#सुरतला
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय, परस्परांविरुद्धच्या अपात्रता याचिकाही फेटाळल्या
राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हाच आपला संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचं मागासलेपण दूर करण्यासाठी मिळणारा निधी प्राधान्याने वापरण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
आणि
नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष असल्याचं निर्णय दिला आहे. त्या सोबतच आमदार अपात्रता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाकडे असलेल्या नोंदीवरून एकनाथ शिंदे यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचं निरीक्षण नार्वेकर यांनी नोंदवलं. शिवसेनेच्या घटनेत २०१८ मध्ये केलेल्या कथित बदलाची निवडणूक आयोगाकडे नोंद नसल्याचं, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिलेल्या घटनेवर तारीख नमूद नसल्याने, पक्षाची १९९९ सालची घटनाच मान्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. पक्षाच्या प्रमुखाचं मत हे पक्षाचं मत होऊ शकत नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना नव्हता, या��ंदर्भात २५ जून २०२२ रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचे पुरेसे पुरावे नसल्याचं, नार्वेकर यांनी नमूद केलं. मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे आमदार संपर्कात नव्हते, हा दावा मान्य करता येणार नाही, असं ते म्हणाले. शिवसेनेत २१ जून २०२२ रोजी फूट पडली. त्या दिवसापासून सुनिल प्रभू यांचं प्रतोद पद अवैध ठरतं, त्यामुळे त्यांनी जारी केलेला व्हिप किंवा बोलावलेली बैठक वैध ठरत नसल्याचं सांगत, शिंदे यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती नार्वेकर यांनी वैध ठरवली.
दरम्यान, बच्चू कडू यांच्यासह दोन अपक्ष आमदारांविरोधातल्या अपात्रता याचिकाही राहुल नार्वेकर यांनी काल फेटाळून लावल्या.
****
राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हाच आपला संकल्प असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आमदार संतोष बांगर, खासदार हेमंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगला बदल झाला पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘शिवसेनेचा आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, हा एकनाथ शिंदे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या भल्यासाठी खर्च करणार आहे. या महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे. या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माताभगिनी, माझे तरूण बांधव यांच्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ जे आहेत ते, त्यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे.’’
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्यात २२ ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. त्या माध्यमातून दोन कोटी २० लाख लोकांना त्यांच्या घरी जाऊन शासकीय योजनांची मदत देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यवतमाळ जिल्ह्यात पोफाळी इथल्या वसंत सहकारी साखर कारखानाच्या गाळप हंगामांचं उद्घाटन तसंच साखर पूजन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल पार पडला, यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. १०० रुपयात मिळणाऱ्या या आनंदाच्या शिध्यात एक किलो साखर, एक किलो खाद्यतेल आणि प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा, तसंच पोहे दिले जातील. २२ जानेवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान हे वाटप होणार आहे.
कुपोषणावर मात करण्यासाठी, ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातल्या अतितीव्र कुपोषित बालकांसाठी, नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली. १०४ नागरी प्रकल्पांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात वाढ करून हे अनुदान ५० हजार रुपयांवरुन एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपटासाठी कर सवलत देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचं मागासलेपण दूर करण्यासाठी पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम, नीती आयोगाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना यांच्या माध्यमातून मिळणारा निधी प्राधान्याने वापरावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक योजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शिर्डीच्या धर्तीवर नांदेडचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असून, विमानसेवा सुरु करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्याचं मागासलेपण आणि दुष्काळी परिस्थिती पाहता, जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देण्यात येईल, असं आश्वासन पवार यांनी दिलं. यावेळी परभणी जिल्ह्याच्या वार्षिक योजना प्रारुप आराखड्यात ७२४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, बीड जिल्ह्याचा ४०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १७१ कोटी ४९ लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी केली. त�� छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित वाढीव आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं. घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद व्हावी, जिल्ह्यातील पर्यटन सुविधा तसंच क्रीडांगणांचा विकास यासाठीही तरतूद व्हावी अशी मागणी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी केली.
****
नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या श्री खंडोबा यात्रेला काल येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात बेलभंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. खंडोबाच्या पालखीच्या मानकऱ्यांचं शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीनं मानाचा फेटा, श्रीफळ, मानधन देऊन स्वागत करण्यात आलं. सकाळी शासकीय पूजेनंतर दुपारी पालखी पूजन होऊन देव स्वारी काढण्यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल विकसित भारत संकल्प ��ात्रेनं विविध गावांना भेटी देऊन शासकीय योजनांबाबत नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी यावेळी आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांसाठी नोंदणी केली.
