#त्यावेळी
Explore tagged Tumblr posts
chaitanyakulkarni98 · 7 months ago
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. ��िंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो व��ैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
ख���ं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्य��ूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes · View notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १९ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
अंतराळात नऊ महिने राहावं लागलेल्या नासाच्या अंतराळवीरांना पृथ्वीवर सुखरूप परत आणण्याच्या, नासाच्या स्पेस एक्स क्रू नाईन या मोहिमेच्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नासाच्या पूर्ण पथकाचं अभिनंदन केलं आहे. भारताची कन्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांनी आपल्या दृढता, समर्पण आणि हार न मानण्याच्या भावनेनं सर्वांना प्रेरणा दिली आहे, असं राष्ट्रपतींनी याबाबतच्या संदेशात म्हटलं असून, या अंतराळवीरांचं आरोग्य उत्तम राहो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. अथक आणि चिकाटीनं प्रयत्न करणं म्हणजे काय, हे या मोहिमे��ल्या सर्वांनी जगाला दाखवून दिल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठीच्या ४५ दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरु केली जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नांदेड - पुणे रेल्वेला वंदे भारत मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी, देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं. पुणे तसंच हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं अधुनिकीकरण करुन, त्यांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु आहे, त्यानंतर या स्थानकांवरुन रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.
आज केंद्रीय राखीव पोलीस दल- सीआरपीएफ दिन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दिनानिमित्त या दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९५० साली आजच्याच दिवशी या दलाला राष्ट्रपती ध्वजानं सन्मानित केलं गेलं होतं, याचं स्मरण करत, सीआरपीएफचं शौर्य आणि बलिदान राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नेमका किती आहे, याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमून पुढील पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. सभागृहात याबाबतच्या प्रश्नाला मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचं समाधान न झाल्यानं, अध्यक्षांनी हे निर्देश दिले. राज्यात कुष्ठरोग्यांची संख्या देशाच्या तुलनेत अत्यंत कमी असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रति रुग्ण मिळणारं अनुदान मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिलं असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
नागपूर इथं सोमवारी रात्री झाल��ल्या दंगलीच्या घटनेनंतर अकरा पोलीस स्थानकांतर्गत लागू करण्यात आलेली संचारबंदी आजही सुरू असून, केंद्रीय राखीव पोलीस दल-सीआरपीएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त राहूल माखनिकर यांनी सांगितलं आहे.
पुण्यात हिंजवडी इथं एका टेंपोला लागलेल्या आगीत व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले. आज सकाळी आठ वाजता या टेंपोच्या चालकाच्या केबिनमध्ये आग लागली, त्यावेळी चालक आणि पुढच्या भागात बसलेले कर्मचारी खाली उतरले, मात्र वाहनाचे मागचे दरवाजे उघडू न शकल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी होत आहे. या उत्सवासाठी नाशिक शहरात सात ठिकाणी पेशवेकालीन रहाडी असून जमिनीखाली असलेल्या या रहाडी म्हणजेच हौद यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत. प्रथेप्रमाणे महिला आणि मानकऱ्यांच्या हस्ते रहाडीचं पूजन करण्यात येईल आणि त्यानंतर नैसर्गिक रंग खेळला जाईल. नाशिकमधल्या काही मंदिरांमध्येही रंगोत्सव होत आहे.
धाराशिव इथं जलजागृती सप्ताहाअंतर्गत काल कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मागणी आणि पुरवठा आधारित उपाययोजनांची ओळख तसंच जलसंधारणाच्या कामाची देखभाल आणि दुरुस्ती यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात लातूर-नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातल्या नांदगाव पाटी इथल्या अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’ वर प्रशासनाच्या सूचनेवरून लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. या बॅरिकेडमुळे नांदगावकडे जाणारी वाहनं बंद झाल्याने ग्रामस्थांनी काल रस्ता रोको आंदोलन करत बॅरिकेड काढण्याची मागणी केली.
0 notes
nagarchaufer · 8 days ago
Text
छात्रभारतीच्या कार्यकर्त्यास महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण , विखे आले अन.. 
सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेलेले छात्रभारतीचे कार्यकर्ते अनिकेत घुले यांना संगमनेर नगरपालिकेच्या आवारात 13 तारखेला महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली.  विखे पाटील हे गुरुवारी संगमनेर नगरपालिका येथे बैठकीसाठी आलेले होते त्यावेळी त्यांना छात्रभारतीच्या ��तीने निवेदन देण्यासाठी…
0 notes
mayurabanavali · 12 days ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
महिला दिनाचे औचित्य साधून मी मुलुंडकर प्रतिष्ठान आणि लिओ क्लब ऑफ मुलुंड lakeside ह्यांनी “ सारी वॉकेथोन चे आयोजन के���े होते . सुमारे २५० च्या वरती महिलांनी सहभागी होवून उत्तम प्रतिसाद नोंदवला . वेगवेगळ्या वेशभूषा , सुंदर कल्पना करून आगदी ७० वर्षाच्या आजी सुद्धा म्यूजिक वर थिरकायला मागे हटल्या नाहीत. खास मुलुंडकरांसाठी सुप्रिया पाठारे ताई उपस्थित राहिल्या , कलावैभव फौंडेशन च्या ऍडव्होकेट प्रांजल जाधव व नवघर पोलीस स्थानक च्या सपकाळ मॅडम व कदम मॅडम ह्यांनी सायबर गुन्हे व हेल्पलाईन नंबर्स ची माहिती दिली . त्यावेळी मुलुंडचे आमदार मिहिरजी कोटेचा व महामंत्री नंदकुमार वैती व दीपिका घाग यांची उपस्थिती लाभली त्यावेळची काही क्षणचित्रे. त्याचप्रमाणे भरगोस बक्षिसे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात अली .
#सारीवॉकेथोन #महिलादिन #मुलुंडकरप्रतिष्ठान #लिओक्लबमुलुंड #स्त्रीशक्ती #सांस्कृतिकउत्सव #सायबरसुरक्षा #समाजसेवा #महिलासक्षमीकरण #आनंदाचेक्षण
0 notes
valentin10 · 1 month ago
Text
'मुलगा निवडून आणता आला नाही अन्...', राज ठाकरे यांना अजित पवार यांचा टोला - Marathi News | NCP leader Ajit Pawar criticizes MNS leader Raj Thackeray | TV9 Marathi
Ajit pawar on Raj Thackeray: लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी सुनावले. — À lire sur www.tv9marathi.com/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-criticizes-mns-leader-raj-thackeray-1346368.html/amp
0 notes
karmadlive · 2 months ago
Text
करमाड येथील श्री.नवनाथ पोफळे सरांचे आय.टी.कम्प्युटर्स & सुपर अबॅकस इन्स्टिट्यूट 47 राष्ट्रीय अवॉर्ड मिळवून देशात पहिले
करमाड:दिनांक १९ जानेवारी रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय सुपर अबॅकस स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमधे देशभरातून विविध राज्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील सुपर अबॅकस चे एम.डी.आ.मनीष महाजन सर व विदर्भ विभाग प्रमुख आ.राजेश परदेशी सर व जळगाव विभाग प्रमुख आ.प्रवीण जाधव सर तसेच छत्रपती संभाजी नगर विभाग प्रमुख…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 months ago
Text
‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांना संरक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
नागूपर दि. ०५ : गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आल्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे, विकासकांनीही सर्व��ामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चिटणवीस सेंटर येथे ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2.0’ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
seo-3024 · 3 months ago
Text
आईपण भारी देवा... नवीन_आईपण_पेलताना...
Tumblr media
इंस्टाग्राम आणि फेसबुक च्या आजच्या काळात गरोदरपण आणि त्यातले सारे सोहळे साजरे करताना जोडपी किती सुंदर आणि छान दिसतात नाही आणि बाळाच्या आगमनाने तर फेसबुक आणि इंस्टाग्राम , प्रत्येकाचे व्हॉटसअप चे स्टेटस अपडेट्स सार काही आनंदाने ओसंडून वाहत असते...नवजात बाळाचे वेगवेगळे पोझ मधले फोटो, बाळाच्या पहिल्या पावलांचे ठसे फ्रेम करणे, नवजात बाळाला दागिने, प्रॉप्स, पानाफुलांनी सजवून फोटो काढणे , नव्या आईची खोली डेकोरेट करणे,सगळ्यांचे फोन,व्हिडिओ कॉल सगळच अगदी मनभावन छान आणि आनंदी..
या सगळ्या ऑनलाइन आभासी दुनियेमध्ये स्वतःला बाळंतपणा नंतर अप टू डेट ठेवताना नवीन आईची नकळत दमछाक होत असते परंतु तिला या सगळ्याची इतकी आवड किंवा सवय झालेली असते की ते केल्याशिवाय करमत नाही... घरातील मोठे लोक कधी कधी या नवीन 'आई बाबांना' सूचना ही देत असतात परंतु त्याच्याकडेही बरेच वेळा कानाडोळा केला जातो. हे सगळं कर�� असणाऱ्या नविन आईबाबांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर जेव्हा वास्तवाची जाणीव होते त्या वेळेला लक्षात येते की हे नवीन आईपण आणि बाबापण निभावण इतकं सोपं नाही आणि या साठी लागणाऱ्या कष्टांबद्दल आणि द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल आपल्याला कोणीही जागं केलेलं नाही आतापर्यंत डिलिव्हरी होऊन बाळ येणार म्हटल्यावर त्यांनी फक्त आणि फक्त आनंदी बाजूच एकलेली असते
प्रत्यक्षात मात्र बाळाच्या रुटिन बरोबर ताळमेळ साधताना या नवीन आई बाबांची तारांबळ उडायला लागते मग सुरु होते चिडचिड वैताग आणि एक संघर्ष....कधी कधी तर डिप्रेशन आणि त्यामुळे होणारी आई आणि बाळा ची ओढाताण ! आजकाल याच प्रमाण जरा जास्तच वाढलय म्हणून हा लेखन प्रपंच...
