#प्रजासत्ताक दिन २०२२
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
सामाजिक न्याय हे डिजिटल इनोव्हेशनचं प्रमुख उद्दीष्ट असावं-राष्ट्रपतींचं प्रतिपादन.
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी एका वर्गात २५ परीक्षार्थी-शिक्षण मंडळाची सूचना.
अकोला इथं अखिल भारतीय गज़ल संमेलनाचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्‌घाटन.
आणि
बिंदुसरा नदी स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं-बीड जिल्हा प्रशासनाचं आवाहन.
****
सामाजिक न्याय हे डिजिटल इनोव्हेशनचं प्रमुख उद्दीष्ट असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज डिजिटल भारत २०२२ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला एका बटणाच्या क्लिकवर देशाच्या दुर्गम भागात पोहोचता आलं, समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकांचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी, भारत योग्य उदाहरण मांडत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराचं आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. यावेळी एनसीसीच्या पायदळ, नौदल आणि हवाई दल या तिन्ही शाखांमधून कॅडेट्सच्या तुकडीने उपराष्ट्रपतींना मानवंदना दिली. उपराष्ट्रपतींनी यावेळी संचलनाची पाहणी केली. तीन आठवडे चालणाऱ्या या शिबिरात सर्व २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतील ७१० मुलींसह एकूण दोन हजार १५५ कॅडेट्स सहभागी झाले आहेत. युवा विनिमय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या शिबिरात १९ मित्र देशांतील कॅडेट्स आणि अधिकारी देखील सहभागी झाले आहेत.
****
जगभरात नदीतून होणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या प्रवासाला येत्या १० तारखेपासून वाराणसीतून प्रारंभ होणार आहे. १० जानेवारीला गंगा नदीतून प्रवाशांना घेऊन निघणारं हे जहाज पाटणा, कोलकाता मार्गे बांगलादेशाची राजधानी ढाका इथं पोहोचेल, त्यानंतर सिंधू नदीतून प्रवास करत गुवाहाटी आणि माजुली बेटामार्गे येत्या एक मार्च रोजी आसाममध्ये दिब्रूगढ इथं पोहोचणार आहे.
****
मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने उद्यापासून दहा जानेवारी दरम्यान इंदूर इथं १७ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.
****
राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिलं असून राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे, परंतु औद्योगिक जगताच्या सहकार्याशिवाय अर्थपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देता येणार नाही, असं मत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई इथं आज कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेच्या सहकाऱ्यांने औद्योगिक प्रशिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला, त्यावेळी कोशारी बोलत होते. या दृष्टीने लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने कौशल्य विद्यापीठाना सहकार्य करावं, असं आवाहनही कोशारी यांनी केलं.
****
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी एका वर्गात २५ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था ठेवण्याची सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. या परीक्षेचं वेळापत्रक निश्चित झालं असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे. राज्यभरातील आठ हजार केंद्रांवर सुमारे ३० लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके नेमली जाणार असून, विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असं आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केलं आहे.
****
कविता किंवा गज़ल ही माणसांच्या सुख-दुखा:विषयी बोलत असते, गज़लेचा आशय हा हृदयाला भिडतो म्हणूनच कवी-गज़लकार हे समाज मनाचा हुंकार मांडत असतात, असं मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे. अकोला इथं दोन दिवसीय अखिल भारतीय गज़ल संमेलनाचं उद्घाटन आज मंजुळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त�� बोलत होते. गज़लसागर प्रतिष्ठानच्या वतीनं होत असलेल्या या संमेलनाची सुरुवात आज गज़ल दिंडीने झाली. विभागीय आयुक्त डॉ.दिलिप पांढरपट्टे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. सुप्रसिद्ध्‌ गज़ल गायक भीमराव पांचाळे यांच्यासह देशभरातले गज़लकार या संमेलनात सहभागी झाले आहेत.
****
औरंगाबाद इथं होणाऱ्या आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्तानं दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार यंदा प्रसिध्द दिग्दर्शक आणि चित्रपट अभ्यासक अरूण खोपकर यांना देण्यात येणार आहे. आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषेदत ही माहिती देण्यात आली. येत्या ११ ते १५ जानेवारी दरम्यान औरंगाबाद इथल्या प्रोझोन मॉलमध्ये हा महोत्सव होणार आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीनं देण्यात येणारा श्री गुरुजी पुरस्कार, यंदा हिमाचल प्रदेशात धरमशाला इथं कार्यरत डॉ क्षमा मेत्रे यांना, तर संस्थांसाठीचा पुरस्कार अमूल या संस्थेला जाहीर झाला आहे. आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. औरंगाबाद इथल्या वंदे मातरम् सभागृहात येत्या १२ फेब्रुवारीला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. हे पुरस्काराचं २८वं वर्ष आहे.
****
बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावं, लोकसहभागातून ही मोहीम पूर्णत्वाला जाऊ शकते असं, आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज या मोहिमेची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शहरातल्या सोमेश्वर मंदिराच्या नजीक पुलापासून शर्मा यांनी नदीपात्रात उतरून आज साफसफाईला सुरुवात केली. नदी खोलीकरणासाठी नाम ही स्वयंसेवी संस्था स्वतःहून पुढे आली असल्याने त्यांना या कामात सहभागी करून घेतलं जाईल असेही शर्मा म्हणाले.
