#सगळ्यात
Explore tagged Tumblr posts
Text
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी…
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी…
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी… एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस देऊन आश्चर्याचा धक्का दिलाय. ख्रिसमसनिमित्त या महिलेने आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 1 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 80 लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस देण्याची घोषणा केलीये. या महिला बॉसने बैठकीत अचानकच बोनस जाहीर करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता सोशल मीडियाच्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा • भाजप तसंच महाविका�� आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार • मतदा��ासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार • मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय • बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात आणि • मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारच राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला, तसंच उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारसभेला खरगे यांची संबोधित केलं.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित असतील.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे संजय शिरसाठ यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मराठवाड्यातल्या पहिल्या पिढीने दुष्काळ पाहिला मात्र पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, शिरसाट यांच्या प्रचारार्थ अभिनेते गोविंदा काल शहरात आले होते. यावेळी रॅली काढण्यात आली. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकर दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं तसंच बीडमध्ये परळी आणि आष्टी इथल्या सभांनाही काल संबोधित केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व चे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात त्यांनी जनसभेला संबोधित केलं.
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय पाटकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
मराठवाडा साहित्य परिषद - मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचे सर्व २२ सदस्य बहुमतानं विजयी झाले. या पॅनलच्या विरोधात डॉ. सर्जेराव जिगे यांच्या परिवर्तन मंचाचे १५ उमेदवार उभे होते. काल छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. येत्या पंधरा दिवसांत कार्यकारी मंडळाची बैठक होवून पदाधिकारी निवडले जाणार आहेत. आपण सहाव्यांदा ही निवडणूक जिंकलो असून, आता मराठवाड्यातला वा.ड्मयीन इतिहास लिहून तो प्रकाशित करण्याच्या उपक्रमासह मराठवाड्यातल्या मराठी भाषेच्या शब्दकोष निर्मितीचं काम केलं जाणार असल्याचं प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितलं.
बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.
नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध्यमातून देण्यात आले. त्याबरोबरच सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत मतदानाची शपथ दिली.
लातूर ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृतीच्या पथकाने गावात गृहभेटी देवून मतदार जागृतीस सुरुवात केली आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्र��त्न केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात ज्या गावांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा भागात, विशेष फेरी काढून, मतदान संकल्प पत्राचं वाचन करून मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. याअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांच्या मार्गदर्शनातून, अंतरवाली सराटी, नालेवाडी वाळकेश्वर, शहागड, महाकाळा अंकुशनगर कारखाना, वडीगोद्री, शहापूर आणि दाडेगाव या गावांमध्ये, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं फेरी काढण्यात आली.
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात एक हजार ५२३ मतदान केंद्रावर १४ लाख चार हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातले दोन हजार ६१२ मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदान करणार आहेत.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोली जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. या केंद्रावर ७ जानेवारी पर्यंत मूग आणि उडीद तर १२ जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्रावर संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मुग,उडीद आणि सोयाबीन केंद्रावर जावून नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी केलं आहे.
धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
Text
2 वर 36 शून्यं, रशियानं ठोठावला गुगलला महाप्रचंड दंड कारण ..
आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध असलेली गुगल कंपनी हिला रशियामध्ये तब्बल मोजता आणि उच्चारता देखील येणार नाही इतक्या रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोनवर तब्बल 36 अशी दंडाची रक्कम असून रशियाचे चलन असलेल्या रुबलमध्ये हा दंड आहे. रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनेलवर बंधनं घातल्यामुळे हा महाप्रचंड असा दंड गुगलला ठोठावण्यात आला आहे. गुगलसारख्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या…
0 notes
Text
Maharashtra Live News Today: सगळ्यात आधी पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत, संजय राऊतांचा घणाघात
Jalna Rain: जालना जिल्ह्यातील काही भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेक गावांना पुराचा फटका जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मंठा तालुक्यातील पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी माळतोंडी, देवठाणा या गावांना पुराचा फटका बसला आहे. तर पांगरी खुर्द गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानं रात्रीच गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. काही मंडळांत ढगफुटी…
View On WordPress
0 notes
Text
मराठी song with AI
गळ्यात माझिया एक दिवस तू मंगल मणी बांधले जन्मों जन्मी ची सुवासिनी मी तुझ्या मुळे जाहलेहातात हात घेऊनी तुझ्या, वचन दिले तू माझे सुखात दुःखात सगळ्यात मी, तुझ्या सोबती राहतेसांज सकाळी तुझी आठवण, मनात माझ्या दरवळते प्रेमाच्या त्या पवित्र बंधने, नाते आपले गुंफलेअक्षय अशा या नात्यामध्ये, अनंत प्रेम ते वाहते तुझ्या सोबती आयुष्य सारे, आनंदाने मी जगतेतुझ्या डोळ्यात पाहिले मी, भविष्याचे ते स्वप्न रे आशा…
0 notes
Text
आत्म्याचा आवाज
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आम���ीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्ह��� तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आ��ि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note
·
View note
Text
Pradip : हल्ली खुप चहाची दुकाने निघाली आहेत. येवले चहा, साईबा चहा, कडक चहा, प्रेमाचा चहा…..
Manya : सगळ्यात चांगला चहा कोणता?
Pradip : फुकटचा चहा!
😆😆😆🤓🤓🤓🥳🥳🥳😏😏😏
0 notes
Text
Bandya : हल्ली खुप चहाची दुकाने निघाली आहेत. येवले चहा, साईबा चहा, कडक चहा, प्रेमाचा चहा…..
जन्या : सगळ्यात चांगला चहा कोणता?
Bandya : फुकटचा चहा!
😆😆😆🤓🤓🤓🥳🥳🥳😏😏😏
0 notes
Text
जगातील सगळ्यात मोठी पॅरा मिलिटरी फोर्स म्हणून ओळख असलेल्या BSF चा आज स्थापना दिवस
आंतरराष्ट्रीय सीमांवर लक्ष ठेवणं, शत्रूंच्या कुरघोडी हाणून पाडणं, देशाचं सीमांवर रक्षण करणं हे काम BSF चे जवान दिवस रात्र करत असतात. सीमा सुरक्षा बल त्यांच्या गौरवशाली इतिहासाची ५८ पूर्ण करून नव्या वर्षात पुन्हा नव्या दमाने प्रवेश करत आहेत.
#बॉर्डर_सिक्युरिटी_फोर्स
#सीमा_सुरक्षा_दल
स्थापना दिन
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#BSF #सीमा_सुरक्षा_बल #india #indianarmy #indiannavy #bsf #bordersecurityforces #narendramodi #pune
0 notes
Text
मुंबईत म्हाडा चे सगळ्यात स्वस्त घर फक्त 9 लाखात जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर? Mhada Lottery 2023
तुमच्या बजेटमध्ये मुंबईजवळ घर घेऊ शकणार आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा महाराष्ट्र गृहनिर्माण
#mhada lottery2023#breaking news#latest news#mhadalottery#mhadanews#mumbai#news#mhada#digital marketing company in pune#lokmat#mhada lottery2023#mha fanart#mha bakugou
0 notes
Text
जगातलं सगळ्यात महाग अननस!
जगातलं सगळ्यात महाग अननस!
जगातलं सगळ्यात महाग अननस! अननस हा व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि मॅंगनीज आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा समृद्ध स्रोत आहे. विशेषतः थंडीच्या मोसमात आरोग्यासाठी हे उत्तम फळ आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, याचा एक प्रकार आहे जो खूप महाग आहे? हेलिगन अननस (Heligan pineapple) बीबीसीच्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये ज्या बागेमध्ये हे फळ उगवले जाते त्या बागेच्या नावावरून हेलिगन अननसांचे…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
• विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना महायुतीचं सरकारच आणेल असा विश्वास • भाजप फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार • सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार, न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार आणि • बीड, हिंगोली तसंच नाशिक इथं गृह मतदानाला सुरुवात
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून, विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारचं राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
****
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी, खरगे यांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीला भेट देऊन, डॉ. आं��ेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला आदरांजली वाहिली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला त्यांनी संबोधित केलं, उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्राचारार्थ खरगे यांची आज सभा होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा शहराच्या बजरंग चौकात होत आहे. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकार दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड इथं परळी विधानसभा मतदारसंघातले महाविकास आगाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
****
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात ओवैसी जनसभेला संबोधित करणार आहेत.
