#तामिळनाडू क्रिकेट
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित • बहिष्कार मागे घेत महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांकडूनही शपथग्रहण • अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सावाला वर्णी महापूजेने प्रारंभ • पोलिस व्यवस्थेत संरचनात्मक बदलांची अपेक्षा निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांच्याकडून व्यक्त आणि • आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीन वेगवेगळ्या क्रिकेट सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत काल दुपारी बारा वाजता संपली, या मुदतीत फक्त नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी पक्षाकडून कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज केलेला नाही. आज सभागृहात नार्वेकर यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी सदस्यत्वाच्या शपथग्रहणावर टाकलेला बहिष्कार काल मागे घेतला. अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. दरम्यान, आठ आमदारांनी अजुनही सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही, यामध्ये पैठणचे आमदार विलास भुमरे, यांच्यासह उत्तम जानकर, शेखर निकम, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर सुनील शेळके, विनय कोरे आणि जयंत पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान, सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर ईव्हीएमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि ईव्हीएमला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध केला. ईव्हीएमवर शंका घेणं हा संविधानाचा अपमान असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ईव्हीएमवर आक्षेप घेऊन शरद पवार यांनी लोकशाहीवरुन लोकांचा विश्वास उठेल, असं वक्तव्य करु नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी पराभव स्वीकारावा, असं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बोलतांना, निवडणुकीतल्या अपयशाचं खापर मतदानयंत्रावर फोडण्याची विरोधकांची कृती लोकशाहीला अपायकारक असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप का घेतला गेला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मारकडवाडी इथं ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला असण्याची शक्यता असू शकेल, मात्र, एखादं मशीन बिघडलं म्हणजे सर्वच ईव्हीएम खराब आहेत असा त्याचा अर्थ होत नाही, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. ग्रामस्थांना काही शंका असतील तर निवडणूक आयोगाने त्याचा तपास करून शंका निरसन केलं पाहिजे, असं आठवले म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे करण्यात आली. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर, ‘‘लोकसभेच्या तीस आणि विधानसभेच्या पंचेचाळीस अशा एकूण पंच्याहत्तर मतदान केंद्रावरील मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. लॉटरी पद्धतीनुसार या निवडक केंद्रांची सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून निवड करण्यात आली होती. तर मतमोजणीची ही ��डताळणी प्रक्रिया निवडणूक निरीक्षकांच्या पुढे केली गेली.’’ आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेडहून अनुराग पोवळे
कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून तामिळनाडू इथल्या एका इसमाला पाच कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. निरंजन कुलकर्णी असं या आरोपीचं नाव असून, त्याने तामिळनाडू इथल्या नरसिम्हा रेड्डी या व्यक्तीला आपल्या राजकीय ओळखी सांगून, कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यासाठी १५ कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यातले पाच कोटी आठ लाख रुपये देखील घेतले होते. न्यायालयाने या आरोपीला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सावाला काल वर्णी महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार विलास तरंगे यांनी सपत्निक योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. महोत्सवाच्या कालावधीत मंदिरात जवळपास चार ते पाच हजार महिला आराध बसणार असल्याची माहिती देवल समितीच्या वतीने देण्यात आली.
पोलिस व्यवस्थेत संरचनात्मक बदल व्हावेत, अशी अपेक्षा निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल अनंत भालेराव प्रतिष्ठानचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' बोरवणकर यांना प्रदान करण्यात आला, त्यानंतर ‘पोलीस, राज्यकर्ते आणि समाज: आव्हाने आणि उपाय’ या विषयावर त्या बोलत होत्या. गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून, त्या तुलनेने पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.. ५० हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह या स्वरुपाचा हा पुरस्कार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या हस्ते बोरवणकर यांना प्रदान करण्यात आला, बोरवणकर यांनी हा पुरस्कार राज्यातल्या पोलिसांना, तर पुरस्काराची रक्कम पोलीस फाउंडेशनला समर्पित केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काल झालेल्या तीन वेगवेगळ्या प्रकारातील सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दुबई इथं १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारताचा बांग्लादेशकडून ५९ धावांनी पराभव झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशनं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ ३५ षटकं आणि दोन चेंडूत १३९ धावा काढून बाद झाला.
महिला क्रिकेटमध्ये देखील ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर १२२ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला तिसर��� आणि अखेरचा सामना येत्या ११ डिसेंबरला पर्थ इथं होणार आहे. ** बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियानं हा सामना दहा गडी राखून जिंकला असून, पाच सामन्यांच्या मालिकेत १ - १ अशी बरोबरी साधली आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव केवळ १७५ धावांतच आटोपला. नितीश रेड्डी यानं सर्वाधिक ४२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात यजमान संघासमोर विजयासाठी अवघं १९ धावांचं आव्हान उरलं. ते ऑस्ट्रेलियानं एकही गडी न गमावता पूर्ण केलं. मालिकेतला तिसरा सामना येत्या १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन इथं खेळला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून विविध कार्यक्रमांची सुरुवात काल करण्यात आली. महापालिकेच्या विविध वाहनांचं पथसंचलनही काल करण्यात आलं. वर्धापन दिनानिमित्त आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात तरवडी इथल्या सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. राधेशाम जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती, स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली. यासह इतर साहित्य पुरस्कारांचं वितरण येत्या २२ तारखेला तरवडी इथं होणार आहे.
सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगडावर काल शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. भवानी मातेची महापूजा तसंच ध्वजस्तंभाचं पूजन करुन भगव्या ध्वजाचं रोहण करण्यात आलं. आरती नंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
परभणी जिल्ह्याच्या सेलू शहरात जायकवाडी वसाहतीत जलसंपदा विभागाच्या निम्न दुधना प्रकल्पाच्या कार्यालयाला काल रात्री आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
फेंजल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असली तरी, उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाल्यानं, गारठा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
0 notes
Text
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
राजस्थान रॉयल्सनंतर, चेन्नई सुपर किंग्ज देखील प्रस्तावित महिला आयपीएलमध्ये संघ तयार करण्याचा विचार करेल. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी शनिवारी कोझिकोडमध्ये सांगितले की, “एकदा बीसीसीआयने महिला आयपीएलच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेतला की, आम्ही त्यात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवू.” जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच बोलू. स्पोर्ट्सस्टारने काशी विश्वनाथचाही हवाला देत…
View On WordPress
#CSK#CSK आणि रवींद्र जडेजा#CSK मधील मालक संघ आणि रवींद्र जडेजा यांचा विचार#CSK-रवींद्र जडेजा संबंध#TNP#TNPL#आयपी��ल २०२२#इंडियन प्रीमियर लीग#चेन्नई सुपर ��िंग्ज#चेन्नई सुपर किंग्ज बातम्या#चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएल#चेन्नई सुपर किंग्स#चेन्नई सुपर किंग्स बातम्या#चेन्नई सुपर किंग्स महिला आयपीएलमध्ये संघ घेण्याचा विचार करणार आहे#तरुण लीग#तामिळनाडू#तामिळनाडू क्रिकेट#तामिळनाडू प्रीमियर लीग#तो म्हणाला ते खरे नाही#महिला आयपीएल#युवा लीग
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम् किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. काल मध्यरात्री हे वादळ नागापट्टिनमच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे २३० किलोमीटर आणि चेन्नईच्या २१० किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचं काल चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. वादळाच्या प्रभावामुळं परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुणे, आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दहा अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. तर नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सात अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात अकरा अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर किमान तापमान दहा पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस तर धारणी-चिखलदरी येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कालचा दिवस मुंबईतील आठ वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. किमान तापमान १६ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल सायंकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक तथा माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव ना��सेन कांबळे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार, शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसंच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पाच डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं अवाहन करण्यात आलं आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने त्रयस्त कोणत्याही देशात खेळवण्याच्या पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊ इथं होत असेलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशु राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होईल. दरम्यान, महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम चार मध्ये पोहोचली आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एका खासगी उद्योग समुहाच्या कथित लाचप्रकरणाच्या मुद्यावर हौद्यात येत गोंधळ घातला. विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळं लोकसभेचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. बारा वाजेनंतर कामकाजाला गोंधळात सुरुवात झाली. याच गोंधळात वक्फसंबंधीच्या संसदीय समितीचा कार्यकाळ वाढवण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर लोकसभेचं कामकाज ��िवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही काँग्रेस सदस्य प्रमोद तिवारी यांनी नियम २६७ अंतर्गत खासगी उद्योग समुहाच्या कथित लाचप्रकरणावर चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षांची मागणी फेटाळून लावत राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब केलं. नियमानूसार लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्या परवानगीनं पटलावर आलेल्या विषयांवर चर्चा करता येईल, असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, लोकसभेत आज नव्या सदस्यांचा शपथविधी पार पडला. वायनाडमधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या प्रियंका गांधी-वाध्रा आणि नांदेडमधून विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.
****
तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी वेलिंग्टन इथल्या डिफेन्स स्टाफ सर्विस कॉलेजच्या कार्यक्रमात प्रशिक्षण संपवून सैन्यदलात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं. राष्ट्रपती उद्या निलगिरी इथं आदिवासी समुदायाशी चर्चा करणार आहेत.
****
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं मानवी तस्करीच्या गुन्ह्यांसंबंधी सहा राज्यातील २२ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. परदेशात नोकरी देण्याचं अमिष दाखवून मानवी तस्करी करण्यासंबंधीचे गुन्हे जुलै महिन्यात दाखल करण्यात आले होते, त्यासंदर्भात छापेमारी करण्यात आली. या तपासात म्यानमार आणि लाओस इथून कॉल सेंटर आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं उघड झालं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरूणांना “विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र” या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं आवाहन केलं आहे. ही स्पर्धा चार स्तरांवर घेण्यात येत असुन यात १५ ते २९ वयोगटातल्या व्यक्ती भाग घेऊ शकतात. २५ नोव्हेंबर पासून या डिजिटल प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुरूवात झाली असून ही स्पर्धा पाच डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
भारत-रशिया सैन्य सहकार्यासंबंधीची चौथी बैठक मॉस्को इथं पार पडली. दोन्ही देशांतील रणनितीक सहकार्याला वृद्धींगत करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची मानली जाते. दोन्ही देशांदरम्यान सैन्यदलाच्या संयुक्त कवायतींचा विस्तार करणे, नियमितपणे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून ४०० ��नफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तालुक्यात गहू, हरभरा कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढेल अशी शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा आणि इसापूर उजवा कालव्यातून १ डिसेंबर पासून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पात्र लाभधारकांनी पिकांसाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज शाखा कार्यालयात सादर करावा असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टरक्लास, आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, अनेक उपक्रम राबवण्यात आले. समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ आयसीसीच्या कसोटी क्रिकेट गोलंदाजांच्या मानांकनात भारताचा जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कगीसो रबाडाला, तसंच दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवुडला मागं टाकत पहिलं स्थान मिळवलं. तर, फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वालनं दुसरं स्थान गाठलं आहे.
****
थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
चारधाम तीर्थयात्रेच्या दृष्टीनं उत्तराखंड प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. चारधाम तीर्थयात्रा करण्याऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकार सज्ज झालं आहे. यासंदर्भात उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं असून सामान्य यात्रेकरुंच्या सुविधेसाठी या चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केदारनाथ धामसाठी विशेष व्यक्तिंसाठींच्या अर्थात व्हिआयपी यात्रांची संख्या कमी करण्याबाबत या पत्राद्वारे सूचित केलं आहे. तसंच कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी यात्रेकरुंनी आयआरटीसीच्या माध्यमातूनच हेलिकॉप्टर सेवांची नोंदणी करण्याचं आवाहनही उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे.
****
इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बदलेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य निरर्थक असून इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा झालेली नाही. पुरेसं संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्य राज्यात लोकसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अधिक ठिकाणी प्रचारासाठी संधी मिळावी, म्हणून राज्यातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक घेतली जात असल��याची टीकाही त्यांनी केली.
****
गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सगळेच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गुजरात राज्यात येत्या सात तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणंद इथं सभा झाली. या सभेनंतर ते सुरेंद्रनगर, जामनगर आणि जुनागढ या ठिकाणी सभा घेतील, तर काँग्रेस नेते तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या नेत्या सुनीता केजरीवाल भावनार आणि भरुच इथं आप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोटाद आणि डेडियापाडा इथं रोड शो करत आहेत.
****
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरु आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून आज त्या चिरमिरी इथं जाहीर सभा घेतील. प्रियंका गांधी यांचा छत्तीसगडचा हा दुसरा प्रचार दौरा असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी या आधी राजनांदगांव तसंच कांकेर इथं जाहीर सभा घेतल्या आहेत.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.
****
भारतीय बुद्धीबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ फिडेनं अधिकृतपणे ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित केलं आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर या किताबानं सन्मानित झालेली वैशाली ही तिसरी महिला बुद्धीबळपटू आहे. ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित असलेली वैशाली आणि तिचा भाऊ रमेशबाबू प्रग्यानंद ही विश्वातली पहिली भावा बहिणीची जोडी आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेत काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जनं १७ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. या स्पर्धेतल्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशातील नागरिकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली तसंच या दिवशी राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानातून देशाची सामूहिकतेतली शक्ती सर्वांना दिसली. हीच शक्ती देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या आपल्या `मन की बात` या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या मालिकेचा या वर्षातला हा पहिला आणि एकूण एकशे नववा भाग होता. २६ जानेवारीला कर्तव्य पथावरील महिलांच्या तुकडीचं पथसंचलन, अर्जुन पुरस्कार प्राप्त महिला खेळाडूंनी कठीण परिस्थितीत मिळवलेलं यश, तसंच बचत गटातल्या महिलांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार याचा त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. उत्तर प्रदेश मधल्या बहराइच इथल्या जैव उत्पादन बनवणाऱ्या महिला बचत गटाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. आकाशवाणीवरुन छत्तीगडमध्ये हत्तींच्या कळपाविषयी माहिती देणाऱ्या `हमर हाथी- हमर गोठ` या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी यावेळी पद्म पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करत यातल्या प्रत्येकाचं योगदान देशवासीयांना प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. अवयवदान आणि देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाचं त्यांनी यावेळी कौतूक केलं. आयुष मंत्रालयानं जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीनं आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित माहिती आणि शब्दावलीचं वर्गीकरण केल्यानं या कोडिंगच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांना औषधं लिहून देण्याच्या चिठ्ठीवर एकसमान भाषेत लिहिणं शक्य होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात ९६ कोटी मतदार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. तसंच युवामतदारांनी `नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल` आणि `व्होटर हेल्पलाइन अॅप`च्या माध्यमातून नावनोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. गेल्या सात वर्षांपासून सुरु `परीक्षा पे चर्चा` या कार्यक्रमात यावेळेस सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या लोकांच्या सामूहिक, व्यक्तिगत प्रयत्नांमुळं, देश कशारितीनं पुढं जात आहे, यावर आपलं लक्ष्य केंद्रीत असेल, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. स्वातंत्र्य संग्रामातील थोर सेनानी, पंजाब केसरी लाला लजपतराय आणि फिल्ड मार्शल के.एम.करियप्पा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना यावेळी अभिवादन केलं.
****
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज विक्रमी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा सोपवला. सरकारमध्ये सर्व काही ठिक नव्हतं म्हणून आपण राजिनामा दिल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आज आणि उद्या महाराष्ट्र, तामिळनाडू ��ाज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत काल सुरु झालेल्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८४ व्या परिषदेला ते आज संबोधित करतील.
****
इंग्लंडविरुद्ध हैदराबाद इथं सुरू पहिला कसोटी क्रिकेट सामना जिकण्यासाठी भारतासमोर २३१ धावांचं आव्हान आहे. भारतानं आज चौथ्या दिवशी आतापासून थोड्या वेळापूर्वी दोन बाद ४२ धावा केल्या आहेत. ओली पोपनं केलेल्या १९६ धावांमुळं इंग्लंड संघानं आपल्या दुसऱ्या डावामध्ये ४२० धावा केल्या. जसप्रित बुमराहनं चार तर आर. अश्विननं तीन गडी बाद केले. इंग्लंडनं या कसोटी सामन्यातल्या पहिल्या डावामध्ये २४६ धावा केल्यानंतर भारतानं ४३६ धावा करत पहिल्या डावामध्ये १९० धावांची आघाडी मिळवली आहे.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपदाच्या लढतीत आज तृतीय क्रमवारी प्राप्त डॅनीयल मेदवेदेव आणि चतुर्थ क्रमवारी प्राप्त जानिक सिनर दरम्यान सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होणार आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर गावातून मुंबईला पायी गेलेले गावकरी कार्यकर्ते आज गावात परतले. आंदोलन यशस्वी करुन परतल्यामुळं गावकऱ्यांतर्फे त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं.
****
नांदेडमध्ये आज दुपारी दोन वाजता काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा होणार आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यात मार्गदर्शन करणार आहेत.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
अयोध्येत उद्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठाना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात विविध ठिकाणी अनेक धार्मिक-सांकृतिक-सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तामिळनाडू दौ-यात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राम सेतुची निर्मिती झालेल्या अरिचल मुनाई या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी समुद्र किना-यावर पुष्प अर्पण केलं.
****
आगामी काळात भारत जगातला सर्वात मोठं मेट्रोचं जाळं विस्तारलेला देश असेल असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते.
****
मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणाऱ्या जगातल्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचं उद्घाटन काल पुणे इथं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते झालं.
****
निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार बीड जिल्ह्यातील मतदार यादी उद्या २२ जानेवारी ऐवजी मंगळवारी २३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार हा बदल करण��यात ��ला आहे. एक जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द होईल.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा काल महाराष्ट्राच्या खेळांडुनी रिदमिक योगा आणि तलवारबाजी मध्ये दोन रौप्य आणि तीन कास्य पदकांची कमाई केली. दुपारच्या सत्रात महाराष्ट्राच्या स्वरा गुजर, युगांका राजम यांनी रीदमिक पेयर या क्रीडा प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तर तलवारबाजी मध्ये वैयक्तीक प्रकारात काशिश बारड हिने कांस्यपदक पटकावलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नमो चषक क्रीडा स्पर्धांमध्ये काल कबड्डी, धनुर्विद्या , शूटिंग बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आदी स्पर्धा आकर्षणाचं केंद्रबिंदू होत्या. आज या स्पर्धेत खो- खो, कुस्ती, मल्लखांब आणि रस्सीखेच या खेळांचा थरार अनुभवता येणार आहे.
