#२०२२ आयपीएल
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 12 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं, राज्यात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट उपलब्ध करुन दिले आहेत. या टप्प्यात अकरा लोकसभा मतदार संघांमध्ये, मतदानासाठी २९ हजार २८४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी या सर्व जिल्ह्यांची प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त ठिकाणी रवाना झाले आहेत. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उद्या १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदारांना मतदारयादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागानं आपल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ईसीआय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून १९५० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तत्काळ पाठवला जातो.
****
केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात २०२२ ते २०२७ या कालावधीत उल्��ास- नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या अभियानात सहभाग घेऊन ४ लाख २५ हजार ९०६ जण साक्षर झाले आहेत. यामध्ये ६६ वर्षांपेक्षा अधिक वयाचे तब्बल ९६ हजार ५१८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याचं राज्याच्या शिक्षण संचालनालयानं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून या अभियानात सहभागी झालेल्या निरक्षरांची साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्चला घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपकेंद्रातील विभागांमध्ये, २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी, प्रवेश चाचणी परीक्षा-सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश होणार असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. सीईटीसाठी १५ ते २५ मे दरम्यान नोंदणी केली जाणार असून, त्यानंतर ३ ते १४ जून दरम्यान संबंधित विभागांमध्ये ऑफलाइन पद्धतीनं सीईटी होणार आहे.
सीईटीचे ५० टक्के आणि अंतिम वर्षाच्या ऐच्छिक विषयाचे ५० टक्के गुण ग्राह्य धरून गुणवत्तेनुसार संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित केला जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी होणार असून, सीईटी परीक्षाही स्वतंत्रपणे आयोजित केलेली आहे. १०० गुणांच्या चा परीक्षेत एकूण ५० प्रश्न विचारले जातील, असं विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे आहे.
****
अमृतसर इथून सुटणाऱ्या अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसची आज रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे रुळाच्या कामांसाठी जालना जिल्ह्यात कोडी आणि रांजणी रेल्वे स्थानकांदरम्यान लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दर मंगळवारी आणि शनिवारी काही गाड्या उशिराने धावणार आहेत. तर धर्माबाद-मनमाड ही गाडी आजपासून चार ऑगस्टपर्यंत धर्माबाद ते नांदेडदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेसाठी, भारतीय कुस्तीपटू अमन शेरावतनं आपलं स्थान पक्कं केलं आहे. ही कामगिरी करणारा अमन हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. तुर्कियेतल्या इस्तंबूलमध्ये जागतिक कुस्ती ऑलिंपिक पात्रता फेरीत त्यानं ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात विजय मिळवला.
दरम्यान, भारताच्या दिपक पुनियाला ८६ किलो वजनी गटात आपलं स्थान निश्चित करता आलं नाही.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल. चेन्नईच्या एम. ए. चिंदबरम क्रीडा संकुलात हा सामना होईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता होईल. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल.
****
येत्या २४ तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा ‌अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा विभागानं दिला आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
IPL 2022: सर्वाधिक श���के ठोकणारे संघ अद्याप चॅम्पियन झालेले नाहीत, या खेळाडूच्या नावावर आहे सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम
IPL 2022: सर्वाधिक शतके ठोकणारे संघ अद्याप चॅम्पियन झालेले नाहीत, या खेळाडूच्या नावावर आहे सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने आतापर्यंत 14 हंगाम पूर्ण केले आहेत, परंतु 3 संघ दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्स यांनी आतापर्यंत विजेतेपद जिंकलेले नाही. विशेष म्हणजे, यापैकी दोन संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत टॉप-2 मध्ये आहेत. आरसीबीने आयपीएलमध्ये सर्वाधिक १४ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर पंजाब…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
'टाटा' आयपीएल २०२२; लीगचा नवा टायटल स्पॉन्सर
‘टाटा’ आयपीएल २०२२; लीगचा नवा टायटल स्पॉन्सर
‘टाटा’ आयपीएल २०२२; लीगचा नवा टायटल स्पॉन्सर इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. नुकतच टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. त्यानुसार, आता या लीगचे नाव ‘टाटा’ आयपीएल म्हणून ओळखले जाणार आहे. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
एमएस धोनी वाढदिवस: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 7 जुलै रोजी 41 वा वाढदिवस आहे. माही सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथे आपला वाढदिवस साजरा करणार आहे. धोनी (एमएस धोनी) ने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएल खेळत आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी काही…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
नव्या संसद भवनाचं उद्घघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावं, याबाबत दाखल जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही असं न्यायालयानं म्हटलं असून, त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकीलानं ही याचिका मागे घेतली आहे.
दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्घाटन परवा २८ तारखेला होणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ रुपयांचं नाणं देखील जारी करणार आहेत. या उद्घाटन समारंभात विरोधी पक्षांनी सहभागी व्हावं, असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवीन संसद भवन हे भारताची लोकशाही आणि १४० कोटी नागरिकांच्या अपेक्षांचं शक्तिशाली मूर्त स्वरूप आहे, त्यामुळे ज्या राजकीय पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्गघाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्यांनी पुर्नविचार करावा, असं त्यांनी ट्विट संदेशात ��्हटलं आहे.
***
२०२२-२३ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज कृषी मंत्रालयानं जारी केला. या चालू कृषी वर्षात तीन हजार ३०५ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. तांदूळ, गहू, मका, सोयाबीन, आणि उसाचं विक्रमी उत्पादन होईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. लाखो शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम, शास्त्रज्ञांचं प्राविण्य सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे कृषी क्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी बाबत बैठकीत ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदाही गणेशोत्सवात स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.   
***
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश परीक्षेचा डाटा हॅक करणा-या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं पुणे इथून अटक केली आहे. हा तरूण डार्कनेटवरील काही हॅकर्स सोबत संपर्कात असल्याचं आढळून आल्याचं, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. या हॅकर्सकडून त्याला प्रवेश पत्र आणि पश्नपत्रिका हॅक करण्यासाठी ४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचं देखील तपासात समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.
***
आषाढी वारीसाठी शेगाव इथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. या पालखीचं यंदाचं हे ५४ वं वर्ष आहे. एका महिन्याच्या प्रवासानंतर २७ जून रोजी ही पालखी पंढरपूरला पोहचेल.
***
औरंगाबाद शहरातील मौलाना आजाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मजहर फारुखी यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यपदी झाली आहे. यानिमित्त काल औरंगाबाद इथं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 
***
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यासाठी महत्वपुर्ण असलेल्या ८५ गांव वॉटरग्रीड योजनेचं भुमिपुजन काल आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत २७४ कोटी रुपयांच्या निधीतून ही योजना साकारली जात आहे.
***
गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शीचे पोल���स निरीक्षक राजेश खांडवे यांना न्यायाशीधांना धमकावल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी दिले होते. त्यानंतर खांडवे यांनी न्यायाधीशांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून हुज्जत घातली होती.