****
औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या नवव्या पक्षी महोत्सवात आज सकाळी शहराजवळच्या सुखना प्रकल्प परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आलं. यावेळी बदक तसंच बगळ्यांचे विविध प्रकार, राजहंस, पाणकावळे तसंच आफ्रिकेतून येणाऱ्या कैकर या शिकारी पक्ष्यासह सुमारे ४० प्रकारचे पक्षी पहायला मिळाल्याचं, पक्षी तज्ज्ञ डॉ दिलीप यार्दी यांनी सांगितलं. या पक्षी निरीक्षणाला शहरवासियांसह शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. उद्या सकाळी पैठणजवळ जायकवाडी परिसरात पक्षी निरीक्षण होणार आहे.
****
सोलापूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेचं देवस्थान पंच कमिटीतर्फे सर्व नियोजन झाले असून होम मैदानावर मनोरंजनाची दुका��ं थाटली जात आहेत. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच सिद्धेश्वर यात्रा उत्साहात साजरी होणार आहे. दरम्यान, या यात्रेच्या पार्श्वभूमीवी सोलापूर बाजार समितीला सुटी असणार आहे. १३ जानेवारीला बाजार समिती सुरु राहील, पण कांदा लिलाव होणार नाही. तर १४ आणि १५ जानेवारीला बाजार समिती पूर्णपणे बंद राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड इथं जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या उपस्थितीत मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज पहिलं प्रशिक्षण शिबीर झालं. हे मतदान मतपत्रिकाद्‌वारे होणार आहे. त्यानुसार मतपेट्या, तसंच सुरक्षा कक्षाचं नियोजन आदीबाबत सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने एकूण तीन वेळा प्रशिक्षण होणार असून शेवटचं प्रशिक्षण तालुकास्तरावर होणार आहे.
****
लातूर शहरातल्या गर्भवतींना प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि प्रसुतीनंतर घरी परतण्यासाठी गैरसोय होवू नये म्हणून, लातूर महानगरपालिकेनं जननी रथ ही सुविधा चालू केली आहे. काल ६ जानेवारी पासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील एएनएम आणि आशा स्वयंसेविकांशी संपर्क साधावा, असं आवाहन लातूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
****
दक्षिण आशियाई देशांतील पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या सार्क पत्रकार मंचाची ऐतिहासिक परिषद १० आणि ११ जानेवारीला नवी दिल्ली इथं होत आहे. या परिषदेसाठी औरंगाबद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथले पत्रकार आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीची प्रतिनिधी अनिल साबळे हे ग्रामीण भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड या प्रशिक्षण विभागाच्या वतीने ‘लीड द एड-फ्युचर’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा पदक'
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला ‘परम विशिष्ट सेवा पदक’
नीरज चोप्रा पुरस्कार: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारे सुभेदार नीरज चोप्रा यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. नीरज हे भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहेत. आतापर्यंत नीरजला अनेक सन्मान मिळाले आहेत. ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
देशाचा ७३वा प्रजासत्ताक दिन! जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
देशाचा ७३वा प्रजासत्ताक दिन! जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
देशाचा ७३वा प्रजासत्ताक दिन! जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व दरवर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष होत आहेत. देशभरात यंदा आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. अश्यातच ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. २६ जानेवारी २०२२ रोजी ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. देशाची राज्य घटना २६ जानेवारी १९५०…
View On WordPress
0 notes
festivalpostermaker · 3 years ago
Text
26 January Poster Maker - Happy Republic Day Poster Maker - Gantantra Diwas 2022
26 January Poster Maker - Happy Republic Day Poster Maker - Gantantra Diwas 2022
Tumblr media
Republic Day is a National Holiday in India. The Flag of India on Republic Day poster to customized with your own photo. 26 January Poster Making & Video Status Android/iPhone Application for the users. On this day Parade, Flag Hoisting, Dance, Speech, Indian Army etc. User can create daily Post for Marketing of National & International Days.
Create 26 January Poster Maker in different Indian regional languages. Republic Day celebration 26 January 2022 with ready to use frame layout is available here. This day is celebrated all over the India by the people. Indian Festival Poster Maker & Video app where user can add Company Name, Logo, Address, Location, ID, Website & Contact Number to create marketing post in 1 minute.
Customized Gantantra Diwas Photo Editor feature is also offered where customer can add their own business image or personal pic. Decorate your favorite photos with Happy Republic Day Poster Maker readymade template. On this occasion of Ganatantra Divas 2022 a parade is held on Rajpath. Hurry up and be the part of the festival season by creating trending post for digital marketing.
How to Make Republic Day Poster ?
Download App and Select the Image/Video
Add Text, Change Font, Add Sticker & Text Color
Hide or Unhide The Company Inform
Opt the Frame Style
Lastly Save or Directly Share the Post
If you are worried for how to make a video status reels on republic day then download this app and create it easily. Happy Republic Day Poster Maker 2022 with latest quotes wishes. Create stunning poster & video status of Prajasattak Divas for your social media marketing in 1 minute. Huge collection of customizable design templates for 26 January 2022. Gantantra Diwas Photo Frame for the fans of India to create post instantly.