नवीन होणारे आई-बाबांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव घरातील मोठ्यांनी त्यांना करून द्यायला हवी कधी कधी मोठे जाणीव करून देतही असतात परंतु हे नवीन होणारे आई-बाबा या गोष्टी इतक्य��� मनावर घेत नाहीत. आज यातील काही वास्तववादी गोष्टी इथे मांडते
1. नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यामध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होत असतो त्याची ठराविक अशी मोजपट्टी नसते काही जणींना डिलिव्हरीच्या कळा सहन होतात तर काहीजणांना याचा खूप त्रास होतो आज-काल वेदना रहित प्रसूती ची सोय आहे तरीही काही ठराविक वेळ तरी या कळा सहन कराव्या लागतात. प्रत्येक मुलीने आपली क्षमता ओळखून डिलिव्हरीच्या कळा काही काळ तरी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत याची मानसिक तयारी करायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची जर मानसिक तयारी नसेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्ट सांगायला हवे.
2. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात.
3. नवीन बाळाचे काहीही रुटीन नसते सहसा बाळ दिवस भर झोपतात आणि पूर्ण रात्र जागी असतात त्यामुळे सहाजिकच नवीन आई-बाबांचे जवळपास रोजच जागरण होते या जागरणाची नवीन आईला सवय नसल्यामुळे तिची चिडचिड ओढाताण होते तसेच झोप नीट न झाल्यामुळे डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होणे या गोष्टीही नवीन आईच्या बाबतीत अगदी कॉमन असतात.
4. नवीन आईने आपला सारावेळा फक्त बाळासाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवायला हवा आणि बाळ ज्यावेळी झोपेल त्यावेळी स्वतः विश्रांती घ्यायला हवी
5. नवीन आई आणि बाळ यांचे एक��ेकांशी जुळून येण्यासाठी वेळ लागतो साधारण सव्वा महिना हळूहळू बाळाचे रुटीन आईला समजायला लागते आणि मग इतर गोष्टी त्याप्रमाणे ऍडजेस्ट करणे सोपे जाते परंतु पहिले सहा महिने अवघडच असतात आणि जागरणाची तयारी या वेळेला ठेवावी लागते.
6. बाळ जर पूर्ण 'ब्रेस्ट फीडिंग' वर असेल तर पहिले सहा महिने आईला बाळापासून अजिबात वेगळे राहणे शक्य होत नाही कारण बाळ भुकेसाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सतत बाळाचे बरोबर राहणे आणि स्वतःसाठी काहीही करायला न मिळणे यामुळे नवीन आईची चिडचिड होते.
7. कित्येक वेळा आई जेवायला बसले की बाळाचे रडणे आणि शू शी करणे इत्यादीमुळे अर्ध्या जेवणातून आईला उठावे लागते याचीही पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना कल्पना नसते
8. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि स्वतःच्या दिसण्यात झालेला बदल पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.डिलिव्हरी नंतर करायचे व्यायाम अनेक ठिकाणी शिकवतात पण खर सांगू का पहिले काही दिवस आईची नीट विश्रांती च होत नाही तर ती व्यायाम करायला शक्ती आणि वेळ कुठून आणणार?
सगळ्यात महत्वाचे आहे तुमचे मानसिक आरोग्य, नीट खाणे आणि विश्रांती ...काही वेळानंतर तुम्ही व्यायाम चालू केला तरी चालेल..
9. वरील सर्व तर रूटीन मध्ये होणारे बदल झाले...या खेरीज बाळ आजारी पडले तर होणारा मानसिक आणि शाररिक त्रास वेगळाच असतो.
10. या सगळ्यातून तरून जाण्यासाठी महत्त्वाची ठरते ती 'सपोर्ट सिस्टीम '..तुम्हाला मदतीसाठी घरातील सदस्य किंवा जर घरातील सदस्यांना शक्य नसेल तर बाहेरुन योग्य मोबदला देऊन अश्या सपोर्ट सिस्टीम' ची सोय करणे गरजेचे आहे.हल्ली डिलिव्हरी नंतर येणाऱ्या डिप्रेशन चे प्रमाण वाढत आहे ते नवीन आईला नसणाऱ्या पूर्वी सारख्या सपोर्ट मुळे..
