#असत्या
Explore tagged Tumblr posts
Text
काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते...!
काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते…!
काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते…! मोठ्या गर्भश्रीमंत घरात लग्न झालं की आपण सर्वात जास्त सुखी आयुष्य जगू आणि अगदी आरामात राहू असाच विचार माझा देखील होता. शेवटी कोणत्याच मुलीला स्ट्रगल करायचं नसतं. जर एखादं श्रीमंता घरचं स्थळ आलं की आजही कित्येक मुली लगेच होकार देतात. पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार देखील करत नाही. माझ्या सोबत देखील असंच…
View On WordPress
#“..तर#असत्या#काश#गर्भश्रीमंत#गोष्टी#घडलं?#घराण्याची#जे#ते#महिला#माझ्यासोबत#माहित#या#विशेष#सून#होण्याआधी
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१४ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
���ंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस इटलीमध्ये होत असलेल्या जी - 7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान जी सेव्हन राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चेबरोबरच ग्लोबल साऊथ, विकास आणि हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडणार आहेत.
****
जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि शिस्त वृध्दींगत करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रीपदाचा तर के. राममोहन नायडू यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार काल स्वीकारला. पुढच्या पाच वर्षात संरक्षण सामुग्रीची निर्यात ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं देशाचं उद्दिष्ट असल्याचं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
****
बिल्डरकडून तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपातून फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याची ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात पोलिस अपयशी ठरल्याचं विशेष न्यायाधीश अमित शेटये यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
****
राज्यातल्या महाविकास आघाडीनं जर वंचित आणि रिपब्लिकन पक्षासोबत युती केली असती तर लोकसभा निवडणुकीत आणखी सहा जागा वाढल्या असत्या, असं रिपाइंचे डॉ.राजेंद्र गवई यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथं बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला आम्ही दहा जागांची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
विद्यार्थी निधी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने नाशिक इथं कालपासून जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परीषदेला प्रारंभ झाला. आरोग्य उपचार पद्धतीत जागतिक स्तरावर प्रगती होत असताना भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असं मत डीआरडीओचे अध्यक्ष डॉक्टर जी. सतीश रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे राजापूर- कोल्हापूर मार्ग बंद झाला आहे. दरड हटवण्याचं काम सुरू असून, इथली वाहतूक आंबा घाटमार्गे वळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
0 notes
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असता��ा बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केले���्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत ��ाजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
Text
मला तुझ्या प्रीतीचा सहारा मिळाला असता
जर तुफान नसते आले तर किनारा गवसला असतांमला तुझ्या प्रीतीचा सहारा मिळाला असताखुशीने मी माझे नेत्र अश्रुने भिजवले असते माझ्या बदल्यात तू हास्य घेतले असतेसतुझ्या बदल्यात मी नेत्र अश्रुने भरले असतेमला कदापी तुझा सर्व वेदना मिळाल्या असत्या जर तुफान नसते आले तर किनारा गवसला असतामला तुझ्या प्रीतीचा सहारा मिळाला असता मिळाली चांदणी जयाला तो नशिबवान असतामला माझ्या प्रार्बधाची इतकीच शिकायत आहेमला एखादा…
View On WordPress
0 notes
Text
शेअर बाजार आढावा: 08 डिसेंबर प्रसाद जोशी
शेअर बाजार आढावा: 08 डिसेंबर प्रसाद जोशी
ज्या प्रमुख घटना होत्या ज्यामुळे बाजारावर शेष परिणाम होणार होता त्यातील अजून एक घटना म्हणजे गुजरात व हिमाचल प्रदेश मधील निवडणूक निकाल. त्यापासून गुजरात राज्य मधील निवडणुकांचे निकाल बाबतीत बातम्या येणे सुरू झाले होते. गुजरात मधील निवडणुका या एक प्रतिष्ठेचा विषय बनला असल्यामुळे मार्केटवर याचा परिणाम होणार होता. जर अपेक्षेपेक्षा कमी जागा जर मध्ये सत्ताधारी पक्षाला मिळाल्या असत्या तर मात्र मार्केट…
View On WordPress
0 notes
Photo
पटलं तर...लाईक नाय केलं तरी चालल पण शेअर करा विकृत निर्लज्ज पैशे वाल्यानो , भष्टाचार करून पैसा कमावता अन वरून अशा प��स्ट टाकता . खालील इमेज ची पोस्ट बनविणारे , टिंगल - टवाळी करण्यासाठी ती शेअर करणारे आणि त्याच्यावर विनोदी प्रतिक्रिया देनाऱ्यानो. तुम्ही स्वतःला फार मोठे समजता... तुम्ही कोणीच नाहीत रे ....तुम्ही फक्त विकृत आहात विकृत तुमच्या पेक्षा जनावरं लै बरे ( शिव्या देण्याचे संस्कार माझ्यावर आई- बापाने केले नाहीत.नाहीतर फुल्या मारू मारू तुम्हाला शिव्या तर दिल्याचं असत्या पण पायताण काढून हाणला असता. )पण तुम्हाला लाजा वाटू द्या. तिकडे माणसं मेलीत , उपाशी मारताहेत , उध्वस्त झालीत ,अन तुम्हाला विनोद सुचत आहेत. थू तुमच्या जिंदगीवर !!! लक्षात ठेवा , एक दिवस तुम्हाला फेडावीच लागतील तुमची कर्माची पापं , अरे माज करणाऱ्या भल्या भाल्यांची वाट लागली , तुम्ही कुठले किडे रे ...इतकाच माज असेल ना तर कोरोना काळात लोकांना लुटून जो पैसा कमावलाय ना पापाने , या पूर ग्रस्तांना मदत करून ती पापे फेडण्याची संधी वाया घालू नका. नायतर तुमची पण एक दिवस वाट लागल्या शिवाय राहणार नाय .
1 note
·
View note
Text
घावांना जर जिभा असत्या
तर त्यांनी वेदना बोलून दाखवल्या असत्या.
1 note
·
View note
Text
Unknowns Diary
कधी एकदाची कामं संपणार आणि लिहायला सुरुवात करणार असं झालं होतं. सगळी कामं संपवून एकदा लिहायला सुरुवात केली की मग कशी लिहायला चांगली ४-५ तासांची बैठक बनते. पण आज सकाळी सकाळीच लेले काकी येऊन बसलेल्या गप्पा मारायला. गप्पा मारायला खूप आवडतं त्यांना. आणि माझ्याकडे काय वेळच वेळ असतो. एखाद्याकडे गप्पा मारायला विषय नसेल तर त्याने लेले काकींकडे जावं त्यांच्याकडे चिक्कार विषय पडलेले असतात. मलाही नाही लागत विषय गप्पा मारायला.
आता आजचच पाहाना. अंजली बाईने राणादाला ओळख दिली यावरून १ तास गप्पा मारत बसल्या. मुळात माझ्याकडे TV नाही त्यामुळे राणादा आणि अंजली बाई कोण हे समजण्यात माझे सुरुवातीचे १० मिनिटे गेली. मग हे नवरा बायको असलेले राणादा आणि अंजली बाईंमध्ये असं काय झालेलं की अंजली बाई राजा राजगोंडा म्हणून आलेल्या राणादाला ओळख देत न्हवती हे समजण्यात पुढची १५ मिनिटे. मग त्यांची नातीगोती, गावातलं राजकारण, त्याचं गायकवाड घराणं आणि याप्रमाणे संपूर्ण सिरीयलचा इतिहास समजून घेण्यात २०-२५ मिनिटे गेली. शेवटी लेले काकांनी बोलावलं म्हणून नाहीतर अजून अर्ध-एक तास गप्पा चालल्या असत्या.
त्या गेल्या आणि दरवाजा लावून परत कामाला सुरुवात करेपर्यंत दारावरची बेल वाजली. दुधाचे पैसे घ्यायला विठ्ठल आला होता. त्याला गेल्या ३ महिन्यांचे दुधाचे पैसे द्यायचे राहिलेले. मी कितीदा त्याला द्यायचा प्रयत्न केला.
पण म्हणायचा “परत येतो पैसे घ्यायला. तुम्ही तर इथेच आहात, का कुठे पळून जाणार आहात. आज मला उशीर होतोय, ११ ची लोकल पकडायचीय.”
आज कुठे त्याला परत यायला वेळ मिळाला होता. जनावरांसाठी आणि शेतीसाठी काही खरेदी करायची होती म्हणून गावाला आज उशिरा जाणार होता.
मी म्हटलं ”आज निवांत आहेस तर बस जरावेळ. चहा पी, मग जा.”
नाही म्हणत होता. शेवटी बसला.
चहा पितापिता गप्पागोष्टी सुरु केल्या. कामशेत वरून लोकलने पुण्याला आणि मग पुणे स्टेशन जवळ ठेवलेल्या सायकलने दररोज सकाळी गाईचं ताजं दुध आपल्यापर्यंत कसं पोहोचतं, दुधकाढण्यासाठी त्याच्या घरातल्या सगळ्यांची पहाटेची लगबग, त्यानंतर वेळेत लोकल पकडण्यासाठीची त्याची धावपळ असं सगळं सांगितलं त्याने. त्याच्या घरच्यांबद्दल, मुलाबाळांबद्दल सांगितलं.
त्यांच्याकडे वडिलोपार्जीत आलेली २ एकर शेती आहे. पूर्वी त्यांच्याकडे घरची गरज भागवतील एवढीच जनावरं होती. गेल्या काही वर्षांपासून पाऊसपण दडी मारत असतो. १०वी पर्यंतचंच शिक्षण झालेलं, तरीपण व्यावसायिक ज्ञान होतं. शेतीतून येणारं उत्पन्नपण कमी होतं चाललेलं. म्हणून गेल्या ६-७ वर्षांत शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय त्यानं वाढवला. चांगला पैसा मिळतो पण उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची कमतरता जाणवते. गेल्या उन्हाळ्यात २ जनावरं दगावली बिचारी. सरकार चारा छावण्या सुरु करत तिथे ठेवावं लागत जनावरांना मग कुठे चारापाणी मिळतो. कसंतरी करून कुटुंब चालवत होता. हा पण पूर्वीपेक्षा घरची परस्थिती आता सुधारली होती. मुलांना चांगलं अर्धा-पाऊण तास गप्पा झाल्या. खूप वेळ झाला होता एव्हाना गप्पा सुरु होऊन.
