#यांच्यातील
Explore tagged Tumblr posts
Text

कागभुशुंड आणि गरुड यांच्यातील चर्चा पहा उदया सकाळी 5:55 वाजता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता युट्युब संत रामपाल जी मराठी सतसंग व फेसबुक संत रामपाल जी मराठी सतसंग वर पहा
2 notes
·
View notes
Text


शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम लालवंडी येथे संपन्न...
शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरे शास्त्रज्ञाने देत त्यांच्या शंकांचे समाधान करता यावे, या उद्देशाने केव्हीकेनी सुरू केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आज लालवंडी गावात करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी माती परीक्षण, फळबाग लागवड, पोक्रा योजना, हळद लागवड, जनावरांचे आजार व उत्तम दुग्धव्यवसायासाठी करावयाच्या विविध योजना, गांडूळखत निर्मिती इत्यादी संबंधित महत्वपूर्ण प्रश्न विचारले, आणि त्यांच्या शंका शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन दूर केल्या. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्यासाठी केव्हीकेने एक कॅम्प आमच्या गावी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याचा उद्देश फक्त शंका समाधान करणे नसून, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे व समग्रपणे मिळवून देणे आहे. तसेच, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी केव्हीके आणि शेतकरी यांच्यातील सुसंवाद अधिक सुदृढ करण्याचे ध्येय आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. कपिल इंगळे, डॉ संतोष चव्हाण, डॉ कृष्णा आंभुरे, डॉ निहाल मुल्ला, डॉ प्रवीण चव्हाण व गावचे सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालाजी चंदापुरे व प्रभुदास उडतेवार व सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. # #farmer #farmers #farmerscientist #farming #शेतकरी #शास्त्रज्ञ #सुसंवाद
1 note
·
View note
Text

अवश्य पहा हा सत्संग: जोगजीत रुपात कबीर परमेश्वर आणि कालब्रम्ह यांच्यातील वार्ता पहा उद्या सकाळी 5.55 वाजता LOK शाही चैनेल वर
0 notes
Text
IND vs ENG : दुसरा एकदिवसीय सामना कटकमध्ये, मॅचच्या वेळेत बदल? - Marathi News | India vs england 2nd odi live and digital streaming know all details marathi news | TV9 Marathi
India vs England 2nd Odi Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली होती. दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? — À lire sur www.tv9marathi.com/sports/cricket-news/india-vs-england-2nd-odi-live-and-digital-streaming-know-all-details-marathi-news-1346928.html/amp
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. ९२ वर्षीय डॉ मनमोहनसिंग यांचं काल रात्री निधन झालं. देशसेवेसाठी, निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन त्यांनी मिळवलेलं यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले… एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में,और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में, उन्हे हमेशा याद किया जाएगा। एक अर्थशास्त्री के रूप में उन्होने अलग अलग स्तर पर भारत सरकार में अनेक सेवाए दी। एक चुनौती पूर्ण समय में उन्होने, रिझर्व बँक के गव्हर्नर की भूमिका निभाई। पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्तमंत्री रहते हुए उन्होने वित्तीय संकट से घिरे देश को एक नयी अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी डॉ मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं देशानं एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
डॉ. मनमोहनसिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळं देशानं जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू आणि विद्वान व्यक्तिमत्व गमावले, असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल प्रगतीच्या ४५ व्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत आठ महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यात विविध राज्यांतील शहरी वाहतुकीचे सहा मेट्रो प्रकल्प आणि रस्ते जोडणी आणि औष्णिक उर्जेशी संबंधित प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
क्रिकेट- महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय वेस्ट इंडिज संघानं घेतला होता. अवघ्या १६२ धावांवर वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला. भारताकडून दीप्ती शर्मानं ३० धावा देत ६ बळी टिपले तर रेणूका सिंगने ४ खेळाडू बाद केले. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने जिंकत भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
��ॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा भारताच्या पाच बाद १६४ धावा झाल्या आहेत.
