Tumgik
#मुसळधार
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत नवी दिल्ली : मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची मामल्लापुरम किनारपट्टी ओलांडली आहे. सध्या हे चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 16 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 September 2024
Time - 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा रविवारी २९ सप्टेंबरला पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजनही यावेळी होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांचा कालचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता.
दरम्यान, पंतप्रधान मोदी परवा रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत नऊ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली. पौष्टिक आहाराबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणारे उपक्रमही राबवल्याची मंत्रालयानं दिली आहे.
****
देशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत ऐंशी कोटीं रोपांची लागवड करण्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं आहे. ३० सप्टेंबर या अंतिम मुदतीच्या आधी हे लक्ष्य गाठले असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं. यात उत्तर प्रदेश सरकारने सर्वाधिक २६ कोटी रोपांची लागवड केली आहे.
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा केला जात आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाच�� आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
देशात कापसाच्या उत्पादनात पुढच्या वर्षी किमान एक हजार किलो प्रति हेक्टरने वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या देशातल्या कापसाचं उप्पादन साडेचारशे किलो प्रति हेक्टर असून, ते अमेरिका, रशिया, चीन, ब्राझील या देशात होणाऱ्या दोन हजार ते दोन हजार दोनशे किलो प्रति हेक्टर उत्पादनापेक्षा कमी असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील यांचं आज धुळे इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. पाटबंधारे आणि अन्य खात्याचं मंत्रिपद भूषवलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अक्कलपाडा आणि अन्य प्रकल्प पूर्णत्वास नेले. काँग्रेस पक्षातही अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज परभणी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. या पथनाट्यातून ओला कचरा सुखा कचरा विलागिकरण, आपला कचरा आपली जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेच्यावतीनं विविध माहिती फलक लावण्यात आले होते.
****
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातल्या सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातल्या उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. येत्या रविवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे उद्या २८ तारखेला सुरमणी पंडित उत्तमराव अग्निहोत्री स्मृति संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आलं आहे. या समारोहात सुप्रसिद्ध संवादिनी वादक आणि पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांचे नातू ओंकार अग्निहोत्री यांचं सादरीकरण होणार आहे.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान दुसरा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून कानपूर इथं सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. उपाहारापर्यंत बांग्लादेशच्या दोन बाद ७४ धावा झाल्या होत्या.
****
0 notes
6nikhilum6 · 2 days
Text
Holiday Declared On September 26 For Schools and Colleges In Pune And Pimpri-Chinchwad Due To Heavy Rainfall
भारतीय हवामानशास्त्र विभागानी वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा असून या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना म्हणून #पुणे आणि #पिंपरीचिंचवड शहरातील सर्व #शाळा व महाविद्यालयांना २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर -जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) September 25, 2024 Pune city experienced torrential rain on September 25…
0 notes
mhlivenews · 25 days
Text
Nanded Rain Update: सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका, २५ जनावरे मृत्युमुखी
Heavy Rains In Nanded: नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २५ जनावरांचा मृत्यू झालाय तर एक जण पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. महा���ाष्ट्र टाइम्स.कॉम नांदेड(अर्जुन राठोड): जिल्हात सलग दुसऱ्या दिवशी ही पावसाने जोरदार हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवष्टीमुळे दोन लाख हेक्टरहुन अधिक शेतीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
Hawaman Andaj Today: IMD नुसार, आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशासह किनारपट्टी कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान मिझोराम, त्रिपुरा यासह गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे जारी केले आहे. IMD ने म्हटले आहे की, गुजरात आणि राजस्थानमध्ये 28 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. तर कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत 27 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
imranjalna · 3 months
Text
जालना जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता
दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन Yellow alert in Jalna district; Gusty wind, chance of rain जालना, दि. 22 (जिमाका)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 23 जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने) मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, दिनांक 24 जून रोजी तुरळक ठिकाणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 5 months
Text
Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात
Pune News : पुणे शहरासह परिसरात शनिवारी सायंकळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर शनिवारीही जोरदार अवकाळी पाऊस बरसला. पुण्यातील धानोरी, मुंढवा केशवनगर, खराडी भागामध्ये पावसाला सुरुवात झाली असून घोरपडीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. तसेच लोहगावात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील मुख्य भाग असलेला शिवाजी नगरमध्येही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagbharat · 10 months
Text
अनपेक्षित मुसळधार पावसाने यश चौक, कारेगाव औद्योगिक परिसरातील जनजीवन विस्कळीत ! https://www.shirurvarta.in/?p=11765
0 notes
crime-chovis-tass · 1 year
Text
भंडारा जिल्ह्यात तीन तास ढगफुटी सदृष्य पाऊस:रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ, अनेक ठिकाणी पूरस्थिती
मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली असतानाच शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून तब्बल साडेबारा वाजेपर्यंत अक्षरश: ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. तब्बल तीन तासापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भंडारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. सर्वत्र जलमय स्थिती                            निवासी वसाहतीत रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहे.                …
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
मुंबईत वीकेंडला मुसळधार पाऊस?
https://bharatlive.news/?p=171890 मुंबईत वीकेंडला मुसळधार पाऊस?
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात ...
0 notes
Video
youtube
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, ४,५ दिवस मुसळधार पाऊस..
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बात���्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन 
पंतप्रधानांचा नियोजित पुणे दौरा रद्द-मात्र तीन परम रुद्र संगणकांचं दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कोठडीसह २५ हजार रुपये दंड
आणि
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम-पालघर तसंच नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज लद्दाखमध्ये सियाचीन या जगातल्या सर्वाधिक उंचीवर असलेल्या सैन्यदलाच्या तळाला भेट देऊन राष्ट्रपतींनी तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला. इथल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले. सियाचीन युद्ध स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून त्यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतरत्न दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर सियाचीन दौरा करणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्याच राष्ट्रपती आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
या दौऱ्यात नियोजित कार्यक्रमांपैकी तीन परम रुद्र संगणकांचं तसंच हवामान विभागासंदर्भात एक संगणकीय यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आलं. शास्त्रोक्त संशोधनासाठी सहायक ठरणारे हे परम रुद्र संगणक दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात स्थापन करण्यात आले आहेत.
****
देशांतर्गत कापूस उत्पादनात प्रति हेक्टरी एक टन वृद्धीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. कृषीपाठोपाठ रोजगार देणारं वस्त्रोद्योग हे मोठं क्षेत्र असून सन २०३० पर्यंत या क्षेत्रामध्ये सहा कोटी लोकांना रोजगार देता येतील असा विश्वासही गिररराज सिंह यांनी वर्तवला.
****
देशात सर्वसामान्य नागरिकांना एकंदर आरोग्य सुविधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाल्याचं निरीक्षण राष्ट्रीय आरोग्य योजनांबाबतच्या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या खर्चाचं प्रमाण ६४ पूर्णांक दोन शतांश टक्के होतं, २०२१ मध्ये ते प्रमाण ३९ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही सरकारनं आरोग्य क्षेत्रावर केलेल्या खर्चाचं प्रमाण १ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांवरून वाढून १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोचल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं. मात्र, या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
****
प्रशिक्षण काळातच प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांचं अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचे निर्देश देत, हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खेडकर सध्या हंगामी जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला केंद्रीय लोकसेवा आयोग-युपीएससीने विरोध केला आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, अनेक भागात हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी देण्यात आली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
****
लातूर जिल्ह्यात रेणा नदीवरील रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे आज सकाळी १० सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा १ हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
****
हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्या निमित्त धाराशिव तालुक्यातील सांजा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर भांगे यांनी या उपक्रमामुळे गावाचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास सुरू असल्याचं सांगत, अधिक माहिती दिली –
१७ सप्टेंबरपासून पूर्ण जिल्हाभरामध्ये उपक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये एक पेड माँ के नाम, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, गावामध्ये स्वच्छतेचे जे कामं झालेले आहेत, त्या कामाचं उद्‌घाटन, त्याच्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग हा दैनंदिन उपक्रम राबवतोय. दोन ऑक्टोबर हा पूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व सहभागी व्यक्तींचा अशा कुटुंबाचा सत्कार सोहळा, त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा करणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्रवर्ग -४ मधील हर्सुल कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांना कचरा संकलन, वर्गीकरण, ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती, सुक्या कचराचे व्यवस्थापन या विषयीची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना स्वच्छता विषयक प्रतिज्ञा देण्यात आली.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
नांदेड जिल्ह्यात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्ट २०२४ पासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं अबिनाश कुमार यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या २७ आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील पर्यटन स्थळांना चालना आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.
****
बीड जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी काम करताना सर्व नियम आणि कायद्यातील तरतुदी याची माहिती घेऊन काम करावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात या अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune : पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली, नाशिक, कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस
एमपीसीन्यूज – राज्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ठिकठिकाणी(Pune ) मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. आज हवामान खात्याने पुण्यासह सातारा आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे.तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे ,रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण…
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
imranjalna · 5 months
Text
जालना जिल्ह्यात 25 व 26 एप्रिल रोजी यलो अलर्ट विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता   
25 व 26 एप्रिल दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन Yellow Alert on 25th and 26th April in Jalna district with possibility of heavy rain with lightning. जालना, दि. 24 (जिमाका) :-   प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 25 व 26 एप्रिल 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes