#गेले;
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 2 years ago
Text
आभाळंच फाटलं कुठं कुठं शिवणार ? सासू सासरे दिंडीला गेले अन..
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नगर तालुक्यातील आठवड गावच्या शिवारात एका महिलेने मुलासोबत शेतात उडी घेत आत्महत्या केलेली आहे. 23 तारखेला शुक्रवारी दुपारी ही घटना घडलेली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोमल राजेंद्र नवले ( वय 25 वर्ष ) आणि यश राजेंद्र नवले ( वय आठ दोघेही राहणार आठवड ) अशी त्यांची नावे असून कोमल यांच्या पतीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले...
मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ही सगळी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला त्यांच्या गावी निघून गेल्याची आणखी एक वदंता राजकीय वर्तुळात पसरली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 5 months ago
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे ��ळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मार���ोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील ��नेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम क���लेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य ज��त असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाच�� आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes · View notes
alkabirislamic · 11 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
मोहम्मदजीं चा मोक्ष नाही झाला!
फरिश्ते जिबराईल मोहम्मदजी ना खेचरा वर बसवून वर घेऊन गेले. जिथे त्यांनी हजरत मुसा, इसा, आणि इब्राहिम जी यांना बघितले. या वरून हे सिद्ध होते की त्यांचा पण मोक्ष नाही झाला आहे, तर मुस्लिम समाजातील लोकांचा मोक्ष कश्याप्रकारे संभव आहे?
Tumblr media
23 notes · View notes
haveyoubeentothiscity · 9 months ago
Text
लोकसंख्या: ६,२००,००० (6,200,000)
भाषा: मराठी (Marathi)
Credit to @oneparticularharbor for the translation. धन्यवाद!
11 notes · View notes
impossibleperfectiongarden · 6 months ago
Text
Tumblr media
परमेश्वर कबीर जी सहशरीर सतलोकात कसे गेले पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
4 notes · View notes
gitaacharaninmarathi · 3 months ago
Text
49. स्थितप्रज्ञा ही आंतरिक घटना आहे
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञ हा स्वत:बद्दल समाधानी असतो (2.55). यातील गंमतीचा भाग असा की स्थितप्रज्ञ चालतो-बोलतो कसा या अर्जुनाच्या प्रश्नाला मात्र श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही.
‘स्वत:बद्दल समाधानी’ ही पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे आणि बाह्य वर्तनावरून तिचे अनुमान किंवा आकलन अजिबात शक्य नाही. एखाद्या परिस्थिती अज्ञानी मनुष्य आणि स्थितप्रज्ञ सारख्याच भाषेत बोलू शकतो, एकसारखाच चालू–वागू शकतो. या परिस्थितीमुळे आपल्या मनात स्थितप्रज्ञतेबद्दल अधिकच गुंतागुंत निर्माण होते.
कृष्णाचे आयुशःय हे स्थितप्रज्ञतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो जन्मत:च आपल्या पालकांपासून दूर झाला. ‘त्याला ‘माखनचोर’ म्हणून ओळखले गेले. त्याचे प्रेम, नृत्य आणि बासरी या सगळ्यांच्या कथा झाल्या, मात्र जेव्हा त्याने वृंदावन सोडले त्यानंतर तो या प्रेमासाठी कधीही परत आला नाही. गरज होती तेव्हा तो लढला आणि जीवही घेतले, पण विविध वेळी त्याने युद्ध टाळले आणि त्यातून त्याला रणछोडदास असेही नाव मिळाले. त्याने अनेक चमत्कार दाखवले आणि मित्र म्हणूनही तो सर्वोत्तम होता. लग्न करायची वेळ आली तेव्हा त्याने ते केले, कुटुंब सांभाळले, चोरीचा खोटा आळ नष्ट करता यावा म्हणून समंतक मणी त्याने शोधून आणला आणि गीतेचे ज्ञान सांगायची वेळ आली तेव्हा ते ही केले. एका सामान्य माणसासारखा त्याचा मृत्यू झाला.
सर्व प्रथम, त्यांच्या जीवनाची रचना वर्तमानात जगण्याची आहे. दुसरे म्हणजे, कठीण परिस्थितीतही ते आनंदाचे आणि उत्सवाचे जीवन आहे, कारण त्याने अडचण��ंना अनित्य मानले. तिसरे, श्लोक 2.47 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्यासाठी स्वतःवर समाधानी असणे म्हणजे निष्क्रियता नाही, तर कर्तात्वाची भावना आणि कृतीच्या परिणामाची अपेक्षा सोडून कृती करणे असा होतो.
