Tumgik
#सुवर्णपदकासाठी
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत तीन हजार १०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न
राज्यात नऊ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदकासाठी आज लढत
****
समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या तीन हजार १०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईत काल विशेष शिक्षक पदनिर्मिती, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. राज्यातल्या केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना देखील यावेळी करण्यात आली.
****
बांगलादेशातल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. मंत्रालयानं विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. यासाठी या विद्यार्थ्यांची यादी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली असून, तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, तसंच केंद्रीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनानं एक पथक स्थापन केलं आहे. बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून, या आव्हानात्मक काळात राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांबरोबर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात नऊ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे अभियान सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरं केलं जाणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या या अभियानाचं हे तिसरं वर्ष आहे. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, असे विविध उपक्रम राबवण्याबाबत केंद्र सरकारनं सूचना दिल्या आहेत. या अभियानासाठी नागरिकांना शासनाकडून राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात ते कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांच्यासह आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आदी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सेवा हमी कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन येत्या १५ ऑगस्टला करण्यात येणार असून, यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हा पथदर्शी प्रकल्प प्रथम कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात राबवण्याची सूचनाही देसाई यांनी केली.
****
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले राज्याच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे यांनी काल जालना इथल्या नवीन मोंढातल्या रेशीम कोष बाजारपेठेची पाहणी केली. रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बाजारपेठेतल्या सुविधांबाबत त्यानी समाधान व्यक्त केलं. रेशीम कोष निर्मितीसाठी मिळणारं अनुदान, चॉकी सेंटर, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, रेशीम शेतीसोबत घेता येणारं आंतरपिक, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सर्वात जवळची रेशीम बाजारपेठ, रेशीम उत्पादनासह बाजारपेठेत विक्रस आलेल्या मोसंबी फळाची सविस्तर माहिती जाणून घेत योग्य त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा गावात पूलवजा बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातली कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश, जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गतच्या कामांचा सत्तार यांनी काल मंत्रालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या भागात विविध योजनांसाठीच्या निविदा तातडीने काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारत भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं इतिहास घडवला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. विनेशची अंतिम फेरीची लढत आज अमेरिकेच्या सारा एन हिल्डेब्रांट हिच्याशी होणार आहे. महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची आज जर्मनीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.
भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली. काल झालेल्या पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात सर्वाधिक ८९ पूर्णांक ३४ दशांश मीटर लांबवर भाला फेकून पहिलं स्थान निश्चित केलं. भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी उद्या आठ ऑगस्टला होणार आहे.
हॉकीमध्ये उपान्त्य फेरीत भारतीय संघाला जर्मनीकडून तीन - दोन असा पराभव पत्करावा लागला. आता कांस्यपदकासाठी भारताचा सामना स्पेन बरोबर होणार आहे. पुरुष टेबल टेनिस मध्ये उपांत्यपूर्व फेरीत काल भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज क��लंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत श्रीलंका एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसरासाठी देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ वेदकुमार वेदालंकार यांना जाहीर झाला आहे. कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी काल ही माहिती दिली. येत्या १६ ऑगस्ट ला धाराशिव उपपरिसराच्या विसाव्या वर्धापनदिनी वेदालंकार यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं काल सायंकाळी धाराशिवहून लातूर इथं आगमन झालं. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरी काढून तसंच जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. राज ठाकरे हे दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी बैठक घेणार आहेत.
****
नांदेड शहराजवळील झरी इथल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा काल बुडून मृत्यू झाला. शहरातले पाच जण या खाणीत पोहण्यासाठी उतरले होते, त्यापैकी तिघांना पोहता येत नव्हतं, यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीनं चारही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रातल्या ११९ जवानांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्राचार्य अमिरूल हसन अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वेगवेगळ्या गटातल्या जवानांचा सन्मान करण्यात आला.
****
बीड इथं शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी काल नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केलं. शहरातल्या नागरिकांच्या मुलभूत सुविधा आणि समस्या सोडवण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरतं असल्यानं, हे आंदोलन करण्यात आलं. शिवसंग्रामच्या ज्येष्ठ नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नीता अंधारे यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं.