शेवटी तोच म्हणाला “चला येतो नाहीतर काम राहून जायचं”.
जाताजाता म्हणाला “Thank you चहासाठी. गेली कित्येक वर्ष पुण्यात दुध देतोय कोणी चहा प्यायला थांबवलं न्हवतं आणि ह्या सदाशिवपेठेत तर नाहीच नाही. तुम्ही आवर्जून थांबवलतं. मनमोकळ्या गप्पा मारल्या. बरं वाटलं.”
बराच वेळ झाला होता आता. माझी कामही जवळपास झालीच होती. सकाळपासून आता कुठे लिहायला बसायला कामातून उसंत मिळत होती. कथेविषयी कालपासून डोक्यात बरेच points सुचले होते ते कागदावर उतरवायचे होते. शेवटी १२ च्या आसपास लिहायला सुरुवात केली.
1 note
·
View note
Text
Day 2036 - 🚩 जय शिवराय ...🚩
टेकूनी माथा जया चरणी
मी वंदन ज्यासी करितो…
नित्यारोज तयांचे
नवे रूप मी स्मरितो…
न भूतो न भविष्यती
ऐसेची होते माझे शिवछत्रपती…
जन्मले आई जिजाऊ उदरी
पावन झाली अवघी शिवनेरी…
ऐकत असता पोवाडा सदरी
त्यात वर्णिली राणी पद्मिनी…
रजपूत राणी सुंदर विलक्षणी
कैद झाली मोघल जनानखानी…
चरचर कापले हृदय शिवरायांचे
डोळ्यात दाटले अश्रू संतापाचे…
कडाडले शिवरायsss
आम्ही आहो वंशज रामरायाचे
दिवस भरले आता मोघलांचे…
ज्याची फिरेल नजर वाकडी
आईबहिणीकडे….
त्याच क्षणी शीर मारावे
हुकुम घुमला चोहीकडे…
काबीज करता कल्याण-भिवंडी
अमाप आला हाती खजिना…
वेळ न दवडिता सरदारांनी
सादर केला एक नजराणा…
कल्याण सुभेदाराची
स्नुषा विलक्षण सुंदर…
उभी होती राजांपुढती
झुकुवूनी घाबरी नजर…
धीमी पाऊले टाकीत राजे
तिज जवळी आले…
रूप पाहुनी विलक्षण सुंदर
राजे पुढे वदले….
जर का आमच्या मांसाहेब
इतक्या सुंदर असत्या…..
आम्ही तयांचे पुत्र लाडके
असेच सुंदर निपजलो असतो….
वंदन तुजला शतदा करतो
धन्य तू शिवराया….
स्त्री जातीचा मान राखुनी
तूच शिकविले जगाया….!! ~
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभे��्छा।
1 note
·
View note
Text
प्रेमविवाहापूर्वी या गोष्टी मला कोणी सांगितल्या असत्या तर आज माझी भयानक अवस्था झाली नसती
प्रेमविवाहापूर्वी या गोष्टी मला कोणी सांगितल्या असत्या तर आज माझी भयानक अवस्था झाली नसती
प्रेमविवाहापूर्वी या गोष्टी मला कोणी सांगितल्या असत्या तर आज माझी भयानक अवस्था झाली नसती लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलते. आपल्या आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर चांगले पण जर जोडीदाराची निवड चुकली तर सर्व संपूर्ण आयुष्य बिघडून जाते. माझ्या बाबतीमध्ये देखील असेच झाले. माझ्या लग्नाला आता २ वर्षे झाली आहेत. मी माझ्या पतीसोबत प्रेमविवाह केला होता. मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे, पण असे…
View On WordPress
#“..तर#अवस्था#असत्या#आज#कोणी#गोष्टी#झाली#नसती#प्रेमविवाहापूर्वी#भयानक#मला#महिला#माझी#या#विशेष#सांगितल्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर;ठाण्याची करिश्मा संखे देशात पंचविसावी तर महाराष्ट्रातून प्रथम
राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश
दोन हजाराच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात
औरंगाबाद इथं मृत सफाई कामगारांच्या कुटूंबाला दहा लाख रुपये मदतीचे धनादेश प्रदान
सिंदखेडराजाजवळ काल झालेल्या बस आणि कंटेनर अपघातातील मृतांचा आकडा नऊवर
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे राजेश पाटील विजयी
आणिप्ले- ऑफ फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये इशिता किशोरनं देशातून प्रथम, गरिमा लोहियानं द्वितीय तर उमा हरातीनं तृतीय क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून करिश्मा संखे हिनं पहिला क्रमांक मिळवला असून, ती देशात पंचविसाव्या क्रमांकावर आहे.
या परीक्षेत एकूण नऊशे तेहतीस उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी तीनशे पंचेचाळीस उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील तर ९९ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहेत. दोनशे त्रेसष्ट इतर मागासवर्गीय, एकशे चोपन्न अनुसूचित जातीचे आणि बहात्तर उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या नऊशे तेहतीस उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तरहून जास्त उमेदवारांचा समावेश आहे.एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे बारा टक्के उमेदवार महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील यशस्वी उमेदवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे.