11. पूर्वीच्या काही पद्धती या सायन्स ला अनुसरून च होत्या...सव्वा महिना बाळंपणानंतर घरा बाहेर न पडणे हे या साठी च पाळत असत की आई आणि बाळाला एकमेकांशी ऍडजस्ट व्हायला पुरेसा वेळ मिळावा...
गार पाण्यात हात घालू न देणे हे देखील या साठी च की नवीन आई घरकाम करण्यात अडकून पडू नये तिने बाळाला आणि स्वतः ला वेळ द्यावा.
आईपण पेलण आणि निभावणं ही तारेवरची कसरत आहे जशी योग्य आहार आणि वेळोवेळी तपासण्या करून तुम्ही सुदृढ बाळाची तयारी करता तशीच डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्या साठी कणखर मानसिक तयारीची ही गरज असते. जागरण आणि अपुरी झोप हे पक्के मनात ठसवून पुढे चालत राहावे लागते म्हणजे मग नवीन आईची ओढाताण आणि चिडचिड होत नाही.
तुम्ही हे नवीन आईपण कस पेलल हे ��ठवतंय का?नक्की तुमचे अनुभव लिहा .इतरांना ही त्याचा उपयोग होईल.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ नंदिनी क्लिनिक
नंदिनी क्लिनिक हडपसर
नंदिनी क्लिनिक वानवडी
फोन 8421119264
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४६
भाऊसाहेबांनी केलेल्या त्या स्पष्ट खुलाशानंतर एक विचित्र शांतता पसरली! त्यावर कुणालाच कांही ��ोलण्याचा धीर झाला नाहीं. एका बाजूला खुर्चीवर ऐकत बसलेल्या मनोरमावर मात्र भाऊसाहेबांच्या खुलाशाचा वेगळाच परिणाम झाल्याचं शुभदाला जाणवलं. तिची अचानक वाढलेली अस्वस्थता पाहून शुभदाने मनोरमाच्या चाळवाचाळव करणाऱ्या हातांवर शांतपणे आपला हात ठेवीत तिला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि नजरेच्या खुणांनीच 'तुला जे कांही बोलायचं आहे ते लगेच आणि स्पष्टपणे बोल' असं सुचवलं. "माफ करा भाऊसाहेब," मनोरमा शांततेचा भंग करीत म्हणाली, "तुम्ही मुलांनी जे सुचवलं त्याला सुहासिनीचा ठाम विरोध असल्याचं सांगीतलं, पण त्याची कारणं नाहीं सांगीतली!" "मनोरमा, अग तूं मधेच हे काय --" म्हणत तिला थांंबवायचा प्रयत्न करणाऱ्या भोसलेंना अडवून मनोरमा शांतपणे म्हणाली,"मला बोलूं द्या, मनोहर! खरं तर ही कारणं सुहासिनीने स्वत: सांगणं अधिक योग्य ठरलं असतं, पण आतां ती बोलायच्याही अवस्थेत नाहीये! तिचं म्हणणं या सर्वांसमोर आलं नाहीं तर परिस्थितीचं गांभीर्य कुणालाच समजणार नाहीं!" त्यावर भोसलेंनी भाऊसाहेबांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं! भाऊसाहेबांनी मूकपणे संमतीदर्शक मान डोलावली तशी मनोरमा सर्वांना उद्देशून पुन: बोलूं लागली, "सुहासिनीकडून तिच्या अलीकडच्या आजारपणांत मला जे समजलं तेच मी थोडक्यात सांगणार आहे! सुहासिनीचं स्पष्ट मत होतं की मुलांना दाखवताहेत तसा आई-बाबांचा कळवळा वगैरे कांही आलेला नसून गेली पांच वर्षं तरी दाबूून ठेवलेली मनीषा त्यांना पूर्ण करायची आहे!" "कुठल्याही कारणास्तव कां होईना, मुलं आई-बाबांची काळजी घेणार असतील तर हरकत काय आहे?" एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं.
