#सुवर्णपदक
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या बारा हजार एकशे कोटी रुपयांच्या पंचवीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी करण्यात आली. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध योजनांचा समावेश आहे. दरभंगा इथल्या नियोजित, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सची कोनशीलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहारमधल्या विविध रेल्वेस्थानकांबरोबरच देशातल्या १८ रेल्वेस्थानकांवरील जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आपलं सरकार जनतेच्या सेवेसाठी प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन करत, भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं प्रगति करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
नागरिकांची संपत्ती उध्वस्त करून त्यांच्यावरचे आरोप ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आरोपी व्यक्तींविरोधात होणा-या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की नोटिस न बजावता होणा-या अशा प्रकारच्या कार्यवाहीला मनमानीपणा समजलं जाईल. देशभरातल्या अशा प्रकारच्या संपत्तींच्या अनधिकृत विध्वंसाला रोखण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेव��� सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्याबाबत अजित पवार गटाला न्यायालयानं गेल्या आठवड्यात सूचना केल्या आहेत.
****
झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २९ पूर्णांक ३१ टक्के मतदान झाल्याचं, निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदार संघ आणि १० राज्यातल्या विधानसभांच्या काही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेआधीच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान सुरळीत सुरु आहे. सर्व मतदानकेंद्रावर वेबकास्टींग करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत गृह मतदान पथक कार्यरत राहणार आहे. ४२५ मतदार गृहमतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. यात ७७ दिव्यांग आणि उर्वरीत ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार आहे.
जळगाव जिल्ह्यातही सर्व ११ मतदार संघात आज गृहमतदान सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोंडाईचा इथं सभा सुरु आहे. त्यानंतर शहा यांची जळगाव आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं सभा होणार आहे.
भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर आणि नागपूर इथं सभा होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपनेते योगी आदित्यनाथ वाशिम आणि ठाणे इथं प्रचारसभा घेणार आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध रीतीनं राहणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नाखरे काळाकोंड तालुक्यात चिरेखानी भागात गेल्या सहा महिन्यांपासून राहणा-या या घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. या तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम ते रामगुंडम मार्गावर मालवाहू रेल्वे रुळावरुन घसरली आहे. त्यामुळं या ��ार्गावरील बहुतांश रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबाद-तिरुपती, तिरुपती-सिकंदराबाद, अदिलाबाद-परळी, अकोला -पूर्णा, अदिलाबाद-नांदेड या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
****
पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये पॅरिस पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा दहा मीटर एअर रायफल आणि दहा मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधूनं राऊंड सिक्सटीमध्ये प्रवेश केला आहे. तिनं थायलंडच्या खेळाडूवर अवघ्या 38 मिनिटांत 21-12, 21-8 असा विजय मिळवला. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे.
****
0 notes
Text
वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या कोमल वाकळेला सुवर्णपदक
https://bharatlive.news/?p=180787 वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या कोमल वाकळेला सुवर्णपदक
पणजी; ...
0 notes
Text
Asian Games 2023 : 19 व्या आशिया क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकं आली, पण त्यात एकही सुवर्णपदक नव्हतं. त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पाहायला मिळाली. माञ, आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आशिया गेम्समधील भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णकामगिरीनं झाल्यामुळे हि 'सुवर्ण, बातमी भारतीयांसाठी अभिमानाची आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार या त्रिकुटानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. रोइंगमध्येही भारतानं कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे आशिया गेम्समधील एकुण पदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.
0 notes
Text
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवले पंचकुला, (क्रीडा प्रतिनिधी) : टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-�� अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी…
View On WordPress
0 notes
Text
नीरज चोप्राने ४ दिवसांत दुसऱ्यांदा विश्वविजेत्याला हरवले, ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकाचे लक्ष्य केले.
नीरज चोप्राने ४ दिवसांत दुसऱ्यांदा विश्वविजेत्याला हरवले, ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकाचे लक्ष्य केले.
