#राष्ट्रीय खेळ बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 57 minutes ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २६ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
वीर बाल दिवस साजरा केला जात आहे. शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. दरम्यान, या पुरस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजनही करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात सुपोषित ग्राम पंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमटी वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. एमटी वासुदेवन नायर हे मल्याळी चित्रपट आणि साहित्यातील नामांकित व्यक्तिमत्व असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नायर यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिल��. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कर्डांचं वितरण याद्वारे केलं जाणार आहे.
पारंपारिक पद्धतींवर आधारित सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त झाल्याचं, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत समग्र स्वास्थ्य सेवा या चित्रपट श्रृंखलेचं जाधव यांनी काल दिल्लीत अनावरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. ही श्रृंखला राष्ट्रीय आयुष मिशनची उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तनकारी परिणामांवर प्रकाश टाकते, आजारांना प्रतिबंध करून, निरोगी जीवनाला चालना देण्यात आयुष मंत्रालयाची भूमिका यातून विशद होत असल्याचं, जाधव यांनी नमूद केलं.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उद्या उद्‌घाटन होणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसंच वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारे इत्यादी विभागांसोबतच कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर विभागांची दालने आहेत. कृषी संलग्नित व्यवसाय, शेतीपूरक जोडधंदे तसंच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालनं, हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत
अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. ठाण्याचे कवी गीतेश शिंदे यांचा 'सीसीटीव्हीच्या गर्द छायेत' हा कविता संग्रह, जयसिंगपूर इथले डॉ. महावीर रायाप्पा अक्कोळे यांचा 'संतांचा तो संग नव्हे भलतैसा' हा ग्रंथ, पुण्याचे देवा झिंजाड यांची 'एक भाकर तीन चुली' ही कादंबरी, पुण्याच्या दिपाली दातार यांचं 'पैस प्रतिभेचा' हे पुस्तक, तसंच सांगलीचे महादेव माने यांच्या 'वसप' हा कथा संग्रह, आदी साहित्यकृतींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सन्मानचिन्ह, मानपत्र, आणि १० हजार रुपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सु��ू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे. यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद २३७ झाल्या होत्या. सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्कस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणं वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान राहील, त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
VIDEO: किंचितनं दोनदा विचारलं Will You Marry Me? गर्लफ्रेंडची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा
VIDEO: किंचितनं दोनदा विचारलं Will You Marry Me? गर्लफ्रेंडची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा
VIDEO: किंचितनं दोनदा विचारलं Will You Marry Me? गर्लफ्रेंडची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा kinchit shah proposing to his girlfriend: भारतीय संघाने आशिया कप २०२२ मधील आपला दुसरा सामनाही जिंकला आहे. दुबईत बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा ४० धावांनी प���ाभव झाला. या पराभवानंतर हाँगकाँगचा खेळाडू किंचित शाहने स्टेडियममध्येच सर्वांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. याचा व्हिडिओही व्हायरल…
View On WordPress
3 notes · View notes
loksutra · 3 years ago
Text
नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला: गौतम गंभीर संबित पात्रा: गोल्डन बॉयने ते पुन्हा केले, नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम रचला, टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण फेक गौतम गंभीर आणि संबित पात्रा यांनी नीरज चोप्राच्या नवीन राष्ट्रीय विक्रमावर बोलले
नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला: गौतम गंभीर संबित पात्रा: गोल्डन बॉयने ते पुन्हा केले, नीरज चोप्राने नवीन राष्ट्रीय विक्रम रचला, टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण फेक गौतम गंभीर आणि संबित पात्रा यांनी नीरज चोप्राच्या नवीन राष्ट्रीय विक्रमावर बोलले
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 89.30 मीटर अंतर फेकून नवा राष्ट्रीय विक्रम रचला आणि स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरज चोप्राने फिनलंडमधील तुर्कू येथे पावो नूरमी गेम्समध्ये ही कामगिरी केली. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक पटकावले. नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून नवा राष्ट्रीय विक्रम केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये येताच,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने 89.30 मीटर अंतर कापून त्याचा राष्ट्रीय विक्रम मोडला
पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने 89.30 मीटर अंतर कापून त्याचा राष्ट्रीय विक्रम मोडला
पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्रा: भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने 89.30 मीटर फेक करून ही कामगिरी केली. यादरम्यान त्याला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे सेट केलेला 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. पावो नुर्मी गेम्स फिनलंडमधील टॉप ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटप��की…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण • सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन • केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित • राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ आणि • नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण केलं जाणार आहे. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक तसंच प्रमाणपत्र प्रदान करण्यात यईल. दरम्यान, या पुरस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजनही करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात सुपोषित ग्राम पंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी, काल करण्यात आली, या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले… ‘‘साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।’’
माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती वर्षाला काल प्रारंभ झाला. यानिमित्तानं पंतप्रधानांनी एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं यावेळी अनावरण केलं.
दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीरा मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ** केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, ���ुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे. नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रं, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरणही शहा यांनी काल केलं. लातूर जिल्���ाधिकारी कार्यालयात याच अनुषंगानं काल विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी महिलांचा सहभाग वाढवण्याचं आवाहन करत, मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं, पाटील यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कर्डांचं वितरण उद्या केलं जाणार आहे.
चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर वस्तू आणि सेवा कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.पाकिटबंद तसंच लेबल लावून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर सुट्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू आहे, चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न हे सुट्या स्वरुपात विकले जात असल्यानं, त्यावर पाच टक्के दरानेच जीएसटी आकारला जात असल्याचं, जीएसटी परिषदेनं स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीचा आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले.. ‘‘प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.’’
सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं… ‘‘एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून ह�� मात्र माझा नेहमी मत आहे.’’
शिवसेनेचे प्रवक्ते तथा उपनेते डॉ राजू वाघमारे, तसंच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची स्वतंत्रपणे भेट घेऊन सांत्वन केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली, तर परभणी आणि बीडच्या घटनांचा संबंध जोडू नये, असं आवाहन वाघमारे यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते या महोत्सवा उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.
प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर तसंच अहिल्यानगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले, तसंच चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी झाले.
हिंगोली इथं एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच कुटुंबावर केलेल्या बेछूट गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर मुलीसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. काल रात्री ही घटना घडली. विलास मुकाडे असं या पोलिसाचं नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे.
लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा प्रमुख डॉ.प्रमोद घुगे याला न्यायालयानं ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच रुग्णालयातला कर्मचारी बाळू डोंगरे याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ घुगे याला उत्तराखंडातून अटक करून काल न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणातल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ११२ धावा झाल्या होत्या.
हवामान राज्य��त छत्रपती संभाजीनगरसह, अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजा��च्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामांचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागाने केले आहे.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायबसिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. चैनी यांच्या शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंडीगडमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे.
****
नागरिकत्व कायद्याचं कलम सहा ए संवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित हे कलम आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय उपाय असल्याचं नमूद केलं.
दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील.
****
बिहारमधल्या सिवान आणि सारन जिल्ह्यात मद्य सेवनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सेवन केलेलं मद्य विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, सारनमध्ये आठ आणि सिवानमध्ये दहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सिवानचे पोलिस अधिक्षक अमितेश कुमार यांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘रणांगण विधानसभेचं’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणी प्रसारित झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात उप-उपान्त्यपूर्व फेरीत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा सामना आज चीनच्या हान यू हिच्याशी होणार आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा खेळ आज दुसऱ्या दिवशी सुरु झाला, मात्र काही वेळानंतर पावसामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या तीन बाद १३ धावा झाल्या आहेत.
****
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेशच्या टाडा गावाजवळ पोहोचलं. दुपारपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये या वादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूजवळ चेन्नईपासून ३२० किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमानात घट झाल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. परिक्षेसाठी नोंदणी करता��ा तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा मधल्या माछिल इथं दोन, तर तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. सहा जिल्ह्यातल्या २६ विधानसभा मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश असून, आजपासून येत्या पाच सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. दुसर्या टप्प्यात २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड इथं दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पवार यांचं स्वागत केलं. यानंतर दुचाकी रॅलीला सुरुवात झाली असून, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांना स्थानबद्ध केलं असून, शरद पवार गटाच्याही पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
तत्पूर्वी अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्याचं एकविसाव्या शतकातील महत्त्व ��णि समयोचितता’ या विषयावर उद्यापासून दोन दिवस राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या आंतरविद्याशाखीय आणि बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी देशभरातून आणि राज्यातून ७५ शोधनिबंधांची नोंदणी झाली असून, त्यांच्या सादरीकरणासाठी नऊ समांतर सत्रं होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टक्रांती, राज्यनीती, शिवकालीन कागदपत्रांच्या अभ्यासाची पद्धत या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं होणार आहेत. अमृतमहोत्सवानिमित्त विशेष टपालतिकिटाचंही प्रकाशन केलं जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्याने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी दरमहा नऊ तारखेला जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात येतं.  जिल्ह्यातल्या सर्व गर्भवतींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केलं आहे.
****
राज्यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आली असून, या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या कृषि पंप ग्राहकांचं अंदाजे ४६ कोटी रुपयांचं वीज बील माफ करण्यात येणार आहे. हिंगोली मंडळांतर्गत येणाऱ्या हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाच तालुक्याचा यात समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या नऊ सप्टेंबरला विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात हे कामकाज सुरू होणार असून, नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिनाचं कामकाज होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा इथं दोन, तर तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं सांगीतलं आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यस्त वेळअपत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
४४ व्या ‘प्रगती’ बैठकीत महाराष्ट्रासह ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७६ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.
****
देशभरातल्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र सुधारणांच्या दृष्टीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला प्रतिसाद मिळत असल्याचं, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. बाजारपेठेतल्या गरजा, मागणीशी सुसंगता असणारा अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात २४६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी, तर उत्कृष्ट कामगिरीसाठी नऊ पदवीधर विद्यार्थांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं.
****
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी आपल्याला साडेतेराच्या आर्थिक विकास दरानं पुढे जावं लागेल. यामुळे ��पण केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही, तर आपल्या सर्व समस्याही दूर होतील, असं ते म्हणाले.
****
काँग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी काल राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
****
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक लाभ देण्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तूंचं वाटप सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
आदिवासी क्षेत्रातल्या म्हणजेच पेसा क्षेत्रातल्या भरतीसाठी नाशिकसह राज्यातल्या शेकडो आदिवासींनी काल नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढला. आदिवासी भरती होणार नाही तोपर्यंत आंदोलनं सुरुच राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला. पंचवटीतील तपोवन इथून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तेथून आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मेार्चात तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने काल शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
ब्राझीलच्या रिओ दि जानेरिओ इथं झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली. बंगळुरूच्या दक्ष तयालियानं सुवर्ण पदक जिंकलं, तर पुण्याच्या आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराबादच्या बनिब्रता माजी आणि बिहारच्या पाणिनी, या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकं जिंकली.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात खेळणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नवव्या दिवशी, भारताचे खेळाडू विविध खेळप्रकारांच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये आपलं कसब पणाला लावणार आहेत. गोल्फ प्रकारात शुभंकर शर्माचा सहभाग असलेला खेळ दुपारी साडेबाराला सुरु झाला. हॉकीच्या संघाची उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनसोबत दुपारी दीडला लढत आहे. तर, याचवेळी ॲथलेटीक्सच्या अडथळ्यांच्या धावण्याच्या प्रकारात पारुल चौधरीचा सहभाग आहे. लांब उडी प्रकारात जेस्वीन आल्ड्रीन अडीच वाजता खेळणार आहे. त्यानंतर मुष्टीयुध्द ७५ किलो वजनी गटात लवलि��ा बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत तीन वाजता खेळेल. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचा पुरुष एकेरी उपांत्य फेरीचा सामना साडेतीनला आहे. याचवेळी नौकायन प्रकारात पुरुष गटात विष्णु सर्वनन, तर महिला गटात नेत्रा कुमानन संध्याकाळी सहाला खेळणार आहे.