****
येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
१९ वर्षांखालील पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, भारत-बांग्लादेश दरम्यान काल झालेला सामना भारतानं ८४ धावांनी जिंकला.
****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.
****
२३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार-पंतप्रधानांची घोषणा
तृतीयपंथियांना आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र तसंच राज्य सरकारांना नोटीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणीत ‘शासन आपल्या दारी’कार्यक्रम
खरीप हंगामासाठी जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणी सोडण्याची कालवा सल्लागार समितीची शिफारस
कर्तव्यात कसूर प्रकरणी जालना जिल्ह्यात १४ कृषी सहायकांविरोधात गुन्हा दाखल
दृष्टीबाधितांच्या जागतिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ अजिंक्य
आणि
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयला कांस्यपदक
****
२३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. चांद्रयानाच्या चंद्रावर यशस्वी अवतरणाच्या पार्श्वभूमीवर ते काल बंगळुरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोच्या मुख्यालयात शास्त्रज्ञांच्या अभिनंदनपर कार्यक्रमात बोलत होते.
विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या स्थळाचं ‘शिवशक्ती’ असं नामकरण करण्यात येईल तसंच चांद्रयान-दोनचा लॅण्डर चंद्रावर ज्या ठिकाणी कोसळला, त्या स्थळाचं “तिरंगा असं नामकरण केलं जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. अपयश हा शेवट नसून कठोर परिश्रम करत भविष्यात यशस्वी होण्याचा धडा घेण्याची आठवण ‘तिरंगा बिंदू’ आपल्याला करून देत राहील, यातून भावी पिढ्यांना मानवतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध राहण्याची प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाद्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांनी देशासाठी अभिमानास्पद का��गिरी केली असून त्यांचं समर्पण-जिद्द प्रेरणादायी आहे, या शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं.
*****
मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे चारावा भाग असेल. आकाशवाणी - दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल.
****
तृतीयपंथी व्यक्तींना सार्वजनिक शिक्षण संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र तसंच देशभरातल्या राज्य सरकारांनी उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. केरळमधल्या एका तृतीयपंथी व्यक्तीनं ही याचिका दाखल केली आहे. तृतीयपंथी समुदाय हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर मागासलेला असल्यानं त्यांच्या हितासाठी त्यांना आरक्षण देण्याचा आदेश जारी करावा, अशी मागणी या याचिकाकर्त्यानं केली आहे.
****
राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातल्या पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सारथी मोबाईल अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार तर सोलापूरला स्मार्ट सिटी पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार इंदूर, सुरत आणि आग्रा या शहरांनी मिळवला आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांना राज्य पुरस्कार मिळाला असून चंडीगड़ला केंद्र शासित प्रदेशांचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येत्या २७ सप्टेंबर रोजी इंदूर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या नव्या रुपातल्या संकेतस्थळाचं काल अनावरण झालं. हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी अधिक सोपं, तसंच अधिक सुलभ आहे. यावर प्रत्यक्ष कर कायदा, इतर संलग्न कायदे, आयकर विभागाची परिपत्रकं आणि दिशानिर्देश यांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नांदेड आणि परभणीच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता नांदेड इथल्या विमानतळावर त्यांचं आगमन होऊन ते हेलीकॉप्टरने परभणीकडे प्रस्थान करतील. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर दुपारी दोन वाजेनंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने नांदेडकडे आणि तिथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.
****
काही आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हाप��रात पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सभांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही सकारात्मक सुरुवात असल्याचं पवार यांनी सांगितलं.
सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत आहे, याविरोधात 'इंडिया' आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असं पवार सांगितलं. 'इंडिया' आघाडीची दोन दिवसीय बैठक या आठवड्यात मुंबईत होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांचे मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
राज्यभरात पावसानं ओढ दिल्यानं तोंडाशी आलेली पिकं करपत आहेत, आतापर्यंत पंचनामे सुरू करायला हवे होते, मात्र सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचं दिसून येतं, अशी टीका शरद पवार यांनी केली. १५ सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचं केंद्राचं धोरण आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर कमी होतील, असा अंदाज पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
****
आगामी निवडणूका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परीषदेत बोलत होते. आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होणार असलेल्या जाहीर सभेबाबत तटकरे यांनी यावेळी माहिती दिली. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. आगामी काळात राज्यभर करण्यात येणाऱ्या दौऱ्याची सुरुवात आज बीडच्या सभेनं होत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. धर्मनिरपेक्षता ही आमची मूळ विचारधारा आहे. त्या विचारांवर ठाम विश्वास ठेवत आणि ती विचारधारा पुढे नेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. रामलीला मैदानावर दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. शंभराहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. लाल पत्थर, बाजीगर, हम आपके हैं कौन, मैंने प्यार किया, आदी चित्रपटांमधील त्यांनी लिहिलेली गाणी विशेष गाजली. देव कोहली यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
जलशक्ती मंत्रालयानं काल लघुसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, देशात दोन कोटी ३१ लाखांहून अधिक लघुसिंचन योजनांची नोंद झाली आहे. यामध्ये दोन कोटी १९ लाख भूजल योजना तर १२ लाख १० हजार पृष्ठीय जल योजनांचा समावेश आहे. देशात सर्वात जास्त लघुसिंचन योजना उत्तर प्रदेशात असून त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक आहे. भूजल योजनांसाठी उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. पृष्ठीय जल योजनांसाठी महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कांद्याला हंगामानुसार योग्य हमीभाव मिळण्यासाठी, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या विंचूर उप-बाजार समितीला भुजबळ यांनी काल भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, कांद्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती संचालकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. कांदा चाळी वाढवण्याच्या दृष्टीनं छोट्या कांदा चाळींनासुद्धा अनुदान देण्याचं प्रस्तावित असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.
