#‘शिवसेनेच्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्सेलिसच्या जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त
राज्यात मत्स्योत्पादन वृद्धीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षण कार्यक्रम
शिक्षण आणि जीवन व्यवहारांत समन्वयाची आवश्यकता-राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून इंग्लंडसमोर ३५७ धावांचं लक्ष्य
****
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये मार्सेलिसच्या जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते आज आपल्या फ्रान्स दौऱ्यात मार्सेलिस इथं पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या ठिकाणाचं मोठं महत्त्व असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आठ जुलै १९२० रोजी जहाजातून उडी मारुन मार्सेलिस बंदर गाठलं होतं. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्ते आणि जनतेप्रति त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्या हस्ते आज मार्सेलिस इथं भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मोदी यांनी मॅक्रॉ यांच्या समवेत मार्सेलिस इथल्या युद्ध हुतात्मा स्मारकाला भेट देऊन, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना अभिवादन केल��. पंतप्रधानांच्या मार्सेलिस भेटीबाबत तिथल्या भारतीय समुदायामध्ये उत्साहाचं ��ातावरण असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अपयशाची भीती न बाळगता आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रीत करण्याचं आणि दुबळी बाजू बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन दीपिकाने विद्यार्थ्यांना केलं.
****
टाटा स्मारक केंद्र आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स यांनी, स्तनाच्या कर्करोगाच्या काही रुग्णांकडून हार्मोन उपचारांना प्रतिसाद न मिळण्यामागची जनुकीय कारणं शोधून काढली आहेत. या शोधामुळे अशा रुग्णांसाठीची उपचार योजना ठरवण्यात मदत मिळणार आहे. या शोधात, हार्मोन उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या आणि प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांच्या जीनोमचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ट्यूमरमधल्या तीन प्रमुख जनुकांमध्ये उत्परिवर्तन आढळलं. हा शोध म्हणजे कर्करोगाच्या वैयक्तिकृत उपचारांमधलं एक महत्त्वाचं मार्गदर्शक पाऊल आहे, असं प्रमुख संशोधक डॉ. निधान बिस्वास यांनी सांगितलं आहे.
****
राज्यात गोड्या पाण्यातलं तसंच समुद्रातलं मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे तसंच सागरी किनारपट्टीच्या एका जिल्ह्यातही हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करावी, अशा सूचनाही राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार असलेल्या वाढवण बंदरासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीकरता एक प्रशिक्षण कार्यक्रम आखून तो तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही राणे यांनी यावेळी दिले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार झालेले नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या किरण सामंतांकडून पराभव झाला होता. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलनार गावांजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पोलिस अंमलदार महेश नागुलवार यांना आज गडचिरोली इथल्या पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर संध्याकाळी नागुलवार यांच्या पार्थिवदेहावर अनखोडा या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागुलवार यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, नागुलवार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दोन कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली आहे.
****
थोर समाज सुधारक दयानंद सरस्वती यांची आज जयंती आहे. समाजाला जागरूक करण्यासाठी, तसंच भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी महर्षी दयानंद आयुष्यभर झटत राहिले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
संत रविदास यांची जयंतीही आज देशभरात साजरी केली जात आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविदास यांना अभिवादन केलं.
बीडमध्ये संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात सामाजिक एकतेचा संदेश देणारी फेरी तसंच संत रविदास यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथंही रविदास यांना अभिवादन करण्यात आलं.