नेमबाजीत २५ मिटर मीटर रैपिड फायर पिस्टल प्रकारात अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धूचा सहभाग असलेला खेळ थोड्या वेळेपूर्वी सुरु झाला आहे
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्तानं महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार आहेत. या जनसन्मान यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर इतर आठ जणांचा सहसमन्वयक म्हणून समावेश केला आहे.
****
राज्यस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील राजघाट इंथ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशासाठी शहिद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विजयघाट इंथ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळावर जात त्यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाड्यातील मुक्ती संग्राम स्मारकाची निर्मिती होत असून, ही निर्मिती परिपूर्ण होण्यासाठी सुधारीत नव्या बाबींचा समावेश आराखड्यात करुन हा सुधारीत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांच्या समोर काल सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील संतांच्या आभासी प्रतिमा, आठही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे स्तंभ, जिल्ह्यांची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं प्रतिबिंब बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, कला दालन, अजिंठा-वेरूळ लेण्यातील चित्रे, मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचं सादरीकरण स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसाठी होणार आहे.
****
पुण्यानजीक खडकवासला धरण���च्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग आज सकाळी अकरा वाजेनंतर पावसाचं प्रमाण आणि पाण्याची आवक यानुसार बदलून वाढवण्यात येत आहे. पुण्याच्या सिंचन भवनाद्वारे ही महिती देण्यात आली आहे.
खडकवासलासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सुमारे १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात झाला आहे. तरीही आज अखेरपर्यंत या धरण साखळीत सुमारे ७३ पूर्णांक ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. विसर्ग सुरु असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरु असून, त्या परिसरातील धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. ताम्हिणी घाटासह जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर परिसरात वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांसह आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.
****
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
****
वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत याच्या अंमलबजावणीचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात उद्या कृषी मार्गदर्शन - प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल पंधरवडा निमित्त आयोजित आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या या शेतीविषयक कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह नागरीकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारत-श्रीलंके दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना थोड्याच वेळेत दुपारी अडीच वाजता कोलंबो इथं ��ुरु होत आहे.
****
1 note · View note
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नवव्या दिवशी, भारताचे खेळाडू विविध खेळप्रकारांच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये आपलं कसब पणाला लावणार आहेत. गोल्फ प्रकारात शुभंकर शर्माचा सहभाग असलेला खेळ दुपारी साडेबाराला सुरु झाला. हॉकीच्या संघाची उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनसोबत दुपारी दीडला लढत आहे. तर, याचवेळी ॲथलेटीक्सच्या अडथळ्यांच्या धावण्याच्या प्रकारात पारुल चौधरीचा सहभाग आहे. लांब उडी प्रकारात जेस्वीन आल्ड्रीन अडीच वाजता खेळणार आहे. त्यानंतर मुष्टीयुध्द ७५ किलो वजनी गटात लवलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत तीन वाजता खेळेल. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचा पुरुष एकेरी उपांत्य फेरीचा सामना साडेतीनला आहे. याचवेळी नौकायन प्रकारात पुरुष गटात विष्णु सर्वनन, तर महिला गटात नेत्रा कुमानन संध्याकाळी सहाला खेळणार आहे.
नेमबाजीत २५ मिटर मीटर रैपिड फायर पिस्टल प्रकारात अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धूचा सहभाग असलेला खेळ थोड्या वेळेपूर्वी सुरु झाला आहे
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्तानं महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार आहेत. या जनसन्मान यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर इतर आठ जणांचा सहसमन्वयक म्हणून समावेश केला आहे.
****
राज्यस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील राजघाट इंथ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशासाठी शहिद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विजयघाट इंथ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळावर जात त्यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाड्यातील मुक्ती संग्राम स्मारकाची निर्मिती होत असून, ही निर्मिती परिपूर्ण होण्यासाठी सुधारीत नव्या बाबींचा समावेश आराखड्यात करुन हा सुधारीत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांच्या समोर काल सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील संतांच्या आभासी प्रतिमा, आठही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे स्तंभ, जिल्ह्यांची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं प्रतिबिंब बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, कला दालन, अजिंठा-वेरूळ लेण्यातील चित्रे, मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचं सादरीकरण स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसाठी होणार आहे.
****
पुण्यानजीक खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग आज सकाळी अकरा वाजेनंतर पावसाचं प्रमाण आणि पाण्याची आवक यानुसार बदलून वाढवण्यात येत आहे. पुण्याच्या सिंचन भवनाद्वारे ही महिती देण्यात आली आहे.
खडकवासलासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सुमारे १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात झाला आहे. तरीही आज अखेरपर्यंत या धरण साखळीत सुमारे ७३ पूर्णांक ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. विसर्ग सुरु असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरु असून, त्या परिसरातील धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. ताम्हिणी घाटासह जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर परिसरात वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांसह आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.