****
जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणी सोडण्याची शिफारस कालवा सल्लागार समितीने केली आहे. समितीची काल औरंगाबाद इथं सिंचन भवनात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पावसाची स्थिती पाहता, नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून दोन आवर्तनं देण्याची तसंच जायकवाडी प्रकल्पातूनही पाणी देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. पावसाळ्याच्या उर्वरित काळात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण पाहून पुढील आवर्तनांचा निर्णय घ्यावा, असंही या बैठकीत सांगण्यात आलं.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून, धरणातून ८२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, भंडारदरा प्रकल्पाचे अभियंता अभिजीत देशमुख यांनी ही माहिती दिली.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्ष समारोपानिमित्त संपूर्ण मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घ्यावेत, आणि मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात काल या संदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या अंतर्गत आरोग्य शिबिरं, स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि मराठवाडा गीत गायन, व्याख्यानमाला, काव्यवाचन, कवी संमेलन, मराठवाडा मुक्तीसंग्राम माहितीपट सादरीकरण आदी उपक्रम राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
या उपक्रमांत शासकीय संस्था, विद्यापीठं, शैक्षणिक संस्थांना सहभागी करावं. वृक्ष लागवड, पथनाट्य, हुतात्मा स्मारकांसह सर्व शहरांमधील ��्मृतीस्थळांचं सुशोभिकरण यांसारखे उपक्रम राबवण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.
****
जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत विविध गावांसाठी नियुक्त १४ कृषी सहायकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ष-२०२२ मध्ये अतिवष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झाल्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केलं होतं, महसूल प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश कृषी सहायकांना दिले मात्र, वारंवार लेखी सूचना तसंच नोटीसा बजावूनही १४ कृषी सहायकांनी १५ गावांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत केल्या नाहीत. त्यामुळे संबंधीत शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. याची गंभीर दखल घेत नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर या कृषी सहायकांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
****
दृष्टीबाधितांसाठीच्या जागतिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं झालेल्या या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं भारतापुढे विजयासाठी ११५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना नऊ षटकांचा खेळवण्यात आला आणि विजयी लक्ष्य ४२ धावांचं देण्यात आलं. भारतानं अवघ्या साडेतीन षटकातच एक बळी गमावून हे लक्ष्य पार केलं आणि विजेतेपदाला गवसणी घातली.
****
डेन्मार्कमध्ये कोपनहेगन इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत प्रणॉयचा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या के. कुलनावूत व्हिटीड सर्न यानं पराभव केला. प्रणॉयने पहिला गेम २१-१८ असा जिंकल्यानंतर व्हिटीड सर्न याने पुढच्या दोन गेममध्ये २१-१३, २१-१४ अशा गुणांनी प्रणॉयला पराभूत केलं.
****
राज्य शासनानं पिक विम्याची पंचवीस टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करावी तसंच कांदा पिकावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद शाखेनं केली आहे. या मागणीचं निवेदन उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकं धोक्यात आली असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल पाच जणांचा बुडून मृत्यु झाला. जालना शहरात काल एका नाल्यात दोन तरुणांचे मृतदेह आढळले. आकाश पाटोळे आणि मुकेश पाखरे अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही शुक्��वारी सायंकाळपासून घरी परतले नव्हते. काल दुपारी गांधीनगर भागातल्या मोठ्या नाल्यात त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.
दुसऱ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेने काल आपल्या दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव इथं ही घटना घडली.
****
संपूर्ण परभणी जिल्हा लम्पी आजाराबाबत सतर्क क्षेत्र असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी घोषित केलं आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. लम्पीवर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचं निर्मूलन करण्यासाठी गोजातीय प्रजातीची सर्व गुरं, ज्या ठिकाणी पाळली जातात त्या ठिकाणापासून दूर ठेवावीत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना, राज्य सरकारनं निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं नवीन कृती दल
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध - कृषी आयुक्त सुनील चव्हाण
अक्षय्य तृतीया, भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती तसंच रमजान ईदचा सण देशभरात उत्साहात साजरा
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं महावितरणचं आवाहन
जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदकं
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
सविस्तर बातम्या
देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड विषयक देखरेखीबद्दल सावध राहून व्यवस्था अधिक बळकट करावी, चाचणी, उपचार, बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी या पत्रातून केली आहे.
****
सार्वजनिक आरोग्य विभागानं कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी नव्या कृती दलाची स्थापना केली असून निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, डॉक्टर बिशन स्वरुप गर्ग, यांच्यासह ८ जणांची या कृती दलाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे संकेत रोजगार हमी मंत्री सं��ीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल नंदूरबार इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठल्याही खात्याचं काम अडून राहिलेलं नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भुमरे यांनी टीका केली. राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हान भुमरे यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पक्षात घुसमट होत असून, एक दिवस त्याचा विस्फोट होईल, असंही मंत्री भुमरे यांनी म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना यंदा आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराशा केल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपण अविचलपणे जनतेसाठी काम करीत राहू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे जिल्हा रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, मात्र रुग्णांना तातडीने इतरत्र नेण्याची गरज पडल्यास हवाई रुग्णवाहिकेची सोयही उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलत होते. धर्माचं राजकारण केल्यानं भविष्यात राज्यात दंगली होतील, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले…
Byte…
महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का की दंगली घडवायच्या? असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर याठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतंय की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटीव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटीव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.
****
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. मृगाचा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असते, त्या पार्श्वभूमीवर खतांचं नियोजन एप्रिलपासून सुरु करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाप्रमाणे पिकनिहाय खतांचं प्रमाण, त्यांची उपलब्धता आणि त्यासाठीचा खर्च याबाबत माहिती देणारं ‘कृषिक ॲप’ कृषी विभागानं तयार क���ल्याची माहिती कृषि आयुक्त चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा, अतिरिक्त खत वापरामुळे होणारा अतिरिक्त खर्च, घटणारं पिक उत्पादन अशा समस्यांवर मात करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं.
****
राज्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर ई-पीक पेऱ्यांची नोंद झालेली नाही अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी गावपातळीवर संबंधीत गावचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची समिती गठित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या समितीनं कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून, याबाबत शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून शहानिशा करावी आणि सात - बारा उताऱ्यावर त्याची नोंद करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमाणित केलेले सात - बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. समितीनं आपला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे.
****
‘उडान अर्थात उडे देश का आम नागरिक' या योजनेच्या पाचव्या टप्प्याला काल सुरुवात झाली. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उडानच्या माध्यमातून देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुविधा अधिक वाढवणं आणि अगदी अखेरच्या टोकापर्यंत हवाई संपर्क सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात एक हजार नवे मार्ग, पन्नास अतिरिक्त विमानतळं, हेलीकॉप्टर स्थानकं आणि पाण्यावरील विमान उड्डाण व्यवस्था कार्यान्वित करण्याचं लक्ष्य साध्य होईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य तुरुंग विभागानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला आणि पुरुष कच्चे कैदी तसंच शिक्षा झालेल्या महिला कैदी, त्यांच्या मुलांना, तसच नातवंडं, भाऊ, बहिण यांना भेटू शकणार आहेत. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारावं आणि समान वागणूक द्यावी, या उद्दशानं हे धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती, तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
****
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी एक चार पाच सहा सात या क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या या नि:शुल्क मदतवाहिनीच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार आदी बाबींची माहिती तसंच मदत देण्यात येते
****
पंतप्रधान न��ेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी, ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचं विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
विविध क्षेत्रातल्या नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पाठ्यवृत्ती अर्थात फेलोशिप उपक्रम राबवणार आहे. राज्याचा पर्यटन विकास साधणं हा याचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपसाठी तरुणांनी १५ मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महामंडळानं केलं आहे. २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतली प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहेत. gm@maharashtra tourism.gov.in आणि dgm@maharashtra tourism.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करता येतील.
****
साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण , भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसंच ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण काल देशभरात साजरा झाला. उत्तराखंडातल्या प्रसिद्ध चार धाम तीर्थक्षेत्र यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. उत्तराखंडमधील, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांचे दरवाजे काल दुपारच्या सुमारास दर्शनासाठी विधीवत उघडण्यात आले. केदारनाथ धाम इथलं मंदिर २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम इथलं मंदिर २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पुढच्या सहा महिन्यांपर्यंत नेहमीप्रमाणे या चारही ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिव��दन करण्यात आलं, ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि मिरवणुक काढण्यात आली तर महात्मा बसवेश्वर जिल्हा महोत्सव समिती आणि अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
****
ईद-उल-फित्रच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणा सुदीच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिली आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरात मुस्लीम समा��बांधवांनी सकाळी कदीम जालना आणि सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद ऊल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.
****
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. वीज वाहिन्या, रोहित्र, वीज वितरण पेट्या किंवा फीडर फिल्डरच्या जवळ कचरा जाळल्यामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला आग लागल्यामुळे विजेच्या भूमिगत तारा आणि इतर वीज यंत्रणा नादुरुस्त झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या आगींमुळे महावितरणच्या नुकसानीसोबतच ग्राहकांना वीज पुरवठा अनियमित होतो आहे. अशा घटनातून वीज यंत्रणेला आग लागल्याचं आढळल्यास एक नऊ एक दोन किंवा १८००-२१२-३४३५ या नि:शुल्क क्रमांकावर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १२ वसतीगृहं सुरू करण्यात आली आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी ही माहिती दिली, ते काल मानकुरवाडी इथं ऊस तोडणी कामगारांना ओळख पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. मानकुरवाडी परिसरातील ऊसतोड कामगारांची लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शंभर टक्के नोंद करण्यात आली आहे. या महामंडळांतर्गत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
जागतिक ग्रंथ दिन आज साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठी प्रकाशक पुणे यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्था या विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे , भाष्य करणार आहेत. प्रकाशन परिषदेचे कार्यवाह अरविंद पाटकर हे ग्रंथव्यवहारासंबंधी विचार मांडणार आहेत.
****
तुर्की इथं झालेल्या प्रथम स्तर जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली आहेत. ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे या जोडीनं मिश्र दुहेरीत चिनी तैपेई जोडीचा १५९ विरुद्ध १५४ गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने महिलांच्या कंपाउंड प्रकारात कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीवर १४९ विरुद्ध १४६ अशी मात करत सुवर्ण पदक पटकावलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायन्टसवर ७ धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सनं २० ��टकात ६ गडी गमावत १३५ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल लखनऊ सुपर जायन्टस संघ मात्र २० षटकांत सात गड्याच्या बदल्यात केवळ १२८ धावा करू शकला.
या स्पर्धेतल्या अन्य सामन्यात पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्स संघावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्जनं २१५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करणारा मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत २०१ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
syed मुश्ताक अली ट्रॉफी 2020-21, तामिळनाडू वि बडोदा फायनल | सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: बडोदाला wickets विकेट्सने हरवून तमिळनाडू दुस time्यांदा चॅम्पियन बनला, कार्तिक-शाहरुखने आश्चर्यकारक कामगिरी केली
syed मुश्ताक अली ट्रॉफी 2020-21, तामिळनाडू वि बडोदा फायनल | सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: बडोदाला wickets विकेट्���ने हरवून तमिळनाडू दुस time्यांदा चॅम्पियन बनला, कार्तिक-शाहरुखने आश्चर्यकारक कामगिरी केली
अहमदाबाद (आयएएनएस) आपल्या फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सामनावीर एम सिद्धार्थच्या चार विकेटनंतर तामिळनाडूने रविवारी येथील मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बडोद्याला सात विकेट्सने पराभूत केले आणि सय्यद मुश्ताक येथे दुस time्यांदा विजय नोंदविला. अली ट्रॉफी टी -20 जिंकली क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद. तामिळनाडूकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी -20…
View On WordPress
#dainikbhaskarhindi ब्रेकिंग न्यूज#dainikbhaskarhindiMedia#syed मुश्ताक अली ट्रॉफी 2020-21#कार्तिक#क्रिकेट#खेळ#तमिळनाडूने 7 गडी राखून विजय मिळवला#ताजी बातमी#ताज्या हिंदी बातम्या#तामिळनाडू वि बडोदा फायनल#दैनिक भास्कर हिंदी#दैनिक भास्करकिंदीची बातमी#दैनिकभास्कर हिंदी#दैनिकभास्करिंधि#भास्करकिंदी बातमी#शाहरुख#सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021#सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अझरुद्दीन#हिंदी बातम्या#हिंदी बातम्या आज#हिंदी बातम्या थेट#हिंदी मध्ये बातमी
0 notes
Text
दुलीप ट्रॉफीत अजिंक्य रहाणेकडे पश्चिम विभागाचे नेतृत्व, करण शर्माकडे मध्यवर्ती संघाचे नेतृत्व क्रिकेट बातम्या
दुलीप ट्रॉफीत अजिंक्य रहाणेकडे पश्चिम विभागाचे नेतृत्व, करण शर्माकडे मध्यवर्ती संघाचे नेतृत्व क्रिकेट बातम्या
तंदुरुस्त झालेला भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ८ ते २५ सप्टेंबर दरम्यान तामिळनाडू येथे होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाच्या शक्तिशाली संघाचे नेतृत्व करेल. पीटीआयने गेल्या रविवारी असे वृत्त दिले होते की, मांडीच्या दुखापतीतून बरा झालेला रहाणे दुलीप ट्रॉफीसह स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूर यांसारखे आंतरराष्ट्रीय ��ेळाडू आणि यशश्वी जैस्वाल, शम्स मुलानी,…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आज आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मात्र भोंगे उतरवण्यात आलेल्या ठिकाणी नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. नागरिकांनी हे भोंगे काढण्यासाठी पोलिस ठाण्यांना पत्र द्यावी, तक्रार दाखल करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मुंबईतल्या अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात पोलीस बंदोबस्त आहे, तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद शहरामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती इथं हनुमान चालीसा पठण करण्यात आलं.
