#कसोटी क्रिकेट
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल - पंतप्रधानांना विश्वास
येत्या पाच वर्षात राज्यात दहा हजार सहकारी संस्था उभारण्याचं धोरण - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती
बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चार अधिकाऱ्यांच्या बदल्या
बीड जिल्ह्यात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब या स्पर्धेचं आयोजन
आणि
बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा चार गडी राखून विजय, मालिकाही तीन - एक अशी जिंकली
****
भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीत आज रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षांत भारत विकसित देश झालेला आपण पाहू आणि दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
अब आनेवाले पच्चीस साल भारत के भविष्य के लिये, दिल्ली के भविष्य के लिये बहोत ही महत्वपूर्ण है। ये पच्चीस साल भारत को विकसित राष्ट्र बनते हुये दे��ेंगे। ये भारत को आधुनिकता के एक नये दौर से गुजरते हुये देखेंगे, जब भारत दुनिया की तिसरी बडी आर्थिक ताकद बनेगा।
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या १३ किलोमीटर लांबीच्या विस्तारीत मार्गाचं उद्घाटन करून पंतप्रधानांनी, दिल्लीला पहिल्या नमो भारत रेल्वे गाडीची भेट दिली. दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी, तसंच रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं.
****
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उद्या नवी दिल्लीत पंचायत से पार्लियामेंट टू पॉइंट ओ या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या अनुसूचित जमातीच्या ५०३ महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अनुसूचित जमातीच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना घटनात्मक तरतुदी, संसदीय कार्यपद्धती आणि शासन व्यवस्थेची माहिती देणं, हे या कार्यक्रमाचं उद्दीष्ट आहे.
****
राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करण्याची गरज असून, येत्या पाच वर्षात १० हजार सहकारी संस्था उभारण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. सहकारी संस्थाना पतपुरवठा करणं आणि वसुली करणं या पलीकडे जाऊन त्यांना सहकारी तत्वावर वेगवेगळे उद्योग करण्याची परवानगी दिली जाईल, असं ते म्हणाले. सहकारी दूधसंघात अध्यक्ष आणि राजकारणी लोकांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे हे क्षेत्र अडचणीत आलं आहे, सहकारी चळवळ टिकवायची आणि वाढवायची असेल तर कायद्यात सुसूत्रता आणून कठोर भूमिका घेणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. या प्रकरणातल्या पाच आरोपींना काल पकडण्यात आलं असून, हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील आम्ही सोडत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
माझं मत एवढंच आहे की, यासंदर्भात नीट चौकशी करू द्यावी. सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही. याचा उपयोग कुठल्याही राजकारण करता करू नये ही गंभीर बाब आहे. एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृ�� हत्या झाली त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यांना समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे.
****
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
****
बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे, अंजली दमानिया यांच्यावर समाज विघातक कृत्य अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी बीड इथल्या नागरिकांनी केली आहे. या नेत्यांनी जाहीर सभेमध्ये केवळ राजकिय हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने मराठा तसंच ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, विविध ठिकाणी त्यांनी केलेल्या विधानांमुळे समाज विघातकी प्रसंग घडून येत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत मोठ्या संख्येनं नागरिक आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले होते. यावेळी पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आलं.
****
शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं गरजेचं असून, त्यातून घडलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दाखवण्याची आवश्यकता असल्याचं, खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. चिपळूण इथं वाशिष्ठी डेअरीने आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. कोकणात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, फळबागा, अन्नधान्य, डाळी या सगळ्यासाठी प्रचंड संधी आहेत, त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली, तर कोकणाचा आता बदलत असलेला चेहरा आणखी बदलेल, असं पवार यांनी नमूद केलं. हा महोत्सव नऊ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वैयक्तिक नागरी स्वच्छता आणि आरोग्य बळकटीकरणासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब, ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, खत खड्डा तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या असणारं कुटुंब यासाठी पात्र असून, २६ जानेवारी रोजी अशा कुटुंबांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातले सुमारे चार लाख ७२ हजार ३७९ कुटुंब सहभागी होणार आहेत.