****
सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो, महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यावेळी उपस्थित होते. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत, अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातल्या जनतेची दिशाभूल केली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
नाशिक- चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघातले भाजपचे बंडखोर केदा आहेर आणि आत्माराम कुंभार्डे या दोघांची पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपाने मालेगाव बाह्य मधले बंडखोर कुणाल सूर्यवंशी, बागलाणमधले आकाश साळुंखे आणि जयश्री गरुड या तिघांची हकलपट्टी केली होती.
****
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
****
राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय गोखले यांनी केलं आहे. बाईट – विजय गोखले
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीन वाद, दोन प्रौढांनी सहमतीने ठेवलेल्या समलिंगी संबंधांना मान्यता ��णि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार यांचा समावेश आहे. त्यांचे हे निर्णय समाज आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे होते.
****
देशभरात आज राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जात आहे. नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, आणि समाजातल्या वंचित घटकांसह सर्व नागरिकांना न्याय प्रक्रियेचा लाभ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत शिक्षण देण्यासाठी तसंच विविध प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून विवाद निवारण यंत्रणा मजबूत करुन अधिकन्याय्य समाजाची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
****
बीड विधानसभा मतदारसंघात आजपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरिक गृह मतदान करणार असून, उद्यापर्यंत हेमतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत. नाशिक विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान होत असून, आज पहिल्या दिवशी सुमारे शंभराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं.
****
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात नवडणे शिवारातल्या एका शेतात धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरुन केलेल्या कारवाईत ६७ लाख २० हजार रुपये किमतीचा मद्यसाठा पकडला आहे.
****
0 notes
Text
--II ● विवेक विचार ● II--
. –II ● विवेक विचार ● II–अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २२९० वा दिवस भारतीय शिक्षणाची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे शिक्षकाच्या दैनिक सामान्य कार्याचा अनुभव आणि यासाठी एक सगळ्यात मोठा आणि अत्यंत आवश्यक गुण शिक्षकाच्या अंगी असणे जरुरीचे आहे. तो म्हणजे शिष्याच्या दृष्टीतून जगाकडे पाहण्याची शक्ती. शिक्षणशास्त्राच्या प्रत्येक सिद्धांतातून हेच सत्य…
View On WordPress
0 notes
Text
कडी मेहनत
“माझी समज अशी आहे की,कडी मेहनतीनेच माणूस आपली प्रगती करू शकतो.मी कठीणातले कठीण काम आलं तरी सोडत नाही.लोकं माझ्या प्रयत्नाचं नेहमीच कौतूक करतात.जी काही माझ्याक्डे शक्ती आहे त्याचा मी परीपूर्ण उपयोग करून घेतो.आणि मी त्यात यशस्वीही होतो.माझ्या यशाची जरी आणखी कारणं असली तरी माझ्या ह्या कामात शक्ती हे एक मुळ करण आहे.त्यामुळे बरेचसे व्यापारी माला कामात ठेवायला पसंत करतात. सगळ्यात कडी मेहनतीचं काम…
View On WordPress
0 notes
Text
Ration card rules| 'या' लोकांचं रेशन कार्ड होणार रद्द, काय आहे सरकारचा नवा नियम?; जाणून घ्या सविस्तर