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने चार दिवसांत दुसऱ्यांदा ग्रेनेडाच्या विद्यमान विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सवर मात केली. शनिवार, 18 जून 2022 रोजी फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये भालाफेक स्पर्धेत त्याने हंगामातील पहिले सुवर्णपदक जिंकले. 24 वर्षीय नीरजने 86.69 मीटरच्या प्रयत्नाने पदक जिंकले. ३० जून रोजी स्टॉकहोम येथे होणाऱ्या डायमंड लीगपूर्वी या विजयामुळे त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. नीरज चोप्राने…
View On WordPress
#कुर्तन गेम्स 2022#कोर्टाने गेम्स 2022#नीरज चोप्रा#नीरज चोप्रा कुओर्तने खेळ#नीरज चोप्रा कोर्टाने गेम्स#नीरज चोप्रा गोल्ड#नीरज चोप्रा सुवर्ण#नीरज चोप्रा सुवर्णपदक#भाला फेकणारा#भाला फेकणे
0 notes
Text
नीरज चोप्राने पुन्हा एकदा तिरंगा फडकावला, फिनलंडमध्ये 86.69 मीटर अंतरावर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले
नीरज चोप्राने पुन्हा एकदा तिरंगा फडकावला, फिनलंडमध्ये 86.69 मीटर अंतरावर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले
नीरज चोप्रा सुवर्णपदक कुओर्तने खेळ भालाफेक: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा कमाल दाखवल��. फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरजने शनिवारी येथे ८६.६९ मीटर विक्रमी भालाफेक केली. विशेष म्हणजे त्याची बरोबरी कोणीच करू शकले नाही. नुकताच नीरजने राष्ट्रीय विक्रम केला होता. भारताचा स्टार नीरजने पहिल्यांदाच ८६.६९ मीटर भालाफेक केली, त्यानंतर…
View On WordPress
#नीरज चोप्रा#नीरज चोप्रा फिनलंड सुवर्णपदक#नीरज चोप्रा भालाफेक#नीरज चोप्रा सुवर्णपदक#नीरज चोप्रा सुवर्णपदक फिनलँड#फिनलंड#भारत
0 notes
Video
instagram
याला म्हणतात विश्वास. भाला फेकल्यानंतर तो निश्चितस्थळी पोचण्याआधी साजरा केला जल्लोष. भारताला अजून एक सुवर्णपदक. अभिनंदन नीरज चोप्रा #olympics #olympics2021 #instapic #tokyo2020 #tokyoolympics (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CSRq7Biq-2o/?utm_medium=tumblr
1 note
·
View note
Text
धावपटू हिमा दासन कोरल पाचव्या सुवर्णपदावर नाव
धावपटू हिमा दासन कोरल पाचव्या सुवर्णपदावर नाव
भारताची युवा धावपटू हिमा दास हिची सध्या सोनेरी दौड सुरू आहे. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या महिनाभरातील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे.
झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत अव्वलस्थानी राहत पूर्ण केली. हिमा हिने 52.09 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
कर्करोग मूनशॉट उपक्रमाला भारताची मदत, भारत-अमेरिकेदरम्यान सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध उपक्रमांचं आयोजन
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज नांदेड आणि लातूर इथं सकल मराठा समाजाकडून बंदचं आवाहन
बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच पटकावलं सुवर्णपदक
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत
एक - शून्यनं आघाडी
सविस्तर बातम्या
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते काल बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उपस्थितीत भारत-अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला. नवीन सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार, लष्करी आयुधं आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून,या प्रकल्पामुळे भारत चीप निर्मिती करणारा देश ठरेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या प्रकल्पांमध्ये नोकरीसाठी भूमीपूत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबई इथं आयोजित कोळी भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी बोलत होते. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झालं असून, सरकारने प्रकल्पांना चालना दिली, तसंच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असं शिंदे म्हणाले. "वाढवण" बंदराच्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देशातलं सर्वात मोठं पॅकेज देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद��र फडणवीस यावेळी म्हणाले.
***
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना काल नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्या, अशी मागणी केली आहे.
****
राज्यात सध्या विरोधी पक्षांकडून रिन्यू पॉवर लिमिटेड हा उद्योग प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा दावा करणारं वक्तव्य राज्याची प्रतिमा मालिन करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोणतेही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. रीन्यू कंपनीने देखील विरोधी पक्षांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये काल स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली.
