#राष्ट्रकुल
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी
एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी चालक आणि वाहकांना रोख प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय
श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ
आणि
****
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर इथला दर्शन मंडप तसंच दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. या सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गूणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. नाशिक जिल्ह्यात भगूर इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क, जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थान विकास आराखडा, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथं संत गाडगेबाबा कर्मभूमी ऋणमोचन विकास आराखडा, बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र गहिनीनाथगड विकास आराखडा, दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या मूळगावी सातारा जिल्ह्यात केंडबे इथं स्मारक उभारण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सर्व कामांसाठी निधीच्या तरतुदीलाही शिखर बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पालाही या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
****
नवी मुंबई आंतररा��्ट्रीय विमानतळाच्या एका धावपट्टीवर ५ ऑक्टोबर ���ोजी भारतीय वायू दलाचं एक विमान उतरवणं हे सिडकोचं उद्दिष्ट आहे. विमानाच्या भू अवतरणाचा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, त्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार असल्याचं, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. शिरसाट यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली, त्यानंतर ते सिडको भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळ उभारणीचं काम अत्यंत समाधानकारक पद्धतीनं सुरू असून, वायू दलाचं विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मार्च महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहतुक सुरू करण्याचा तर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचं आज नागपूर इथं आगमन झालं, रेशीमबाग इथं सुरेश भट सभागृहात त्यांची भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठक होत आहे. दरम्यान अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरं राबवण्यास सुरुवात झाली आहे. या शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आजारांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशनकडून पुढाकार घेण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांत मणक्याशी संबंधित आजाराचं निदान झालेल्या रुग्णांवर त्या त्या जिल्ह्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं, स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त आणि मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितलं आहे.
****
शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती बरोबरच भारताला समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक महत्त्वाचं ठरत असल्याचं, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत इथं राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या १० व्या परिषदेत बोलत होते. लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद “शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर घेण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरणाचा वेग असलेलं राज्य असल्याने सार्वजनिक वाहतुकीचे विस्तारते जाळे, इलेक्ट्रिक वाहने, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प या मुद्यांकडे नार्वेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचं लक्ष वेधलं.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणारे चालक आणि वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.
****
येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली.
****
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ झाला. आज सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. तत्पूर्वी सेवेकरी पलंगे कुटुंबियांनी मंचकी निद्रेसाठी चांदीचा पलंग स्वच्छ केला. तर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला. दरम्यान, नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपवून ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पहाटे देवी तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होईल. त्याच दिवसापासून शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल.
****
सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यां���्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. एकात्मिक पर्यटन विकास आराखडा आणि प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन, रस्ते कामांचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, यंदा साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. आगामी सण, आणि राज्य विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, ऊस गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या या स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने मानवी साखळी करत विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे ��पायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड, राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालिका डॉ. सोनाली क्षीरसागर, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर आणि कर्मचारी उपस्थित होते. मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारण्याच्या या उपक्रमात तेराशे विद्यार्थी सहभागी झाले.
****
माजीमंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी आज लातूर इथल्या बार्शी रोडवरील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देत छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण आणि मानव विकास, संशोधन संस्था कार्यालय आणि वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकामांची पाहणी केली. काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
****
परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातही आज पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, उद्याही मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केला आहे. या दोन दिवसांदरम्यान सोयाबीन काढणी करतांना पावसामुळे पिकांचं नुकसान होणार नाही, याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी, तसंच पशुधन सुरक्षित स्थळी बांधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण ९० टक्क्यांहून अधिक भरलं आहे. आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येईल असं पाटबंधारे विभागाचे धनेगाव इथले शाखा अधिकारी सुरज निकम यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही साडे ९९ टक्क्यांहून अधिक भरलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचाही समावेश आहे. रुपेश मडावी हा गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील रहिवासी होता. गडचिरोली जिल्ह्यात त्याच्याविरोधात हत्या आणि जाळपोळीसह ६६ गुन्हे दाखल होते. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात तेर इथं हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तेर इथल्या त्रिविक्रम मंदिरापासून हेरिटेज वॉकची सुरुवात होणार आहे. तेर प���िसराचा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना माहिती व्हावा, आणि जिल्ह्यात पर्यटन वृद्धी व्हावी, या हेतूने पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने हा वॉक घेण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं तहसील कार्यालयात आज दोन जणांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे आणि वसंत बनसोड या दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं, फुलंब्री पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात हे आंदोलन करण्यात आल्याचं वृत्त आहे.
