Tumgik
#ऑलिम्पिक 2020
darshaknews · 3 years
Text
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा शिवपाल सिंग अंजलीसोबत सात फेऱ्या घेणार आहे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा शिवपाल सिंग अंजलीसोबत सात फेऱ्या घेणार आहे
टोकियो 2020 ऑलिंपियन विवाह: यंदाच्या आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करत असलेला भारतीय भालाफेकपटू शिवपाल सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा शिवपाल सिंग सध्या भारतीय हवाई दलात वरिष्ठ नॉन-कमिशन्ड अधिकारी आहे. 85.47 मीटर फेक करून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या शिवपालने नीरज चोप्रासोबत टोकियोला उड्डाण केले. तथापि, चांगली सुरुवात…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Asian Games:आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निलंबनामुळे तयारीला अधिक वेळ मिळाला-सविता पुनिया
Asian Games:आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निलंबनामुळे तयारीला अधिक वेळ मिळाला-सविता पुनिया
Asian Games:आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निलंबनामुळे तयारीला अधिक वेळ मिळाला-सविता पुनिया भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सविता पुनिया हिला आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे कारण टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्याने हांगझोऊ येथील कॉन्टिनेंटल गेम्स पुढे ढकलण्यात आल्याने संघाला प्रशिक्षण आणि सुधारणा करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.   कोविड-19 महामारीमुळे 2020 ऑलिम्पिक खेळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 3 years
Text
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले     टोकियो -वृत्तसंस्था 2020 summer Paralympics मध्ये भारताला पॅरा ऑलिम्पिक मध्ये पाहिले पदक मिळाले असून चीनला हरवून भारताच्या भावना पटेल हिने पदकाची कमाई केली आहे.   आणखी वाचा:कोरोनाने ऑलिम्पिक पदकाची संधी हुकली;ऑलम्पिक खेळाडू अविनाश साबळे याची खंत भावना पटेल ही पॅरा ऑलिम्पिक मध्ये टेबल टेनिस खेळाडू आहे.तिने सेमी फायनल मध्ये चीनची झेंक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Tokyo Olympics 2020 LIVE Updates: India Beat Kazakhstan To Reach Men's Archery Quarters
Tokyo Olympics 2020 LIVE Updates: India Beat Kazakhstan To Reach Men’s Archery Quarters
टोकियो ऑलिम्पिक 2020: आर्चर अतानू दासने आज शानदार प्रदर्शन केले.© एएफपी टोकियोमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी बजावल्यानंतर भारतीय तिरंदाजांनी अतनु दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय यांच्या तिरंदाजी संघाने कझाकस्तानचा 6-2 असा पराभव करून पुरुष संघ तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, भारतीय फेंसर भवानी देवीने Sab 64 सामन्यांच्या महिला साबेर टेबलमध्ये ट्युनिशियाच्या नादिया बेन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      नव्या कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेसाठी केंद्र सरकारकडून शेतकरी नेत्यांना पुन्हा आमंत्रण.
·      मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार - खासदार संभाजीराजे छत्रपती.
·      आर्थिक दुर्बल गटाचा लाभ मराठा समाजाला देण्याच्या निर्णयावर राजकारण होत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप.
·      औरंगाबादच्या साई केंद्रात क्रीडा साहित्य खरेदीसाठी पाच कोटी रूपये तसंच ३०० खाटांचं वसतिगृह सुरू करण्याची केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा.
·      गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेडची २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.
·      राज्यात तीन हजार ५८० नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यातनव्या २३७ रुग्णांची नोंद.
आणि
·      माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त आज भाजपचा ‘सुशासन दिवस’.
****
नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना केंद्र सरकारनं पुन्हा एकदा चर्चेसाठी पत्र पाठवून आमंत्रित केलं असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी दिली आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पत्र लिहून सरकार मोकळ्या मनानं शेतकऱ्यांसोबत चर्चेला आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर समाधानकारक उत्तरं द्यायला तयार असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागला तर त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, अशी टीका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांना खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी आर्थिक मागास वर्गाची सवलत देण्यात आली आहे. मराठा समाजाला केंद्रीय आरक्षणानुसार हे १० टक्के आरक्षण मिळत होतं, यामध्ये इतरही अनेक समाजांचा समावेश असल्यामुळे फक्त मराठा समाजासाठीच हे आरक्षण दिलं, असं म्हणता येत नसल्याचं संभाजीराजे यांनी नमूद केलं.
****
मराठा समाजाला आर्थिक दुर्बल गटाचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काही मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग - ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातल्या संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याचे आदेश देवून राज्य सरकारनं यासंदर्भात भूमिका निश्चित करावी असं सांगितलं होतं, त्यानुसार संबंधित निर्णय घेतला असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
आज नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचं आचरण करायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणानं नाताळ साजरा करावा, असं आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही जनतेला नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी केलं आहे.  
****
राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं यंदाच्या घोषित पुरस्कारांच्या मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. कोविड-19 चा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर, शासनाच्या नियमांचं पालन करून पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करुन मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ मानकऱ्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
****
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबाद इथल्या केंद्रात विविध क्रीडा प्रकाराच्या साहित्यासाठी पाच कोटी रूपये तसंच ३०० खाटांचं वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे, काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात जलतरण तलाव आणि सिंथेटिक हॉकी मैदानाचं उद्घाटन तसंच तलवारबाजी सभागृहाचं कोनशिला अनावरण रिजिजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातल्या खेळाडूंमध्ये असलेली क्षमता वृद्धींगत करण्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देईल, असं केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणाले. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत प्राधिकरणातील जवळपास २० खेळाडू भारताचं प्रतिनिधीत्व करतील, असा विश्वासही रिजिजू यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं क्रीडा मंत्रालयाकडे केलेल्या मागण्यांबाबतही आपण सकारात्मक असून विद्यापीठास ‘खेलो इंडिया’तून निधी देणार असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रामध्ये कबड्डी या खेळाचा समावेश करावा, अशी मागणी करणारं निवेदन जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी सादर करण्यात आलं. बीड वळण रस्त्यावर वाल्मी नाका ते झाल्टा फाटा या अकरा किलोमीटर मार्गावर सायकल ट्रॅक तयार करण्यात यावा, अशी मागणी करणारं एक निवेदनही औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी देण्यात आलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी काल राळेगणसिद्धी इथं अण्णांची भेट घेतली. हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता. यापूर्वीही पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागं घेण्याची विनंती केली होती.
