#दुसऱ्या
Explore tagged Tumblr posts
chaitanyakulkarni98 · 5 months ago
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा ��का आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे ��ीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एका��ेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes · View notes
nandedlive · 2 years ago
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की�� फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एस च्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश • सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे पाच संशयित-लातूर इथल्या रुग्णांचा समावेश-आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन • सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सूचना • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी टोयाटो कंपनीचं सहकार्य आणि • अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ
गुईलेन बॅरे सिंड्रोम - जी बी एस च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. काल मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेण्यात आला. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकार शक्ती कमी झाल्याने तसंच दूषित पाणी आणि न शिजवलेलं अन्न किंवा कच्चं मांस खाल्यामुळे हा आजार होतो, त्यामुळे अशा प्रकारचं अन्न टाळावं आणि पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. या आजाराची सामान्य लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तत्काळ सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नागरिकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं. ** लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते. तपासणी अहवालात एका रुग्णाला ��ा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं असून, दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पाटील यांनी केलं आहे. ** कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.
सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यातल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या आठ जानेवारीला या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. याआधी खंडपीठाने वाल्मिकी, मेहतर, भंगी, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या समुदायातल्या व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली होती, ती आता उठवण्यात आली आहे.
राज्यात सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, लातूर जिल्ह्यासाठी २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टाला मंजुरी देण्यात आल्याचं रावल यांनी सांगितलं. सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत परवा ३१ जानेवारीला संपत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयाटो कंपनी विकास कामात सहकार्य करणार आहे. कंपनीचे भारतातले मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप गुलाटी यांनी काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन चर्चा केली. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी तसंच शाळांमध्ये पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यात २१ हजार ५५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून १ हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून छत्रपती संभाजीनगर विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्ये��ा दुसरं शाही स्नान होत आहे. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती अटल आखाड्यांनी पहाटे अमृत स्नान केलं. १३ आखाड्यांना स्नान करण्यासाठी क्रम ठरवून देण्यात आला आहे. भाविकांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता, उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त रेल्वे विभागातर्फे अतिरिक्त ६० विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी ही माहिती दिली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं आज शंभरावं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी, जीएसएलव्ही एफ - 15 या क्षेपणास्त्राद्वारे एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह अवकाशात झेपावला. दूरसंचार आणि हवामानाच्या अचूक अंदाज देण्यासाठी हा उपग्रह काम करणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा महोत्सवातून एक भारत श्रेष्ठ भारताचं सुंदर चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर काल ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर इथं झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, काल झालेल्या सामन्यात भारताने स्कॉटलंडवर १५० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत फक्त ५८ धावांतच सर्वबाद झाला.
भारत आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान इंग्लंडने काल भारताचा २६ धावांनी पराभव केला, मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात होत आहे. दोन फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी सात ते ११ आणि दुपारी चार ते नऊ या वेळात या स्पर्धा होणार असल्याची माहिती, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष भुजबळ यांनी दिली. माती आणि गादी या दोन्ही प्रकारांमध्ये या स्पर्धा होणार असून राज्यभरातून ८६० मल्लं यात सहभागी होत आहेत.
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यां���्या आदेशानुसार रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच सहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
बीड इथं ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी काल रास्ता रोको आंदोलन केलं. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसंच ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या नागापूर इथल्या विविध विकासकामांचं लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी सुंदर माझे अंगण अभियानातंर्गत उत्कृष्ट कुटुंबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जालना शहरात छत्रपती संभाजीनगर मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. सनराईज हॉटेल टी पॉइंट समोर काल रात्री हा अपघात झाला. मृत कामगार बदनापूर तालुक्यातल्या कवडगाव इथले रहीवाशी होते.
परभणी इथं नियोजित हजरत शहा तुराबुल हक ऊर्सच्या तयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल आढावा घेतला. हा ऊर्स दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रभक्ती चेतवण्याचं काम वंदे मातरम या मंत्राने केल्याचं, स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत त्या काल बोलत होत्या. आज या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांचं व्याख्यान होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात सगरोळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आजपासून तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान, लोहा तालुक्यात गुराखी गडावर भरलेल्या गुराखी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. दहा विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले. या संमेलनाचं हे तिसावं वर्ष आहे.
कुंभ मेळ्यातल्या शाही स्नान पर्वणीच्या निमित्तानं पैठण इथं गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
0 notes
nagarchaufer · 17 days ago
Text
अहिल्यानगर महापालिकेसमोर दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू ,  काय आहेत मागण्या ? 