****
राज्यात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक गुरुबीर पाल सिंग यांनी काल मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लष्करी शिस्त आणि देशप्रेम अंगी बाणवणाऱ्या एनसीसी म��्ये सहभागासाठी राज्यातल्या तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असतो, असं सांगत, राज्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र एनसीसीची विद्यार्थी संख्या वाढवण्याचं नियोजन आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट आणि बूट मोजे असा विद्यार्थ्यांचा तर त्याच रंगसंगतीत विद्यार्थिनींचा गणवेश असेल. काही शाळांनी या वर्षी गणवेशाची मागणी कंत्राटदारांकडे नोंदवली असल्याने, अशा शाळांचे विद्यार्थी तीन दिवस शाळेने ठरवलेला तर उर्वरित तीन दिवस राज्य सरकारने ठरवलेला गणवेश घालतील, असं केसरकर यांनी सांगितलं. खासगी शाळांनीही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत विचार करावा, असं आवाहन केसरकर यांनी केलं. ते म्हणाले....
Byte…
खासगी शाळांनी खरं आता याचा विचार केला पाहिजे की
आम्ही या खासगी शाळा काढल्या १०० टक्के पगार आपण शासनाकडून घेतो , इतर खरच आपण शासनाकडून घेतो परंतु त्या शासकीय शाळा नसल्यामुळे ती मुलं याच्यापासून वंचित होतात. याचा विचार खासगी शाळांनी कधी तरी केलाच पाहिजे, असं मलं वाटतं. शेवटी शिक्षणासाठी तुम्ही या संस्था स्थापन केलं नं . मग त्या मुलांचा तुम्ही विचार करणार नाहीत का, कारण त्या जर गवरमेंट स्कूल असत्या तर त्या मुलांना सुद्धा युनिफॉर्म मिळणार. त्या मुलांना आपण मोफत पुस्तकं देतो पण युनिफॉर्म देऊ शकत नाही, इतर फॅसिलिटिस त्यांना देऊ शकत नाही, त्यांना लॅबस् देऊ शकत नाही, याच्यासाठी खासगी शाळांचे चालक महाराष्ट्राच्या मुलांचं हिताच्या दृष्टीने पुढे येणार का , ते जर स्वत: हून पुढे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि नाही आले तर मग काय निर्णय घ्यावा लागेल.., शेवटी मुलांचं हित हे शिक्षणा मधे सर्वोच्च असतं.
****
लोकसभेचे माजी अध्यक्ष तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोशी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सोमवारी सायंकाळी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत
****
आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी कार्यरत जी - ट्वेंटी कार्यगटाची दुसरी बैठक कालपासून मुंबईत सुरू झाली. सर्जनशील निधी यंत्रणेची तपासणी करण आणि संधी ओळखून विशिष्ट समुदायांवरील आपत्तीचा प्रभा�� कमी करणं, हा या बैठकीचा उद्देश आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि २० देशांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या प्रतिनिधींनी काल सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं.
****
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात झाली. बदलल्या जाणाऱ्या नोटांचा दैनंदिन हिशोब ठेवण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं सगळ्या बँकांना दिले आहेत. याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचा हिशोबही ठेवला जाणार आहे. केंद्र सरकारनं २०१६ मध्ये नोटबंदी केल्यानंतर नव्यानं चलनात आणलेल्या या नोटा, चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं गेल्या शुक्रवारी केली होती.
****
महाविकास आघाडीत एकजूट राहील आणि ती कायम असावी, अशीच आपली भूमिका असल्याचंही विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीसंदर्भात बोलताना, सूड भावनेतून तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठीक असल्याचं मत पवार यांन��� व्यक्त केलं. ते म्हणाले...
Byte…
माझं याबद्दल एवढच म्हणणं आहे की, द्वेष भावनेतनं राजकीय सूड बुद्धीतनं, काही वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणाला बोलवण्यात येऊ नये. काही त्यांना कुठे एखादा क्ल्यू मिळाला आणि त्या च्याबद्दल त्यांना काही नोटीस काढावी लागली, तर तो काढण्याचा त्यांचा अधिकार आहे.
****
पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने, राज्यातल्या मोठ्या गर्दीच्या मंदिरांचं डिजिटल मॅपिंग करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
****
यावर्षी ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आषाढी वारीचं नियोजन करण्यात येणार असून, महिला वारकऱ्यांना मूलभूत तसंच आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. पालखी मार्गावर गेल्या वर्षीप्रमाणे य��दाही दहा हजार वृक्ष लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला वारकऱ्यांना हिरकणी कक्षही उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वामी यांनी यावेळी दिली.
****
अमरावती जिल्ह्यातलं श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथून माता रुक्मिणीची पायदळी वारी पालखी आषाढी एकादशी करता पंढरपूरकडे काल मार्गस्थ झाली. या पालखीचं हे चारशे एकोणतिसावं वर्ष आहे. कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचं माहेर असून पंढरपूरमध्ये या पालखीचा विशेष मान असतो.