"तेच तर मी सांगतेय् की सुहासिनीच्या मते मुलांचा खरा हेतू काळजी घेण्याचा नसून वेगळाच होता! धाकट्या शिरीषने ५ वर्षांपूर्वी वेगळं बिऱ्हाड केलं तेव्हांच दोघां भावांनी 'माॅम आणि डॅडने त्यांच्याबरोबर रहावं' असं सूतोवाच केलं होतं! त्यावेळी नकार देतांना सुहासिनीने स्पष्ट शब्दांत सांगीतलं होतं की 'तुमच्या लग्नांनंतर सर्वांनी एकत्र रहावं म्हणून तर होता तो बंगला विकून त्याच परिसरात आम्ही हा ४ बेडरूमचा फ्लॅट घेतला! तथापि तुम्हां दोघांनाही स्वतंत्र राहायचं असेल तरी आमची हरकत नाही;-- पण हा फ्लॅट सोडून आम्ही कुठेही येणार नाहीं. गेली ३५ वर्षांहून अधिक काळ इथे राहिल्याने या परिसराशी आमची जणूं नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आतां या वयांत दुसरीकडे नव्याने बस्तान बसवणं शक्य नाहीं.' ते ऐकून दोघेही खूप नाराज झाले होते!" "पण मुलांना उतारवयात आई-बाबांनी एकटं राहण्याबाबत काळजी वाटणे साहजिक नाहीं कां?" दुसर्‍या एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं "सुहासिनीशी याबाबत भाऊसाहेब सहमत नसले, तरी सुहासिनीच्या मते मुलांचा डोळा फक्त हा फ्लॅट विकून येणाऱ्या भल्यामोठ्या रकमेवर होता! कारण त्यांनी कधीही असं म्हटलं नाहीं की 'हा फ्लॅट विकून येणाऱ्या पैशांतून तुमच्यासाठी आमच्या जवळ नवीन फ्लॅट घेऊंया'. गेल्या ५ वर्षांत या फ्लॅटची किंमत अधिकच वाढली आहे हे उघड आहे!!" एवढ्यांत कुणीतरी उतावीळपणे अधिक वेळ बटन दाबून धरावे तशा प्रकारे डोअरबेल कर्कश्श वाजली. भाऊसाहेबांना बसून राहण्याची खुण करीत भोसलेंनी चट्कन पुढे होऊन दार उघडलं तशी गिरीश घाईघाईने आंत आला. पण जमलेल्या लोकांना बघून कांहीसं चकित होत त्याने तीक्ष्ण स्वरांत भाऊसाहेबांना विचारलं, " डॅड, माॅम कुठे आहे? आणि तुम्ही ही कोण लोकं, कशासाठी जमा केली आहेत?" " डॅड, तुम्हांला दिवसभरांत फोन करून दादाशी किंवा माझ्याशी बोलावंसं नाहीं वाटलं?" गिरीशच्या मागोमाग आलेल्या शिरीषने विचारलं. त्याच्या स्वरांतला उपहास लपण्याजोगा नव्हता!
"गिरीश आणि शिरीष, तुम्हांला वाटणारी काळजी आम्ही सगळे समजूं शकतो! तथापि माझी विनंती आहे की तुम्ही शक्य तेवढ्या हळूं आवाजांत बोलावं!" आपल्या आवाजावर ताबा राखीत भोसले अत्यंत शांत स्वरांत म्हणाले, "भाऊसाहेब या घडीला कुठलाही संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाहींत, हे तुम्ही दोघांनी लक्षांत घ्यायला हवं! त्यामुळेच मी स्वत: तुम्हां दोघांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला! पण फोन लागला नाहीं;-- तेव्हां तुम्ही महत्वाच्या कामांत बिझी असाल हे ओळखून मी तुमच्या मोबाईलवर मेसेज पाठवले, ते तुम्ही बघितले नाहीं कां?" भोसलेंनी शांत स्वरांत केलेला खुलासा ऐकून गिरीश आणि शिरीष दोघेही वरमले. पुढे केलेल्या खुर्चीवर बसत गिरीश म्हणाला, "काका, तुमचा मेसेज शिरीषने प्रथम बघितला आणि मला लगेच कळवलं! म्हणून तर आम्ही ताबडतोब इथे आलो आहोंत!" दोघांच्या वागण्या-बोलण्याचा एकुण रागरंग पचनी न पडल्याने खुप चिडलेली मनोरमा पुढे येत लागट स्वरांत म्हणाली, "नशीब म्हणायचं की भोसलेकाकांना तरी तुम्ही ओळखलंत! आणि काय रे, तुम्ही आई-बाबांची विचारपूस करायला आला आहांत की त्यांना जाब विचारायला?" "माफ करा काकु!" गिरीश चट्कन हात जोडून म्हणाला, "काळजीपोटी आम्ही कांही कमीजास्त बोललो असूं हे प्लीज समजून घ्या! माॅमला आम्ही भेंटूशकतो कां?प्लीज?" "सुहासिनीची तब्येत ठीक आहे आतां, पण औषधांच्या परिणामाने तिला गाढ झोंप लागली आहे! हवं तर तिला बघून या, पण उठवूं नका!" मनोरमा म्हणाली, "डाॅक्टर म्हणाले आहेत की ती आपणहून उठेल तेव्हां तिची तब्येत ठणठणीत झालेली असेल!" "माॅमला शांत झोप लागली असेल तर आपण तिला आत्ता नको भेंटुया!" गिरीशला उद्देशून शिरीष म्हणाला, "उद्यां सकाळी त्यांना घेऊन जायला येऊं, तेव्हांच एकदम भेंटुया!"