अहिल्यानगर महापालिकेसमोर दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करत बहुजन आंबेडकर चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांच्यासोबत आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी 17 जानेवारीपासून महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.  अशोक गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे ,’ अहिल्यानगर शहरात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज , महामानव…
0 notes
pradip-madgaonkar · 28 days ago
Text
जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
Pradip : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
Pradip चं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 28 days ago
Text
जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
Bandya : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
Bandya चं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
darshanpolicetime1 · 30 days ago
Text
महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
नागपूर, दि. ०५: महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 month ago
Text
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४३
जेवणानंतर थोडा वेळ स्वस्थ डुलकी लागल्याने अनंतचं चित्त बऱ्यापैकी थाऱ्यावर आलं. त्याचा तणावमुक्त चेहरा बघून शुभदालाही हुरूप आला आणि त्याला 'गप्पांच्या बैठकीतील' मित्रांना भेटायला उशीर होऊं नये यासाठी ती रोजच्यापेक्षां लौकरच चहाच्या तयारीला लागली. चहा तयार झाल्यावर कप घेऊन ती डायनिंग टेबलापाशी आली तेव्हां अनंत मोबाईलवरून कुणाला तरी फोन करायचा प्रयत्न करीत होता. "भोसलेंना काॅल करताहांत कां?" शुभदाच्या प्रश्नावर होकारार्थी मान हलवीत अनंत म्हणाला, "हो;-- पण ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याने फोन लागत नाहींये!" "आधी चहा घ्या आणि मग पुन: प्रयत्न करा! नाहींतर चहा गार होईल!" "त्यांचा आतां चालुं असलेला काॅल संपला की बहुधा मनोहरपंतच फोन करतील" म्हणत अनंतने चहाचा कप उचलला. "भोसलेंशी बोलणं होईल तेव्हां त्यांना मनोरमा कुठे आहे ते विचाराल कां? मला वाटतंय् की ती नक्की भाऊसाहेबांच्या घरी असणार! तसं असेल तर मीसुद्धा तुमच्याबरोबर येईन म्हणते!" त्यावर अनंतने तिला 'आतां तूं तिथे येऊन काय करणार आहेस?' असं शब्दांत विचारलं नाहीं तरी तशा अर्थाचं प्रश्नचिन्ह त्याच्या नजरेत उमटलेलं शुभदाला जाणवलं. ती खुलासा करीत म्हणाली, "तुम्हांला कदाचित् आठवत नसेल, पण माझी चांगली ओळख आहे सप्रेवहिनींशी" "ती कशी काय?" अनंतच्या थंड स्वरांतला अविश्वास लपण्याजोगा नव्हता. "अहो, असं काय करताय्? या सप्रेवहिनी म्हणजे आपल्या बबलीच्या ८ वीच्या क्लासटीचर सुहासिनी सप्रे!" शुभदाने सांगितलेली ओळख ऐकून बुचकळ्यांत पडलेल्या अनंतने आपल्या स्मरणशक्तीला ताण देण्याचा प्रयत्न केला. 'बबलीची ८वीची क्लासटीचर म्हणजे जवळजवळ २० वर्षांपूर्वीची गोष्ट?' असं स्वत:ला बजावीत तो विचार करूं लागला;-- आणि अचानक वीज चमकून सगळा काळोखा आसमंत उजळावा तशी एक आठवण त्याच्या मनांत जागी झाली! "म्हणजे जयू��ा आपण लाडानं घरी बबली म्हणायचो त्याचं नावीन्य वाटून कौतुक करणाऱ्या क्लासटीचर कां?"