****
ड्रेनेज लाईन मधला गाळ कचरा काढण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आता रोबोटिक स्कॅव्हेंजर इक्विपमेंट हे आधुनिक यंत्र वापरणार आहे. महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्यासमोर काल या यंत्राचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. हे यंत्र ड्रेनेजमधला गाळ काढण्याचं काम मानवविरहित पद्धतीनं करतं, यामुळे ड्रेनेजमधल्या विषारी वायूमुळे होणारी जीवितहानी टाळता येईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. केरळमधल्या चार तरुण अभियंत्यांनी जेन-रोबोटीक्स या त्यांच्या स्टार्टअप उद्योगातून हे यंत्र तयार केलं आहे.
दरम्यान, शहरातल्या सलीम अली सरोवर परिसरात ड्रेनेज पाईप दुरुस्त करताना चार मजुरांचा आठ मे रोजी मृत्यू झाला होता, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.वेंकटेशन यांनी काल मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वेंकटेशन यांच्या हस्ते त्या कुटुंबांना देण्यात आले.
****
हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर यांची, तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे अशोक सिरामे यांची निवड झाली आहे. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात काल ही निवड प्रक्रिया झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जवळाबाजार बाजार समितीच्या सभापतीपदीसाठी शिवसेनेचे शिवाजी आप्पा भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ काल सकाळी झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातातील मृतांचा आकडा नऊवर पोहचला आहे. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत तसंच जखमी प्रवाशांना शासकीय खर्चानं योग्य ते वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या वेरूळ इथल्या डमडम तलावामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. संकेत बमणावत आणि आयुष नागलोद अशी या दोघांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात काल ��काचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. निवळी खुर्द शिवारात झालेल्या या दुर्घटनेत अन्य एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
ग्रामीण भागात पशुधन विकास अधिकारी पशुधनाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देत असल्याचं, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशूंचे निदान करण्यासाठी मेटल डिटेक्टर तसंच विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप काल करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, नायगाव, मुखेड आणि कंधार या सात तालुक्यातल्या ६२ पशुवैद्यकीय दवाखान्यांना मेटल डिटेक्टर तसंच १०१ पशुवैद्यकीय दवाखान्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले- ऑफ फेरीत चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सवर पंधरा धावांनी विजय मिळवत, अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. १७३ धावांचं लक्ष्य साधण्यासाठी फलंदाजीला आलेला गुजरात टायटन्सचा संघ अवघ्या १५७ धावात तंबूत परतला.
दरम्यान, प्ले- ऑफ गटात दुसरा सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंटस यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं एम ए चिदंबरम क्रीडासंकुलात संध्याकाळी साडेसात वाजता सामना खेळवला जाईल. या सामन्यातला पराभूत संघ स्पर्धेतून बाद होईल, तर विजेत्या संघाचा परवा शुक्रवारी गुजरात टायटन्ससोबत सामना होणार आहे.
****
७१ व्या महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेच्या काल अखेरच्या दिवशी नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे यांनी सर्वोत्कृष्ट धावपटूचा मान पटकावला. पुणे जिल्हा संघाने पुरुष आणि महिला गटात अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. म्हाळुंगे बालेवाडीच्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र ॲथलेटिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसं देण्यात आली. ओडिशामध्ये येत्या १५ ते १८ जून दरम्यान आंतर-राज्य वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी काल झालेल्या स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथे ‘वंडर केव्ह्स‘ या कार्यक्रमाचं येत्या सत्तावीस तारखेला आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं साजरा होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव, या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला शिबीर, पोवाडा गायन, प्रश्नमंजुषा आणि नृत्यनाटिका असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दुर्गम भागासह खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी शासनानं हाती घेतलेल्या “शासन आपल्या दारी” या क��र्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यात येत्या एक जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
****
0 notes
Text
रिव्ह्यू सिस्टीमवर शोएब अख्तरचं वक्तव्य, 'सचिनच्या काळात असं झालं असतं तर त्याने 1 लाख धावा केल्या असत्या'
रिव्ह्यू सिस्टीमवर शोएब अख्तरचं वक्तव्य, ‘सचिनच्या काळात असं झालं असतं तर त्याने 1 लाख धावा केल्या असत्या’
क्रिकेट नियमांवर शोएब अख्तर: शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर क्रिकेटच्या नव्या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी क्रिकेटमधील फलंदाजांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवीन नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन तेंडुलकरच्या काळात असे नियम असते तर त्याने 1 लाख धावा केल्या असत्या, असेही त्याने यावेळी म्हटले आहे. शोएब अख्तर…