****
शिक्षण आणि जीवन व्यवहारांत समन्वयाची आवश्यकता राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे. आज सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण आणि व्यवहाराचा हा समन्वय साधण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. या विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सहाशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांपैकी ���त्कृष्ट गुण मिळविलेल्या तीन स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
****
शुभमन गीलची शतकी खेळी आणि विराट कोहलीपाठोपाठ श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय क्रिकेट संघानं पाहुण्या इंग्लड संघासमोर ३५७ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना अहमदाबाद इथं सुरू आहे. मालिकेतले पहिले दोन सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
****
पुण्यातल्या म्हाळुंगे-बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अद्ययावत कराव्यात, असे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत भरणे यांनी गणवेशाचा दर्जा, प्रशिक्षकांचं मानधन तसंच भोजन दर ��ाबाबतही सूचना केल्या. कोल्हापूर इथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यालाही या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात शेळका धानोरा इथले महादेव विठ्ठल कांबळे यांच्या शेतात एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापरातून मिरची पिकाचं संगोपन केलं जात आहे. सयाजी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने आयसीआयसीआय फाउंडेशनकडून वापरात आणलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेणारा हा वृत्तांत –
शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये असलेली आर्द्रता, हवामानाचा परिणाम, औषध फवारण्या तसेच पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन करण्यास मदत होत आहे. यासाठी जमिनीमध्ये वाफे पद्धतीने लावलेल्या मिरच्यांच्या मुळाशी सेंसर लावून ते सेंसर संदेश टॉवर पर्यंत पोहोचतात, हा टॉवर २४ तास कार्यरत राहून संबंधित शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर संदेशाद्वारे अवगत केलं जातं. त्यामुळे पिकांची जोपासना करण्यास आणि शेती उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला हा वापर धाराशिव जिल्ह्यातील पहिलाच पथदर्शी प्रयोग असून इतर शेतकऱ्यांना हा मार्गदर्शक ठरणार आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
****
चव्वेचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या पंधरा आणि सोळा तारखेला आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाचं अध्यक्षपद डॉ. भीमराव वाघचौरे भूषवणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रतिष्ठित व्यापारी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन विश्वनाथ पेंढारकर यांना या वर्षाचा ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या नऊ मार्च रोजी हिंगोली इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
****
परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी तसंच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा ��ाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
0 notes
Text
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी , जिथे जाईल तिथे..
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ,’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे. जिथे जाईल तिथे पोखरायला सुरुवात करते ,’ असे म्हटलेले आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ,’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आधी दिसत नाही पण नंतर कळते की वाळवी लागलेली आहे. आपल्याला वाळवी सारखे काम करायचे नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. प्रखर…
0 notes
Video
youtube
शिवसेनेच्या रणरागिणी नाशिक पुर्व विधानसभेसाठी सज्ज..
0 notes
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी ��हा >>
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-both-candidates-of-shiv-sena-have-a-close-fight/
0 notes
Text
जालन्यात महायुतीत बिघाडी..जालन्यात शिवसेना शिंदे गटाच्या भास्कर मगरे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.
शिवसेना भाजपची युती असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चर्चांना उधाण.. भास्कर मगरे रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवे आव्हान उभे करणार.. गोरगरीब कष्टकरी व गायरान जमिनीसाठी लढा देणारे ॲड.मगरे लोकसभेच्या रिंगणात.. शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲड. भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज.. जालन्यात शिवसेनेच्या दलित आघाडीच्या जिल्हाप्रमुखाने लोकसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दानवेंच्या अडचणीत…

View On WordPress
0 notes
Text
शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

View On WordPress
0 notes
Text
आदेश बांदेकरांच्या जागी सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची नियुक्ती
https://bharatlive.news/?p=188667 आदेश बांदेकरांच्या जागी सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी ...
0 notes
Text
आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
मुंबई : दसऱ्याच्यानिमित्ताने आज (दि. २४) होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. मागील वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. यंदाच्या भाषणामध्ये उद्धव…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक २५ टक्क्यांची कपात केली आहे. मुंबईत बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. यामुळे आता रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्क्यांवरुन सहा पूर्णांक २५ टक्के इतका झाला आहे. यामुळे व्याजदरात कपात होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
तीन नवीन फौजदारी कायद्यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात डिजिटल प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, हे भारताच्या न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलाचं प्रतिनिधित्व करणारे कायदे गेल्या वर्षी एक जुलै पासून देशभरात लागू करण्यात आले. काही कलाकार पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि या कायद्यांबाबत जागरुकता निर्माण करत आहेत.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात देशभरात २५ कोटींह���न अधिक रोजगारनिर्मिती झाल्याची माहिती, राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. उत्पादन क्षेत्रात सात कोटींहून अधिक जणांना रोजगार मिळाला असून, सेवा क्षेत्रात हीच संख्या १७ कोटी इतकी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
विकसित भारताचं पंचप्राण ध्येय साध्य करण्यासाठी महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं असून, या क्षेत्रात शतावरी ही वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. शतावरी - उत्तम आरोग्यासाठी या देशव्यापी मोहीमेला काल जाधव यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
नवीन प्राप्तीकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार असून, विधेयकाचा मसुदा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय अर्थसचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका व्यापारी संघटनेनं आयेजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन विधेयकात धोरणात्मक बदल फारसे नाहीत, मात्र लांबलचक वाक्य आणि क्लिष्ट रचना टाळून सर्वांना समजेल अशी सोपी भाषा वापरली आहे, असं ते म्हणाले. हे विधेयक मंजूर झाल्यावर १९६१च्या प्राप्तीकर कायद्याची जागा घेईल.
