#गोष्टी
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Vastu Shashtra : वास्तुशास्त्रात सांगितलेल्या 'या' गोष्टी घरी ठेवा, होईल भरभराट
Vastu Shashtra : वास्तुशास्त्रात सांगितलेल्या ‘या’ गोष्टी घरी ठेवा, होईल भरभराट
Vastu Shashtra : वास्तुशास्त्रात सांगितलेल्या ‘या’ गोष्टी घरी ठेवा, होईल भरभराट Vastu Tips For Financial Stabilyty : वास्तूमध्ये मूर्ती स्थापनेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. घराची सजावट आणि सौंदर्य वाढवण्याच्या प्रक्रियेत आपण अनेक वेळा अशा मूर्ती बसवतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. Vastu Tips For Financial Stabilyty : वास्तूमध्ये मूर्ती स्थापनेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. घराची…
View On WordPress
0 notes
onlinemittra · 1 year ago
Text
0 notes
stargazer3700 · 5 months ago
Text
जीवनातल्या ह्या सहज सोप्या गोष्टी,
गम्मत, चर्चा, खिन्नता, व बरंच काही;
करायच्या आहेत मला ह्या तुझ्या सह,
स्वतःला सापडते सतत मी ह्याच घाईत.
10 notes · View notes
survivetoread · 4 months ago
Note
नमस्कार! मी आता तीन महिन्यांपासून मराठी शिकत आहे (तुमच्या langblrने मला खूप मदत केलं आहे). मला मराठी वाचायचं practice करून नवा शब्द शिकायचा आहे, पण मला वाटतं की योग्य पुस्तकं मिळणं अवघड आहे. तुम��ही नवीन मराठी शिकणारांसाठी काही पुस्तकं suggest करू शकता का?
In the likely case my Marathi was confusing, I’m looking for book suggestions (or any literature) to practice reading Devanagari and grow my vocabulary. Thanks!
हा निरोप वाचून मला खूप खूप आनंद झाला. तीन महिन्यांत तुम्ही इतकी प्रगती केली! कौतुकाची गोष्ट झाली ती तर.
मराठी साहित्य जगाची माहिती माझ्याकडे कमीच आहे. 😓 पण मी जितकी पुस्तके वाचली आहेत (सर्व २.२५ पुस्तके 😅) , त्यांच्यातून मला रत्नाकर मतकरी यांच्या गोष्टी सर्वात सोप्या वाटल्या.
तुमच्यासाठी त्या योग्य आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही, पण मी "Read With STR" प्रकल्पात त्या गोष्टी वाचल्या होत्या. येथे पाहा:
मला हा निरोप पाठवला याचे खूप खूप आभार. असले निरोप पाहून मला प्रोत्साहन मिळतं.
वाचत राहा आणि वाचत राहा!
4 notes · View notes
avinashbhondwe · 1 year ago
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
6 notes · View notes
igamravati · 2 years ago
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेह��ती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माण���ं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर ��ेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
santoshdixit · 2 days ago
Text
कबीर साहब और गोरखनाथ की ज्ञान गोष्टी💥 #santrampaljimaharajsatsnag #santr...
youtube
0 notes
adhiraj09 · 6 days ago
Video
youtube
लघवी पिल्याने माणूस १०० वर्ष जगतो बघुयात या गोष्टी मागचं गुढ.
0 notes
airnews-arngbad · 15 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज राज्यात विविध ठिकाणी प्रचार सभा • स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत राज्यात ठिकठिकाणी चित्ररथ रवाना, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम • कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्य शासकीय महापूजा, ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदीरांमध्ये भाविकांची गर्दी आणि • महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताचा मलेशियावर चार - शून्य असा विजय
भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात चिमुर, सोलापूर आणि पुणे इथं प्रचारसभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईतल्या दोन सभांना संबोधित करतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे चिखली आणि गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार संजना जाधव, तर वैजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. वैजापूर इथल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला. “लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली. आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार मतं जास्त घेतली. स्ट्राईक रेट आपला वाढला. व्होट शेअर आपला वाढला. आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे.’’
त्यानंतर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं घेतलेल्या प्रचारसभेत शिंदे यांनी, मराठवाडा आणि दुष्काळ हे दोन शब्द आपल्याला वेगळे करायचे असून, विकासाच्या माध्यमातून मराठवाड्याला न्याय द्यायचा असल्याचं सांगितलं. महायुतीच्या दहासूत्री कार्यक्रमाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. जालना इथल्या आझाद मैदानावर महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ शिंदे यांची सभा झाली.
निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल पत्रकार परिषद घेण्यात आली. खासदार डॉ. भागवत कराड, औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे उमेदवार अतुल सावे यांनी महायुतीच्या काळात शहरात झालेल्या विकासात्मक कार्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या १४ तारखेला चिकलठाणा इथं सभा होणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काल काढण्यात आलेल्या रॅलीत अभिनेते गोविंदा सहभागी झाले होते. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राज�� शिंदे यांनी काल वेंदात नगर, कबीर नगर, एकनाथ नगर, हमाल वाडी, राहूल नगर, बाला नगर परिसरात परिवर्तन पदयात्रा काढली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळ जिल्ह्यात वणी मतदारसंघात प्रचारसभा घेतली. जुनी पेन्शन आणि सार्वत्रिक मोफत शिक्षण लागू करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ज्या काही गोष्टी आपण देऊ इच्छित आहोत, जसं महिलांना सुरक्षा म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रमध्ये पोलीस स्टेशन एक वेगळं महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेलं पोलीस स्टेशन आपण उभारणार आहोत. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता जे जीवनावश्यक पाच वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये गहू आला, तांदूळ आला, साखर, तेल, डाळ या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढची पाच वर्ष हे स्थिर ठेऊन दाखवणार. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मोफत शिक्षण मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा देणार आहे.
धाराशिव इथं तुळजापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र ओबीसी सेनेनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष शरद भोवर यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात कालपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवाना करण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. “आपल्या जिल्हाभरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या रथाचं आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातल्या विशेषतः शहरातल्या मतदानाची टक्केवारी अतिशय चिंताजनक आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला ही चिंता वाटली पाहिजे की या पद्धतीने जर मतदानाची टक्केवारी कमी होत गेली तर लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.’’ केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक संचालक माधव जायभाये यांच्यासह जिल्ह्याचे मतदान जनजागृती विषयी आयकॉन असलेले प्रेषित रुद्रवा��, अर्चना गायकवाड, श्रेयस यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या गावामध्येही एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून, या व्हॅनचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल उपस्थित होते. जिल्ह्यात मागील निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झालं आहे, त्याठिकाणी या व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा काल प्रारंभ झाला. मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगून मतदान करण्याचं आवाहन या यात्रेतून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या ५० गावांमधून जवळपास एक लाख मतदारांपर्यंत ही यात्रा पोहोचणार आहे.
निवडणुकीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, स्वीप कक्ष आणि दयानंद महाविद्यालयाच्या वतीने काल घेतलेल्या विशेष कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘तिचा आवाज, तिचं मत आहे मौल्यवान’ ही संकल्पना घेवून आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मतदार जागृतीची श���थ देण्यात आली.
येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही महापूजा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. लातूर जिल्ह्यातले सागरबाई आणि बाबुराव सगर या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. एकादशीनिमित्त सुमारे दोन लाखावर भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं दर्शनासाठी जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून विविध आगारातून पैठणला जादा बस सोडण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगरनजिक पंढरपूर इथं देखील एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आ��ोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात झाली असून, काल पहिल्या दिवशी ९०० जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात एकूण २७ हजार ९६४ दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ५७७ जणांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गृहमतदानाला काल सुरुवात झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघात काल सतराशे कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
लातूर इथं निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं काल जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नर्हे-विरोळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. हिंगोली इथंही वाशिम रोडवरील पिपल्स बँक परिसरात दुचाकीवरून बॅगमध्ये साडे चौदा लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं.
महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताने सलामीच्या सामन्यात मलेशियाचा चार - शून्य असा पराभव केला. इतर सामन्यांमध्ये चीनने थायंलडचा १५ - शून्य असा पराभव केला, तर दक्षिण कोरिया आणि जपान मधला सामना दोन - दोन असा बरोबरीत सुटला. बिहारमधे नालंदा इथल्या राजगीर इथं ही स्पर्धा होत असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते काल या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं.
0 notes
pradip-madgaonkar · 16 days ago
Text
Tumblr media
Happy' Birthday Isha : Birthday Wishes From Pradip Madgaonkar शांती, स्थिरता आणि प्रेम या गोष्टी तुला मिळो. 