Ready to use India Republic Day 2022 background layout with Name and Logo. One can edit the information to display or not. Zoom and drag the logo to get the proper placement or size. Follow the step for how to make a poster on republic day from your own mobile. Collection of Republic day Background with Indian Flag Tricolor, Ashoka Chakras, Mahatma Gandhiji, Indian Map, Indian Historic Photos etc.
Gantantra Diwas Poster Maker app offer large collection of new frames to celebrate the day. Proud to be an Indian & Jai Hind photo background layout for the users. This app includes multiple images option to select your favorite one. Prajasattak Din wishes in languages such as Hindi, English, Kannada, Gujarati, Bengali Marathi, Telugu, Punjabi, Tamil etc.
भारतीय प्रजासत्ताक दिन को पोस्टर बनाए अपने मोबाइल से| गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं भेजिए वीडियो और पोस्टर पोस्ट द्वारा| 26 जनवरी फोटो फ्रेम २०२२ बनाएं इस ऐप्लिकेशन के साथ। 26 जनवरी वीडियो स्टेटस डाउनलोड करे और सोशल मीडिया पर पोस्ट करें| 26 जनवरी फोटो फ्रेम २०२२ एडिटिंग करे और अपना पोस्टर बनाये| इस फेस्टिवल पोस्टर मेकर और वीडियो ऐप के साथ रिपब्लिक डे पोस्टर बनाय|
Edit Republic Day Poster by choosing your favorite Font Style, Add Text & Background Color of your business details to make it attractive. After the poster or video is created one can share on Insta, WhatsApp, Twitter, Snapchat, Facebook, YouTube etc to promote the business with festival images.
Make an announcement of republic day sale best offers on your social media apps with your followers. One can create an advertisement with a festival poster maker by selecting your business type or random images. Free Poster Maker App with lots of new features in one application for the users. Download and start making All Types of Poster through this trending android/iphone application quickly.
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.****
सामाजिक ��्याय हे डिजिटल इनोव्हेशनचं प्रमुख उद्दीष्ट असलं पाहिजे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज डिजिटल भारत २०२२ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला एका बटणाच्या क्लिकवर देशाच्या दुर्गम भागात पोहोचता आलं, समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकांचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी, भारत योग्य उदाहरण मांडत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
भारत संधी आणि गुंतवणुकीचं जागतिक केंद्र बनलं असल्याचं, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर-२०२३ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. एनसीसीने गेल्या काही वर्षांमध्ये  चैतन्यशील, वैविध्यपूर्ण आणि शिस्तप्रिय तरुणांची केडर तयार केली आहे, जे जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत, असं उपराष्ट्रपती म्हणाले. या शिबिरात देशभरातून २ हजार १५५ केडेट्स सहभागी झाले आहेत.
****
मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने उद्यापासून दहा जानेवारी दरम्यान इंदूर इथं १७ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. 
****
नागरी विमान वाहतूक संचालनालयानं बेशिस्त प्रवाशांना हाताळण्यासाठी सर्व विमान कंपन्यांकरता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एखादा प्रवासी समजावूनही ऐकत नसेल, तर अशावेळी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे, असं यात म्हटलं आहे.
****
देशात काल ५६ हजार ९९७ नागरीकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं. देशात आतापर्यंत या लसीच्या २२० कोटी १३ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काल नव्या २१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या दोन हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास योजनेमुळे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विस्तार तसंच पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल, असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे एफ एम रेडिओची पोहच सहा लाख वर्ग किलोमीटरपेक्षा जास्त विस्तारेल. सुरुवातीला हा विस्तार नक्षलग्रस्त आणि सीमावर्ती भागात केला जाईल. येत्या चार वर्षात भौगोलिक क्षेत्रफळाच्या भाषेत एफ एमची पोहच सध्याच्या ५८ टक्क्यांवरुन ६६ टक्क्याच्यावर जाईल, असं त्यांनी सांगितलं. डीडी फ्री डिश नेटवर्कची क्षमता सध्या ११६ वाहिन्यांची आहे, २५० वाहिन्यांपर्यंत वाढेल, असं द्विवेदी म्हणाले.
****
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारकडून जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत तंत्र शिक्षणातल्या बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची निवड केल्याबद्दल, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. या प्रकल्पांतर्गत केंद्र शासनानं देशातल्या १५ राज्यांची निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचं केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयानं पत्राद्वारे कळवल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. प्रकल्पात निवड ��ालेल्या प्रत्येक पदवी संस्थेला दहा कोटी तर पदविका संस्थेला प्रत्येकी पाच कोटी रुपये असं मानधन अनुदान प्रकल्प कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालय आणि देशातल्या इतर उच्च न्यायालयांप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायदानाची व्यवस्था जनतेसाठी असून यामुळे सर्वसामान्यांना सहजपणे कामकाज बघता येईल, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी या प्रकरणात अधिक माहिती सादर करण्यात यावी, असे निर्देश देऊन सुनावणी २७ जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे.
****
हिंगोली इथल्या जिल्हा न्यायालयात आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असं आवाहन जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी केलं आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन टी -ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 27 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
शाळा, महाविद्यालयं तसंच विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात-मन की बातमधून पंतप्रधानांचं आवाहन.
एमजीएम विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लीट पदवी प्रदान.
परांडा इथल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.
आणि
भारत-न्यूझीलंडदरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द.