****
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त, छत्रपती संभाजीनगर शहरात एन आठ भागातल्या महानगरपालिका रुग्णालयात काल जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अर्चना राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवण्यात आला. आज या सप्ताहाचा समारोप होत आहे.
****
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातल्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून सध्या १५ हजार २७४ घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १ हजार ५०३ फुटांवर पोहोचली असून, उपयुक्त पाणी साठा २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या ५७ हजार ३१७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
IND W vs AUS W CWG 2022: सुवर्णपदकासाठी रंगणार अंतिम झुंज; राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक
IND W vs AUS W CWG 2022: सुवर्णपदकासाठी रंगणार अंतिम झुंज; राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक
IND W vs AUS W CWG 2022: सुवर्णपदकासाठी रंगणार अंतिम झुंज; राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक IND W vs AUS W Possible Playing 11: भारताची सलामीची जोडी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बर्मिंगहॅममध्ये २२वी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघाने पहिल्याच वर्षी अंतिम फेरीत धडक मारून…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
CWG 2022, महिला क्रिकेट फायनल, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: लाइव्ह टेलिकास्ट, लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे? | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022, महिला क्रिकेट फायनल, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: लाइव्ह टेलिकास्ट, लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे? | राष्ट्रकुल खेळ बातम्या
हरमनप्रीत कौरचा फाइल फोटो© एएफपी भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताना सुवर्णपदकासाठी झुंज देईल. द हरमनप्रीत कौर-नेतृत्वाची बाजू घेईल मेग लॅनिंगच्या शिखर सामन्यात ऑस्ट्रेलिया. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. भारताने शेवटच्या काही षटकांमध्ये इंग्लंडला मागे टाकण्यासाठी आपली मने राखली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस पंचकुला, (क्रीडा प्रतिनिधी) : चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी जोरदार लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Khelo India | लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक ; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
#KheloIndia | लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक ; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत #UmeedSeYakeenTak #KIYG2021 #Maharashtra #Tennis #Sports
Khelo India | खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस Khelo India | पंचकुला, ११ (क्रीडा प्रतिनिधी) – चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी जोरदार लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
पंचकुला, ११ (क्रीडा प्रतिनिधी) – चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी जोरदार लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यातल्या दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावं, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी गठीत विशेष कृतीदलाच्या बैठकीत पुणे इथं ते बोलत होते. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सराव प्रात्यक्षिकात आढळलेल्या त्रुटींचं तत्काळ निराकरण करावं. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावं, अशा सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिल्या.
***
गेल्या २४ तासात देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे १० हजार ११२ नवे रुग्ण आढळले. आणि ९ हजार ८३३ रुग्ण या आजारातून बरे झाले. सध्या देशात ६७ हजार ८०६ कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आणि रुग्ण बरे होण्याचा देशातला दर ९८ पूर्णांक ६६ दशांश टक्के आहे.
***
मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासप्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी येत्या १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणासंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. राज्य शासनाचा क्युरेटिव्ह पिटीशन - सुधारणा याचिका दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय हा वेळकाढूपणा असल्याचा सूर या बैठकीतून निघाला. कोणीही राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला छत्रपती संभाजीनगर इथं येण्यास भाग पाडावं, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
***
सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या जवळ असलेल्या कागद कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
***
छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
***
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, उद्या सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारत राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश करणार असल्याचं, या पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
***
इंडियन प्रीमिअर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे, दुपारी साडे तीन वाजता बंगळुरु इथल्या के एम चिन्नास्वामी मैदानावर सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतला अन्य सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जाईल.