***
नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी आज आठ तास उशिरा धावणार आहे. ही रेल्वेगाडी नांदेड रेल्वे स्थानकावरुन तिच्या निर्धारित वेळेऐवजी संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेलवेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
क्वालालंपूर मध्ये सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व  फेरीत सिंधूनं चीनच्या झांग यीमान हिचा २१ - ११, २१ - १४ असा पराभव केला. तर प्रणॉयनं जपानच्या के निशिमोतो याचा २५ - २३, १८ - २१, २१ - १३ असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात किदांबी श्रीकांतचा इंडोनेशियाच्या सी. एदिनाता याच्याकडून पराभव पत्करावा लागला.
***
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बाद फेरीतला अखेरचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात होत आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर होणाऱ्या या सामन्यातला पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजेत्या संघाचा परवा अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना होणार आहे.
//***********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 19 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
२०२२ - २३ या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनाच्या मूल्यानं प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला असल्याचं, संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या वर्षातलं संरक्षण उत्पादनाचं सध्याचं मूल्य गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांहून अधिक वाढलं आहे. संरक्षण उद्योग आणि त्यांच्या संघटनांसमोरील आव्हानं दूर करण्यासाठी आणि देशातल्या संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार सतत काम करत असल्याचं मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
संरक्षण पुरवठा साखळीत सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आणि स्टार्ट-अप्सच्या एकत्रीकरणासह व्यवसाय सुलभ करण्याच्या उद्देशानं अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. संरक्षण डिझाइन, विकास आणि उत्पादनातल्या या धोरणांमुळे, गेल्या सात - आठ वर्षांत उद्योगांना जारी केलेल्या संरक्षण परवान्यांच्या संख्येत जवळपास २०० टक्के वाढ झाली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. या उपाययोजनांमुळे देशातल्या संरक्षण औद्योगिक उत्पादन परिसंस्थेला चालना मिळाली असून, रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत.
****
देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आज दोन नवीन न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती कलापती व्यंकटरमण विश्वनाथन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.  
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आज रवाना झाले. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान मोदी जी-7 शिखर परिषदेत स��भागी होणार आहेत. परिषदेदरम्यान पंतप्रधान अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करणार असून, हिरोशिमा इथं महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसनं भारतात वर्ष २०३० पर्यंत १२ अब्ज ७० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. या नियोजित गुंतवणूकीमुळे भारतातल्या डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अंदाजे एक लाख ३१ हजार सातशे पूर्ण वेळ नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील. क्लाऊड प्लॅटफॉर्म ही स्टोरेज, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात २०० हून अधिक सेवा पुरवते. भारतामध्ये येणाऱ्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे या क्षेत्राला मोठी उभारी मिळणार आहे. मागच्याच महिन्यात सिस्को सिस्टीम या कंपनीने त्यांच्या  जागतिक पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी भारतात उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचं उद्धाटन आज औरंगाबाद इथं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झालं. सहकार मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या बारव पुनरुज्जीवन तसंच स्थापत्याचं जतन आणि संवर्धनाकरता राज्य सरकारनं तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असणारी बारव संवर्धन समिती गठीत केली आहे. या समितीत बारव अभ्यासक, जलव्यवस्थापक, जलसंवर्धन कार्यकर्ते, वास्तूविशारद, अभियंते, कायदेतज्ज्ञ आदींचा समावेश आहे. या समितीने राज्यातल्या बारवांचं जतन आणि संवर्धन तसंच पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना तयार करावी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ बारव संरक्षित करण्यासाठी जतन संवर्धनाचे प्रस्ताव आराखडे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करावं, असे निर्देश सांस्कृतिक विभागानं दिले आहेत.
****
राजपूत भामटा जातीतून भामटा हा शब्द हटवण्यात येऊ नये, अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे. आज चंद्रपर इथं या समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली. भामटा शब्द या जातीतून वगळल्यास, विमुक्त जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक लाभ सवर्ण राजपूत घेतील आणि या प्रवर्गात मोडणाऱ्या १४ विमुक्त जातींवर अन्याय होईल, त्यामुळे भामटा शब्द वगळू नये, अन्यथा विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वजातींना सोबत घेऊन राज्यभरात तीव��र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
****
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा लखनौमध्ये येत्या २५ तारखेपासून सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरस्थ पद्धतीनं या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उद्घाटनाला उपस्थित राहणार असून, स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात क्रेरी भागातल्या वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार क��लं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात काही दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल ��िश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं पायन परिसरात घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. संयुक्त पथक संशयित घटनास्थळी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल आणि एका पिस्तूलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
****
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल देशातलं अवयवदान धोरण आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि मंत्रालयाचे सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, २०१३ मध्ये वर्षाला पाच हजारापेक्षाही कमी असलेलं प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचं प्रमाण, २०२२ मध्ये १५ हजारांपेक्षाही जास्त झालं आहे. या क्षेत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतराराष्ट्रीय मानकांचा अभ्यास करून ती कार्यान्वित करावीत, अवयवदान आणि प्रत्यारोपण याबाबत रुग्णालयांना उपयुक्त आणि दिशादर्शक ठरेल अशी मार्गदर्शक नियमावली पुस्तिका तयार करावी, प्रत्यारोपण समन्वयकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावा, अशा सूचना मांडवीय यांनी यावेळी दिल्या.
****
लोकसंख्येवरील उष्णतेचा प्रभाव मोजण्यासाठी, आणि विशिष्ट स्थानांसाठी प्रभाव-आधारित उष्मा लहरी सूचना निर्माण करण्यासाठी, भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक सुरु करणार आहे. भारतीय हवामान विभागानं गेल्या आठवड्यात देशाच्या विविध भागांसाठी प्रायोगिक उष्णता निर्देशांक जारी करण्यास सुरुवात केली. हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता लक्षात घेऊन ते खरोखर किती गरम आहे ते या निर्देशांकाद्वारे निर्धारित करण्यात येतं. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. तापमान आणि आर्द्रतेपासून, ते वारा आणि प्रभावाचा कालावधी यांसारख्या इतर बाबी या निर्देशांकात एकत्रित असतील. लोकांसाठी उष्णतेच्या ताणाचा तो प्रभावी सूचक असेल. धोक्याचा गुणांक सुमारे दोन महिन्यांत तयार होईल आणि तो पुढील उन्हाळ्याच्या हंगामात कार्यान्वित होईल असंही महापात्रा यांनी सांगितलं.
****
देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ९६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सात हजार ८७३ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ३६ हजार २४४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाप्रतिबंधक लसींची मात्रा घेतलेल्यांची संख्या २२० कोटी ६६ लाख इतकी झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
राज्यातल्या कृषी विद्यापीठाच्या दहा विद्याशाखांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा - सीईटी २०२३ साठी अर्ज भरण्यास सहा मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. साडेतेराशेपेक्षा अधिक जागांसाठी २२ ते २४ जुलै दरम्यान ही परिक्षा होणार आहे. या सीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका एक ऑगस्ट, तर निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज भरता येतील.