****
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेऊन गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याची परभणी, बीड आणि धुळे इथली २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागानं काल या प्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्यानं २९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर सहा बँकाकडून जवळपास ३२८ कोटी रुपयांचे कर्ज परस्पर घेतलं होतं. गुट्टे यांनी ही रक्कम योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये गुंतवली. याप्रकरणी आता सक्तवसुली संचालनालयानं गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची २४७ कोटी रुपये किंमतीची यंत्रं, पाच कोटी रुपयांची जमीन, तसंच योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे इथल्या बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपयांचे समभाग आदी संपत्ती जप्त केली आहे.
****
राज्यात काल तीन हजार ५८० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख नऊ हजार ९५१ झाली आहे. काल ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार ५८ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका ���हे. काल तीन हजार १७१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख चार हजार ८७१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५४ हजार ८९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३७ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात दोन, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.  
औरंगाबाद जिल्ह्यात काल ६६ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ३८, बीड ३५, नांदेड २९, जालना ३०, उस्मानाबाद १४, परभणी १३, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले १२ नवीन रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसंच धार्मिक स्थळावर गर्दी करु नये, असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं आहे. कोरोना विषाणू संदर्भातल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या घटली असली तरी या आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव थांबला नसल्याचं सांगून नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहनही दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ‘सुशासन दिवस’ पाळण्यात येणार आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या शेतकऱ्यांना दुपारी बारा वाजता संबोधित करणार आहेत. भाजपच्या सर्व जिल्हा शाखांमध्ये पंतप्रधानांचं भाषण दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत अठरा हजार कोटी रुपये निधी देशभरातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहेत. औरंगाबाद इथं वृद्धाश्रम चालवणाऱ्या मालती करंदीकर, कोविडग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारे उस्मानाबाद इथले विलास गोरे आणि लोहारा ग्रामीण रुग्णालयात कोविड काळात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे सौदागर साठे यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.  
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलं आहे.
****
कापूस पणन महासंघामार्फत परभणी जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या कापूस खरेदी केंद्रात नोंदणी करण्यासाठी उद्या २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परभणी बाजार समिती अंतर्गत काही शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झाली नसल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात येत्या २८ तारखेपासून तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, चालू वर्षाचा ऑनलाईन सातबारा उतारा, पिकपेरा, बँकेचे पासबुक ही कागदपत्रे स्कॅन करुन नोंदणी करता येणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ११ केंद्रांवर ही नोंदणी करता येणार आहे.
****
नाताळचा सण तसंच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लातूर महापालिका हद्दीत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदुषण होऊ नये यासाठी फटाके वाजवण्यास घातलेली बंदी आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रात लागू असलेली रात्रीची संचारबंदी या दोन्ही बाबींचा विचार करुन लातूर महापालिकेने फटाकेबंदीचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांनी फटाके न वाजवता सहकार्य करावे, असं आवाहन महापलिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी केलं आहे.
****
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी काल परळी शहरातील मोंढा मार्केट भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून नव्या कृषी कायद्याचं महत्त्व आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा लाभ याची माहिती दिली. हा कायदा शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचं स्वातंत्र्य प्रदान करणारा असून नव्या कायद्यामुळे कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची मक्तेदारी संपुष्टात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
लातूर महानगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५१ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आलं आहे. या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रं काल प्रदान करण्यात आले. महानगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ८३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव होता, या पैकी ५१ कर्मचारी पात्र ठरल्यानं सेवेत सामावून घेण्यात आलं.
****
हिंगोली शहरात राबवल्या गेलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत १५ बालकामगांची सुटका करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षानं ही मोहीम राबवली गेली. या बाल कामगारांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात येऊन बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं.
****
दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी ही माहिती दिली. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
****
परभणी पोलिसांच्या विशेष पथकानं काल बलसा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत तीन लाख नऊ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करुन चोरलेली १५ लाख रुपये किंमतीची वाहनं जप्त केली आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले तीन आणि आखाडा बाळापूर इथला एक अशा या चार चोरांनी २३ दुचाकी चोरल्या आहेत.