****
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन - एक अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या पाचव्या सा��न्यात भारतीय संघानं दिलेलं १६२ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलिया संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ १५७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
पोलीस विभागाच्या नांदेड परिक्षेत्र अंतर्गत लातूर इथं पोलीस क्रीडा निवड चाचणी स्पर्धेचं उद्घाटन आज लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेसाठी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातून २४ खेळ प्रकारात ४५० खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या १५ ते १९ जानेवारी दरम्यान होणार्या दहाव्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ६५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे, तर ओपनिंग सिनेमा म्हणून लिटील जाफना प्रदर्शित केला जाणार आहे. महोत्सवाचा समारेप १९ जानेवारीला प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खान यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याचं सुकथनकर यांनी सांगितलं.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या लेखी परीक्षा सात ते २३ जानेवारी दरम्यान होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या हिवाळी सत्रातल्या प्रवेशित नियमित विद्यार्थांची सत्र परीक्षा आणि मे २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. राज्यातल्या विविध २३५ केंद्रांवर ही परीक्षा होईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त कचरामुक्त यात्रा ही मोहीम राबवण्यात येत असून, यात्रेतील स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या उद्देशानं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन विशेष मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी पाच वाजता आणि रात्री ११ वाजेदरम्यान यात्रेतली गर्दी कमी झाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी प्लास्टिकसह इतर कचरा उचलत आहेत. दरम्यान, यंदाही यात्रेकरुंना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या वस्सा इथं ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जागृती महिला प्रभाग संघाची आमसभा आज पार पडली. यावेळी महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला हक्काचं विक्री ��ेंद्र मिळावं यासाठी जागृती विक्री केंद्राचं उद्घाटन, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपली प्रगती साधत आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन आपल्या कुटुंबाचं जीवनमान उंचावण्याचं आवाहन, खांडेकर यांनी यावेळी केलं.
****
0 notes
Text
थेट स्टेडियम मैदानातून माहिती देताना चार बुकी गजाआड
नागपूर : नागपुरातील जामठा स्थित विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतविरुद्ध आस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर चक्क मैदानात बसूनच रिअल टाईम माहिती देणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे (बुकी गजाआड). रिअल टाईम माहिती देताना थेट स्टेडियममधूनच अटक करण्याची नागपुरातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई कसोटी सामन्याच्या दुसर्या…
View On WordPress
0 notes
Text
WTC क्रमवारीत भारताची घसरण, 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानचा फायदा
WTC क्रमवारीत भारताची घसरण, 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानचा फायदा
इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२३ च्या गुणतालिकेत तो खाली घसरला आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या विजयाचा फायदा पाकिस्तानला झाला आहे. तो पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाऐवजी तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. खरं तर, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी दोन गुण वजा केले गेले. भारतीय संघ निर्धारित वेळेत दोन…
View On WordPress
#इंग्लंड#इंग्लंड विरुद्ध भारत#ऑस्ट्रेलिया#कसोटी क्रिकेट#जसप्रीत बुमराह#जागतिक कसोटी चॅम्पियनशिप रँकिंग#जागतिक चाचणी चॅम्पियनशिप पॉइंट टेबल नियम#पाकिस्तान#भारत#भारत विरुद्ध इंग्लंड#वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2022
0 notes
Text
James Anderson : जेम्स अँडरसनने केला नवा विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला
James Anderson : जेम्स अँडरसनने केला नवा विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला
James Anderson : जेम्स अँडरसनने केला नवा विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघासाठी मैदानात उतरून अतुलनीय कामगिरी केली.आपल्या संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा … James Anderson :इंग्लंडचा कसोटी…
View On WordPress
#anderson:#james#अँडरसनने#कसोटी#केला#क्रिकेट#क्रिकेटमध्ये#क्रीडा#खेळ बातम्या#घेण्याचा#जेम्स#टेनिस#नवा#भारत लाईव्ह मीडिया#मराठी खेळ अपडेट्स#राष्ट्रीय खेळ बातम्या#विकेट्स#विक्रम#विश्वविक्रम#सर्वाधिक#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी
0 notes
Text
IND vs ENG: जेव्हा इंग्लंडने कसोटीत एकदिवसीय फलंदाजी केली तेव्हा बॅझबॉल ट्रेंडिंग सुरू झाला, अर्थ जाणून घ्या
IND vs ENG: जेव्हा इंग्लंडने कसोटीत एकदिवसीय फलंदाजी केली तेव्हा बॅझबॉल ट्रेंडिंग सुरू झाला, अर्थ जाणून घ्या
भारत विरुद्ध इंग्लंड: बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी ७ विकेटने जिंकून इंग्लंडने इतिहास रचला. या विजयासह 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या सामन्यादरम्यान बझबॉल या शब्दाची बरीच चर्चा झाली. भारताच्या पहिल्या डावात पंतने शानदार फलंदाजी केली. या खेळीनंतरच इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनी हा शब्द वापरला होता. तो म्हणाला होता की, पंत…
View On WordPress
#IND vs ENG 5वी कसोटी#IND vs Eng एजबॅस्टन कसोटी#IND वि ENG#आक्रमक क्रिकेट#इंग्लंड#इंग्लंड 7 विकेट्सने जिंकला#इंग्लंड क्रिकेट संघ#ऋषभ पंत#एजबॅस्टन टेस्ट#एजबॅस्टन स्टेडियम#ऑस्ट्रेलिया#क्रिकेट बॅजबॉल#क्रिकेटमधील बॅजबॉल#चाचणी मालिका#जसप्रीत बुमराह#जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण सारणी#जेम्स अँडरसन#जॉनी बेअरस्टो#जो रूट#दक्षिण आफ्रिका#बाझबॉल काय आहे#बॅजबॉल#बॅजबॉल काय आहे#बॅझबॉल#बेन स्टोक्स#ब्रँडन मॅक्युलम#ब्रेंडन मॅक्युलम#भारत#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी
0 notes
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही ��ोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत.