0 notes
Text

गोरखनाथ आणि कबीर जी यांच्यातील चर्चा संत रामपाल जी महाराज यांचे लिखित पुस्तक ज्ञान गंगा पुस्तक अवश्य वाचा आणि रोज सकाळी 5.55 ते 6.55 लोकशाही चायनल वरती बघू शकता
0 notes
Text
52. गुंडाळणे शहाणपण आहे
श्रीकृष्ण म्हणतात, “ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अंग काढून घेतो, त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा आपल्या इंद्रियांच्या वस्तूंपासून सर्व बाजूंनी आपली इंद्रिये काढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते” (2.58).
श्रीकृष्ण इंद्रियांवर भर देतात कारण ते आपले अंतरंग आणि बाह्य जग यांच्यातील प्रवेशद्वार आहेत. श्रीकृष्ण सांगतो की जेव्हा आपण स्वतःलाच्या इंद्रियांना उपभोगवस्तूंची आसक्ती व्हायला लागते तेव्हा आपण आपल्या संवेदनावर ताबा मिळविला पाहिजे जसे की कासव धोक्यार्चा जाणीव झाल्यावर आपले अवयव आत ओढून घेते.
इंद्रियांचे दोन भाग असतात. एक म्हणजे नेत्रगोलक आणि दुसरे नियंत्रक, मेंदूचा भाग जो या नेत्रगोलकावर नियंत्रण ठेवतो.
संवेदी परस्परसंवाद दोन स्तरांवर होतो. एक इंद्रिय म्हणजे वस्तूंचे सतत बदलणारे बाह्य जग आणि संवेदना साधन (नेत्रगोलक) जे पूर्णपणे स्वयंचलित आहे. जेव्हा फोटॉन नेत्रगोलकापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या भौतिक गुणधर्मांनुसार प्रभाव पडतो. दुसरे संभाषण नेत्रगोलक आणि त्याचे नियंत्रक यांच्यात घडते.
पाहण्याची इच्छा हे डोळ्याच्या विकासाचे कारण आहे आणि ती इच्छा इंद्रियांच्या नियंत्रित भागामध्ये अजूनही आहे. याला प्रेरित धारणा म्हणून ओळखले जाते जिथे आपल्याला जे पहायचे आहे ते आपण पाहतो आणि जे ऐकायचे आहे ते आपण ऐकतो. क्रिकेटच्या खेळाप्रमाणेच आपल्याला असे वाटते की विरोधी पक्षाच्या बाजूने अधिक निर्णय घेतले जात आहेत आणि त्यामुळे पंच अन्यायकारक आहे असा निष्कर्ष काढतो.
जेव्हा श्रीकृष्ण इंद्रियांचा उल्लेख करतात, तेव्हा ते इंद्रियांच्या नियंत्रित भागाबद्दल बोलतात ज्यामुळे इच्छा उत्पन्न होते. म्हणून जेव्हा आपण शारीरिकरित्या आपल्या इंद्रियांना बंद करतो तेव्हाही, मन आपल्या इच्छा जिवंत ठेवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती वापरते कारण मन हे या सर्व नियंत्रकांचे संयोजन आहे.
या वैज्ञानिक श्लोकाद्वारे श्रीकृष्ण आपल्याला इंद्रियांच्या भौतिक भागापासून नियंत्रक वेगळे करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत जेणेकरून आपण नेहमी उत्तेजक किंवा निराशाजनक बाह्य परिस्थितीपासून परम स्वातंत्र्य (मोक्ष) प्राप्त करू शकू. कोणत्याही परिस्थितीत केव्हा आत्मसमर्पण करायचे हे जाणून घेण्यातच शहाणपण आहे.
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/ek-daav-bhutacha-is-an-interesting-journey-to-find-love-for-the-ghost-and-to-free-the-ghost-on-4th-october/
0 notes
Text
charudatta thorat shraddha karale radio vishwas 90.8 community station nashik - charudatta mahesh thorat sraddha karale nashikcha radio
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित ..
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
📌 रेडिओ का App available #GoogleStore 👉👉 https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
#श्रद्धा_कराळे_चारूदत्त_थोरात_Podcast
_________________
जगप्रसिद्ध आदिवासी लोककला विश्वविक्रमकार व
सुप्रसिद्ध वारली चित्रकार श्रद्धा कराळे आणि .....
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिराचे भक्त
चारूदत्त थोरात यांच्यातील संवाद...