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या ��हयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए सरकारनं तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात सरकारनं, पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत करून, पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. शहरात झाडांचं प्रमाण वाढविण्यासाठी, नगर व्हॅनलाही सरकारनं मंजुरी दिली आहे.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात काल सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर आणि नांदेड जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी काल धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण प्रक��णी कुणबी नोंदी ��ाबत तसंच हैदराबाद गॅझेटीयरसह उपलब्ध झालेल्या इतर अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत जेष्ठ कायदे सल्लागार आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी आग्रही विनंती तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. या कागदपत्रांच्या अनुषंगानं पुढच्या आठवड्यात धाराशिवच्या जिल्हाधिका-यांसोबतही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने खुल्या आणि महिला गटात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैजानविरुद्धच्या सामन्यांत दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर. अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनाविर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिल्याचं ते यावेळी म्हणाले. उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या विविध रस्ते कामांचं भूमिपूजनही बनसोडे यांच्या हस्ते काल झालं.
****
नांदेड इथं श्रीकर प्रतिष्ठानच्या वतीने दि. मा. देशमुख लिखित गंध मातीचा, शब्द हुंकार, आणि शब्दवेध या तीन कविता संग्रहांचं प्रकाशन काल ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात प्रमुख सम��क्षक तसंच वक्ते म्हणून संत साहित्याचे अभ्यासक, लेखक ड��. मार्तंड कुलकर्णी हे होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नगरीकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढचे पाच दिवस हाज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Text
अश्विन, दर्पण आणि सौंदर्य त्रिकुटाला पॅरा बुद्धिबळमध्ये सुवर्णपदक
https://bharatlive.news/?p=180300 अश्विन, दर्पण आणि सौंदर्य त्रिकुटाला पॅरा बुद्धिबळमध्ये ...
0 notes
Photo
ओळखू शकाल यांना ? राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते,कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी आपल्या ह्यातील अनेक नामवंत मल्ल घडवले.
Can you recognize them? National Gold Medal Winner, the son of kolhapur district, who made many famous malla in his name.
4 notes
·
View notes
Text
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस पंचकुला, (क्रीडा प्रतिनिधी) : चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी जोरदार लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या…
View On WordPress
0 notes
Text
लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये सुवर्णपदक जिंकले
लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये सुवर्णपदक जिंकले
टोकियो ऑलिम्पियन लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमधील चानिया येथे व्हेनेझुएला-चानिया २०२२ अॅथलेटिक्स मीटमध्ये ७.९५ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. रविवारी झालेल्या या स्पर्धेत फ्रान्सच्या ज्युल्स पोमेरी (7.73 मी) आणि एरव्हान कॉन्टे (7.71 मी) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. श्रीशंकर यांचे नाव 8. राष्ट्रीय विक्रम 36 मीटर आहे. गेल्या महिन्यात 8.36 मीटर उडी मारून राष्ट्रीय विक्रम…
View On WordPress
0 notes
Text
पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने 89.30 मीटर अंतर कापून त्याचा राष्ट्रीय विक्रम मोडला
पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने 89.30 मीटर अंतर कापून त्याचा राष्ट्रीय विक्रम मोडला
पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्रा: भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने 89.30 मीटर फेक करून ही कामगिरी केली. यादरम्यान त्याला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे सेट केलेला 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. पावो नुर्मी गेम्स फिनलंडमधील टॉप ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटपैकी…
View On WordPress
#टोकियो ऑलिम्पिक#नीरज चोप्रा#नीरज चोप्रा ताज्या बातम्या#नीरज चोप्रा पावो नर्मी#नीरज चोप्रा पावो नुर्मी#नीरज चोप्राचा राष्ट्रीय विक्रम#पावो नुर्मी खेळ#पावो नुर्मी गेम्स नीरज चोप्रा#फिनलंड#फिनलंडमधील पावो नुरमी खेळ#फिनलंडमधील पावो नूरमी खेळ#भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा#राष्ट्रीय विक्रम
0 notes