मूलत:, भूतकाळाचे ओझे मनावर न घेता आणि भविष्याकडून कोणतीही अपेक्षा न करता वर्तमान क्षणात जगायला हवे. या वर्तमान क्षणात शक्ती आहे आणि नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सगळे काही याच वर्तमान क्षणात घडत असते.
2 notes · View notes
happilyevr · 1 year ago
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगर���त वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या स��कलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes · View notes
bandya-mama · 2 years ago
Text
Bandya : अरे यार लाइट गेले.
Pradip : लाइट गेले आहेत, तर पंखा चालू कर.
Bandya : बोललास ना मूर्खासारखं,
पंखा चालू केला तर मेणबत्ती विझणार नाही का?
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😩😩😩😎😎😎😉😉😉🤣🤣🤣
2 notes · View notes
boltevha · 2 years ago
Video
तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लग्न केले गेले, बलात्कार केला गेला, जबरदस्त...
2 notes · View notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
दरम्यान, ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या ��ेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे.
एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाचवेळी निवडणूक घेण्यावर भर दिला जात असून, तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून, तरुणांनी यात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वेमार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं रावल यांनी सांगितलं.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची, टँकरमधल्या पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आबीटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या ��ुग्णांवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले तीन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन निमगिरे यांनी केलं.
बुलडाणा इथं अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्रात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं लोकार्पण केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाना आवश्यक साहित्य जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते ४७ दिव्यांगांना तीन लाख ५१ हजार रुपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केल�� आहे.
0 notes
nagarchaufer · 15 days ago
Text
नगर जिल्ह्यातील गाजलेल्या ‘ ह्या ‘ प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे वर्ग
नगर जिल्ह्यातील गाजलेल्या ‘ ह्या ‘ प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे वर्ग
नगर जिल्ह्यातील गाजलेल्या पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील दीपक उंडे प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे. ०४ डिसेंबर २०२२ रोजी दीपक उंडे हा तरुण रहस्यमयरित्या गायब झालेला होता. पारनेर पोलीस स्टेशनचे तीन पीआय बदलून गेले मात्र तरीही तपासात प्रगती दिसून आली नाही.  उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या संदर्भात ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली होती आणि तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग…
0 notes
news-34 · 15 days ago
Text
0 notes
adbanaobrandbadhao · 24 days ago
Text
तिळगुळाच्या गोडव्यासह बिझनेस मध्ये ग्राहकांची गर्दी वाढावा
मकरसंक्रांतीच्या परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या! गोड सणासोबत तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी AdBanao app वापरा आणि स्पेशल पोस्टर्स, अॅड्स, आणि स्टिकर्स तयार करा
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं म्हंटल कि आपसूकच कोणता सण आहे हे आपल्याला कळते. जानेवारी महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. भारतातील अनेक सण आणि उत्सव असे आहेत जे भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले आहेत. मकरसंक्रांती हि असाच आपल्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला सण आहे. मकरसंक्रांती या सणाचे वैशिष्ट्य ��े खूप मोठे आहे, Adbanao festival poster maker app च्या आजच्या blog मध्ये आपण मकरसंक्रांती विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया. 
या मकरसंक्रांती मध्ये तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि तुमच्या बिझनेस ला मोठं करण्यासाठी Adbanao best poster maker app तुमच्यासाठी घेऊन आलं आहे, मकरसंक्रांती विशेष posters, social media posts, मकरसंक्रांती offer ads, मकरसंक्रांती विशेष banner, product ads, मकरसंक्रांती विशेष whatsapp stickers आणि असा बराच काही ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस फक्त एक click मध्ये वाढवू शकता. तर आता आपण बघूया या मकरसंक्रांती चे महत्व.
0 notes
impossibleperfectiongarden · 5 months ago
Text
Tumblr media
समुद्राने पाच वेळा जगन्नाथपुरी चे मंदिर तोडल्यानंतर कोणाच्या आशीर्वादाने ते मंदिर पुन्हा बांधले गेले पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
3 notes · View notes
sanjay-ronghe-things · 1 month ago
Text
वर्ष गेले पूर्ण
वर्ष गेले पूर्ण पणवेळ आहे अजून ।नव्विन आले आताकसे सजून धाजून । जुने तेच गेलेजाऊ दे ना उडत ।गोंधळ होता साराहोते किती रडत । पाहू आता नवेकाय काय होते ।ये सोबत जराजाऊ जिथे नेते । उरले सुरले मनभिजेल थोडे वाटते ।जुन्यांच्या आठवणींनीहृदय माझे दाटते । गळा येतो भरूनडोळ्यातही आसवं ।नको विचार करूआहे जगच फसवं ।Sanjay Ronghe
Tumblr media
View On WordPress
0 notes