Don't wanna be here? Send us removal request.
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याच�� गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पोलिसांवर जास्त ताण येईल, असं कोणीही बोलू नये, असं ते म्हणाले. तत्पूर्वी पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं. बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी महासचिव मधुकरअण्णा मुळे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली.
२० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचं राज्य सरकारचं धोरण नाही, तसा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही, असं राज्य सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. राज्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा दत्तक योजना राबवली जात आहे. त्यात दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांकडून आर्थिक मदत घेतली जाते. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद तसंच मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यातल्या शाळा दुरुस्तीचा आराखडा लवकरच तयार करू आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातला मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला उत्तर देताना शिंदे यांनी, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून, सर्वसामान्यांचं दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचं नमूद केलं.
विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विरोधी पक्षनेता नियुक्त करताना विधानसभेतलं संख्याबळ पाहिलं जात नाही, असं ते म्हणाले. याप्रकरणी नियमानुसार योग्य निर्��य घेऊ आणि सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालेल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.
हास्य कलाकार कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. आज विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, कोणत्याही नेत्याचा अनादर करणं सहन केलं जाणार नाही, कोणालाही स्वातंत्र्याचा गैरवापर करता येणार नाही, असं स्पष्ट केलं. कामरा यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
कर्नाटकमध्ये एका विशिष्ट अल्पसंख्यक समाजाला सरकारी कंत्राटांमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आज भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या, या निर्णयासाठी घटनेत बदल करण्याच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधला वाद प्रतिवाद वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज स्थगित केलं. लोकसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणार्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. १८८२ मध्ये याच दिवशी डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग अर्थात टीबी च्या जीवाणूंचा शोध लावला होता. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्ध व्हा, प्रयत्न करा आणि परिणाम मिळवा’ अशी यंदाच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. जनतेनं क्षयरोग निर्मूलनासाठीची आपली कटिबद्धता दृढ करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजी नगर इथल्या एमजीएम बहुविधाच्या संचालक स्नेहलता दत्ता यांचं आज सकाळी निधन झालं, त्या ८४ वर्षांच्या होत्या. एमजीएम महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांच्या त्या मातोश्री होत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह एमजीएम हॉस्पिटल इथं दान केला जाईल.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २४ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणार्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. १८८२ मध्ये याच दिवशी डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोग अर्थात टीबी च्या जीवाणूंचा शोध लावला होता. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्धता, गुंतवणूक आणि परिणामी प्रयत्न’ अशी यंदाच्या क्षयरोग दिवाची संकल्पना आहे. भारत सरकारने क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात क्षयरोगाच्या संसर्ग दरात १७ पूर्णांक सात दशांश टक्के घट झाली आहे.
जम्मू काश्मीरच्या पूंछ इथंल्या जंगल क्षेत्रात सुरक्षा दलांनी दहशतवादी तळ शोधून, हल्ल्याचा कट उधळून लावला. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट - वेव्ह्ज अंतर्गत, वेव्ह्ज यंग फिल्ममेकर स्पर्धेसाठी देशभरातून तेराशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. यातल्या वीस स्पर्धकांची अंतिम यादीत निवड झाली आहे. अमोल गुप्ते आणि चैतन्य चिंचलीकर यांचं मार्गदर्शन तसंच व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलची मदत या स्पर्धकांना मिळाली. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमध्ये मार्गदर्शन तसंच प्रशिक्षण दिलं जातं.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं ५०० कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यात द्यावा, अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलंस लर्निंगचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार करून वैद्यकीय महाविद्यालय, परिचर्या महाविद्यालय, वसतिगृह आदी ��पक्रम, तसंच महाविद्यालयांच्या जुन्या इमारतींचं नूतनीकरण करण्यासाठी हा निधी दोन टप्प्यात द्यावा, असं ते म्हणाले.
राज्यातल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुण्यात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महाअधिवेशन तसंच प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक बाळासाहेब अनासकर उपस्थित होते.
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यात ५० उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं काल उमेद अभियानाअंतर्गत 'कळसुआई' महिला बचतगटांच्या वस्तू विक्री आणि प्रदर्शन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नागपूर शहरातल्या ३० हजार महिलांनी या योजनेच्या मदतीने पतसंस्था स्थापन केली असून, आज तिच्यात ३५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. या धर्तीवर इतरही जिल्ह्यात महिलांनी एकत्र येऊन पतसंस्था सुरू कराव्यात, असं आवाहन तटकरे यांनी केलं.
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातल्या मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी गावासाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. अशा अतिदुर्गम भागात गावकऱ्यांची सोय या बसफेऱ्यांमुळे झाली असून, ही बस त्यांच्यासाठी आनंदाची बस ठरली आहे.
आगामी येणाऱ्या सणानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी तसंच सर्व धर्मियांना आपापले सण उत्सव साजरे करता यावे, यासाठी उद्या २५ तारखेपासून आठ एप्रिल पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, सीएसएन फर्स्ट आणि पूर्णम ईकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेस्ट आऊट ऑफ ई-वेस्ट’ या आंतरशालेय स्पर्धेची अंतिम फेरी काल पार पडली. यानिमित्त ३३ शाळांच्या १५० नाविन्यपूर्ण प्रकल्पांचं भव्य प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना, ई- कचऱ्याचा पुनर्वापर करणं काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कालचा तिसरा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णमय ठरला. तीरं��ाजीमध्ये मुंबईच्या आदिल अन्सारीने, नेमबाजीत मिश्र दहा मीटर एअर रायफल प्रोन एसएच वन प्रकारात लातूरच्या सागर कातळेनं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या दिलीप गावितने सुवर्ण पदकाची कमाई केली.
0 notes
Video
youtube
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 24 مارچ 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
0 notes
Video
youtube
آکاشوانی خبریں‘ تاریخ: 24.03.2025 ‘ وقت: صبح 08:30
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणं अत्यावश्यक- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; गटशेतीसाठी विशेष धोरणाची घोषणा
मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाचा नांदेड इथं समारोप
कबड्डी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडवर मात करत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य
आणि
खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा नेमबाज सागर कातळेला सुवर्णपदक
****
कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिकमध्ये काल भारतीय उद्योग महासंघ - सीआयआयच्या यंग इंडियन्स शाखेच्या संवादात मुख्यमंत्री बोलत होते. विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागा��ुरती मर्यादित न ठेवता, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यासाठी नव्या उद्योजकांसमोर मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विकासाचा रोडमॅप मांडला.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक इथं २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून, यासंदर्भात प्रयागराजप्रमाणे लवकरच कायदा करण्यात येईल, असं त्यांनी यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या विकासासाठी तयार केलेल्या अकराशे कोटी रुपयांच्या आराखड्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्यात गटशेतीकरता धोरण आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सत्यमेव जयते फार्मर कप २०२४चं पुरस्कार वितरण काल पुण्यात बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ यावेळी उपस्थित होते. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या नरसी इथं एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा विरोधकांचा प्रचार खोटा असल्याचं सांगत, आपण स्वतः राज्याचा सात लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडल्याचं पवार यांनी सांगितलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा अभ्यासक्रम शासकीय शाळांमध्ये राबवण्याबाबत गैरसमज दूर करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. ते काल नाशिकमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या अभ्यासक्रमाबाबत अधिवेशनातच सर्व माहिती दिली जाईल, त्यानंतर या अभ्यासक्रमाचं सर्वच स्तरात स्वागत होईल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला. यंदाच्या वर्षी पहिलीसाठी हा अभ्यासक्रम सुरू करणार असून, तीन वर्षांत १२ वीपर्यंत त्याचा विस्तार करण्याचं नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
नागपूर शहरातली संचारबंदी काल पूर्णतः उठवण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी ही माहिती दिली. या हिंसाचार प्रकरणी एकूण १३ एफ आय आर दाखल झाल्या असून, सामाजिक संपर्क माध्यमातून अफ��ा पसरवणाऱ्यांनाही अटक केली जात असल्याचं, सिंघल यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरू�� कासार इथल्या आदिवासी पारधी वस्तीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी काल घटनास्थळाची पाहणी केली. आयोग या प्रकरणाची चौकशी करेल, असं त्यांनी सांगितलं. मेश्राम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि सामाजिक न्याय विभागाकडून येत्या पंधरा दिवसात कारवाई करण्याची सूचना केली.
****
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल कन्नड तालुक्यातल्या अंबाळा गावाला भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसंच सोयीसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले.
****
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना काल हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. १९३१ साली २३ मार्चला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही वीरांना अभिवादन केलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही हुतात्मा क्रांतिकारकांना अभिवादन केलं.
****
अहिल्यानगर इथं काल १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. राज्य शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून, संत साहित्य संमेलनासाठी दरवर्षी १५ लाख रुपयांचं अर्थासहाय्य दिलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केल्याबद्दल वारकरी विठ्ठल पुरस्कार या कार्यक्रमात सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारोप सत्रात राज्यभरातून आलेले अनुवादक, लेखक आणि भाषाभ्यासकांनी विविध ठराव मांडले. राज्यामध्ये अनुवाद अकादमीची स्थापना करण्यात येऊन तिच्या मार्फत मराठीतून अन्य भाषेत आणि अन्य भाषेतून मराठीमध्ये भाषांतरांना उत्तेजन देण्यात यावं, पूर्व प्राथमिक स्तरावरील सर्व शिक्षण मातृभाषेतूनच देण्यात यावं, प्रत्येक शाळेत अवांतर वाचनासाठी काही तास राखून ठेवण्यात यावेत, आदी ठरावांचा यात समावेश आहे.
****
भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंडमध्ये काल झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष संघाने इंग्लंड संघाचा ४४ - ४१ असा, तर महिला संघानेही इंग्लंड संघाचा ५७ - ३४ असा पराभव केला. आशिया खंडाच्या बाहेर पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत आघाडीच्या कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता. २०१९ मध्ये मलेशिया इथं झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही भारताने महिला आणि पुरुष गटात विजेतेपद पटकावलं होतं.
****
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्ध��त नेमबाजीत महाराष्ट्राच्या सागर कातळे याने १० मीटर एअर रायफल प्रोन मिक्स्ड एसएच वन प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. मोना अग्रवाल हिने रौप्य तर दीपक सैनी याने कांस्यपदक जिंकलं आहे. सुमेधा पाठक हिनं १० मीटर एअर पिस्तूल महिला एसएच वन प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. रुबिना फ्रान्सिसनं रौप्यपदक तर अनिता कुमारीने कांस्यपदक जिंकलं. तिरंदाजीत शीतल देवीनं सुवर्ण, पायल नागनं रौप्य तर ज्योतीनं कांस्यपदक जिंकलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला ४४ धावांनी पराभूत केलं. तर चेन्नई इथं झालेल्या अन्य एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इडियन्सचा चार गडी राखून पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल जागतिक जल दिनानिमित्त वॉकेथॉन घेण्यात आला. पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. मराठवाड्यातलं जलसंकट दूर करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं, त्या यावेळी म्हणाल्या.
****
जागतिक वन दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात काल २२ शाळांमधल्या दीड हजार विद्यार्थ्यांसोबत 'चला जाऊया वनाला' हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वनांचं आणि पर्यावरणाचं महत्व पटवून देण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर पोलिसांना राज्य शासनाच्या वतीने नवीन ३३ वाहनांचं लोकार्पण काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. पोलीस दल अधिक सक्षम आणि बळकट करण्यावर शासनाचा भर असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले.
****
हवामान
राज्यात काल सर्वात जास्त ३९ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३६ पूर्णांक आठ तर परभणी तसंच धाराशिव इथं ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
Text
0 notes
Video
youtube
آکاشوانی خبریں‘ تاریخ: 23.03.2025 وقت: رات 09:15
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
• कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहिल - मुख्यमंत्र्यांची ग्वाही • सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करुन विकास आराखडा राबवणार • आर्थिक परिस्थीती सुधारल्यानंतर लाडकी बहिण योजनेचं अनुदान वाढवणार- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि • आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचं राजस्थान रॉयल्ससमोर २८७ धावांचं लक्ष्य
कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, असं त्यांनी आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले… बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून या संदर्भात प्रयागराजप्रमाणे लवकरच कायदा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाशिकमध्ये आज फडणवीस यांनी २०२७ मध्ये होणाऱ्य कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्याची तयारी वेगानं सुरू असून त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी खासगीकरणातून कामं करण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या कामाला सुरूवात हेाईल असं त्यांनी सांगितलं. कुशावर्त तीर्थाचं पाणी शुध्द करण्यासाठी नगरपालिकेनं तयारी केली असून त्यांना लवकर कामं करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.
देशातलं सर्वात मोठं बंदर आता वाढवण इथं होत असून नाशिकहून वाढवणसाठी ग्रीन फिल्ड रोड तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये भारतीय उद्योग परिसंघ अर्थात सीआयआयच्या एका कार्यक्रमात दिली. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करत असून त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३६ टक्के असेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या नरसी इथं एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडक्या बहिणींना एकविस��े रुपये देण्यात येतील, असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही तसचं राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे, हा विरोधकांचा खोटा प्रचार असल्याचं सांगत आपण स्वतः राज्याचा सात लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली वाहत आहे. १९३१ मध्ये २३ मार्चला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं हुतात्मा दिन म्हणून स्मरण करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाजमाध्यमावर मोदी यांनी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी या क्रांतीकारकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि सर्वोच्च बलिदान देशवासियांना प्रेरित करेल, असं पंतप्रधान म्हणाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद दिनानिमित्त आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक संपर्क माध्यमांवर हुतात्मा क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे.
ग्यानेश कुमार यांनी देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रियांच्या बळकटीकरणासाठी ठोस पावलं उचलली आहेत. निवडणूक आयोगानं आज मुंबईत एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचं सतत क्षमता वृद्धीसाठी डिजिटल प्रशिक्षण, पाच हजारांहून अधिक सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन, याचा यात समावेश आहे. निवडणूक यादीतील दुरुस्ती आणि नावांचा समावेश करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
आज दुपारी तीन वाजेपासून नागपूर शहरातली संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे. तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरा या चारही पोलिस ठाण्यांतर्गत संचार बंदी पूर्णतः उठविण्यात आली असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी दिली आहे.
सायबर फसवणुकीसाठीच्या एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईनवर आलेल्या ११० तक्रारी २४ तासांच्या आत सोडवून मुंबई पोलिसांनी त्यातून सुमारे एक कोटी ४९ लाख रुपये जप्त केले आहेत. शुक्रवारी या हेल्पलाईनवर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या ११० तक्रारी आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधून पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया थांबवली. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास नागरिकांनी या मदतवाहिनीवर तातडीनं मदत मागावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी, कायदा नवीन असल्यामुळं या कायद्याचं पालन करताना झालेल्या चुकांमुळं करदात्याला अधिकचा दंड बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं अभ�� योजना सुरू केली आहे. पात्र करदात्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल, असं वस्तू आणि सेवा कर विभागानं कळवलं आहे. करभरणा करताना करदात्यांकडून चुका झाल्यास किंवा वस्तू आणि सेवा कर संबंधित विवाद प्रकरणांना निकाली काढण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. आवश्यक स्पष्टीकरण किंवा मदतीसाठी आपल्या समन्वयक, क्षेत्रीय जीएसटी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असं आवाहन वस्तू आणि सेवा कर विभागानं केलं आहे.
इंडियन प्रिमियर लीग क्रिकेटमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघानं आज राजस्थान रॉयल्स समोर हैदराबाद इथं विजयासाठी २८७ धावांचं कठीण आव्हान ठेवलं आहे. इशान किशन यानं ४७ चेंडुंमध्ये नाबाद १०६ धावा केल्या तर ट्रॅव्हीस हेडनं ३१ चेंडुंमध्ये ६७ धावांची खेळी केली. त्यामुळं सनराझर्सनं सहा बाद २८६ धावांचा पल्ला गाठला. राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात डळमळीत झाली असून संघानं पाचव्या षटकात तीन बाद ५० धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कन्नड तालुक्यातील अंबाळा गावाला भेट देऊन आदिवासीच्या अडीअडचणी बाबत माहिती जाणून घेत आदिवासीच्या योजना तसंच सोईसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अंबाळा ग्रामस्थांनी गावाचा रस्ता, प्रलंबित वनहक्क दावे, जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिक्षण, शाळेसाठी संरक्षण भींत, ग्रामविकास, जन्मप्रमाणपत्र, बिबट्यांचा त्रास आदीं बाबत आपल्या अडचणी याप्रसंगी मांडल्या. जल जीवन मि��न योजने अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासोबतच योजना मंजूर असून अर्धा किलोमीटर या ठिकाणी भूमिगत जलवाहिनीचं काम करण्यासाठी वन विभागाची मंजुरी मिळण्याबाबत यावेळी चर्चा झाली. तसंच प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गतीनं काम करावं, अशा सूचना विभागीय आयुक्त गावडे यांनी दिल्या. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी विविध उपयुक्त योजनांची माहिती यावेळी दिली.
बीड जिल्ह्यातली सुमारे साडे पाच हजार प्रकरणं राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीनं निकाली निघाली आहेत. जिल्हा न्यायालयातल्या प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण ११ हजार ९२४ प्रकरणं लोकअदालीत ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादन आदी प्रकरणांचा समावेश होता.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 23 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा दिना निमित्त हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांना आज श्रध्दांजली अर्पण केली. समाजमाध्यमाद्वारे प्रसारीत आपल्या संदेशात मोदी यांनी या क्रांतीकारकांच्या सर्वोच्च बलीदानाचं अभिवादनाद्वारे स्मरण केलं आहे.
नाशिक इथं प्रस्तावित कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगानं आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर इथं ज्योर्तिलिंग मंदीराला भेट दिली. फडणवीस यांनी विविध आखाड्यांच्या साधू संतांची भेटही घेतली. तत्पूर्वी, हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी श्री गुरूगोविंदसिंगजी नांदेड विमानतळावर आगमन झालं. ते आज दिवसभर नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक हे देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत.
भारतीय अंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाणं आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्याच्या मोहिमेवर भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रो काम करत असल्याचं, अध्यक्ष डॉक्टर व्ही. नारायणन यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल जालंधर इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून, येत्या २०४० सालापर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यात इस्रोला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०३० सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल, असंही इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन म्हणाले.
इंटरनेटद्वारे खेळल्या जाणा-या अर्थात ऑनलाईन गेमिंगच्या अनधिकृत अशा साडेतीनशेहून अधिक संकेतस्थळांवर, वस्तू आणि सेवा कर -जी.एस.टी.च्या गुप्तचर विभागानं बंदी घातली आहे. संबंधीत चोवीसशे बँक खातीही या कारवाईत गोठवल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. परदेशातून चालवण्यात येणाऱ्या या कंपनी नोंदणीकृत नसल्यानं जी.एस.टी.चा भरणाही होत नाही. महासंचालनालयानं सुमारे सातशे अशा कंपन्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या खेळांचे जाहिरात दुत असणा-या चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि समाज माध्यमांच्या प्रभावाखाली न येता नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. आय पी एल क्रिकेट हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ नोंदणीकृत ऑनलाईन मंचाचा वापर करावा, असं आवाहनही अर्थ मंत्रालयानं केलं आहे.
दिल्ली ��च्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याप्रकरणी,सर्वोच्च न्यायालयानं आपल्या संकेतस्थळावर अंतर्गत अहवाल जाहिर केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांच्या नेतृत्वातील तपासणीच्या माहितीनुसार देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ति संजीव खन्ना यांनी याप्रकरणी त्रीसदस्यीय समिती स्थापन केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानाशी संबंधीत कोणत्याही कामास प्रतिबंध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी आपण किंवा कुटुंबियांनी अशी रोकड घरात ठेवलेली नसून यात आपल्याला बदनाम करुन फसवलं जात असल्याचा दावा न्यायमूर्ती वर्मा यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या झालेल्या बैठकीत न्यायाधीश यशवंत वर्मा यांना अलाहबाद उच्च न्यायालयात स्थलांतरीत करण्याबाबत निर्णय झाला होता. परवा- शुक्रवारी याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधिशांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
उष्णतेची लाट तसंच पाणी टंचाईचा कृषी क्षेत्रावर होणारा दुष्परिणाम,लक्षात घेता अशा महत्त्वाच्या विषयांवर बहुआयामी कृती करण्यावर भर दिला पाहिजे असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि हवामान बदल केंद्रीय राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं‘भारत २०४७: हवामान - पुरक भविष्याची उभारणी’ या परिसंवादाच्या समारोप सत्रात काल बोलत होते. स्थानिक पातळीपासून प्रशासनाच्या सर्वच स्तरांवर हवामानाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश केला पाहिजे असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. शाश्वत कार्यवाही, सहयोग आणि धोरणाभिमुख हवामान अनुकूलता या विषयांवरही या चार दिवसांच्या परिसंवादात मार्गदर्शन झालं.
शासनाच्या विविध उपाययोजनांद्वारे म���ाठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून यात सगळ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचं राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. जागतिक जल दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं शहरात पायी फेरी काढण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठवाड्याच्या जलसमृद्धीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असून त्याला सर्व संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बोलताना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याच्या जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
नागपूर इथं शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
म्हैसमाळ इथं सी-डॉप्लर रडार लवकरच कार्यान्वित करणार-खासदार डॉ भागवत कराड
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सावाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
आणि
आएपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय; खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडुंची काल चार सुवर्ण पदकांची कमाई
****
नागपुर इथं शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल नागपूर इथं आढावा बैठकीत बोलत होते. या दंगलीमध्ये मालमत्ता तसंच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, या नुकसानासंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन, संपूर्ण नुकसान भरपाई दंगलखोरांकडून वसुल करण्यात येईल, यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करून दंगल भडकण्यास कारणीभूत ठरलेल्यांवरही कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले..
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या महसूल विभागानं जारी केलं. १३ सप्टेंबर २०२४ पासून हे शुल्क आकारण्यात येत होतं. चालू आर्थिक वर्षात १८ मार्चपर्यंत साडेअकरा लाख मेट्रीक टनांहून अधिक कांद्याची निर्यात झाली आहे. लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या महिन्यात कांद्याची आवक वाढल्यानं दर कमी झाले आहेत.
****
राज्यात साखरेचं उत्पादन घटल्यानं साखर कारखान्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, असं राष्ट्रीय सहकारी कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल पुण्यात बोलत होते. त्यासंदर्भात लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्याकरता विनंती करणार असल्याचं पाटील म्हणाले.
****
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प��्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर कमी लोकसंख्येच्या राज्यांना, अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधीत्व मिळेल, अशी शक्यता सुळे यांनी वर्तवली.
****
केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे महाराष्ट्र वीज महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
हवामानाचा अचुक अंदाज घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथं लवकरच सी-डॉप्लर रडार कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती, खासदार डॉ भागवत कराड यांनी दिली. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हे रडार बसवण्यासाठी वन विभागाने जागा उपलब्ध करून दिली असून, हे देशातलं ४०वं रडार असेल. डॉप्लर बसवल्यानंतर चारशे किलोमीटरपर्यंत त्रिज्येचं हवाई अंतर स्कॅन केलं जाणार असल्याची माहिती, कराड यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीचा राष्ट्रीय स्मारक दर्जा रद्द करण्यासाठी नाशिक इथले सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्र शासनाने १९५१ मध्ये घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं असून, केवळ काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा दर्जा देण्यात आला होता, हा निर्णय घेताना तत्कालीन लोकप्रतिनिधींची संमती घेण्यात आलेली नव्हती, असं रतन लथ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून, यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार सैनिकांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
****
जालना इथले सुप्रसिद्ध उर्दू शायर दिवंगत राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा 'दु:खी राज्यकाव्य पुरस्कार' नाशिक इथले कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना, तर ना. धों. महानोर राज्य पुरस्कार कोल्हापूर इथले साहित्यिक रफीक सूरज यांना घोषित झाला आहे. काल जालना इथं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. येत्या गुढीपाडव्याला जालना इथं हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
प्रसिद्ध हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ८८ वर्षांचे शुक्ल, हा पुरस्कार मिळवणारे ��िंदीतले बारावे, तर छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक आहेत. ‘दीवार में एक खिडकी रहती थी’, ‘नौकर की कमीज’ ही कादंबरी आणि ‘सब कुछ होना बचा रहेगा’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सावाची काल काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज बेलदारवाडीकर यांचं काल्याचं कीर्तन झालं. नाथसमाधी मंदीरात नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते काल्याची दहिहंडी फोडण्यात आली. हजारो भाविक यावेळी उपस्थित होते.
****
इंडियन प्रीमियर लीग - आएपीएल क्रिकेटच्या १८व्या हंगामात काल सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या या सामन्यात, कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद १७४ धावा केल्या. प्रत्यूत्तरात बंगळुरुच्या संघाने हे लक्ष्य १७ व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं.
****
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रिडा स्पर्धेत कालच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली. भालाफेक मध्ये महिलांच्या गटात भाग्यश्री जाधवने, पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रणव देसाईने, महिलांच्या थाळीफेक प्रकारात अक्कुताई उलभागट ने आणि ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात नाशिकच्या दिलीप गावित यांनी सुवर्णपदक जिंकलं.
****
वाचन संस्कृती लोप पावत नसून, काळाच्या गतीने धावण्यात आपण कमी पडत असल्याचं प्रतिपादन, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा ग्रंथोत्सवाचा काल समारोप झाला, त्यावेळी यांनी हे मत मांडलं,
बाईट - ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर
आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ग्रंथोत्सव चळवळीला बळ मिळावं, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं काळे यांनी सांगितलं. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल ग्रंथोत्सवाला भेट दिली.
लातूर जिल्हा ग्रंथोत्सवाचाही काल समारोप झाला. साहित्य समीक्षक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी यावेळी बोलतांना, डिजिटल माध्यमातून वाचन संस्काराचे क्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत असल्याकडे लक्ष वेधलं.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कर थकबाकी प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय आणि सचिवांच्या दालनाला काल सील ठोकलं. बाजार समितीकडे १० कोटी ३२ लाख ४७ हजार ४२३ रूपये कर थकलेला असल्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
बीड इथं काल पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सामाजिक संपर्क माध्यमांवर आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस, रिल्स, पोस्ट करणारे किंवा प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन कॉंवत यांनी केलं.
****
हिंगोली इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत काल कयाधू जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शनाला प्रारंभ झाला. यावेळी एक हजार ४१५ गटांना, तसंच स्वयं आधार महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना एकूण १७ कोटी ३६ लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
****
धाराशिव इथं काल जागतिक जलदिनानिमित्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. जलसंधारणाच्या कामातून जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्वांचा पुढाकार गरजेचा असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
बीड-गेवराई मार्गावर भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर पाच जण जखमी झाले.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
• नागपूर इथं शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश • यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना जाहीर • केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाकडून महावितरण कंपनीचा सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव • म्हैसमाळ इथं सी-डॉप्लर रडार लवकरच कार्यान्वित करणार-खासदार डॉ भागवत कराड आणि • आएपीएलच्या १८व्या हंगामाला आजपासून प्रारंभ-कोलकाता आणि बंगळुरू संघात पहिला सामना
शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज नागपूर इथं आढावा बैठकीत बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाही, यादृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या दंगलीमध्ये मालमत्ता तसंच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानासंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन, संपूर्ण नुकसान भरपाई दंगलखोरांकडून वसुल करण्यात येईल, यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचा एकतेचा संदेश आज अधिक प्रासंगिक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा यांनी लिहिलेल्या 'हेडगेवार : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी' या डॉ हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचं प्रकाशन, आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आपसात एकी नसल्यामुळे अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी भारतावर अनेक दशके राज्य केलं, मात्र छत्रपती शिवाजी महाराज अशा फुटीर प्रवृत्तींना पुरून उरले होते, असं राज्यपालांनी नमूद केलं.
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या पुनर्रचनेसंदर्भात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली पहिली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं झाली. त्या पार्श्वभूमीवर सुळे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर त्या राज्यांना अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधीत्व मिळेल, असं त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या पुरस्काराचं हे ३७वं वर्ष आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार सैनिकांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे महाराष्ट्र वीज महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरवण्यात आलं. काल नवी दिल्लीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यावेळी उपस्थित होते. महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तसंच महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
मुंबई - ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्ली इथं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. वैष्णव यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत कृती आराखडा तयार करण्याचं आश्वासन दिलं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हवामानाचा अचुक अंदाज घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथं लवकरच सीडॉप्लर रडार कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती, खासदार डॉ भागवत कराड यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाडा हा हवामान बदल आणि त्याच्या परिणामाबाबत संवेदनशील असून अवर्षणप्रवण आणि टंचाई असलेला भूभाग आहे. हवामान बदल ही कृषी अर्थव्यवस्थेसमोरची चिंताजनक बाब असल्याचंही कराड यांनी सांगितलं. हे रडार बसवण्यासाठी वन विभागाने जागा उपलब्ध करून दिली असून हे देशातील ४० वं रडार असणार आहे. डॉप्लर बसवल्यानंतर चारशे किलोमीटरपर्यंत त्रिजेचे हवाई अंतर स्कॅन केलं जाणार असल्याची माहिती, डॉ कराड यांनी दिली.
जागतिक जल दिन आज साजरा झाला. माती आणि पाणी मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे, अन्न आणि पाणी नसेल तर सजीव पृथ्वीतलावर जीवंत राहू शकणार नाही, असं मत राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलं आहे. मृद आणि जलसंधारण विभागाच्या 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' आणि 'नाला खोलीकरण आणि रुंदीकरण' या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन आज यवतमाळ इथं राठोड यांच्याहस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर, गंगापूर इथं जागतिक जलदिन मोठ्या ��त्साहात साजरा करण्यात आला. फुलंब्री तालुक्यातल्या देभेगाव इथं शालेय विद्यार्थांना पाणी बचतीची शपथ देण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयात जागतिक जल दिनाचं औचित्य साधुन पाण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं.
संत साहित्य, विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संताची भूमिका लोककल्याणाची होती, असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. शिर्डी इथं आज वारकरी साहित्य परिषदेच्या १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात विखे पाटील बोलत होते. संत साहित्य टिकून राहिल्यामुळे समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित झाली, समाज एकसंघ ठेवण्याचं सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे, असं विखे पाटील यांनी सांगितलं. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, संमेलनाध्यक्ष संजय महाराज देहूकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा असलेला राष्ट्रीय स्मारक दर्जा रद्द करण्यासाठी नाशिक इथले सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्रशासनाने १९५१ मध्ये घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं असून, केवळ काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा दर्जा देण्यात आला होता, हा निर्णय घेताना तत्कालीन लोकप्रतिनिधींची संमती घेण्यात आलेली नव्हती, असं रतन लथ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
हिंगोली इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आज कयाधू जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शनाला प्रारंभ झाला. यावेळी एक हजार चारशे १५ गटांना ८ कोटी ४९ लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी, २९९ गटांना ८ कोटी ५९ लाख रुपये, हिंगोली तालुक्यातल्या स्वयं आधार महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना १२ लाख ८७ हजार रुपये, असे एकूण १७ कोटी ३६ लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर इथं कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी महापालिकेनं कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय आणि सचिवांच्या दालनाला सील ठोकलं. बाजार समितीकडे १० कोटी ३२ लाख ४७ हजार ४२३ रूपये कर थकलेला असल्याने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार तसंच उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आज लोक अदालतीमध्ये ५४ लाख रुपयांची एकूण ४४ प्रकरणं निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणात संबंधितांना व्याजात २५% सूट न्यायाधिकरणाने दिल्याचं, महानगरपालिकेच्या वृत्तात म्हटलं आहे
नागरिकांनी कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असं आवाहन महावितरणने केलं आहे. कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा, कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद करावा, ओल्या हाताने कुलरला कधीही स्पर्श करू नये, लहान मुलांना नेहमी कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावं, आदी खबरदारी घ्यावी घेण्याचं आवाहन महावितरणने केलं आहे.
थेट पशुपालकांशी संवाद या कार्यक्रमाद्वारे आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं बालगाव इथं शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. पशुपालकांना यावेळी शासनाच्या विविध योजना आपल्या दारी कशा येतील, यावर सूक्ष्म माहिती देण्यात आली. किसान क्रेडिट कार्डची माहिती समजावून पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचे अर्ज वितरित करण्यात आले.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आएपीएल क्रिकेटचा १८ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता इथं, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत १० संघ एकूण ७४ सामने खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे.
स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शु लिऊ आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होईल.
हवामान राज्यात आज सर्वात जास्त ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान सोलापूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३५ पूर्णांक दोन, परभणी तसंच धाराशिव इथं ३८ अंशांवर तापमानाची नोंद झाली.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 22 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
पाणी वाचवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आजच्या जलदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सामाजिक माध्यमावर यानिमित्त दिलेल्या संदेशात मानवी संस्कृतीतील पाण्याची महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हचलं आहे. भावी पिढ्यांसाठी पाणी हा अमूल्य स्रोत असून, त्याचं रक्षण करण्यासाठी सामूहिक कृती करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे.
पाण्याचं संकट हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. जल जीवन मिशननं कोट्यवधी घरांना नळाचं पाणी पुरवलं आहे, अटल भूजल योजनेनं घटत्या पाण्याच्या पातळीबद्दल जागरूकता निर्माण केली असून, अमृत सरोवर योजनेमुळे जलस्रोतांचं पुनरुज्जीवन केलं आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी कळवलं आहे. ही परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली होती. यातील उमेदवारांना आपलं म्हणणं मांडता यावं, यासाठी २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान सुनावणी होणार आहे. याबाबतचं पत्र संबंधित उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे, तसंच परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी कळवलेल्या दिवशी सकाळी ११ वाजता स्वखर्चानं, सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठीची मुदत परिवहन आयुक्त कार्यालयानं दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता वाहनधारकांना ३० जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट लावणं बंध��कारक करण्यात आलं आहे. जिल्ह्यात साडे नऊ लाख वाहनांपैकी आतापर्यंत केवळ २० हजार वाहनधारकांनी 'एचएसआरपी'ची ऑर्डर दिली आहे. त्यात सुमारे ५ हजार वाहनांना प्रत्यक्षात ही नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. यामुळेच परिवहन आयुक्त कार्यालयानं ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
****
नवी मुंबईतल्या शिरवणे औद्योगिक वसाहतीतल्या शुभदा पॉलिमर्स या कारखान्यात काल रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चित्रपट चावडी या उपक्रमात यावेळी इस्राएलच्या सैन्यातील एका सैनिकावर आधारित 'फॉक्सट्रॉट' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. एमजीएमच्या व्ही. शांताराम प्रेक्षागृहात उद्या सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम वृत्तपत्रविद्या विभाग आणि एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो. प्रवेश सर्वांसाठी खुला असून, जास्तीत जास्त रसिक, विद्यार्थी, अभ्यासकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन संयोजकांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा इथल्या प्रसिद्ध श्री जगदंबा माता यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. सोंगे काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत आज रात्री गणरायाचे सोंग काढले जाईल. तसंच उद्या ��ुपारी जगदंबा मातेची मुखवटा मिरवणूक, बारा गाडे नवस फेडण्याचा कार्यक्रम ��णि उद्या रात्री पुन्हा विविध देवी-देवतांची सोंगे काढण्यात येणार आहेत. सोमवारी पहाटे जगदंबा मातेच्या स्वारीने यात्रेची सांगता होणार असल्याचं उत्सव समितीनं कळवलं आहे.
****
भाषेचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. भाषांवर आधारित ज्ञानव्यवहाराची महत्त्वाची केंद्रं म्हणून ग्रंथालयांना विशेष महत्त्व आहे, असं प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या ग्रंथोत्सवात, 'मराठी भाषेच्या विकासात ग्रंथालयांचं योगदान’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. डॉ. रा. शं. बालेकर, अनिल लहाने, गुलाबराव मगर, कुंडलिक अतकरे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला होता.
****
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजकल्याण विभाग कार्यरत असून, भविष्यात शिक्षणासाठी मुलामुलींचे वसतिगृह उभारण्याला प्राधान्य दिले जाईल, असं प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. कोल्हापूर इथल्या माणगाव परिषदेच्या १०५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते.
****
स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या आज महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत त्रिशा जोली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शु लिऊ आणि टॅन निंग यांच्याशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी स्वित्झर्लंडमधल्या बासेल इथं खेळला जाईल. काल झालेल्या सामन्यात भारतीय जोडीनं हाँगकाँगच्या युंग नगा टिंग आणि युंग पूई लाम यांचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
जागतिक जलदिन आज जगभरात साजरा होत आहे. गोड्या पाण्याचं महत्त्व आणि जलस्रोतांचं योग्य व्यवस्थापन याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि कृती करण्यास प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. १९९२ मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरो इथं झालेल्या पर्यावरण आणि विकास परिषदेत संयुक्त राष्ट्रांनी जागतिक जलदिनाची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने आज हरियाणातील पंचकुला इथं बहुप्रति��्षित जलशक्ती अभियानांतर्गत 'पावसाचं पाणी अडवू या - २०२५' ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
धाराशिव इथं आज गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या विषयावर विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
****
रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासाच्या मुद्द्यांवर काल राज्य सरकारनं जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग इथल्या आर्थिक आणि राजकीय विभागाच्या शिष्टमंडळाशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत जर्मनीच्या औद्योगिक कामगारांच्या गरजा आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्राची भूमिका, यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. राज्यातल्या कुशल तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीसाठी कौशल्यं प्रदान करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं अलीकडेच बाडेन-वुर्टेमबर्गसोबत एक करार केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. क्रांतीचौकानजीक समता दर्शन वाचनालयात काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. मुलांवर वाचनाचे संस्कार करायचे असतील, तर आधी पालकांनी पुस्तकं वाचायला हवीत, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आज सकाळी भारतीय संविधान - हक्क आणि कर्तव्य या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. तर दुपारी कथाकथनाचं सत्र होईल. सायंकाळी या ग्रंथोत्सवाचा समारोप होत आहे.
****
बीड येथील डॉ. ओमप्रकाश श��टे यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
****
तुळजापूर इथलं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
****
केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे आज संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी समाज कल्याण अधिकाऱ्यांसह बैठक आणि पत्रकार परिषद होईल. सायंकाळी नागसेनवन इथं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाचं उद्घाटन आठवले यांच्या हस्ते होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेत आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मालमत्ताकर वसुलीची वादपूर्व प्रकरणं तडजोडीअंती निकाली काढण्यात येणार असल्यानं, थकबाकीदार मालमत्ताधारका��नी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ या अभियानांतर्गत बिहार राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे युवा कलावंत आज मुंबईतल्या राजभवनात कला सादरीकरण करणार असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली. विद्यापीठाचे कुलपती, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी विविध राज्यांच्या वर्धापन दिनानिमित्त या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. गेल्या वर्षी ईशान्य भारतातील सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यापीठाच्या संघानं सहभाग घेऊन एक लाखांचं पारितोषिक जिंकलं होतं.
****
नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्णपदकं आणि एक रौप्य पदक पटकावलं. अकोल्याच्या चैतन्य पाठकनं शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं. मीनाक्षी जाधव हिनं गोळाफेकीत रौप्यपदक मिळवलं. बॅडमिंटनमध्ये आरती पाटील आणि सुकांत कदम यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
प्रीमियर लीग अर्थात आएपीएल क्रिकेटचा १८ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता इथं, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत १० संघ एकूण ७४ सामने खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे.
****
हवामान
राज्यात काल सर्वात जास्त ४० पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान वाशीम इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७, परभणी तसंच बीड इथं ३८ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Video
youtube
آکاشوانی خبریں‘ تاریخ: 22.03.2025 ‘ وقت: صبح 08:30
0 notes