****
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत आज सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि सायकल प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
0 notes
Text
सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
नागपूर, दि. 15 : जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता संविधानाने सर्व अधिकार लोकांना दिले आहेत. त्यामुळे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडवण्यात तरुणांनी पुढाकार घेऊन याकामी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रकुल संसदीय मंडळ अभ्यासवर्ग : “विविध संसदीय आयुधे, विधिमंडळ समिती व अर्थविषयक समिती कामकाज”
नागपूर, दि. 12 : संसदीय लोकशाहीने लोकप्रतिनिधींना विविध आयुधे दिली आहेत. या आयुधांचा वापर लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करतात. या आयुधांचा विधिमंडळाच्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून प्रभावीपणे वापर होतो, असे प्रतिपादन आमदार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात आज “विविध संसदीय आयुधे, विधिमंडळ समिती व अर्थविषयक समिती कामकाज” या विषयावर…
View On WordPress
0 notes
Text
झिरवाळ यांचा जपान दौऱ्यातला स्वेटर खरेदीचा किस्सा
https://bharatlive.news/?p=92424 झिरवाळ यांचा जपान दौऱ्यातला स्वेटर खरेदीचा किस्सा
राष्ट्रकुल संसदीय ...
0 notes
Text
CWG 2022 च्या उत्सवादरम्यान, बादलीतून दूध पिताना मुलाचा फोटो व्हायरल, लोक म्हणाले - नक्की सोने आणू
CWG 2022 च्या उत्सवादरम्यान, बादलीतून दूध पिताना मुलाचा फोटो व्हायरल, लोक म्हणाले – नक्की सोने आण���
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा समारोप झाला आहे. भारताने २२ सुवर्णांसह एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. दरम्यान, एका मुलाचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याला लोक मेडलवीर म्हणत आहेत. आयएएस अवनीश शरणने हा फोटो शेअर करत लिहिले – गोल्ड मेडलची तयारी प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 संपले आहे. यावेळी भारतीय खेळाडूंनी पदकांचा वर्षाव केला. ज्या खेळांची…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जोरदार तयारी करणाऱ्या बजरंगने सांगितले प्रशिक्षण आणि फिटनेसबाबत ही खास गोष्ट
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जोरदार तयारी करणाऱ्या बजरंगने सांगितले प्रशिक्षण आणि फिटनेसबाबत ही खास गोष्ट
बजरंग पुनिया कुस्तीपटू कॉमनवेल्थ गेम्स: बजरंग पुनिया हा भारतातील स्टार कुस्तीपटूंपैकी एक आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता ते कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीत व्यस्त आहेत. बजरंग त्याच्या फिटनेस आणि ट्रेनिंगवर पूर्ण लक्ष देत आहे. बजरंगने शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, तो मिशिगन विद्यापीठातील काही सर्वोत्तम कुस्तीपटूंसोबत खेळणार आहे. तेथे…
View On WordPress
#जागतिक कुस्ती स्पर्धा#बजरंग पुनिया#बजरंग पुनिया कॉमनवेल्थ गेम्स#भारत#भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया#राष्ट्रकुल खेळ
0 notes
Text
भारताकडून राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता
भारताकडून राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता
बर्मिंघहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. या स्पर्धेत नेमबाजीला स्थान न दिल्याने भारताने या हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी स्पर्धेत कोणत्या खेळ प्रकारांना प्राधान्य द्यावे, याचा सर्वस्वी निर्णय हा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्राकडे आहे, अशी भूमिका राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतली आहे.
राष्ट्रकूल स्पर्धेत नेमबाजी हा पर्यायी खेळ असल्याचा…
View On WordPress
0 notes
Photo
ओळखू शकाल यांना ? राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते,कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी आपल्या ह्यातील अनेक नामवंत मल्ल घडवले.
Can you recognize them? National Gold Medal Winner, the son of kolhapur district, who made many famous malla in his name.
4 notes
·
View notes
Text
मुक्केबाज़ी के कुछ घंटों बाद दिल का दौरा पड़ने से नवोदित महाराष्ट्र के पहलवान की मौत
मुक्केबाज़ी के कुछ घंटों बाद दिल का दौरा पड़ने से नवोदित महाराष्ट्र के पहलवान की मौत
पुणे: अपने प्रतिद्वंद्वी को मुकाबले में हराने के कुछ घंटे बाद महाराष्ट्र के कोल्हापुर शहर में एक 22 वर्षीय पहलवान की दिल का दौरा पड़ने से मौत हो गई। मारुति सुरवासे के रूप में पहचाने जाने वाले पहलवान पिछले कुछ महीनों से पश्चिमी महाराष्ट्र शहर में राष्ट्रकुल कुस्ति संकुल अकादमी में प्रशिक्षण ले रहे थे। वह सोलापुर जिले के पंढरपुर का रह���े वाला था। अकादमी चलाने वाले राम सारंग ने कहा, “सोमवार को दशहरे…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीसात मोठी वाढ : क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीसात मोठी वाढ : क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीसात मोठी वाढ – क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन राजेश सोनवणे, मुंबई,दि. 26 : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रोत्साहन मिळावे,जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावेत, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे. याकरीता सरकारने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली असल्याचे क्रीडा व…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चा पुढे सुरु राहणार आहे. लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. भाजपानं व्हीप जारी करुन सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहायला सांगितलं आहे. राज्यसभेत जलप्रदुषण निवारण आणि नियंत्रण सुधारणा विधेयक २०२४ पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव, तर लोकसभेत प्रवेश परीक्षांमध्ये होणारी कॉपी आणि पेपरलीक सारख्या घटना रोखण्याशी संबंधीत कठोर तरतूदी असणारं विधेयक मांडण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पुरवणी मागण्या दर्शवणारं विवरण पटलावर ठेवणार आहेत.
****
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या शक्ति या बँडला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. लॉस एंजेलिसमध्ये आज झालेल्या ६६व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहोळ्यात सर्वश्रेष्ठ वैश्विक अल्बम श्रेणीमध्ये ‘दिस मोमेंट’ या अल्बमसाठी शंकर महादेवनसह चार भारतीय संगीतकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उस्ताद झाकीर ह��सैन यांनी तीन तर सर्वोत्कृष्ट बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले.
****
नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल सर्वसाधारण परिषदेचा समारोप काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाला. आजच्या काळात हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर, न्यायाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व पैलूंसह पर्यावरणीय न्यायाचा पैलूदेखील समाविष्ट केला पाहिजे, असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं.
****
नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात एका विहिरीत गाळ काढत असताना क्रेनचा वायर रोप तुटल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. काल बागलाण तालुक्यातल्या मुळाणे इथं ही घटना घडली.
****
पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने दर्पण आणि मूकनायक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे पुरस्कार काल अंबाजोगाई इथं वितरीत करण्यात आले. नितीन चव्हाण, दिनकर शिंदे आणि श्रीयुत स्वामी या पत्रकारांना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विशाल साळुंखे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
0 notes
Text
लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया- आमदार प्रवीण दरेकर
नागपूर, दि. 15: पक्ष संघटन हा लोकशाहीचा आत्मा असून निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या विजयाचा पाया असल्याचे मत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे सचिव विलास आठवले, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने आदी उपस्थित होते. लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायपालिका व माध्यम हे चार…
View On WordPress
0 notes
Text
महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर, दि. 12 :- समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. राजकीय आरक्षणामुळे महिलांना समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अधिकची संधी निर्माण होणार आहे. या आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसू लागतील, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. विधानभवनात आयोजित राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात “संसदीय लोकशाही व महिला धोरण” या विषयावर अभ्यास वर्गासाठी…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ मुंबई : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे या��रीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.…
View On WordPress
#आताची बातमी#क्रीडापटूंच्या#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#पदकप्राप्त#फ्रेश बातमी#बक्षिस#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मोठी#रकमेत#राष्ट्रकुल#रेगुलर अपडेट#वाढ#वायरल बातमी#स्पर्धेतील
0 notes
Text
कॉमनवेल्थ गेम्स: हिंदी शिक्षकाने अभिषेकला बनवले आंतरराष्ट्रीय हॉकीपटू, हरियाणवी मुलगा चमकायला तयार
कॉमनवेल्थ गेम्स: हिंदी शिक्षकाने अभिषेकला बनवले आंतरराष्ट्रीय हॉकीपटू, हरियाणवी मुलगा चमकायला तयार
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अभिषेक: हरियाणातील सोनीपत येथील अभिषेकला राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुरुष हॉकी संघातही संधी मिळाली आहे. 22 वर्षीय अभिषेकने 2022 च्या सुरुवातीला भारतीय हॉकी संघात स्थान मिळवले. बालपणी मित्राला पाहून हॉकीला करिअर बनवणाऱ्या अभिषेकसाठी वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचा प्रवास सोपा राहिलेला नाही. अभिषेकला घरच्यांचाही पाठिंबा मिळाला नाही. मात्र, त्यांना त्यांच्या गुरूची साथ…
View On WordPress
#CWG 2022#अभिषेक#कॉमनवेल्थ गेम्स 2022#बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स#भारतीय हॉकी#भारतीय हॉकी फॉरवर्ड अभिषेक#राज्याभिषेक#राष्ट्रकुल खेळ#समशेर#हॉकी बातम्या
0 notes
Text
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा शिवपाल सिंग अंजलीसोबत सात फेऱ्या घेणार आहे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा शिवपाल सिंग अंजलीसोबत सात फेऱ्या घेणार आहे
टोकियो 2020 ऑलिंपियन विवाह: यंदाच्या आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करत असलेला भारतीय भालाफेकपटू शिवपाल सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा शिवपाल सिंग सध्या भारतीय हवाई दलात वरिष्ठ नॉन-कमिशन्ड अधिकारी आहे. 85.47 मीटर फेक करून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या शिवपालने नीरज चोप्रासोबत टोकियोला उड्डाण केले. तथापि, चा��गली सुरुवात…
View On WordPress
#CWG2022#आशियाई खेळ#आशियाई खेळ 2022#उत्तर प्रदेश#ऑलिम्पिक#ऑलिम्पिक 2020#ऑलिम्पिक सुवर्ण#जोनान्स वेटर#टोकियो 2020#टोकियो ऑलिम्पिक#ट्रॅक आणि फील्ड#नीरज चोप्रा#भारतीय ऑलिम्पिक#भारतीय ऑलिम्पियन#भारतीय हवाई दल#भाला फेकणारा#भाला फेकणे#राष्ट्रकुल खेळ#वाराणसी#शिवपाल सिंग#सुवर्ण पदक
0 notes