६ जुलै २०२३
0 notes
makarandpawar · 4 months ago
Text
परमेश्वर बालरूपात अवतरीत झाले होते, त्यावेळी प्रत्यक्ष साक्षीदार कोण होते?
Tumblr media
0 notes
impossibleperfectiongarden · 4 months ago
Text
Tumblr media
परमेश्वर बालरूपात अवतरित झाले होते त्यावेळी प्रत्यक्ष साक्षीदार कौन होते पहा उदया सकाळी 5:55 वाजता लोकशाही न्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर लाइव पाहू शकता यूट्यूब संत रामपाल जी मराठी सत्संग फेसबुक संत रामपाल जी मराठी सतसंग वर पहा
1 note · View note
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
नागपुरातल्या घटनेचे विधीमंडळात पडसाद-सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप
बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकारची विशेष मोहीम-गृहराज्यमंत्र्यांची माहिती
आणि
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
****
महाकुंभातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आज लोकसभेत महाकुंभाबाबत निवेदन सादर केलं, त्यावेळी त्यांनी विविधतेत एकतेचं महाकुंभातून दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली, एकतेची ही भावना सतत समृद्ध करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पंतप्रधानांच्या काही विधानाच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज एक वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
गेल्या दहा वर्षांत रेल्वेने पाच लाख नोकऱ्या दिल्या असून एक लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावरच्या चर्चेला उत्तर देत होते. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली असून, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी सरकार काम करत आहे, २०२० पासून देशात प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही, आणि इतर देशांच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे तिकीटदर खूपच किफायतशीर आहेत, रेल्वे अपघा�� कमी करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं.
****
नागपुरात काल घडलेल्या घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करत आपापली मतं मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवदेन सादर करत, लोकांनी संयम राखावा, एकमेकांप्रती आदर बाळगावा, असं आवाहन केलं. राज्यात पोलिसांवर हल्ला सहन करणार नाही, दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेतही त्यांनी याप्रकरणी निवेदन सादर केलं. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनीही परिषदेत या बाबत माहिती दिली.
दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. पोलिस तसंच गुप्तचर यंत्रणांनी लक्ष दिलं असतं, तर नागपुरात ही घटना घडली नसती, असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज सदनात या मुद्यावर बोलत होते. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देत, चर्चेची मागणी त्यांनी केली. दरम्यान, या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं, सदनाचं कामकाज सभापतींनी १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.
****
राज्यात औरंगजेबच्या कबरीपेक्षा मोठे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यात सरकार अपशयी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
बाईट – उद्धव ठाकरे
दरम्यान, नागपुरात काल घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी ५० जणांना अटक केली असल्याची माहिती, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या घटनेमध्ये ३४ पोलिसांना दुखापत झाली असून, पाच नागरिकांनाही इजा झाली आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव, सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला. अविश्वास प्रस्तावात कोणतंही ठोस कारण नमूद केलेलं नाही तसंच याबाबतचे निकष पूर्ण केले नाहीत असं निरीक्षण सभापतींनी नोंदवलं.
बाईट – राम शिंदे, सभापती, विधान परिषद
****
राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकार एक मोहीम राबवत असून येत्या तीन महिन्यात बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली, ते एका लक्षवे��ीला उत्तर देत होते. बांगलादेशी घुसखोरांबद्दलची सगळी माहिती केंद्र सरकारकडे दिली असून केंद्रीय गृहमंत्रालय या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचं कदम यांनी सांगितलं.
****
मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.
****
राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांना परत आणण्यासाठी गेलेले ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडे तीनच्या सुमारास हे यान अमेरिकेत फ्लोरिडाच्या समुद्रात अवतरण करेल, अशी अपेक्षा आहे.
पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना दिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल.
****
राज्याचं भव्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही घोषणा केली.
****
सहकारी बँकांप्रमाणे मल्टिस्टेट पतसंस्थांमधल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत प्रकाश सोळंके यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात उपप्रश्न विचारला होता. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ८० मालमत्तांचा लिलाव करून, फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येईल असं��ी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातील बसस्थानकं अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे, असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मुंबईत परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसंच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकात अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं, आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे.