**
परभणी जिल्ह्यात बळीराम शिंदे आणि संगीता गायकवाड या लाभार्थ्यांनी आपल्याला झालेल्या लाभाची मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत माहिती दिली...
****
इंडोनेशियात जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटील आणि मेहुली घोष यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये रिदम संगवान आणि अर्जुन सिंग चीमा यांच्या जोडीला मिश्र दुहेरीत रौप्य पदक मिळालं. १० मीटर एअर रायफल एकेरीत रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत ८ पदकं मिळाली आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात येत्या १५ ते १७ जानेवारी दरम्यान विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून होत असलेल्या या व्याख्यानमालेत यंदा पर्यावरणवादी लेखिका-कार्यकर्त्या डॉ. वंदना शिवा, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार आणि बालशिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक रमेश पानसे यांची व्याख्यानं होणार आहेत.
****
नांदेड शहरालगत असलेल्या वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये तातडीने रूपांतर करण्याची मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री, पैठण आणि वैजापूर तालुक्यातल्या ११ वाळू घाटांमधून ६५ हजार ब्रासहून अधिक वाळू उपलब्ध होणार असल्याची माहिती, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिली आहे.
****
0 notes
Text
हिर्यांची राजधानी मुंबईतून सुरतला
https://bharatlive.news/?p=180080 हिर्यांची राजधानी मुंबईतून सुरतला
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
Text
विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा गुजरात दौरा, पक्षाच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी आज सुरतमध्ये बैठक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा गुजरात दौरा, पक्षाच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी आज सुरतमध्ये बैठक होणार आहे.
आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत (अरविंद केजरीवाल गुजरात दौरा). केजरीवाल आज सुरतमध्ये बैठक आणि पत्रकार परिषद घेणार आहेत. अरविंद केजरीवाल बुधवारी रात्री सुरतला पोहोचले. गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकागुजरात विधानसभा निवडणूक 2022त्यामुळे आम आदमी पक्ष राज्यात सातत्याने सक्रियता वाढवत आहे. या एपिसोडमध्ये पार्टी (गुजरातमध्ये आप) संयोजक आणि…

View On WordPress
0 notes
Text
श्रीमंत.....भाग – ३
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजीराजांनी अदिलशहाचा बराचसा प्रदेश काबीज करण्याचा धडाका लावला. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा स्वराज्यात आला. विजापूर दरबार हादरले. पुढच्याच वर्षी १६६० ला अदिलशहाने सिद्धी जोहरला मोठी फौज देऊन शिवरायांचा बिमोड करायला पाठवले. त्यावेळी शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्यास वेढा देवून बसले होते. सिद्धी येण्याची खबर मिळताच ते सुरक्षिततेसाठी पन्हाळ्याला आले. सिद्धीने २ मार्च १६६० ला पन्हाळ्याला वेढा घातला. काही करुन शिवाजीला पकडायचेच असा सिद्धीने निर्धार केला होता. इंग्रजांच्या मदतीने दारुगोळ्याचा वर्षाव सुरु झाला. वेढा तोडणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर शिवाजीराजांनी वेगळाच डाव टाकला. शिवा काशीद हा न्हावी शिवाजीराजांसारखाच दिसायचा. राजांनी सिद्धीला तहाच्या बोलणीत गुंतवले आणि शिवा काशीदला नकली शिवाजी बनवून सिद्दीकडे मेण्यात बसवून पाठवले. त्याचवेळी वेढयातली ढील हेरून १२ जुलै १६६० ला राजे भर पावसात रात्रीच्या अंधारात बेमालुमपणे सहाशे निवडक सैन्यासह विशाळगडावर जाण्यासाठी निघाले. सिद्धीला ही खबर लागली आणि त्याने सिद्धी मसाऊदला शिवाजीराजांच्या मागावर धाडले. पन्हाळा ते विशाळगड २७ मैलाचे अंतर चिखलातून पार करत राजे १३ जुलै १६६० ला घोडखिंडीजवळ पोहोचले होते. त्यावेळीच गनीम जवळ आल्याची खबर आली. ‘लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशींदा जगला पाहिजे’ ही शपथ घालून बाजीप्रभू देशपांडेने तीनशे सैन्यासह राजाला विशाळगडाकडे जाण्यास भाग पाडले. गडावर पोहोचल्यावर तोफांचा आवाज करायला सांगितले. राजे गेले आणि गनीमाबरोबर दिवसभर लढता लढता तीनशे मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले. गडावरुन तोफांचा आवाज आल्यावरच बाजीप्रभूंनी आपला देह खाली ठेवला.