****
तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 परिषदेमध्ये सामील व्हावं, शाळा, महाविद्यालयं तसंच विद्यापीठांनी जी-20 शी स��बंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज बोलत होते. या कार्यक्रमाचा आज ९५वा भाग प्रसारित झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.
स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज आपले नागरिक नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताची आवड जगभरातच वाढली आहे, हे लक्षात ��ेत आहे, आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित ठेवणं, त्याचं संवर्धन करणं आणि जितकं शक्य असेल तितका त्याचा प्रसार करणं, ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य जाणून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे 
****
२०२३ सालच्या प्रजासत्ताक दिन समारंभात अरब प्रजासत्ताक- इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. २०२२-२३ मध्ये जी -२० च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात इजिप्तला ‘अतिथी देश’ म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ -२४ साठी सरकारनं लोकांकडून कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत. येत्या १० डिसेंबरपर्यंत या सूचना पाठवता येतील. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सहभागपूर्ण आणि सर्वसमावेशक करण्यासाठी तसंच लोकसहभागाच्या भावनेला चालना देण्यासाठी, अर्थमंत्रालय दरवर्षी नागरिकांकडून सूचना मागवतं. सर्वसमावेशक वाढीसह भारताला जागतिक स्तरावरच्या आर्थिक केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात मदत करू शकतील अशा आपल्या कल्पना आणि सूचना लोकांनी मांडाव्या असं आवाहन अर्थमंत्रालयानं केलं आहे.
****
राज्यात सुरू असलेल्या पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी तसंच ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर करण्यातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. मात्र, या शेवटच्या दिवसांत ऑनलाईन अर्ज करताना विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावं लागत आहे. भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. यामुळे ही मागणी केली असल्याचं मुंडे यांनी केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील बाया कर्वे पुरस्कार डॉ. बुधरी ताती यांना जाहीर झाला आहे. ताती या छत्तीसगडमध्ये दंतेवाडा नक्षलग्रस्त भागात गेल्या ३३ वर्षा पासून महिला सशक्तीकरणाचं कार्य करत आहेत. येत्या मंगळवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असं संस्थेच्या उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महर्षी कर्वे ��ांच्या पत्नी आनंदीबाई तथा बाया कर्वे यांच्या नावे १९९६ पासून हा पुरस्कार दिला जातो.
****
मराठवाड्यातलं पहिलं स्वयंअर्थसहाय्यित अभिमत विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ आज औरंगाबाद इथं झाला. या सोहळ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री मधुकर साठे यांनी ही पदवी स्वीकारली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तसंच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, नियामक मंडळाचे सदस्य कमलकिशोर कदम यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते यावेळी ५३४ विद्यार्थ्यांनाही या वेळी पदवी प्रदान करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा इथल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते आज सकाळी या शिबिराचं उद्‌घाटन झालं. या महाआरोग्य शिबिरात दोन दिवसात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, चाचण्या आवश्यकतेनुसार औषधोपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारावर पुढील उपचार सुरू होणार आहेत. काही गंभीर आजार आढळून आले तर त्या रुग्यांवर मोफत पुढील उपचार करण्यात येणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत सुक्ष्म पद्धतीने नियोजन केल्याने शिबिरास न भुतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, नंतर सामना २९ षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. पावसामुळं हा सामना उशिरा सुरू झाला होता. त्यामुळं केवळ २९ षटकंच खेळवली जाणार होती. त्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना १२ षटकं आणि ५ चेंडूत भारतीय फलंदाजांनी १ बाद ८९ धावा केल्या होत्या. कर्णधार शिखर धवन ३ धावा करुन बाद झाला. मात्र पावसामुळे खेळ थांबवावा लागला तेव्हा शुभमन गिल ४५ तर सूर्यकुमार यादव ३४ धावांवर खेळत होते. पाऊस न थांबल्यामुळे सामना रद्द करावा लागला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.
मालिकेतला तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना बुधवारी होणार आहे. त्यानंतर चार डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश संघात बांगलादेशात तीन एकदिवसीय सामन्यांची तसंच दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
****
अंबाजो��ाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज समारोप होत आहे. या समारोप सत्रात यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी पंजाबराव देशमुख, साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी इंदुमती जोंधळे, संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी सूरमणी बाबुराव बोरगांवकर तर प्रदीप जोगदंड तसंच रजनी वर्मा यांना शिल्पकलेसाठी युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातल्या अधिसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या ���ार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातल्या बॅडमिंटन सभागृहात उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काल या निवडणुकीसाठी सुमारे ५१ टक्के मतदान झालं. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. या निवडणुकीत १० जागांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात होते. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात ८३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
जी - ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी भारताला मिळाली असून, या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा आज ९५वा भाग प्रसारित झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानं, ही बाब अधिकच खास झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जी - ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक आणि अभिमान बाळगला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतातल्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय असून, आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात असल्याचं ते म्हणाले. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात असल्याचं सांगुन पंतप्रधानांनी, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं नमूद केलं. अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला असून, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येत असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. विविध देशांमध्ये भारतीय संगीताबद्दलची आत्मियता त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून यावेळी विषद केली.
भारत देश जगातल्या सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आपण खूप अभिमान बाळगतो. त्यामुळे आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं, ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात सध्या शिक्षणाचं क्षेत्र उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, उत्तर प्रदेशचे जतिन ललितसिंह आणि झारखंडचे संजय कश्यप या दोन शिक्षकांच्या कार्याची माहिती दिली.
आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 
****
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसि हे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून येणार आहेत. इजिप्तच्या राष्ट्रपतींची प्रजासत्ताक दिनाच्या येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि इजिप्तमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून, दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. भारताच्या जी-20 च्या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला 'अतिथी देश' म्हणून आमंत्रित करण्यात आलं ��सल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.
****
स्पेन मध्ये झालेल्या जागतिक युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकासह एकूण ११ पदक जिंकत दुसरं स्थान पटकावलं आहे. काल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुरेश विश्वनाथ, वंशराज, देविका घोरपडे आणि रविना यांनी सुवर्ण पदक जिंकलं. भावना शर्मा, कीर्ति आणि आशिष यांनी रौप्य, तर तमन्ना, कुंजरानी देवी, लशु यादव आणि मुस्कान यांनी कांस्य पदक जिंकलं.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता जपान विरुद्ध कोस्टारिका, संध्याकाळी साडे सहा वाजता बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, रात्री साडे नऊ वाजता क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, तर रात्री साडे बारा वाजता स्पेन विरुद्ध जर्मनी हे सामने होणार आहेत.
काल या स्पर्धेत अर्जेंटिनानं मेक्सिकोचा दोन - शून्य असा, तर फ्रान्सने डेन्मार्कचा दोन - एक असा पराभव केला. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा एक - शून्य असा, तर पोलंडनं सौदी अरेबियाचा दोन - शून्य असा पराभव केला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान ���ॅमिल्टन इथला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, नंतर सामना २९ षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. मात्र पाऊस सुरुच राहील्यानं सामना रद्द करण्यात आला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांनी एकत्र गायले राष्ट्रगीत, पहा व्हिडिओ
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांनी एकत्र गायले राष्ट्रगीत, पहा व्हिडिओ
ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक नायक: टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंनी २६ जानेवारीपूर्वी एका मंचावर येऊन राष्ट्रगीत गायले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (IISM) चा हा उपक्रम आहे, ज्यामध्ये या सर्व खेळाडू आणि पॅरा ऍथलीट्ससोबत एक व्हिडिओ बनवण्यात आला आहे. यामध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीनंतर भारताचे राष्ट्रगीत दाखवण्यात आले आहे. IISM…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
प्रजासत्ताक दिन बीटिंग रिट्रीटमधून महात्मा गांधींची आवडती धून अबाइड विथ मी का वगळण्यात आली, जाणून घ्या कारण
प्रजासत्ताक दिन बीटिंग रिट्रीटमधून महात्मा गांधींची आवडती धून अबाइड विथ मी का वगळण्यात आली, जाणून घ्या कारण
नवी दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या प्रकाशात केंद्र सरकारने महात्मा गांधींचे आवडते स्तोत्र ‘अबाइड विथ मी’ या वर्षीपासून ‘बीटिंग रिट्रीट सेरेमनी’ समारंभातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत विचारी आणि संवेदनशील लोकांना दुखावल्याचे म्हटले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·      कोविड संसर्गाचं प्रमाण घटत असल्यामुळे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत.
·      १२ मार्च रोजी नियोजित नीट-पीजी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
·      प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं राज्य आणि केंद्रशासित प्र��ेशांमधून पहिला क्रमांक पटकावला.
आणि
·      औरंगाबाद शहरातील सर्व माध्यमांचे इयत्ता ५ वी ते सातवीचे वर्ग येत्या सोमवार सात फब्रुवारी पासून सुरु करण्याचे निर्देश.
****
राज्यात कोविड संसर्गाचं प्रमाण घटत असल्यामुळे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करणार असल्याचे संकेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात बोलत होते. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोविडची तिसरी लाट ओसरेल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
सध्याच्या परिस्थितीत शासनाचा कल हा कुठल्याही परिस्थितीत निर्बंध वाढवण्याकडे नाही, निर्बंध कमी करण्याकडे आहे. त्याचं कारण असंय की जे काही निर्बंध लावण्यात आले होते, त्या सगळ्या निर्बंधांच्या बाबतीतसुद्धा सविस्तर चर्चा कॅबिनेटमधे झाली. निर्बंध हळूहळू, टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्याच दृष्टीकोनातून तुम्हाला दर आठवड्यात पाहायला मिळेल. आणि आपण मिड मार्चपर्यंत म्हणजे मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थर्ड वेव्हचं एंडॅमिक स्टेजपर्यंत जाईल असं मला तज्ज्ञांच्या काही आलेले मतं आहेत त्याच्यावरून या ठिकाणी मला सांगायचंय.
