Don't wanna be here? Send us removal request.
Text
Dengue vaccine | मोठी बातमी! आता डेंग्यूचा होणार अंत; वर्षभरात येणारं लस, सायरस पूनावाला यांची घोषणा

Dengue vaccine | भारतातील लस किंग सायरस पूनावाला यांनी एक मोठे विधान केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की ते एका वर्षात डेंग्यूवर बरा करणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी सांगितले की, वर्षभरात आम्ही डेंग्यू उपचार आणि डेंग्यूची लस (Dengue vaccine ) विकसित करू. आफ्रिकन देश आणि भारतात या नवीन लसीची खूप गरज आहे, जिथे लाखो लोकांना या आजाराची लागण होत आहे. Malaria vaccine Covishield च्या यशानंतर, SII जगात प्रथमच मलेरियाची लस लॉन्च करणार आहे. या लसीची आफ्रिकन देशांमध्ये आणि भारताच्या अंतर्गत भागातही नितांत गरज आहे, जिथे लाखो लोकांना या सामग्रीमुळे संसर्ग होत आहे. मोठ्या संख्येने स्त्रियांना संक्रमित करणाऱ्या रोगासाठी एक लस आहे, ही एक लस आहे जी गर्भाशयाला संक्रमित करते. Work started at SII Serum Institute of India एसआयआय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये काम सुरू सायरस पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत डेंग्यूसंदर्भात मोठी घोषणा केली. पूनावाला यांनी डेंग्यूच्या लसीची नितांत गरज सांगितली. सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या लसीवर दीर्घकाळापासून काम करत आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त, संपूर्ण आशिया आणि भारतात डेंग्यूमुळे बरेच लोक मरतात. अलीकडेच, सीरम इन्स्टिट्यूटच्या अहवालाने निष्कर्ष काढला की डेंग्यू लसीचा एकच डोस प्रौढांमध्ये सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे सहन केला जातो. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सतत चाचणी आणि काम केले जात आहे. There will be a vaccine for all four types या चारही प्रकारांसाठी लस असेल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डेंग्यूच्या चारही प्रकारांवर उपचार केले जातील. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या प्रक्रियेकडे पावले टाकू शकते. देशात औषधाच्या प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. सीरमने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यूएस स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत सहकार्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी 10 ते 40 कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात Read the full article
0 notes
Text
Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पावसाच्या खंडामुळे ‘या’ 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आगाऊ पिक विमा; कृषी आयुक्तांचे महत्त्वपूर्ण निर्देश

Crop Insurance | यंदा पावसाळा नुसता नावाला सुरू झाला आहे. शेतीसाठी पुरेसा असा काही पाऊस काही पडण्याचं नाव घेत नाहीये. म्हणूनच शेतकरी या संकटात सापडले आहे. एकीकडे अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर दुसरीकडे आता या पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या होऊनही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी पिक विम्याबाबत (Crop Insurance) कृषी आयुक्तांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. 25 percent of crop insurance will be received in advance पिक विम्याची 25 टक्के मिळणार आगाऊ रक्कम राज्यातील 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसांपासून पावसाचा खंड आहे. यामुळे पेरण्या करूनही पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, याचा परिणाम थेट पीक उत्पादनावर होणार आहे. आता यात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत 25% आगाऊ रक्कम देण्याचे निर्देश कृषी आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. याबाबतची तरतूद पिक विमा योजनेमध्ये आहे. Instructions for conducting survey in 13 districts 13 जिल्ह्यांतील सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील 25% तातडीने आगाऊ रक्कम देण्याच्या निकषाला गृहीत धरून 13 जिल्ह्यांतील 53 मंडलांना आगाऊ रक्कम देण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. याचमुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळू शकणार आहे. अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा, नाशिक, जालना, जळगाव, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Read the full article
0 notes
Text
अंतरिक्षा भारताने केला शंखनाद-नरेंद्र मोदी

नांदेड(प्रतिनिधी)-भारताने चंद्रयान-3 मधील विक्रमच्या माध्यमातून चंद्रावर पाय ठेवले. हा भारताचा अंतरिक्षात शंकनाद आहे असे प्रतिपादन दक्षीण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज सायंकाळी 5.44 वाजता भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षीण धु्रवावर उतरत असतांना नरेंद्र मोदी दक्षिण अफ्रिकेतून इस्त्रो आणि भारतीय वैज्ञानिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे सहभागी झाले होते. सायंकाळी 5.55 वाजता भारताचे चंद्रयान उभ्या रेषेत चंद्राकडे जात असतांना सर्वांचा जीव गळ्यात आला होता. इस्त्रोचे मुख्य एस.सोमनाथ यांनी चंद्रयान-3 ने चंद्रावर विक्रमद्वारे पाय रोवताच टाळ्यांचा कडकडाट केला आणि एस.सोमनाथ यांनी भारताच्या पंतप्रधानांना आम्ही यशस्वी झाल्याची माहिती दिली. त्यावेळी भारताचे पंतप्रधान यांनी हातात तिरंगा घेवून टाळ्या वाजवल्या. याप्रसंगी पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले अब चंदा मामा दुरके नहीं, तसेच भारतीय वैज्ञानिकांना शुभकामना दिल्या. भारतीय लोकांना याबद्दल सांगतांना नरेंद्र मोदी म्हणाले आम्ही आता अंतरिक्षात शंखनाद केला आहे. सोबतच आता चंद्रावरच्या व्याख्या बदलतील आणि त्याबद्दलच्या आस्था बदलतील. नवीन समीकरणे तयार होतील आणि त्यातून आम्ही जगाला नवीन माहिती देवू. याप्रसंगी जगाला संबोधीत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीमध्ये बोलले आणि म्हणाले आजच्या चंद्रयान -3 चे यशस्वी प्रदार्पण माझे एकट्याचे नसून त्यासाठी जगाची आमच्यासोबत असलेली शुभकामना महत्वपुर्ण आहे. चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आम्ही गगण यान प्रक्षेपणासाठी तयार ठेवलेले आहे. आणि आम्ही त्याद्वारे शुक्रग्रहावर जाणार आहोत. आजचा दिवस जग लक्षात ठेवील की, भारत हा पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षीण धु्रवावर आपला विक्रम उतरवला आहे. Read the full article
0 notes
Text
तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व बस चालकांसाठी 20 जुलै 2023 पासून मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य ��पासणी शिबिराचे आयोजन शासकीय रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या कालावधीत करण्यात आले आहे. तरी सर्व बसचालकांनी या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. देशात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असून रस्ता सुरक्षितता ही परिवहन विभागाची महत्वाच्या जबाबदारी पैकी एक आहे. रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे आरोग्य तसेच वाहन चालकांच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचणी निर्माण होतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यात सर्व बस चालकांची आरोग्य व दृष्टी तपासणी 20 जुलै पासून करण्यात येत आहे. या तपासणी शिबिरात माहे जुलै महिन्यात एकूण 97 वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नेत्र तपासणी दरम्यान एकूण 52 वाहनचालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात 202 वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी दरम्यान एकूण 93 वाहनचालकांना परिवहन विभागाच्यावतीने मोफत चष्म्याचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या शिबिरात चष्मा लागलेल्या वाहन चालकास मोफत चष्मे वाटप करण्यात येत आहेत. तरी बस चालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. Read the full article
0 notes
Text
रुग्णवाहिका चालक बेमुदत संपावर जाणार

मुंबई : राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ ही २०१४ पासून सुरू करण्यात आली. ही रुग्णवाहिका चालवणारे चालक सुरुवातीपासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. ��ात्र, याबाबत तोडगा न निघाल्याने चालक संपावर जाणार आहेत. बीव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांनी अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप चालकांनी केला होता. याबाबतचे निवेदन वाहनचालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले. याबाबत काय तोडगा काढण्यात येईल, यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी २५ जुलै रोजी बीव्हीजी कंपनीचे संबंधित प्रकल्पाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि वाहनचालक यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत बैठक घेत योग्य विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता महिना होत आला तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे रुग��णवाहिका चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णवाहिका ठप्प होऊ शकतात. त्याचा फटका रुग्णांना बसू शकतो. जीवनवाहिनी ठरत आहेत रुग्णवाहिका राज्यात नागरिकांच्या 24 तास अत्यावश्यक सेवेसाठी 1000 रुग्णवाहिका ही तैनात केल्या आणि 108 हा हेल्पलाईन नंबरही सुरु केला. शासनाचा हा प्रकल्प भारत विकास ग्रुप अर्थात इश्ॠ या खाजगी कंपनीकडे चालवण्यासाठी दिला आहे. सुरुवातीला काही वर्षे हा प्रकल्प अत्यंत यशस्वी म्हणून समोर आला. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने लाखो रुग्णाचे प्राणही वाचले आहेत. मात्र, ही रुग्णवाहिका चालवणा-या चालकांनी संपाचा इशारा दिल्याने ही रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याची भीती आहे. Read the full article
0 notes
Text
हायड्रोजनवर चालणारी पहिली बस आता लडाखमधून धावणार

नवी दिल्ली : भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा केंद्र��ासित प्रदेश लडाखच्या रस्त्यांवर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बससेवा लेहमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिक चाचण्यांसह सुरू करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी एनटीपीसी या प्रकल्पाअंतर्गत शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला ५ हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे. सरकारी कंपनीने बसेसला इंधन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इंधन केंद्र आणि १.७ मेगावॅटचा सोलर प्लांटदेखील बांधला आहे. यासाठी लेह प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी शहरातील ७.५ एकर जमीन भाड्याने दिली आहे. हा प्रकल्प पंतप्रधानांच्या २०२० च्या स्वातंत्र्यदिनी कार्बन-न्यूट्रल लडाखच्या घोषणेच्या दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्यात आला आहे. हायड्रोजन फ्युएल सेल बसेस भारतातील सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिकरित्या कार्यरत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाची चाचणी ११,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या दुर्मिळ वातावरणात आणि हवेतील कमी ऑक्सिजनमध्ये होणार आहे. Read the full article
0 notes
Text
वैद्यकीय ईच्छापत्र अर्थात मृत्युपत्र

आज दिनांक 8मार्च 2017 रोजी मी माधव संताजी अटकोरे वय 72 वर्ष,राहणार तथागत नगर,तरोडा खुर्द,मालेगाव रोडवर नादेड माझे वैद्यकीय इच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र स्वखुशीने ,कोणताही दबाव अथवा नशापाणी न घेता लिहून देतो कि,मी जर कोणत्याही अपघाताने किवा शारीरिक व्याधीने मेन्दूम्रत ��ालो तर मला दुरूस्त करण्यासाठी,वाचविण्याच्या ईच्छेपोटी उपचारादरम्यान पैसे खर्च करू नका कारण मेन्दूम्रत व्यक्ती दुरूस्त होण्याची शक्यताच नसते . अशा ��ीवनाच्या अन्तिम प्रसंगी दुख अथवा विलाप न करता स्वताच्या मनावर ताबा ठेवा.आणि विनाकारण नातेवाईक आणि मित्राना बोलावून नाहक त्रास देऊ नका.कारण अशा अवस्थेत जगण्याची शक्यताच नसते हे समजून घेऊन येणार्या प्रसंगाचा सामना करण्याचे साहस दाखवा. मेन्दूम्रत अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे अवयव काढून घेण्याची सुचना डॉक्टराना द्या ज्यामुळे कोणत्यातरी गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उपयोगी पडतील. मेन्दूम्रत अथवा नैसर्गिक म्रुत्युनतर माझे अवयव दान करण्यासाठी मी हे वचनपत्र भरून देतील आहे त्याचा आपण आदर करून माझ्यावरील प्रेम दाखवावे. म्रुत्युनतर मला गरम पाण्याने आन्घोळ घालू नका ,स्मशानभूमीत नेण्यासाठी तिरडी सजवू नका ,नातेवाईकांना बोलावून त्रास देऊ नका.कोणताही विधी करू नका कारण तुम्ही काहीही केले तरी मी जीवन्त होणार नाही हे सत्य मनाला पटवून द्या. माझ्या म्रुत्युनतर संपत्तीचे वाटप हा मुद्दाच नाही कारण माझ्या नावाने संपत्ती जमा करण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही.खुप कष्ट केले .ईमान कधीच विकले नाही.पत्रकारीता करताना पैसे हडप करण्याचे अनेक प्रसंग आले परंतु कोणाला जाचक ठरून पैसे कमविणे मला कधीच पटले नाही म्हणून मी आज जरी कफल्लक असलो तरी मनाने पुर्ण पणे समाधानी आहे . जगताना कमी गरजा ठेवून समाधानाने जगलो.जीवनात लबाडी केलीच असेल तर ती फक्त उपाशीपोटी असतानाच केली . मुलांनाही असेच ईमानदारीने जगण्याचा सस्कार दिला .म्हणून माझी मुले आज अतिशय चांगल्या पध्दतीने जीवन जगत आहे त्याचेही समाधान आहे. मी जर वयाच्या 72 वर्षात मरण पावलो तर एकच काम करा माझ्या वया इतके वृक्षारोपण करून त्याची जोपासना करा.झाडे मोठी होतील. ती फुले ,फळे ,सावली देतील आणि पर्यावरणाला सहाय्यक बनतील .माझी पुण्य तिथी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करू नका त्यामूळे काहीही साध्य होणार नाही. मी हे वैद्यकीय इच्छापत्र पुर्ण समाधानाने लिहून देत आहे .यासाठी दोन साक्षीदार देत आहे .एक भिमराव ईरबाजी तरटे आणि दुसरे लक्ष्मण चोखाजी जाधव …. Read the full article
0 notes
Text
निवडणूक निर्णय अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी पदी एडवोकेट पायल ओझा (गुरावा) यांची नियुक्ती

नांदेड :- नांदेड येथील एडवोकेट पायल ओमप्रकाश ओझा उर्फ पायल विजय गुरावा यांची निवडणूक निर्णय अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव श्री डॉ. पी. एल. खंडागळे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) 2014 मधील नियम 75 व 76 मधील तरतुदीमध्ये नमूद केलेल्या कवड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे करिता नांदेड जिल्ह्यासाठी परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींचा समावेश नाम तालिकेत दिनांक 31 जुलै 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आला असून नामतालिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या नामतालिकेत नांदेड येथील एडवोकेट पायल ओमप्रकाश ओझा उर्फ पायल विजय गुरावा यांचा समावेश आहे. तसेच एडवोकेट पायल यांची अलीकडेच लवाद अधिकारी (Arbitrator) म्हणून देखील आयुक्त, सहकार व निबंधक यांचे कार्यालयाद्वारा औरंगाबाद विभागासाठी नामतालिकेत समावेश करण्यात आला होता. एडवोकेट पायल ओझा या मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ व जिल्हा सत्र न्यायालय नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, परळी येथे प्रॅक्टिस करत असून त्या दक्षिण भारत सारस्वत समाजाचे माजी अध्यक्ष तथा वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक स्वर्गीय ओमप्रकाश कन्हैयालालजी ओझा (ओ. के. ओझा ) यांची मुलगी असून नांदेड सारस्वत समाजाचे अध्यक्ष तथा दैनिक सिंहझेपचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी रमेशचंद्र बालकिशांची गुरावा (शर्मा) यांच्या सून आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंद��� होत आहे. Read the full article
0 notes
Text
ActrssHD on Twitter

Source by priyagajjar80 Read the full article
0 notes
Text
ActrssHD on Twitter


Source by priyagajjar80 Read the full article
0 notes
Text
"राज्यात सत्ताबदल होणार हे मी ठासून सांगतो"

मुंबई | सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पास��न बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल, असं वडेट्टीवार म्हणालेत. तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नाहीये. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवायचं म्हणून चालवलं जात आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Text
जिल्हा परिषदमध्ये घडणारे निविदा प्रकरण चुकीचेच ; जि.प.च्या डीएसईवर असलेले कंत्राटदारांचे फोन नंबर इतरांना कसे मिळतात?

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या निविदा आणि ते काम कोणाला मिळावे यात चालणारी राजकीय निती कुठे तरी बंद झाली पाहिजे. यामुळे खऱ्या गरजवंत कंत्राटदारांना कामाचे कंत्राट मिळेल, त्यांच्यामुळे चार लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांच्या कुटूंबाचे भरण पोषण सुध्दा होईल. हा प्रकार अनेक वर्षापासून असाच सुरू आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मिनल करणवाल यांनी या निविदा प्रकारामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेमध्ये वर्षभरात कोट्यावधी रुपयांची कामे होतात. कोणत्याही कामासाठी निविदा काढली जाते. आता तर निविदा ऑनलाईन भरायची पध्दत आहे. एखाद्या कामासाठी 10 कंत्राटदारांनी निविदा भरल्या तर त्या जिल्हा परिषदेच्या डीएसईवर अपलोड होतात. निविदा भरण्याची तारीख आणि उघडण्याची तारीख सुनिश्चित असते. परंतू निविदा भरण्याचा वेळ संपल्यानंतर निविदा उघडण्यासाठी विहित वेळेपेक्षा 10 ते 15 दिवस उशीर लावला जातो. जिल्हा परिषदेमध्ये गुप्त रुपात असलेल्या डीएसईवरील त्या कंत्राटदाराचा फोन नंबर इतरांना मिळतो. त्यानंतर असे सांगितले जाते की, त्या निविदेतील काम अमुक एका माणसाने आणले आहे म्हणून दुसऱ्या कंत्राटदारांनी आपल्या निविदा पर घेण्याचे पत्र द्यावे असा दबाव आणला जातो. काही कंत्राटदार आपसात मोदकांची देवाण-घेवाण पण करत असतील परंतू या सर्व चुकीच्या पध्दती आहेत. अमुक एक व्यक्ती काम आणतो म्हणजे तो मंत्रालयात जाऊन ते काम मंजुर करून घेतो काय? कारण शासनाकडे कोणते काम करायचे आहे, कोठे गरज आहे, कोणत्या योजना आहेत या सर्वांची इंत्यभुत माहिती असते आणि त्या आधारावरच कामांसाठी निधी वितरीत होत असतो. कोण्या एका माणसाच्या सांगण्यामुळे एक काम मंजुर होत नसते ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया सरकार बदलली तरी सुरुच राहते. मग हा अमुक माणुस कसा त्याचा हक्कदार होतो हे न उलगडणारे कोडे जिल्हा परिषदमध्ये सुरू आहे. या सर्व चुकींच्या कामांवर नियंत्रण आणण्यासाठी सध्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या पदावर मिनल करणवाल ह्या काम करत आहेत. त्यांनी आपल्याकडून सासुचेच प्रेम मिळेल असे एक वक्तव्य जाहीरपणे केलेले आहे. त्या अर्थाने त्यांनी ते सासुचे प्रेम दाखवायला हवे आणि चुकीच्या कामावर जरब यायला हवा अशीच अपेक्षा आहे. Read the full article
0 notes
Text
Diet To Protect From Mosquito Bite | डासांना मारण्यासाठी औषधांची नाही गरज! आहारात करा ‘हे’ बदल एकही डास नाही चावणार, डेंग्यूपासून होईल बचाव
Diet To Protect From Mosquito Bite | डास म्हणजे फक्त खाज सुटण्याची समस्या नाही. डास चावल्यानेही अनेक आजार होतात. ज्यामध्ये डेंग्यू ते मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या घातक आजारांचा समावेश आहे. त्यामुळे जगभरातील लाखो लोकांना प्रत्येक वेळी त्रास सहन करावा लागतो. मॉस्किटो रिपेलंट्स आणि मच्छरदाणी हे डास चावण्यापासून वाचण्याचा एक चांगला मार्ग आहे, त्याशिवाय या कामात तुमचा आहारही (Diet To Protect From Mosquito Bite) खूप उपयुक्त ठरू शकतो. चांगला आहार घेतल्याने तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत करू शकता की तुम्ही डास चावल्यामुळे होणारे आजार टाळू शकता. व्हिटॅमिन सी समृद्ध आहार व्हिटॅमिन सी समृद्ध अन्नामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याची क्षमता असते. तुम्ही तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करू शकता. जसे संत्री किंवा द्राक्षे. याशिवाय, किवी, शिमला मिरची हे देखील व्हिटॅमिन सी समृद्ध आहार आहे. जास्त समृद्ध आहार मांसाहारामध्ये दुबळे मांस आणि पोल्ट्री पदार्थांव्यतिरिक्त, कडधान्ये, ड्रायफ्रुट्स आणि विविध प्रकारच्या बियांमध्ये भरपूर झिंक असते. जे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी आणि अँटीबॉडीज मजबूत करतात. यासोबतच ते डासां��्या चावण्याने निर्माण होणाऱ्या रोगजनकांच्या विरोधात लढण्यासाठी शरीराला ताकद देते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड समृद्ध आहार जवस, अक्रोड आणि मासे खाणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड समृद्ध आहार घेत आहेत. हा घटक दाहक-विरोधी आहे. जे सेल झिल्ली मजबूत करते आणि रोगप्रतिकारक पेशींचे कार्य सुधारते. आले आणि हळद आले आणि हळद हे फक्त नैसर्गिक इम्युनो बूस्टिंग फूड म्हणता येईल. आल्यामध्ये अँटीवायरल गुणधर्म तसेच अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. याशिवाय हळदीमध्ये कर्क्यूमिन मुबलक प्रमाणात असते. या दोन गोष्टींचा आहारात समावेश केल्यास शरीराची रोगांशी लढण्याची शक्ती वाढवता येते. व्हिटॅमिन डी समृद्ध आहार व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात विशेष भूमिका बजावते. सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त, आपण फॅटी मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यातील पिवळ बलक यापासून व्हिटॅमिन सी मिळवू शकता. Read the full article
0 notes
Text
PM Vishwakarma Yojana | मोठी बातमी! मोदी सरकारने आणली नवी योजना; आता 5 टक्के व्याजदराने ‘या’ लोकांना मिळणार 1 लाखांच कर्ज

PM Vishwakarma Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर एका दिवसानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत ( PM Vishwakarma Yojana) पाच वर्षांत 13 हजार ��ोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कुशल कामात गुंतलेल्या कामगारांना स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते. त्याचवेळी, कौशल्याशी संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. किती रक्कम खर्च केली जाईल? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी झाली. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर योजनेच्या मंजुरीची माहिती दिली. ते म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे, ज्यावर 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 30 lakh artisans will benefit | 30 लाख कारागिरांना फायदा होणार ते म्हणाले की, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 या पाच वर्षांत 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 17 सप्टेंबरपासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू होणार आहे. या अंतर्गत अशा कामगारांना लाभ मिळणार आहे, जे कौशल्याशी संबंधित कामात गुंतलेले आहेत आणि जिथे गुरु-शिष्याची परंपरा अजूनही सुरू आहे. या योजनेचा 30 लाख पारंपारिक कारागिरांना फायदा होणार असल्याचे मंत्री म्हणाले. Who will benefit from PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेचा कोणाला होईल फायदा? लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलविक्रेते, मासे जाळे विणणारे, लॉकस्मिथ, शिल्पकार इत्यादींची गणना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ होणार्या संभाव्य कारागिरांमध्ये केली जात आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत या लोकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, अधिक कौशल्ये कशी विकसित करता येतील याकडे लक्ष दिले जाईल आणि पारंपारिक कामगारांना नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइनची माहिती मिळावी. या योजनेंतर्गत पारंपारिक कामगारांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठीही मदत केली जाणार आहे. योजनेंतर्गत, मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील. कोर्स करणाऱ्या कामगारांना सरकारकडून स्टायपेंड दिला जाईल. 500 रुपये प्रतिदिन या दराने स्टायपेंड मिळेल. How can you get financial help under PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत आर्थिक मदत कशी मिळेल? पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल, ज्यावर जास्��ीत जास्त 5 टक्के व्याजदर असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही दिले जाणार आहे. आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. Read the full article
0 notes
Text
यूनिवर्सल शाळेचे संचालक श्री जितेंद्रसिंघ पहाडिया राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नांदेड : दिनांक १७ ऑगस्ट २०२३ नांदेड शहरातील गेल्या ३० वर्षा पासुन शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची वैविध शिक्षण पद्धती व अनेक उपक्रमांतून विद्यार्थीयांना शिकवण्या साठी या शाळेचे नाव आहे. अनेक विद्यार्थी उपयोगी प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांत विज्ञान, भाषा, खेळ, धैर्य, संस्कृती संवर्धन या बाबतीत ही शाळा समाजात लोकप्रिय आहे. या सर्व उपक्रमाची नोंद राष्ट्रीय पातडीवर घेऊन शाळेचे उपक्रमशील संचालक व उच्च विद्या विभूषित श्री जितेंद्र सिंघ पहाडिया यांना “स्किल भारत सम्मान २०२३” जाहीर झालेला आहे. सदरील पुरस्काराचे वितरण माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार ( वित्त व योजना, वन मित्र, ��हाराष्ट्र ) यांच हस्ते मुंबई येथे एका भव्य कार्यक्रमात २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदरील पुरस्कार हा सीएनबीसी टीव्ही “OLL- skill for all” आणि “स्किल टैंक” या संस्थे तर्फे प्रायोजित केलेला असून मराठवाड्यातून हा मानाचा सन्मान यूनिवर्सल शाळेस मिळालेला आहे. त्या मुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना आनंद झालेला आहे. यूनिवर्सल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योतकौर, शिक्षकवृंद, एसोसिएशन ऑफ इंग्लिश मीडियम स्कूल्स नांदेड चे अध्यक्ष श्री केशव जी गाडडम, आनंदवन मित्र परिवाराचे श्री संजय बजाज, श्री नारायण दादा श्रीमनवार, श्री गोविंद जी बजाज यांनी अभिनंदन केले आहे. सदरील पुरस्कार मुळे नांदेडचा शैक्षणिक क्षेत्राचे नाव उज्वल झाले आहे. Read the full article
0 notes
Text
एक ऐसा Coruse जिससे आप अपना Own Business स्टार्ट कर सक्ते हो....

एक ऐसा Coruse जिससे आप अपना Own Business स्टार्ट कर सक्ते हो.... 🌐 Exciting news! Join me in embarking on a journey to master the art of web development with the incredible guidance of Balaji Gaikwad. 🚀 Let's dive into the world of coding, design, and creating amazing websites. Don't miss out on this opportunity to broaden your skillset and unleash your creativity! 🖥️ #WebDevelopment #LearningJourney #BalajiGaikwad Call # 086686 71716 Read the full article
0 notes
Text
भोकर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजारांची मदत द्या-सतिश देशमुख

नांदेड(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस होत असल्याने भोकर तालुक्यातील शेतीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी व भोकर तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे अशी मागणी शिवसेना(ठाकरे) उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील काही दिवसांपासून भोकर तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. सुरूवातीला पेरण्या उशीरा झाल्यामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला होता. एकीकडे पेरण्या झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात असणारे कोवळे पिके या पावसात वाहुन गेली. यामुळे पिकासह शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडे आता आत्महत्येशिवाय आता दुसरा पर्याय उरला नाही. त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे. अगोदरच शेती मालाला योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकरी पुर्णता: कोलमडला आहे. नदीकाठच्या गावात नदीचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. याचबरोबर नदीकाठच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांसह शेतीतील माती वाहुन गेली. त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची ��दत देण्यात यावी, याचबरोबर नदीकाठच्या गावातील नागरीकांना इतरत्र स्थलांतर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख, तालुकाप्रमुख माधव वडगावकर, तालका संघटक संतोष आलेवाड, पांडूरंग वर्षेवार, माजी जि.प.सदस्य सुनिल चव्हाण, मारोती पवार, बाबूराव खेदानपुरे, जगदीश गडदे यांच्यासह आदींचे निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. Read the full article
0 notes