****
परभणी जिल्ह्यात ‘योजना जन कल्याणकारी सर्व सामान्यांच्या दारी’, या शासकीय योजनांच्या जत्रा कार्यक्रमाअंतर्गत, जिल्ह्यातल्या कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, आणि एच एल एल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं सात मे पर्यंत जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करायचे आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, खुडज, कळमनुरी, कुरुंदा, बाळापूर, आदी ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचं मोठं नुकसान झालं.
****
या आठवड्यात बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात मोचा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग, त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारनं बचाव, मदतकार्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. इकडे महाराष्ट्रात,अनेक ठिकाणी सहा मेपर्यंत जोराचे वारे, वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बंगळुरू इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज आणि दहा किलो तांदूळ मोफत देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये, बेरोजगार पदवीधरांना तीन हजार रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना एक हजार ५०० रुपये देणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतूक बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास, अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आरक्षण आणि अनुसूचित जमातींसाठी तीन वरुन सात टक्के आरक्षण, मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय राज्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासनही काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलं आहे.
****
भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ मध्ये तीन पूर्णांक आठ  टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी चार पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - आय एम एफनं म्हटलं आहे. आपल्या प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षण अहवालात आय एम एफनं, आशिया आणि पॅसिफिक बाबत ही माहिती दिली. हा प्रदेश जागतिक विकासात सुमारे ७० टक्के योगदान देईल, असं आयएमएफनं या अहवालात नम��द केलं आहे.
****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी, हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या वाशी इथं गांधी फौंडेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ३२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ३७९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४४ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७२ शतांश टक्के इतका आहे. 
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं. या नव्या आवृत्तीत ७५ पानं वाढवण्यात आली असून, शरद पवार यांच्या २०१५ ते २०२२ पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित आहेत.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं असून, सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी सन्मान योजना फसवी असून, यातून शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पटोले यांनी दिला. 
****
परभणी इथल्या प्रस्तावित जिल्हा स्त्री रुग्णालयाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पाहणी केली. या रुग्णालयाचं काम अधिक गतीनं आणि दर्जात्मक करण्याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातल्या महिलांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत���रणेला यावेळी दिले. विद्युत उपकरणं, स्वच्छता, उद्वाहन यंत्रणा, सुरक्षा भिंतीचं बांधकाम, वहानतळ आदी व्यवस्था काटोकोरपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांना आरोग्य सुविधा नजिकच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्नरत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमनं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. मोचा नामक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या १७ ठिकाणांवर आज मंगळवारी छापे टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए आणि अंमलबजावणी संचालनालय -ईडी यांनी संयुक्तपणे बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात ही कारवाई केली. केंद्र सरकारने २०२२ मध्ये पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. तरीही, पीएफआय सध्या दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी १५ राज्यांमध्ये सक्रीय असल्याचं सांगितलं जात आहे.
****
देशात गेल्या २४ तासात सहा हजार ६६० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर नऊ हजार २१३ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६३ हजार ३८० रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ शतांश टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत २२६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५०५ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात पाच हजार ७७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत म्हणाले. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
भाजप नेते राहुल कुल यांच्या मालकीच्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असून, ही रक्कम कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचा राऊत यांचा आरोप आहे. आपण गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे राऊत यांनी ��्हटलं आहे.
****
'स्वच्छता मॉनिटर' उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं, त्यांचं हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या, 'स्वच्छता मॉनिटर' उपक्रमात, सर्वोत्तम कामगिरी करणारे पाच जिल्हे, पाच समन्वयक तसंच ३० शाळा आणि विद्यार्थ्यांचा, केसरकर यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
सत्कारार्थीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फातेमा गर्ल्स उर्दू हायस्कूल, जालना जिल्ह्यात अंकुशनगर इथल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल, जनता हायस्कूल, मत्स्योदरी विद्यालय, तसंच मोतीगव्हाण इथल्या नेत्रदीप विद्यालयाचा समावेश आहे.
****
अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. याआधी ही योजना विमा कंपन्यांच्या मार्फत राबवण्यात येत होती, मात्र त्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन, अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी, शासनाच्या वतीनं, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत प्रस्ताव मंजूर करून शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात येणार आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं काम पूर्ण झालं आहे. येत्या एक मे रोजी या दवाखान्याचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं पैठण नगरपरिषदेनं कळवलं आहे.
****
जागतिक हिवताप दिन आज पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथल्या सहायक संचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीनं, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत, हिवताप जनजागृती साठी प्रदर्शनी लावण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
दिव्यांगांना पदोन्नतीसाठी, चार टक्के आरक्षण लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याला मंजुरी
सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून खेळत्या भांडवलासाठी, सिमांत कर्ज मंजूर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय
नोकर भरतीतील महिलांसाठी असलेली  नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील
राज्यात कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं आवाहन
केंद्रीय मंत्रिमंडळाची राष्ट्रीय क्वाँटम अभियानाला मंजुरी 
दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी एन साईबाबा याच्या सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा राजस्थान रॉयल्स संघावर दहा धावांनी विजय
स��िस्तर बातम्या
केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नतीसाठी, चार टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. केंद्र शासनाच्या १७ मे २०२२च्या आदेशाप्रमाणे, राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना, गट - ड ते अ च्या निम्नस्तरापर्यंत, पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येणार आहे. रिक्त पद असल्यास चार टक्के पदं दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात येतील. अपंगत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारनिहाय एकूण आरक्षण चार टक्के राहील. ज्या संवर्गात सरळ सेवेनं नियुक्तीचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नसेल अशाच संवर्गात दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण राहील.
****
राज्यातल्या शेती पंपांना दिवसा अखंडित आणि खात्रीशीर वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याला देखील, राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्यातल्या ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी, ७०० कोटी रुपयांचा स्वतंत्र फिरता निधी देखील स्थापन करण्यात येईल. चालू वर्षासाठी याकरता १०० कोटी रुपये निधी, हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येणार आहे. या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अकृषी करण्याची गरज राहणार नाही, तसंच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना ३० वर्षांपर्यंत सर्व कर आणि शुल्कांतून सूट देण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून खेळत्या भांडवलासाठी, सिमांत कर्ज -मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी, मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती काम करेल. आतापर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव, तांत्रिक तसंच वित्तीय तपासणीसाठी साखर आयुक्तांकडे पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, या प्रस्तावांना अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या मर्यादेपर्यंतच मंजूरी देण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या अकृषी विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णयही, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. थकबाकीची रक्कम पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यांमध्ये दरवर्षी एक जुलै रोजी देण्यात येईल. त्यानुसार २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षांचे हप्ते आणि २०२३-२४चा हप्ता एकत्रितपणे, एक जुलै, २०२३ रोजी देण्यात येईल. थकबाकीची रक्कम देण्यासाठी ९००कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.