****
पालघर जिल्ह्यात घडलेल्या साधू तिहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी २६ आरोपींना अटक केली आहे. यामुळं या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ही जवळपास २५५ इतकी झाली आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा पदक'
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला ‘परम विशिष्ट सेवा पदक’
नीरज चोप्रा पुरस्कार: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारे सुभेदार नीरज चोप्रा यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. नीरज हे भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहेत. आतापर्यंत नीरजला अनेक सन्मान मिळाले आहेत. ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
या दिग्गजांशी स्पर्धा करत नीरज चोप्राने आणखी एक कामगिरी केली, या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले
या दिग्गजांशी स्पर्धा करत नीरज चोप्राने आणखी एक कामगिरी केली, या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा: भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. खेळांच्या महाकुंभमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला खेळाडू आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने आणखी एक यश संपादन केले आहे. नीरज चोप्राच्या नावाची या वर्षातील सर्वात मोठी क्रीडा पुरस्कार लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी शिफारस करण्यात आली आहे. नीरज चोप्रा एम्मा रदुकानू,…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी मार्च 2020 नंतर चीनमध्ये कोविड 19 ची सर्वाधिक प्रकरणे | कोविड
हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी मार्च 2020 नंतर चीनमध्ये कोविड 19 ची सर्वाधिक प्रकरणे | कोविड
चीनमधील कोविड-19 प्रकरणे: चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. सोमवारी, मार्च 2020 नंतर चीनमध्ये संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चीनची राजधानी बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. अशा स्थितीत बीजिंगमध्ये कडक कारवाई करण्यात येत आहे. चीनमध्ये प्रथमच 2019 च्या अखेरीस कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली. तेव्हापासून चीन कठोर पावले…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Tokyo Olympics 2020 Men's Hockey Match, India vs Australia Live Match Score Updates: India Trail Australia After 1st Quarter
Tokyo Olympics 2020 Men’s Hockey Match, India vs Australia Live Match Score Updates: India Trail Australia After 1st Quarter
टोकियो ऑलिम्पिक हॉकी सामना अद्यतनेः भारताने आपल्या पहिल्या पूल ए सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला.© एएफपी रविवारी सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील दुसर्‍या पूल ए सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-1 ने पिछाडीवर आहे. दोन्ही संघांनी आपले सुरुवातीचे खेळ जिंकले आणि ओआय हॉकी स्टेडियमवर झालेल्या विजयासह त्यांच्या गटातील आपले स्थान मजबूत करण्याचा विचार केला जाईल. शनिवारी नजीकच्या लढतीत भारताने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Tokyo Olympics Day 3 Live Updates: India's Manu Bhaker In 5th Spot After Series 1
Tokyo Olympics Day 3 Live Updates: India’s Manu Bhaker In 5th Spot After Series 1
टोकियो 2020: मनु मीटरने 10 मीटर एअर पिस्टल पात्रतेमध्ये चांगली सुरुवात केली, यशस्विनी सिंग मागे पडला.© इंस्टाग्राम / आयएसएसएफ_ऑफिशियल टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या तिसर्‍या दिवशी मनु भाकरने १० मीटर एअर पिस्टल महिला पात्रतेतील मालिका १ नंतर चांगली सुरुवात केली, तर यशस्विनीसिंग देसवालने तिच्या मोहिमेला कठोर सुरुवात केली. पुरुष गटात दिव्यंशसिंग पंवारदेखील 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत काम करणार आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Tokyo Olympics 2020 Opening Ceremony Live Updates: Indian Contingent Enters Stadium
Tokyo Olympics 2020 Opening Ceremony Live Updates: Indian Contingent Enters Stadium
टोकियो गेम्सचा उद्घाटन सोहळा: शरणार्थी ऑलिम्पिक संघ राष्ट्रीय स्टेडियममध्ये दाखल झाला.© एएफपी वर्षभराचा (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा (साथीचा रोग)) पुढे ढकलण्यात आलेल्या घोटाळ्यामुळे आणि वादामुळे टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी जवळजवळ रिक्त स्टेडियमवर सुरू झाला. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा (साथीचा रोग)) साथीच्या आजारांच्या वेळी घरी अ‍ॅथलीट्सचे प्रशिक्षण देणार्‍या एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Tokyo Olympics 2020 Live Streaming: How to Watch the Olympic Events Live, Schedule, and More
Tokyo Olympics 2020 Live Streaming: How to Watch the Olympic Events Live, Schedule, and More
टोकियो ऑलिम्पिक 2020 शनिवार, 23 जुलै 2021 पासून सुरू होणार आहे आणि ऑनलाईन प्रवाहित झाला आणि टीव्हीवरही प्रसारित होईल. पुढील 17 दिवसांपर्यंत, आम्ही जगातील कित्येक againstथलीट्स एकमेकांविरूद्ध प्रतिस्पर्धा करताना पाहत आहोत. स्पर्धा पहाटे पाच वाजता सुरू होतील आणि दिवसभर चालू राहतील. सानिया मिर्झा, पीव्ही सिंधू, अंकिता रैना, सौरभ चौधरी, शरथ कमल हे भारतीय खेळाडू जपानमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 August 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      पीएम केअर्स निधी, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीत वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासंदर्भातला निर्णय राखीव.
·      कोरोना विषाणू संसर्गामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ञ तसंच संशोधकांनी केलेल्या शिफारशींवर कालबद्ध कृती करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना.
·      औरंगाबाद जालना आणि जळगावमध्ये आजपासून टेली-आयसीयू सेवा.
·      कोविडविरोधात प्रभावी आणि निर्णायक लढ्याकरता कृती दलाची स्थापना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.
·      राज्यात ११ हजार १९१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४२२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      मराठवाड्यात ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं निधन, तर नव्या एक हजार ६९ बाधित रुग्णांची नोंद.
आणि
·      क्रिकेटपटू रोहित शर्मासह चौघांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी तर बीडचा पैलवान राहूल आवारे तसंच उस्मानाबादची खो खो पटू सारिका काळेसह २९ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस.
****
पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीत वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. एका खाजगी संघटनेनं ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत ही मागणी नाकारताना, पीएम केअर्सची स्थापना ही विश्वस्त संस्था म्हणून झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अशा प्रकारच्या धर्मादाय संस्थेच्या मदत संकलनाला कोणतंही घटनात्मक बंधन नसल्याचं सांगितलं. तथापि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीला स्वेच्छेनं देणगी देता येत असल्यामुळे दात्यांवर कोणतही बंधन नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. या दोन संस्था वेगवेगळ्या असल्यामुळे पीएम केअर्सचा निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीत विलीन करता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
देशातल्या सर्व विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. या परीक्षा ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्या या विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या निर्देशाच्या विरोधात दाखल याचिकांवर काल सुनावणी घेताना न्यायालयानं, या खटल्याशी संबंधित सर्व पक्षकारांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ञ तसंच संशोधकांनी केलेल्या शिफारशींवर कालबद्ध कृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसंच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा यासंदर्भात पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगांचं राज्यभर विकेंद्रीकरण असेल तर पुढे चालून कोणतीही अशी समस्या आली तरी कुठेना कुठे उत्पादन सुरु राहील, असं ते म्हणाले.
****
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमधे संततधार पावसामुळे धरणं भरून वाहू लागली आहेत. मराठवाड्यातल्या अनेक भागात काल पावसानं उघडीप दिली, तरीही काही भागात पूर परिस्थिती कायम होती. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
औरंगाबाद शहरात पावसानं काल उघडीप दिली. गेल्या आठवडाभरापासून औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती.
 नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या मुक्रमाबाद इथं काल सर्वाधिक ९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल किनवट तालुक्यातल्या देहली इथं ९० मिलीमीटर आणि मांडवी इथं ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे किनवट, माहूर, हिमायतनगर तालुक्यातल्या नदी नाल्यांना पूर आले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या शेतजमिनी खरडल्या गेल्या असून, काढणीस आलेल्या मूग, उडीद पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तूर, कपाशीच्या पिकांना मर लागली आहे.
दरम्यान, हिमायतनगर तालुक्यात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक २६ वर्षीय शेतकरी वाहून गेला.
उस्मानाबाद इथंही काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातले पाच लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगांव धरणही पूर्ण भरलं आहे.
****
दरम्यान, येत्या दोन दिवसांत कोकणात आणि विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
औरंगाबाद आणि जालन्यासह राज्यातल्या तीन जिल्ह्यात आजपासून टेली-आयसीयू सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कृती दल तसंच सर्व विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करत, कोविडसंदर्भात आढावा घेतला. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत टोपे यांनी पत्रकारांना माहिती दिली, ते म्हणाले –
टेलिआयसीयु याचा प्रयोग आपण सहा जिल्ह्यांमध्ये करतो आहोत. त्यातल्या एक ठिकाणी सुरु झाला आहे प्रत्यक्ष. आता आपण  औरंगाबाद, जालना आणि जळगाव या तीन ठिकाणी Actual सुरु करतो आहोत. भिवंडी मध्ये प्रत्यक्ष सुरु झाला आणि त्याचे खूप चांगले परिणाम दिसत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानानं खूप चांगला मार्ग काढला आहे त्याचा आरोग्य विभागानं सहा जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली आहे. सर्वच टास्क फोर्सनं असा आग्रह केला आहे टेलिआसीयू Facility ही आता आपण सर्वच जिल्ह्यांमध्ये राबवली पाहिजे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू असणाऱ्या रुग्णालयांनी योजनेच्या लाभार्थी रुग्णांकडून शुल्क आकारू नये, अन्यथा रुग्णालयांना पाच पट दंड ठोठावला जाईल, जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार असल्याचं, टोपे यांनी यावेळी सांगितलं.
गणेशोत्सव काळात कोविड संदर्भातले सर्व नियम पाळावेत, सार्वजनिक गणपतींची पूजा तसंच आरती मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करण्याची सूचना टोपे यांनी यावेळी केली. मोहरमच्या काळातही योग्य शारीरिक अंतर राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार करणाऱ्या ग्रामीण भागातल्या स��माजिक संस्था आणि संघटनेच्या कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांचं विमा कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. या कर्मचाऱ्यांनाही कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असून, त्यांचं आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातल्या या धाडसी कोरोना योद्ध्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६८ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, नमो ॲप वर किंवा माय जीओव्ह�� ओपन फोरमवर पाठवू शकतात.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कोविडविरोधात प्रभावी आणि निर्णायक लढ्याकरता कृती दलाची स्थापना करावी, असे निर्देश खंडपीठानं दिले आहेत. विलगीकरण कक्ष आणि कोविड रुग्णालयातल्या कामकाजाविरोधात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खंडपीठानं सुमोटो याचिका दाखल करुन घेतली, यावरच्या काल झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठानं, कोविडवर उपचार, प्रतिबंध आणि पायाभूत सोयी सुविधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कृती दलामार्फत योग्य उपचार, शुल्कामध्ये समानता यावर काम केलं जावं, असं न्यायालयानं सांगितलं.
****
राज्यात काल ११ हजार १९१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सहा लाख १५ हजार ४७७ झाली आहे. काल ४२२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २० हजार ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नऊ हजार ३५६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत चार लाख ३७ हजार ८७० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
****
मराठवाड्यात काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६९ बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं १९ हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी २९९ रुग्ण आढळले, तर सात जणांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात काल चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १३८ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातही चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १२० रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर यापूर्वी झालेल्या १४ मृत्यूंची नोंद घेण्यात आली, तर जिल्ह्यात आणखी ११५ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ६८ रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर आणखी सात रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात २१०, तर जालना जिल्ह्यात काल आणखी ११५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  
****
मुंबईत काल आणखी ९३१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४९ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात दोन हजार ५४३ नवे रुग्ण, तर ९६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ६२२ नवे रुग्ण आढळले, तर नऊ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार २४, रायगड ३५९, पालघर ३२४, सातारा ३९२, सांगली ३११, बुलडाणा १०४, गोंदिया २३, वाशिम ११, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  
****
यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी निवड समितीनं क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्यासह चौघांची शिफारस केली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, तसंच दिव्यांग ऑलिम्पिक मधला सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगावेलु यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे. बीडचा पैलवान राहूल आवारे तसंच उस्मानाबादची खो खो पटू सारिका काळे, क्रिकेटपटू इशांत शर्मा, तिरंदाज अतनु दास, हॉकीपटू दीपिका ठाकूर, टेनिसपटू दिवीज शरण यांच्यासह २९ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी या निवड समितीने शिफारस केली आहे.