7 Time World Record Achiver - In the art of Adiwasi Warli - Shraddha Karle - Historical Kalarama Temple - Nashik
_____________________
charudatta thorat ,
World Famous Most Historical
kalarama temple of nashik bhakta ..
चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet,
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक,
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार (जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
- Source -
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक
______
#1_April_2024 रेडिओ
#Podcast on #Radio (Full Podcast)
___________________
#Poster Creator : अजित सारंग | डॉ.हरि कुलकर्णी
#PodCast Release 1-4-24 @Digital_Radio
जल्द ही डिजिटल माध्यम मे प्रसारित.. #आकाशवाणी
------------------------------------------------------------------
• २२ देशो के ... @मराठी कम्युनिटी मे सीधा प्रसारण !!!
-------------------------------------------------------------------
• मुलाखतकार - *** #श्रद्धा_कराळे RJ ***
(सुप्रसिद्ध वारली चित्रकार, वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रमकार,
7 Time Word Record Holder, *वारली लेखिका*)
• Interview by - Shraddha Karale,
Word Record Achiver - *Warli Artist*
_______________________________________
_______________________________________
_______________________________________
• विषय - प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : चारूदत्त थोरात
यांचे मुलभूत विचार... (#RJ श्रद्धा & CMThorat)
" तुमचं जगणं .. तुमचा आवाज " इस कार्यक्रम मे...
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ पर.....
• गेस्ट के रूप मे #चारूदत्त जी के विचार सुने...!
• रेडिओ विश्वास - के २२ देशो मे ६ लाख से अधिक श्रोते
_______________________________________
_____________________________________
_______________________________________
• content : " traditional life of indians "
• Chief Guest - Charudatta Mahesh Thorat
- Famous Warli Painter - Shraddha Karale
Radio Vishwas 90.8 Marathi
radio station online
Mon. 18 March 2024 / RJ Shraddha With
Charudatta Mahesh Thorat / cmthorat
_________________
________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त : चारूदत्त थोरात
________________
__________________
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित ..
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
#चारूदत्तथोरात की रेडिओ #आकाशवाणी मुलाखत...
First Radio Interview of #CMThorat
• प्रेरणादायी व्यक्तीत्व -
चारूदत्त थोरात यांचे मुलभूत विचार
__________________________________________
••••••••• संवादन | Communication •••••••••••
Guest - charudatta thorat ,
World Famous Most Historical
kalarama temple of nashik bhakta ..
अतिथी - चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
Interviewer - shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet,
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
मुलाखतकार : माननीय. श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक,
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार
(जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
____________________________________________
• Recorded Date - 18 March 2024
• Publicly Published Date - 01 April 2024
________________________________________
- Source -
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक.....................
____________
_______________________
#रेडिओ_90 #आकाशवाणी #चारूदत्त की #मुलाखत
Recording Date - 18 March 2024
publicly published on 1 april 2024
Thanks - For / 90.8 radio nashik fm radio community group of radio nashik /
first community radio 908 vishwas radio
____________________
_________________
सुप्रसिद्ध वारली चित्रकार RJ श्रद्धा कराळे .. चारुदत्त थोरात ... रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
संचालक - डॉ. हरि विनायक कुलकर्णी...
अजित सारंग सर










0 notes
Text
MangoBazaar च्या चॅनेलवर स्वागत आहे! 🌟 आजच्या व्हिडिओमध्ये, आम्ही आंब्याच्या जगात खोलात जाऊन एक महत्वाचा विषय उघड करणार आहोत - मूळ रत्नागिरी-देवगड हापुस (अल्फान्सो) आणि कर्नाटक हापुस यांच्यातील भेद कसा ओळखायचा. 🥭💡 आंब्याचा मौसम पूर्ण बहरात असताना, तुम्ही काय खरेदी करत आहात हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे!
या व्हिडिओमध्ये, आपण पाहू:
- रत्नागिरी-देवगड हापुसची अनोखी वैशिष्ट्ये.
- खरी गोष्ट ओळखण्यासाठी टिप्स आणि युक्त्या.
- कसे काही आंबा व्यापारी अधिक नफा मिळविण्यासाठी ग्राहकांना गृहीत धरून कर्नाटकचे आंबे मूळ रत्नागिरी
-देवगड अल्फान्सो म्हणून विकत आहेत याची अंतर्दृष्टी.
