Tumgik
#तामिळनाडूत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत नवी दिल्ली : मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची मामल्लापुरम किनारपट्टी ओलांडली आहे. सध्या हे चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर  हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड भाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मन��रपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज यांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांना सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृ���गारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच साबित हुवा। मुझे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भगवे वस्त्र आणि कपाळास टिळा; बाबासाहेब आंबेडकरांवरील फोटो पोस्टमुळे तामिळनाडूत वाद
भगवे वस्त्र आणि कपाळास टिळा; बाबासाहेब आंबेडकरांवरील फोटो पोस्टमुळे तामिळनाडूत वाद
भगवे वस्त्र आणि कपाळास टिळा; बाबासाहेब आंबेडकरांवरील फोटो पोस्टमुळे तामिळनाडूत वाद Dr. Babasaheb Ambedkar post in Tamil Nadu : तामिळनाडू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या एका पोस्टवरुन वादंग निर्माण झाले आहे. यात बाबासाहेबांनी भगवे वस्त्र परिधान केलेले दिसून येत असून त्यांच्या डोक्यावर टिळा देखील आहे. Dr. Babasaheb Ambedkar post in Tamil Nadu : तामिळनाडू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 14 January 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
आज भोगी सण. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी हा सण सर्व देशभरात विविध पद्धतीनं साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आसाम मध्ये बिहू, तामिळनाडूत पोंगल, पंजाबमध्ये लोहडी तर उत्तर भारतात मकर संक्रांत या नावानं हा सण साजरा करण्यात येतो. या सणानिमित्त गुजरात सह काही राज्यात पतंग उडवण्यात येतात. 
****
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ. हुसेन अमीन अब्दुल्लाहीन यांच्यासोबत ते अनेक द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
****
नामांतर हा सामाजिक समतेच्या विजयाचं प्रतिक असल्याचं प्रतिपादन महात्मा गांधी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३० व्या नामविस्‍तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर बोलत होते. प्रकांडपंडित म्हणून जागतिक स्‍तरावर गौरविल्या गेलेल्या भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी नामविस्‍तारावेळी विद्यापीठातील विभागांची संख्या ३० होती, ती आज ४५ पर्यंत पोहचली असल्याचं सांगितलं.
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्‍याविषयी काल ��ेलेल्‍या वक्‍तव्याच्‍या निषेधार्थ कॉग्रेस पक्षाच्‍या वतीन छत्रपती संभाजीनगर इथल्‍या क्रांतीचौकात आज दुपारी निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेस पक्ष शंकराचार्यांचा अपमान सहन करणार नसल्याचं निदर्शनस्थळी सांगण्यात आलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १२ कोटींहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरीकांना देण्यात येते.
दरम्यान, ही यात्रा काल पालघर जिल्ह्यात वसई तालूक्यात सकवार गावात दाखल झाली. गावात यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्धाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच मंत्री राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं.
****
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळं राज्यात येत्या १९ ते २५ जानेवारी दरम्यान थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागानं अंदाज आहे.
****
हिट ॲण्ड रन संदर्भात केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याविरोधात छत्रपती संभाजीनगर इथं मालवाहू रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीने बंद पाळून आंदोलन करण्यात आलं. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर यांच्यावतीनं विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण तपासणीनाक्या जवळ अवैधरित्या वाहतूक केली जाणारी १४ लाख ७४ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी राजस्थान मधील लक्ष्मण रेबारी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एका वाहनासह एकूण २४ लाख ७४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वाहनचोरी आणि दरोड्याचे ३३ गुन्हे दाखल असलेल्या पिता पुत्राच्या जोडीला काल छत्रपती संभाजीनगर शहरातून गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं. या जोडीनं गेल्या वर्षभरात शहरातून नऊ महागडी च���रचाकी वाहनं तसंच जळगाव, अहमदनगर, आणि जालना जिल्ह्यातूनही काही चारचाकी वाहनं चोरली असल्याची कबूली दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात उद्या, सोमवारपासून तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखिका डॉक्टर वंदना शिवा, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. सुदर्शन अय्यंगार आणि बालशिक्षण तज्ज्ञ प्रा. रमेश पानसे हे पुष्प गुंफणार आहेत.