सिद्धीने विशाळगडलाही वेढा घालण्याचा प्रयत्न केला, पण तो मराठ्यांनी उधळून लावला. चिडलेल्या सिद्धीने पन्हाळा घेण्यासाठी आक्रमण सुरु केले. मराठ्यांची हानी होवू नये म्हणून शिवाजीराजांनीच २२ सप्टेंबर १६६० रोजी पन्हाळा सिद्धी जोहरच्या ताब्यात दिला.
तीनशे मावळे, बाजीप्रभ��, शिवा न्हावी यांनी बलिदान देवून आपल्या पोशिंद्याचे रक्षण केले. अशा असंख्य लोकांमुळेच स्वराज्याचा पाया भक्कम बनला होता. या योद्ध्यांच्या जाण्याने राजांना प्रचंड दु:ख झाले. पण शोक करायलाही वेळ नव्हता. इकडे औरंगजेबाने शिवाजीराजांचा बिमोड करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी शाहिस्तेखानाला औरंगाबादला पाठवले होते. २८ जानेवारी १६६० ला त्याने औरंगाबाद सोडले आणि अहमदनगरला छावणी केली. तिथून २५ फेब्रुवारी १६६० ला निघून तो ३ मार्च १६६० ला स्वराज्यात घुसला. स्वराज्यात त्याने खूप अराजकता माजवली. अनेक मंदिरे फोडली, शेतीची धुळधाण केली, रयतेला लुटले. सोनवडी, सुपे, शिरवळ, इंदापूर, बारामती इ. भागावर ताबा मिळवला आणि ९ मे १६६० ला तो पुण्यात आला. शिवाजी महाराजांचे बालपण ज्या महालात गेले त्या लाल महालावर त्याने कबजा केला.
अदिलशहा आणि मुघलांच्या आक्रमणाने चारी बाजूने स्वराज्यावर संकट आले होते. शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी दोन्ही शाह्यांनी कंबर कसली होती. पन्हाळ्यावर सिद्धीच्या तावडीत शिवाजी अडकेल या विचाराने शाहिस्तेखान पुण्यात आरामात थांबला होता. पुणे प्रांतात त्याचा हैदोस चालूच होता. १५ ऑगस्ट १६६० ला त्याने चाकणचा किल्ला घेतला. मराठ्यांनी त्यासाठी त्याला ५६ दिवस खेळवले होते. शिवाजीराजे १३ जुलै १६६० रोजीच पन्हाळ्यावरुन निसटले होते त्यामुळे मराठ्यांमध्ये खूप जोश भरलेला होता.
कोकण त्याब्यात घेण्यासाठी त्याने कारतलबखानाला मोठ्या फौजेनिशी पाठवले. पण शिवाजीराजांनी त्याला उंबरखिंडीत गाठून त्याची प्रचंड दुर्दशा केली. त्याला संपूर्ण लुटून २ फेब्रुवारी १६६१ रोजी सोडून दिले.
पन्हाळ्यावर इंग्रजांनी सिद्धी जोहरला मदत केली होती. मार्च १६६१ ला शिवाजीराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार पूर्णपणे लुटली, बेईमान इंग्रजांना कैद केले आणि राजापूर ताब्यात घेतले. त्याचवेळेस सिद्धीला मदत करणार्या सूर्यराव सुर्वेचे शृंगारपूर २९ एप्रिल १६६१ ला ताब्यात घेतले. सूर्यराव निसटून जाण्यात सफल राहिला.
शाहिस्तेखानाकडे शिवाजीराजांचे लक्ष होतेच. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. त्यामुळे कोकण मोहीम आटोपती घेऊन जुलै १६६१ मध्ये राजे राजगडावर आले. शाहिस्तेखानाने जरी स्वराज्यात धुमाकूळ घातला तरी अनेक ठिकाणी त्याच्या फौजेला मराठ्यांनी गनीमी काव्याने सतावून सोडले होते. शाहिस्तेखानाला स्वराज्यातून हुसकावून लावणे हा एकच ध्यास शिवाजीराजांनी घेतला होता. अनेक खलबतानंतर बेत ठरला आणि नेताजी पालकर व मोरोपंताच्या फौजेच्या तुकड्या घेऊन राजे स्वत: वेष बदलून पुण्यात शिरले. केवढे हे धाडस! ५ एप्रिल १६६३ रोजी स्वत: ��ाजे काही निवडक सोबती घेऊन लाल महलात बेमालुमपणे दाखल झाले. लहानपण याच लालमहलात गेलेले असल्यामुळे तिथली खडानखडा माहिती राजांना होती. मराठे महालात शिरल्याची खबर लागताच एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळून गेलेला शाहिस्तेखान खिडकीतून उडी मारुन पळून जात असतांना राजांच्या तलवारीने त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे कापून काढली. कुणाला काही कळण्याच्या आत शिवाजीराजे बिनबोभाट सिंहगडावर पोहोचले. शिवाजी अचानक प्रकट होतो, त्याच्या अंगात दैवी शक्ती आहे, असा समज झालेला बिना बोटाचा खान आपल्या शाही लवाजम्यासह ८ एप्रिल १६६३ रोजी पाय लावून दिल्लीकडे पळाला.
