#कर्णधार रोहित शर्मा
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं.
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मग��मच्छ
0 notes
Text
विजयाचे नवरंग
https://bharatlive.news/?p=167437 विजयाचे नवरंग
रोहित शर्मा कल्पक कर्णधार पाकिस्तानी डाव सुरू असताना ...
0 notes
Text
Asia Cup 2023, IND Vs SL : रोहित शर्माची अपवाद सर्वाधिक 53 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली ���ामगिरी करता आली नाही. त्यासिवाय ईशान किशन 33 आणि केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले. वेलाल्लागे याने अचूक टप्प्यावर ��ारा करत भारताच्या आघाडीच्या ��लंदाजांना बाद केले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. भारताचा संपूर्ण डाव 213 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे. भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल यांनी 80 तर इशान किशन आणि केएल राहुल यांनी 63 धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीचा अपवाद वगळता एकही मोठी भागिदारी झाली नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली.
0 notes
Text
श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर रोहित शर्माने महेला जयवर्धनेला मिठी मारली, माजी कर्णधाराने केली मजेशीर टिप्पणी; पाहा व्हिडिओ - श्रीलंकेची साफसफाई केल्यानंतर महेला जयवर्धनेला भेटायला आला रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने केली ही टिप्पणी; व्हिडिओ पहा
श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर रोहित शर्माने महेला जयवर्धनेला मिठी मारली, माजी कर्णधाराने केली मजेशीर टिप्पणी; पाहा व्हिडिओ – श्रीलंकेची साफसफाई केल्यानंतर महेला जयवर्धनेला भेटायला आला रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने केली ही टिप्पणी; व्हिडिओ पहा
IPL 2022 मध्ये रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारचा कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केल्यानंतर, रोहित शर्माने आता आपले लक्ष इंडियन प्रीमियर लीग 2022 कडे वळवले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारचा कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केल्यानंतर, रोहित शर्माने आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 कडे आपले लक्ष वळवले आहे. श्रीलंकेला साफ केल्यानंतर, रोहित शर्माने IPL 2022 च्या आधी, मंगळवार, 15…
View On WordPress
#आयपीएल २०२२#इंडियन प्रीमियर लीग 2022#एमआय कॅप्टन रोहित शर्मा#एमआयचा कर्णधार रोहित शर्मा#एमआयचे प्रशिक्षक महेला जयवर्धने#कर्णधार रोहित शर्मा#क्रिकेट बातम्या#जसप्रीत बुमराह#ताज्या क्रिकेट बातम्या#थेट क्रिकेट#भारत विरुद्ध श्रीलंका#महेला जयवर्धने#मुंबई इंडियन्स#मुंबई इंडियन्स संघ#मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने#रोहित शर्मा#रोहित शर्मा कर्णधार#श्रीलंका विरुद्ध भारत#हिंदी क्रिकेट बातम्या#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
Text
रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला, श्रीलंकेला हरवण्याचे श्रेय या खेळाडूला दिले
रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला, श्रीलंकेला हरवण्याचे श्रेय या खेळाडूला दिले
आपल्या कसोटी कर्णधारपदाची सुरुवात विजयासह केल्यानंतर, रोहित शर्माने रविवारी सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. रवींद्र जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात नाबाद 175 धावा करत एकूण 9 बळी घेतले. यासह तीन दिवसांत श्रीलंकेवर डाव आणि २२२ धावांचा मोठा विजय नोंदवण्यात संघाला…
View On WordPress
#कर्णधार रोहित शर्मा#टीम इंडिया#भारत जिंकला#भारत विरुद्ध श्रीलंका#भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका#भारत श्रीलंका मोहाली कसोटी#भारताचा म���हाली कसोटी विजय#भारताने मोहाली कसोटी जिंकली#भारतीय क्रिकेट संघ#मोहाली#मोहाली कसोटी#रोहित शर्मा#रोहित शर्मा टीम इंडिया#रोहित शर्मा विधान#रोहित शर्माचे विधान
0 notes
Text
IND vs PAK आशिया कप: शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये काय सुरु पाहिलं का? व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK आशिया कप: शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये काय सुरु पाहिलं का? व्हिडिओ व्हायरल
रविवार ४ सप्टेंबर दुबई येथे आशिया चषक ट्वेण्टी-२० क्रिकेट सहभागी ‘सुपर ४’ फेरीच्या कडून भारतीय संघाला पाकिस्तानला पत्करावा कारण. भारताने विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मोहम्मद रिवान आणि मोहम्मद नवाज यांच्या उत्कृष्ट खेळींमुळे पाकिस्तानने पाच गडी आणि एक राखून भारतावर मात केली. कप २० च्या आतच पाकिस्तानने भारताने पाकिस्तानला अग्रलेखाची परतफेड केली आणि आशियाच्या सुपर ४ मध्ये विजयाने आघाडी…
View On WordPress
#INDvPAK#अंतिम षटक#अर्शदीप सिंग#आशिया कप#आशिया कप 2022#एशिया कप 2022#ट्रेंडिंग व्हिडिओ#नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन#पाकिस्तान#पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम#पाकिस्तानची ड्रेसिंग रूम#भारत#भारत विरुद्ध पाकिस्तान#रोहित शर्मा#विराट कोहली#व्हायरल व्हिडिओ#शादाब खान
0 notes
Text
सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला...
सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला…
धर्मशाला: भारतीय संघाने वेस्ट इंडिज पाठोपाठ श्रीलंकेचा टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला. या दोन्ही संघांविरुद्धच्या मालिकेत भारताने अनेक प्रयोग केले, युवा खेळाडूंना संधी दिली. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेनंतर कर्णधार रोहित शर्माने देखील मान्य केले की आता संघाकडे अधिक पर्यायांची समस्या निर्माण झाली आहे. अनेक खेळाडूंनी टी-२० मध्ये संधी मिळाल्यानंतर खुप चांगली कामगिरी केली. या खेळाडूंनी…
View On WordPress
0 notes
Text
पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा भारताला ‘ओव्हरटेक’
पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा भारताला ‘ओव्हरटेक’
��ुंबई-प्रतिनिधी लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले मैदानावर भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला. पण इंग्लंडने लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढत भारताचा पहिला डाव ४०.४ षटकात ७८ धावांवर संपुष्टात आणला आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) सोडले, तर…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत सादर
तुरीच्या दरातील तफावत दूर करून नव्या दराने खरेदीचं सरकारकडून आश्वासन
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी ��ुपये बक्षीस-मुंबईकर क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं एमआयडीसी स्थापनेबाबतची अधिसूचना जारी
आणि
संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपयांपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. परीक्षा सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून जारी परिपत्रकानुसार ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रा��ाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत काल ते बोलत होते. मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
तुरीच्या दरातील तफावत दूर करून, नव्या दराने तूर खरेदी केली जाईल, असं आश्वासन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. तुरीचे बाजारभाव आणि हमी भावाच्या तफावतीचा मध्यबिंदू काढून तूर खरेदी दर निश्चित करण्याचा विचार केला जाईल, असं सत्तार म्हणाले. सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चालू हंगामात शासनाच्या १५३ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत फक्त ४६ शेतकऱ्यांनी साडे पाचशे क्विंटल तूर विक्री केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान काल विधान भवनातील उपाहारगृहात ‘‘भरडधान्य महोत्सव’’ घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघा��ले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यानंतरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार काल दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश आहे. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं ३६७ एकरावर नवीन औद्योगिक वसाहत -एमआयडीसी स्थापन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची,विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला सोलापूर इथं बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल रोटीघाट पार केला. ही पालखी आज बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावाकडून मार्गस्थ होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नीरा स्नान सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात लोणंद मुक्कामी पोहोचेल.
संत मुक्ताबाईंच्या पालखीत काल बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीकाठी गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधीस्थळी आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा झाला. मुक्ताबाईंच्या पादुका त्यांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीपर्यंत वाजत गाजत नेण्यात आल्या. दरम्यान मुक्ताबाईंची पालखी आज पाली इथून मार्गस्थ होईल.
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण काल बीड जिल्ह्यात पाटोद्यातल्या पारगाव घुमरे इथं पार पडलं. शेकडो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला कालपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटी वितर��त करण्यात येत असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील आगावू मालमत्ता कर भरणाऱ्यांना कर सवलत देण्यात आली होती. या योजनेला १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्��ा शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केली आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी काल विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
राज्यात २०२१ आणि २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या काही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र अद्याप दाखल केलेलं नाही. परभणी जिल्ह्यात संबंधित सदस्यांनी १० जुलैपर्यंत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावं, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आजपासून येत्या १३ तारखेपर्यंत मराठा आरक्षण संवाद रॅली काढण्यात येणार आहे. आज हिंगोलीतून या रॅलीला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी आज परीक्षा होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात येत आहे.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते काल संबोधित करत होते.