****
बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना आता दरमहा आठ हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला.
****
खुल्या गटातल्या महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीकरता, तसंच सर्व मागास प्रवर्गातल्या महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या राखीव जागांकरता नामनिर्देशन पत्रासोबत, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावण्याचं आवाहन, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी महाजन यांनी काल संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. सर्वांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचं आवाहन करताना, ते म्हणाले,
Byte…
मागच्या वेळी जसा धोकादायक होता हा व्हेरिएंट, तसा यावेळी नाही. पण यासंदर्भामध्ये अधिक काळजी घेण्याचीसुद्‌धा आवश्यकता आहे. घाबरण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही आता सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये यासंदर्भातले सर्व कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना मास्क कंपलसरी केलेला आहे. ज्यांना याची लक्षणं असतील, त्यांनी सुद्‌धा बाहेर वावरताना, खरं म्हणजे घरातच आपण क्वारंटाईन झालं पाहिजे, घरात असतांना किंवा बाहेर असतांना आपण सगळ्यांनी मास्क वापरला पाहिजे की जेणेकरून याचा पुन्हा प्रसार आपल्या माध्यमातून होणार नाही. ज्यांनी व्हॅक्सिनेशन केलेलं नसेल, अजूनही त्यांनी व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे. यावेळेला याचा परिणाम कमी का आहे, तर या व्हॅक्सिनेशनमुळे.
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागानं २५ समर्पित कोविड रुग्णालयं कार्यरत केली आहेत. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी सुविधा उपलब्ध असून, एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालय ३० हजारांहून अधिक कोविड चाचण्या करू शकतात. या बैठकीत महाजन यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा घेतला.
****
शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहं बांधण्यासाठी औद्योगिक जगतानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन, राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. काल मुंबईत एका समारंभात ते बोलत होते. सर्व शहरांमध्ये, गर्दीच्या भागांमध्ये आणि विशेषतः रेल्वे स्थानकांवर, महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहं बांधावीत, सार्वजनिक ठिकाणं तसंच कार्यालयांची प्रवेशद्वारं दिव्यांग स्नेही असावीत, उद्योग समूहांनी युवकांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याच्या संधी निर्माण कराव्यात, आदी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.
****
शासकीय कारभार जलदगतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी काल मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, मध्यवर्ती टपाल केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यभरातले सामान्य नागरिक त्यांची निवेदनं आणि टपाल ��ेऊन मंत्रालयात येत असतात, तसंच क्षेत्रीय कार्यालयांतल्या कर्मचाऱ्यांद्वारेही टपाल प्राप्त होत असतात. त्याचं जलद गतीनं वाटप होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते ट��ाल पोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आलं आहे.
****
दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी महानगरपालिकांच्या मैदानांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर शासनाचा भर असून, त्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी, प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी दिव्यांगांना चाकाच्या खुर्च्याचं वितरण करण्यात आलं, तसंच दिव्यांगांच्या बास्केटबॉलचा विशेष सामनाही खेळवण्यात आला.
****
राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी झाला. सर्व परिक्षा मंडळांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अभ्यासासंदर्भात सुलभता येण्यासाठी या वर्षीपासून पुढील तीन वर्षापर्यंत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचं मराठी विषयाचं मूल्यांकन श्रेणी स्वरुपात केलं जावं, असं या शासन निर्णयात नमूद केलं आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय क्वाँटम अभियानाला मंजुरी दिली आहे. या अभियानाच्या माध्यमातून क्वाँटम तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आर्थिक वृद्धीला गती मिळेल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितलं. ते काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. चालू आर्थिक वर्षापासून २०३०-३१ पर्यंतच्या काळासाठी या योजनेकरता सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या चोऱ्या थांबवण्यासाठी चलचित्र संशोधन विधेयकाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. संसदेच्या आगामी अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाणार आहे.
****
दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी एन साईबाबा याच्या सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल सुनावणी घेत, उच्च न्यायालयानं एक स्वतंत्र पीठ स्थापन करून, यावर पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून गडचिरोली न्यायालयानं साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ती शिक्षा रद्द करत, साईबाबा याच्या सुटकेचे आदेश दिले होते. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल रद्दबातल ठरवला आहे.
****
खारघर इथल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्��मात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावावं, अशी मागणी, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सादर केलं. शिंदे सरकार खारघर घटनेतलं सत्य लपवत आहे, मात्र काँग्रेस पक्ष येत्या २४ एप्रिलला राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगणार आहे, अशी माहितीही पटोले यांनी दिली.
****
विदर्भ आणि मराठवाडा विभागातल्या दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल ही माहिती दिली. या दुसऱ्या टप्प्यात धाराशिव, लातूर, नांदेड, आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत विविध पुरस्कार काल जाहीर झाले.
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुरू केलेल्या, संजय गांधी निराधार योजना अनुदान घरपोच वाटप या अभिनव उपक्रमाला, दहा लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यस्तरावरील शासकीय कर्मचारी गटात प्रथम क्रमांकाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०२२-२३ साठीचा पुरस्कार, अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता इथले मंडळाधिका,री डॉ.मोहसिन युसुफ शेख यांना जाहीर झाला आहे. महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायिक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग राहाता मंडळ कार्यालयानं राबवला, या कल्पक प्रयोगासाठी शेख यांना हा पुरस्कार जाहीर झाला. उद्या नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासाठी २५ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. मराठी, हिंदी, इतिहास, वन्सपतीशास्त्र आणि रसायनशास्त्र या मंडळात अध्यक्षपदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. विविध विद्याशाखेतल्या १९ अभ्यासमंडळासाठी प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज राहिल्यानं २५ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. मात्र १४ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी एकही उमेदवार पात्र, ठरला नाही, त्यामुळे या १४ मंडळांच्या अध्यक्षांच्या जागा रिक्त राहणार आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात विहिरीचं खोदकाम करताना स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हिरडी गावात ही घटना घडली. तिन्ही मयत कामगार हे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातले रहिवासी असून, लहू महाजन, आबा बोराडे, बि��िषण जगताप अशी त्यांची नावं आहेत.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा इथं येत्या २५ तारखेला पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी नऊ वाजता या मेळाव्याला सुरवात होईल. लातूरसह पुणे, मुंबई, तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण १० आस्थापनांनी, एकूण ४२५ रिक्त पदं या मेळाव्यासाठी अधिसूचित केली आहेत. यासाठी १० वी, १२वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय ट्रेड, डिप्लोमा तसंच इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं राजस्थान रॉयल्स संघावर दहा धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लखनौच्या संघानं निर्धारित षटकात १५४ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला राजस्थानचा संघ २० षटकात १४४ धावाच करु शकला.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात काल संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. केरुळ आणि सांगवी इथं दोन महिलांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर पारगाव इथं वीज पडून दोन बैल दगावले.
दरम्यान, राज्यात काल मराठवाडा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. बर्याच भागात दिवसा तापमान वाढ, तर संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडत आहे.
रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथं या मोसमातलं सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर इथं ४३ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. मराठवाड्यात काल परभणी आणि बीड जिल्ह्यात सरारी ४१, तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव इथं ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज आणि उद्या राज्यातल्या चारही विभांगामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
ठळक बातम्या
****
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान, वीरता, भक्ती आणि सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रानं केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार
पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ११ जणांचा उष्माघातानं मृत्यू, तर २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
भारतीय जनता पक्षानं गेल्या आठ वर्षांत जनतेसाठी काय केलं, हे जाहीर करण्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नागपुरच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत आवाहन
पदवी परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द 
पद्मश्री शंकरबापू आपेगावकर स्मृतीप्रित्यर्थ, अंबाजोगाई इथं, धृपद संगीत महोत्सवाला प्रारंभ
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
****
वीरता, भक्ती आणि सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रानं केलं असल्याचं गौरवोद्गार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले आहेत. राज्य शासनाच्या वतीनं ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना, २०२२ चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान काल नवी मुंबईत आयोजित सोहळ्यात शहा यांच्या हस्ते देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचं काम या भूमीनं केलं आहे. कर्तृत्वानं दिलेली शिकवण चिरंजीव राहते. धर्माधिकारी कुटुंबियांनी आपल्या कर्तृत्वानं समाजात सुधारणा केली असून, एकाच कुटुंबातल्या तीन पिढ्या समाजसेवेचा वारसा जपत असल्याचं हे अनोखं उदाहरण असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
‘‘लक्ष्मी की कृपा एक परिवार पर पिढीयों तक रहती है। मैने ये भी देखा है, की एक ही परिवार में कई वीर एक के बाद एक पैदा होते है। और एक वीर परिवार की निर्मिती होती है। मैने ये भी देखा है, सरस्वती की कृपा भी कई बार कई परिवारोंपर पिढीयोंतक रहती है। मगर समाजसेवा का संस्कार तीन तीन पिढीयों तक रहना मैने मेरे जीवन मे पहली बार देखा है।’’
२५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्काराला उत्तर देताना, अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी, पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देत असल्याचं जाहीर केलं.मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा, प्रत्येकानं किमान पाच झाड लावावी, असा सल्ला त्यांनी यावेळी आपल्या अनुयायांना दिला. राज्य शासनाचं जलसंधारणाचं मोठं काम सुरू आहे. त्याद्वारे पाणी जिरवण्याच्या कामातही योगदान द्यावं, असं ते म्हणाले. या पुरस्काराचं श्रेय दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं कार्य, तसंच श्री सदस्यांच्या कार्याला जातं, अशी भावना व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘पुरस्कार हा मोठाच असतो नेहमी. तो लहान कधीच नसतो. पण तो कार्याची दखल घेऊन मला दिला गेला. कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा हा गौरव आहे. आणि नानासाहेबांनी असे कष्ट केले आणि आपण सर्व जे आज कष्ट करता आहात आणि याचा अगोदर पण केलेले आहेत. या सगळ्यांचं श्रेय आपल्या सर्वांना जातं.’’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अप्पासाहेब हे माणूस घडवण्याचं विद्यापीठ आहे, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. तर निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा देणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशातून सुमारे २० लाखाहून अधिक श्री-सदस्य उपस्थित होते. या सर्वांसाठी ५८ एलईडी स्क्रिन मैदानात उभारण्यात आले होत्या. श्री सदस्यांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ११ श्री सदस्यांचा उष्माघातानं मृत्यू झाला, तर २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असं मुख्यमंत्री सांगितलं. काल कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात या रुग्णांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
****
भारतीय जनता पक्षानं गेल्या आठ वर्षांत जनतेसाठी काय केलं, हे जाहीर करावं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल नागपुरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलत होते. भाजपला सत्तेची नशा जडल्याचा आरोप ठा���रे यांनी केला. ते म्हणाले…
‘‘आम्ही काँग्रेससोबत गेलो, कोणी घालवलं आम्हाला? २०१४ साली त्यांनी युती तोडली होती. २०१९ मध्ये सुद्धा दिलेली वचनं, आहे ना मग रामाचं नाव घेता कशाला. प्राण न जाये, पर वचन न जाये, वचन गेलं खड्ड्यात. पण माझी खुर्ची मिळाली ना, आता तू पण जा खड्ड्यामध्ये. मी सत्तेची नशा जे बोललो, सत्तेचं व्यसन जे बोललो, अरे आमचं चाललं होतं सरकार पण तुम्हाला आणखी दोन - तीन वर्ष सुद्धा थांबवलं नाही. महाराष्ट्रामध्ये माहविकास आघाडीचं सरकार हे व्यवस्थितपणे काम करत होतं, त्याच्यामध्ये तुम्ही घुसलात. त्यातनं आमचे गद्दार तुम्ही फोडले, आणि हे गद्दार त्यांना घेऊन तुम्ही आता राज्य कारभार करताय, ही सत्तेशी नशा नाही तर दुसरं काय आहे.’’
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसच्यावतीनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भाषणे झाली. यावे‍‍ळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुलवामा हल्ल्यासंदर्भात सत्यपाल मलिक यांचं वक्तव्य, हिंडेनबर्ग अहवाल, मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा, यासह अनेक विषयांवरून या वज्रमूठ सभेत सरकारवर कडाडून टीका करण्यात आली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुंबई दौऱ्यात, गुप्त भेट घेतल्याच्या वृत्ताचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, खंडन केलं आहे. काल नागपुरात, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या पार्श्वभूमीवर, ते पत्रकारांशी बोलत होते. आपण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत, त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करू नये, असंही पवार म्हणाले. राज्य सरकारकडे सध्या एकूण १६५ आमदार आहेत, त्यामुळे सत्तासंघर्षाच्या प्रकरणात १६ आमदार अपात्र ठरले तरीही, सरकारकडे बहुमतासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ कायम राहिल, ही वस्तुस्थिती असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या ��िधानानंतर, काँग्रेस पक्ष आज राज्यभर केंद्रसरकार विरोधात आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. या घटनेसंदर्भात अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील, असं ते म्हणाले.
****
उत्तर प्रदेशातल्या उमेश पाल हत्याकांडातला चकमकीत मारला गेलेला आरोपी, असद अहमद, काही काळ नाशिकमध्ये वास्तव्यात असल्याचं समोर आलं आहे. त्याला मदत करणाऱ्या एका हस्तकाला, उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलं असून, अधिक चौकशीसाठी त्याला लखनऊला नेण्यात आलं आहे. दरम्यान, असदला पुण्यात राहण्यास मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.