****
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज इंदूर इथं होळकर क्रीडासंकूलात खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
गृहनिर्माण संस्थांसाठीची मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सुलभ.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातल्या उष्माघात बळींची जबाबदारी घेत, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - अंबादास दानवे यांची मागणी.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत रंगकर्मी पॅनलचा मोठा विजय.
आणि
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेसचं राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन.
****
गृहनिर्माण संस्थांसाठीची मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्याअनुषंगानं सहकार विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मानीव अभिहस्तांतरण अभियानातून’ गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे. आकाशवाणीच्या दिलखुलास कार्यक्रमातून त्यांनी ही माहिती दिली. गृहनिर्माण संस्था उभी असलेली जागा गृहनिर्माण संस्थेच्या नावावर होण्याच्या प्रक्रियेला ‘मानीव अभिहस्तांतरण’-डीम्ड कन्व्हेअन्स असं म्हणतात. मानीव अभिहस्तांतरण झाल्याशिवाय गृहनिर्माण संस्थेकडे त्या जागेचा मालकी हक्क येऊ शकत नाही.
भविष्यात गृहनिर्माण संस्थांची पुनर्विकास प्रक्रिया सुलभ होण्यासाठी या प्रक्रियेचं महत्त्व, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत, याबाबत कवडे यांनी यावेळी माहिती दिली.
****
मुंबईतील आरे कॉलनीमधले झाडं तोडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत मुंबई मेट्रोला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने मेट्रो रेल्वे महामंडळाला ८४ झाडे तोडण्याची परवानगी दिली होती, तरी महामंडळाने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अवमान केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणखी झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आल्याचं न्यायालयानं सांगितलं.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेत, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी आज खारघर इथल्या रुग्णालयांत दाखल रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, सांस्कृतिक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीसेवकांना पाणी आणि सावलीसह आवश्यक सुविधा देणं ही आयोजकांची जबाबदारी होती, या सुविधा देणं शक्य नव्हतं, तर खुल्या मैदानावर कार्यक्रम घ्यायला नको होता, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. या आयोजनात योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही, याची चौकशी व्हायला हवी, असं मत पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, हा कार्यक्रम कडाक्याच्या उन्हात न ठेवता सायंकाळी घेण्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली नाही का, असा प्रश्न विचारला आहे. एका ट्विट संदेशात ठाकरे यांनी, भविष्यात अशा घटना होऊ नयेत, आणि प्रशासन अशा चुका करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे.
दरम्यान, या घटनेतील मृतांची संख्या आता १३ झाली असून कळंबोली, वाशी इथल्या रूग्णालयात १० जणांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
****
राज्यातील शाळांनी शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे निकाल अडवून ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश, शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. काही शाळांनी शुल्क वसुलीचा तगादा लावला असून, शुल्क न भरल्यास निकाल देणार नाही तसंच पुढील वर्गात प्रवेशही मिळणार नाही, अशी भीती दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना हे निर्देश देत, पुढील वर्गातील प्रवेशही रोखू नयेत, असं सांगितलं आहे.
****
देशात तूर तसंच उडदाचे साठे जाहीर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ग्राहक कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या या निर्देशांमध्ये राज्य सरकार तसंच जिल्हा प्रशासनांनी या साठ्यांची पडताळणी करण्यास सांगितलं आहे, तसंच बेकायदा साठ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूत केलेल्या सर्वेक्षणातून या साठ्यामध्ये वाढ होत असल्याचं निर्दशनास आलं आहे.
****
अमरनाथ यात्रेच्या ऑनलाईन तसंच ऑफलाईन नोंदणीला आजपासून प्रारंभ झाला. यंदा ही यात्रा एक जुलैला सुरू होऊन ३१ ऑगस्टला तिचा समारोप होईल. १३ ते ७० वर्ष वयोगटातले भाविक यात्रेसाठी नोंदणी करू शकणार आहेत. सहा आठवड्यांपेक्षा अधिक दिवसांच्या गर्भवतींना नोंदणी करता येणार नाही. देशभरात पंजाब नॅशनल बँक, जम्मू काश्मीर बँक, येस बँक तसंच स्टेट बँकेच्या शाखांमध्ये ही नोंदणी करता येणार आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत उद्योग मंत्री उदय सामंत समर्थित प्रशांत दामले यांच्या नेतृत्वातल्या रंगकर्मी पॅनल ने मोठा विजय मिळवला आहे. मुंबईत १४ पैकी १० जागांवर “रंगकर्मी पॅनल”चे उमेदवार विजयी झाले. तर उर्वरित महाराष्ट्रात ५० पैकी ४५ ठिकाणी सामंत यांचा पाठिंबा असलेले उमेदवार विजयी झाले. मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू, आणि आणि नाट्य परिषदेला शिखरावर नेऊ, असा विश्वास रंगकर्मी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
****
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालय समोर काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं.