View On WordPress
#क्रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#क्रिकेटच्या नव्या नियमांमुळे शोएब अख्तर नाराज#क्रिकेटच्या नियमांवर शोएब अख्तर#क्रीडा अद्यतन#क्रीडा बातम्या#��ाज्या क्रिकेट बातम्या#तीन पुनरावलोकनांवर शोएब अख्तर#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#नवीनतम क्रीडा अद्यतन क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रीडा अद्यतने#नवीनतम क्रीडा बातम्या#पुनरावलोकन प्रणालीवर शोएबचे विधान#शोएब अख्तर यू ट्यूब चॅनेल#शोएब अख्तर यूट्यूब चॅनेल#शोएब अख्तरचं सचिन तेंडुलकरवरचं वक्तव्य#शोएब अख्तरला १ लाख धावांचा टप्पा#सचिन तेंडुलकरने एक लाख धावा केल्या#सचिन तेंडुलकरवर शोएब अख्तर
0 notes
Photo
भारतीभर्ता देवी बुद्धीचे एक अत्यंत सुंदर नाव आहे भारती. भारतीय संस्कृती नुसार नाव हे प्रवृत्तीचे लक्षण असते. बाळाचे नामकरण करताना माता-पित्यांना त्यामध्ये ज्या गुणांची अपेक्षा असते त्यानुसार नामकरण केले जाते. अर्थात नावातून गुण कळत असतात. याच दृष्टीने आपल्या देशाचे नाव भारत आहे. त्यातून आपली सामाजिक प्रवृत्ती स्पष्ट होते. भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तेज. जो ज्ञानामध्ये, तेजामध्ये रत तो भा-रत. आपली संस्कृती ज्ञानाची उपासक आहे. तेजाची उपासक आहे. त्यामुळेच तो भारत आहे. याच गुणांनी देवी बुद्धी युक्त असल्याने तिला भारती असे म्हणतात. ती अशीच असायला हवी. ती असत्या वर नव्ह��� सत्यावर प्रेम करणारी हवी .ती अंधारावर नव्हे प्रकाशावर प्रेम करणारी हवी. मृत्युवर नव्हे अमृतत्वावर प्रेम करणारी हवी. अशा बुद्धीला भारती असे म्हणतात. स्वाभाविकच अशी बुद्धी ज्या तेजा वर प्रेम करते त्या परम चैतन्याला बुद्धिपती असे म्हणतात. जय भगवान श्री गणेश अशा बुद्धीचे भरणपोषण करीत असल्याने त्यांना भारती भर्ता असे म्हणतात. https://www.instagram.com/p/CU9V_2NgOXY/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
मी खेराडे वांगी आरोग्य केंद्रातील डॉक्टरला एका आजोबांना इंजेक्शन देत नाही म्हणून धुतल्यावर काही प्रस्थपितांचे बगलबच्चे आणि दलाल माझ्याबद्दल काहीही उठवायला लागले. हे चुकीचं आहे. डॉक्टर, नर्स आणि स्टाफ खूप चांगला आहे. प्रमोद मांडवेला स्टंट करायचा होता म्हणून त्यान डॉक्टरला टार्गेट केलं. आणि आणखी बरंच काही उठवलं. त्या लोकांनी खालील खेराडे वांगी येथूनच आलेली प्रतिक्रिया वाचावी. अश्या अनेक माझ्या समर्थनार्थ प्रतिक्रिया आणि फोन मला खेराडे वांगी आणि परिसरातून आले. त्या डॉक्टर आणि स्टाफ विषयीच्या तक्रारी आल्या. यावरून मी केलं हे योग्यचं केलं हे या सामान्य लोंकांच्या प्रतिक्रिया वरून स्पष्ट होतंय. मी तडीपार असतानासुध्दा व या प्रकारानंतर माझ्यावर आणखी केसेस दाखल होऊ शकतात हे माहिती असतानासुद्धा मी हे कडक पाऊल उचलंल ते स्टंट करायला नाही तर त्या गरीब-निराधार आजोबांना न्याय मिळवून देण्यासाठी. ते आजोबा माझ्या गावातील नाहीत आणि खेराडे वांगी गांव माझ्या जवळच्या भागात येतं नाही. मग तुम्ही म्हणत असलेला स्टंट तिथं करून माझा फायदा काय ? वास्तविक मी कधी जात-धर्म, जवळच-लांबचा, माझ्या गावचा-लांबचा असा कधी भेदभाव करत नाही. महाराष्ट्र सोडून आणखी कुठे माझ्यापुढे असा प्रकार झाला तर मी तिथेसुद्धा फोडाफोडी करायला मागेपुढे पाहणार नाही. यासाठी माझा जीव गेलातरी बेहत्तर. माणुसकी हाच धर्म व समाजसेवा हेच कर्म हे माझे ब्रीद आहे. माणुसकीच्या रक्षणासाठी आणि समाजसेवेच्या कार्यात मी स्वतः ला झोकून दिलंय ते तुमच्याकडून चांगले-वाईट प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाही, तर हे माझे कर्तव्य आहे. आणि या बदल्यात मला हजारो लोंकांचे शुभ आशीर्वाद मिळतात. राहिला प्रश्न तुम्ही चांगले वाईट किंवा स्टंट म्हणायचा. आपले आयुष्य प्रस्थपितांची चप्पल चाटण्यात घालवलेले तुम्ही. तुम्हाला स्वाभिमा�� राहिला नाही. आणि तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या स्टंटचं एवढं वाईट वाटतंय तर खेराडे वांगी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बद्दल अनेक लोकांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यावर तुम्ही आणि ज्यांच्या इशाऱ्यावर तुम्ही काम करता ते गप्प का बसले? त्यांच्यावर कारवाई करून तुम्ही आणि त्या प्रस्थपितांनी स्टंट करायचा होता. त्या सामान्य लोकांच्या अडचणी पण दूर झाल्या असत्या. आणि तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. पण तुम्ही हे करू शकत नाही. कारण सामान्य लोकांशी तुम्हाला काही घेणं-देणं नाही. ज्यांची तळवी चाटता त्या प्रस्थपितांनी तुम्हाला असंच कुठंतरी खितपायला लावलं की मग समजेल तुम्हाला. पण तोपर्यंत वेळ गेला असेल म्हणून लवकर सुधारा. https://www.instagram.com/p/CQ8nLe-LQfT/?utm_medium=tumblr
0 notes
Text
फक्त शॉट घ्या आणि कोरोना चालवा! हे आश्चर्यकारक कसे होईल ते जाणून घ्या
फक्त शॉट घ्या आणि कोरोना चालवा! हे आश्चर्यकारक कसे होईल ते जाणून घ्या
कोरोनाव्हायरस कॅप्सूल नक्कीच, जेव्हा तुमची नजर आमच्याद्वारे लिहिलेल्या या शीर्षकाकडे गेली असती, तेव्हा तुमच्या संवेदना बिघडल्या असत्या. आपल्या मनाने आणि मनाने काम करणे थांबवले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुमच्या बाबतीतही असे घडले असेल तर तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. सध्याच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या प्रकारची परिस्थिती पाहून आपण काय पाहू शकाल, परंतु ज्याच्या डोळ्याकडे या शीर्षकाकडे…
View On WordPress
0 notes
Text
झोपाळा...