Ration card rules| विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे आपलं रेशन कार्ड. या रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारनं रेशन कार्ड बाबत असलेल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांचा फटका देशातील हजारो लोकांना बसण्याची शक्यता आहे. कोरोना काळात प्रचंड स्थलांतर झालं लोकांची आबाळ झाली. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PM-GKAY) सुरु केली. याअंतर्गत जनतेला मोफत रेशन द्यायला सुरुवात केली होती. याचा लाभ देशातील जवळपास 80 कोटी जनतेला झाला. काहीजण यासाठी पात्र नसूनही याचा लाभ घेताना दिसून आले. सरकार अशा लोकांचं रेशन कार्ड ��द्द करण्याची शक्यता आहे. सरकारनं आणलेल्या नवीन नियमानुसार जर तुमच्याकडे 100 स्क्वेअर मीटरपेक्षा अधिकचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर असल्यास, चारचाकी किंवा ट्रॅक्टर असल्यास, ग्रामीण भागातील एखाद्या कुटुंबाचं 2 लाखांपेक्षा जास्त किंवा शहरी भागातील कुटुंबाचं 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचं रेशन कार्ड त्यांना सरेंडर करावं लागणार. या लोकांना त्यांचं रेशन कार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात जमा करावं लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीनं आपलं रेशन कार्ड अशा पद्धतीनं जमा केलं नाही तर ते छाननी करून रद्द करण्यात येईल. सोबतच कायदेशीर कारवाई होणार आहे. इतकच नव्हे तर त्यांनी घेतलेलं रेशनही त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे. हे लोक ठरणार अपात्र ज्या कुटुंबांकडे एसी, कार, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, 5 केवी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा जनरेटर, 100 चौरस मीटरचा भूखंड किंवा घर, पाच एकरपेक्षा जास्त जमीन, एकापेक्षा जास्त शस्त्र परवाना आणि आयकर भरणाऱ्या कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. तसंच ग्रामीण भागातील कुटुंबाचं उत्पन्न 2 लाख तर शहरी भागातील कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाख आहे ते लोक रेशन कार्डसाठी अपात्र ठरवले जाणार आहेत. कोरोनानंतरचं मोफत रेशन कोरोनाच्या काळात प्रचंड स्थलांतर झालं लॉकडाऊन मुळे लोकांचे उत्पन्न थांबलं यावर उपाय म्हणून सरकारने मोफत रेशन द्यायला सुरुवात केली होती. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या माहितीनुसार याचा लाभ देशातील जवळपास 80 कोटी जनतेला झाला. मात्र काही आर्थिक दृष्ट्या सुस्थिती�� असलेले लोकही याचा लाभ घेताना आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. Read the full article
0 notes
Text
सध्या मन: शांती, मानसिक स्थैर्य, peace of mind या गोष्टी खूप परिचयातल्या आहेत. हे शब्द म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य स्तंभ आहेत, ज्यावर आपल्या आयुष्याचा लेखाजोखा ठरत असतो. सगळ्यात महत्त्वाच काय असेल तर ते मानसिक स्थैर्य. या स्तंभाला डळमळीत करणारा एक जबाबदार घटक म्हणजे भीती. मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात नियतीने सर्व गोष्टींबरोबरच भयही दिले आहे. हे भय सावलीसारखे आपल्याबरोबर असते. भय असते भविष्याचे,ठरवलेली गोष्ट होईल की नाही याचे,घेतलेले निर्णय चुकतील की काय याचे. आपल्या आसपास अनाहुतपणे घडणारे प्रसंग, उद्याचा दिवस काय घेऊन येईल याची धाकधूक. अशा सगळ्या गोष्टींमुळे आज कित्येकजण हळवे आणि कमकुवत झाले आहेत आणि याच गोष्टीचा फायदा भीती घेऊ लागली. ज्या भीतीला आपण आपल्यापेक्षाही अधिक महत्त्व देऊ पाहत आहोत. ती भीती कुणी बाहेरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्याकडे आलेली नसून ती आपल्याच अतिविचारांच प्रतिबिंब आहे. हे या भीतीमुळे मनातुन बिथरलेल्या माणसांना कळायला हवं. आपण जेव्हा मी काय करु शकलो असतो पेक्षा मी पुढे काय काय करु शकेन याला अधिक महत्त्व देऊ लागतो तेव्हा भीतीची जागा आपल्याही नकळत आपल्या आत्मविश्वासाने घेतलेली असते. आणि आत्मविश्वास अस��ल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे.... 🙂
0 notes