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच.
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस.
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या ��तिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांच��� पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास...
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय...
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note
·
View note
Text
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा नाशिक गट विजेता
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा नाशिक गट विजेता
परभणी विरुद्ध आघाडीचे गुणहुजैफ शेख ५ सामन्यात २७ बळींसह स्पर्धेत सर्वोच्च स्थानावर नाशिक मध्ये झालेल्या, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , नाशिकने परभणी विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेत विजय मिळवला. अशा प्रकारे पाच साखळी सामन्यांत २ निर्णायक विजय व ३ पहिल्या डावातील…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशाच्या राजधानी दिल्लीमधील रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याच्या संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. या उद्घाटनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वेस्थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवासही करणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आज येत आहेत. या दौऱ्यात ते समपदस्थ अजीत डोभाल आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक करणार आहेत. या बैठकीत दोन्ही देशातील अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रासंबंधावर चर्चा होणार आहे. त्याशिवाय चीनच्या हिंद व प्रशांत महासागरातील प्रकल्पाविषयी चर्चा होणार आहे.
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं ३-१ अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं १६२ धवांच लक्ष्य ऑस्ट्रेलिया संघानं ४ गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण केलं. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ १५७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियानं बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका तब्बल दहा वर्षांनी जिंकली आहे. तसच या मालिका विजयामुळं ऑस्ट्रेलिया संघानं कसोटी विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांचा सामना आता दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा विभाजन, वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती असे अनेक प्रश्न सोडवू, असं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे. ते अहिल्यानगर इथं सर्वपक्षीय सत्काराला उत्तर देत होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
सज्जनांनी सक्रिय होणं हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असतं, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. काल मुंबई इथं शेठ गोकुळदास तेजपाल, नाट्यगृहात झालेल्या चाणक्य नाटकाच्या १ हजार ७१० व्या प्रयोगाला फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम होत असल्याचं फडणविस यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या शासकीय कार्यक्रमांचा आज समारोप होत आहे. या यात्रेत कुस्त्यांची दंगल आज होणार असून, आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळाही होणार आहे. काल या स्पर्धेत नागरिकांनी शंकरपटाचा थरार अनुभवला. ५८ बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. त्यापैकी हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यात पिंपळदरी इथले महादू कोंडिबा रिटे यांच्या बैलजोडीने निर्धारित अंतर अवघ्या साडे चार सेकंदात पार करत पहिला क्रमांक पटकावला.
शिक्षण घेऊन रोजीरोटीसाठी जॉब शोधण्याची संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळं स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडणारी पिढी घडविणं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दीष्ट असल्याचं प्रतिपादन शिक्षण आणि संगणक क्षेत्राच्या अभ्यासक डॉ. रेवती नामजोशी यांनी केल आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होत्या.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत काल विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्राच्या वतीनं ग्रंथ दिंडी काढण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, संचालक, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागातील शिक्षक, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असे ५०० पेक्षा अधिक जण ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झाले.
भारतीय टेनिसपटू सुमित नागपालने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने आज सकाळी अंतिम पात्रता फेरीत फ्रांसच्या एड्रियन मॅनारिनोचा पराभव केला. नागपालने काल झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लिंचारोव्हचा पराभव केला होता. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या, युकी भांब्री आणि अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडच्या सँडर एरेंड्स आणि ब्रिटनच्या ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे.
राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते काल जिल्हा परिषद, धुळे इथं ११ नविन रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना राज्यस्तरावरुन या ११ नविन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत • संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक; १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी • नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे आणि • बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचं लक्ष्य
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले… पी एम किसान सम्मान निधी से किसानों को करीब तीन लाख करोड रूपये की आर्थिक मदत दी गई है। पिछले दस वर्षों में कृषी ��ोन की राशी साढे तीन गुना हो गई है। अब पशु पालक��ं और मत्स्य पालकों को भी किसान क्रेडीड कार्ड दिया जा रहा है। देश मे मौजुद नौ हजार से ज्यादा एफ पी ओ, किसान उत्पाद संघ उन्हें भी आर्थिक मदत दी जा रही है।
कृषी मालाच्या किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार सरकार उचलणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. यावर्षी कृषी आणि संबंधित क्षेत्रातला वाढीचा दर साडेतीन ते चार टक्क्यांदरम्यान राहणं अपेक्षित असल्याचं चौहान यांनी सांगितलं.