उमरग्याला आमच्या वाड्यात प्रत्येक येणार्या जाणार्यांचे सर्वात जास्त आकर्षण म्हणजे ओसरीवरचा मोठा झोपाळा! तेल पाजून काळ्या कुळकुळीत झालेल्या वरच्या लाकडी सरीला चार लोखंडी साखळ्यांना तो अडकवलेला होता. एक फूट लांबीच्या सळ्यांना एका बाजूने फिक्स हुक आणि दुसर्या बाजूने हुकमध्ये अडकवता येतील असे अर्धवट हुक होते. या सर्व सळ्या जोडून साखळ्या तयार केलेल्या होत्या, त्या झोपाळ्याच्या चार बाजूला लावलेल्या होत्या. चार फुट बाय साडेपाच फुट आकाराच्या या झोपाळ्याच्या चारी बाजूने जाडजूड सागवानी लाकडाच्या फ्रेममध्ये तशाच जाडजूड फळ्या बसवलेल्या होत्या. या झोपाळ्यावर दोघेजण आरामात झोपू शकत. त्याच्या चारी कोपर्यांवर पितळेच्या फिरकीतून हुक बाहेर निघालेले होते. त्या हुक्सना लोखंडी साखळ्या अडकवलेल्या होत्या. वरच्या खणातील लाकडी सरीला डबल हुक असलेले लटकन दोन बाजूला अडकवलेले होते. त्या लटकनात या साखळ्या अडकवल्या होत्या. ते लटकन सरीला फिक्स असलेल्या हुकमध्ये बसवलेले होते. झोका हलवला की ती डबल हुकची कडी साखळ्यांसोबत हलायची. वरच्या फिक्स हुकला तिचे घर्षण झाले की कर्रर्र कर्रर्र असा आवाज यायचा. या आवाजातच वाड्याचा जिवंतपणा सामावलेला होता. हा आवाज कमी करण्यासाठी हुकमध्ये अधुनमधून तेल सोडले जायचे.
वाड्याच्या मुख्य दारातून हा झोका दिसायचा. बाहेरुन जाणारी काही मुले आम्ही झोपाळ्यावर बसलेले असतांना डोकावून पहायची, याची आम्हाला खूप गम्मत वाटायची. ढेळजातून सरळ पुढे येवून अंगणातल्या ��ोन पायर्या चढून ओसरीवर आलं की हा झोपाळा होता. त्याच्या बाजूलाच मागच्या वाड्यात जायचा दरवाजा होता. तिथे रहाणार्या काकू, मावश्या दुपारी यायच्या तेव्हा झोपाळ्यावर बसूनच आईसोबत त्यांच्या गप्पांच्या मैफिली चालायच्या.
कुणी बायका नसतील तर दुपारचे जेवण आटोपल्यावर आई झोपाळ्यावर वामकुक्षी घ्यायची. शाळेला सुट्टी असली की आम्हीही तिच्याजवळ झोपायचो. अशा एकांत वेळी आई तिच्या काळातली जुनी गाणी म्हणायची. नूरजहां, उमादेवी, सुरैय्याची अनेक गाणी आम्ही तिच्याकडुनच पहिल्यांदा ऐकली. झोक्याच्या लयीत ही गाणी ऐकायला खूप छान वाटायचे. पहुडायच्या आधी आई, सुंदराबाईशी गप्पा मारत पानपुड्यातले पान लावून खायची. आम्ही लहान होतो तेव्हा खलबत्त्यात पान कुटून आम्हालाही खायला द्यायची. खलबत्त्याचा खट खट आणि झोपाळ्याचा कर्र कर्र आवाज ऐकत, पान चघळत केव्हा डोळा लागायचा हे कळायचेच नाही.
लहानपणी सकाळी आंघोळ झाली की आमचा पहिला मुक्काम या झोपाळ्यावरच असायचा. हिवाळ्याच्या दिवसात अंगणातून उन्हाची किरणे यावर पडायची. अंगावर टॉवेल पांघरुन उकड बसून आम्ही या कोवळ्या उन्हात शेकत बसायचो. शाळेत जाण्यापूर्वी आईने कालवून दिलेला वरणभात याच ठिकाणी बसून खायचो. आमचे कंगवा पावडरही झोपाळ्यावर बसवूनच आई करायची. तयार झालो की वाड्यासमोरच असलेल्या ओमीताईच्या शाळेत धूम ठोकायचो.
