#१६ ठिकाणी छापे
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरची सुनावणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार
बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीची कारवाई; मुंबईसह सहा ठिकाणच्या कार्यालयांवर छापेमारी
· १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं १२ ते १७ जानेवारी दरम्यान नमो चषक २०२४ स्पर्धेचं आयोजन
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरची सुनावणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. या याचिकेसंदर्भातली कागदपत्रं आणि पुरावे आजपासून संकलित केली जाणार असून, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर १६ जानेवारीला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर २० आणि २३ जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी तसंच उलटतपासणी होईल. तर, २५ आणि २७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून अखेरचा युक्तिवाद केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ३१ जानेवारीपर्यंत याबाबत निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
****
नाशिक इथं नियोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या 'शेकरू' या शुभंकराचं, बोधचिन्हाचं तसंच बोधवाक्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दूरद��श्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण झालं. या महोत्सवाचं १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
****
मराठवाडा आणि विदर्भासाठी वैधानिक विकास महामंडळ तत्काळ पुनर्स्थापित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात, महामंडळांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि मराठवाडा तसंच विदर्भातल्या जनतेला न्याय द्यावा, असं म्हटलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या बारामती ॲग्रो कंपनीतल्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या पथकाने काल मुंबईसह सहा ठिकाणी छापे मारले. बारामती ॲग्रो ही कंपनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीची असून, बारामती तालुक्यात पिंपळी इथं या कंपनीचं मुख्यालय आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी काल, सकाळपासून कंपनीच्या सहा कार्यालयात तपास मोहिम सुरू केली. याप्रकरणी गेल्या वर्षी रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी माय जीओव्ही पोर्टलवर एक कोटीपेक्षा अधिक नोंदणी झाल्याचं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान परवा सोमवारी, आठ जानेवारीला विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
या यात्रेत गेल्या ५० दिवसांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संख्येनं १० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लाभार्थ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना घेऊन जात आहे.
**
ही यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात विश्रांती चौक इथं पोहोचली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधला. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती.
या यात्रेत काल नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. त्यांनी आपले अनुभव त्यांनी या शब्दांत कथन केले...
****
सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना, नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात काल १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सावंत यांच्या हस्ते घंटा वाजवून शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरवला जावा, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली. खासदार श्रीन��वास पाटील, संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात काल कोरोनाच्या १४ हजारांहून अधिक चाचण्यांमधून १४६ नव्या रुग्णांचं निदान झालं आणि १२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात ९३१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातले ९५ टक्के गृहविलगीकरणात आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे सात नवे रुग्ण आढळून आले.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना यानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अविष्कार महोत्सवाचं उद्घाटन काल उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते झालं. आजच्या परिस्थितीत विद्यापीठीय चौकटीच्या बाहेर विचार, संशोधन आणि कृती करणाऱ्यांसाठी सुवर्णकाळ असल्याचं, भोगले यावेळी म्हणाले. दोन दिवसीय या महोत्सवात ३७० संघानी नोंदणी केली असून, ५६७ संशोधकांचा समावेश आहे. या स्पर्धेतून ४८ संघाची निवड राज्यस्तरीय अविष्कार महोत्सवासाठी होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल मराठ्यातल्या पाच लघु चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं. मराठवाड्यातल्या युवा कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, या उद्देशानं मराठवाडा आर्ट कल्चर आणि फिल्म फाउंडेशनच्या वतीनं ही लघुपट स्पर्धा घेण्यात आली.
****
धाराशिव इथं हिरकणी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. आमदार राणा जगजितसिंह पा���ील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या पाच दिवसीय महोत्सवात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे १५० स्टॉल्स मांडण्यात आले असून महिलांसाठी उद्योजकीय तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिंपिक संघटनेच्या वतीने जिल्ह्यात येत्या १२ ते १७ जानेवारी दरम्यान नमो चषक २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ॲथलेटिक्स, जम्परोप, डॉजबॉल, धनुर्विद्या सारख्या नव्या क्रिडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ५१ क्रीडा प्रकारात २५ हजारांपेक्षा अधिक खेळाडू दोन हजार पंच स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती कराड यांनी दिली.
****
नवी मुंबईत झालेल्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाचा ��ऊ खेळाडू राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं १��२ धावांचं लक्ष्य भारतीय महिलांनी ४८व्या षटकात पूर्ण केलं. शेफाली वर्मानं ६४, स्मृती मंधानानं ५४ धावा केल्या. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर इथं विशेष मतदार नोंदणी शिबीरात तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली. या समाज घटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे कागदपत्रं नसली, तरी मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती, उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
****
हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड भागात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल एका घरावर छापा टाकून जवळपास चार लाख किमतीचा २० किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माळेगाव इथली यात्रा दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रेत कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल तसंच लावणी महोत्सव होणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ही यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याचं त्या म्हणाल्या.
****
0 notes
Text
तामिळनाडूत एनआयएचे १६ ठिकाणी छापे
तामिळनाडूत एनआयएचे १६ ठिकाणी छापे
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काही दिवसांपूर्वीच छापेमारी करत तामिळनाडूमध्ये एका अशा संघटनेच��� पर्दाफाश केला होता की, जी देशात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होती. या दहशतवाद्यांनी अंसारूल्ला नावाने संघटना बनवली होती. या प्रकरणी आज, शनिवारी एनआयएच्या पथकाने मोठी कारवाई करत तामिळनाडूच्या १६ ठिकाणी छापेमारी केली. यात मोहम्मद शेख यांच्या घरावरही एनआयएच्या पथकाने छापा टाकला.
एनआयएने ९ जुलै रोजी…
View On WordPress
0 notes
Text
मनीष सिसोदियांच्या निवासस्थानी ‘सीबीआय’चे छापे; केजरीवाल सरकारच्या मद्यविक्री धोरण गैरव्यवहारप्रकरणी १६ जणांविरोधात गुन्हे
मनीष सिसोदियांच्या निवासस्थानी ‘सीबीआय’चे छापे; केजरीवाल सरकारच्या मद्यविक्री धोरण गैरव्यवहारप्रकरणी १६ जणांविरोधात गुन्हे
मनीष सिसोदियांच्या निवासस्थानी ‘सीबीआय’चे छापे; केजरीवाल सरकारच्या मद्यविक्री धोरण गैरव्यवहारप्रकरणी १६ जणांविरोधात गुन्हे दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील (मद्यविक्री धोरण) कथित गैरव्यवहारांप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह सात राज्यांतील २१ ठिकाणी शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले. नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील…
View On WordPress
#१६#आंतर राष्ट्रीय मराठी बातम्या#आंतरराष्ट्रीय#आंतरराष्ट्रीय बातम्या#केजरीवाल#गुन्हे#गैरव्यवहारप्रकरणी#छापे;#जणांविरोधात#धोरण#निवासस्थानी#भारत लाईव्ह मीडिया इंटरनेशनल#��द्यविक्री#मनीष#मराठी वल्ड न्यूज#वैश्विक बातम्या#सरकारच्या#सिसोदियांच्या#सीबीआयचे
0 notes
Text
राज्यात आयकरच्या धाडी
मुंबई : राज्यात जवळपास ४० ठिकाणी आज आयकर विभागाने धाडी टाकल्या असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांचे चार्टर्ड अकाऊंटंटसह इतर निकटवर्तीय आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. ४० ठिकाणी सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये २५ निवासस्थाने, कार्यालये आणि पंचतारांकित हॉटेल्स आहेत. याशिवाय कर्नाटकातही धाडी टाकण्यात आल्या. या धाडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याशी संबंधित नातेवाईकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. पुण्यातील उद्योजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात ४० ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, जालना, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरसह जवळपास ४० ठिकाणी हे छापे टाकले. मुंबईतील एका हॉटेल्सच्या काही सुट्सवरही छापे टाकण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापा टाकण्यात आला. यात त्यांच्या ३ बहिणींशी संबंधित कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यतिरिक्त कर्नाटक, बेंगळुरू येथेही आयकर विभागाचे छापे टाकले. याआधी आयकर खात्याने मुंबईत ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पहाटे ५ वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. त्यांच्या अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील १६ व्या मजल्यावरील घरावर छापे टाकले. संजय कदम हे ��निल परब यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या निवासस्थानीही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. Read the full article
0 notes
Photo
माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण याच्या घरासह १६ ठिकाणी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकानचे छापे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण याच्या घरासह १६ ठिकाणी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने छापे टाकले.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 05 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातल्या अपात्रता याचिकांवर सुनावणी��ं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून निश्चित
मराठवाडा आणि विदर्भासाठी वैधानिक विकास महामंडळ पुनर्स्थापित करण्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
बारामती ऍग्रो कंपनीतल्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे मुंबईसह सहा ठिकाणी छापे
आणि
अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या धुळे जिल्ह्यातल्या सात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणीचं कामकाज २७ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उद्या सहा ते २७ जानेवारी दरम्यानच्या या सुनावणीचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून अंतिम करण्यात आलं आहे. उद्यापासून याचिकेसंदर्भातली कागदपत्रं आणि पुरावे जमा करण्यास सुरुवात होणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर १६ जानेवारीला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर २० आणि २३ जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी, उलटतपासणी घेतली जाईल. तर, २५ आणि २७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तिवाद मांडला जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते, त्यामुळे २७ जानेवारीला अंतिम युक्तिवादाचं कामकाज संपवून ३१ जानेवारीपर्यंत याबाबतचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत या कार्यक्रमाद्वारे दोन कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
****
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भातला प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागानं तयार करावा; त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातल्या विविध विकासकामांचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं पवार म्हणाले.