शेतकरी-कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडताना साहित्यिकांनी समाज प्रबोधनावर भर द्यावा, असं आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड इथं काल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल शिंदे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडणाऱ्या साहित्य निर्मितीमुळे समकालीन सामाजिक प्रश्न, लोकजीवन, लोकसंस्कृती, निसर्गसौंदर्य, शेतीचे प्रश्न समाजासमोर येतात. साहित्यातून समाजजीवन प्रतिबिंबित होते आणि मानवी जीवनाला दिशा मिळते, असं ते म्हणाले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विजया रहाटकर यांचा काल नाशिक इथं श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी आणि आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. गावाची, देशाची संस्कृती टिकवण्याचं कार्य महिलांनीच केलं, मात्र, सध्या विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था अडचणीत असून त्या सांभाळण्याची जबाबदारी केवळ महिलांचीच नाही, तर पुरुषांचंही तितकंच योगदान आवश्यक असल्याचं मत, रहाटकर यांनी व्यक्त केलं.
सरकारी संस्था संपवण्याचं विद्यमान सरकारचं उद्दीष्ट असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत काल रेल्वे कामगार सेनेच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हा पुतळा बसवू, असा इशारा त्यांनी यवेळी दिला. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होत नसल्याबद्दलही त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.
खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पण पॅरोल रजेवर बाहेर आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या दोन साथीदारासह अटक केली. त्याच्याकडून चार पिस्टल आणि २४ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातल्या धार्मापुरी इथल्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम याबाबत काल कार्यशाळा घेण्यात आली. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
जागतिक महिला दिनानिमित्त येत्या आठ मार्चला बीड इथं तुलसी शैक्षणिक समुहाच्या वतीनं महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. पाच किलोमीटर अंतर असलेल्या या मॅरेथॉनमधल्या विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
0 notes
Text
‘ ह्या ‘ निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना बंद होणार
‘ ह्या ‘ निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना बंद होणार #LadakiBahin #CMO #Maharashtra
राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झालेले असले तरी ही योजना अवघे काही दिवस सुरू राहणार असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे . ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा माजी खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. काय म्हणाले विनायक राऊत ? महाराष्ट्र कर्जामध्ये डुबलेला आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची…
0 notes
Text
वाटचाल नव्या विकासपर्वाकडे...

तूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाचा वास्तवदर्शी आणि सत्याची झालर असलेला इतिहास कोणी लिहीला आहे की नाही, ठावे नाही. परंतु अशा इतिहासाची पाने जेव्हा केव्हा लिहीली जातील, त्यावे���ी सध्याच्या राज्य सरकारचे नाव नोंदवावे लागणार आहे. या संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेणारे आधुनिक भगीरथ म्हणूनही या सरकारचा उल्लेख केल्यास वावगे ठरणार नाही. तीर्थक्षेत्रापासून स्वार्थक्षेत्रापर्यंत, कलेपासून ��लेवरापर्यंत आणि संन्यासापासून पदन्यासापर्यंत जीवनातील प्रत्येक क्षेत्र गढूळ होत चालले आहे की काय अशी शंका यावी असे वातावरण भवतालात असताना अशा स्थितीतही जगण्याची गणितं शोधण्यासाठी अंधाराशी चाललेल्या लढाईत सर्वसामान्य माणसांची ताकद वाढेल असा उजेड सध्याच्या भाजप- शिवसेनेच्या युती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यात आणला आहे. मुळात लातूर जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती ओळख पुसून टाकण्यासाठी हे राज्य शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना येत्या २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास पावणेचार लाख कुटुंबांना नळजोडणी मिळणार आहे. यासाठी जवळपास ५४८ कोटी रुपयांच्या ९३५ योजनांना सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्णही झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळजोडणीद्वारे पेयजलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. नळ पाणीपुरवठ्याची सोय नसलेल्या आदिवासी गावे, वाड्या, पाडे