#नेमका
Explore tagged Tumblr posts
Text
भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा नेमका काय आहे इतिहास ? ‘जाणून घ्या’ या दिवसाचे महत्त्व
भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा नेमका काय आहे इतिहास ? ‘जाणून घ्या’ या दिवसाचे महत्त्व
भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा नेमका काय आहे इतिहास ? ‘जाणून घ्या’ या दिवसाचे महत्त्व भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे तीन सैन्यदल रक्षण करत आहेत. लष्कर जमिनीवर सज्ज असताना हवाई दल आकाशावर नजर ठेवते. भारताचे सागरी मार्ग आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचे नौदल सज्ज आहे. हा विशेष दिवस लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सैनिकांच्या कल्याणासाठी साजरा केला…
View On WordPress
0 notes
Text
16. गुणातीत होणे
श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही कर्मासाठी कुणीही कर्ता नसतो. निसर्गाचा भाग असलेल्या सत्व, रज आणि तम गुण यांच्यातील परस्परसंवादाचा परिणाम म्हणजे कर्म.
दु:खापासून मुक्ती हवी असेल तर या तीन गुणांच्या पार जाणे आवश्यक आहे असा उपदेश श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत. गुणातीत कसे व्हायचे हे अर्जुनाला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा तो मनुष्य नेमका कसा असतो हे ही त्याला समजून घ्यायचे आहे.
गीतेत नमूद केलेल्या द्वंद्वातीत (विरोधाभासांच्या पल्याड जाणे), दृष्टा (साक्षी) आणि समत्व या तीन विषयांची आपण या अगोदरच चर्चा केली आहे. या तिघांच्या संयोगातून गुणातीत अवस्था गाठता येते, असे श्रीकृष्ण म्हणतात.
श्रीकृष्णाच्या मते ज्या व्यक्तीने गुणातीत अवस्था गाठली आहे त्याला याची जाणिव असते कि गुणांचा गुणांशी संबंध येत असतो आणि म्हणून तो साक्षीभावाने त्याकडे बघतो. एखाद्या विशिष्ट गुणाची त्याला विशेष ओढही नसते आणि त्यापासून तो दूर ही जात नाही.
गुणातीत हा एकाचवेळी द्वंद्वातीत ही असतो. सुख-दु:खाचे ध्रुव समजून तो दोन्हींप्रती तटस्थ राहतो. स्तुती आणि टीकेच्या बाबतीत तो तटस्थ आहे कारण त्याला माहित आहे की हे तीन गुणांचे उत्पादन आहेत. त्याचप्रमाणे तो मित्र आणि शत्रूंबद्दल तटस्थ असतो, हे समजून घेतो की आपणच आपले मित्र आहोत आणि आपले शत्रू देखील आहोत.
भौतिक जग हे दोन टोकांमध्ये विभागले गेले आहे आणि त्यांच्यातील तोल कुणा एका बाजूला झुकणे हे नैसर्गिक आहे. दुसर्या बाजूने विचार केला तर असे लक्षात येते की सतत झुलत अ��लेल्या लोलकालाही एक स्थिर बिंदू आवश्यक असतो. भगवान श्रीकृष्ण या स्थिर बिंदूबद्दल सांगतात जेथे आपण पोहोचले पाहिजे आणि झुलण्याचा भाग न होता त्याकडे म्हणजेच द्वंद्वाकडे साक्षीभावाने बघितले पाहिजे.
गुणातीत व्यक्ती हा सोने, दगड आणि मूठभर माती यांना सारखेच महत्व देतो. या उदाहरणावरून हे सांगायचे आहे की तो कोणत्याच एका गोष्टीला जास्त किंवा कमी महत्व देत नाही. वस्तू जशा आहात तसेच त्यांचे मूल्यमापन तो करीत असतो, इतरांनुसार नाही.