****
चालू गाळप हंगामासह पुढच्या दोन हंगामांकरता गाळप हंगामाच्या करारात ३४ टक्के वाढ झाली आहे. यामुळे ऊस तोडणी मजुरांना टनामागे २७४ ऐवजी ३६७ रुपये मजुरी मिळेल. याशिवाय मुकादम कमीशनमध्ये एक टक्का वाढ करुन हे कमिशन आता २० टक्के होईल. पुण्यातल्या साखर संकुलात झालेल्या बैठकीत साखर उद्योगाचे प्रतिनिधी आणि साखर संघाच्या सदस्यांची बैठक झाली, त्यात हा तोडगा मान्य झाल्याचं खासदार शरद पवार यांनी समाज माध्यमावर सांगितलं. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्यासह आठ संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
****
मराठवाडा आणि विदर्भासाठी वैधानिक विकास महामंडळ तत्काळ पुनर्स्थापित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात, महामंडळासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि मराठवाडा तसंच विदर्भातल्या जनतेला न्याय द्यावा, असं म्हटलं आहे. या दोन्ही विभागातल्या जनतेला आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, पर्यटन, लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल अशी नागपूर कराराप्रमाणे अपेक्षा होती, मात्र या अटींचं पालन न केल्यानं विदर्भ आणि मराठवाडा मागास राहिला, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या बारामती ऍग्रो कंपनीतल्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय-ईडीच्या पथकाने आज मुंबईसह सहा ठिकाणी छापे मारले. बारामती ऍग्रो ही कंपनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीची असून, बारामती तालुक्याच्या पिंपळी इथं या कंपनीचं मुख्यालय आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आज, सकाळपासून बारामती ऍग्रोच्या सहा कार्यालयात तपास मोहिम हाती घेतली. याप्रकरणी गेल्या वर्षी रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती.
****
अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या आणि त्याचं नामकरण "महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम" असं करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली.
भूविज्ञान मंत्रालयाच्या चार हजार ७९७ कोटी रुपयांच्या, पृथ्वी विज्ञान योजनेला देखील केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी, आठ जानेवारीला विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील. सरकारच्या विविध प्रमुख योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशानं, संपूर्ण देशभरात सध्या विकसित भारत संकल्प यात्रा काढली जात आहे.
****
ही यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात विश्रांती चौक इथं पोहोचली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधला. नागर��कांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती.
या यात्रेत विविध भागातल्या लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - अशोक घोडके, सुनंदा सोनवणे, जि.छत्रपती संभाजीनगर आणि भारत कांबळे, राजेंद्र मेश्राम जि.अकोला
****
ॲलोपेथी औषधांचा साठा बाळगून अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या धुळे जिल्ह्यातल्या सात बोगस डॉक्टरांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात आज गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या डॉक्टरांकडून ॲलोपॅथी औषधी साठा, इंजेक्शन, सलाईन, गोळ्या तसंच अन्य साहित्य जप्त करण्यात आलं.
****
हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड भागात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे एका घरावर छापा टाकून जवळपास चार लाख किमतीचा २० किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
****
राज्यातले ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या स्मृतींवर आधारित डॉ. उमाकांत राठोड संपादीत 'कॉम्रेड कुमार शिराळकर : माणुसपणाच्या वाटेवरचा प्रवासी' या हस्तलिखित पुस्तकाचं प्रकाशन परवा सात जानेवारीला छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. सृजन सांस्कृतिक आणि सामाजिक फोरमच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम शहरातल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिंपिक असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यात येत्या १२ ते १७ जानेवारी दरम्यान नमो चषक २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ॲथलेटिक्स, जम्परोप, डॉजबॉल, धनुर्विद्या सारख्या नव्या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ५१ क्रिडा प्रकारात २५ हजारांपेक्षा अधिक खेळाडू दोन हजार पंच स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती कराड यांनी दिली.
****
��ारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नवी मुंबईत डि वाय पाटील मैदानावर खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल.
****
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माळेगाव इथली यात्रा दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रेत कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल तसंच लावणी महोत्सव होणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागून पाच डबे भस्मसात;सुदैवाने जीवितहानी नाही
अपघातांचं प्रमाण कमी करण्यासा��ी जाणीवजागृती करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऊसतोड कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध
आणि
ऑलिंपिक खेळांमध्ये टी ट्वेंटी क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करायला मंजुरी
****
अहमदनगर आष्टी या रेल्वे गाडीला अहमदनगर जिल्ह्यातल्या शिरडोह इथं आज भीषण आग लागली. या आगीत रेल्वेचे पाच डबे खाक झाले. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलं नसल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी जनतेमध्ये जाणीवजागृती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. बेदरकारपणे वाहन चालवून इतरांचे जीव धोक्यात आणणाऱ्यांविरोधात कारवाईचे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले. ते म्हणाले -
हे अतिशय गंभीर आहे. आणि निश्चितपणे अशा प्रकारे अनेकांचे जीव जे धोक्यात घालतात, त्यांच्यावर कारवाई ही करावीच लागेल. या व्हिडिओचीही गंभीर दखल घेतली जाईल. एकीकडे अशा प्रकारचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि दुसरीकडे जाणीव जागृती कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करावा लागेल.
राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी समिती निर्माण केल्या असून सातत्याने या समितीच्या कामगिरीचं पर्यवेक्षण चालू असतं. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त या समितीचे सदस्य असतात, त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा अंमली पदार्थ विरोधी कारवाई राज्यात चालूच राहणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा बैठक घेतली. राज्यातील तरुणांना रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
****
कोविड काळात आवश्यक उपकरणांच्या खरेदी - विक्रीत अनियमितता प्रकरणात आज प्राप्तिकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली, प्रयागराज या शहरांसह गुजरातमध्ये काही ठिकाणी छापे घातले. कोविड काळात मुंबई महानगर पालिकेसोबत करार केलेल्या कंपन्यांच्या कार्यालयांवर ही कारवाई केल�� जात आहे. सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना यापूर्वीच अटक केली आहे.
****
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसून मंत्रिमंडळाच्या गेल्या काही बैठकांमध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर कुठलीच चर्चा नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही कोणत्याच समाजाला या सरकारने आरक्षण दिलेलं नाही, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे, असं मत पटोले यांनी व्यक्त केलं.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता विद्यार्थ्यांचे स्वयंचलित स्थायी शैक्षणिक नोंदणी-ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक रेजिस्ट्री-अपार ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अपार ओळखपत्राद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार असून, विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास त्यात साठवला जाणार आहे. मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने आजपासून तीन दिवसात विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
****
ऊसतोड कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात गोदावरी तांडा इथं आज गोर सेनेतर्फे ऊसतोड कामगार महामेळावा घेण्यात आला, या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे, गोर ऊसतोड कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इतर कामगारांप्रमाणे ऊसतोड कामगारांसाठी माध्यान्ह भोजन योजना राबववण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी स्वाधार योजनाही लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं पाटील म्हणाले.
संजय राठोड यांनी यावेळी बोलताना, गर्भवती ऊसतोड कामगारांना ६ महिन्याचे वेतन, तसंच ऊसतोड कामगाराचा मृत्यू किंवा ते जखमी झाल्यास त्यांना किंवा वारसांना एक सन्मानजनक निधी देण्याचा प्रस्ताव सरकारला देणार असल्याचं सांगितलं.
****
ऑलिंपिक खेळांमध्ये टी ट्वेंटी क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करायला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेनेने मंजुरी दिली आहे. समितीच्या मुंबईत सुरु असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉस एंजेलिस इथं २०२८ मध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स मध्ये आता टी ट्वेंटी क्रिकेट, बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल, लॅक्रोज, फ्लॅग फूटबॉल आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं आज सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासमोर २१० धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुसल परेरानं सर्वाधिक ७८ तर पाथूम निसांकानं ६१ धावा केल्या. श्रीलंकेचा संघ ४४ व्या षटकांत २०९ धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम जम्पानं सर्वाधिक चार, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन तर मॅक्सवेलने एक गडी बाद केला.
****
ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला जालना पोलिसांनी दिल्ली इथून अटक केली. नीरजकुमार शर्मा असं आरोपीचं नाव असून, त्याने सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. जालना जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने इंडिया मार्ट या ॲपवर विविध वस्तू खरेदीसाठी पैसे भरले होते, मात्र त्यानंतरही वस्तू देण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानं त्याने पोलिसांत तक्रारी दाखल केली. सायबर शाखेच्या पोलिस पथकाने सदर आरोपीला दिल्लीहून अटक करत, त्याच्या ताब्यातून आठ मोबाईल, नऊ सीमकार्ड, विविध कंपन्यांच्या नावाने बनावट स्टँप, आदी साहित्य जप्त केलं आहे. त्याला न्यायालयानं उद्या १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला कोल्हापूर इथल्या अंबाबाई देवीची आज महागौरी रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांसह अन्य ठिकाणहून भाविकांनी मोठी गर्दी केली. आज पुणे पिंपरी चिंचवड, चाकण, सासवड भागातील महिलांचे समूह एकत्रित देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरात दाखल झाले होते.
धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार पूजेस परवापासून प्रारंभ होणार आहे. परवा रथ अलंकार महापूजा, १९ ऑक्टोबरला ललीत पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, २० ऑक्टोबर रोजी शेषशायी अलंकार महापूजा तर २१ ऑक्टोबरला भवानी तलवार अलंकार महापूजा बांधली होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत आज धाराशिव तालुक्यातील १२२ गावातून आणलेल्या मातीच्या कलशाची धाराशिव शहरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर १२२ गावातील मातीचे एकत्रीकरण करून नेहरू युवा केंद्राकडे कलश सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना शपथही देण्यात आली.
****
माझी माती-माझा देश या अभियान��ंतर्गत सातारा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांहून जमा करण्यात आलेली माती आणि तांदूळ आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या अभियानाच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले. या मातीने भरलेले अमृत कलश मुंबईकडे रवाना केले जाणार असून तिथून ते दिल्लीला पाठवले जाणार आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ‘एनआयए’, ‘इडी’ची औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेडसह विविध ठिकाणी कारवाई, राज्यभरात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या २० सदस्यांना अटक.
महाविकास आघाडी सरकारनं केंद्रीय योजना लागू करण्यामध्ये उशीर केला - निर्मला सीतारामन यांचा आरोप.
मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली.
आणि
नाथसागराच्या विसर्गात वाढ, गोदावरी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा.