****
राज्यातल्या यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य नारायण कुचे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं ४० पूर्णांक सहा दशांश सेल्सियस एवढं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ अंश, धाराशिव इथं ३८, परभणी इथं ३९ तर बीड इथं ४० अशं तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
nagarchaufer · 12 days ago
Text
सतीश ��ोसले उर्फ खोक्याच्या घरात काय काय सापडलं ? 
बीड जिल्ह्यात वाल्मीक कराड पाठोपाठ आता दुसरा एक कुख्यात गुंड चर्चेत आलेला असून विशेष बाब म्हणजे हा गुंड भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या जवळचा आहे. एका व्यक्तीला केलेली मारहाण आणि नोटांचे बंडल उधळणारा हा व्यक्ती , सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर शनिवारी वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले.  सतीश भोसले…
0 notes
mayurabanavali · 14 days ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
आज महिला दिनानिमित्त नवघर पोलिस स्टेशन च्या वतीने माझा व मुलुंडमधील काही महिलांचा सन्मान करण्यात आला . महिला सेफ्टीच्या आहे दृष्टीकोनातून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिस आपल्या सर्व महिलांच्या रक्षणासाठी सक्षम असल्याचे पाहून आनंद झाला , त्यावेळी महिला पोलिसांनी विविध गोष्टींचे मार्गदर्शन केले त्यावेळची काही क्षणचित्रे .
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @medhasomaiya @kirit.somaiya @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_
#महिलादिन #सन्मानस्त्रीशक्ती #महिलासुरक्षा #गर्वआहेमुलुंडचा #पोलिसआणिआपण #स्त्रीसशक्तीकरण #सुरक्षितभारत #संवादसुरक्षासशक्तीकरण #महिलासशक्त #सहकार्यआणिसंरक्षण
0 notes
dhanu-j-92 · 5 months ago
Text
Tumblr media
. 🍁 *ज्ञान गंगा* 🍁 .
➖ *विवाहातील प्रचलित वर्तमान परंपरांचा त्याग :-* ➖
विवाहात व्यर्थ खर्च बंद करावा लागेल. उदाहरणार्थ मुलीच्या विवाहात मोठी वरात घेऊन येणे, हुंडा देणे, ह्या व्यर्थ परंपरा आहेत. ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाते आणि तिला गर्भातच खुडण्याचे उद्योग सुरु आहेत. माता-पित्यांसाठी तर हे महापाप आहे. मुलगी देवीचे स्वरूप आहे. आमच्या विकृत परम्परानी मुलीला शत्रू बनविले आहे. श्री देवीपुराणाच्या तीसर्याे स्कंदात याचे प्रमाण आहे कीह्या ब्रह्माण्डाच्या प्रारम्भी तिन्ही देवतांचा (म्हणजेच श्री ब्रह्मदेवजी, श्री विष्णुजी आणि श्री शिवजी) यांचा त्यांची श्री दुर्गादेवीजींनी विवाह केला त्यावेळी कोणी वरात काढली नव्हती किंवा भोजनावळ सुद्धा घातल्या नव्हत्या. ना नाचगाणी होती किंवा बँडबाजा होता. श्री दुर्गादेवीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्री ब्रह्मदेवाला म्हटले की हे ब्रह्मा! ही सावित्री नामक मुलगी तुला पत्नीच्या रूपात देत आहोत. हिला घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाट. त्याचप्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णु यांना लक्ष्मीजी आणि कनिष्ठ पुत्र श्री शंकरजींना पार्वतीजी देऊन सांगितले, ह्या तुमच्या पत्नी आहेत. ह्यांना घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाटा. तिघेही आपल्या पत्नी बरोबर घेऊन आपल्या लोकात गेले आणि मग जगाचा विस्तार झाला.