श्रीकृष्ण पुढे म्हणतात की गुणातीत म्हणजे कर्ता भाव सोडणारा. हे तेव्हा घडते जेव्हा आपण आपल्या अनुभवातून समजतो की प्रत्येक गोष्ट स्वतःच घडते आणि कर्त्याचे त्यात फारसे योगदान नसते.
0 notes
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पा��ळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुट��्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाल��� असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
Text
13 डिसेंबर 2001 रोजीचा संसदेवरील हल्ला नेमका कसा झाला ? नेमकं काय घडले त्या दिवशी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 15 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १५ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यानजीक खाजगी प्रवासी मिनी बसनं ट्रकला मागून दिलेल्या जोरदार धडकेत बारा जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास २३ जण जखमी झाले आहेत. मध्यरात्र��� साधारण दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. २३ पैकी सहा जखमींवर वैजापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तर, १७ जणांवर छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिनीबसमधले सर्व प्रवासी नाशिकचे रहिवासी आहेत. ते बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा दर्ग्याचं दर्शन घेवून शिर्डीकडं जात होते. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला तसंच, मृतांच्या वारसांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली.
****
दरम्यान, या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं असून
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली तसंच जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. अपघाताची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्य���चे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
**** इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे; इस्रायली सैन्यानं सीरियातल्या अलेप्पो विमानतळावर बॉम्बफेक केली, लेबनॉनमधील हिजबुल्ला लष्करी तळांवरही हल्ला केला. दरम्यान, भारत सरकारच्या 'ऑपरेशन अजेय' अंतर्गत इस्रायलमधून भारतीय नागरीकांना सुरक्षित आणलं जात असून ही मोहीम सुरूच असून आज २७४ भारतीय नागरिकांना घेऊन चौथे विमान तेव अवीव येथून दिल्लीला पोहोचले.
**** मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षानं मध्य प्रदेशसाठी १४४ उमेदवारांची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ छिंदवाडा इथून निवडणूक लढवणार आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं या राज्यातील २३० पैकी १३६ विधानसभा जागांसाठी आधीच उमेदवार जाहीर केले. छत्तीसगडसाठी काँग्रेसनं पहिल्या यादीत ३० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्याच्या पा��णमधून तर उपमुख्यमंत्री टी.एस.सिंह देव अंबिकापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५५ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला दोन टप्प्यात, मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
**** माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती जागतिक विद्यार्थी दिन म्हणून आज साजरी केली जात आहे. भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून परिचित डॉ. एपीजे अब्दुल कलाम २००२ ते २००७ या काळात देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. रामेश्वरम या छोट्याशा गावापासून ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनापर्यंत डॉ.कलाम यांच्या जीवनातील कथांनी लाखो लोकांना प्रेरणा मिळाली आहे.
कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई इथं मंत्रालयात कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. वाचन संस्कृती रुजण्यासह वाढविण्यासाठी राज्यात लवकरच ‘वाचन चळवळ’ उभी करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
शारदीय नवरात्रोत्सवाचा आज शुभारंभ झाला. शक्तीस्वरुप महादेवी दुर्गेच्या आराधनेच्या या उत्सवास घरोघरी घटस्थापनेनं सुरुवात होत आहे. श्री क्षेत्र माहूरगड इथं रेणुका माता मंदीरात, नाशिक जिल्ह्यातल्या सप्तश्रृंगी गडावर, तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदीरात घटस्थापनेसह विधिवत पुजन होत आहे. अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवी मंदीरात तसंच पश्चिम विदर्भाचं कुलदैवत अमरावतीच्या श्री अंबादेवी एकवीरा देवी मंदिरातही नवरात्र उत्सवास घटस्थापनेनं सुरुवात झाली.