***
तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत आज तिसऱ्या सुवर्णपदकासाठी पुरुष रिकर्व गटात भारत आणि चीन यांच्यात लढत होणार आहे. भारतीय संघात अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तरुणदीप राय या नेमबाजांचा समावेश आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार थोड्या वेळात म्हणजे दुपारी १ वाजून १० मिनिटांनी या लढतीची सुरुवात होईल. पुरुष रिकर्व एकल स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत भारताचा धीरज बोम्मादेवरा आणि मोल्दोवाचा डॅन ओलारु यांच्यात सामना होणार असून संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
***
नांदेड रेल्वे विभागातील आदिलाबाद इथून सुटणारी रेल्वेगाडी आदिलाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत दादर पर्यंतच धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्नानकावर काही दिवस घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉक मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
//************//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Asian Championship: दीपक पुनियाला पुन्हा अंतिम फेरीत पराभव, रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, भारताने जिंकली 17 पदके
Asian Championship: दीपक पुनियाला पुन्हा अंतिम फेरीत पराभव, रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, भारताने जिंकली 17 पदके
Asian Championship: दीपक पुनियाला पुन्हा अंतिम फेरीत पराभव, रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, भारताने जिंकली 17 पदके कझाकस्तानच्या अजमत दौलतबेकोव्हच्या भक्कम बचावाला पराभूत करण्यात दीपक पुनिया अपयशी ठरला कारण त्याने रविवारी येथे आशियाई कुस्ती स्पर्धेच्या अंतिम दिवशी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर विकी चाहरने फ्रीस्टाइल 92 किलो गटात कांस्यपदक जिंकले. खंडीय स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 February 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा. **** पालकांनी दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या युवकांना घरी परत बोलवावं, असं आवाहन लष्करानं काश्मीरमधील परिस्थितीच्या पार्श्र्वभूमीवर आज केलं. जे हातात बंदूक घेतील, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही लष्करातर्फे देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शंभर तासात तो हल्ला करणाऱ्या जैश - ए - मोहम्मदच्या कमांडरला काल ठार मारण्यात आलं. लेफ्टनंट जनरल के. एस. धिल्लन यांनी आज श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. पाकिस्तानमधील गुप्तचर संघटना ISI, जैश - ए- मोहम्मद संघटना चालवत असल्याचं धिल्लन यावेळी म्हणाले. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. तत्पूर्वी त्यांनी डिझेल लोकोमोटीव कारख्यान्यात डीझेल मधून परावर्तित केलेल्या पहिल्या विद्युत रेल्वे इंजिनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. गुरु रविदास यांचं जन्मस्थळ असलेल्या वाराणसी मधल्या शीर गोवर्धनपूर इथं भेट देऊन पंतप्रधानांनी, त्यांना अभिवादन केलं. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये जन आरोग्य योजना -आयुष्मानच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान काही वेळात संवाद साधणार आहेत. **** लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा उद्या नांदेड इथं आयोजित करण्यात आली आहे. या सभेला काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. **** उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्या अटकेला दिल��ल्या स्थगितीची मुदत राजस्थान उच्च न्यायालयानं वाढवली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयानं वाड्रा यांना दिले आहेत. वाड्रा यांच्याशी संबंधित एका कंपनी विरोधातल्या कथित आर्थिक गैरव्यवहारीच्या तक्रारी संदर्भात त्यांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी १५ मार्चला होणार आहे. **** रिझर्व्ह बँक, ३१ डिसेंबर २०१८ ला संपलेल्या सहामाहीसाठी २८ हजार कोटी रुपयांचा लाभांश केंद्र सरकारकडे हस्तांतरित करणार आहे. मर्यादित लेखापरीक्षण आढाव्याच्या आधारे, आणि सध्याच्या आर्थिक भांडवली चौकटीत हा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे. बँकेच्या मंडळाच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. **** छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु रविदास यांची जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी शिवाजी महाराज आणि गुरु रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. **** बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये उद्यापासून येत्या एक मार्चपर्यंत “दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान” राबवण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगांना ओळखपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. इच्छूक दिव्यांग व्यक्तींनी वैद्यकीय प्रमाणपत्र, छायाचित्र आणि आवश्यक ती कागदपत्रं घेऊन यावीत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. **** पुण्यातील डीएसके गृहप्रकल्प उद्योगाचे प्रमुख दीपक कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, आणि मुलगा शिरीष यांच्याविरुद्ध कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागानं आरोपपत्र दाखल केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ३५० गुंतवणूकदारांची सुमारे २० कोटी रुपये फसवणूक गृह प्रकल्पाच्या माध्यमातून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. डीएसकेच्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या शंभर कोटी रुपयांच्या सहा मालमत्ता पोलिसांनी यापूर्वीच जप्त केल्या आहेत. **** बल्गेरियात सोफिया इथं सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत, आज, पुरुष गटात भारताचा अमित पंघाल, तसंच महिला गटात निखात झरीन, मंजू राणी, आणि मीना कुमारी देवी यांच्या सुवर्णपदकासाठी लढती होतील. अंतिम सामन्यात अमितची गाठ कझाकस्तानच्या तोमिर्तास झुस्सुपोव्हशी पडणार आहे. निखातचा सामना फिलिपाईन्सच्या मँगो आयरिशशी, राणीचा मुकाबला फिलिपिन्सच्या जॅबुको जोसेशी, तर देवीची लढत फिलिपाईन्सच्याच विलेगास आयराशी होणार आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23  December 2018 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.०० **** रस्ते आणि सिंचनाच्या प्रश्नावर गेली चार वर्षे राज्य आणि केंद्र सरकार काम करत असून हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सातारा इथं आज खंबाटकी घाटातल्या एस वळण परिसरात नियोजित बोगदा तसंच सुमारे एक हजार कोटी खर्चाच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन मुख्यमंत्री आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ते बंगळुरु हा इकोनॉमिक कॉरिडॉर असून, त्याच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प हाती घेतला असल्याचं ते म्हणाले. **** मुंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासमा यांचं आज निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं. भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांचे ते वडील होत. चुडासमा यांनी केलेल्या समाजकार्यासाठी २००५ साली भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात, चुडासमा यांच्या निधनानं मुंबईच्या सामाजिक - सांस्कृतिक विकासाचा ध्यास असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली. **** मुंबईत गोरेगाव इथल्या मोतीलाल नगर मध्ये आज सकाळी दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. **** देशात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. गोंदिया इथं आज आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ते बोलत होते. गोंदिया इथं उभारण्यात आलेल्या रिलायन्स कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झालं. **** समाजात प्रबोधन आणि परिवर्तन करायचं असेल, तर साहित्याशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून लातूर जिल्ह्यात उदगीर इथं प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यक ऋषीकेश कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते, परवा २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, विविध विषयांवरचे परिसंवाद होणार आहेत. **** नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत १८ पैकी नऊ जागांचे निकाल हाती आले. यात भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीच्या पॅनलनं सहा, तर काँग्रेसनं दोन जिंकल्या आहेत. **** जालना इथं सुरू असलेल्या ६२व्या महाराष्ट्र अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. आज ९२ किलो वजनी माती गटात हिंगोलीच्या ज्ञानेश्वर गादेकरनं तर ६५ किलो वजनी गादी गटात पुण्याच्या सागर लोखंडेनं कांस्य पदकांची कमाई केली. आज सायंकाळी ६५ किलो वजनी गादी विभागातून कोल्हापूरचा सोणबा गोंगाने विरूद्ध कोल्हापूरच्या मानिक कारंडे, माती विभागात पुण्याच्या सूरज कोकाटे विरुध्द सोलापूरच्या सूर्यकांत रुपनकर यांच्यात सुवर्णपदकासाठी अंतिम लढत होणार आहे. ९२ किलो गादी गटात कोल्हापूरचा सिकंदर शेख विरुध्द पुण्याच्या अक्षय भोसले आणि माती विभागात मुंबईचा सुहास गोगडे व नांदेडच्या अनिल जाधव यांच्यात अंतिम लढत होईल. या लढतीनंतर पुण्याचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफिक शेख यांच्यात महाराष्ट्र केसरीच्या किताबाची अंतिम लढत होणार आहे. **** उस्मानाबाद इथं आज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा तीन विभागातून ही स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शेकडो धावपटू सहभागी झाले होते. **** बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं आज अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार आणि गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी शिबिरातल्या विविध कक्षांना भेट देऊन औषधी साठा, पुरवठा, रुग्णांची तपासणी आदींची माहिती घेतली. **** महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयातर्फे औरंगाबाद शहरातल्या विवेकानंद महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे. एक जानेवारी ते १० जानेवारी या काळात दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत होणाऱ्या या वर्गात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. **** विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली असून, राज्यात उर्वरित भागात तापमान सरासरी आहे. आज सर्वात कमी सात अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. नाशिक ११ पूर्णांक दोन, औरंगाबाद आणि परभणी सरासरी १२, तर उस्मानाबाद इथं १४ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ***** ***
0 notes