शाहिस्तेखान पळून गेल्यानंतर शिवाजीराजांनी आक्रमक धोरण अवलंबले. मुघलांनी स्वराज्यात केलेली प्रचंड हानी त्यांच्याकडूनच वसूल करण्यासाठी मुघलांच्या राज्यातील संपन्न शहर सुरत लुटण्याचे शिवाजीराजांनी ठरवले. बहिर्जी नाईकने सुरतची खडानखडा माहिती पुरवली. नेताजी पालकरच्या साथीने मराठ्यांनी ५ जानेवारी १६६४ ते १० जानेवारी १६६४ या सहा दिवसात सुरतला बेसुरत केले. प्रचंड लुटीसह राजे राजगडावर परत आले.
शाहिस्तेखानाला हुसकावून लावल्यानंतर पुणे परगणा सोडून गेलेली रयत परत पुण्यात येवू लागली. याच काळात एक आघात झाला. २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजी राजांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. जिजाऊ सती जायला निघाल्या. राजांनी त्यांची मनधरणी करुन त्यांना त्यापासून प्रवृत्त केले. सुरत मोहिमेवरुन राजे वेळेवर पोहोचले नसते तर अघटीत घडले असते.
To be cont'd....
© नितीन म. कंधारकर
0 notes
Text
खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा
खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा
मालेगावहून सुरतला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी दुरध्वनीमुळे शुक्रवारी रात्री चांगलीच खळबळ उडाली. मात्र, बॉम्बशोधक व नाशक पथकाने बसची दोन तास तपासणी केल्यानंतर काहीच हाती लागले नाही. त्यामुळे प्रवांशासह पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला.
शुक्रवारी रात्री अकरा वाजता मालेगावच्या आंबेडकर पुतळा परिसरातील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस मालेगाव येथुन सुरतला…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 October 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
गोर गरिबांच्या सामाजिक न्याय तसंच आरोग्य, घर निर्माणावर सरकारचा भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलनं
आणि
ज्येष्ठ किर्तनकार बाबामहाराज साताराकर यांचं निधन
****
सरकार गोर गरिबांच्या सामाजिक न्याय तसंच आरोग्य, घर निर्माणावर अधिक भर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं एका जाहीर सभेत मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या छोट्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले -
महाराष्ट्र के छोटे किसानों के बँक खातों में भी छब्बीस हजार करोड रूपये ट्रान्सफर हुये है। मुझे इस बात की खुशी है, की महाराष्ट्र सरकार ने नमो शेतकरी महासम्मान योजना शुरू की है। इसके तहत महाराष्ट्र के शेतकरी परिवारों को छह हजार रूपये और अतिरिक्त दिये जायेंगे।
वाहून जाणारं पाणी मराठवाडा, विदर्भा��डे वळवावं, यासाठीचा मोठा खर्च राज्याच्या आवाक्या बाहेरचा आहे. याकरता केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. मराठवाडा, विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्रात पडणारा दुष्काळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी मिळावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणांमध्ये राज्यातल्या विकास प्रकल्पांची माहिती दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डी इथं साडे सात हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कार्याचं उद्घाटन, लोकार्पण केलं. अहमदनगरमधल्या अत्याधुनिक माता आणि शिशू रुग्णालयाचं तसंच आयुष रुग्णालयाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी झालं. कुर्डूवाडी- लातूर रोड रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचं लोकार्पण तसंच जळगाव ते भुसावळच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरणासह लोकार्पण यावेळी करण्यात आलं. इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेडच्या मनमाड टर्मीऩलवर अतिरिक्त सुविधा या प्रकल्पाचं उद्घाटनही या���ेळी मोदींच्या हस्ते करण्यात आलं. साई बाबा मंदिरातला दर्शन रांग प्रकल्प, मराठवाडा, विदर्भाला कोपरगांवशी जोडणारा महामार्ग प्रकल्प याचं लोकार्पणही पंतप्रधानांनी आज केलं केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलकांनी आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पेंडगाव आणि पंचक्रोशीतल्या कार्यकर्त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केलं. गेवराई तालुक्यात मादळमोही इथंही ग्रामपंचायत कार्यालयाच्या टॉवरवर चढत आंदोलन करण्यात आलं. सकल मराठा समाजाच्या धुळे शाखेतर्फे आज या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील मौजे देवजना इथल्या एका तरुणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आत्महत्या केली. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या निपाणी इथल्या एका युवकानंही काल आत्महत्या केली.
