#पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 October 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
पश्चिम बंगाल विधान सभा पोटनिवडणुकीत भवानीपूर मतदार संघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अकराव्या फेरी अखेर ३८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरूद्ध भारतीय जनता पक्षाच्या प्रियांका टिब्रेवाल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे श्रीजीब बिस्वास निवडणूक लढवत आहेत. समशेरगंज आणि जांगीपूर मतदारसंघातही सध्या मतमोजणी सुरु आहे.
ओडिसात पिपिली मतदार संघात बिजू जनता दलाचा उमेदवार रूद्र प्रताप महारथी ५१४० मतांनी आघाडीवर आहे. आज सकाळी या पोटनिवडणुकीतील मतदान मोजणीला प्रारंभ झाला.
****
भारतीय जनता पक्षानं नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातून सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. साबणे यापूर्वी शिवसेनेकडून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीनं पोटनिवडणुकीसाठी आज तीन उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये तेलंगणातील हुजुराबाद मतदारसंघातून माजी मंत्री इटेला राजींदर यांना तर मिझोराममधील तूईरीयाल मतदारसंघातून के. लालडिरथारा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
मुंबई नजिक समुद्रात खासगी जहाजावर काल रात्री उशीरा सुरु असलेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थ सेवन प्रकरणी जवळपास दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभाग -एन.सी.बी. मुंबईच्या पथकानं छापे टाकून ही कारवाई केल्याचं कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्याच्या मुलासह अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी तसंच तीन मुलींचाही समावेश आहे. अंमली पदार्थांचा मोठा साठा यावेळी जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
****
रा��्ट्रीय तपास संस्थेनं दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याच्या संशयावरुन जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नऊ ठिकाणी आज छापे घातले. याकामी त्यांनी जम्मू आणि काश्मीर पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या मदतीनं हे छापे घालण्यात आले आहेत.
****
देशात २४ तासात २२ हजार ८४२ नवे कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळले असून २४४ नागरिकांचा मृत्य झाला आहे. सध्या देशात दोन लाख, ७० हजार, ५५७ सक्रीय रूग्ण आहेत. देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या चार लाख ४८ हजार, ८१७ इतकी झाली आहे.
आतापर्यंत देशात ९० कोटी ५१ लाख ७५ हजार ३४८ नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. काल दिवसभरात ६५ लाख २७ हजारांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
****
सोलापूर इथं काल महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधत रस्त्यांवर थुंकणं थांबवण्यासाठी नो स्पिटींग अभियान सुरु झालं. भारतीय वैद्यकिय संघटना - आय.एम.ए.च्या सोलापूर शाखेतर्फे हे अभियान राबवलं जात आहे. परिसर स्वच्छतेसह सर्वांच्या आरोग्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. शहरवासियांना फलक, भित्ती चित्रांच्या माध्यमातून तसंच शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीतील अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे.
****
उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात त्रिशुल पर्वतावरच्या नौदलाच्या गिर्यारोहण मोहिमेदरम्यान शुक्रवारी पहाटे झालेल्या हिमस्खलनात बेपत्ता झालेल्यांपैकी चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. चामोली इथं सापडलेल्या या मृतदेहांमध्ये लेफ्टनंट कमांडर अनंत कुकरेती आणि रजनीकांत यादव या मुंबईच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय लेफ्टनंट कमांडर योगेश तिवारी आणि जवान हरि ओम यांचे मृतदेह सापडले आहेत. नौदलाचा अन्य एक जवान आणि एक शेरपा अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
नौदलाचा २० सदस्यीय संघ १५ दिवसांपूर्वी त्रिशुल पर्वत सर करण्यासाठी रवाना झाला. यापैकी १० गिर्यारोहक शुक्रवारी चढाई करत होते त्यावेळी अचानक हिमस्खलन झालं. सध्या खराब हवामानामुळे बचाव मोहीमेत अडचणी येत आहेत.
****
भारत - यजमान ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात सुरु असलेल्या दिवस-रात्र स्वरुपातल्या कसोटी सामन्यात काल तिसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव ८ बाद ३७७ धावांवर घोषित केला. कालचा खेळ संपला, तेंव्हा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ४ गडी गमावून १४३ धावा झाल्या होत्या. आस्ट्रेलिया संघ अजूनही २३४ धावांनी पिछाडीवर असून पहिल्या दोन दिवसात पावसामुळे व्यत्यय आलेला हा कसोटी सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.
//********//
0 notes
Text
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक २०२१, टीएमसीचे नेते शेख आलम म्हणाले की, Per० टक्के मुस्लिम चार पाकिस्तान बनवू शकतात
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक २०२१, टीएमसीचे नेते शेख आलम म्हणाले की, Per० टक्के मुस्लिम चार पाकिस्तान बनवू शकतात
{“_ आयडी”: “605c95173bb1f72c57021888”, “स्लग”: “पश्चिम-बंगाल-विधानसभा-निवडणूक -2021-टीएमसी-नेता-शेख-आलम-म्हणते -30-टक्के-मुस्लिम-कॅन-फोर-पाकिस्तान”, ” प्रकार “:” कथा “,” स्थिती “:” प्रकाशित करा “,” शीर्षक_एचएन “:” 0 u092c u0902 u0917 u093e u0932 u091a u0941 u09f 09 935\0 U0938 U0940 U0928 U0947 U0924 U093a U0936 U0947 U09l6 U0906 U0932 U092a U09l5 U093a U092d U092l U093c U09l5 U093a U090a U092c…
View On WordPress
#इंडिया न्यूज इन हिंदी#ताज्या इंडिया न्यूज अपडेट्स#पश्चिम बंगाल निवडणुकीची तारीख 2021#पश्चिम बंगाल निवडणूक 2021#पश्चिम बंगाल निवडणूक 2021 वेळापत्रक#पश्चिम बंगाल निवडणूक आयोग#पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021#पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक
0 notes
Text
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 ममता बॅनर्जी म्हणाल्या मी बीजेपीविरोधात लढा देत राहणार आहे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 ममता बॅनर्जी म्हणाल्या मी बीजेपीविरोधात लढा देत राहणार आहे
ममता बॅनर्जी व्हील चेअरवर रोड शो करत आहेत – फोटो: एएनआय बातमी ऐका बातमी ऐका भाजपवर निशाणा साधताना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारचा प्रचार मला प्रचार करण्यापासून रोखू शकत नाही. जर माझ्या पायाला दुखापत झाली असेल तर विरोधकांना असे वाटले की मी घरी बसू शकेन पण मला लोकांच्या वेदनांनी बाहेर पडावे लागले. लोकांच्या वेदना…
View On WordPress
#अमित शाह#इंडिया न्यूज इन हिंदी#टीएमसी#ताज्या इंडिया न्यूज अपडेट्स#निवडणूक#पश्चिम बंगाल निवडणुकीची तारीख 2021#पश्चिम बंगाल निवडणूक#पश्चिम बंगाल निवडणूक 2021#पश्चिम बंगाल निवडणूक 2021 वेळापत्रक#पश्चिम बंगाल निवडणूक आयोग#पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021#पश्चिम बंगालमधील निवडणूक#पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक#बीजेपी#ममता बॅनर्जी#विधानसभा निवडणूक 2021
0 notes