****
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा - ‘एनआयए’ आणि अंमलबजावणी संचालनालय - ‘ईडी’नं आज राज्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेडसह विविध ठिकाणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया – पीएफआय’ या संघटनेच्या २० जणांना अटक केली. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर रहमान याना मालेगाव शहरातून त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये कायम शेख आणि राजी अहमद खान या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्यांविरुद्ध औरंगाबाद, नांदेड, मुंबई, नाशिक इथं गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. औरंगाबाद इथं दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक संदीप खाडे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले –
राज्याचे दहशतवाद विरोधी पथकास जी गोपनीय माहिती मिळाली होती त्यामध्ये असं समजून आलं होतं की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते हे राष्ट्र विरोधी कारवायामध्ये लिप्त आहेत. सदर गोपनीय माहिती पडताळून पाहण्यात आली. अशी माहिती पडताळून पाहण्यात आल्यानंतर आणि तिची खात्री झाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेलं आहे. दहशतवादी विरोधी पथकाने औरंगाबाद, नांदेड, जळगाव त्याचप्रमाणे पुणे, ठाणे इतरत्र ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत. आतापर्यंत वीस अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई आणि पुढील तपास चालू आहे.
देशभरात दहा राज्यांमधल्या ‘पीएफआय’च्या कार्यालयांवर छापे टाकून संघटनेच्या एकूण १०६ सदस्यांना आज अटक केली असून ‘एनआयए’नं केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून दुपारपर्यंत ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१७ कोटी १९ लाखांच्या वर गेली आहे. त्यात १९ कोटी ८६ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज दुपारपर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६८ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ८९ लाख ५३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे. दरम्यान, देशात काल नव्या पाच हजार ४४३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच हजार २९१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४६ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा करत आहेत. बारामती राज्यातल्या ���६ लोकसभा मतदार संघांमध्ये आहे जिथं पक्ष आपला जनाधार बनवण्याचा विशेष प्रयत्न करत आहे. आपल्या या दौऱ्याला २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून नव्हे तर संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मानावं, असं सितारामन यानिमित्त आज कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाल्या. बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं केंद्रीय योजना लागू करण्यामध्ये उशीर केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला. सक्तवसुली संचालनालयासारख्या केंद्रीय संस्थांचा सरकार दुरुपयोग करत असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या आरोपांचं त्यांनी यावेळी खंडन केलं. केंद्रीय तपास संस्था कोणत्याही प्रकरणाच्या पहिल्या टप्प्यात हस्तक्षेप करत नसून पोलीस अथवा अन्य संस्थांना एखाद्या प्रकरणात काळा पैसा अथवा त्यासारखे गैरव्यवहार आढळून आल्यावर केंद्रीय तपास संस्थांची भूमिका सुरू होत असल्याचं सितारामन म्हणाल्या.
****
मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारल्याचं महापालिकेकडून जारी केलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
****
प्राध्यापकांच्या समस्यांबाबत आणि सर्व मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करून ‘इंडियन नेट-सेट असोसिएशन’- ‘इन्सा’ला लवकरच चर्चेसाठी बोलवू असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रालयात यासंबंधी झालेल्या बैठकीत बोलत होते. ‘नेट- सेट’ धारक तसंच प्राध्यापकांच्या समस्यांबाबत विविध मागण्यांचं निवेदन ‘इन्सा’चे अध्यक्ष डॉ.कमलाकर पायस यांनी आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं.
****
देशासह राज्यातही परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पैठण इथल्या नाथसागराच्या विसर्गात आज सकाळी वाढ करण्यात आली आहे. नाथसागर धरणाची अठरा दारं आता दोन फुट उंचीवर स्थिर करुन ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळं पाटबंधारे विभागानं गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
****
ज्येष्ठ दिग्दर्शक, पटकथाकार सतीश आळेकर यांना यंदाचा ‘विष्णूदास भावे पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते आळेकर यांना सांगली इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गौरवपदक, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती मार्फत गेली ५४ ��र्ष हा पुरस्कार दिला जातो.
****
नांदेड जिल्ह्यात साजरा होत असलेल्या सेवा पंधरवाड्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्येच विविध प्रमाणपत्र मिळणार आहेत. या अनुशंगानं देगलूर आणि मुखेड तालुक्यातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना महसुल विभागामार्फत देण्यात येणारी विविध प्रमाणपत्रं मिळणार असल्याचं देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी कळवलं आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं संबंधित शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी संकलित करुन उद्यापासून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शाळेजवळ असलेल्या सेतू सुविधा केंद्राकडे द्यावीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्ह्यातला औंढा तालुका अतिवृष्टी अनुदानात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज औंढा ��थं तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. पीक कर्ज माफ करा, पीक विमा मंजूर करुन त्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम द्या, आदी मागण्याही यावेळी आंदोलकांनी केल्या. औंढा तालुका अतिवृष्टी अनुदान यादीत समाविष्ट करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे राष्ट्रीय पोषणमाह अंतर्गत ‘पोषण भी, पढाई भी’ हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत ‘ई आकार’ या उपक्रमाला चालना देण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण प्रकल्प एक मधील करमाड आणि सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव मधील ४५ अंगणवाडी मदतनीसांना मोबाईल वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी करमाड मधील २२ अंगणवाडी मदतनीसांना आज मोबाईलचं वितरण करण्यात आलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा आखण्यासाठी माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रस्तरीय समितीची स्थापना.
भारत बायोटेक कंपनीकडून विकसित नाकाद्वारे घेण्याच्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारची मंजुरी.
क्रिकेटपटू सुरेश रैनाची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना.
आणि
औरंगाबाद इथं येत्या तेरा ते सतरा सप्टेंबर या कालावधीत मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीराचं आयोजन.
****
राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा आखण्यासाठी राष्ट्रस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आज ही घोषणा करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत देशभरातले सत्तेचाळीस सदस्य आहेत. या सदस्यांमध्ये सहकार क्षेत्रातले तज्ज्ञ; राष्ट्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरच्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, सहकार सचिव तसंच राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सहकारी संस्थांचे निबंधक, यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, सहकारातून समृद्धी, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे नवीन सहकार धोरण आखलं जात आहे. सहकार चळवळ मजबूत करणं आणि सहकारावर आधारित आर्थिक विकास योजनांना प्रोत्साहन देणं, हे या धोरणाचं उद्दिष्ट असणार आहे.
****
भारत बायोटेक कंपनीकडून विकसित, नाकाद्वारे घेण्याच्या कोविड प्रतिबंधक लसीच्या, नियंत्रित वापराला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एका ट्विटमधून आज ही माहिती दिली. आणीबाणीच्या स्थितीत, अठरा वर्षांहून जास्त वयाच्या रुग्णांना ही लस घेता येईल. यामुळे भारताचा कोविडविरुद्धचा लढा अधिक मजबूत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ७ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१३ कोटी ७९ लाखाच्या वर ��ेली आहे. आतापर्यंत १६ कोटी ८८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची मात्रा घेतली आहे.
राज्यात आज सकाळपासून १७ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६१ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ८४ लाख ८१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय- ईडीने आज देशभरात अनेक ३० हून ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंबई, दिल्ली आणि गुरुग्रामसह पंजाब आणि उत्तरप्रदेशातल्या शहरांमध्ये हे छापे घालण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रेल्वे गाडीला दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास आयआरटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिलं जातं. शताब्दी, राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार असल्याची माहिती ‘आयआरटीसी’कडून देण्यात आली.
****
येत्या सतरा तारखेनंतर विविध पक्षांतले अनेक जण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा, राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे. ते आज सोलापूर इथे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर शहर उपाध्यक्ष विशाल कल्याणी यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
क्रिकेटपटू सुरेश रैना यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. देशाच्या तसंच उत्तर प्रदेशच्या क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणं ही आपल्यासाठी खूप सन्मानाची बाब होती, असं त्याने म्हटलं आहे. सुरेश रैनानं आपल्या तेरा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत भारतासाठी अठरा कसोटी सामने, दोनशे सव्वीस एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि अट्ठ्याहत्तर टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रैनानं पाच हजार सहाशे पंधरा आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक हजार सहाशे चार धावा केल्या आहेत. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात असलेल्या रैनाने आयपीएल क्रिकेट मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून दोनशे पाच सामने खेळत पाच हजार पाचशे अट्ठावीस धावा केल्या आहेत.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर गटात भारताची लढत श्रीलंकेसोबत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरवात होईल. या स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणी हिंदी आणि इंग्रजीतून करणार आहे.
****
पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ येत्या तेरा ते सतरा सप्टेंबर या कालावधीत औरंगाबादमध्ये मोफत प्लास्टिक सर��जरी शिबीर घेण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा, महात्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्यानं शहरातल्या एन वन सिडको इथल्या लायन्स नेत्र रुग्णालयात येत्या तेरा तारखेला हे शिबीर सुरू होणार आहे. ��ॉक्टर शरदकुमार दीक्षित यांनी औरंगाबादमध्ये सुरू केलेल्या निशुल्क प्लॅस्टिक सर्जरी शिबिराचं हे शेहेचाळीसावं वर्ष असून, गेल्या पंचेचाळीस वर्षांत या शिबिरांमधून तेरा हजार चारशे छत्तीस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य आणि सहकारी डॉक्टर राज लाला यांनी या शिबिराचं काम नियमितपणे सुरू ठेवलं आहे.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान आज सात महत्त्वाचे करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात आज नवी दिली इथे द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या करारांमध्ये भारत-बांगलादेशादरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्र तसंच अंतराळ तंत्रज्ञानक्षेत्रात सहकार्य, प्रसार भारती आणि बांगलादेश टीव्ही यांच्यात सहकार्य यासह अनेक करारांचा समावेश आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी संयुक्तपणे मैत्री सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा पहिल्या संच कार्यान्वित केला. या प्रकल्पातून बांगलादेशच्या राष्ट्रीय ग्रीडमध्ये एक हजार ३२० मेगावॅट वीज देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही देशातला संपर्क वाढण्याच्या दृष्टीनं बनलेल्या पाच किलोमीटर लांबीच्या रूपा रेल्वे पुलाचंही उद्घाटन दोन्ही नेत्यांनी आज केलं.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या धसवाडी गावात जनावरांमध्ये लंपी स्कीन रोगाचा प्रार्दुभाव दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अंबाजोगाई शहरात मंगळवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी हे आदेश दिले. बाधित जनावरांच्या पालकांनी पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन अंबाजोगाई बाजार समितीचे प्रशासक गोविंद देशमुख यांनी केलं आहे.
****
शासनानं बंदी घातलेला मांगूर मासा असलेला ट्रक औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या पोलिसांनी पकडला आहे. या ट्रकमध्ये असलेला सुमारे दोन टन मत्स्यसाठा गंगापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नष्ट केला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत लवकरच निर्णय घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
· औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय, क्रीडा विद्यापीठ स्थापनेस ही मान्यता
· मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाकडून मध्यरात्री अटक
· “हर घर तिरंगा” मोहिमेत देशवासियांनी भाग घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
· १६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर आता बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८४९ रुग्ण, मराठवाड्यात ६८ बाधित
· बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन मध्ये अचिंता शेऊली आणि जेरेमी लालरिनुंगाला सुवर्णपदक. बिंदिया राणीला रौप्य पदक
अणि
· भारत - वेस्ट इंडीजमध्ये आज दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना
****
मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनं बाधित शेतकरी, नागरिकांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी काल पाऊस, अतिवृष्टी, पीकपाणी आणि विकासकामांचा विभागीय आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टी बाधित शेतजमिनींचे दोन ते तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं हे राज्य शासनाचं उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांना बँकांचं कर्ज तातडीनं उपलब्ध करुन देण्यात यावं, आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. औरंगाबाद इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयासह या बैठकीतल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले…
‘‘संभाजीनगर येथे जे क्रीडा विद्यापीठ आहे ते क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर वेरुळ घृष्णेश्वर काही डेव्हलपमेंट मागणी येथे आली होती. नांदेड शहराच्या रस्त्यांच्याबाबतीमध्ये नगरोत्थान मधून काही प्रस्ताव पाठवलेले आहेत. परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईल त्यासाठी जे काही आपल्याला त्याच्यात अडचणी आहेत, त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. त्याचबरोबर नांदेड जालना समृध्दी हायवे आहे तो झाला पाहिजे. त्या तिथल्या लोकांना त्याचा बेनीफीट होईल. नांदेडमध्ये भुमीगत गटार योजना जी आहे, ती मंजूर करण्यात येईल. औंढानागनाथ मंदीरासाठी विकास निधी, जिल्हा सामान्य रुग्णालय जे लातूरचं आहे, त्याच्यामध्ये मोफत जमीन त्यासंदर्भात ज्याकाही अडचणी आहेत, त्या आपण दूर करु. घाटी जे हॉस्पीटल आहे, त्याचं प्रायव्हटायझेशन होता कामा नये. त्याचा सकारात्मक निर्णय आपण घेतलेला आहे.’’
****
औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे आता औरंगाबादच्या रहिवाशांना लवकरच एक दिवसाआ�� पाणीपुरवठा करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. १०० कोटी रुपये खर्चाच्या पडेगाव ते समृद्धी महामार्गासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्या गटात किंवा भारतीय जनता पक्षात येऊ नका, असं उपरोधिक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.
दरम्यान, काल सकाळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं ग्रामदैवत संस्थान गणपतीचं दर्शन घेऊन औरंगाबाद दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर खंडेलवाल दिगं��र जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरात आचार्य श्री पुलकसागर यांची त्यांनी भेट घेतली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं औरंगाबाद इथं राज्यस्तरीय व्यापार परिषदेला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. वस्तू आणि सेवा कर जीएसटी, प्लास्टिक बंदी आणि बाजार समिती एपीएमसी कायदा हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांनी काल रात्री सिल्लोड इथं जाहीर सभेला संबोधित केलं. राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसंच औरंगाबाद शहरातल्या टी.व्ही.सेंटर परिसरातल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
महसूल विभागाचा आकृतिबंध आणि पदभरतीसंदर्भात मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेनं काल मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिलं. महसूलव्यतिरिक्त अधिकच्या कामांमुळे कर्मचाऱ्यांच्या तणावात वाढ होत आहे. जुना आकृतिबंध आणि रिक्त पदांमुळे कामं मुदतीत पूर्ण होत नसल्यानं नवीन आकृतिबंध मंजूर होईपर्यंत सध्या मंजूर असलेली १०० टक्के पदं तात्काळ भरण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
मराठा समाजातल्या सामाजिक आणि अर्थिकदृष्या मागास तरुणांना संबंधित प्रवर्गांमधून नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलं.
****
औरंगाबाद नामांतरासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. शहराचं नाव बदलण्यात येऊ नये, अशा आशयाचं निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलं. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचंच असेल, तर नवीन शहर स्थापन करा. त्याचं आम्ही स्वागत करू, असं खासदार इम्तियाज माध्यमांशी बोलताना म्हणाले.
****
मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीनं मध्यरात्री अटक केली. काल सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरी दाखल होत त्यांची चौकशी सुरू केली होती. नऊ तास चौकशी केल्यानंतर पथकानं त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर परत त्यांची चौकशी करुन अखेर मध्यरात्री अटक करण्यात आली. आज सकाळी साडे अकरा वाजता राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक निदर्शनं करत असून, पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे.
****
१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित “हर घर तिरंगा” या मोहिमेत देशवासियांनी भाग घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात��न पंतप्रधानांनी काल देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा ९१वा भाग होता. या काळात, आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा किंवा आपल्या घरात लावावा. दोन ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावून मोहिमेत उत्साह भरावा, असं ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानं आता एका लोकचळवळीचं रूप घेतलं आहे. विविध क्षेत्रांतले, समाजाच्या प्रत्येक वर्गातले लोक यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत हे उत्साहवर्धक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
****
१६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, मात्र आजच्या कामकाज तालिकेमध्ये या याचिकांचा समावेश केलेला नाही, त्यामुळे ही सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८४९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४७ हजार ४५५ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १०४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल एक हजार ८५३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ८६ हजार ३४८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ टक्के झाला आहे. राज्यात सध्या १३ हजार तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या बीए फोर प्रकाराचे १०, बीए फाईव्ह प्रकाराचे ५२, तर बी ए टू पॉईंट सेवन फाईव्हचे ७९ रुग्ण आढळले. राज्यात बीए फोर आणि बीए फाईव्ह रुग्णांची संख्या आता २५८, तर बी ए टू पॉईंट सेवन फाईव्हच्या रुग्णांची संख्या १९९ झाली आहे.
****
मराठवाड्यात काल ६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २७, जालना १८, नांदेड १२, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या ११ रुग्णांचा समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानामुळे, दुबार पेरणीसाठी शासनानं विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी, अंबाजोगाई या तालुक्यात त्यांनी काल पीक पाहणी केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यावेळी उपस्थित होते. सुमारे तीन हजार सहाशे हेक्टरवरच्या सोयाबीन पिकाचं गोगलगायींनी शेंडे खाऊन ��ुकसान केलं आहे. गोगलागायींच्या प्रादुर्भावाचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करण्यासह दुबार पेरणीसाठी मदतीची मागणी पवार यांनी केली.
****
दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणांत राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयएनं काल देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले. त्यात महाराष्ट्रात नांदेड आणि कोल्हापूर इथं छापा टाकण्यात आला असून, कोल्हापूर इथं दोन जणांना ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. भारोत्तोलन मध्ये पुरुष गटात अचिंता शेऊलीनं ७३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. २० वर्षीय अचिंतानं ३१३ किलो वजन उचलून ही कामग���री केली. तर १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा यानं पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं.
५५ किलो वजनी गटात भारताच्या बिंदिया राणीनं रौप्य पदक पटकावलं. बिंदियानं स्नॅचमध्ये ८६, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११६ किलो, असं एकूण २०२ किलोंचं वजन उचलून स्पर्धेत विक्रम नोंदवला.
अन्य स्पर्धांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी महिला संघाचा पराभव केला. टेबलटेनिसमधे भारताच्या पुरुष संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तर महिला मुष्टीयोद्धा निखात झरीननं ५० किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांमधे शिवा थापाला मात्र आज पराभव पत्करावा लागला.
बॅडमिंटनमध्ये अश्विनी पोनप्पा आणि सुमित रेड्डी यांच्या जोडीनं मिश्र दुहेरी प्रकारात उपान्त्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या जोडीचा २१-९, २१-११ असा पराभव केला.
भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे.
****
सांगली इथला भारोत्तोलक संकेत सरगर याला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल औरंगाबाद इथं ही घोषणा केली. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी अभिनंदनीय आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. संकेतच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकून एक शून्य अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, १८ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या झिम्बाबे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयनं क्रिकेट संघाची काल घोषणा केली. या दौऱ्यात शिखऱ धवनकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेनंतर २२ ऑगस्टला भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराताला रवाना होईल.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या ��ाष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २�� १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· मुंबईत मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू, वारसांना राज्य सरकारकडून पाच तर केंद्र सरकारकडून दोन लाख रूपये मदतीची घोषणा.
· नंदुरबार जिल्ह्यात सिंदिदिगर घाटात खाजगी जीप दरीत कोसळून आठ जण ठार.
· संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात.
· राज्यात आठ हजार १७२ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू तर ३२८ बाधित.
आणि
· श्रीलंकेविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला.
****
मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात बहुतांश ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला.
मुंबईत मुसळधार पावसामुळे विक्रोळी, भांडूप आणि चेंबूर या तीन ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ जण जखमी झाले.
चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये काही घरांवर दरड कोसळल्यामुळे १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही दुघर्टना घडली.
विक्रोळीत सूर्यानगर भागात एक दुमजली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. भांडूपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर अंधेरी आणि पोयसर इथं विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला.
मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये, आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूर, विक्रोळी आणि भांडुपमधल्या दुर्घटनाग्रस्त भागाला काल भेट देऊन, मदत कार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेतल्या घरात राहणाऱ्या नागरिकांचं इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं, त्यांनी सांगितलं.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही काल दुर्घटनाग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणाचा कारणीभूत असल्याचं, ते म्हणाले. महापालिकेनं बांधलेली निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंत या दुर्घटनेला कारणीभूत असून, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या दोषींविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी, दरेकर यांनी यावेळी केली.
****
मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्��ारे आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका आणि इतर सर्व यंत्रणांनी, अपेक्षित तसंच अनपेक्षितरीत्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगून समन्वयानं काम करण्याच��� निर्देश, मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
मुंबईत पावसामुळे मिठी नदीतलं पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढल्यानं, कुर्ल्यातल्या क्रांतीनगर भागातल्या नागरिकांना, काल सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून, अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या.
मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वेही अनेक ठिकाणच्या रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात मनमाड रेल्वेस्थानकावर दोन, तर नाशिकरोड, लासलगाव आणि देवळाली स्थानकावर प्रत्येकी एक रेल्वे प्रवाशांसह थांबवण्यात आली होती.
पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. डहाणू बस स्थानकात उभ्या बसगाड्या अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेल्या आहेत.
****
कोकणातही काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्याच्या अनेक सखल भागांत पाणी साचलं असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. संगमेश्वर तालुक्यात धामापूर इथं दोन तरुणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईत रुळांवर पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
मराठवाड्यात लातूर आणि जालना जिल्ह्यांत काल जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात औराद शहाजनी परिसरात काल तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातल्या अनेक गावांचे शिवार पाण्याखाली गेले आहेत. तेरणा नदीवरील बंधारे भरले असून, औराद, तगरखेडा इथल्या बॅरेजेसचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
औरंगाबाद शहरातही काल रात्री काही वेळ पाऊस झाला.
****
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसात, बार्शी शहराच्या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. बार्शी - सोलापूर रस्त्यावर पुलाचं काम सुरू असल्यानं, तात्पुरता तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता या पावसात वाहून गेला, त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली. बार्शी - लातूर मार्गावरील लक्ष्मीनगर इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं, बार्शी - लातूर वाहतूकही शनिवारी रात्रभर बंदच होती. बार्शी - तुळजापूर रस्त्यावर असलेला कदमवस्ती इथला रस्ता खचल्यानं, वाहतुकीवर परिणाम झाला.
****
नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ खोऱ्यातल्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खाजगी जीप दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला, तर पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले. काल सायंकाळच्या सुमारास ही गाडी घाटातून जात असताना, चालकाचा ��ाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या काळात दोन्ही सदनाच्या प्रत्येकी १९ बैठका होतील, या काळात २९ विधेयकं संसदेसमोर सादर केले जाण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. संसदेच्या दोन्ही सदनातलं कामकाज सुरळीत व्हावं, यासाठी राजकीय पक्षांचं सहकार्य मिळावं, या उद्देशानं बोलावण्यात आलेल्या या बैठकीला, काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, डीएमके खासदार तिरुची शिवा, यांच्यासह ३३ पक्षांचे ४० सदस्य उपस्थित राहिल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. हे अधिवेशन कामकाजाच्या दृष्टीनं चांगलं होईल, सर्व विषयांवर फलदायी चर्चा होईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काल लोकसभा सदस्यांची बैठक घैतली.
****
राज्यात अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड लसीकरणाची विशेष सुविधा दिली जाणार आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, पथकामार्फत त्यांचं लसीकरण केलं जाईल, असं सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कळवण्यात आलं आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे आणि पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल, अशा व्यक्तीचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचं कारण आणि सदरची व्यक्ती, लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र, इत्यादी माहिती, कोविड व्ही ए सी सी टू बेड रिडन ॲट जीमेल डॉट कॉम, या ईमेलवर पाठवण्याचं आवाहन, आरोग्य विभागानं केलं आहे.
****
राज्यात काल आठ हजार १७२ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख पाच हजार १९० झाली आहे. काल १२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २६ हजार ८५१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार शतांश टक्के झाला आहे. काल ८ हजार ९५० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ७४ हजार ५९४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक २८ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ४२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२८ कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या पाच, औरंगाबाद दोन, तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक १७४ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ५७, लातूर ४९, औरंगाबाद ३१, जालना सहा, परभणी पाच, नांदेड चार, तर हिंगोली जिल्ह्यात काल दोन नवे रुग्ण आढळले.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरांवर काल सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापे घातले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर, देशमुख यांच्या विरोधात चौकशी सुरु आहे. त्याच प्रकरणात ईडीनं नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यात, देशमुख यांच्या वडिलोपार्जित घरावर छापे घातले.
****
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रं रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळानं पुढाकार घेतला असून, यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील गेल्या आठ शैक्षणिक वर्षातील, सुमारे १० लाख पदविका प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात प्रदान करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून, उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणं सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांची होणारी गैरसोय थांबेल, असं कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची, औंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर पुनर्उभारणी करावी, आणि कौशल्य विकास गाव-खेड्यापर्यंत पोहचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे निर्देश, राज्याचे कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. ते काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात कौशल्य विकासाच्या विविध योजनांमध्ये ११ विविध क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं, देसाई यांनी सांगितलं.
दरम्यान, काल परभणी इथं शिवसंपर्क अभियानालाही देसाई यांनी संबोधित केलं. कोणी-कोणालाही भेटू द्या, किंवा हातमिळवणी करु द्या, शिवसेना सर्वार्थाने सक्षम असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
जालना जिल्ह्यात पोलीस ठाण्यांचं विभाजन करून, जालना, अंबड, राजूर आणि घनसावंगी इथं नवीन पोलीस ठाण्यांच्या उभारणीबाबत गृहमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. जालना इथं, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पोलीस विभागासाठी सव्वादोन कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या, २० चारचाकी आणि ९२ दुचाकी वाहनांचं काल टोपे यांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस वसाहतींमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही टोपे यांनी दिली.
****
अंगणवाड्यांना दिलेल्या गॅस जोडणीचं देयक काढून देण्यासाठी ४० हजार रुपये लाच घेणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला, उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. नारायण दशरथ गायके असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. परंड�� तालुक्यातल्या अंगणवाड्यांकरता ८६ गॅस जोडण्यांचं, सुमारे पाच लाख ६४ हजार रुपयांचं देयक काढून देण्यासाठी, त्यानं ४८ हजार रुपये लाच मागितली होती, तडजोडीअंती ठरलेले ४० हजार रुपये घेताना, त्याला अटक करण्यात आली.
****
पारंपरिक शेतीला जोडून फळबाग लागवड करण्याचं आवाहन, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. लातूर जिल्ह्यात गुरधाळ इथं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत, फळबाग लागवडीचा शुभारंभ बनसोडे यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेअंतर्गत कलम खरेदी करणं, खड्डे खोदून लागवड करणं, ठिबक सिंचन, यासाठी तीन वर्षांपर्यंत अनुदान दिलं जातं.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, शिखर धवन याच्या नेतृत्वातल्या भारतीय संघानं, श्रीलंका संघाचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं दिलेलं २६३ धावांचं लक्ष्य, भारतीय संघानं ३७व्या षटकातच पूर्ण केलं. कर्णधार शिखर धवननं ८६, इशान किशननं ५९ धावा केल्या. ४३ धावा करणारा सलामीवीर पृथ्वी शॉ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
हवामान
मुंबईसह संपूर्ण कोकणासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, साडे आठनंतर ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला. पुढचे चार ते पाच दिवसांसाठी हा सावधानतेचा इशारा हवामान खात्यानं जारी केला आहे.
मराठवाड्यात बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या ४८ तासात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** आधुनिक भारतातली गावं स्वयंपूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न - स्वामित्व योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
** माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, काटोल तसंच मुंबईतल्या घरी सीबीआयचे छापे
** औरंगाबाद इथं आज ३५ कोविडग्रस्तांचा मृत्यू
आणि
** बीड जिल्ह्यात नवे एक हजार १९५ कोविड रुग्ण
****
आधुनिक भारतातली गावं स्वयंपूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वामित्व योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान बोलत होते. देशातल्या ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी सुमारे दोन लाख २५ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशातल्या सहा लाख ६२ हजार गावांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. भूजल, स्वच्छता, कृषी आणि शिक्षण या चार बाबींवर अधिक काम करण्याची सूचना पंतप्रधानांनी ग्रामपंचायतींना केली. ई स्वामित्व योजनेअंतर्गत चार लाखापेक्षा अधिक लाभार्थींना ई प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहेत, या आधारे हे नागरिक बँका तसंच आर्थिक संस्थांच्या कर्जसुविधेचा लाभ घेऊ शकतात. २०२१ चे राष्ट्रीय पंचायत पुरस्कारही ��ावेळी प्र��ान करण्यात आले. ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
दरम्यान पंतप्रधान उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल.
****
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं विविध करांचा भरणा करण्यासाठी दोन महिने मुदतवाढ दिली आहे. विवाद से विश्वास तक योजनेत तसंच आयकरांतर्गत करनिर्धारणाची मुदतही आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोविड पार्श्वभूमीवर करदाते, विशेषज्ञ तसंच संबंधित घटकांकडून केली जाणारी मागणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ दिली आहे.
****
न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी आज देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश रमणा यांची १६ महिन्यांसाठी नियुक्ती असेल.
****
रेमडीसीविर इंजेक्शनच्या राज्यातील तुटवड्यामुळे ते पुरवण्याबाबत राज्य शासनानं केलेल्या आवाहनास काही देशांनी संमती दर्शवली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात प्रकाशित जाहिरातला सिंगापूर, बांगलादेश आणि इजिप्त या देशांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, रेमडीसीविर परदेशातून आयात करण्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीस केंद्राची लवकरच परवानगीही मिळणार असल्याचं राज्य शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे. रेमडीसीविरचा तुटवडा दूर करून कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचं आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
नाशिकसह विरार इथं रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर तसंच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणांना दिले आहेत. कुंटे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा असून पोलिस संरक्षणात त्यांची वाहतुक करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
****
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध प्रथम माहिती अहवाल-एफआयआर दाखल झाल्यानंतर, आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयनं देशमुखांच्या मालमत्तांची झडती घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांच्या नागपूर, काटोल तसंच मुंबईतल्या घरी सीबीआयनं छापे टाकले आहेत. देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम सात आणि भारतीय दंड विधानाच्या कलम १२० ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. गेल्या पाच एप्रिलला अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज ३५ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या चार, जालना जिल्ह्यातल्या तीन, आणि नाशिक तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित २६ मृत रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळच्या सत्रात ८३ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार १९५ नवे कोविड बाधित आढळले, यापैकी बीड तालुक्यात सर्वाधिक २०८ रुग्ण आढळले. आष्टी तालुक्यात २०१, अंबाजोगाई तालुक्यात १९४, केज १३०, गेवराई १२४, परळी ७२, पाटोदा ६५, माजलगाव ५९, शिरुर ५८, धारुर ५०, तर वडवणी तालुक्यातल्या ३४ रुग्णांचा समावेश आहे.