तर, सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मार्डी इथल्या सव्वा आठशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री यमाई देवीच्या नवरात्रोत्सवास सकाळी प्रारंभ झाला. म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा ऐतिहासिक दसरा महोत्सव अशी ओळख असलेल्या हिंगोली इथंल्या एकशे एकोणसत्तराव्या ऐतिहासिक दसरा महोत्सवालाही रामलीला मैदानावर आज प्रारंभ झाला.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यात नवरात्रीनिमित्त फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. राज्यासह देशभरात नवरात्री उतस्व साजरा होत असून प्रशासनातर्फे चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
बुलढाण्यात खासगी बसचा नेमका अपघात कसा झाला?, मध्यरात्री काय घडले; काही संपूर्ण जळाले तर काही अर्धवट, अंगावर शहारे येणारी माहिती
0 notes
Text
Pradip एकदा डॉक्टरांकडे गेला....
Pradip - डॉक्टर, प्लीज... मला नेमका काय आजार झालाय सांगू शकाल का ओ?
डॉक्टर - हो, तुमचे डोळे ना खूप कमजोर झाले आहेत.
Pradip - डॉक्टर, तुम्ही कसं लगेच ओळखलं ओ?
डॉक्टर: कारण, बाहेरचा बोर्ड तुम्हाला वाचता आला ���ाही...
मी जनावरांचा डॉक्टर आहे
🤗🤗🤗🥳🥳🥳🤣🤣🤣😛😛😛🤦♂️🤦♂️🤦♂️
0 notes
Text
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ...
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ… IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेला ४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण भारत व बांगलादेश यांच्यातील वनडे सामने हे आता नेमके किती वाजता सुरु होणार आहेत, याची माहिती आता समोर आली आहे. भारत व बांगलादेश यांच्यातील वनडे सामने नेमके किता वाजता सुरु होणार, जाणून…
View On WordPress
#आणि#किती#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#घ्या#जाणून#नेमका#बांगलादेश#भारत#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#यांच्यातील#योग्य#वनडे#वाजता#विश्व#वेळ#सामना#सुरु#स्पोर्ट्स बातम्या#होणार
0 notes
Text
Bandya एकदा डॉक्टरांकडे गेला....
Bandya - डॉक्टर, प्लीज... मला नेमका काय आजार झालाय सांगू शकाल का ओ?
डॉक्टर - हो, तुमचे डोळे ना खूप कमजोर झाले आहेत.
Bandya - डॉक्टर, तुम्ही कसं लगेच ओळखलं ओ?
डॉक्टर: कारण, बाहेरचा बोर्ड तुम्हाला वाचता आला नाही...
मी जनावरांचा डॉक्टर आहे
🤗🤗🤗🥳🥳🥳🤣🤣🤣😛😛😛🤦♂️🤦♂️🤦♂️
0 notes
Text
5. ज्ञान, कर्म आणि भक्ती योग
गीता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळ्या प्रकारे दिसते.
गीतेमध्ये तीन वेगवेगळे मार्ग दिले आहेत. कर्मयोग, सांख्य योग आणि भक्तीयोग. मनाचा मार्ग अनुसरणार्यांसाठी कर्मयोग आदर्श मार्ग आहे. बुद्धीवर विश्वास असणार्यांसाठी सांख्ययोग आणि हृदयाचा मार्ग चोखाळणार्यांसाठी भक्तीयोग.
आजच्या जगात बहुतेक लोक हे मनाचा मार्ग अनुसरणारे असतात. आपण सगळे जण साखळ्यांनी बांधले गेले आहोत आणि त्या तोडण्यासाठी आणि बंधनांतून मुक्त होण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. तर, यामध्ये कृती महत्वाची आहे. अशा लोकांशी झालेला कुठलाही संवाद ‘हा! तर, आता मी काय करायला हवे’ या वाक्यावर संपतो. हा मार्ग आपल्याला निष्काम कर्माकडे म्हणजेच, कोणताही उद्देश नसलेल्या कृतीकडे नेतो.