धुळे इथं मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख आणि त्यांचे सहकारी आज सकाळी शिवतीर्थ इथं जमले असताना त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.
नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, शहरातल्या अनेक मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सातपूर मध्ये काही कार्यकर्त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं.
पालघरमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष सुनील राऊत यांच्यासह इतर पाच कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. मात्र आज अखेर त्यांना १२ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.
****
केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यू अहवालावर आधारित सी आर एस म्हणजे नागरी नोंदणी प्रणाली अहवाल २०२० जारी केला आहे. या आकडेवारीमध्ये कोविड-19 आणि इतर कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. नोंदणीकृत मृत्यूंच्या संख्येत सहा पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि हरियाणा या काही राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी २०१९ ते २०२० पर्यंत नोंदवलेली मृत्यूची संख्या लक्षणीय असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल चार लाख ७९ हजार २०८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८९ कोटी ४८ लाख एक हजार २०३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार २०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३१ रुग्णांच��� उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ८०२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १९ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातली प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. पीक परिस्थिती, पाऊस पाणी, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी ही भविष्यवाणी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या भविष्यवाणीनुसार कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील, त्यांना भावही चांगला मिळेल, असं सांगितलं आहे. पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएलचे प्ले ऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. यावेळी मैदानात पूर्ण क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश असेल, अशी माहिती, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. पात्रता फेरीचा पहिला सामना आणि बाद फेरीचा सामना २४ आणि २५ मे रोजी कोलकात्याच्या इडन गार्डनवर होईल. तर पात्रता फेरीचा दुसरा सामना आणि अंतिम सामना अमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर २७ मे आणि २९ मे रोजी होईल.
****
हवामान
येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशिम जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात काही भागांत मात्र उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 December 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य सरकार कठोर निर्बंध लावू शकतात- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
· ओमायक्रॉनशी लढण्यासाठी स्वयंजागरुकता आणि स्वयंशिस्त आवश्यक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यात ३१ नवे ओमायक्रॉन बाधित तर कोविडचे एक हजार ६४८ रुग्ण, मराठवाड्यात एकाचा मृत्यू, २९ नवे बाधित
· कायदेशीर सल्ला घेऊन राज्यपाल आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निणर्य देणार
· परभणी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू
आणि
· दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर, तीन बाद २७२ धावा
****
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य सरकार कठोर निर्बंध लावू शकतात, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या काल सांगली इथं प्रसारमाध्यमांशी ��ोलत होत्या. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार प्रतिबंधित क्षेत्र - कंटोनमेंट झोन तयार करणं, कडक नियमावली लावणं, हे निर्णय राज्य सरकारनं घ्यायचे असल्याचं, पवार यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या...
केंद्रसरकार सातत्याने कोविड नियंत्रणासाठी आपल पथक पाठवत असत त्या त्या राज्यात संख्या वाढल्या तर तिथ गाईडलाईन देत असते, त्या राज्याशी चर्चा पण करत असते आणि एक लक्ष ठेवून असते. आता लॉकडाऊनचा विषय हा राज्य सरकारचा असतो. एखाद्या ठिकाणी पेशंटची संख्या वाढली तर तिथल नियंत्रण करन असेल, कंटोनमेंट झोन असतील किंवा तिथली व्यवस्था असेल, ती राज्याने द्यायची असते. गरज पडल्यास लॉकडाऊनचा विषय असेल तर राज्यसरकारला ते अधिकार आहेत, ते करु शकतात.
ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग लवकर होतो आणि तो बरा देखील लवकर होतो, तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता, पवार यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दोन पॅकेज मधून विशेष मदत करण्यात आली, यातून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध खरेदी करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
दरम्यान, कोल्हापूर इथं बोलताना भारती पवार यांनी, शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं वारंवार नुकसान होत असेल, तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल, असा इशारा दिला. राज्यात आरोग्य विभागासह अन्य भरती परीक्षांमध्ये घोटाळा दिसून आल्यानं, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्या. या अनुषंगानं पवार यांनी, काळ्या यादीतील संस्थांकडे परीक्षेची जबाबदारी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित केला. या संदर्भात राज्य सरकार नेमकी काय कारवाई करत आहे, हे कळत नसल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
भारती पवार यांनी काल तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, केंद्रानं ओमायक्रॉन आणि कोविडचा वाढता संसर्ग असलेल्या महाराष्ट्र, केरळ आणि मिझोराम इथं पथकं पाठवली असून, परिस्थितीचा आढावा घेऊन हे पथक केंद्राला अहवाल देईल, असं सांगितलं.
****
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या स्वरुपाशी लढण्यासाठी स्वयंजागरुकता, स्वयंशिस्त आवश्यक असून, आपली सामुहिक शक्ती कोरोनाचा पराभव करेल, या विश्वासासह आपणा सर्वांना २०२२ या वर्षात प्रवेश करायचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम शृंखलेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत होते. तामिळनाडू मध्ये हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेले देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, पंतप्रधानांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या अपघातात मृत्युशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर मरण पावलेले कॅप्टन वरुण सिंह यांनी, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्राचाही, मोदी यांनी उल्लेख केला. या पत्रात दिवंगत वरुण सिंह यांनी आपल्या यशाचा नव्हे तर आपल्या कमतरतांचा संदर्भ दिला असून, आपल्यातल्या उणीवांवर मात करण्यासाठी, विशेष करुन विद्यार्थ्यांकरीता हे पत्र प्रेरणादायी असल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.