****
हिरे उद्योगांसह अन्य मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे उद्योग मागील दीड वर्षांपासून सातत्यानं सुरु असून इतर उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. भारतीय जनता पक्षानं मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योग, महत्वाची कार्यालयं, संस्था, महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचा सपाटा लावलेला आहे, असं ते म्हणाले. जातन��हाय जनगणनेची भूमिका राज्यातल्या जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसतर्फे येत्या तीन जानेवारीपासून ओबीसी जनजागरण यात्रा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडे आज सोपवण्यात आला. कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांचा कार्यकाळ पाच नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळं कुलपती रमेश बैस यांनी सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडे हा पदभार सोपवला. सहा नोव्हेंबरपासून पुढील सहा महिने अथवा नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत डॉ. महानवर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार पाहतील.
****
औरंगाबाद महापालिकेनं मालमत्ता कर थकबाकीपोटी मिटमिटा इथल्या एका व्यावसायिक मालमत्तेला आज टाळं ठोकलं. या मालमत्ताधारकांनं महापालिकेचा साडे वीस लाख रुपयांहून अधिक कर थकवला आहे. महापालिकेतर्फे सर्व विभाग कार्यालयांत थकीत मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यात येत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नेरूळ इथल्या राहत्या घरी वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. उद्या दुपारी चार वाजता नेरुळ इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीव देहावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीनं घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत बाबा महाराज सातारकर यांचं निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध त्यांनी लढा दिला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबामहाराजांना श्रध्दांजली वाहिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं ओबीसी, एन टी, व्हीजेएनटी, भटक्या जाती, अलुतेदार, बलुतेदार समाजातील वेगवेगळ्या जाती संघटनानी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी प्रवर्गात ईतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी तसचं नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करावी, या मागण्यांसाठीही हे आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजी नगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये आज साहित्यिक विनीता तेलंग यांचं `राष्ट्रीय उभारणीत महिलांचं योगदान` या विषयावर व्याख्यान होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या व्याख्यानानं तापडिया नाट्यमंदिरात सुरू या व्याख्यानमालेचं काल उद्घाटन झालं. या व्याख्यानमालेचा समारोप उद्या राज्याचे उच्च शिक्षण संचालक डा शैलेश देवळाणकर यांच्या व्याख्यानानं होणार असल्याचं संयोजकांनी कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला विभागातर्फे छाऊ नृत्यनाट्य कला प्रकाराची कार्यशाळा आज सुरू झाली. पश्चिम बंगाल, बिहार, ओडीसा या राज्यात हा कलाप्रकार प्रसिद्ध आहे. चार नोव्हेंबर पर्यंत ही कार्यशाळा कला विभागात सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान चालेल, असं विभागप्रमुखांनी म्हटलं आहे.
****
तंबूद्वारे चित्रपट दाखवणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष समीर दीक्षित यांनी म्हटलं आहे. या संदर्भातली बैठक काल छत्रपती संभाजी नगर इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातले व्यावसायिक या बैठकीत सहभागी झाले. त्यांनी आपापल्या भागातून आणलेली माती यावेळी अमृत कलशामध्ये एकत्र करण्यात आली. हा कलश दिल्लीला मुख्य कार्यक्रमासाठी पाठवणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं १८ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३९ कांस्य पदकांसह एकूण ८१ पदकं जिंकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या पॅरा-अॅथलीट्सच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
****
0 notes
Text
नाशिकहून सुरतला जाणारे कॉंग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात
https://bharatlive.news/?p=80419 नाशिकहून सुरतला जाणारे कॉंग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ...
0 notes
Text
“चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार २ मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही ?”
“चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार २ मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही ?”
“चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार २ मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही ?” मुंबई – “छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणारे हे सरकार सीमा प्रश्नाला, मराठी बांधवांना न्याय देईल असे वाटत नाही. आता महाराष्ट्रालाच उठाव करावा लागेल. 20 लाख मराठी बांधव कानडी जोखडात गेल्या 50-60 वर्षांपासून अडकून तडफडत आहेत. त्यांची बाजू मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकू, मुस्कटदाबी करू, अशा धमक्या…

View On WordPress
#‘शिंदे#“चाळीस#२#Adventure#आमदारांचे#आहे#खोके#गंभीर#नाही#पाठवणारे#पाठवू#पार्सल#बेळगावात#मंत्री#मुद्दा#शकले#सरकार#सुरतला
0 notes
Text
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही ?”
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही ?”
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही ?” मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रकरणी वाद सुरु झाल्यानंतर बेळगावत वाहनांवर झालेल्या दगडफेकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४८ तासाचा अल्टिमेटम देखील दिला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी,रात्रीच्या अंधारात…

View On WordPress
#Adventure#अंधारात#आमदारांना#आहे#कर्नाटकला#का#गंभीर#तसं#नाही#पाठवता#पाठवलं#मंत्र्यांना#मुद्दा#येऊ&8217;;#रात्रीच्या#शकतं!#सुरतला
0 notes
Text
रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं…रोहित पवारांचे खोचक ट्विट, काय म्हणाले रोहित पवार…
रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं…रोहित पवारांचे खोचक ट्विट, काय म्हणाले रोहित पवार���
रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं…रोहित पवारांचे खोचक ट्विट, काय म्हणाले रोहित पवार… अहमदनगर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर खोचक टीका केली आहे. सूरतवारी ते सरकार पाडण्यापर्यंतचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवरून टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद हा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांची…
View On WordPress
#अंधारात#आजच्या प्रमुख घडामोडी#आमदारांना#काय?#खोचक#ट्विट#पवार#पवारांचे#पाठवता#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#म्हणाले#येऊ&8217;;#राजकारण#राजकारण लेटेस्ट#रात्रीच्या#रोहित#शकतं…रोहित#शासन#सरकार#सुरतला
0 notes
Text
चहुबाजूंनी आरोप, वर्षभर चौकशी, सरकार बदललं-क्लिनचिट मिळाली, राठोडांना मंत्रिपदाचीही लॉटरी
चहुबाजूंनी आरोप, वर्षभर चौकशी, सरकार बदललं-क्लिनचिट मिळाली, राठोडांना मंत्रिपदाचीही लॉटरी
चहुबाजूंनी आरोप, वर्षभर चौकशी, सरकार बदललं-क्लिनचिट मिळाली, राठोडांना मंत्रिपदाचीही लॉटरी Sanjay Rathod : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. एकनाथ शिंदे सुरतला निघून जाण्यापूर्वी संजय राठोड हे सतत त्यांच्यासोबत वावरत होते. याशिवाय, बंजारा समाजात संजय राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#आरोप#चहुबाजूंनी#चौकशी#ठळक बातमी#ताजी बातमी#बदललं-क्लिनचिट#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मंत्रिपदाचीही#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मिळाली?#राजकारण#राठोडांना#लॉटरी#वर्षभर#सरकार
0 notes
Text
“उद्धव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?”; संजय राऊतांकडून मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पोस्ट
“उद्धव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?”; संजय राऊतांकडून मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पोस्ट
“उद्धव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?”; संजय राऊतांकडून मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पोस्ट शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या मुलाखतीचा ट्रेलर पोस्ट केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची महामुलाखत घेतल्याचं…
View On WordPress
#असते?#आजची बातमी#आताची बातमी#उद्धव#गेले;#ट्रेलर#ठळक बातमी#ठाकरे#तर#ताजी बातमी#दुसऱ्या#पोस्ट#बातम्या#भागाचा#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मुलाखतीच्या#राऊतांकडून#राजकारण#संजय#सुरतला#स्वतः
0 notes
Text
Uddhav Thackeray : शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांशी डील करण्याचा प्रयत्न?; मोदी, शहांनाही फोन?
Uddhav Thackeray : शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांशी डील करण्याचा प्रयत्न?; मोदी, शहांनाही फोन?