देशाच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं काल पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. चिदंबरम यांना पद्मश्री तसंच पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राज्यातल्या विविध नियोजन प्राधिकरणांचं सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते काल नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते. महिला आणि बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करायच्या कामांचाही मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला. राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागात विशेषत: मुंबई महानगरात झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतले फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याना पुण्यातून तर सिध्दार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती, या सर्व आरोपींना केज न्यायालयात काल हजर करण्यात आलं, न्यायालयानं या सर्वांना १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे… नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण, अमानुष मारहाण आणि हत्या केल्यापासून फरार असलेल्या सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात चर्चेत असलेले बहुतांश प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत, त्यामुळे आता विशेष तपास पथक तसंच सीआयडीकडून तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत काल सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर यांच्यासह दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. नांदेड शहरात पाटबंधारे नगरातल्या एका घरात सहा एप्रिल २००६ रोजी झालेल्या या स्फोट प्रकरणात काल तब्बल १८ वर्षांनंतर न्यायालयानं निकाल सुनावला. या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी दोन आरोपींचा स्फोटातच मृत्यू झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने या प्रकरण दोन हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं, मात्र हा बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. त्यामुळे हा फटाक्यांचा स्फोट असल्याचं ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आता जर्मन भाषेत एबीसीडीचे धडे गिरवत आहेत. महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षात हा उपक्रम सुरू केला आहे. जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आकाशवाणीला सांगितलं. ते म्हणाले.. जर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे स्कोप पाहिजे असेल, तर त्यांना जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. बेसिक जर्मन भाषा जर आपण मुलांना शिकवली तर मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ती मुलं निश्चित उच्च शिक्षण जर्मन भाषेतून घेतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी आमच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक आली होती. जर जर्मन भाषा काही शिक्षकांना शिकायची असेल, तर ऑनलाईन ही शिकता येणार आहे. तर यासाठी जर्मनीमध्ये असलेले मिस्टर दावोस ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. आमचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून ती भाषा शिकत आहेत. तेच शिक्षक आता शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या ��जच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा दुसरा डाव केवळ १५७ धावांवर आटोपला. या डावात ॠषभ पंतच्या ६० धावा वगळता कुणालाही मोठी धावसंख्या करता आली नाही. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या उपाहारापर्यंत तीन बाद ७१ धावा झाल्या होत्या..
लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या एकोणसाठाव्या तीन दिवसीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थिती, स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मिती तसंच उद्योजकता विकासाकडे युवकांची ओढ निर्माण करण्यासाठी सरकारने धोरण आखावं, असे प्रस्ताव संमत करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' या विषयावर शिक्षण तज्ञ अनिल राव यांनी मार्गदर्शन केलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांची या सत्रास प्रमुख उपस्थिती होती.
भोपाळ इथं होत असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे खेळाडू काल रवाना झाले. या स्पर्धा आजपासून सुरु होत आहेत. शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने आणि नांदेड जिल्हा मल्लखांब संघाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी संघाला शुभेच्छा दिल्या.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या शासकीय कार्यक्रमांचा आज समारोप होत आहे. या यात्रेत कुस्त्यांची दंगल आज होणार असून, आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळाही होणार आहे. काल या स्पर्धेत नागरिकांनी शंकरपटाचा थरार अनुभवला. ५८ बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. त्यापैकी हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यात पिंपळदरी इथले महादू कोंडिबा रिटे यांच्या बैलजोडीने निर्धारित अंतर अवघ्या साडे चार सेकंदात पार करत पहिला क्रमांक पटकावला. परिसरातल्या गोरगरीब कुटुंबांमध्ये प्रसिद्ध असलेला जुन्या कपड्यांचा बाजार काल या यात्रेत आकर्षणाचं केंद्र होता.
वाहतूक नियमांचं पालन केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी बोलताना, रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत विविध कार्यशाळा, दुचाकी फेरी, नेत्र तपासणी शिबीरं तसंच, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.