****
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या सुधारित नियमांनुसार, जुगार आणि सट्टेबाजीला इंटरनेटवर स्थान दिलं जाणार नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत अधिक माहिती देताना, इंटरनेटचा वापर सुरक्षित व्हावा यासाठी, सरकारनं नियमावली तयार केल्याचं सांगितलं. ऑनलाइन गेम आकर्षक, आणि मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे, सट्टेबाजीला प्रोत्साहन देणारे, व्यसन लावणारे आणि बालकांसाठी हानिकारक असलेल्या ऑनलाइन गेमला, मात्र परवानगी दिली जाणार नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. खऱ्या खोट्या माहितीची पडताळणी करण्यासाठी, केंद्र सरकारनं स्वतंत्र यंत्रणा सुरू केल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारनं अकृषिक कर एकदाच भरण्याची योजना आणली असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल क्रेडाईच्या २०२३ ते २०२५च्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळ काल विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. सरकार जर रेडिरेकनर दर कमी किंवा स्थिर ठेवत असेल, तर बांधकाम व्यवसायिकांनी बांधकामाचे दर कमी ठेवायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात कोविड १९ च्या उपचाराधिन रुग्णांची संख्या सहा हजाराच्या वर गेली आहे. सध्या राज्यात सहा हजार ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सर्वाधिक एक हजार ७०२ रुग्ण मुंबईत, तर त्याखालोखाल एक हजार ३४ रुग्ण ठाण्यात आहेत. पुण्यात ७४० रुग्ण उपाचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के, तर मृत्यू दर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.
****
पदवी परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी, छत्रपती संभाजीनगर शहरात देवळाई परिसरातल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र, रद्द करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ.प्रमोद येवले यांनी या महाविद्यालयाच्या चौकशीसाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्यीय समिती नेमली आहे. शैक्षणिक विभागाच्या वतीनं ही चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या केंद्रावरच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था दुसऱ्या केंद्रावर करण्यात आली आहे.
****
भारत राष्ट्र समिती या पक्षाची येत्या २४ एप्रिल रोजी, छत्रपती संभाजीनगर शहरात सभा होणार आहे. हैदराबादचे खासदार बी बी पाटील यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तेलंगणा राज्यात सर्वच घटकांसाठी, तसंच अनुसूचित जाती आणि शेतकऱ्यांसाठी, विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं, त्यांनी सांगितलं. आमदार जीवन रेड्डी, आमदार शकील आमिर, नेते अब्दुल कदीर मौलाना, तसंच हर्षवर्धन जाधव यावेळी उपस्थित होते.
****
पखवाजवादक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं, धृपद संगीत महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. या महोत्सवात पहिल्या दिवशी पंडित उद्धवबापू आपेगावकर आणि समूहाच्या वतीनं, मंगल वाद्य पखवाज वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर भोपाळ इथले उस्ताद अफजल हुसेन, तसंच नवीदिल्ली इथले धृपद गायक पद्मश्री उस्ताद वसिफुद्दीन डागर यांनी सादरीकरण केलं. काल पुण्याच्या विदुषी मेघना सरदार, तसंच पंडित उदय भवाळकर यांचं धृपद गायन, तर बिहार इथले पंडित प्रेमकुमारजी मलिक आणि पंडित प्रशांत मलिक यांचं धृपद गायन आणि जुगलबंदी झाली. आज या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात श्री संत गोरोबा काकांच्या यात्रेला काल मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महापुजा पार पडली. या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शंभरावर वारकरी दिंड्या आणि हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. काल पहिल्या दिवशी गोरोबा काकांच्या पालखीसह सर्व वारकरी दिंड्यानी नगर प्रदक्षिणा घातली. गोरोबा काकांच्या पुण्यतिथी सोहळा कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
इंडियन प्रिमिअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबई ��ंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पाच गडी आणि १४ चेंडू राखून पराभव केला. मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करत, सहा बाद १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई संघाने हे आव्हान १७ षटकं आणि चार चेंडूत पाच गडी गमावत साध्य केलं. या सामन्यासाठी मुंबईनं अंतिम संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश केल्यानं, अर्जुनचा हा आयपीएलचा पदार्पणाचा सामना ठरला. त्यानं दोन षटकांत १७ धावा दिल्या.
अन्य एका सामन्यात राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फंलदाजी करत गुजरातच्या संघानं निर्धारित षटकात सात बाद १७७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या राजस्थानच्या संघाने चार चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केलं.
****
आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते ��ॅप्टन भाऊराव खडताळे यांचं काल मुंबई इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९७ वर्षांचे होते. खडताळे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची हानी झाल्याची भावना भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या आडुळ परिसरात अब्दुलापूर, शिवगड तांडा डोंगराला काल दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आग लागली. परिसरातल्या नागरीकांनी बराच वेळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
****
हिंगोली इथं माऊली प्रतिष्ठानद्वारा संचलित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. २१ ते २३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चितानंद शेवडे यांच्यासह अनेक मान्यवरांचं व्याख्यान होणार आहे.
****
लातूर इथं भगवान परशुराम जयंतीच्या अनुषंगाने उद्या डॉ.संजय उपाध्ये यांच्या, 'प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा, "जिंकलो ऐसे म्हणा", या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी सहा वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या दुर्गसावंगी इथं काल एसटी गाडीमध्ये जागा पकडण्यावरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्यांविरूद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
जगातली तिसरी लेझर ग्रॅव्हीटेशनल वेधशाळा औंढा नागनाथ इथं उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय आज राज्यांसोबत बैठक घेणार
१४ फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात पाच हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छूक
राज्यातल्या तीन हजार ६६६ सदस्य, आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजपासून ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबवण्यात येणार
वेतन श्रेणीची मागणी मान्य झाल्यानंतर राज्यातल्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचा संप मागे
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा रॉलय चॅलेंजर्स बंगळुरु संघावर ८१ धावांनी विजय
****
भारतीय अंतराळ धोरण २०२३ ला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून, जगातली तिसरी लेझर ग्रॅव्हीटेशनल वेधशाळा हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं दोन हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
‘‘ऑब्जर्वेटरीज की एक कल्पना की गई है। इसमे महत्वपूर्ण बात ये है की आज तक विश्वभर मे केवल दो ऑब्जर्वेटरीज इस प्रकार थी, जो युनायटेड स्टेट्स मे थी। तो जे जो एमओयू हुए थे जिसमे ये निर्णय लिया गया, और युएसएने भी इस बात को स्वीकार किया की तिसरी ऑब्जर्वेटरी होगी, उसकी स्थापना भारत मे की जाएगी। और ये 2600 करोड रुपये की लागत से इस लेझर ऑब्जर्वेटरी का सेटअप, इसके लिये स्थान चयन किया गया है महाराष्ट्र मे हिंगोली स्थान पर।’’
  भारतासाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरणारी, ब्रम्हांडाचा धांडोळा घेणारी आणि भारतात खगोलशास्त्राला चालना देणारी ही वेधशाळा असणार आहे. यापूर्वीच्या दोन वेधशाळा या अमेरिकेत आहेत. ��ा वेधशाळेच्या स्थापनेमुळे भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षमतेला मोठं बळ मिळणार असल्याचं जिंतेंद्र सिंग यांनी सांगितलं.