- तुम्ही खरे अल्फान्सो आंबे मिळविण्यासाठी काय करू शकता.
फसवणूकीला बळी पडू नका! उन्हाळ्याच्या खऱ्या चविचा आनंद घेण्याचे रहस्य जाणून घ्या. 🌞🌳 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
www.magobazaar.in
+91-8412037393
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#maharashtra #marathinews #summer #maharashtranews #trending #mangoseason #marathibreakingnews #holi2024 #devgadhapus #ratnagiri #pune
How to recognize Devgad Ratnagiri vs Karnataka Mango? I Buy Online Mangoes In Pune I
Welcome to MangoBazaar Youtube channel! 🌟 Your Top online mango delivery in Pune. Today, we're diving deep into the world of mangoes to uncover a topic that has puzzled many - How to distinguish between the Original Ratnagiri-Devgad Alphonso mangoes and the Karnataka Alphonso. 🥭💡 With mango season in full swing, it's crucial to know what you're buying!
In this video, we'll explore:
- The unique characteristics of Ratnagiri-Devgad Alphonso and Karnataka Alphonso.
- Tips and tricks to identify the real deal.
- An insight into how some mango traders may mislead customers for a higher profit by selling Karnataka mangoes as the original Ratnagiri-Devgad Alphonso.
- What you can do to ensure you're getting authentic Alphonso mangoes.
Don't fall for fraud! Learn the secrets to enjoying the genuine taste of summer. 🌞🌳 Subscribe to our channel for more informative videos, and hit the bell icon to stay updated!
www.magobazaar.in
+91-8412037393
0 notes
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्सेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाषेतील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत ��ाहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथळे तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव्ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना निर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि नैतिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
Text

#हिन्दू_भाई_संभलो
#HinduBhai_Dhokhe_Mein
#Hindu #Hinduism #HinduTemple #Hindiquotes #Sanatani #SanatanDharma
#SantRampalJiMaharaj
#BhagavadGita
*सनातनच्या नावावर हिंदूंची फसवणूक*
कृष्ण आणि काल ब्रह्म यांच्यातील फरक न कळल्यामुळे आचार्य प्रशांत जी यांनी गीता अध्याय ४ श्लोक ५ द्वारे कृष्णाला सर्वज्ञ, निराकार ब्रह्मा आणि निर्माता म्हटले आहे. तर सुक्ष्मवेद (कबीर वाणी) तसेच गीता, वेद, पुराण, कुराण इत्यादी ग्रंथांतून वर्णन केलेल्या तत्त्वज्ञानावरून संत रामपाल जी यांनी गीतेचे ज्ञान वासुदेवपुत्र श्रीकृष्णाने दिलेले नसून कालाने दिलेले आहे हे सिद्ध केले आहे. (पुरावा - अध्याय 11 श्लोक 32 आणि श्लोक 47)
(पुरावा - गीता अध्याय 10 श्लोक 2, अध्याय 2 श्लोक 12, अध्याय 4 श्लोक 5 आणि 9,अध्याय 8 श्लोक 16)
0 notes
Text
SA vs IND | शतकवीर सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत, हेल्थबाबत मोठी अपडेट समोर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांचं काल रात्री निधन झालं, त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं, तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा य��ंनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, अकोल, वाशीम जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे. दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघाने १९ षटकात ३ खेळाडू बाद ८० धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने भारताने जिंकले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा ��ेल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आली तेंव्हा भारतीय संघानं पहिल्या डावात २ बाद ८२ धावा केल्या आहेत. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
अग्नीवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात कारकून तसंच सामान्य श्रेणीत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बेळगावी इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर इथं दोन जानेवारी २०२५ पासून नऊ जानेवारीपर्यंत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकाचे भाऊ, माजी सैनिक, तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त क्रीडापटूंसाठी हा मेळावा आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या मेळाव्यात शारीरिक चाचणी तसंच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. साडे सतरा ते २१ वर्ष वयोगटातले युवक यासाठी पात्र असतील. सामान्य श्रेणीसाठीचा उमेदवार ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तर कारकून श्रेणीसाठी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात हवामान बदलामुळे भुईमुग पिकावर टीका रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येत असल्याने रब्बीच्या भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिंतूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
0 notes