लातूर शहरात एका खाजगी रुग्णालयातले दिवंगत कर्मचारी बाळू डोंगरे यांच्या दोन्ही मुलांचा लातूर इथल्या केशवराज विद्यालयाने शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबतचं पत्र विद्यालयाला दिलं होतं.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक;१८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे
आणि
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या पाचव्या सामन्यात भारताला १४५ धावांची आघाडी
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
पी एम किसान सम्मान निधी से किसानों को करीब तीन लाख करोड रूपये की आर्थिक मदत दी गई है। पिछले दस वर्षों में कृषी लोन की राशी साढे तीन गुना हो गई है। अब पशु पालकों और मत्स्य पालकों को भी किसान क्रेडीड कार्ड दिया जा रहा है। देश मे मौजुद नौ हजार से ज्यादा एफ पी ओ, किसान उत्पाद संघ उन्हें भी आर्थिक मदत दी जा रही है।
****
देशाच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या ह���त्या. चिदंबरम यांना पद्मश्री तसंच पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते आज नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे, हा निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याना पुण्यातून तर सिध्दार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती, या सर्व आरोपींना केज न्यायालयात आज हजर करण्यात आलं, न्यायालयानं या सर्वांना १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे –
नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण, अमानुष मारहाण आणि हत्या केल्यापासून फरार असलेल्या सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात चर्चेत असलेले बहुतांश प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत, त्यामुळे आता विशेष तपास पथक तसंच सीआयडीकडून तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.
****
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी करायच्या कारवाईबाबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना वेगळी वागणूक देत असून याबाबतचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे.
****
लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाचे निर्देश नाही, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात करण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचं वृत्त प्रसार माध्यमातून पसरलं होतं, त्यासंदर्भात पापळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ही बाब स्पष्ट केली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाचा राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आढावा घेतला, महाजन यांनी पांडूरंगाचं सहकुटूंब दर्शन घेतलं, यावेळी मंदिर समितीच्या वतीने महाजन यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. पुरातत्त्व विभाग आणि संबधित कंत्राटदारानी संबंधित कामास गती देऊन वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना महाजन यांनी दिल्या. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राज कुमार यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आता जर्मन भाषेत एबीसीडीचे धडे गिरवत आहेत. महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आकाशवाणीला सांगितलं. ते म्हणाले –
जर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे स्कोप पाहिजे असेल, तर त्यांना जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. बेसिक जर्मन भाषा जर आपण मुलांना शिकवली तर मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ती मुलं निश्चित उच्च शिक्षण जर्मन भाषेतून घेतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी आमच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक आली होती. जर जर्मन भाषा काही शिक्षकांना शिकायची असेल, तर ऑनलाईन ही शिकता येणार आहे. तर यासाठी जर्मनीमध्ये असलेले मिस्टर दावोस ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. आमचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून ती भाषा शिकत आहेत. तेच शिक्षक आता शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला. तत्पूर्वी पहिल्या डावात भारतीय संघानं १८५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर सहा गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत १४५ धावांची आघाडी मिळाली आहे.
****
भोपाळ इथं होत असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे मल्लखांब खेळाडू आज रवाना झाले. या स्पर्धा उद्या ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत. शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने सर आणि नांदेड जिल्हा मल्लखांब संघाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी संघाला शुभेच्छा दिल्या.
****
सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा २०वा दीक्षांत समारंभ येत्या १० जानेवारीला होणार आहे. यावेळी एकूण १५ हजार २९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन ��ांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाहतूक नियमांचं पालन केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलं आहे. ते आज हिंगोली इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. अल्पवयीन तसंच कुणीही विनपरवाना वाहन चालवू नये, असं आवाहन उमाप यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी बोलतांना रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत विविध कार्यशाळा, दुचाकी फेरी, नेत्र तपासणी शिबीरं तसंच, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.
****
लातूर शहरात एका खाजगी रुग्णालयातले दिवंगत कर्मचारी बाळू डोंगरे यांच्या दोन्ही मुलांचं लातूर इथल्या केशवराज विद्यालयाने शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबतचं पत्र विद्यालयाला दिलं होतं, त्यानुसार केशवराज विद्यालयाने दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बाळू डोंगरे यांची ते काम करत असलेल्या रुग्णालयातच हत्या झाली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आज जुन्या कपड्यांचा आकर्षक बाजार भरवण्यात आला होता. परिसरातल्या गोरगरीब कुटुंबांसाठी हा बाजार वर्षभर पुरणाऱ्या कपड्यांची खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. दरम्यान, माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा, तसंच कृषी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण करण्यात आलं. उद्या कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ दु��ारी १.०० वा.
ग्रामीण भारताला सशक्त करण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ग्रामीण भारत महोत्सवाचं उद्घघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. २०१४ पासून सरकार खेड्यातील लोकांचं जगणं समृद्ध करण्यासाठी प्राधान्य देत असून, हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकारनं प्रत्येक गावात मूलभूत सुविधांची हमी देणारी मोहीम सुरू केल्याचं ते म्हणाले. ग्रामीण समाजांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे तसंच स्वच्छ भारत अभियान, पीएम आवास योजना, जल जीवन मिशनद्वारे सर्व ग्रामीण भागाचा फायदा आणि विकासाचे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. येत्या नऊ तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून विकसित भारत २०४७ साठी स्वावलंबी ग्रामीण भारताची निर्मिती ही या महोत्सवाची संकल्पना आहे.
चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस HMPV हा विषाणू वेगाने पसरत असून तेथील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. या विषाणुमुळे चीनमध्ये अनेक मृत्यु झाले असून त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. HMPV, कोरोना आणि माइकोप्लाज्मा न्यूमोनिया यासारखे आजार देखील चीनमध्ये वेगाने पसरत असल्याचंही वृत्त आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी परिस्थितीचं निरीक्षण करत असून, नागरिकांनी सातत्याने मास्क वापरावा, हातही धुवावेत, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
एस. टी महामंडळ नफ्यात राहण्यासाठी महामंडळाने बृहत कृती आराखडा तयार करावा. यासाठी परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, वाहतूकदार यांच्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करावा, अशा सूचना परिवहन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात समिती सभागृहात परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देऊन स्वच्छतेची कोटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महिला प्रवाशांसाठी प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या.
रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढवून देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा, अशा सूचना रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल���या आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत तसंच ग्रामीण भागात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणावर होत असून उद्योग क्षेत्रातील मजुरीचे दर जास्त आहेत. या बाबींचा विचार होऊन मजुरीचे दर ठरवावेत, अशा सूचनाही मंत्री गोगावले यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा असं जलजीवन योजनेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला लवकरात लवकर या सुविधांचा लाभ मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत येत्या १०० दिवसांत होणाऱ्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत उद्या पाच तारखेला दुपारी बारा वाजता कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर माळेगाव यात्रेत विजेत्या मल्लास माळेगाव केसरी हा पुरस्कार दिला जातो. नांदेडसह विविध राज्यांतून कुस्तीपटू मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेणार आहेत. माळेगावच्या लाल मातीत या कुस्त्या रंगणार आहेत. दरम्यान माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा, तसंच कृषी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण केलं जाणार आहे.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला. तत्पुर्वी पहिल्या डावात भारतीय संघानं १८५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर सहा गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत १४५ धावांची आघाडी मिळाली आहे.
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान ८ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान, आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि किमान तापमानात काहीशी घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चे काही वेळात उद्घघाटन करणार आहेत. यावेळी ते जाहीर सभेला संबोधित करतील. या महोत्सवाचा उद्देश ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करणे, स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि ग्रामीण समुदायांमध्ये नवकल्पना वाढवणं हा आहे.
भारतीय सेना, जगातील सर्वोत्तम सेंनांपैकी एक आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला ही सेना परतवून लावू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी पुण्यात साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर Know Your Army मेळाव्याचं उद्घघाटन करताना पुण्यात काल ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, खासदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमधील फरार असलेले संशयित आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बीड पोलिस दलाच्या विशेष पथकाने आज अटक केली. पुढील तपासासाठी आरोपींना सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणात एक लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचे केंद्र बनेल, असं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ठाण्यात आयोजित बिझनेस जत्रेचं उद्घघाटन केल्यानंतर काल ते बोलत होते. उद्योजकांचा पहिला मराठी मेळावा नाशिकमध्ये घेतला जाईल. त्याला उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग संपूर्ण सहकार्य करेल, असं उद्योगमंत्री सामंत म्हणाले. तत्कालीन सरकारने एअर बसच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
��नलाईन सेवा आणखी लोकाभिमुख कराव्यात, असं आवाहन राज्यसेवा हक्क आयोगाचे आयुक्त निवृत्त सनदी अधिकारी दिलीप शिंदे यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील राज्यसेवा हक्क आयोग अंतर्गत येणाऱ्या सेवांच्या संदर्भात आढावा बैठकीत काल ते बोलत होते. राज्यसेवा हक्क आयोगानं सेवांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीनं दिल्या जाव्यात. याकडे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ही यंत्रणा अधिक गतिशील करावी, नागरिकांना माहिती देण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात इ-पीएफओ च्या सदस्यांना आपलं निवृत्ती वेतन आता कोणत्याही बँकेतून काढता येणार आहे. इपीएफओ नं देशभरातल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत निवृत्ती वेतन प्रणाली सुरु केली आहे, त्यामुळे निवृत्तीवेतन सुरु झाल्यानंतर पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही आणि रक्कम लगेच खात्यात जमा होईल. देशभरातल्या ६८ लाखांहून अधिक निवृत्तीवेतन धारकांना याचा लाभ होणार आहे.
येत्या १५ दिवसांत राज्याचं वाळूधोरण तयार करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. याबाबतच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. गौण खनिजांबाबतचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आयोजित शिर्डी महोत्सवातील २५ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ याकालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तर या कालावधीत सुमारे १६ कोटी ६१ लाख रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावात भारताला चार धावांची आघाडी मिळाली आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या १८१ धावांत सर्वबाद झाला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी तीन तर कर्णधार जसप्रीत बुमराह आणि नितीशकुमार रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. दरम्यान, भारताचा दुसरा डाव सुरू झाला असून, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या २ बाद ४८ धावा झाल्या होत्या.