****
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
****
वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत याच्या अंमलबजावणीचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात उद्या कृषी मार्गदर्शन - प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल पंधरवडा निमित्त आयोजित आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या या शेतीविषयक कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह नागरीकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारत-श्रीलंके दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना थोड्याच वेळेत दुपारी अडीच वाजता कोलंबो इथं सुरु होत आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचालींना वेग, भाजप-संयुक्त जनता दलाची नवी दिल्लीत बैठक
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात ६५ टक्के तर राज्यात ६१ टक्के मतदान
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी
रायगडासह राज्यात तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस आज महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाच्या सरी
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. याच अनुषंगानं भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. संयुक्त जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. एनडीएच्या नेत्यांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्याच्या एका दिवसानंतर या बैठका झाल्या. दरम्यान, एनडीएत समाविष्ट घटक पक्षाची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत भाजपसह मित्रपक्षांचे नवनिर्वाचित खासदार उपस्थित रा��तील.
****
देशात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६५ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही नवीन आकडेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधील तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यातील राज्यसभा सदस्यत्वासाठी १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहेत. तर, २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कसलीही चर्चा झाली नसून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर तटकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त तटकरे यांनी फेटाळून लावलं. पक्षाच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असून सर्व आमदार बोलावलेल्या बैठकीला येणार आहेत, असंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्यात केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या विरोधात अधिक नाराजी असून येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केले जाईल, असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून महागाई, जीएसटी या प्रश्नांवर यापुढे आवाज उठवला जाईल असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर आले आहेत. संपूर्ण रायगड फुलांनी सजविण्यात आला असून आज सकाळी ��ोल ताशांच्या गजरात शिवरायांना छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं असून राज्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात येत आहे. या ठिकाणी आज सायंकाळी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही होत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे.
****
महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी यावेळी स्फोटकं, वायर, बॅटरी, पुस्तकं आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. हे नक्षलवादी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी आले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
****
५८, ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटी�� यांनी केलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं आहे. मान्सून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पोहचला. पुणे इथल्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. हौसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग इथं कालपासून तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत लांजा इथं सर्वाधिक १८ पूर्णांक ८० मिलिमीटर पावसाची, तर दापोलीत १६ पूर्णांक ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात आजही पावसाच्या सरी कोसळल्या असून वाशिम जिल्ह्यातही सायंकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात शहादा, प्रकाशा पट्ट्यात मिरची लागवडीची तयारी सुरु असून यासाठी नाशिक आणि इतर ठिकाणांहून मिरचीचे रोपं मागवण्यात आले आहेत. यंदा मान्सून चांगल्या प्रमाणात झाल्यास, भरघोस पिकाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस परिसरात आज झालेल्या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले आहेत. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या बोलोरो जीपला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. हे सर्वजण जिंतूर तालूक्यातल्या कोक इथले रहिवासी आहेत.
****
धुळे जिल्ह्यात आजपासून २१ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या मोहिमेत अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणं, अतिसाराच्या प्रकरणाच्या व्यवस्थापनासाठी तरतूद करणं, ओआरएस आणि झिंग कॉर्नरची स्थापना करण्यासह मोहिम प्रभावी राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.
****
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार वृक्षारोपण केलं जात आहे.
भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढविण्यासाठी कार्यरत आहे. यंदा आणि पुढील वर्षात इको बटालियनमार्फत धारुर तालुक्यात किल्ले धारुर आणि घागरवडा येथे सव्वा दोन लाख वृक्ष लागवड करणार आहे.
****
महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेला छत्रपती संभाजीनगर इथून सुरुवात झाली आहे. शेतकरी वर्गाला पीक कर्ज नुतनीकरण, व्याज परतावा आणि शासनाच्या प्रोत्साहनपर योजनांचं महत्व पटवून देत यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. बीड जिल्ह्यात ही संवाद यात्रा येत्या नऊ, दहा आणि अकरा तारखेपर्यंत जनजागृती करणार आहे. बँकेची योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर माहिती दिली जाणार आहे. ही संवाद यात्रा मराठवाड्यात ११ दिवस असेल.
****
नांदेड इथं येत्या मंगळवारी ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतलं बचावकार्य आज सकाळी साडेदहा वाजेदरम्यान संपवण्यात आलं. मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी आज पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. जवळपास ६३ तास चाललेल्या या बचावकार्यात ९१ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. सध्या या ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम सुरु आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पेट्रोल पंपाच्या अनुषंगाने फलकासंदर्भातल्या परवानग्या तपासण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले. शहरात असणाऱ्या अशा पद्धतीच्या सर्व जाहिरात फलकांची तपासणी करण्यात येत आहे. तसंच सर्व बेकायदेशीर फलकांविरोधात कारवाई सुरु असून, सर्व फलकांना स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, १३ मे रोजी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत १६ ��णांचा मृत्यू झाला आहे.
****
यंदाच्या पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परिक्षा सीयुईटीत काल ७५ टक्क्यांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. काल एकाच दिवशी झालेल्या परिक्षेसाठी, ३७९ शहरात दोन हजार १५७ परिक्षा केंद्रांवर एकूण ११ लाख ४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. दरम्यान, दिल्ली केंद्रासाठी काल होणारी ही परिक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून आता ही परिक्षा २९ मे रोजी होईल.
****
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषि विभागामार्फत विभाग आणि प्रत्येक जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे. ठाण्याचे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी ही माहिती दिली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणं, खतं, किटकनाशकं आदींबाबत उदभवणाऱ्य़ा अडचणींचं निराकरण व्हावं, तसंच काळाबाजार आणि साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने हा कक्ष सुरु करण्यात आला आहे.  
****
राष्ट्रीय डेंग्यू दिवस आज पाळला जात आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थेत विविध जनजागृतीपर कार्यक्रम होत आहेत. नागरिकांनी घरात कोणतेही साठविलेलं पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये, ��ाणी साठवणुकीचं भांडं आठवड्यातून एकदा रिकामं आणि कोरडं करुन भरावं तसंच डेंग्यू ताप टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केलं आहे. डेंग्यु संदर्भात इंडिया फाईट डेंग्यू हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार करण्यात आलं असून या ॲप्लिकेशनचा नागरिकांनी वापर करावा,  डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्याची कामं लोकसहभागातून हाती घ्यावीत असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. अशा कामांना शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थामार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाना त्यांनी दिल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर देण्यात येणार असून यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्याचा संकल्प प्रत्येकानं करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. वृक्षलागवड या चळवळीला लोकचळवळीचं स्वरुप येणं गरजेचं आहे. यासाठी माय गार्डन, माय प्राईड मोहीम राबविण्यात येईल. तसंच स्वयंसेवी संस्थांनी शहरी भा��ात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याची संकल्पना राबवावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. 
****
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात आज आणि उद्या जोराचे वारे, वीजा, गारपीटींसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  
****
यंदाच्या टी-ट्वेंटी विश्वचषक दरम्यान, भारतीय सांकेतिक भाषा आणि ऑडिओ वर्णनात्मक समालोचन प्रदान करण्यासाठी इंडिया साइनिंग हँड्स प्रायव्हेट लिमिटेडसह अनेक खाजगी क्रीडा वाहिनींच्या सहकार्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी कौतुक केलं आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी, सरकारच्या सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
****
व्हिएतनाम इथं सुरु असलेल्या आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुसरं पदक प्राप्त झालं आहे. सीता, हर्षा सिंघा आणि उषा धामणस्कर या तिन्ही खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुमसे खेळ प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदक मिळवून दिलं. या खेळाडूंनी ३० गुणांची कमाई करत पदक प्राप्त केलं. १४ मे रोजी मंगळवारी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अरुणाचल प्रदेशच्या रुपा बायोर हिनं पुमसे गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. ही स्पर्धा १८ मेपर्यंत चालणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
माजी राष्ट्रपीत रामनाथ कोविंद यांच्या अध्यतेखालील एक देश एक निवडणूक समितीनं काल नवी दिल्लीत राजनैतिक पक्ष आणि अन्य संबंधित घटकासोबत चर्चा केली. या बैठकीत जनता दल संयुक्तच्या वतीनं राजीव रंजन सिंह आणि पक्षाचे महासचिव संजय कुमार झा यांनी देशात एक निवडणूक घेण्यासाठी समर्थन दर्शवलं. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या शिष्टमंडळातल्या श्रीहरी बोरीकर, डॉक्टर सीमा सिंह आदींनी देखील यासाठी सहमती दर्शवली.
****
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार यासह अन्य पुरस्कार येत्या २२ फेब्रुवारीला मुंबईत वरळी इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येईल. यासोबतचं राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
****
विशाखापट्टणम इथं उद्यापासून पन्नास हून अधिक देशांच्या नौदलांचा सांघिक अभ्यास - `मिलन`  सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी पर्यंत हा अभ्यास सुरु असेल. मजबूत नौदल, सुरक्षित सागरी वाहतूक हा यावर्षीचा विषय असून या अंतर्गत पानबुडी सुरक्षा, हवाई सुरक्षा, युद्ध कौशल्य आदींचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये भारतीय नौदलाच्या २० युद्धनौका आणि ५० विमानं सहभागी होतील, असं नौदलानं म्हटलं आहे. 
****
आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं आज प्रथमच विजेतेपद मिळवलं आहे. मलेशियामधे या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा तीन- दोन असा पराभ�� केला. आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिनं पहिल्या एकेरीच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय नोंदवत संघाला एक-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. ट्रेसा जॉली आणि गायत्री पुलेला यांनी नंतर दुहेरीची लढत जिंकून संघाला दोन-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. भारतीय संघाला त्या नंतरच्या दोन सामन्यांत मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. अनमोल खरब हिनं पाचव्या निर्णायक सामन्यात प्रतिस्पर्धी खे‍ळाडूवर मात करत भारतीय महिला संघाचा विजय निश्चित केला.
****
भारतानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी राजकोट इथं चार बाद ३७४ धावा केल्या असून भारताकडे सध्या ५०० धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल १९३ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी, उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा भारताच्या चार बाद ३१४ धावा झाल्या होत्या. दरम्यान, घरगुती कारणामुळं या सामन्यातून बाहेर पडलेला फिरकीपटू आर. अश्विन आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज असल्याचं क्रिकेट मंडळानं म्हटलं आहे. 
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथल्या गोदावरी नदीची ‘गोदा आरती’ आता कायमस्वरूपी होणार आहे. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. याबद्दलची कार्यवाही जलद होण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या गोदा आरतीसाठी अकरा ठिकाणं तयार करण्यात येणार आहेत. भाविकांना बसण्याची व्यवस्था,  तसंच दिवे आणि विद्युतीकरणाची अन्य कामं इथं वेगानं करण्यात येतील, असं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.
****
शिवजयंतीनिमित्त महासंस्कृती महोत्सवात नांदेड इथं नंदगिरी किल्ल्यावर कालपासून सुरू छायाचित्र प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातली प्रेक्षणीय स्थळं, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन विषयांवरची छायाचित्र ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत उद्या  आयटीआय इथं रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन होणार आहे.
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सहकार भारतीतर्फे उद्या मुंबईतल्या चेंबूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातील प्रतिनीधी सहभागी होतील तसंच सहकार भारतीचे राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असून त्यांचं मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे. 
****
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ट्रक अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्यानं आज अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यु झाला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारताचं चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून अवघ्या १३४ किलोमीटर अंतरावर, बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार.
राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचं मुंबईत वितरण, अदर पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार प्रदान.
दहीहंडीतील गोविंदा पथकांना राज्य सरकारकडून मिळणार विमा संरक्षण, दहा लाखापर्यंत मिळणार आर्थिक मदत.
गंगापूर इथं होणाऱ्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड, लेखिका साहित्य संमेलन जानेवारीमध्ये हिंगोलीत होणार.
आणि
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिंपियाड स्पर्धेत भारताला दुसरा क्रमांक, चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं.
****
भारताच्या चंद्रमोहिमेतील चांद्रयान - तीनच्या अंतराळ यानाचा भाग अर्थात लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्त्रोनं ते आवश्यक असणाऱ्या कक्षेत पोहचवलं आहे. यासंदर्भातली दुसरी प्रक्रिया आज पहाटे यशस्वीरित्या पार पडली. इस्त्रोतर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-तीन येत्या बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ही ऐतिहासिक घटना इस्त्रोचं संकेतस्थळ आणि यु-ट्युब चॅनल तसंच फेसबुकवरील पेज यासह दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून थेट प्रसारीत करण्यात येणार आहे.
आता हे यान आणि चंद्र यांच्यातील सरासरी कमाल अंतर १३४ किलोमीटर इतकं असल्याचं इस्त्रोच्या माहितीत सांगण्यात आलं आहे. यान सुस्थितीत असल्याचं इस्रोतर्फे सांगण्यात आलं असून यान जेव्हा दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रावर उतरेल तेव्हा ही कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत अद्याप कोणत्याही देशाला यशस्वीपणे पोहोचता आलेलं नाही. दरम्यान, रशियाचं लुना - २५ हे यान दक्षिण ध्रुवाजवळ उतरताना अपघातग्रस्त झालं. त्यामुळे रशियाची ही मोहीम अपयशी ठरली आहे.
****
राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचं आज मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण झालं.
सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार, किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी पुरस्कार आणि विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.
या पुरस्काराअंतर्गतचा राज्याचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार काल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला गेला होता. त्यानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना पुरस्काराचं सन्मानचिन्ह आज प्रदान केलं गेलं.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य शासनानं यंदाच्या वर्षापासून या पुरस्काराला सुरुवात केली आहे.
****
लडाखमध्ये काल संध्याकाळी भारतीय सैन्य दलाचा एक ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ सैन���क हुतात्मा झाले तर एक सैनिक गंभीर जखमी झाला. अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, या अपघातात शहीद झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या राजाळे इथल्या वैभव संपतराव भोईटे यांचा समावेश आहे.
****
वर्ष २०२४ साठी दिल्या जाणाऱ्या बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण या पुरस्कारांसाठी केंद्र शासनातर्फे अर्ज मागवण्यात येत आहेत. www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीनं या ३१ ऑगस्ट पर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
वय वर्ष पाचपेक्षा अधिक ते १८ वर्षापर्यंतच्या ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. तर, मुलांच्या विकास, संरक्षण आणि कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्ष काम करणाऱ्या व्यक्तिस तसंच बाल कल्याण क्षेत्रात किमान दहा वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट अपवादात्मक कार्य करणाऱ्या आणि पूर्णतः निधीवर अवलंबून नसणाऱ्या संस्थेला बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
****
दहीहंडीसह प्रो-गोविंदा लीग मानवी मनोरे रचण्याच्या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या अर्थात गोविंदा आणि गोपिकांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. हा साहस प्रकार असल्यानं तो सादर करताना अनेकदा गोविंदांना अपघात होतात, रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचारांची गरज पडते. प्रसंगी गोविंदांचा मृत्यूही ओढवतो. अशा परिस्थितीत गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्याद्वारे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी हा शासन निर्णय पारित केला आहे. या विमा योजनेंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतुद करण्यात आली आहे.
****
गंगापूर इथं येत्या दोन ते चार डिसेंबर दरम्यान आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, कथा-कादंबरीकार डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक आज परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मसापच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांचे रास आणि गोंडर, झाडमाती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मुडदे, आखर, मुक्क्याला फुटले पाय हे कदम यांचे कथासंग्रह ��हेत. बुडत्याचे पाय खोलात, वडगाव लाईव्ह ही नाटकं, कादंबरी तसेच चरित्रग्रंथ, ललितलेख, समिक्षा ग्रंथ, व्यक्तिचित्रे असं विपूल लेखन कदम यांनी केलं आहे.
दरम्यान, नववं लेखिका साहित्य संमेलन हिंगोली इथं घेण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. स्व. वामनराव देशमुख बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हिंगोली या संस्थेनं लेखिका संमेलनाचं निमंत्रण मसापला दिलं होतं. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये हे संमेलन हिंगोलीत घेतलं जाणार आहे. तर मराठवाडा साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम येत्या ३० सप्टेंबर रोजी देगलूर इथं घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
जालना इथल्या उर्मी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा कविता गौरव पुरस्कारासाठी यंदा कविवर्य प्राचार्य जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे. तर याच संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा डॉ. दादा गोरे यांना त्यांच्या समग्र वाङ्मयीन कार्यासाठी जाहीर झाला आहे. उर्मीच्याच वर्ष २०२२ च्या गोदावरी राज्य काव्य पुरस्कारासाठी माजलगावच्या कवयित्री कविता बोरगावकर यांची, तर वर्ष २०२३ च्या पुरस्कारासाठी कवयित्री सीमा पाटील, केजकर यांची निवड करण्यात आली आहे. या संस्थेचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठीचा वर्ष २०२३ चा जीवनगौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातील सेवेबद्दल जगन्नाथराव खंडागळे यांना जाहीर झाला आहे. येत्या २८ ऑक्टोबर रोजी जालन्यातील अग्रसेन भवन इथं हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.
****
केंद्र शासनाच्या सेवेला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. भक्त निवास क्रमांक दोनमध्ये भरवलेलं हे प्रदर्शन २२ तारखेपर्यंत चालणार आहे. गेल्या नऊ वर्षाच्या कालखंडात केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे .
****
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकून दुसरं स्थान पटकावलं आहे. पोलंडच्या चोरझॉफ इथं दहा ऑगस्टपासून सुरू असलेल्या या ऑल्म्पिआडचा आज समारोप झाला. यात महाराष्ट्रातल्या नागपूरच्या आकर्ष राज सहय याच्यासह राजस्थानातील कोटाच्या राजदीप मिश्रा, आंध्र प्रदेशातील कुर्नूलच्या कोडूरु तेजेश्वर आणि पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या मोहम्मद साहिल अख्तर या चौघांनी सुवर्ण पदक मिळवलं. तसंच कर्नाटकातल्या बंगरुळूच्या सैनवनीत मुकुंद यानं रौप्य पदक मिळवलं. स्पर्धेत युनायटेड किंगडमनं पाच सुवर्णपदकं मिळवून आघाडीचं स्थान घेतलं. पन्नास देशांमधून २३६ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
****
येत्या दोन दिवसात कोकणात ��हुतांश ठिकाणीतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.अकोला जिल्ह्यात आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे.वाशीममध्येही रिमझिम पाऊस सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातल्या संजय सरोवर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्यानंसुद्धा वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मिटरनं उघडण्यात आले आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
चालू वर्षासाठी, मूल्य समर्थन योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तूर, उडीद आणि मसूर खरेदीवरची मर्यादा रद्द
प्राथमिक कृषी पतसंस्थेला देशभरात दोन हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रं उघडण्यास परवानगी
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा काल राज्यभरात उत्साहात साजरा
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन यादीत महाराष्ट्रातल्या सदुसष्ट शैक्षणिक संस्थांचा समावेश
जालना इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू
मोसमी पावसाचा प्रवास मंदावण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
आणि
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून लंडन इथं कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना
****
केंद्र सरकारनं चालू वर्षासाठी, मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद आणि मसूर डाळीच्या खरेदीवरची ४० टक्क्यांची मर्यादा रद्द केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांकडून कोणत्याही मर्यादेशिवाय, किमान आधारभूत किमतीला डाळींची खरेदी करता येईल. सरकारकडून किफायतशीर किमतीला या कडधान्यांच्या खरेदीची खात्री मिळाल्यावर, या धान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आगामी खरीप आणि रब्बी पेरणीच्या हंगामात तूर, उडीद आणि मसूर या पिकांच्या पेरणीचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. डाळींची साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात दोन जून रोजी, अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ लागू करून तूर आणि उडीद डाळीच्या साठवणीवर मर्यादा लागू केली होती. डाळींचे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, गिरणी मालक आणि आयातदार यांच्यासाठी ही मर्यादा लागू आहे.
****
प्राथमिक कृषी पतसंस्थेला देशभरात दोन हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रं उघडण्यास केंद्र सरकार परवानगी देणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. यापैकी एक हजार जन औषधी केंद्रे या वर्षी ऑगस्टपर्यंत आणि पुढची एक हजार केंद्रे डिसेंबरपर्यंत उघडली जातील. या निर्णयामुळे पतसंस्थेचं उत्पन्न वाढवण्यासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, तसंच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना परवडणाऱ्या किंमतीत औषधं उपलब्ध होणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा काल राज्यभरात उत्साहात साजरा झाला. किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थ��तीत राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक सोहळा राहिला नसून, तो एक लोकोत्सव झाला असल्याचं, संभाजी राजे छत्रपती यावेळी म्हणाले. राज्यातले पन्नास किल्ले शासनानं आपल्या ताब्यात दिल्यास शासनाकडून काहीही निधी न घेता स्वखर्चानं त्या किल्ल्यांचं संवर्धन करू, असा प्रस्तावही त्यांनी दिला. पाचाड इथं शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीबाबत छत्रपतींनी समाधान व्यक्त केलं. शिवराज्याभिषेक समितीनं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन झालं. यावेळी 'शिव वंदना' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.
कोल्हापूर इथं नवीन राजवाड्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर युवराज यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानिमित्त झांज पथक, बँड वादन, पोवाडे आणि मर्दानी खेळ सादर करण्यात आले. सोलापूर इथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवज्योत फेरी आणि व्याख्यान घेण्यात आले.
****
‘शासन आपल्या दारी‘ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती आणणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं या कार्यक्रमाला सुरुवात करताना बोलत होते. सरकार आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी हा उपक्रम राज्यभरात राबवला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शहात्तर कोटी रुपयांचा लाभ आजच्या एका दिवसात देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमधल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या नऊ वर्षातली कारकीर्द हा देशासाठी सुवर्णकाळ असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. 
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक कालपासून मुंबईत सुरू झाली. ही समिती उद्या द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई दर गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच पाच टक्क्यांच्या खाली, म्हणजे चार पूर्णांक सात टक्क्यांवर आला असून, हा दर उतरला असला तरी, समिती प्रमुख व्याज दरांच्या स्थितीत बदल करणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेतल्यानंतर आर्थिक धोरण समितीची ही पहिलीच बैठक आहे.