सांख्ययोगाला ज्ञानयोग असेही म्हटले जाते आणि ते जागरूकता किंवा जाणणे आहे. त्याचा प्रारंभ बिंदू हा असा विश्वास आहे की आपण एका अंधाऱ्या खोलीत आहोत आणि अंधार घालवण्यासाठी दिवा लावणे आवश्यक आहे कारण कितीही प्रयत्न किंवा निष्क्रियता तो अंधार दूर करू शकत नाही. हा मार्ग आपल्याला निवडरहित जागृतेच्या जाणीवेकडे नेतो.
भक्तियोग हा शरणागतीचा मार्ग आहे. कॊणतीही लाट ही जशी समुद्राचाच भाग असते तसेच आपण परमात्म्याचेच अभिन्न अंग आहोत ही भावना भक्तियोगाचे अनुसरण करणार्यांमध्ये असते.
सुरुवातीला, या तिन्ही मार्गांसाठी वापरली जाणारी भाषा आणि त्यांचे आकलन हे भिन्न भासू शकते. मनावर विसंबून असलेल्या माणसाला जर जाणीवजागृतीचा मार्ग सांगितला तर या जागृतीसाठी कोणती कृती करायची याचा तो शोध घेत राहील.
अर्थात, प्रत्येकाला नेमका कसा अनुभव येतो याची काही अगदी काटेकोर समीकरणे नाहीत. उदाहरणार्थ, जेव्हा कर्म आणि सांख्य हे दोन मार्ग एकत्र येतात तेव्हा आपल्याला जाणीव होईल की सर्व कर्मांचे अंतिम गंतव्य हे एक मृगजळ आहे आणि आपण एखाद्या नाटकातील अभिन���ाप्रमाणेच कर्म करताना त्यामध्ये गुंतून पडणार नाही.
जसे संपूर्ण विश्व हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन या कणांनी बनले आहे, त्याचप्रमाणे, आध्यात्मिक जगही या कर्म, सांख्य आणि भक्ती या तीन मार्गांनी साकारले आहे.
श्रीकृष्ण म्हणतात, या सर्व मार्गांमध्ये अहंकारमुक्त आत्मसाक्षात्काराची क्षमता आहे.
0 notes
Text
महिला पोलीस उपनिरीक्षक राहत्या घरात मयत अवस्थेत आढळल्या
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून नेहरूनगर ��ागात एक महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आलेला आहे. संशयास्पदरित्या हा मृतदेह आढळून आल्यानुसार आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे यावर तपासाची दिशा ठरणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, शितल…
View On WordPress
0 notes
Text
महिला पोलीस उपनिरीक्षक राहत्या घरात मयत अवस्थेत आढळल्या
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून नेहरूनगर भागात एक महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आलेला आहे. संशयास्पदरित्या हा मृतदेह आढळून आल्यानुसार आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे यावर तपासाची दिशा ठरणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, शितल…
View On WordPress
0 notes
Text
राज्यातील सत्तासंघर्षाचा १५ मेपूर्वी निकाल?
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नेमका लागणार तरी कधी? गेल्या काही दिवसांपासून हाच प्रश्न राज्यात सर्वाधिक उत्सुकतेचा बनला आहे. १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान, घटनापीठातील एक न्यायमूर्ती न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे १५ मे पूर्वी या सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिना लागतो. पण जास्तीत जास्त किती कालावधी लागेल, याची काही शाश्वती नसते. पण महाराष्ट्राच्या केसमध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने किमान त्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात एखाद्या प्रकरणाचा निकाल येणार हे आदल्या दिवशीच कळते. कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या केसचा निकाल जेव्हा लागेल, त्याच्या एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. मात्र, त्या तारखेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातले एक न्यायमूर्ती पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १४ मेच्या आधी कधीही हा निकाल येणार हे तर निश्चित मानले जात आहे. त्यातच २० मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्याही सुरु होत आहेत. २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुटी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्याप��्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असे कायदेशीर वर्तुळात बोलले जात आहे. Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना, राज्य सरकारनं निवृत्त आरोग्य महासंचालक ��ॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं नवीन कृती दल
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध - कृषी आयुक्त सुनील चव्हाण
अक्षय्य तृतीया, भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती तसंच रमजान ईदचा सण देशभरात उत्साहात साजरा
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं महावितरणचं आवाहन
जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदकं
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
सविस्तर बातम्या
देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड विषयक देखरेखीबद्दल सावध राहून व्यवस्था अधिक बळकट करावी, चाचणी, उपचार, बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी या पत्रातून केली आहे.
****
सार्वजनिक आरोग्य विभागानं कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी नव्या कृती दलाची स्थापना केली असून निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, डॉक्टर बिशन स्वरुप गर्ग, यांच्यासह ८ जणांची या कृती दलाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे संकेत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल नंदूरबार इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठल्याही खात्याचं काम अडून राहिलेलं नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भुमरे यांनी टीका केली. राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन ��ुन्हा निवडून यावं, असं आव्हान भुमरे यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पक्षात घुसमट होत असून, एक दिवस त्याचा विस्फोट होईल, असंही मंत्री भुमरे यांनी म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना यंदा आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराशा केल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपण अविचलपणे जनतेसाठी काम करीत राहू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे जिल्हा रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, मात्र रुग्णांना तातडीने इतरत्र नेण्याची गरज पडल्यास हवाई रुग्णवाहिकेची सोयही उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलत होते. धर्माचं राजकारण केल्यानं भविष्यात राज्यात दंगली होतील, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले…
Byte…
महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का की दंगली घडवायच्या? असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर याठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतंय की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटीव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटीव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.
****
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. मृगाचा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असते, त्या पार्श्वभूमीवर खतांचं नियोजन एप्रिलपासून सुरु करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाप्रमाणे पिकनिहाय खतांचं प्रमाण, त्यांची उपलब्धता आणि त्यासाठीचा खर्च याबाबत माहिती देणारं ‘कृषिक ॲप’ कृषी विभागानं तयार केल्याची माहिती कृषि आयुक्त चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा, अतिरिक्त खत वापरामुळे होणारा अतिरिक्त खर्च, घटणारं पिक उत्पादन अशा समस्यांवर मात करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं.
****
राज्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर ई-पीक पेऱ्यांची नोंद झालेली नाही अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी गावपातळीवर संबंधीत गावचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची समिती गठित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या समितीनं कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून, याबाबत शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून शहानिशा करावी आणि सात - बारा उताऱ्यावर त्याची नोंद करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमाणित केलेले सात - बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. समितीनं आपला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे.
****
‘उडान अर्थात उडे देश का आम नागरिक' या योजनेच्या पाचव्या टप्प्याला काल सुरुवात झाली. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उडानच्या माध्यमातून देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुविधा अधिक वाढवणं आणि अगदी अखेरच्या टोकापर्यंत हवाई संपर्क सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात एक हजार नवे मार्ग, पन्नास अतिरिक्त विमानतळं, हेलीकॉप्टर स्थानकं आणि पाण्यावरील विमान उड्डाण व्यवस्था कार्यान्वित करण्याचं लक्ष्य साध्य होईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य तुरुंग विभागानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला आणि पुरुष कच्चे कैदी तसंच शिक्षा झालेल्या महिला कैदी, त्यांच्या मुलांना, तसच नातवंडं, भाऊ, बहिण यांना भेटू शकणार आहेत. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारावं आणि समान वागणूक द्यावी, या उद्दशानं हे धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती, तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
****
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी एक चार पाच सहा सात या क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या या नि:शुल्क मदतवाहिनीच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार आदी बाबींची माहिती तसंच मदत देण्यात येते
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी, ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वा��ता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचं विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
विविध क्षेत्रातल्या नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पाठ्यवृत्ती अर्थात फेलोशिप उपक्रम राबवणार आहे. राज्याचा पर्यटन विकास साधणं हा याचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपसाठी तरुणांनी १५ मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महामंडळानं केलं आहे. २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतली प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहेत. gm@maharashtra tourism.gov.in आणि dgm@maharashtra tourism.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करता येतील.