दरम्यान, जालना जिल्ह्यासाठी आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशनच्या सहकार्याने उपलब्ध करण्यात आलेल्या पाच फिरत्या दवाखान्याचं लोकार्पण टोपे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सामाजिक दायित्त्व निधीतून राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्येही येत्या काळात अशा फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी, उपचार, कोरोना चाचण्या, मधुमेह, रक्तदाब तपासणी आदी सुविधा देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात लसीचा तुटवडा जाणवू नये, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अनिवार्य असलेली नीट-पीजी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येत्या १२ मार्च रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या ६ विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात सध्या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली. त्यामुळे १२ मार्च रोजी नीट पीजी झाल्यास राज्यातले १५० विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. केरळमधल्या साडे तीन हजारांवर विद्यार्थ्यांची इंटर्नशिप ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. तर गुजरातमधील ३०० विद्यार्थ्यांची इंटर्नशिप जुलै महिन्यात संपणार आहे. अन्य राज्यातल्या विद्यार्थ्यांचाही हाच मुद्दा आहे, ही बाब लक्षात घेता न्यायालयानं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ��ेतला आहे.
****
प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं होतं. यंदा प्रथमच आवडत्या चित्ररथ तसंच संचलन तुकडीला माय गव्ह वरून मत देण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं.
उत्तरप्रदेशानं सर्वसाधारण पहिला क्रमांक पटकावला आहे. कर्नाटकनं दुसरा तर मेघालयनं तिसरा क्रमांक पटकावला. सशस्त्र दलांच्या चित्ररथातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं, केंद्रीय मंत्रालयांमधून शिक्षण मंत्रालय तसंच नागरी उड्डयन मंत्रालयानं, तर सैन्य दलांमधून वायुसेनेच्या संचलन तुकडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला सोमवार सात फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. या निमित्तानं अनेक सेवा कामांची सुरुवात होणार असल्याची माहिती जनकल्याण समितीच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे, १६ जिल्ह्यात सुरु असलेल्या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचा इतर ९ जिल्ह्यात विस्तार, तसंच योगप्रशिक्षण, ज्येष्ठांसाठी क्षेमकुशल उपक्रम, दिव्यांगासाठी संवेदना प्रकल्प निवास शाळा असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा यामध्ये समावेश असल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरातील सर्व माध्यमांचे इयत्ता ५ वी ते सातवीचे वर्ग येत्या सोमवार सात फेब्रुवारी पासून सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. शहरात कोविड रुग्णसंख्या घटत आहे, यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच आठवी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचं लसीकरण झालेलं असणे आवश्यक आहे  
****
किराणा दुकानांमधून वाईन विक्रीच्या परवानगीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणी इथं, आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीनं आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. जिल्हाभरातील महिलांच्या सह्या घेऊन हे निवेदन राज्यपालांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बोर्डीकर यांनी दिली.
दरम्यान, वाईन विक्रीच्या या निर्णयाचा महिला शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. परभणी तालुक्यातल्या मुरुंबा इथल्या महिला शेतकऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाला एक निवेदन सादर करत, वाईन विक्रीसोबत आता गांजा पिकवण्यासाठीची परवानगी मागितली आहे.
****
कणकवली इथले शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयानं १८ फेब्रुवारी पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणे यांच्या पोलीस कोठड��ची मुदत संपल्यानं त्यांना आ�� कणकवली दिवाणी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दरम्यान, कणकवली न्यायालयाच्या या निर्णयानंतर राणे यांच्या वकिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
RepublicDay Ahmednagar : कनोरे प्रशालेत प्रजासत्तक दिन उत्साहाता साजरा
#RepublicDay Ahmednagar : कनोरे प्रशालेत प्रजासत्तक दिन उत्साहाता साजरा #Ahmednagar
RepublicDay Ahmednagar : अहमदनगर (दि २७ जानेवारी २०२२) –    कल्याण रोड, ड्रिमसीटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाचे निवृत्त पर्यवेक्षिका सौ.मंगला पुरुषोत्तम मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी स्वकुळसाळी हित संवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
RepublicDay Ahmednagar : स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवून स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करु - बाळासाहेब भुजबळ
#RepublicDay Ahmednagar : स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवून स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करु - बाळासाहेब भुजबळ #Ahmednagar
     RepublicDay Ahmednagar : अहमदनगर (दि २७ जानेवारी २०२२) – स्वतंत्र्य भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन येथील ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मंगलगेट येथील जनमोर्चाच्या शाखा कार्यालयाच्या प्रागंणात राज्य उपाध्यक्ष शौकतभाई तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.      याप्रसंगी बाळासाहेब भुजबळ म्हणाले, यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
·      प्रजासत्ताक दिनानिमित्त नवं, बलशाली राज्य घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करू या - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन.
·      निर्भया पथकामुळं महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही.
·      मराठवाड्यात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा.
आणि
·      राज्यात कर वाढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत.
****
राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान असून स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवं, बलशाली राज्य घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करूया, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.  मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं त्र्यहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. राज्यानं आरोग्य, पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, वनं, सर्वसामान्यांना घरं, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा विविध क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात भरीव कामगिरी केल्याचं ते यावेळी म्हणाले. कोश्यारी यांनी यावेळी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
****
निर्भया पथकामुळं महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून निर्भया पथकासह विविध निर्भया उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. निर्भया संकल्पगीत���चं लोकार्पण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झालं. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केलं आहे. शेट्टी यांनी यावेळी ५० लाख रुपये निधी निर्भया पथकासाठी दिला. याच निमित्तानं मुख्यमंत्री निधीत धनादेशाद्वारे जमा झालेला ११ लाख रुपये निधीही महिला सुरक्षिततेच्या कामासाठीच वापरला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी बोलताना, निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याची माहिती दिली. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते निर्भया बोधचिन्हाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
****
मराठवाड्यामध्ये प्रजासत्ताक दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ऐकू यात या संदर्भातला वृत्तांत –
औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याची दखल राज्य मंत्रिमंडळानं घेतली असल्याचं सांगत देसाई यांनी प्रशासनाचं कौतुक केलं. विविध विकासात्मक कामांमुळं जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचं देसाई म्हणाले.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. देवगिरी किल्यावर नायब तहसिलदार प्रशांत देवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वीज महावितरण परिमंडल कार्यालयात व्यवस्थापकीय सहसंचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी घटना उद्देश पत्रिकेचं कर्मचाऱ्यांनी सामुहिक वाचन केलं.