Uddhav Thackeray : शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांशी डील करण्याचा प्रयत्न?; मोदी, शहांनाही फोन? Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे 26 आमदारांना घेऊन सुरतला गेल्याचं 21 जून 2022 रोजी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या. शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी ठाकरे यांनी नवा डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मुंबई: शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे…
View On WordPress
#thackeray#uddhav#आजची बातमी#आताची बातमी#उद्धव#करण्याचा#ठळक बातमी#ठाकरेंकडून#डील#ताजी बातमी#प्रयत्न#फडणवीसांशी#फोन#बंडानंतर#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मोदी#यांच्या#राजकारण#शहांनाही#शिंदे
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
· दक्षिणेतल्या देवस्थानांप्रमाणे पंढरपूरचा विकास करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
· शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटाच्या ५३ आमदारांना विधिमंडळ सचिवालयाची नोटीस.
· औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या ठरावाबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती-खासदार शरद पवार यांच्याकडून स्पष्ट.
· आषाढी एकादशीचा उत्सव मराठवाड्यात भक्तिभावाने साजरा.
आणि
· कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची सुखरुप सुटका.
****
दक्षिणेतल्या देवस्थानांप्रमाणे पंढरपूरचा विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज पंढरपूर इथं शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्य शासन राज्यातला सर्व घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे, हे सर्व सामान्यांचं सरकार आहे असं शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या ४० आमदारांचा उठाव ही ऐतिहासिक घटना असून, हा उठाव सत्तेसाठी नसल्याचा, पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. आपण मुख्यमंत्री असलो तरी सर्वसामान्यांचा सेवक म्हणून कार्यरत राहणार असल्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंढरपूर इथं ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत विजेत्या कार्यालयाला पारितोषिक वितरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हा उपक्रम कार्यक्षमपणे राबवण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.
****
विधीमंडळ सचिवालयाने शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटाच्या ५५ पैकी ५३ आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि त्यानंतर झालेला मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव या दोन्हींसाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून आपापल्या समर्थक आमदारांना पक्षादेश-व्हीप बजावण्यात आला होता. यामध्ये आपलाच व्हीप अधिकृत असा दोन्ही गटांचा दावा आहे. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांच्या व्हीपचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी पाठवलेल्या या नोटिसीत आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे आ��ित्य ठाकरे यांना ही नोटीस बजावण्यात आलेली नाही. उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
****
गेल्या सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतराचा ठराव घेतला, त्याबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती असं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांच्या नामांतराऐवजी या शहरातल्या पाणी पुरवठ्यासह इतर नागरी समस्या आणि मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं आपण म्हणालो नाही, अडीच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असं आपण कार्यकर्त्यांना सुचवलं असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली, अशी तत्परता दाखवणारे ते पहिले व्यक्ती असल्याची उपरोधिक टीका पवार यांनी केली.
शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाला काहीही आधार नसल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले –
कुणी हिंदुत्वाचा विषय काढतो, कुणी राष्ट्रवादीचा विषय काढतो ह्या सगळ्या गोष्टी सुरतला गेल्याच्या संबंधीचा निर्णय झाला. त्यानंतर हे झालेलं आहे. त्याच्या आधी निदान माझ्या तरी काही कानावर याची अशी काही गोष्ट आलेली नाही. तर जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाला काही आधार नाही. पण त्यामुळे काही तरी लोकांच्या समोर स्पष्टीकरण केलं पाहिजे याशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही.
२०२४ ची निवडणूक महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र लढवावी अशी आपली इच्छा आहे. मात्र त्याबाबत मित्रपक्षांसोबत अद्याप चर्चा झालेली नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं.
****
नागपूर मधल्या डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचं अनुकरण संपूर्ण देशात केलं जाणार असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते. एकाच पीलरवर उड्डाणपूल आणि मेट्रो असल्याने तसंच महा मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सोबत काम केल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली असून, कामही गुणवत्तापूर्ण झाल्याचं गडकरी यांनी सांगितलं. असाच डबल डेकर उड्डाणपूल पुण्यातही बांधला जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
****
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९८ कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन कोटी ६० लाख ७३ हजार ३६५ लसीकरण सत्रांतून १९८ कोटी ७६ लाख ५९ हजार २९९ नागरिकां��ा कोविड लस देण्यात आली. यामध्ये तीन कोटी ६५ लाखांवर किशोरवयीन नागरिकांचा समावेश आहे.
****
आषाढी एकादशीचा उत्सव आज मराठवाड्यातही भक्तिभावाने साजरा झाला. औरंगाबाद शहरात आज सकाळपासून पावसाची झड लागलेली असूनही, नागरिकांनी शहरातल्या विठ्ठलमंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात रस्त्यावरून जाणाऱ्या दिंड्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.
औरंगाबाद जवळील प्रतिपंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत एकनाथ महाराजांचा 'हरिपाठ' ग्रंथांचं वितरण करण्यात आलं. यावेळी विजय महाराज खेडकर तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.