लातूर शहर आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्यांनी निदर्शनं करत, सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
महारोजगार मेळावा हा रोजगार देण्यासोबतच ग्रामीण भागात उद्योजक घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं उद्‌घाटन केल्यानंतर बोलत होते. युवकांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावं, असं आवाहन कराड यांनी केलं. या मेळाव्यासाठी सुमारे सतराशे युवकांनी नोंदणी केली आहे.
****
बीड जिल्हा परिषद शाळेतले इयत्ता पाचवी ते आठवी वर्गाचे तेहेतीस विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी आज रवाना झाले. या अभ्यास दौऱ्यासाठी बावीस हजार दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांनी केंद्रस्तर, तालुकास्तर, आणि जिल्हास्तर अशा तीन स्तरांवर परीक्षा दिली होती, त्यातून या तेहेतीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
****
हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डमध्ये ऑनलाईन लिलाव पद्धतीला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत रोष व्यक्त केल्याने जवळपास दोन तास लिलाव बंद झाला होता. हिंगोलीसह परिसरातील जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी हळद विक्रीला आणली होती, मात्र शेतकऱ्यांना या लिलावाची कुठलीही माहिती न देता खरेदीदार, आडते यांनी अचानक ऑफलाईनवरुन ऑनलाईन पद्धतीने लिलाव सुरू केल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे आडते, खरेदीदारांना लिलाव बंद करावा लागला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय गाठत ऑफलाईन पद्धतीने लिलाव करण्याची मागणी केली. बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सर्वांशी एकत्रित चर्चा केली. त्यानंतर ऑफलाईल लिलावाला सुरूवात झाली. दरम्यान, बाजार समितीत आज हळदीच्या दहा हजार कट्ट्यांची आवक झाल्याची सचिव नारायण पाटील यांनी दिली
****
महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं महाज्योतीच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सर्व संशोधक विद्यार्थ्यांना पीएच डीच्या नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती - फेलोशीप देण्यात यावी यामागणीसह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे
****
धुळे जिल्हा पोलिस दलाच्या मोहाडी पथकानं शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले साडे अकरा लाख रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. या प्रकरणी एरंडोल इथून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अहमदनगर इथं २० ते २३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेसाठी लाल मातीचा आखाडा सज्ज करण्यात आला आहे. ही स्पर्धा माती तसंच गादी विभागात रंगणार आहे. विजेत्या मल्लाला हॉलमार्क असलेली २४ कॅरेटची पाचशे ग्रॅम वजनाची सोन्याची गदा बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.
****
0 notes
Text
तामिळनाडूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून तोडफोड
https://bharatlive.news/?p=83625 ��ामिळनाडूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला फटका, हिवाळ्यात विदर्भात पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्याची स्थिती काय?
मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला फटका, हिवाळ्यात विदर्भात पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्याची स्थिती काय?
मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला फटका, हिवाळ्यात विदर्भात पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्याची स्थिती काय? Maharashtra Rain Alert : हिमालयातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळंही काही भागांत थंडी वाढण्याची शक्यता असून तामिळनाडूत धडकलेल्या चक्रिवादळामुळं विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. Maharashtra Rain Alert : हिमालयातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळंही काही भागांत थंडी वाढण्याची…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका; “या” ठिकाणी होणार चक्रीवादळाचा परिणाम
राज्यात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका; “या” ठिकाणी होणार चक्रीवादळाचा परिणाम
राज्यात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका; “या” ठिकाणी होणार चक्रीवादळाचा परिणाम मुंबई : दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरामधून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वादळी वारे देखील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार
Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार
Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार चेन्नई :- अण्णा द्रमुक पक्षाचे तामिळनाडूत सध्या दोन गट कार्यरत आहेत. यातील एक गट पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या दोन्ही गटांना एकत्र आणून जयललितांचा राजकीय वारसा भक्कम करण्याचा निर्धार दिवंगत जयललितांच्या निकटच्या सहकारी शशिकला यांनी व्यक्त केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes