#चक्रीवादळामुळे
Explore tagged Tumblr posts
Text
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत नवी दिल्ली : मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची मामल्लापुरम किनारपट्टी ओलांडली आहे. सध्या हे चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी…
View On WordPress
#cyclone#mandous:#आहे#गं��ीर#चक्रीवादळामुळे#चार#चेन्नईत#जनजीवन#ठार#तामिळनाडूत#पाऊस#मंडूस#मुद्दा#मुसळधार#वादळीवाऱ्यासह#विस्कळीत
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन
पुण्यातल्या पोर्शे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशीची काँग्रेस पक्षाची मागणी
आणि
दक्षिण मराठवाड्यात पुढील ३६ ते ४८ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता
****
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातला दुष्काळ तसंच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीटीचे पंचनामे, मदत आणि येणारा पाऊस यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. पावसाळ्यात अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये औषधे, पुरेसे अन्नधान्य पुरवणे, तसंच कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश मधून येणाऱ्या पाण्याबद्दल समन्वय ठेवणे, या विषयावरही बैठकीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. वीर सावरकर यांनी देशसेवेसाठी समर्पित केलेलं जीवन देशसेवेची प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शासकीय निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.
मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या ��पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शहरातल्या विविध संघटनांच्यावतीनं समर्थ नगर भागात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आलं.
नांदेड महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या सावरकर चौकात ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर सतीश महामुनी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरी शहरातलं ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातल्या सावरकर स्मारकात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
****
पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फतच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अंमली पदार्थांचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असून, या रुग्णालयाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर एक पोस्ट केली आहे. रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणं योग्य नाही, म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समीक्षा होणं आवश्यक असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
****
रेमल चक्रीवादळामुळे मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये आज भूस्खलनात दहा जणांचा मृत्यू झाला. एका दगडाच्या खाणीत झालेल्या या अपघातात अनेक मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू झालेलं असून, मजुरांना बाहेर का��ण्यासाठी प्रशासनाने शोध मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
****
हरियाणामधील बहुचर्चित रणजित सिंग हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सह अन्य चौघांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. रणजीत सिंग यांची १० जुलै २००२ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने राम रहीमसह चौघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयानं सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला. दरम्यान, सिरसा इथल्या आश्रमात दोन महिला अनुयायांवर लैगिंक अत्याचार प्रकरणी गुरुमीत राम रहिम हा वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
****
राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली. या आरोपींना वडोदरा, गोपालगंज, दिल्ली, गुरुग्राम आणि चंदीगढ इथून अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय युवकांना नोकरीचं आमिष दाखवून परदेशात नेऊन त्यांना कंबोडिया आणि लाओस सारख्या ठिकाणी अवैध कामांसाठी प्रवृत्त करण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. या कारवाईत कागदपत्रं, डिजिटल उपकरणं, एकाधिक पासपोर्ट, आदी साहित्य जप्त करण्यात आल्याचं एनआयएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
छत्तीसगड इथल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्यानं आज गडचिरोली इथं केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. गणेश गट्टा पुनेम असं त्याचे नाव असून, शासनानं त्याच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
दक्षिण मराठवाड्यात पुढील ३६ ते ४८ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ही माहिती दिली. आज शहरात ३९ पूर्णांक ९ सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तसंच शहरात ३७ पूर्णांक २ दशांश किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते अशी माहिती औंधकर यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात जनावरांना आवश्यक असलेला चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी यांनी दिली आहे. चारा टंचाई भासू नये यासाठी विभागामार्फत गेल्या वर्षी ५६ हजार ८१५ किलो स��धारीत ज्वारी वैरण बियाणांचे वाटप करण्यात आलं होतं. त्यामधून ३ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर बियाणाची पेरणी केल्यामुळे ३ लाख मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध झाला आहे. तसंच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या दुय्यम उत्पादनातून साडे सात लाख मेट्रीक टन इतका चारा उपलब्ध झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली असून जून महिन्यात विभागातर्फे सुधारीत मका वैरण बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया निर्दोष पद्धतीनं पार पाडता यावी यासाठी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावं, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतर्फे ४० तलावांमधून आतापर्यंत ४४ हजार २८७ ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या तलाव आणि धरणातील गाळ काढण्याचं काम लोकसहभागातून सुरू असून यात सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, तसंच काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी घेवून जावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. ही बाब विचारात घेवून लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे.
****
एफ आय एच हॉकी प्रो लीग युरोपीय स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतानं हरमनप्रीत सिंहच्या हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाचा पाच - चार असा पराभव केला. भारतासाठी अरैजीत सिंह हुंदल आणि गुरजंत सिंह यांनी प्रत्येकी एक आणि हरमनप्रीत सिंहनं तीन गोल नोंदवले. भारताचा पुढचा सामना एक जूनला जर्मनीसोबत होणार आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकमधल्या प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत भारताच्या अंकुशिता बोरो ���ीनं महिलांच्या ६० किलो वजनी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. अंकुशिता हिनं मंगोलियाच्या नमुन मोनखोर हिच्यावर ४-१ अशी मात केली. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात मात्र भारताच्या अभिमन्यू लॉरा याचं आव्हान संपुष्टात आलं.
****
0 notes
Text
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ९३ लाख मंजूर - मदत व पुनर्वसन मंत्रीविजय वडेट्टीवार
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ९३ लाख मंजूर – मदत व पुनर्वसन मंत्रीविजय वडेट्टीवार
मुंबई, दि.०९ : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 लाख (बारा कोटी त्र्यान्नव लक्ष फक्त) रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दि. 16 व 17 मे, 2021 रोजी झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रात तसेच…
View On WordPress
0 notes
Text
Cyclone Jawad News : जवाद चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची शक्यता...
Cyclone Jawad News : जवाद चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील “या” जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची शक्यता…
नवी दिल्ली l जवाद चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे त्याचं रुपांतर चक्रीवादळात होईल आणि हे वादळ शनिवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकेल, असं भारतीय हवामा�� विभागानं म्हटलंय. बंगालच्या उपसागरावरील हवेचा खोल दाब ‘जवाद’ चक्रीवादळात तीव्र झाला आहे.(…
View On WordPress
0 notes
Text
यास चक्रीवादळामुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान, हे राज्य सरकार भरपाई देईल
यास चक्रीवादळामुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान, हे राज्य सरकार भरपाई देईल
कृषी बातम्या टाऊट नावाच्या चक्रीवादळाच्या वादळाने भारताच्या पश्चिम किना hit्यावर धडक दिली होती, परंतु ते निघण्यापूर्वीच दुसर्या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या चक्रीवादळाच्या वादळाचे नाव यास होते, ज्याने मेच्या उत्तरार्धात पश्चिम बंगालच्या उपसागरात सुरुवात केली. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये याचा परिणाम झाला आहे. इतकेच नव्हे तर यास चक्रीवादळामुळे शेतकर्यांच्या पिकांचेही…
View On WordPress
0 notes
Text
#Maharashtra #CycloneTauktae #CMOMaharashtra तोक्ते चक्रीवादळ नुकसान ग्रस्तांना मदत देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
#Maharashtra #CycloneTauktae #CMOMaharashtra तोक्ते चक्रीवादळ नुकसान ग्रस्तांना मदत देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 21 – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानीची…
View On WordPress
0 notes
Text
'येत्या ४८ तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल'
वेब महाराष्ट्र टीम : मेकुनू चक्रीवादळाचा अडथळा दूर झाल्यानं ��ेत्या 48 तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मेकुनू चक्रीवादळामुळे कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मात्र असं असलं तरी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं…
View On WordPress
1 note
·
View note
Text
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठं नुकसान, राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा
https://bharatlive.news/?p=105480 बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठं नुकसान, राजस्थानमध्ये कमी ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन
पुण्यातल्या पोर्शे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशीची काँग्रेस पक्षाची मागणी
आणि
दक्षिण मराठवाड्यात पुढील ३६ ते ४८ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता
****
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातला दुष्काळ तसंच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीटीचे पंचनामे, मदत आणि येणारा पाऊस यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. पावसाळ्यात अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये औषधे, पुरेसे अन्नधान्य पुरवणे, तसंच कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश मधून येणाऱ्या पाण्याबद्दल समन्वय ठेवणे, या विषयावरही बैठकीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. वीर सावरकर यांनी देशसेवेसाठी समर्पित केलेलं जीवन देशसेवेची प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शासकीय निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.
मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शहरातल्या विविध संघटनांच्यावतीनं समर्थ नगर भागात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आलं.
नांदेड महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या सावरकर चौकात ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर सतीश महामुनी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरी शहरातलं ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातल्या सावरकर स्मारकात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
****
पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फतच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अंमली पदार्थांचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असून, या रुग्णालयाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर एक पोस्ट केली आहे. रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणं योग्य नाही, म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समीक्षा होणं आवश्यक असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
****
रेमल चक्रीवादळामुळे मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये आज भूस्खलनात दहा जणांचा मृत्यू झाला. एका दगडाच्या खाणीत झालेल्या या अपघातात अनेक मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू झालेलं असून, मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने शोध मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
****
हरियाणामधील बहुचर्चित रणजित सिंग हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सह अन्य चौघांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. रणजीत सिंग यांची १० जुलै २००२ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने राम रहीमसह चौघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयानं सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला. दरम्यान, सिरसा इथल्या आश्रमात दोन महिला अनुयायांवर लैगिंक अत्याचार प्रकरणी गुरुमीत राम रहिम हा वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
****
राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली. या आरोपींना वडोदरा, गोपालगंज, दिल्ली, गुरुग्राम आणि चंदीगढ इथून अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय युवकांना नोकरीचं आमिष दाखवून परदेशात नेऊन त्यांना कंबोडिया आणि लाओस सारख्या ठिकाणी अवैध कामांसाठी प्रवृत्त करण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. या कारवाईत कागदपत्रं, डिजिटल उपकरणं, एकाधिक पासपोर्ट, आदी साहित्य जप्त करण्यात आल्याचं एनआयएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
छत्तीसगड इथल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्यानं आज गडचिरोली इथं केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. गणेश गट्टा पुनेम असं त्याचे नाव असून, शासनानं त्याच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
दक्षिण मराठवाड्यात पुढील ३६ ते ४८ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ही माहिती दिली. आज शहरात ३९ पूर्णांक ९ सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तसंच शहरात ३७ पूर्णांक २ दशांश किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते अशी माहिती औंधकर यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात जनावरांना आवश्यक असलेला चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी यांनी दिली आहे. चारा टंचाई भासू नये यासाठी विभागामार्फत गेल्या वर्षी ५६ हजार ८१५ किलो सुधारीत ज्वारी वैरण बियाणांचे वाटप करण्यात आलं होतं. त्यामधून ३ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर बियाणाची पेरणी केल्यामुळे ३ लाख मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध झाला आहे. तसंच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या दुय्यम उत्पादनातून साडे सात लाख मेट्रीक टन इतका चारा उपलब्ध झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली असून जून महिन्यात विभागातर्फे सुधारीत मका वैरण बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया निर्दोष पद्धतीनं पार पाडता यावी यासाठी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावं, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतर्फे ४० तलावांमधून आतापर्यंत ४४ हजार २८७ ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या तलाव आणि धरणातील गाळ काढण्याचं काम लोकसहभागातून सुरू असून यात सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, तसंच काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी घेवून जावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. ही बाब विचारात घेवून लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे.
****
एफ आय एच हॉकी प्रो लीग युरोपीय स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतानं हरमनप्रीत सिंहच्या हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाचा पाच - चार असा पराभव केला. भारतासाठी अरैजीत सिंह हुंदल आणि गुरजंत सिंह यांनी प्रत्येकी एक आणि हरमनप्रीत सिंहनं तीन गोल नोंदवले. भारताचा पुढचा सामना एक जूनला जर्मनीसोबत होणार आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकमधल्या प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत भारताच्या अंकुशिता बोरो हीनं महिलांच्या ६० किलो वजनी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. अंकुशिता हिनं मंगोलियाच्या नमुन मोनखोर हिच्यावर ४-१ अशी मात केली. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात मात्र भारताच्या अभिमन्यू लॉरा याचं आव्हान संपुष्टात आलं.
****
0 notes
Text
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
मुंबई-प्रतिनिधी बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी…
View On WordPress
0 notes
Photo
सर्वकाळ ध्यान हरिरूप ज्याचें । तया सर्व रूप साचे जवळी असे ।।१।। हरि हरि जाला प्रपंच अबोला । हरिसुख निवाला तोचि धन्य ।।२।। हरि हेचि मन संपन्न अखंड । नित्यता ब्रह्मांड त्याचे देही ।।३।। सोपान विदेही सर्वरूपी बिंबतू । हरिरूपी रतु जीव शिव ।। कोविड व निसर्ग चक्रीवादळामुळे आलेल्या संकटाशी लढण्याचे बळ आम्हाला दे, लवकरात लवकर हे संकट होऊन सर्वांना सुखी-समाधानी, निरोगी जीवन जगता येऊ दे, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना! सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! #आषाढीएकादशी #आषाढीएकादशी2020 #AshadhiEkadashi #askdigitalweb #socialmediamarketing #aurangabad (at Pandharpur - पंढरपूर) https://www.instagram.com/p/CCFpFd4jT68/?igshid=21jk542k1fx6
0 notes
Text
कुडाळ तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना १ कोटी ७१ लाख निधी मंजूर
कुडाळ तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना १ कोटी ७१ लाख निधी मंजूर
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मंजूर निधीच्या पत्रांचे वितरण कणकवली: मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकराने कुडाळ तालुक्यातील तौक्ते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी शासन निकषानुसार देय रक्कम रु १ कोटी ७१ लाख निधी मंजूर केला आहे. यामध्ये नुकसान भरपाईच्या एस.डी.आर.एफ. दराने ८६ लाख ३१ हजार व वाढीव दराने ८४ लाख ७४ हजार रु निधी…
View On WordPress
0 notes
Text
तौक्ते वादळग्रस्तांसाठी अकोल्याला ५७ लाखांची मदत
अकोला : यंदा मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेती पिकांसह घरांचे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ५७ लाख १६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी अकोला, अकोट, तेल्हारा व बार्शी टाकळी तालुक्यातील तहसीलदारांना वर्ग करण्यात आला असून, लवकरच त्याचे वाटप करण्यात येईल. मे महिन्याच्या मध्यावधीत अरबी समुद्रात निर्माण…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Photo
Breaking News : चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त कोकणी माणसाला आमदार लक्ष्मण जगताप यांचा मदतीचा हात ; Learn More : http://indiareal.in/?p=25901&lang=mr&feed_id=4610&_unique_id=5ef4d56fb3a2f
0 notes
Photo
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी मुंबई :- निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज, शनिवार (१३ जून) रोजी एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत.
0 notes
Text
Cyclone Biporjoy : चक्रीवादळामुळे 76 गाड्या रद्द, 143 गाड्या प्रभावित
https://bharatlive.news/?p=105194 Cyclone Biporjoy : चक्रीवादळामुळे 76 गाड्या रद्द, 143 गाड्या प्रभावित
Cyclone Biporjoy Update: आज ...
0 notes