शुभदाने हंसून मान डोलावली तशी चकीत होत आपल्या दोन्हीं हातांनी मस्तक गच्च दाबून धरीत अनंत उद्गारला, "मला ऐनवेळी त्यांचं नांव आठवलं नसलं तरी त्यांची हंसतमुख, सडपातळ मूर्ति माझ्या पक्की लक्षांत आहे! एवढी उत्साही, हंसतमुख बाई;--आणि आज आत्महत्येचा प्रयत्न?" "तुम्ही आधी शांत व्हा!" प्रचंड उत्तेजित झाल्याने बावचळलेल्या अनंतला समजावीत शुभदा म्हणाली, "तुम्हांला आठवताहेत त्या २० वर्षांपूर्वींच्या सप्रेवहिनी! पण आज त्यांची मानसिक अवस्था कशी आहे ते आपल्याला थोडंच माहीत आहे?" शुभदाच्या त्या शब्दांनी भानावर येऊन स्वतःला सावरीत अनंत म्हणाला, "तुझं म्हणणं अगदी योग्य आहे! २० वर्षांच्या काळांत एखाद्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडूं शकते! प्रत्यक्षांत काय घडलं असेल ते समजण्यासाठी आपल्याला आतां मनोहरपंतांशीच बोलायला हवं!" शुभदा कीचनमधे चहाची भांडी आणि कप धूत असतांनाच भोसलेंचा फोन आला. बोलणं संपल्यावर कीचनमधे येऊन अनंत म्हणाला, " शुभदा, तुझा अंदाज खरा ठरला! मनोरमाबाई भाऊसाहेबांच्या घरीच आहेत दुपारपासून! मनोहरपंतही तिथेच होते. पण थोड्या वेळापूर्वी जवळच्या पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराची विचारपूस करायला फोन आला होता म्हणून आतां ते सगळं निस्तरायला पोलीस चौकीत जात आहेत !" शुभदा त्यावर कांही बोलण्यापूर्वीच तो पुढे म्हणाला, " तूं पटकन तयार हो, म्हणजे तुला भाऊसाहेबांच्या घरीं सोडून मी मित्रांना भेंटायला जाईन!" "नको;-- मी रिक्षाने जाईन! तुम्ही तुमच्या मित्रांना लौकर भेटा म्हणजे तुम्ही सगळेजण लौकर येऊं शकाल भाऊसाहेबांकडे."
भाऊसाहेबांच्या निवासस्थानीं शुभदा पोहोचली तेव्हां दारांत उभी राहून मनोरमा जणूं तिचीच वाट बघत होती. तिला आंत घेऊन मनोरमाने दरवाजा हलक्या हाताने लावून घेतला. शुभदाचा प्रश्नार्थक चेहरा लक्षांत घेऊन ती हळू आवाजात म्हणाली, "सुहासिनीला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी जरूर ती औषधं देऊन झोपवून ठेवलेलं आहे! गाढ झोपली आहे बिचारी;- पण तरीही आपण शक्यतों कमीत कमी आवाज करावा असा माझा प्रयत्न आहे!" "भाऊसाहेब बरे आहेत ना?" "हो;-- हळुहळू सावरताहेत!आतां ह्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर घडल्या प्रकारासंबंधी जबाब नोंदवायला गेले आहेत!" "समजलं!" अशा अर्थी मान हलवीत शुभदाने हातांतली पिशवी मनोरमाच्या स्वाधीन केली. निघण्यापूर्वी फोन करून तिने मनोरमाला 'कांही आणायचं आहे कां?' असं विचारल्यावर मनोरमाने मागवलेली कांही घरगुती औषधे आणि किरकोळ चीजवस्तु त्यांत होत्या. "बरं झालं येण्यापूर्वी तुला फोन करून नक्की पत्ता विचारला! सप्रेमॅडम या फ्लॅटमधे रहायला आल्याचं मला माहीतच नव्हतं! आधीचा बंगला कधी आणि कशासाठी विकला?" "१० वर्षांपूर्वी थोरल्या गिरीशच्या लग्नाच्या वेळी जुना झालेला बंगला विकून हा, सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असा, ४ बेडरूमवाला नवीन फ्लॅट मोठ्या हौसेनं घेतला भाऊसाहेबांनी!" "सगळं छान चाललेलं असतांना मॅडमनी अचानक हा आततायीपणा कां केला?" "दिसतं तसं नसतं ग बाई! बरेच दिवस घरगुती धुसफूस चालुं असल्याचं ह्यांच्या कानांवर होतं! पण त्याचं पर्यवसान अशा प्रकारे होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं! बरीच मोठी कर्मकहाणी आहे;- बोलूं सावकाशीने!"
१५ जून २०२३
0 notes
moneywithmansy · 3 months ago
Text
MoneywithMansy खास तुमच्या साठी घेऊन मी आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तासाठी खास योजना – दरमहा ₹5,000 ते ₹3 लाखांपर्यंतची गुंतवणूक करा,आणि दुसऱ्या महिन्यापासून 34% परताव्याचा आनंद घ्या. या इन्व्हेस्टमेंट योजनेबद्दल अधिक माहितीसाठी मला whatsapp वर SISO असा मेसेज करा - 7720040577
www.moneywithmansy.com
InvestmentPlan #MoneyWithMansy
0 notes
vishwa-niti-1994 · 3 months ago
Text
आंतरराष्ट्रीय संबंधातील "विभागीय अभ्यास" ("Area Studies" in International Relations)
२१ व्या शतकात सामाजिक-शास्त्राच्या अभ्यासात वेग-वेगळ्या स्वरूपाचे प्रयोग व संशोधन होत आहेत. त्याचा सकारात्मक परिमाण सामाजिक-शास्त्राच्या अभ्यासाच्या व्यापकतेवर आणि स्वरूपावर (Scope and Nature) होताना दिसत आहेत. म्हणजेच समाज-शास्त्राच्या अध्यायनाची क्षितिजे मोठ्या प्रमाणात बदललेली दिसून येत आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, सामाजिक शास्त्राच्या अभ्यासात जे-जे विषय (इतिहास, भूगोल,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 4 months ago
Text
रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघून मिळणारं स्वास्थ्य.