येथील कुटुंबांना या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाड्या यांनाही या योजनेतून नळजोडणी देण्यात येते आहे, हे विशेष. वर उल्लेख केल्याप्रमाणे, जिल्ह्यात या मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या ९३५ योजनांपैकी लातूर तालुक्यासाठी १३५ योजना असून या तालुक्यातील ६५,८९२ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. पाणी हा जगण्याचा मूलमंत्र आहे. त्याच्याशिवाय जगता येत नाही. जगणेही शक्य नाही. याची जाणीव ठेवून लातूर जिल्ह्याचा रखरख असलेला जलनकाशा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे एक हिरवेगार स्वप्नच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यांत दिसते. कुठेही चर्चा नाही. कामाचा गवगवा नाही. राज्य शासनाने पावसावर विसंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत या जिल्ह्यात वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७५ टक्के – म्हणजेच सुमारे ७५,००० रु. पर्यंत – अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट ३७५ शेततळ्यांचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्रधारण कमाल मर्यादा नाही, याचाही येथे उल्लेख करायला हवा. लातूर जिल्ह्यातील उद्योगधंदे, कृषितंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विजेसारख्या मूलभूत सुविधेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानुसार सामाजिक जाणिवेचे भान ठेवून राज्य सरकारने जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याचे धोरण अंगीकारलेले असले तरी सौरऊर्जा निर्मितीवरही शासनाने अधिक भर दिलेला आहे. जिल्ह्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी खाजगी जमीन भाडेपट्ट्याने घेतली जाणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतक-यांना प्रति हेक्टरी दरवर्षी ७५,००० रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून आतापर्यंत शंभरेक प्रस्ताव सादर झाले असून त्याद्वारे सुमारे १,४३७.७३ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणा-या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून १६०.११ मेगावॅट विद्युत निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने परंपरागत कृषिविकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत जिल्ह्यातील ३०० हेक्टरवर सेंद्रीय शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १५ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, ३ वर्षांत प्रत्येकी १० लाखांचे अर्थसहाय्य त्यांना मिळणार आहे. या सरकारने परंपरागत कृषिविकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक गटाला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने १० लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून, यामध्ये सहाय्यकारी संस्थांमार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रादेशिक परिषदेद्वारे पी. जी. एस. प्रमाणीकरण, डीबीटी द्वारे शेतक-यांना प्रोत्साहन, मूल्यवृद्धी, विपणन आणि प्रसिद्धी आदी बाबींसाठी प्रति हेक्टरप्रमाणे पहिल्या आणि तिस-या वर्षी प्रत्येकी १६,५००, दुस-या वर्षी १७,००० रु. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही स्वप्ने साकार करण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीनधारण क्षमता, बैलांची कमी झालेली संख्या, शेतीकामासाठी कमी झालेली मजुरांची संख्या व वाढते मजुरीचे दर, पिकांमध्ये व फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण आखले आहे. या जिल्ह्यातील २१७५ शेतक-यांना या अंतर्गत विविध अवजारे आणि यंत्रांसाठी जवळपास १० कोटी १ लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. कृषि विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या कृषि यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलरचलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनि��स् आदी बाबींसाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी एक लाख ते सव्वा लाख रुपये, तसेच अन्य बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प किंवा अत्यल्प भूधारक व महिला शेतक-यांना ५० टक्के, तर इतर शेतक-यांना ४० टक्के अनुदान दिले जाते. वाढती लोकसंख्या आणि औद्योगीकरणात जंगले नष्ट होत असतानाच राज्य सरकारने राज्यात बांबूक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली आहेतच. लोकसंख्यावाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदूषण यासारख्या प्रश्नांवर मात करावयाचे असेल तर बांबूक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. सर्वाधिक ऑक्सिजन देणा-या वृक्षांमध्ये