****
0 notes
Text
रोहित-रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच चर्चा; पहा शेअर केलेले ‘हे’ खास फोटो
रोहित-रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच चर्चा; पहा शेअर केलेले ‘हे’ खास फोटो
रोहित-रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच चर्चा; पहा शेअर केलेले ‘हे’ खास फोटो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या दोघांचा लग्नबंधनाला सात वर्ष पूर्ण झाले आहेत. या आनंदाच्या क्षणांना साजरा करण्यासाठी रोहित शर्माने काही खास फोटो सोश�� मीडियावर शेअर केले आहेत. रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या…
View On WordPress
0 notes
Text
IND vs ENG: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीला मुकला, जसप्रीत बुमराह प्रमुख संघ; 35 वर्षांनंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कमान हाती घेतली - IND vs ENG: रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीत खेळणार नाही, जसप्रीत बुमराह असेल कर्णधार; 35 वर्षांनंतर हा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे
IND vs ENG: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीला मुकला, जसप्रीत बुमराह प्रमुख संघ; 35 वर्षांनंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कमान हाती घेतली – IND vs ENG: रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीत खेळणार नाही, जसप्रीत बुमराह असेल कर्णधार; 35 वर्षांनंतर हा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे
रोहित शर्मा 1 जुलै 2022 पासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणार्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, जसप्रीत बुमराहला संघाच्या बैठकीत (कर्णधारपद) याबद्दल माहिती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या कसोटी संघाचे नेतृत्व म्हणजे 35 वर्षांनंतर एखादा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची…
View On WordPress
#IND vs ENG एजबॅस्टन कसोटी#IND वि ENG#इंग्लंड विरुद्ध भारत#इंग्लंड विरुद्ध भारत जसप्रीत बुमराह कर्णधार#कसोटी क्रिकेट#जसप्रीत बुमराह#जसप्रीत बुमराह कसोटी कर्णधार#जसप्रीत बुमराह बातम्या#जसप्रीत बुमराह भारताचा कसोटी कर्णधार#पाचवी चाचणी#पुढील २४ तासांत पथकाची घोषणा#पुढील २४ तासांत संघाची घोषणा#बुमराह कर्णधार#भारत विरुद्ध इंग्लंड#भारताचा इंग्लंड दौरा#रोहित शर्मा#रोहित शर्मा इंग्लंड विरुद्ध भारत 5वी कसोटी#रोहित शर्मा कोविड#रोहित शर्मा कोविड अपडेट्स#रोहित शर्मा बातम्या#रोहित शर्मा विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी उपलब्ध आहे#विराट कोहली भारताचा कर्णधार
0 notes
Text
रोहितच्या नावावर खास रेकॉर्ड नोंदवला गेला, विराट कोहली आणि कपिल देवसुद्धा हे करू शकले नाहीत
रोहितच्या नावावर खास रेकॉर्ड नोंदवला गेला, विराट कोहली आणि कपिल देवसुद्धा हे करू शकले नाहीत
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज रोहित शर्मा रेकॉर्ड: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकला. या मालिकेत भारताने २-० अ��ी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाबरोबरच रोहितच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. पहिल्या 10 वनडेमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये विजय मिळवणारा रोहित कर्णधार ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार विराट कोहली…
View On WordPress
#अहमदाबाद#अहमदाबाद वनडे#कर्णधार रोहित शर्मा#टीम इंडिया#भारत वि वेस्ट इंडिज#भारत वि वेस्ट इंडीज#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघ#भारतीय कर्णधार रोहित शर्मा#रोहित शर्मा#रोहित शर्मा रेकॉर्ड#रोहित शर्माचा विक्रम
0 notes
Text
वेस्ट इंडिजचा विजय अशक्य, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडिजचा विजय अशक्य, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन
कोलकाता: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज बुधवारपासून ३ सामन्यांची ��ी-२० मालिका खेळणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्ड्न्स मैदानावर होणाऱ्या या लढतीसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फेव्हरेट मानला जात आहे. उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झालाय. त्यामुळे आता पहिल्या लढतीत कर्णधार रोहित शर्मा सोबत सलामीला ईशान किशन…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
सैन्यदलाचे विविध शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या राज्यातल्या खेळाडूंचा विधीमंडळात गौरव
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत सादर
आणि
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीची नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्टला
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज प्रदान केलेल्या पुरस्कारांपैकी मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश होता. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम् दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी एक कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच परीक्षा ���ेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपये पर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. ‘राज्याचा सर्वांगीण विकास’ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते आज ��ोलत होते. वीजदेयकात सवलत देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेसह शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचं सांगत, शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शिलाईच्या प्रक्रियेवर दानवे यांनी आक्षेप घेत, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करावं, अशी मागणी दानवे यांनी केली.
मराठवाड्यासाठी घोषीत ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी ७३४ कोटी रुपयांची आवश्यक असतांना, सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या जवळपास ३० लाख फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज, काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला, राज्याने तशाप्रकारे फेरीवाला धोरण आखणं अपेक्षित होतं, परंतु १० वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही, असं पटोले म्हणाले. पावसाळा सुरु असताना फेरीवाल्यांवर कारवाई करणं अन्यायकारक असून, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मंगळवारी चर्चेचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील उपाहारगृहात “भरडधान्य महोत्सव” घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय वेद्यकीय शिक्षण परीक्षा परिषदेने एक परिपत्रक जारी केलं असून, ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेने गेल्या २२ जून रोजी नियोजित असलेली ही परीक्षा पुढे ढकलली होती.
****
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीयस्तरावर 'दृश्यता' वाढवण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसंच विद्यार्थ्यांसाठी ‘आऊटरीच सेंटर निर्माण करावं, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. विद्यापीठाचा १०९वा स्थापना दिवस आज मुंबईत राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. देशी बियाणांच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे या कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. माती वाचवली तर पिढ्या वाचतील असं सांगून विद्यार्थिनींनी पुस्तकासोबत निसर्गाचं देखील ज्ञान घ्यावं, असं आवाहन राहीबाई पोपरे यांनी यावेळी केलं.
****
कांदा आणि दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर इथं आज खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ह��र घालून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सहभाग घेतला.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने क्षीरसागर यांनी पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी कळवलं आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आजपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेत ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, याच अनुभवातून समस्येचं उत्तर नक्की मिळतं, असं लडकत यांनी सांगितलं.
****
0 notes