****
हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाईक यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
औरंगाबाद इथं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र विभागात वसंतराव नाईक अध्यासन केंद्राच्या वतीनं घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, अध्यासन केंद्र समन्वयक प्राध्यापक अशोक चव्हाण, विभागप्रमुख अरविंद धाबे यांनी नाईक यांना आदरांजली वाहिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनसह इतर पिकांवर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याबाबत कृषी रथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या शेतकरी जनजागृती उपक्रमांतर्गत लोहारा तालुक्यात हराळी इथं काल कृषी रथाचं पूजन करून, रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
****
राज्याच्या ग्रामीण भागात काल पोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी हा सण साजरा करताना, कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळल्याचं दिसून आलं. अनेक शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा केली. लातूर जिल्ह्यातल्या एरोल इथं परंपरागत पध्दतीनं पोळा साजरा झाला.
****
परभणी इथं कोविड संशयितांची आणि बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून पहिल्या टप्यात संशयित, बाधित, सौम्य आणि मध्यम त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी खासगी सेवा खुली करण्यात आली आहे. सध्या ५० खाटांची सुविधा असली तरी टप्या-टप्यानं ही सुविधा वाढवण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात शासनाच्या नियमांचं पालन करुन औरंगाबाद जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार असल्याचं गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर तुलसीबागवाले यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. लहान गणेशमूर्ती, प्लाझ्मादान शिबीर, कोरोना योद्ध्यांचा सत्कार, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्यं असतील, असं ते म्हणाले.
****
जालना शहरात गणेशमूर्ती तयार करणारे, विकणारे, तसंच गणेशोत्सवासाठीचं साहित्य विक्री करणाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. आज आणि उद्या जिल्हा परिषद शाळा आणि फुलंब्रीकर नाट्यगृहात या चाचण्या करण्यात येणार आहेत. कोरोना विषाणू तपासणी नकारात्मक असल्याचं प्रमाणपत्र असणाऱ्या विक्रेत्यांनाच साहित्य विक्री करता येईल अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद शहरानजिक असलेल्या निझामकालीन हर्सुल तलाव, आणि या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातल्या १९ पाझर तलावांची महापालिका, जिल्हा परिषद, जलसंधारण आणि जलसंपदा विभागानं संयुक्तपणे तपासणी करून तत्काळ सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काल हर्सुल तलावातली पाणीपातळी, साठा, वितरण, तलावाकाठची गावं, नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन सविस्तर आढावा घेतला तसंच आवश्यक सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
****
पंढरपूरचे माजी आमदार आणि राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक यांचं सोमवारी रात्री पुणे इथं निधन झालं. पाच ऑगस्टला त्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परिचारक हे २५ वर्ष विधानसभेचे सदस्य होते. तसंच त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. परिचारक यांच्या पार्थिवावर काल पुणे इथं अंत्यसंस्क��र करण्यात आले.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 August 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.०० **** ** जालना आणि औरंगाबादसह राज्यात तीन जिल्ह्यात उद्यापासून टेली-आयसीयू सेवा ** औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात १९४ नवे कोविडग्रस्त तर चौघांचा मृत्यू ** गेल्या २४ तासांत राज्य पोलीस दलातल्या ११२ कर्मचाऱ्यांना कोविडची लागण आणि ** यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस **** औरंगाबाद आणि जालन्यासह राज्यातल्या तीन जिल्ह्यात उद्यापासून टेली-आयसीयू सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृती दल तसंच सर्व विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करत, कोविडसंदर्भात आढावा घेतला, या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत टोपे यांनी पत्रकारांना माहिती दिली, ते म्हणाले. टेलिआसीयु याचा प्रयोग आपण सहा जिल्ह्यांमध्ये करतो आहोत. त्यातल्या एक ठिकाणी सुरु झाला आहे प्रत्यक्ष. आता आपण औरंगाबाद, जालना आणि जळगाव या तीन ठिकाणी Actual सुरु करतो आहोत. भिवंडी मध्ये सुरु केले आहे आणि त्याचे दुष्य परिणाम दिसत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानानं खुप चांगला मार्ग काढला आहे त्याचा आरोग्य विभागानं सहा जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली आहे. सर्वच टास्क फोर्सनं असा आग्रह केला आहे टेलिआसीयू Facility ही आता आपण सर्वच जिल्ह्यांमध्ये राबवली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू असणाऱ्या रुग्णालयांनी योजनेच्या लाभार्थी रुग्णांकडून शुल्क आकारू नये, अन्यथा रुग्णालयांना पाच पट दंड ठोठावला जाईल, जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार असल्याचं, टोपे यांनी यावेळी सांगितलं. गणेशोत्सव काळात कोविड संदर्भातले सर्व नियम पाळावेत, सार्वजनिक गणपतींची पूजा तसंच आरती मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करण्याची सूचना टोपे यांनी यावेळी केली. मोहरमच्या काळातही योग्य शारीरिक अंतर राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. **** औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात १९४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १९ हजार ४७ एवढी झाली आहे. त्यापैकी १४ हजार २१७ रुग्ण बरे झाले असून सध्या चार हजार २३१ जणांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज चार कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये मंजित नगरातील ६० वर्षीय, रांजणगाव - शेणपूंजी इथल्या ४२ वर्षीय, बिडकीन इथल्या ७५ वर्षीय पुरूष रुग्ण आणि सिद्धार्थ उद्यान परिसरातल्या ७३ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५९९ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे. **** गेल्या २४ तासांत राज्य पोलीस दलातल्या ११२ कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या संसर्गानं मरण पावलेल्या पोलिसांची संख्या १२८ झाली असून, बाधित पोलिसांची एकूण संख्या १२ हजार ४९५ झाली आहे. यापैकी १० हजार १११ पोलिस बरे झाले असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे. **** देशात गेल्या २४ तासांत ५८ हजार लोक कोविड संसर्गातून मुक्त झाले. यामुळे कोविडमुक्त झालेल्यांची संख्या २० लाखापर्यंत पोहोचली असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७३ पूर्णांक १८ शतांश टक्के झालं आहे. तर मृत्यू दर एक