****
देशाच्या अनेक भागात वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय हे आज राज्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोविडची परिस्थिती, वाढते रुग्ण, उपाययोजना आणि तयारी; याबाबत आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, देशात काल पाच हजार ३३६ नवे कोविडबाधित रुग्ण आढळून आले. देशात सध्या २५ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
तर राज्यात काल कोविडचे नवीन ८०३ रुग्ण आढळून आले, आणि तीन जणांचा या आजारानं मृत्यू झाला. सध्या राज्यात तीन हजार ९८७ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, नाशिक, पालघर आणि सोलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.
****
१४ फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात पाच हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं मुंबईत आयोजित `इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र` परिषदेत ही माहिती देण्यात आली. फ्रेंच कंपन्यांना राज्यात वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असून, याद्वारे दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध अधिक दृढ होत आहेत, असं फ्रान्सचे वाणिज्य दूत ज्यों मार्क सिरे-शार्ली यांनी यावेळी सांगितलं. भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची ठरणार असून, राज्यातल्या उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचं सहकार्यही नक्कीच मोलाचं ठरेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं राज्यातल्या ग्रामीण स्वराज्य संस्थांना २०२२-२३ या वित्तीय वर्षातल्या बंधित अनुदानापोटी, एक हजार ८३ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी ही माहिती दिली. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित निधीचा हा दुसरा हप्ता असून, राज्याला आतापर्यंत तीन हजार ६२६ कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून राज्याच्या ग्रामीण भागात मूलभुत सोयी- सुविधांबाबतच्या विकास कामांना गती मिळेल, ग्रामीण भागातल्या स्वच्छता अभियानासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरूस्ती, पेयजल पाणी पुरवठा, पर्जन्य जलपुनर्भरण इत्यादी कामं या माध्यमातून पूर्ण केली जातील, असं महाजन यांनी सांगितलं.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. लोकसभेचं कामकाज सुरु होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती देत, सदनात सादर झालेल्या आठ विधेयकांपैकी सहा विधेयकं मंजूर झाल्याचं सांगितलं. सदनाच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या व्यत्ययाबद्दल नाराजी व्यक्त करत देशाच्या ��ोकशाही व्यवस्थेसाठी हे उचित नसल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यसभेतही सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांना संबोधित केलं. संसद ही लोकशाहीची हितरक्षक आहे,  जनतेचं आपल्यावर लक्ष असून आपण जनतेसाठी उत्तरदायी आहोत, असं ते म्हणाले. जनतेची सेवा हे आपलं मूलभुत कर्तव्य आहे. सदनातल्या लोककल्याणासाठीच्या चर्चा आणि संवादाची जागा गदारोळानं घेतली आहे, असं सांगून अव्यवस्थेचं नवं तंत्र निर्माण होऊ पहात आहे आणि लोकशाहीसाठी ते धोकादायक असल्याचं सभापती म्हणाले.
****
राज्यातल्या जवळपास दोन हजार ६२० ग्रामपंचायतीमधल्या तीन हजार ६६६ सदस्य, आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी, १८ मे रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल ही घोषणा केली. निधन, राजीनामा, अपात्रता किंवा अन्य कारणांमुळे ही पदे रिक्त झाली आहेत. २५ एप्रिल ते दोन मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तीन मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर आठ मे च्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १९ मे रोजी मतमोजणी होणार आहेत.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजपासून ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबवण्यात येणार असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गामुळे अवयवदानाची चळवळ मागे पडली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या अभियानाची सुरुवात करण्यात येईल आणि वर्षभरात वार्षिक उपक्रमांचं नियोजन केलं जाईल, असं ते म्हणाले. याअंतर्गत जनतेला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात येईल तसंच त्यांचे याबाबतचे गैरसमज दूर केले जातील, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. त्यांचं मानधन आता साडे सात हजार रुपयांवरुन पंधरा हजार रुपये होणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी जाहीर केलं. उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना या मानधन वाढीबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्यातल्या सर्व १२ हजार ७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतकं मानधन लागू करण्यात आलं असून, या महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची काल नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं या संबंधी माहिती दिली. प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख तर प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपिचंद पडळकर, अनिल परब, विलास पोतनीस, अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, भाई जगताप, अभिजित वंजारी आणि कपिल पाटील यांना या समितीवर नियुक्त करण्यात आलं असल्याचं सचिवालयानं कळवलं आहे.
****
प्रसार माध्यमांनी ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती आणि प्रसार करू नये, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सा��गितलं आहे. यासंदर्भात मंत्रालयानं काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सट्टेबाजी आणि जुगार एक बेकायदेशीर प्रकार असल्यानं, माध्यमांवर अशा जाहिराती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विविध कायद्यांचं उल्लंघन करतात, त्यामुळे वर्तमानपत्रं, खाजगी उपग्रह वाहिन्या, डिजिटल माध्यमं आणि ऑनलाइन जाहिरात मध्यस्थांनी त्याचा प्रसार करू नये, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. जी माध्यमं, संस्था सूचनांचं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मंत्रालयानं दिला आहे.
****
दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी आणि त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची घोषणा, भारतीय रिझर्व बँकेनं केली आहे. सध्या, ठेवीदार आणि लाभार्थींना अशा ठेवी शोधण्यासाठी, अनेक बँकांच्या संकेत स्थळांवर जाऊन ठेवीं बाबत माहिती शोधावी लागते. दावा न केलेली ठेव म्हणजे दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणत्याही प्रकारचा व्यवहार न केलेल्या बॅँक खात्यांमध्ये जवळपास ३५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी या ठेवी रिझर्व्ह बँकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. याद्वारे या संदर्भातल्या परवाना किंवा इतर कोणत्याही नियामक मंजुरीची प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी आणखी एक केंद्रीकृत घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. या उपायामुळे नियामक प्रक्रियांमध्ये अधिक कार्यक्षमता येईल आणि व्यवसाय करणं सुलभ होईल, असं दास म्हणाले.
****
राज्य महिला आयोगानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याप्रकरणी आयोगानं स्वतः दखल घेतली असून, येत्या मंगळवारी, ११ एप्रिल रोजी आयोगाच्या कार्यालयात व्यक्तिश: उपस्थित राहून या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लेखी पत्राद्वारे आयुक्तांना दिले आहेत.
****
नायब तहसीलदारांची वेतन श्रेणी चार हजार ८०० रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानं राज्यातल्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी काल संप मागे घेतला. यासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा वेतन श्रेणी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अर्थ मंत्रालयाकडून यासाठी मंजुरी देखील घेण्यात आली.