त्याकाळी फर्नीचरला फार महत्व नसायचे. ओसरीवर एक लोखंडी पलंग आणि तात्यांची एक लाकडी खूर्ची सोडली तर बाकी काही नव्हते. ओसरी म्हणजेच वाड्यातली लिव्हिंग रुम, फन्क्शन हॉल आणि डायनिंग रुम! अनेक उपयोग ओसरीचे असायचे. आलेले पाहुणे झोपाळ्यावरच बसायचे. दोन्ही हातांनी बाजूच्या साखळ्या धरुन हलका झोका घेत गप्पा मारायला सर्वांना आवडायचे. तात्या खूर्चीवर व दादा पलंगावर बसून पाहुण्यांशी बोलत बसायचे. खूप जवळचे पाहुणे असतील तर आम्ही त्यांच्या भोवती झोपाळ्यावरच बसायचो. चहापाणी, फराळ हे सारे झोपाळ्यावर बसूनच व्हायचे. काही वेळेस ओसरीवरचा लोखंडी पलंग काढून तिथे केनचा सोफासेट ठेवला जायचा. हा सोफासेट दादांना त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात एका पक्षकाराने बँड वाजवत मिरव���ुकीने भेट म्हणून आणून दिला होता. रेक्झिनच्या निळ्या कव्हरमध्ये काथ्या भर���ेल्या कुशनचा हा सोफासेट कितीतरी वर्ष घरी होता. स्पेशल गेस्ट येणार असतील, किंवा मंगलकार्याची बोलाचाली असली तर झोपाळ्यासमोर हा सोफासेट ठेवला जायचा. बाकी वेळेस तो बैठकीत किंवा वरती रेडीओच्या माडीत ठेवलेला असायचा.
अनेक मोठी मंडळी घरी यायची. आता सर्वांची नावे आठवत नाहीत, पण तालुका-जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, वकील मंडळी, अनेक साहित्यिक (वि.आ. बुवा, द.मा. मिरासदार आदी), अनेक कलाकार (गायक चंद्रशेखर गाडगीळ, वगैरे) या सर्वांना झोपाळ्याने झुलवले. त्याकाळी आजच्यासारखे डिजिटलायाजेशन नव्हते, नाहीतर असंख्य फोटोंनी या स्मृती जागृत ठेवता आल्या असत्या!
सणावाराला झोपाळा काढून ठेवला जायचा. झोपाळ्याच्या समोर चार खण, म्हणजे चोवीस पंचेवीस फूट जागा आणि मागे एक खण म्हणजे सहा सात फूट जागा होती. या मागच्या जागेत भींतीला टेकवून झोपाळा उभा करुन ठेवला जायाचा. त्याच्या साखळ्या गुंडाळून जागेवरच वरती अडकवल्या जायच्या. या संपूर्ण एल आकाराच्या ओसरीवर पंगती बसवल्या जायच्या. जेवणाच्या पंगती पाट मांडूनच बसवल्या जायच्या, त्यामुळेच त्याकाळी पंगतीला अडचण होवू नये म्हणून इतर कुठले फर्नीचर नसायचे. नागपंचमीलाही झोपाळा काढून फक्त साखळ्यांचा झोका केला जायचा. दोन साखळ्या खालच्या कडीमध्ये एकमेकात अडकवून त्यावर जाड कपडा, पोते किंवा सतरंजी टाकून झोळी तयार केली जायची. त्या झोळीत बसून झोका घ्यायला खूपच मजा यायची.
बहिणींच्या मैत्रीणी, आमचे मित्र आले की झोपाळ्यावरच बसायचे. त्यांना झोपाळ्यावर बसायला खूप आवडायचे. तासनतास त्यावर बसून गप्पा चालायच्या. झोका घेत गाणी म्हटली जायची, सिनेमाच्या स्टोरीज सांगितल्या जायच्या. इथे बसलं की सर्वांना जोश यायचा. थोडक्यात चित्रकला, गायन, वादन, नृत्य, वक्तृत्व या सर्व कलांना स्फूर्ती देणारे ते ठिकाण होते.
वाढदिवस, ओवाळणे, डोहाळजेवणे, हळदी-कुंकू असे किती तरी कार्यक्रम या झोपाळ्याने पाहिले आहेत. राग-लोभ, रुसवे-फुगवे, चिडणे-रडणे अशा कित्येक गोष्टींचा तो साक्षीदार राहिला. तात्यांनी वाडा बांधला तेव्हापासून म्हणजे साधारण १९२०-२५ पासून हा झोपाळा वाड्यात सतत झुलत राहिला. पुढे दादांची पिढी, आमची पिढी आणि आमच्या भाच्या-पुतण्यांची पिढी, अशा चार पिढ्यांना या झोपाळ्याने झुलवले. दुर्दैवाने १९९३ च्या भूकंपात वाड्याचे आतोनात नुकसान झाले, अन हा झोपाळा कायमचा काळाच्या पडद्याआड गेला....आपल्या असंख्य आठवणी मागे ठेऊन.....
नितीन क���धारकर
औरंगाबाद.
0 notes