आमदार संजय शिरसाट यांच्या वतीनं वारकऱ्यांना फळवाटप करण्यात आलं. विविध सेवाभावी संस्था संघटनांच्या वतीनं प्रति पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाविकांसाठी मोफत चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
****
जालना जिल्ह्यातल्या प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. सालाबादाप्रमाणे आज सकाळी आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. नगरप्रदक्षिणा करून ही मिरवणूक सायंकाळी मंदिरात पोहोचेल. पावसाची संततधार सुरू असतानाही पाखली मिरवणुकीत सहभागी भाविकांचा उत्साह कायम असून, सर्व धर्मियांकडून पालखीचं ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं जात आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजूर पोलिस आणि जहागिरदार वाडीतल्या युवकांनी सुखरुप सुटका केली. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि कळसूबाई शिखराच्या परिसरात कालपासून अतिवृष्टी होत आहे. पावसाचा अंदाज न आल्याने काल हजारो पर्यटक कळसूबाई शिखराकडे गेले होते. अडकलेल्या गिर्यारोहकांनी पोलिस मदत केंद्राला फोन करत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गाईड आणि गावकऱ्यांच्या मदतीने मोहीम राबवत पर्यटकांची सुटका केली.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाच्या संततधारांमुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर धरणात ४० टक्के पाणी साठा झाला असून, भावली धरणात ५९ टक्के तर दारणा धरणात ६१ टक्के साठा झाला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्यामुळे पालखेड धरणातून पाच हजार तर दारणा धरणातून तीन हजार आठशे दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
निम���न दुधना धरणाच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहता, धरणातून कधीही पाणी विसर्ग करावा लागू शकतो, यामुळे धरणाच्या खालील बाजूस दुधना नदीपात्राजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या जालना कार्यालयाचे कार्यकारी अभियंता एस बी कोरके यांनी याबाबत सेलू, मानवत परभणी इथल्या उपविभागीय अधिकारी तसंच तहसीलदार यांना पत्र पाठवून सूचित केलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील पाच डोंगरी आणि कोयलारी या गावातील दूषित पाणी प्यायल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या चार व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रशासनाने चोवीस तासात ५ लाख रुपयांचे मदतीचे धनादेश पाठवले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दूरध्वनी वरुन संपर्क करुन आढावा घेतला. जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेचे विविध चमू घटनास्थळी कार्यरत असून, पाच डोंगरी, कोयलारी काट कुंभ आणि चूरणी इथंल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या २३१ असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी सांगितलं.
****
0 notes
Text
“आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी आम्ही…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा
“आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी आम्ही…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा
“आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी आम्ही…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा सुरतमध्ये असणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने संजय नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठवण्यात आलेलं. शिवसेनेचे बंडखोर आमदार राज्यामध्ये परत येऊन आपआपल्या मतदारसंघामध्ये परतले आहेत. एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुंबईमध्ये आपआपल्या…
View On WordPress
#असं…”#आजची बातमी#आताची बातमी#आदित्य#आमदारांचा#आम्ही#खळबळजनक#ठळक बातमी#ठाकरेंना#ताजी बातमी#त्यावेळी#दावा#पाठवतो#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मुख्यमंत्री#म्हणाले#राऊतांसंदर्भात#राजकारण#संजय#सुरतला
0 notes
Text
शिंदे गटाचे आमदार बंडानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात, शिवसेनेच्या महिला आघाडीची घोषणाबाजी
शिंदे गटाचे आमदार बंडानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात, शिवसेनेच्या महिला आघाडीची घोषणाबाजी
शिंदे गटाचे आमदार बंडानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात, शिवसेनेच्या महिला आघाडीची घोषणाबाजी आमदार किणीकर हे पहिलेपासून कट्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक मानले जातात. सर्व आमदार यांनी बंड केल्यानंतर सुरतला गेले यात पण बालाजी किणीकर होते. नंतर गुवाहाटी, मग गोवा आणि मुबंईला आले. आता बालाजी किणीकर यांनी आपल्या मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. मात्र, शहरातील प्रश्न घेऊन पालिकेत आले असताना आमदार…
View On WordPress
#‘शिवसेनेच्या#आघाडीची#आजची बातमी#आताची बातमी#आमदार#गटाचे#घोषणाबाजी#ठळक बातमी#ताजी बातमी#पहिल्यांदाच#बंडानंतर#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मतदारसंघात#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#महिला#राजकारण#शिंदे
0 notes