****
भारतीय रिझर्व बँकेनं २०२३-२४ वर्षासाठीचा पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा काल जाहीर केला. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय नाणेविषयक धोरण समितीन��� धोरणात्मक दरांमधे कोणताही बदल केला नाही. रेपो दर साडेसहा टक्के कायम ठेवला आहे. स्थायी ठेव सुविधा दर सव्वा सहा टक्के, तर सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर पावणे सात टक्क्यावर कायम ��हेत. गेल्या एका वर्षात प्रभावी दर वाढ २९० बेसिस पॉईंट्स झाली आहे आणि चलनविषयक धोरण समितीला विराम देणं आणि त्याच्या एकत्रित परिणामाचं मूल्यांकन करणं आवश्यक आहे, असं सांगत दास यांनी रेपो दरात बदल न करण्याचं कारण स्पष्ट केलं. रिझर्व्ह बँकेनं २०२३-२४ साठी स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा अंदाज साडेसहा टक्के व्यक्त केला आहे.
****
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीनं सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथंही पक्षाच्या विभागीय कार्यालयात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पक्ष स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादाचा, देशाच्या सर्वांगीण विकासाचा, देशसेवेचा संकल्प करणारा पक्ष असल्याचं सावे यावेळी म्हणाले. `भारतीय जनता पक्ष - एक दृष्टिक्षेप` या विषयावर क्रांती चौक इथं छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनही सावे यांच्या हस्ते झालं.
****
नव्या वाळू धोरणामुळे घरांच्या किंमती आवाक्यात येतील, अशी अपेक्षा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. यापुढे वाळू लिलाव बंद होणार असल्यानं डेपोतूनच ६०० रुपये प्रति ब्रास दरानं वाळू उपलब्ध होणार आहे. वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्यानं येणाऱ्या तक्रारी आणि अनियमिततेला यामुळे आळा बसेल असं विखे- पाटील यांनी सांगितलं.
****
बीड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना जलप्रहरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या १०० गावांमध्ये राबवण्यात आलेल्या जल आत्मनिर्भर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची केंद्र सरकारनं दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान केला. घरांवरचे पत्रे आणि छतावरून येणारं पाणी विहिरी, बोअरवेल मध्ये साठवण्याचा प्रयोग त्यांनी राबवला. या प्रकल्पामुळे भूगर्भातली पाणीपातळी वाढायला मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं.
शासनाने महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यासाठी जलप्रहरी हा अवार्ड मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मला देण्यात आला. भारतामध्ये हा एकमेव प्रयोग आहे, की आम्ही एकाच वेळी शंभर गावांमध्ये कॅच द रेन म्हणजे प्रत्येक घरावरचं पावसाचं पाणी बोअरवेलमध्ये आणि विहीरमध्ये टाकण्याचा आम्ही प्रयोग केला. यामध्ये आम्ही साधारण पाच हजार दोनशे अठ्ठेचाळ घरे, तलाठी कार्यालय, ग्रामसेवक कार्यालय, शाळा यांचा यामध्ये समावेश आहे. याची दखल केंद्र शासनाने घेतल���.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता नाईट रायडर्स संघानं रॉलय चॅलेंजर्स बंगळुरु संघावर ८१ धावांनी विजय मिळवला.  प्रथम फलंदाजी करत कोलकाताच्या संघानं दिलेलं २०५ धावांचं लक्ष्य साध्य करताना, बंगळुरुचा संघ १२३ धावातच सर्वबाद झाला.
****
छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेतले कंत्राटी कनिष्ठ अभियंता शेख मोईनुद्दीन शेख नईम आणि कनिष्ठ लिपिक निखिल गायकवाड यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. आधार केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेची शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
परभणी जिल्ह्यात ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग, या प्रवर्गातल्या अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी न केलेल्या उमेदवारांची जात पडताळणी केली जाईल. यासाठी येत्या एक मे पर्यंत उमेदवारांना समितीकडे अर्ज सादर करता येतील, असं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं कळवलं आहे.
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
WI vs BAN: वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला, घरच्या मैदानावर 12वी T20 मालिका जिंकली, काविया मारनच्या निकोलस पूरनने चौकार आणि षटकारांनी पन्नास शतक ठोकले - WI vs BAN: वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला, घरच्या मैदानावर 12वी T20I मालिका जिंकली; काव्या मारनच्या यष्टिरक्षकाने पन्नास चौकार आणि षटकार ठोकले
WI vs BAN: वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला, घरच्या मैदानावर 12वी T20 मालिका जिंकली, काविया मारनच्या निकोलस पूरनने चौकार आणि षटकारांनी पन्नास शतक ठोकले – WI vs BAN: वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला, घरच्या मैदानावर 12वी T20I मालिका जिंकली; काव्या मारनच्या यष्टिरक्षकाने पन्नास चौकार आणि षटकार ठोकले
निकोलस पूरन यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने ८ जुलै २०२२ (भारतीय वेळेनुसार) पहाटे बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला. यासह त्याने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशी जिंकली. वेस्ट इंडिजने मालिकेतील दुसरा सामना 35 धावांनी जिंकला, तर पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
राजस्थान रॉयल्सनंतर, चेन्नई सुपर किंग्ज देखील प्रस्तावित महिला आयपीएलमध्ये संघ तयार करण्याचा विचार करेल. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी शनिवारी कोझिकोडमध्ये सांगितले की, “एकदा बीसीसीआयने महिला आयपीएलच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेतला की, आम्ही त्यात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवू.” जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच बोलू. स्पोर्ट्सस्टारने काशी विश्वनाथचाही हवाला देत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
IND vs ENG: मुंबई इंडियन्स आणि RCB चे चाहते स्टेडियममध्ये दिसले, फोटो व्हायरल
IND vs ENG: मुंबई इंडियन्स आणि RCB चे चाहते स्टेडियममध्ये दिसले, फोटो व्हायरल
भारत विरुद्ध इंग्लंड: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. यादरम्यान स्टेडियममध्ये आयपीएलचे चाहते पाहायला मिळाले. पुरुष चाहत्याने मुंबई इंडियन्स (MI फॅन) आणि महिला चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB फॅन) जर्सी घातली होती. या आयपीएल चाहत्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
माजी दिग्गजांचे वक्तव्य, म्हणाले- जोस बटलरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार व्हावे
माजी दिग्गजांचे वक्तव्य, म्हणाले- जोस बटलरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार व्हावे
जोस बटलरवर मायकेल वॉन: इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर इंग्लंडचा नवा कर्णधार कोण असेल, याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक, मायकेल वॉन म्हणाला की, यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरला इंग्लंडचा नवा कर्णधार बनवायला हवे. त्याचबरोबर तो म्हणाला की, जोस बटलर हा सध्याच्या घडीला मर्यादित षटकांच्या…
View On WordPress
0 notes