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान ८ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
आणि
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यातही भारताची कामगिरी निराशाजनक
****
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत झोपडीवासियांसाठी बांधलेल्या सदनिकांचं लोकार्पण, वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलत होते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचं शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणं विद्यार्थ्यांना शक्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी ��ात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं आदरांजलीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले –
या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रीयांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केली. ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून जगण्याकरता थांबवत होत्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरूद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली. आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं.
माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले –
स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी ��े स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेतून मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा परिसरात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसंच नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्यासह अनेक अधिकारी तसंच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. फेस ऑफ आंबेडकराइट मुव्हमेंट या सामाजिक संस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप करण्यात आलं.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी इथं कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा घेण्यात आला. जालना इथं गांधीचमन चौकात आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. लातूर इथं जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.उज्ज्वला पाटील यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
नांदेड इथं औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ‘दुष्काळ तिथे पाणी’ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्य���त पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
****
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचे आता उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते आज नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।
****
क्रिकेट
सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर यजमान संघानं एक बाद नऊ धावा केल्या असून, हा संघ १७६ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघाची कामगिरी निराशाजनक झाली. भारताचा पहिला डाव १८५ धावांवर संपुष्टात आला. ॠषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. रविंद्र जडेजानं २६, जसप्रित बुमराहनं २२, तर शुभमन गीलने २० धावा केल्या आहेत.
****
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुका निहाय मंजूर प्रकल्पासाठी जमीन उपलब्धतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. ज्या ठिकाणी प्रकल्प उभारणी शक्य नसेल, अशा ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले.
****
महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पोलिस दलाच्या कामकाज जाणून घेण्यासाठी नागरिकांनी तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहावं असं आवाहन रहाटकर यांनी केलं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने येत्या सहा जानेवारीला दर्पण दिनाचं औचित्य साधून प्रसारमाध्यमात कार्यरत १५१ जणांचा गौरव करण्यात येणार आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी ही माहिती दिली. मुद्रित, श्राव्य आणि दृक श्राव्य माध्यमात कार्यरत सर्वांचा याव��ळी गौरव केला जाणार असून यात महिला पत्रकारांसह छायाचित्रकारांचाही सहभाग असल्याचं नाईक यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील नांदूर इथल्या ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी आज जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्��ाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत हा चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण आहे. अंतराळ आणि सहकार्यासाठी ही मोहिम नवी दालनं खुली करणार आहेत. जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. या मोहिमेत इस्रोचे एच डी एच सी झिरो वन आणि एच डी एच सी झिरो - टू हे उपग्रह समाविष्ट असतील. या दोन्ही उपग्रहांचं वजन प्रत्येकी २२० किलो आहे. पीएसएलव्ही सी -16 द्वारे या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण केल्यानंतर त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४७० किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येणार आहे.
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर एक हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.
नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी ��ाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी उद्या ३१ डिसेंबरच्या रात्री खुले राहणार आहेत.
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीड इथं उद्या ३१ तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
बॉर्डर -गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर आटोपला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोल्डनं प्रत्येकी तीन बळी टिपले. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे. दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
किंग कप आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं कांस्य पदकाची कमाई केली. त्याने काल झालेल्या सामन्यात फ्रेंच बॅडमिंटनपटू ॲलेक्स लॅनियरवर २१ - १७, २१ - ११ असा विजय मिळवला.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या सामूहिक शक्तीचा जिवंत दस्तावेज मन की बात कार्यक्रमाच्या आतापर्यंत प्रसारीत ११६ भागांद्वारे निर्माण झाला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’च्या ११७व्या भागाद्वारे देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या काळातल्या संवादादरम्यान युवा नवोन्मेषकाच्या कल्पनांनी आपल्या प्रभावित केलं तर कधी यशानं गौरवान्वित केलं असं त्यांनी नमूद केलं. आपला भारत विविधतेत एकतेसह पुढे जात असून खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भारत नवीन शिखरं गाठत असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. आपण देशवासीयांनी एका कुटुंबाप्रमाणे मिळून प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि नवीन यश संपादन केलं आहे. देशभरात खेळ-तंदुरुस्तीबाबत विविध उपक्रम सुरु असून जनता तंदुरुस्तीला दिनचर्येचा भाग बनवत असल्याबद्दल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. काश्मीरमधल्या स्कीईंग पासून गुजरातमधील पतंग महोत्सवापर्यंत, सायकलचा रविवार तसंच सायकलचा मंगळवार या सारख्या अभियानातून सायकल चालवण्यास प्र���त्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले.