0 notes
sharmilachauhan1234 · 19 days ago
Text
कबीर साहब और गोरखनाथ की ज्ञान गोष्टी💥 #santrampaljimaharajsatsnag #santr...
youtube
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
New Year 2023 : वर्ष २०२३ मध्ये या गोष्टी नक्की करून पाहा, शुभ योगात धनसमृद्धीचा मिळेल खास लाभ
New Year 2023 : वर्ष २०२३ मध्ये या गोष्टी नक्की करून पाहा, शुभ योगात धनसमृद्धीचा मिळेल खास लाभ
New Year 2023 : वर्ष २०२३ मध्ये या गोष्टी नक्की करून पाहा, शुभ योगात धनसमृद्धीचा मिळेल खास लाभ २०२२ वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष २०२३ लवकरच येत आहे. याबाबत लोकांमध्ये आतापासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. येणारे वर्ष आयुष्यात प्रगती घेऊन येवो, या नव्या वर्षात नव्या आशाही राहिल्या. नवीन वर्षात ग्रह-नक्षत्राचाही शुभ प्रभाव पडावा, यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने…
View On WordPress
0 notes
onlinemittra · 1 year ago
Text
0 notes
atplblog · 1 month ago
Text
Price: [price_with_discount] (as of [price_update_date] - Details) [ad_1] गीत ही एका अर्थी सहकारी कला आहे. कवी, संगीत-दिग्दर्शक आणि गायक असे क्रमाने येणारे तीन घटक ही कलाकृती पूर्ण करतात. एकटा संगीत-दिग्दर्शक किंवा एकटा गायक धून निर्माण करू शकेल; पण गीत निर्माण करू शकणार नाही. या तिघांत अधिक महत्त्वाचा कोण, हा प्रश्न अर्थशून्य आहे. यांतला प्रत्येक घटक आपापल्या परीने तितकाच महत्त्वाचा आहे. संगीत-दिग्दर्शक नसेल तर कवीची रचना केवळ शब्दरूप उरेल, गायक नसेल तर संगीतकाराने या शब्दांतून निर्माण केलेली स्वरांची बंदिश संवेदनेच्या कक्षेतच येणार नाही. या तिघांच्या प्रतिभा एकत्र येतील तेव्हाच गीताची प्राणधारणा होऊ शकेल. गीत निर्माण होऊ शकेल. यशवंत देव यांच्यात या तीनही प्रतिभांचा संगम होता. ते कवी होते, संगीतकार होते आणि गायकही होते. त्यामुळेच शब्दप्रधान गायकीविषयी त्यांनी केलेले लेखन हे जास्त महत्त्वाचे ठरते. ‘शब्दप्रधान गायकी’ या पुस्तकात देव यांनी भावगीत गायन कसे असा��े, गाताना कोणकोणत्या गोष्टींचे व्यवधान बाळगले पाहिजे, गेय कवितेची वैशिष्ट्ये, कवितेला चाल लावताना किंवा संगीत-दिग्दर्शन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी या विषयांची चर्चा केली आहे. सुगम संगीतावर असे पद्धतशीर लिहिले गेलेले मराठी भाषेतले हे पहिलेच पुस्तक संगीताचे विद्यार्थी, रसिक, अभ्यासक यांना उपयुक्त होणारे आहे. [ad_2]
0 notes
avinashbhondwe · 2 years ago
Text
काही अनपेक्षित घडल्यास, ताणतणाव वाढल्यास छाती धडधडते. पण काही आजारातही हा त्रास होतो. अशामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी केल्यास धडधड नियंत्रित राहू शकते. @MaharashtraTimes Pune दि.२६ एप्रिल २०२३ #palpitations #heartdisease #cardiology # #avinashbhondwe #heartdiseaseawareness
2 notes · View notes
manoasha · 1 month ago
Text
"तुमचं मूल ADHD चं बळी आहे का?पालकांनी काय पाहावं?"
हायपरएक्टिविटी आणि ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) असलेल्या मुलांमध्ये आढळणारी लक्षणं अधिक सविस्तर समजून घेणे पालकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. खालील लक्षणं हायपरएक्टिव मुलांमध्ये अधिक ठळकपणे दिसू शकतात: १. लक्ष केंद्रित न होणं (Inattention): सतत काम विसरणं: मुलं शाळेची पुस्तकं, पेन किंवा शाळेतील होमवर्क सारख्या गोष्टी विसरतात. कामांमध्ये सातत्य नसणं: सुरुवातीला उत्साहाने एखादं…
0 notes