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण करण्यात आलं.
नांदेड इथं पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. चव्हाण यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरीक, पत्रकार, युवक युवती यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस तसंच विविध दलाच्या पथकांनी यावेळी मानवंदना दिली.
बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस दलातले अधिकारी-कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंडे यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तुळजाभवानी क्रीडासंकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केला असून विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून प्रयत्न होत केले जात असल्याचं गडाख यांनी सांगितलं.
लातूर इथं पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं देशमुख यांनी मानवंदना स्वीकारून, उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोविड प्रादुर्भावाचा राज्याने तसंच लातूर जिल्ह्याने केलेल्या मुकाबल्याचा उल्लेख करत, संसर्ग टाळण्यासाठी नियमांचं पालन करावं, असं आवाहन देशमुख यांनी केलं. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला ५० हजार रुपये मदतनिधी दिला जातो, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ११६ मृतांच्या वारसांना सानुग्रह मदत निधी देण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. कोविडजन्य परिस्थितीत दोन्ही पालक गमावलेल्या जगनाथ नागोराव गाडे तसंच पंढरीनाथ महादू कांदे या बालकांना पाच लाख रुपये मुदतठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं.
हिंगोली शहरात संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. कोविडमुळं अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपये ठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. वीर मातेला सरकारच्या वतीनं चार एकर जमीन प्रदान करत असल्याचं प्रमाणपत्रही सुपूर्द करण्यात आले.
हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी, औरंगाबाद
****
राज्याचा अर्थसंकल्प अकरा मार्च रोजी जाहीर केला जाणार असून राज्यात कर वाढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यांना खूप फटका बसला आहे. गेल्या काळात `एक राष्ट्र, एक कर` असा निर्णय झाला आणि सेवा आणि वस्तू कर आला. त्याला आता पाच वर्ष झाली आहेत. त्या पाच वर्षांच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होतं. ती आता बंद होणार आहे, असं पवार म्हणाले. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कोरोना विषाणू संसर्गाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावं लागेल, असंही पवार म्हणाले.
****
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग येत्या एक फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजरोहण कार्यक्रमप्रसंगी ते आज बोलत होते. आपल्याला कोरोना विषाणू संसर्गा बरोबर राहायचं असल्यामुळं कृती दल आणि केंद्र सरकारच्या सुचनांचं पालन करावं लागेल, असं ते म्हणाले. राज्य, समाज आणि स्वतःच्या सुरक्षीततेसाठी नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं, नियमांचं पालन करावं, त्याद्वारे आपण लवकर संसर्गावर मात करू शकू, असं ते म्हणाले. संसर्गामुळं राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला आहे. निर्बंध लावण्यात आल्यानं उद्योजकांना नुकसान होत आहे. महसूल देखील कमी प्रमाणात जमा होत असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात ऑलिंपिक दर्जाच्या दहा मीटर `एअर फायरिंग रेंज` आणि मुष्टीयुद्ध `रिंग`चं लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झालं. पोलिस दलातल्या उदयोन्मुख खेळाडुंसह इतर खेळांडुंना सरावासाठी याचा उपयोग होऊन त्यांच्या खेळाचा दर्जा अधिक सुधारेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल असं देसाई यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातल्या कर्मचाऱ्यांनी आज `भीक मागा` आंदोलन केलं. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. आजच्या आंदोलनातून जमा झालेले पैसे निषेध नोंदवण्यासाठी प्रशासनाला पाठवणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी इथं आज पहाटे झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन ट्रक आणि एका सात आसनी वाहनांदरम्यान हा भीषण अपघात झाला. गंभीर जखमींमधे दोन पुरुष, दोन महिला, आणि तीन लहान मुलांचा समावेश असून हे सर्व उस्मानाबाद इथले राहणारे आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा..
****
·      ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आज सायंकाळी देशवासियांना संबोधन.
·      देशभरातल्या ९३९ पोलिसांना विविध पदकं जाहीर; महाराष्ट्रातल्या ५१ पोलिसांचा समावेश.
·      बारावा राष्ट्रीय मतदार दिवस आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा.
आणि
·      कोविड संसर्गाची तिसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त.
****
देशाचा त्र्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत उद्या सकाळी साडे दहा वाजता प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथावर होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीनही सैन्यदलांच्या संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारतील. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्राची वारली कला प्रदर्शित केली जाणार आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशातल्या नागरिकांना उद्देशून भाषण करणार आहेत. राष्ट्रपतींचं भाषण सर्व राष्ट्रीय वाहिन्या तसंच आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी सात वाजता प्रसारित होईल. त्याचबरोबर हे भाषण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून रात्री साडे नऊ वाजता प्रादेशिक भाषांमधून देखील ऐकता येईल.