छत्तीसगडच्या बस्तर इथं आयोजित अनोख्या बस्तर ऑलिंपिकचा त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. खिलाडूवृत्ती समाजाला जोडण्याचं सशक्त माध्यम असल्यानं,आपल्या भागातील अशा क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देत हॅश टॅग : खेलेगा भारत - जीतेगा भारतद्वारे गुणवंत खेळाडूंच्या कथा सामायिक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतात वर्ष २०१५ पासून २०२३ दरम्यान मलेरिया रुग्ण आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसंच कर्करोगविरोधी लढाईत जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिक लान्सेटच्या अभ्यासानं देशात मोठी आशा निर्माण केली असून भारतात वेळेवर कर्करोगावरील उपचार सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, असं ते म्हणाले. यानुसार कर्करोग रुग्णावरील उपचार तीस दिवसांच्या आत सुरू होणं आवश्यक असल्यानं आयुष्मान भारत योजना पैशांचा हातभार लावून दिलासा देत असल्यानं महत्वपूर्ण ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं.
२०२५जवळ आलं असून या वर्षातही मन की बातच्या माध्यमातून आपण आणखी प्रेरणादायी प्रयत्न मांडू, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं येणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती ११ भारतीय भाषांत मिळणार असल्याचं सांगून यात सहभागी होत EktaKaMahaKumbh या हॅशटॅगसह सेल्फी टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं.
राज्यघटना लागू होण्यास येत्या २६ जानेवारीला ७५ वर्ष पूर्ण होत असून मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ असलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे असं म���दी म्हणाले. यापार्श्वभूमीवर constition75.com संकेतस्थळाद्वारे राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून तुमची ध्वनीचित्रफीतही टाकू शकता अशी महिती ही त्यांनी दिली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वयस्क महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते. अपघातातल्या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक ��त्त्वं जारी केली आहेत. धूळ नियंत्रित करण्यासाठी तातडीनं करायच्या उपाययोजना, बांधकामांच्या कामावर देखरेख, मलब्याचं व्यवस्थापन आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळांवरील वाहन वाहतुकीचं नियमन यांचा नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे. याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.
****
भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत, मेलबर्न इथं सध्या खेळल्या जात असलेल्या चौथ्या सामन्यात, आजच्या चौथ्या दिवस अखेर, ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात नऊ बाद २२८ धावा केल्या आहेत. याद्वारे ऑस्ट्रेलियानं एकूण ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. जसप्रति बुमराहनं पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करताना चार गडी बाद केले. मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करून त्याला योग्य साथ दिली. मार्नस लाबुशेनं सर्वाधिक ७० तर पॅट कमीन्सनं ४१ धावा केल्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था सहा बाद ९१ असताना सोबत येत धावसंख्येला आकार दिला.
****
नवीन नांदेडमधील कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकानं शनिवारी ही कारवाई केली. या बांगलादेशी नागरिकाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन जणांना हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
नवीन वर्षाच्या आरंभावेळी संतनगरी शेगाव इथं होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. संत श्री गजानन महाराज संस्थान मधील श्रींचं समाधी स्थळ, आणि मंदिरातील सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार असल्याचं मंदिर संस्थानतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. ९२ वर्षीय डॉ मनमोहनसिंग यांचं काल रात्री निधन झालं. देशसेवेसाठी, निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन त्यांनी मिळवलेलं यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले… एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में,और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में, उन्हे हमेशा याद किया जाएगा। एक अर्थशास्त्री के रूप में उन्होने अलग अलग स्तर पर भारत सरकार में अनेक सेवाए दी। एक चुनौती पूर्ण समय में उन्होने, रिझर्व बँक के गव्हर्नर की भूमिका निभाई। पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्तमंत्री रहते हुए उन्होने वित्तीय संकट से घिरे देश को एक नयी अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. ���श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी डॉ मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं देशानं एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
डॉ. मनमोहनसिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळं देशानं जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू आणि विद्वान व्यक्तिमत्व गमावले, असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
पंतप��रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल प्रगतीच्या ४५ व्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत आठ महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यात विविध राज्यांतील शहरी वाहतुकीचे सहा मेट्रो प्रकल्प आणि रस्ते जोडणी आणि औष्णिक उर्जेशी संबंधित प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
क्रिकेट- महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय वेस्ट इंडिज संघानं घेतला होता. अवघ्या १६२ धावांवर वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला. भारताकडून दीप्ती शर्मानं ३० धावा देत ६ बळी टिपले तर रेणूका सिंगने ४ खेळाडू बाद केले. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने जिंकत भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा भारताच्या पाच बाद १६४ धावा झाल्या आहेत.
0 notes