****
साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण , भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसंच ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण काल देशभरात साजरा झाला. उत्तराखंडातल्या प्रसिद्ध चार धाम तीर्थक्षेत्र यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. उत्तराखंडमधील, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांचे दरवाजे काल दुपारच्या सुमारास दर्शनासाठी विधीवत उघडण्यात आले. केदारनाथ धाम इथलं मंदिर २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम इथलं मंदिर २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पुढच्या सहा महिन्यांपर्यंत नेहमीप्रमाणे या चारही ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं, ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि मिरवणुक काढण्यात आली तर महात्मा बसवेश्वर जिल्हा महोत्सव समिती आणि अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
****
ईद-उल-फित्रच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणा सुदीच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिली आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरात मुस्लीम समाजबांधवांनी सकाळी कदीम जालना आणि सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद ऊल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.
****
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं आवाहन महावितरण���ं केलं आहे. वीज वाहिन्या, रोहित्र, वीज वितरण पेट्या किंवा फीडर फिल्डरच्या जवळ कचरा जाळल्यामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला आग लागल्यामुळे विजेच्या भूमिगत तारा आणि इतर वीज यंत्रणा नादुरुस्त झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या आगींमुळे महावितरणच्या नुकसानीसोबतच ग्राहकांना वीज पुरवठा अनियमित होतो आहे. अशा घटनातून वीज यंत्रणेला आग लागल्याचं आढळल्यास एक नऊ एक दोन किंवा १८००-२१२-३४३५ या नि:शुल्क क्रमांकावर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १२ वसतीगृहं सुरू करण्यात आली आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी ही माहिती दिली, ते काल मानकुरवाडी इथं ऊस तोडणी कामगारांना ओळख पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. मानकुरवाडी परिसरातील ऊसतोड कामगारांची लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शंभर टक्के नोंद करण्यात आली आहे. या महामंडळांतर्गत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
जागतिक ग्रंथ दिन आज साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठी प्रकाशक पुणे यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्था या विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे , भाष्य करणार आहेत. प्रकाशन परिषदेचे कार्यवाह अरविंद पाटकर हे ग्रंथव्यवहारासंबंधी विचार मांडणार आहेत.
****
तुर्की इथं झालेल्या प्रथम स्तर जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली आहेत. ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे या जोडीनं मिश्र दुहेरीत चिनी तैपेई जोडीचा १५९ विरुद्ध १५४ गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने महिलांच्या कंपाउंड प्रकारात कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीवर १४९ विरुद्ध १४६ अशी मात करत सुवर्ण पदक पटकावलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायन्टसवर ७ धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सनं २० षटकात ६ गडी गमावत १३५ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल लखनऊ सुपर जायन्टस संघ मात्र २० षटकांत सात गड्याच्या बदल्यात केव�� १२८ धावा करू शकला.
या स्पर्धेतल्या अन्य सामन्यात पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्स संघावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्जनं २१५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करणारा मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत २०१ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
नित्यानंदचा काल्पनिक देश ‘कैलासा’ खरंच आहे का ? नेमका कुठे आहे हा देश ? marathi news
भारतातील एका महिलेवर बलात्काराचा आरोप असलेला स्वा��ी नित्यानंद नुकताच लोकांच्या नजरेत आला आहे. त्यांचे शिष्य, विजयप्रिया आणि बाबा रामदेव, त्यांच्याबद्दल खूप बोलत आहेत आणि विजयप्रिया युनायटेड नेशन्समध्ये कैलाशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडूनही आले आहेत. Read more
1 note
·
View note