****
परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचं आज पहाटे कोविड संसर्गावर उपचार सुरु असतांना रुग्णालयात निधन झालं. १५ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयत दाखल करण्यात आल होतं.
****
नांदेड वाघाळा महानगपालिकेने १९ एप्रिल पासून सुरू केलेल्या जंबो कोविड रूग्णालयात सध्या ७० रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी आज सात रूग्ण बरे होऊन घरी परतले. या रूग्णांना जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी निरोप दिला.
****
औरंगाबाद नजिकच्या एकूण सहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज भेटी दिल्या. यात, वाळूज औद्योगिक वसाहत, गेवराई, चितेगाव आणि शेंद्रा या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्रकल्पामधून एकूण दहा मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. यात वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून या प्रकल्पांना मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली.
****
लातूर जिल्ह्यातील रुग्णालयं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सध्याच्या कोविड प्रादुर्भावावर मात करण्यासाठी एकमेकांसोबत समन्वय राखत काम करण्याची आवश्यकता असल्याचं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नमूद केलं आहे. ते आज उदगीर इथं पशुवैद्यकीय महाविद्यालयात उदगीरसह जळकोट तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाच्या सद्य-स्थितीचा आढावा - उपाय योजना संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.
****
औरंगाबाद इथल्या महावितरणच्या वीजग्राहकांना त्यांच्या वीज वापराची नोंद अर्थात मीटर रीडिंग महावितरणला स्वत:हून पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोविड प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले निर्बंध आणि एकंदर परिस्थिती विचारात घेता महावितरणला मीटर रीडिंग घेणं अवघड आहे. त्यामुळे महावितरण मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळाद्वारे मीटर रीडिंग पाठवावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींवर घरबसल्या मोफत सल्ला घेण्यासाठी केंद्र शासनानं ई-संजीवनी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड यांनी केलं आहे. सद्यस्थितीत काही नागरिक भीतीपोटी दवाखान्यात जात नाहीत. त्यांची आरोग्य परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेल्यानंतर उशीराने दवाखान्यात येत आहेत. यामुळे बराचसा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. कोणालाही घरबसल्या त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत मोफत सल्ला घेण्याची संधी ई-संजीवनी ऑनलाइन अॅप आणि संकतस्थळाद्वारे घेता येणं शक्य आहे.
****
औरंगाबाद इथल्या क्रीडा-भारती संस्थेद्वारे ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना प्रादुर्भामुळे खेळाडूंमध्ये निर्माण झालेलं नैराश्य दूर करुन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खेळाडूंसह अन्य नागरिकही घरबसल्या ह्या क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन विविध खेळाचा आनंद घेऊ शकणार आहेत. ह्या क्रीडा महोत्सवात १२ खेळांचा समावेश असून सहभागासाठी गुगल फॉर्म द्वारे रेजिस्ट्रेशन झाल्यावर खेळानुसार सहभागी खेळाडूंना व्हाट्सॲपद्वारे खेळाचे नियम-अटी कळवल्या जाणार आहेत. दोरी उडी, बास्केटबॉल ड्रिब्लिंग, कुस्तीच्या सपाट्या मारणे, जिम्नॅस्टिक, महिलांसाठी सीट-अप, लाठी-काठी, कराटे-काटा, गदा चक्र, सूर्यनमस्कार, बुद्धिबळ, ल्युडो आदी प्रकारात या ऑनलाईन क्रीडा स्पर्धा होणार आहेत. २७ तारखेला हनुमान जयंतीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धांमध्ये हनुमान चालिसा पठणाचीही स्पर्धा होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात संचारबंदीच्या काळात कपड्याचं दुकान सुरु ठेवणाऱ्या दुकानदाराला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
****
कोविड संसर्गामुळे मरण पावलेले महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक तसंच बाह्यस्रोत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेला महावितरणने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊन ती आता ३० जून २०२१ पर्यंत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनाई
** ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
** जालना जिल्ह्यात ५४९ तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात १०४ कोविडग्रस्तांवर उपचार सुरू
आणि
** एनसीबीचे आज मुंबईत पाच ठिकाणी छापे- सुमारे सहा किलो अंमलीपदार्थ जप्त
****
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनाई केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून नागरिकांशी बोलत होते. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. दिवाळी हा प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदुषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आत येऊ देऊ नये, कोविडच्या काळात आतापर्यंत कमावलेलं यश फटाक्यांच्या धुरात वाहून जाऊ नये, याची दक्षता घ्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोविड संदर्भातल्या आरोग्य सुविधा पुढचे किमान सहा महिने कायम राहू देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
नागरिकांनी अनावश्यक घरा��ाहेर पडणं टाळावं असं सांगतानाच ज्येष्ठ नागरिकांनी मुळीच घराबाहेर पडू नये, असं मुख्यमंत्री म्हणाले. दिवाळीनंतर मंदीरं उघडण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले, मात्र त्यावेळीही मास्क वापरणं बंधनकारक असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज, विदेशी कंपन्यांसोबत केलेले औद्योगिक करार तसंच मुंबई मेट्रोसंदर्भात सुरू असलेल्या कामाबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
नाशिक जिल्ह्यात कोविड प्रतिबंधित क्षेत्र, पूर्व घोषित शांतता क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. परवा दहा नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत ही बंदी कायम राहिल.
****
ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. शहर आणि जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू काय, यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी शहराकडे येतात त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला, तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं.
****
नोटबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशावर नियंत्रण, आयकर प्रक्रियेत नियमितता, तसंच आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नोटबंदी निर्णयाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात या बाबी नमूद केल्या आहेत. चार वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी चलनात असलेल्या पाचशे तसंच एक हजार रुपयांच्या नोटा, चलनातून बाद केल्या होत्या.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोविडबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९९ झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ७६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता अकरा हजार ३२७ झाली आहे. दरम्यान, उपचारानंतर कोविडमुक्त झालेल्या ५१ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जालना जिल्ह्यातले दहा हजार ४७९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ५४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कोविड संसर्ग झालेले तीन नवीन रुग्ण दाखल झाले. सध्या घाटी रुग्णालयात १०४ कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात ��ज नवे चार कोविड बाधित रुग्ण आढळले तर १२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
****
उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता सुमारे ९६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यातल्या एकूण दोन लाख २६ हजार ७६९ कोविडग्रस्तांपैकी दोन लाख १७ हजार ३१९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने आज मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे सहा किलो अंमलीपदार्थ जप्त केले. मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या ठिकाणी केलेल्या या कारवाईत पाच संशयीत अंमलीपदार्थ विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घराचीही या कारवाईदरम्यान झडती घेण्यात आली असून, त्यांच्या घरातूनही अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना तालुक्यातल्या नोव्हेंबरअखेर मुदत संपत असलेल्या १२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज जालना तहसील कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये ६९ ग्रामपंचायतींचं सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३३, अनुसूचित जातींसाठी १९ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी दोन जागा राखीव झाल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली. महिला उमेदवारांसाठी सरपंच पदाच्या ६० जागा राखीव असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
परभणी तालुक्यातल्या सय्यदमिया पिंपळगांव शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक टिप्पर पोलिसांनी जप्त करत दोघांना ताब्यात घेतलं. मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत टिप्पर आणि वाळू असा एकूण ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी केलं आहे.
****
प्रसिद्ध कलावंत पुरुषोत्तम लक्ष्मण ऊर्फ पु.ल.देशपांडे यांच्या एकशे एकाव्या जयंती निमित्ताने त्यांची सर्व साहित्यसूची संगणकाच्या एका ‘क्लिक’वर रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी ही माहिती दिली. pldeshpandebibliography या संकेतस्थळावर ही सूची उपलब्ध आहे. त्याचबरोबर पुलंची पुस्तकं, चित्रपट, नाटक या सर्वांविषयी माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे.
****
जालना इथल्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या परिसरात आज सकाळी पक्षी निरीक्षण करण्यात आलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि परभणी इथली वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं घेतलेल्या या उपक्रमात पर्यावरण प्रेमींनी सकाळी तीन तास पक्षी निरीक्षण केलं. यावेळी १३ पाणपक्षांच्या नोंदी घेण्यात आल्या. या परिसरात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येणारे पाणघार, कारकोचा, फ्लेमिंगो आदी हिवाळी स्थलांतरीत पक्षी अद्याप आले नसल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्याची माहिती वन्यजीव छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात देवसिंगा इथं महिला बचत गटाला नैसर्गिक वनस्पती वापरुन सुगंधी उटणे तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. नागरमोथा, कपूर कचली, ब्राम्ही या आयुर्वेदिक वनस्पतींपासून या महिलांनी उटणं तयार केलं आहे. उटणे निर्मिती व्यवसायामुळे दहा महिलांना रोजगार मिळाला आहे.
**////**
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 September 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
*राज्यात कोरोना विषाणुचं संकट वाढत असून ते रोखण्याची जबाबदारी एकत्रीतपणे पार पाडणं आवश्यक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
*औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे पाच रुग्णांचा मृत्यू
*`माझं कुटुंब, माझी जबाबदारी` मोहीमेसाठी मार्गदर्शक सूचना जारी
आणि
*मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्षाचा इशारा
****
राज्यात कोरोना विषाणुचं संकट वाढत असून ते रोखण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायची असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना `माझं कुटुंब, माझी जबाबदारी` मोहिमेला सहकार्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...
गावोगावी ज्यावेळेला ही पथकं येतील तेव्हा आपण स्वत:हून त्यांना सहकार्य करा. कोणी घाबरण्याचं कारण नाही. कोरोनावर जरी औषध नसलं तरी वेळेत जर का लक्षात आलं तर अनेक जण हे बरे होऊन सुखरुप घरी गेलेले आहेत, जात आहेत. रोजचा आकडा हा पुरेसा बोलका आहे. पण हे संकट वाढतयं हे सुध्दा तितकच खरं. या संकटाचा सामना करण्यासाठी ज्या सुचना आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही आपल्याला करत आलो त्या सुचनांचं जसं पालन केलं तसंच याही पुढं तुम्ही कराल आणि या युध्दात आपण निर्णायक विजय मिळवू.
राज्याची निंदानालस्ती करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचं ते म्हणाले. आपण कोणतंही राजकीय वादळ आलं तरी त्याचा सामना करू, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असल्याची माहिती देताना या मागणीसाठी संसर्ग पार्श्र्वभूमीवर आंदोलनं करू नये, असं आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ८०८ झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग पार्श्र्वभूमीवर परवा, येत्या पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या `माझं कुटुंब माझी जबाबदारी` मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून औरंगाबादमध्ये महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनानुसार मार्च महिन्यापासून राबवण्यात येत असलेल्या अनेक उपाययोजनांचा समावेश यात आहे. मोहीम कालावधीत गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथकं तयार करणं, ताप, खोकला, दम लागणं अशी कोरोना विषाणू सदृष्य लक्षणं असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करणं, घरातल्या सर्व सदस्यांना व्यक्तीशः परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगणं यासारख्या मार्गदर्शक सूचनांचं मोहीमेदरम्यान पालन करावं अशा सूचना यात समाविष्ट आहेत.
****
माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद स��ंह यांचं आज कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झालं. त्यांच्यावर दिल्ली मधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था `एम्स`च्या रुग्णालयात उपचार सुरु होते. रघुवंश प्रसाद सिंह यांनी काही दिवस आधी राष्ट्रीय जनता दलाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
अभिनेत्री कंगना रानौतनं आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आपण आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांन��� माहिती देऊन त्यावर चर्चा केली, अशी माहिती तिनं दिली आहे. राज्यपालांनी आपल्याशी सहानुभूतीपूर्वक चर्चा केली असून या भेटीनंतर आपल्यावरील अन्यायाचं परिमार्जन होईल अशी आशाही तिनं व्यक्त केली आहे.
****
मुंबईत कोरोना विषाणुचे नवे २ हजार ३२१ रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या एक लाख सदुसष्ठ हजार सहाशे आठवर गेली आहे तर मृतांचा आकडा ८ हजार १०६ वर पोहचला आहे. मुंबईतले १ लाख ३० हजार सोळा रुग्ण आतापर्यंत कोरोना विषाणू मुक्त होऊन घरी परतले आहेत.
****
राज्यभरात सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांनी एन ई ई टी अर्थात वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा आज दिली. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आता पर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. परीक्षा केंद्रांवर पोहोचणं सुकर व्हावं यासाठी राज्यसरकारनं वाहतुकीच्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सुरक्षिततेची काळजी आणि सामाजिक अंतरांच्या नियमांचं पालन करुन या परीक्षा घेण्यात आल्या. लातूर जिल्ह्यात आरोग्याची सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळत ही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातल्या १६ हजार आठशे चौसष्ठ विद्यार्थ्यांनी ४३ केंद्रांवर ही परीक्षा दिली.
****
राज्यातली धार्मिक स्थळं सुरू करावीत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज शिर्डी इथं साईबाबा मंदिरासमोर लोटांगण घालून आंदोलन करण्यात आलं. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शासन मॉल सुरू करत आहे मात्र धार्मिक स्थळांना परवानगी का देत नाही असा प्रश्न नांदगावकर यांनी यावेळी उपस्थित केला.
****
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. काल सायंकाळी त्यांच्या चाचणीमधे ही बाब स्पष्ट झाली. जिल्हाधिकारी सिंगला यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून उपचारांदरम्यान जिल्ह्यातलं प्रशासकीय काम ऑनलाइन स्वरूपात सांभाळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या ४६४ नव्या रुग्णांची भर पडली असल्यामुळे एकूण रुग्ण संख्या २९ हजार ३९२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाचशे एकोणाएंशी रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत २५ हजार २२५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. सद्यस्थितित पालघर ग्रामीण भागात सहाशे सहा प्रतिबंधित क्षेत्रं आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या संदर्भात आघाडी सरकारच्या विरोधात सकल मराठा समाजानं ठाणे इथं झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत आज संघर्षाचा इशारा दिला. हे अपयश सरकारनं चार दिवसात निस्तरलं नाही तर समाज रस्त्यावर उतरेल असं मोर्चाचे समन्वयक कैलाश म्हापदी यांनी म्हटलं आहे. समाजानं लवकरच मुंबईत २८८ आमदार आणि ४८ खासदारांची एकत्रित बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घ्यावी तसंच त्यांनाही आरक्षणाच्या केंद्रीय आदेशासाठी आग्रही राहायला सांगावं, असा ठऱाव या बैठकीत घेण्यात आला.
****
मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्य़ाच्या अर्धापूर शहरात भारतीय जनता पक्षानं `रस्ता बंद` आंदोलन केलं. सर्वोच्च न्यायलयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर इथं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनंही या मुद्दावर आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न सर्व रुग्णालयांची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जालना इथं वार्ताहरांशी बोलताना केली. या योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणुच्या रुग्णांकडून शासनाचे निकष डावलून अधिकचे पैसे घेण्याचे प्रकार घडत असून काही रुग्णालयांना आवश्यक सोयीसुविधा नसतानाही या संसर्गावर उपचाराची परवानगी देण्यात आली आहे, याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही यावेळी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
****
महाराष्ट्र् बँक खाजगीकरणाच्या चर्चेच्या पार्श्र्वभूमीवर बँक सार्वजनिक सरकारी स्वरूपाच्या असाव्यात यासाठी बँक कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीनं आजपासून येत्या १७ तारखेपर्यंत जनजागरण अभियान राबवलं जात आहे. याअंतर्गत लातूर इथल्या या बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी, राष्ट्रीय अभिमान असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या रक्षणाची तसंच खाजगीकरण विरोधात जनजागृती करण्याची शपथ घेतली. देशभऱात साठ जिल्ह्यात ही शपथ घेण्यात आल्याची माहिती यानिमित्त देण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात धारखेडा इथं कापूस आणि हळदीच्या पिकात गांजाची शेती करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. कालही हिंगोली जिल्ह्यात तीन ठिकाणी छापे मारून गांजाची शेती करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जगदीश भंडारावार यांनी धारखेडा इथल्या वसंत कराळे याच्या शेतामध्ये धाड टाकली. या शेतात कापूस आणि हळदीच्या अंतर पिकामध्ये गांजाची १०८ झाडं जप्त करण्यात आली असून याची किंमत सुमारे ८४ हजार रुपये आहे.
****
राज्य सरकारनं आंतर जिल्हा बस सेवा सुरू केल्या असून उद्यापासून नाशिक ते नागपूर ही साधी `शयन यान` बस सुरू करण्यात येत आहे. नाशिकहुन सोलापूर, अकोला, लोणारला जाणाऱ्या गाड्याही उद्या सुरू होत आहेत.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 June 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ७ जून २०२० सायंकाळी ६.०० **** निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ७५ कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर. मुख्यमंत्र्यांची घोषणा. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची आपत्ती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप टाळेबंदीचे नियम शिथिल करून दिल्लीच्या सीमा उद्यापासून होणार खुल्या. औरंगाबादेत दिवसभरात आढळले ७० कोरोनाबाधित रुग्ण. तीन जणांचा मृत्यू. **** निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. या संकटकाळात सरकार पूर्ण ताकदीनं कोकणवासीयांच्या पाठीशी उभं राहील, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी, तर सिंधुदुर्गला २५ कोटी रुपयांची तातडीची मदत आज जाहीर केली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुलनेनं कमी नुकसान झालं आहे. मात्र या ठिकाणीदेखील आढावा घेऊन मदतीसंबंधी निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी या चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसान भरपाईची काही रक्कम जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात आगाऊ देऊन पंचनामे होताच ती तात्काळ आपत्तीग्रस्तांना देण्यात येईल, असं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं. तसंच वीज यंत्रणेतील पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश महावितरणला दिल्याचंही ते म्हणाले. **** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कोरोना विषाणू प्रादुर्भावाची आपत्ती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी, लघु उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतिमान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. **** कोरोना प्रादुर्भावामुळे लागलेल्या टाळेबंदीचे नियम शिथिल करून दिल्ली राज्याच्या सीमा उद्यापासून खुल्या केल्या जाणार आहेत. राजधानीतल्या नागरिकांसाठी उपाहारगृहं, सभागृहं, मॉल आणि प्रार्थनास्थळंदेखील उद्यापासून खुली करण्यात येणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केलं. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सुमारे १५ हजार खाटांची व्यवस्था राज्यात करण्यात आली असून, प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत नागरिकांवर राज्य सरकारी रुग्णालयांत उपचाराची पूर्ण तजवीज केली असल्याचंही ते म्हणाले. **** कोरोनाच्या लसीवर संशोधन करत असलेल्या पुण्याच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान प्रयोगशाळेला प्रयोगासाठी ३० माकडं पकडण्याची परवानगी शासनानं दिली आहे. ऱ्हीसस या जातीची ही माकडं असून, त्यांचा व्यापारी कारणासाठी वापर करण्यास प्रतिबंध, तसंच त्यांना दुखापत होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनेसह विविध अटीही शासनानं घातल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** राष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेंट संयुक्त प्रवेश परीक्षा परिषदेनं २०२० या वर्षासाठीच्या प्रवेश परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलल्या आहेत. सध्याची परिस्थिती आणि उमेदवारांच्या विनंतीवरूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी म्हटलं आहे. नवी तारीख कालांतरानं जाहीर करण्यात येईल, असंही ते म्हणाले. **** औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात ६४, तर दुपारी आणखी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २ हजार वीस इतकी झाली आहे. यापैकी १ हजार एकशे चौऱ्याऐंशी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १०२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता औरंगाबादमध्ये सातशे सदतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. दुपारी आढळलेल्या रुग्णांमध्ये भीमनगर-भावसिंगपुरा, संजय नगर, रेहमानिया कॉलनी, तारांगण-पडेगाव, अमोदी हिल-पहाडसिंगपुरा आणि घाटी परिसर या भागांतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये चार महिला आणि दोन पुरुष रुग्ण आहेत. तर गेल्या २४ तासांत तीन जणांचा बळी गेला आहे. ***** हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव शहरासह तालुक्यात रेड झोनमधून आलेल्या आणि विलगीकरणात असलेल्या सात जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आज वैद्यकीय अहवालावरुन स्पष्ट झालं. खबरदारी म्हणून सेनगाव शहरातला प्रभाग क्रमांक ३ आणि तालुक्यातलं चोंढी गाव प्रशासनानं आज पूर्णत: प्रतिबंधित केलं आहे. हे सातही रुग्ण मुंबईतून हिंगोलीमध्ये आले होते. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणं नसली, तरी विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** अहमदनगर जिल्ह्यात आज ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर १२ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यात १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले असून, जिल्ह्यात आता ८० रुग्ण उपचार घेत आहेत. **** रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आज ८२ नं वाढली असून, एकूण रूग्णसंख्या १ हजार ३८६ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६० रूग्णांचा मृत्यू झाला असून, ८०२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ५२४ रूग्ण उपचार घेत आहेत. **** नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ४७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी ९७३ रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जिल्ह्यातल्या ० ते १२ वयोगटातल्या ८७ बालकांचा समावेश होता. यापैकी ५६ बालकं कोरोनामुक्त झाली आहेत. उर्वरित ३१ बालकेही उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून ती ही लवकरच कोरोनामुक्त होऊन सुखरुप घरी परततील, असा विश्वास आरोग्य यंत्रणेनं व्यक्त केला आहे. **** अमरावती शहरात आज चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता कोरोना बधितांचा आकडा दोनशे एको��ऐंशी वर पोहोचला आहे. आतापर्यंत अमरावतीत १६ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून, सत्त्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकशे बहात्तर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. **** गडचिरोली जिल्ह्यात आणखी २ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं आज स्पष्ट झालं. हे दोघे गेल्या ३ तारखेला मुंबईतून गडचिरोलीत आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४३ झाली असून, सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. २५ जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर एकाचा हैदराबाद इथं मृत्यू झाला आहे. **** हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा जामगव्हाण जवळच्या इसापूर धरणात बुडून मृत्यू झाला. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या तिघांचेही मृतदेह सापडले असून, तिघेही हिंगोलीचे रहिवासी होते. शिवम चौंढेकर, रोहित चित्तेवार आणि योगेश गडप्पा अशी मृतांची नावं आहेत. **** चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यात ताडोबा कोअर झोन परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका रिसरातील ा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या आठवड्यातील ही दुसरी, तर मागील तीन महिन्यांतली या परिसरातली ही पाचवी घटना आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. **** हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारुन साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल आज जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखे��्या पथकानं चार ठिकाणी छापे मारुन ही कारवाई केली. या पथकानं दहा जणांना ताब्यात घेतलं आहे. **** कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिला शेतकरी कुटुंबांना खरीपाच्या पेरणीसाठी मदतीचा हात म्हणून, परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठच्या सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्रानं ५० टक्के उधारीवर खत आणि बियाण्यांची विक्री सुरू केली आहे. **** बेस्ट या मुंबईतल्या सार्वजनिक बस वाहतूक उपक्रमानं उद्यापासून बेस्टच्या बस गाड्यांमधून, सुरक्षित अंतर राखत प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे. *****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 February 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** भारताबरोबचे संबंध अधिक वृद्धींगत करण्याची इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यक्त ** ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर ** जलयुक्त शिवार अभियानात नव्यानं कोणतंही काम नाही - जलसंधारणमंत्र्यांकडून स्पष्ट ** राज्यसरकारच्या विरोधात विविध मुद्यांवर भाजपतर्फे काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलन आणि ** चांगल्या वृत्तीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहून नवनिर्मितीचा प्रयत्न करावा- नाट्यलेखक दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांचं आवाहन **** भारताबरोबचे संबंध अधिक वृद्धींगत करण्याची इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, दहशतवाद, ऊर्जा आदी विषयांवर ही चर्चा झाली. मानसिक आरोग्य आणि औषधनिर्माण सुरक्षेसह अनेक सामंजस्य करार यावेळी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीनंतर बोलताना, इस्लामिक दहशतवादापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटीबद्ध असल्याचं म्हटलं. भारताबरोबर तीनशे दशलक्ष डॉलरचा संरक्षण करार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिका हे धोरणात्मक भागीदार आहेत, असं सांगितलं. दरम्यान, ट्रम्प आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मेलानिया यांचं काल राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ दिलेल्या रात्रीभोज कार्यक्रमाला ट्रम्प दाम्पत्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ट्रम्प यांनी काल राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली अर्पण केली. त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. दरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी दक्षिण दिल्लीतील एका सरकारी शाळेला भेट दिली. रात्री उशीरा ट्रम्प आपला भारत दौरा आटोपून अमेरिकेला परतले. **** राज्य विधानसभेनं काल ग्राम पंचायत सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर केलं. त्यानुसार आता सरपंचांची निवड ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार आहे. सरकारनं नुकताच यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार देत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे विधेयक विधीमंडळात मांडण्यास सांगितलं होतं. सरपंचाच्या निवडीचं विधेयक घाईघाईत मंजूर केलेलं असून ते घटनाबाह्य आहे, या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावं असं, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्य सरकारने केलेली ही कर्जमाफी फसवी असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. **** जलयुक्त शिवार अभियानात नव्यानं कोणतंही काम हाती घेतलं जाणार नसल्याचं जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ न देता ही योजना बंद करण्यात आली आहे का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गडाख बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारनं ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेचं नाव बदलून या योजनेची कामं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनानं दिलेले नाहीत, असं गडाख यांनी स्पष्ट केलं. **** राज्य शासनानं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्राच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नेमणूक रद्द केली आहे. आमदार रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून केलेली नेमणूकही रद्द करण्यात आली आहे. या दोघांनीही पद स्वीकारण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयात मात्र नेमणूक रद्द करण्याचं कुठलंही कारण दिलेलं नाही. **** नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे सदस्य आमदार अमरनाथ राजूरकर यांची काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे काल याबाबतचं पत्र दिलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यसरकारच्या विरोधात विविध मुद्यांवर काल भाजपतर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना हेक्टरी ��ंचवीस हजार रूपये मदत, सरसकट कर्जमाफीची मागणी आणि राज्यात महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध या मुद्यांवर हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद तसंच जालना इथं वीज भारनियमन रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. नांदेड इथं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. लातूर इथं या आंदोलनाचं नेतृत्व खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी केलं. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं आंदोलनादरम्यान, कृष्णा खोऱ्याचं पहिल्या टप्प्यातील सात दशलक्ष घनफूट पाणी दिलं जावं तसंच `वॉटर ग्रीड` योजनेला मंजूरी देऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. **** चांगल्या वृत्तीच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहून नवनिर्मितीचा प्रयत्न केला पाहिजे, असं आवाहन प्रसिध्द नाट्यलेखक आणि दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या ‘चित्रपट आणि स्त्रीवाद’ या विषयावर आयोजित पाचदिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन काल तांगडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राध्यापक अंजली माँन्टेरो यांनी आपल्या बीजभाषणात, एखादा संवेदनशील विषय ज्यावेळेस चित्रपटात हाताळला जातो तेव्हा तो बघण्याची समज देखील विकसित होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. **** 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना काल नवी दिल्लीत साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कवी गुलज़ार यांच्या उपस्थितीत अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते अनुराधा पाटील यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं **** परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथल्या मुकुंद चौधरी या तरूण शेतकऱ्यानं गुळ उद्योगाच्या माध्यमातून अनेक तरूणांना रोजगार निर्माण करून दिला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ..... चौधरी यांनी पाथरी नजीक स्वतःच्या शेतात उत्तर प्रदेशातून मजूर आणून कोणतेही केमिकल न टाकता उत्पादनास सुरवात केली यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला ऊसाचा पाक, गुळ २५ तरूण घरोघर जाऊन विकतात यामुळे ग्राहकांना गुळ स्वस्तात मिळतो आणि तरुणांना रोजगार या वसतीत तर जागेवर गुळा¬ विक्री मोठ्या प्रमाणात झाली. शासनाने गुळाचा उतारा पाहून अनुदान द्यावे तर या व्यवसायाला आणि ग्रामीण तरुणांना भविष्य आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि औषधी तपासणी विभागानं काल आष्टी इथल्या वीस दूध केंद्रांवर छापे मारले. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. **** परभणी इथं प्लास्टिकची, विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्यांवर येत्या एक मार्चपासून महिला बचत गटांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. परभणी महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी काल यासंदर्भात ��ालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. **** नांदे़ड इथं डॉ शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण पुण्यतिथी निमित्तानं आयोजित संगीत शंकर दरबार या तीन दिवसीय महोत्सवाचं काल उदघाटन झालं. आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात आज आणि उद्या सुंद्री वादन, व्हायोलिन वादन, शास्त्रीय गायन, वीणा वादन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संगीत शंकर दरबार आयोजनाचं हे १६ वं वर्षे आहे. **** लातूर शहर महापालिकेनं महावितरण कंपनीचे १२ कोटी रुपये वीज देयक न भरल्यामुळे कंपनीने पाणी उपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद केला होता. यापैकी महापालिकेने धनेगाव इथल्या पंपाचे एक महिन्याचे आणि हरंगुळ इथल्या पंपाचे दोन महिन्याचे असे ६९ लाख रुपये भरल्या नंतर काल सायंकाळी दोन्ही ठिकाणचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने पूर्ववत केला. त्यामुळे गेल्या १७ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा कालपासून सुरू झाला. **** अहमदनगर-परळी-बीड रेल्वेप्रमाणे सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी निधी देण्याची मागणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या ८० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी ९५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, यापैकी ५० टक्के निधी राज्य सरकारने रेल्वे मंडळास उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. **** तुळजापूर तालुक्यात माळुंबा इथल्या महावितरणच्या उपकेंद्रातला कामगार विजयानंद डोरनाळीकर याला अडीच हजार रूपये लाच घेतांना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या शेतात वीजपुरवठा देण्यासाठी त्याने ३० हजार रुपये लाच मागितली होती. **** औरंगाबाद इथं जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था, वाल्मी इथला लिपिक सतीश मुळे याला काल लाच घेताना अटक करण्यात आली. आपल्या कार्यालयातल्या सहकाऱ्याचा बदलीचा अर्ज वरिष्ठांपुढे सादर करण्यासाठी मुळे यानं पंचवीस हजार रूपये लाच मागितली होती. ****
0 notes