*शंका समाधान* :- काही व्यक्ति असे म्हणतात की पार्वतीजीचा मृत्यु झाला. त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्षाच्या घरात झाला होता. यौवनात पदार्पण केल्यावर देवी सतीजींनी (पार्वती) नारदाने सांगितल्यानंतर श्री शंकरांना पति म्हणून स्वीकारण्याचा दृढ़ संकल्प करून आपल्या मातेकरवी आपली इच्छा पिता दक्ष याला सांगितली. तेव्हा राजा दक्ष यांनी म्हटले की हे शंकरजी माझे जावई बनण्यायोग्य नाहीत कारण ते नागडे राहतात. एकाच मृगजीन बांधून राहतात आणि शरीरावर राख फासून भांगेच्या नशेत असतात. सर्पांना सोबत ठेवतात. अशा व्यक्तिशी माझ्या मुलीचा विवाह करून जगात मी आपले हसू नाही करून घेणार. परंतु देवी पार्वती सुद्धा जिद्दीला पक्कया होत्या. त्यांनी स्वतःची इच्छा श्रीशंकरजींना कळवली आणि त्यांना सांगितले मी आपल्याशी विवाह करू इच्छीत आहे. राजा दक्षाने पार्वतीजीचा विवाह अन्य कोणासोबत ठरविला होता. त्याच दिवशी श्री शंकरजी आपल्या हजारोंच्या सँख्येतील भूत-प्रेत, भैरव आणि आपल्या गणां सह विवाह मंडपात पोहोचले. राजा दक्षाच्या सैनिकांनी विरोध केला. शंकारांची सेना आणि दक्षाच्या सेनेत युद्ध झाले. पार्वतीजींनी शंकरजींना वरमाला घातली. श्री शंकरजी पार्वतीजींना बलपूर्वक कैलाश पर्वतावर आपल्या घरी घेऊन गेले. काही व्यक्ति असे म्हणतात की बघा! श्री शंकरजी सुद्धा भव्य अशी वरात घेऊन पार्वतीशी विवाह करण्यास आले होते. त्यामुळे वरातीची परंपरा पुरातन आहे. त्यामुळे वरातीशिवाय विवाहात शोभा येत नाही. त्याचे उत्तर असे आहे की हा विवाह नव्हता तर प्रेम प्रसंग होता. पार्वतीजींना बलपूर्वक इचलून घेऊन जाण्यासाठी श्री शंकरजी वरात नाही तर सेना घेऊन आले होते. विवाहाची पुरातन परम्परा श्री दे���ी महापुराणाच्या तीसर्यार स्कंदात आहे व ती वर सांगितली आहे. मुले आणि मुलींनी आपल्या माता-पित्याच्या इच्छेनुसार विवाह केला पाहिजे. प्रेम विवाह हे महाक्लेशाचे कारण होऊ शकते. पुढे भगवान शंकरजी आणि पार्वतीजी यांच्यामध्ये काही गोष्टींवरून तंटा झाला. शंकरजींनी पार्वतीजीशी पत्नीचे नाते समाप्त केले व बोलाचाली सुद्धा बंद केली. पार्वतीजींनी विचार केला आता हे घर माझ्यासाठी एक नरकच बनले आहे.त्यामुळे काही दिवस मी आईकडे जाऊन राहते. पार्वतीजी आपल्या पिता दक्षाच्या घरी माहेरी गेल्या. त्या दिवशी राजा दक्ष यांनी एका हवन यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दक्षाने आपल्या मुलीला सन्मानाने न वागवता म्हटले की आज काय घ्यायला आली आहेस? बघितलेस त्याचे प्रेम, निघून जा माझ्या घरातून. पार्वतीजींनी आपल्या आईस श्री शंकरजी नाराज झाल्याची गोष्ट सांगितली. मातेने आपल्या पतिला सगळे सांगितले होते. पार्वतीजींना ना माहेरी काही स्थान होते ना सासरी. प्रेमविवाहाने अशी गंभीर परिस्थिति उत्पन्न निर्माण केली की दक्ष पुत्रीला आत्महत्या करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही आणि राजा दक्षाच्या विशाल हवनकुण्डात जाळून मृत्यू पावल्या. धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला. आपले अमोल मानवी जीवन गमावून बसल्या. पित्याचाही नाश करवला कारण जेव्हा श्री शंकरजींना हे सर्व माहिती झाल्यावर ते आपली सेना घेऊन तिथे गेले आणि आपले सासरे दक्षजीचे मुंडके छाटून टाकली. नंतर बकर्याऊचे मुंडके लावून जीवित केले. त्या प्रेम विवाहाने कसे घमासान केले. श्री शंकरांच्या सैन्याला वरात असल्याची बतावणी सांगून ह्या कुप्रथेला जन्म दिला आहे. आणि हा प्रसंग प्रेमविवाह रूपी कुप्रथेचा जनक आहे आणि हे समाजाच्या विनाशाचे कारण बनले आहे.
जे विवाह सुप्रथेनुसार झाले, ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत. जसे श्री ब्रह्मदेवजी आणि श्री विष्णुजी.
*विवाह करण्याचा उद्देश* :- संततीची उत्पाती हाच विवाहाचा उद्देश आहे. मग पति-पत्नी मिळून परिश्रम करून मुलांचे पालन करतात. त्यांचा विवाह करून देतात. मग ते आपले घर थाटतात. त्याशिवाय प्रेमविवाह हे समाजात अशांतिचे बीज पेरत आहेत. समाज बिघडवणारे हे अस्तनीतले निखारे आहेत.
0 notes
news-34 · 5 months ago
Text
0 notes