असाच मी एकदा शेतावरच्या पडवीत आराम खुर्चीत बसून विश्रांती घेत होतो. ती रात्रीची वेळ होती. माझ्या मनात आलं की,एका वेळी अशक्य असलेलं दुसऱ्या वेळी शक्य होऊ शकतं.मी माझी वही काढली आणि त्यात लिहायला सुरुवात केली.तेच पान खूप दिवसांनी आज मी वाचत होतो. जिथे दोन दगड घासून आग निर्माण करता येते, तिथे सूर्यापासून वीज निर्माण करण्यापर्यंतचा बदल घडवून आणता येतो, ह्या गोष्टी माणसाने आपल्या बुद्धीचातुर्यावर…
0 notes
airnews-arngbad · 13 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणुकदार परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन, रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, योजनेला आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो.
विधिमंडळाचं कामकाज विनाअडथळा चालवत, गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प पाटणा इथं आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत करण्यात आला. काल समारोपाच्या दिवशी या परिषदेनं पाच संकल्प केले. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधानाचं महत्व सांगण्यासाठी देशभरातल्या विधिमंडळांचे सदस्य समाजाच्या सर्व स्तरात जातील, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिषदनेनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. देशातल्या २३ विधिमंडळातले ४१ पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.
राज्यामध्ये कर्करुग्णांचं प्रमाण वाढत असून, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबवावी असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल दिले. २०२५-२६ या वर्षाच्या नियोजनासाठी मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या तसंच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आबिटकर त्यांनी दिल्या.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक २० रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक १८५ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत १३८ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ४४ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आल्याचं, आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.
नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. नॅशनल असोसिएशन फॉर द ��्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देणारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. २०२३-२४ या वर्षाच्या गाळप हंगामासाठी, आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, सर्वोकृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या हे पुरस्कार वितरीत केले जातील.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथी, देवदासी, एचआयव्ही बाधित २० व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आली. अशा व्यक्तींसाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबवण्यात येतात, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन येडगे यांनी यावेळी केलं.
इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. तर, या स्पर्धेत, पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक-जिन, तर लक्ष्य सेनचा सामना जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होईल. याच स्पर्धेत, काल महिला दुहेरीत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंडच्या जोडीचा, तर पुरुष दुहेरीत, सात्विक साइराज रांकि रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने तैवानच्या जोडीचा पराभव केला.
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
ईव्हीएम पडताळणीबद्दल प्राजक्त तनपुरे यांचा मोठा निर्णय , शिवाजी कर्डिले यांच्यासाठी आनंदाची बातमी
ईव्हीएम पडताळणीबद्दल प्राजक्त तनपुरे यांचा मोठा निर्णय , शिवाजी कर्डिले यांच्यासाठी आनंदाची बातमी
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणी साठी अर्ज केले जातात. नगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पराभव झाल्यानंतर ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला होता.  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या उमेदवारांना ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. निकालाच्या विरोधात कोणी न्यायालयात…
0 notes
pradip-madgaonkar · 2 months ago
Text
रात्री २ वाजता Pradip चा फोन वाजतो.
एक बाई : तुमचा कुत्रा रात्रभर भुकतो, आम्हाला झोपून देत नाही.
Pradip : माफ करा!
(दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता परत त्या बाईचा फोन येतो…)
Pradip : मॅडम, मी तुम्हाला सांगायला विसरलो.
मी कोणताही कुत्रा पाळलेला नाही.
😂😂😂😃😃😃😅😅😅😌😌😌
0 notes
bandya-mama · 3 months ago
Text
जन्या : Bandya! एका बाजुला पैसे आणि दुसऱ्या बाजुला बुद्धी असेल,
तर तू काय घेशील?
Bandya : मी पैसे घेईन!
जन्या : चूक! मी बुद्धी घेईन!
Bandya : तुझी निवड बरोबर आहे.
ज्याच्याकडे जे कमी आहे, तो तेच घेणार.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
1 note · View note