****
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातल्या ९३९ पोलिसांना विविध पदकं जाहीर झाली आहेत.
यामध्ये ८८ जणांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे. यात राज्यातल्या चार जणांचा समावेश आहे. मुंबईचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय करगावकर, धुळे इथले राज्य राखीव पोलिस दलाचे कंमांडंट प्रल्हाद खाडे, पुणे इथले पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, आणि नांदेड इथले पोलिस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे.
१८९ जणांना शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर झालं आहे. यात महा��ाष्ट्रातल्या गोपाळ उसेंदी, महेंद्र कुलेटी, संजय बाकमवार, भरत नागरे, दिवाकर नारोटे, निलेश्वर पाडा, संतोष पोटावी या सात जणांचा समावेश आहे.
६६२ जणांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे. यामध्ये राज्यातल्या ४० जणांचा समावेश आहे. परभणी इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत हुंबे, लातूर इथले पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, औरंगाबाद इथले पोलिस निरीक्षक सुरेंद्र मळाले आणि परभणी इथले पोलिस निरीक्षक राजेश जाधव यांचा यामध्ये समावेश आहे.
 अग्निशमन विभागाचे विशिष्ठ पदकही जाहीर झाली आहेत. महाराष्ट्रातले अग्निशमन दलाचे जवान बाळू देशमुख यांना शौर्यासाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक मरणोत्तर जाहीर झालं आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झालं आहे. उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातले मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, आणि अग्निशमन दलाचे जवान सुरेश पाटील, संजय म्हामुनकर, चंद्रकांत अनादास यांचा समावेश आहे.
****
राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी नागरिकांनी प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नये असं गृह विभागाच्या परिपत्रकात आदेशित करण्यात आलं आहे. प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
****
बारावा राष्ट्रीय मतदार दिवस आज साजरा करण्यात आला. यंदाच्या राष्ट्रीय मतदान दिनाचं घोषवाक्य, ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्वक मतदान प्रक्रिया’ असं होत. यानिमित्त आज नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, तर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रीजीजू प्रत्यक्ष सहभागी झाले. यावेळी सुरक्षा व्यवस्थापन, निवडणूक व्यवस्थापन, सुलभ निवडणुका, मतदार जागृती तसंच प्रसार क्षेत्रातलं योगदान अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना २०२१ - २२ या वर्षासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मतदार दिनाचा राज्य शासनाचा मुख्य कार्यक्रम औरंगाबाद इथं झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी सुर्वे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदारांचे अधिकार आणि कर्तव्यांवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. यावेळी नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं.
देशात लोकशाही बळकट व्हावी तसंच आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत असल्याचं, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी म्हटलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि दयानंद कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमात उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी मार्गदर्शन करताना, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं.
परभणी इथं राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रथमच नाव नोंदणी केलेल्या नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप तसंच प्रथमच नोंदणी झालेल्या पाच तृतीयपंथी मतदारांचा सत्कार करण्यात आला.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली.
****
वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातल्या सेलसुरा इथं चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जवळपास ४० फूट पुलावरून गाडी खाली नदीत कोसळून हा अपघात झाला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.  
****
कोविड संसर्गाची एका महिन्यात तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेनं वर्तवली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. आज औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मात्र कोविड प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशासह राज्यात लसीकरणाचं उद्दीष्ट साध्य केल्यामुळे तिसऱ्या लाटेचा जास्त परिणाम जाणवत नसल्याचं देशमुख म्हणाले. औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयात वाहनतळ, खेळाचे मैदान, नर्सिंग महाविद्यालयाचा विस्तार, नवीन अभ्यासक्रम, विद्यार्थी वसतिगृह या मागण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.  
****
दरम्यान, औरंगाबाद अणि लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या कंत्राटी कामगार, सफाईगार तसंच बाह्य रुग्ण विभाग-ओपीडीतल्या वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी आयटक कामगार संघटनेच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात देशमुख यांनी मागेच आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी यावेळी विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी केली.
****
��रंगाबाद इथं गावठी बंदुक बाळगणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये शहरातल्या गजानननगर इथं राहणाऱ्या हितेंद्र वाघमारे आणि बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या हिरापूर इथं राहणाऱ्या अनिकेत वडमारे या दोघांचा समावेश आहे.  त्यांच्याकडून एक गावठी बंदुक, एक जिवंत काडतूस आणि इतर साहित्य असे एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करणार असल्याचं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Republic Day 2022 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनासाठी खास शुभेच्छा मेसेज!
Republic Day 2022 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनासाठी खास शुभेच्छा मेसेज!
Republic Day 2022 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनासाठी खास शुभेच्छा मेसेज! Republic Day 2022 Wishes in Marathi: २६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या खास दिवशी आपण आवर्जून एकमेकांना मेसेज पाठवतो. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर २६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचं औचित्य साधत शाळा आणि महाविद्याल्यात भाषणं, निबंध स्पर्धा आणि वादविवाद कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या…
View On WordPress
0 notes