पूर्णांक ९२ शतांश टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. देशातली एकूण रुग्ण संख्या २७ लाखावर पोहोचली आहे दरम्यान, देशात कोविड -१९ च्या परीक्षणाच्या क्षमतेत सातत्यानं वाढ होत आहे. काल देशात एकाच दिवसात कोविड -१९ च्या जवळपास ९ लाख चाचण्या करण्यात आल्या. ही संख्या एक विक्रम असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटल आहे. दरम्यान, आतापर्यंत तीन कोटी ९ लाख ४१ हजार २६४ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. ९७१ सरकारी आणि ५०५ खाजगी प्रयोगशाळांमधून या चाचण्या करण्यात येत आहेत. **** टाळेबंदी सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड-१९ संदर्भात २ लाख २९ हजार गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ३३ हजार ४६८ जणांना कलम १८८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या काळात २१ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला. **** हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली. यावेळी पवार यांनी नाईक यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आझाद हिंद सेनेचे संस्थापक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्तही पवार यांनी त्यांना अभिवादन केलं. औरंगाबाद इथं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. वनस्पतीशास्त्र विभागात वसंतराव नाईक अध्यासन केंद्राच्या वतीनं घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अध्यासन केंद्र समन्वयक प्राध्यापक अशोक चव्हाण, विभागप्रमुख अरविंद धाबे, यांनी नाईक यांना आदरांजली वाहिली. **** यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी निवड समितीने क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्यासह चौघांची या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, तसंच दिव्यांग ऑलिम्पिक मधला सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगावेलु यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे. गोलंदाज इशांत शर्मा, तीरंदाज अतनु दास, हॉकीपटू दीपिका ठाकूर, टेनिसपटू दिवीज शरण यांच्यासह २९ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी या निवड समितीने शिफारस केल्याचं वृत्त आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनसह इतर पिकावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे, हा प्रादुर्भावा रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याबाबत कृषी रथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या शेतकरी जनजागृती उपक्रमांतर्गत लोहारा तालुक्यात हराळी इथं आज कृषी रथाचं पूजन करून, रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. **** बैलपोळा आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी हा सण साजरा करताना, कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळ��्याचं दिसून आलं. अनेक शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा केली. लातूर जिल्ह्यातील एरोल इथे परंपरागत पध्दतीने बैल पोळा साजरा झाला. **** निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. आशियाई विकास बॅंकेच्या उपाध्यक्षपदी लवासा यांची नेमणूक झाली आहे. पुढील महिन्यात ते या पदावर रूजू होणार आहेत. **** परभणी जिल्ह्यात कोविड संशयितांची आणि बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी इथं कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आल आहे. पहिल्या टप्यात संशयित, बाधित, सौम्य आणि मध्यम त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी खासगी सेवा खुली करण्यात आली आहे. सध्या ५० खाटांची सुविधा असली तरी टप्या-टप्यानं ही सुविधा वाढवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात शासनाच्या नियमांचं पालन करुन औरंगाबाद जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार असल्याचं गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर तुलसीबागवाले यांनी सांगितलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. लहान गणेशमुर्ती, प्लाझ्मादान शिबीर, कोरोना योद्ध्यांचा सत्कार, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्यं असतील, असं ते म्हणाले. **** राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली. एक जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत ८२६ पूर्णांक ७ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला, या काळातली पावसाची सरासरी ७१३ पूर्णांक ७ मिलीमीटर एवढी आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात पावसानं आज उघडीप दिली. गेल्या सुमारे आठवडाभरापासून औरंगाबाद परिसरात पावसाची संततधार सुरू होती. **** बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातले पाच लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत तर बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगांव धरण १०० टक्के भरले आहे. दरम्यान, हवामान विभागानं बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. **** वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६९० मिलिमीटर पाऊस झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळं तीन मध्यम सिंचन प्रकल्पांपैकी ऐकबुर्जी आणि सोनल हे दोन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर अडाण प्रकल्प ८० टक्के भरला आहे. **** अमरावती विभागात पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३० नागरिक पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर दहा लोकांचा वीज पडून आणि एकाचा भिंत अंगावर पडून मृत्यू झाला. १७ हजार ७०२ हेक्टर शेतातली माती वाहून गेली आणि पिकांचं या पावसाने मोठं नुकसान झालं आहं. **** औरंगाबाद शहरानजिक असलेल्या निझामकालीन हर्सुल तलाव, आणि या तलावांवरील १९ पाझर तलावांचे महापालिका, जिल्हा परिषद, जलसंधारण आणि जलसंपदा विभागानं संयुक्तपणे तपासणी करून तत्काळ सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आज हर्सुल तलावातील पाण्याची पातळी, साठा, वितरण, तलावाकाठची गावे, नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजना, करावयाच्या उपाययोजना याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन सविस्तर आढावा घेतला. पावसाळ्यामध्ये हर्सुल तलावावर नागरिकांना प्रवेशबंदी करावी, या ठिकाणच्या सर्व फलकांवर सुस्पष्ट संदेश असावेत, चोविस तास कर्मचारी तैनात करावेत, विजेचे खांब लावण्यात यावेत, तलावांसह खामनदीतील पाण्याची पातळी समजण्यासाठी मैलांच्या दगडांचा वापर करून पाण्याच्या पातळीची मार्किंग करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधितांना केल्या. **** अहमदनगर शहरातले प्रसिद्ध कापड व्यावसायिक, प्रदीप गांधी यांचं आज अहमदनगर इथं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६५ वर्षाचे होते. कोहिनूर या प्रसिद्ध कापड दुकानाच्या नावलौकिकामुळं त्यांची राज्यभर ओळख झाली होती. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 May 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ मे २०२० दुपारी १.०० वा. **** आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता आजपासून देशांतर्गत विमान सेवेला सुरूवात झाली. गेल्या दोन महिन्यापासून टाळेबंदीमुळं देशातंर्गत विमानसेवा बंद होती. दरम्यान, देशातली विमानतळं विमानसेवा देण्यासाठी पुन्हा सज्ज झाली असून प्रवाशांना विमनतळावर प्रवासाच्या दोन तास आधी हजर राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय अनेक नियमांचं पालन करणही गरजेचं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान मुंबई विमानतळावरूनही आजपासून एकूण ५० विमानांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडिया या विमान वाहतुक कंपनीला पुढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांसह प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र याचवेळी न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश देत, केंद्र सरकारने विमान वाहतुक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीची परवानगी दिल्यानंतर विमान वाहतुक कंपनीकडून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन होत नसल्याची तक्रार करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती, त्यावर उच्च न्यायालयानं एअर इंडिया तसंच नागरी हवाई वाहतुक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून उत्तर मागवलं होतं. एअर इंडियानं यावर न्यायालयात उत्तर देत, सरकारकडून जारी परिपत्रकात मधलं आसन रिकामं ठेवण्याबाबत काहीही सूचना नसल्याचं, सांगितलं होतं. यासंदर्भात उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला या नव्या परिपत्रकाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याकरता दोन जूनपर्यंत अवधी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज सुटीच्या दिवशी घेतलेल्या सुनावणीत, एअर इंडिया आणि इतर विमान वाहतुक कंपन्यांना उच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल, असं सांगत, विमानात दोन आसनांच्या मधलं आसन रिकामं ठेवण्याचे निर्देश दिले. **** विदेशा���ून विमान, जहाज आणि रस्ते मार्गे भारतात येणाऱ्या प्रवाशांकरता आरोग्य मंत्रालयानं काही दिशा निर्देश जारी केले आहेत. या प्रवाशांनी प्रवास संपल्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात रहाणं बंधनकारक आहे यात सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरनाचा समावेश आहे. यासाठी येणार खर्च प्रवाशांना स्वत: करायचा आहे. **** अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले सात नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळेत या ०७ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात एका रुग्णाचा १० दिवसांनंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव आला आहे. तर अकोले तालुक्यातील लिंगदेव इथं आलेल्या घाटकोपर इथल्या व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव आला आहे. तसंच जिल्ह्यातल्या पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातल्या बाधीत व्यक्तींची संख्या आता ८० झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज १६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता तेराशे एक झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. **** धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शिरपुर इथले हे दोन रूग्ण आहेत आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात १४ रूग्ण दगावले आहेत, **** रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात करोनाबाधितांच्या संख्येत २४ जणांची भर पडली असून आता जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या १५६ झाली आहे. हे सारेजण मुंबईहून आलेले असून संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत. **** ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंह यांचं आज सकाळी पंजाबमध्ये मोहाली इथं निधन झालं, ते ९६ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यांपासून ते विविध विकारांनी आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिंह यांच्या कारकिर्दीत भारतीय हॉकी संघाने १९४८, १९५२, आणि १९५६ मध्ये झालेल्या अनुक्रमे लंडन, हेलसिंकी आणि मेलबर्न इथल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. १९७५ साली हॉकी विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं नेदरलंडवर सहा विरुद्ध एक अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं होतं, या सहा गोलपैकी पाच गोल बलवीरसिंह यांनी केलेले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात वैयक्तिकरित्या सर्वाधिक गोल करण्याच्या त्यांचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे. भारत सरकारने १९५७ साली त्यांना पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीरसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. बलबीर सिंह यांचा सर्वोत्तम खेळ सदैव लक्षात राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. **** आजपासून सुरू होणारी हैदराबाद शिर्डी विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. राज्यसरकारने असमर्थता दर्शवल्याने आज हैदराबादहून शिर्डीला येणारं विमान रद्द करण्यात आलं. २९ प्रवाशांनी या विमानात प्रवासाचं आरक्षण केलं होतं, यामध्ये जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद, जिल्ह्यातल्या प्रवाशांचा समावेश होता. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 May 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३ मे २०२० सायंकाळी ६.०० ****  औरंगाबादेत आज दिवसभरात सापडले कोरोनाचे २५ नवे रुग्ण. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २८२ वर.  रेल्वेच्या श्रमिक विशेष गाड्या केवळ स्थलांतरित मजूर आणि विद्यार्थ्यांसाठीच. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं रेल्वेचं आवाहन.  मुंबईतलं प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलवू नका. शरद पवार यांचं पंतप्रधानांना पत्र. आणि  आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे अखेरीस सुरू करणार. क्रीडा मंत्री किरेन रिजिजू. **** औरंगाबादमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे २५ नवे रुग्ण आढळून आले. सकाळी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सायंकाळी आणखी ८ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याची माहिती शासकीय रुग्णालय घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. औरंगाबाद इथं आता कोरोनाबाधित एकूण रूग्णांची संख्या दोनशे एक्क्याऐंशी झाली आहे. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज एका २८ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती झाली. तिनं एका मुलीला जन्म दिला. दोघींची प्रकृती स्थिर असल्याचं स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितलं. **** रेल्वेच्या श्रमिक विशेष गाड्या, केवळ लॉकडाऊनमुळे घरापासून दूर अडकून पडलेल्यांना परत घरी जाता यावं, एवढ्यासाठीच संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीवरुनच चालवण्यात येत आहेत, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, प्रवासात मध्येच अडकलेले यात्रेकरु आणि पर्यटक यांना ही सुविधा राज्य सरकारच्या शिफारसीवर उपलब्ध आहे. इतर सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद असून, कोणालाही वैयक्तिक रीत्या किंवा गटाने प्रवास करता येणार नाही. सर्व स्थानकावर तिकिट विक्री बंद आहे. उपनगरी वाहतूकही बंद आहे. यासंदर्भात कोणीही अफवा पसरवू नये अथवा त्यावर विश्वास ठेवू नये, असं रेल्वे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. **** मुंबईतलं प्रस्तावित आय.एफ.एस.सी. अर्थात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे. हे केंद्र मुंबईतच ठेवावं, अशी विनंती पवार यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. हे केंद्र गुजरातला हलवलं, तर देशाचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, तसंच त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आपल्या विनंतीकडे सकारात्मकतेनं पाहील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे. **** टाळेबंदीच्या २२ मार्च ते १ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार एकोणनव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी गुन्हे दाखल झाले असून, १७ हजार आठशे तेरा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलीस विभागानं प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार २४२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५१ हजार १३ वाहनं जप्त करण्यात आली आहेत, तर परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत. या काळात पोलीसांवर हल्ला होण्याच्या १७१ घटनांची नोंद झाली असून, यात ६५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. **** राज्यातल्या विविध तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या ५ हजारांहून अधिक कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आलं आहे. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून ५८२, ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून ४४३, तळोजा कारागृहातून ४९८, तर पुण्याच्या येरवडा कारागृहातून एकूण ३८८ कैद्यांना घरी सोडण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. बेंगळुरू आणि पतियाळामध्ये ही शिबिरं सुरू होतील. मात्र अन्य प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागेल, असं ते म्हणाले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला देशव्यापी टाळेबंदीचा काळ १७ मे पर्यंत वाढवण्यात आल्यानं सर्व प्रशिक्षण शिबिरं उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, टप्प्याटप्प्यानं ती सुरु केली जातील, असं ते म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत कुठल्याही स्पर्धांचं आयोजन करता येणार नाही, असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** नांदेडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, आज सकाळी ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतरच्या दोन तासांत अन्य दोन कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज दिवसभरात एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. नांदेडमध्ये आता एकूण कोरोना बाधितांची संख्या ३१ झाली आहे. या पैकी २ जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून, आज सकाळीही एक कोरोनाबाधित महिला मरण पावली. सध्या २८ कोरोना बाधितांवर नांदेड इथं उपचार सुरू आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** आतापर्यंत एकही कोरोनाबाधित न आढळलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात काल एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून चंद्रपूरमधल्या कृष्णनगर भागात नाकेबंदी करण्यात आली आहे. या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आणि संपर्कात असलेल्या अशा ११४ नागरिकांची तपासणी आज करण्यात आली. यापैकी १०६ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. **** अमरावती इथं आज २ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. यात एक ६२ वर्षांची महिला आणि एका २५ वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे. या दोघीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या, असं तपासात समोर आलं आहे. **** टाळेबंदीमुळे राजस्थानमधल्या कोटा इथं गेल्या दीड महिन्यापासून अडकलेले बुलडाणा जिल्हयातले २९ विद्यार्थी आपआपल्या घरी परतले आहेत. शिक्षणानिमित्त कोटा इथं गेलेले राज्यातले १ हजार ७६४ विद्यार्थी ‘लॉकडाउन’मुळे अडकून पडले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. अमरावती विभागातील १९० विद्यार्थ्यांसाठी धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा आगारातून १० बसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अकोला, अमरावती जिल्ह्यासाठी चार, तर बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांकरीता सहा बस सोडण्यात आल्या होत्या. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर या मुलांचं त्यांच्या घरात अलगीकरण करण्यात आलं आहे. **** संचारबंदीमुळे वाहतूक बंद झाल्यानं ज्येष्ठ नागरिकांना पोस्टातून पैसे काढणं शक्य नाही. ही अडचण लक्षात घेऊन रायगड जिल्हा डाक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातल्या १४१ निवृत्तीवेतन धारकांना २५ लाख ११ हजार सहाशे रुपयांचं निवृत्ती वेतन प्रत्येकाच्या घरी जाऊन दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या ८५ बॅटरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं छडा लावला आहे. याप्रकरणी तीन महिला आणि खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आलं असून, या पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. **** अमरावती जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात विविध ठिकाणी धाडी टाकून टाळेबंदीच्या ३८ दिवसांत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीची अवैध दारू जप्त केली आहे. अवैध दारू विकत घेऊ नका, पिऊ नका, तसंच कुणी असं करताना आढळल्यास पोलिसांना कळवावं, असं आवाहनही अमरावतीच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी केलं आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथला रणधीर ठाकूर हा २६ वर्षांचा तरुण आज सकाळी विजेच्या धक्क्यानं मृत्युमुखी पडला. सकाळी पाणी भरण्यासाठी नळाला विद्युत मोटर लावत असतांना त्याला विजेचा तीव्र धक्का लागला होता. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात बनगरवाडी गावात दोन १२ वर्षांच्या मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ही मुलं मित्रांसोबत पोहण्यासाठी गेली होती. विहिरीचा कठडा कोसळल्यामुळे ही मुलं विहिरीत पडली. ***** ***
0 notes