****
राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसंच वीज साठवणुकीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या, उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत राज्य शासनाचे नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टोरंट पॉवर लिमिटेड यांच्याशी राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले, त्यावेळी फडणवीस बोलत होते. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातलं हे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान असून, उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे राज्यातल्या शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातली विजेची वाढती मागणी भागवता येणं शक्य होणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भातली ताजी यादी काल जाहीर झाली असून, त्यात महाराष्ट्र तीन वर्षांनी पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्यामुळे, राज्यातून प्रकल्प बाहेर गेले, असा आरोप करणाऱ्यांना योग्य ते उत्तर मिळालं आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
****
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन यादीत महाराष्ट्रातल्या सदुसष्ट शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या अकरा, तसंच शंभर सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत, दहा विद्यापीठांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शंभर संशोधन संस्थांच्या यादीत राज्यातल्या पाच तर अभियांत्रिकी संस्थांच्या यादीत आठ संस्थांचा समावेश आहे. राज्यातल्या तीन महाविद्यालयांना आणि नऊ व्यवस्थापन संस्थांनाही या यादीत स्थान मिळालं आहे. देशातल्या शंभर सर्वोत्कृष्ट औषधीय संस्थांच्या यादीत राज्यातल्या अठरा संस्था असून, त्यात औरंगाबादच्या वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, या संस्थेला ऐंशीवं स्थान मिळालं आहे. सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयात राज्यातली दोन तर दंत महाविद्यालयांच्या यादीत राज्यातली सात महाविद्यालयं आहेत.
****
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती जाहीर केली. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ संजय घनश्याम भावे यांची नियुक्ती झाली आहे.
****
दलित पॅंथर संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम काल नागपूर इथं साजरा झाला.  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पँथर चळवळी��ल्या कार्यकर्त्यांनी चळवळीदरम्यानचे आपले अनुभव कथन केले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला किमान एक मंत्री पद मिळावं, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
राज्यात नवीन वाळू धोरण राबवण्यास सुरुवात आहे. वर्धा, भंडारा, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, हिंगोली या केंद्रांवर वाळू विक्रीला सुरुवात झाली असून, या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करत आहेत. यासाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजे १२ हजार ६३३ ब्रास वाळूची विक्री झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे.
****
जालना तालुक्यातल्या सामनगाव इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये भागवत इंगळे, त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा प्रशांत इंगळे, तसंच भागवत आणि ओमकार पडूळ या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेली मुले बुडत असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी भागवत इंगळे हे पाण्यात उतरले. मात्र त्यांच्यासह सर्व बालकांचा बुडून मृत्यू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
****
गुजरातच्या पोरबंदरच्या दक्षिणेला अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येला सरकण्याची, आणि त्याचं रूपांतर चक्री वादळात होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या स्थितीमुळे मोसमी पावसाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, केरळमध्ये मान्सूनचं आगमन होण्याला उशीर होऊ शकेल. मात्र देशभरातल्या एकूण पावसावर याचा फारसा परिणाम होणार नाही, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, नऊ आणि दहा तारखेला मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून लंडनच्या ओवल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१ ते २०२३ च्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ६६ पूर्णांक ६७ अंकांनी तालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला दोन - एकनं हरवून ५८ पूर्णांक आठ गुण मिळवत अंतिम फेरीतलं स्थान पक्कं केलं.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शारुक खाननं, भालाफेकमध्ये शिवम लोहकरेनं, तर लांब उडी प्रकारात सुश्मितानं रौप्य पदक जिंकलं. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत शकीलनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले गटानं देखील काल या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं.
****
जर्मनीतल्या सुहल इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात अमनप्रीतसिंहनं सुवर्ण पदक जिंकलं. तर महिलांच्या २५ मीटर सांघिक प्रकारात मेघना सादुला, पायल खत्री आणि सीमरनप्रीत कौर यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत आतापर्यंत पाच सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकून भारत पहिल्या स्थानावर आहे.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत, पी राजवत तसंच अर्जुन आणि ध्रुव कपिला या जोडीनं काल दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांना मात्र पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.  
****
दिव्यांगांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी शासनानं हाती घेतलेल्या, “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी”, या अभियानाची अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. या अभियानाबाबतच्या पूर्वतयारी���ाठी  झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. उपक्रमाच्या यशासाठी जिल्ह्यातल्या दिव्यांगांचं गावनिहाय सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. किमान ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याची शिफारस कृषी विद्यापीठानं केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कृषी विभाग लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात एक विशेष मोहीम राबवणार आहे. आजपासून येत्या बारा तारखेपर्यंत चालणाऱ्या ‘खरीपाची तयारी कृषी विभाग आपल्या दारी’, या मोहिमेतून आधुनिक लागवड तंत्रज्ञान, पिकांवरच्या रोगांचं नियंत्रण आणि कृषी विभागाच्या प्रमुख योजना, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत आज परभणी इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात विविध नामांकित उद्योजक आणि कंपन्या सहभाग नोंदवणार आहेत. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर सहभाग नोंदवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
BCCI Title Sponsership: BCCI ला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील
BCCI Title Sponsership: BCCI ला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील
BCCI Title Sponsership: BCCI ला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील Title Sponsorship Rights For BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देशांतर्गत सामन्यांसाठी मास्टरकार्डला टायटल स्पॉन्सर्स म्हणून नियुक्त केले आहे. यासाठी बोर्डाने मास्टरकार्डशी करार केला आहे. यापूर्वी पे��ीएमकडे हे अधिकार होते. Title Sponsorship Rights For BCCI: भारतीय…
View On WordPress
1 note · View note