बांबूचा समावेश आहे. त्यामुळे वृक्षाच्छादन कमी असलेल्या लातूर जिल्ह्यात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बांबू केवळ ऑक्सिजनचा स्रोत नसून रोजगारनिर्मितीचे साधनही असल्यामुळे औसा तालुक्यातील लोदगा येथे बांबूपासून विविध वस्तू, फर्निचर बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तयार बांबूंची खरेदी करून बचत गटांच्या सुमारे ३०० महिला या बांबूपासून विविध साहित्य, फर्निचरची निर्मिती करतात. त्यामुळे शेतकरी व महिला बचत गटांना आर्थिक सुबत्ता येऊ लागली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना ६ हजार रुपयांची मदत केली आहे. राज्य सरकारने त्यात आणखी ६ हजार रुपयांची भर घातली असून आता शेतक-यांना दरवर्षी प्रति शेतकरी १२ हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे, ही या सरकारची मोठी उपलब्धी मानावी लागेल. विविध निराधार योजनांमधूनही शासनाने वयोवृद्ध निराधारांच्या हाती जगण्याचे बळ दिले आहे. याशिवाय लातूर जिल्ह्यात कृषि आधारित १४ उ���प्रकल्प उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट प्रकल्प राबविण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील १४ उपप्रकल्पांसाठी जवळपास २२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या माध्यमातून गोदाम, स्वच्छता प्रतवारी युनिट व दाळ मिल आदी उपप्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून लातूर जिल्ह्यातील ७ कोटी ४७ लाखांच्या १०८ प्रकल्पांना या सरकारने मंजुरी देऊन एका नव्या क्रांतीकडे पाऊले टाकली आहेत. या योजनेतून वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या ३४ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे. समाजातील महिला घटकांचा विचारही राज्य सरकारने प्राधान्याने केला असून महिला सन्मान योजना त्याकरिता शासनाने आणली आहे. या योजनेअंतर्गत म��ाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महामंडळाच्या साधी बस, मिनी बस, निमआराम बस, विनावातानुकूलित शयन – आसनी बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि अन्य सर्व बसेसमधून प्रवास करणा-या महिलांना या योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. अर्थात महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. एका नव्या विकासपर्वाकडे लातूर जिल्ह्याची वाटचाल राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सुरू आहे. विकासाकडे बघण्याचा हा मानवीय आणि समग्रतावादी दृष्टिकोन झाला. अख्ख्या जगण्याचे वारूळ होऊन माणसांचे समूहच्या समूह कोसळताना आपण कोरोनाकाळात पाहिले. परंतु आता मनाला आधार देणारे राज्य शासन विविध विकास योजना आणून या जिल्ह्यात विकासाची नवी पाऊले उमटवू पाहत आहे. यही है जिंदगी, कुछ ख्वाब, चन्द उम्मीदें… इन्हीं खिलौनों से तुम भी बदल सको तो चलो... – असे हे शासन पाठीवर थाप टाकून म्हणत आहे. नव्या जागरणाच्या अशा मांदियाळीचे आपण स्वागतच करायला हवे! -जयप्रकाश दगडे, ज्येष्ठ पत्रकार, लातूर Read the full article
0 notes
Video
youtube
शिवसेनेच्या कार्यालयावर नाशिक महापालिकेचा हातोडा..
0 notes
Text
सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, शिवसेनेच्या माजी महिला आमदारासह जिल्हा प्रमुख आणि 19 जणांना 5 वर्षाची शिक्षा
नांदेड : नांदेडमध्ये 2008 साली महागाई विरोधात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या तत्कालीन आमदारांसह एकूण 19 जणांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी 19 जणांना प्रत्येकी 5 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.आंदोलन कर्त्यांनी 8 एसटी बसेस आणि एका महापालिकेच्या बसची तोडफोड केली होती. या प्रकरणी अतिरिक्त न्यायाधीश एस.ई.…

View On WordPress
0 notes
Text
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथ , काय आहे मजकूर ?
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथ , काय आहे मजकूर ?
राज्यात झालेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेनेचा उद्धव गट असलेल्या निष्ठावंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर एकनिष्ठतेची शपथ लिहून घेतली जात आहे. एकीकडे फुटलेल्या आमदारांना मोठे कोट्यावधींचे आमिष दिल्याची चर्चा असतानाच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा प्रकार केला जात असल्याने चर्चेला ऊत आलेला आहे तर अनेक शिवसैनिक खाजगीमध्ये हा प्रकार हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया देखील…

View On WordPress
#100 rs bind shivsena#shivsena#काय आहे मजकूर ?#शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथ
0 notes