परीक्षांपूर्वी आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असून, या कार्यक्रमासाठी माय जी ओ व्ही डाॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. यामध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेनं, इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्त्वाविषयी परिचय करुन देण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाबद्दल, आणि देशविदेशातून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संवादातून प्रशंसा केली.
****
आरोग्य कर्मचारी आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, कोविड प्रतिबंधक लसीचा तिसरा संरक्षक म्हणजेच बुस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे. या लसीकरणाचं राज्यात योग्य पद्धतीनं नियोजन केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
बुस्टर डोस देण्यासंदर्भात अलिकडेच राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली होती, आणि आमची ती मागणी होतीच, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंधरा ते अठरा वयोगटातल्या मुलांचं देखील लसीकरण केल्यामुळे, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल, तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बुस्टर डोसमुळे लाभ होईल, असं ते म्हणाले.
****
राज्यात काल ओमायक्रॉन बाधित नवे ३१ रुग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या, १४१ झाली असून, यापैकी ६१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. काल आढळलेल्या ३१ नव्या रुग्णांपैकी मुंबईत २७, ठाण्यात दोन, तर पुण्यात तसंच अकोल्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. यापैकी १८ वर्षाखालील सहा आणि अन्य तीन असे नऊ रुग्ण वगळता, इतर २२ जणांचं कोविड लसीकरण पूर्ण झालेलं आहे. २९ रुग्णांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत, तर दोन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असल्याचं, आरोग्य विभागाच्या पत्रकात नमूद आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ६४८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५७ हजार ८८८ झाली आहे. काल १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ४३३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ९१८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख दोन हजार ९५७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या नऊ हजार ८१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १२ नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात नऊ, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी तीन, तर उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. बीड तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातले आणखी ३३ जण, कोरोना बाधित आढळून आले आहेत. या विद्यालयातले १९ विद्यार्थी यापूर्वी बाधित आढळून आल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली, त्यातून हा निष्कर्ष समोर आला. त्यामुळे या विद्यालयातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या आता ५२ झाली आहे.
****
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंजुरी देण्यासंदर्भातलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पत्र, राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवलं. त्यावर आज निर्णय होईल, अशी अपेक्षा मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसंदर्भात राज्यपाल सकारात्मक आहेत आणि कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय कळवू, असं त्यांनी सांगितल्याची माहिती शिंदे यांनी दिली. विधान परिषदेच्या स्वीकृत १२ आमदारांचा मुद्दा किंवा विरोधी पक्षांच्या १२ आमदारांचं निलंबन, यावर यावेळी चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी परिसरात काल पहाटे भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर तीन पूर्णांक नऊ तीव्रतेच्या या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू, भूगर्भात १० किलोमीटर खोल नोंदवला गेला.
****
परभणी जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गंगाखेड लोहा राष्ट्रीय महामार्गावर पालम जवळ काल दुपारी जीप आणि कारची एकमेकांवर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात का���मधले तिघे जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अनिल जागीरदार, शांताबाई जागीरदार आणि लक्ष्मीकांत जागीरदार अशी मृतांची नावं असून, हे सर्वजण नांदेड इथले रहीवाशी आहेत. जखमींवर नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरा अपघात जिंतूर - परभणी रस्त्यावर मैनापुरी शिवारात झाला, या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ३२ वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर इतर दोन युवक गंभीर जखमी झाल्या��ं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
'दास्तान-ए-बड़ी बा��का' या विशेष सादरीकरणातून औरंगाबादकरांनी, काल मुंबईतल्या उपनगरी रेल्वेच्या अनोख्या दर्शनाचा अनुभव घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र, महात्मा गांधी मिशन आणि अभ्युदय फाउंडेशन यांच्या वतीनं सादर झालेल्या या कार्यक्रमात, धनश्री खंडकर आणि अक्षय शिंपी यांनी हावभाव आणि संवादातून मुंबईतल्या लोकलची कथा, लेडीज डब्यातले किस्से, लोकलच्या आत आणि बाहेर घडणाऱ्या घटना, स्टेशनवरचे संवाद आदी प्रसंग सादर केले.
****
लातूर शहरातल्या सर्व प्रभागांमध्ये काल संजय गांधी निराधार योजना समाधान शिबीर घेण्यात आलं. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख यांच्या हस्ते, शहरातल्या प्रभाग क्रमांक १४ इथं या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी, या योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासन दिलं.
****
दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कामगारांसाठी ई-श्रम कार्ड काढून देण्याच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबीर २९ तारखेपर्यंत चालणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे नागरिक इ-श्रम कार्ड काढून घेण्यासाठी हजेरी लावत आहेत.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कालपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, सलामीवीर के एल राहुलच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर, भारतीय संघानं काल पहिल्या दिवसअखेर, तीन बाद २७२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरिअन इथं खेळल्या जात असलेल्या या सामन्यात, भारतानं काल नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मयंक अग्रवाल ६०, कर्णधार विराट कोहली ३५ तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. कालचा खेळ थांबला तेव्हा के एल राहुल १२२ तर अजिंक्य राहणे ४० धावांवर खेळत होता. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एक दिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे.
****
बीड इथं काल दहा किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. आमदार विनायक मेटे, अभिनेता देवदत्त नागे, स्नेहा कोकणे यांनी सकाळी साडे सहा वाजता हिरवा झेंडा दाखवल्यावर या स्पर्धेला सुरुवात झाली. सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं तसंच प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावं, या हेतूनं या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं, आमदार विनायक मेटे यांनी यावेळी सांगितलं. मराठवाडा लोक विकास मंच मुंबई, कैलासवासी अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
****
हवामान
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. खानदेशातल्या जळगावसह मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या शहरांत २८ आणि २९ डिसेंबर या येलो अलर्ट देण्यात असून, काही भागात गारपीटीचा इशाराही देण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** कोविडच्या ओमायक्रॉन या नव्या स्वरुपाशी लढण्यासाठी स्वयंजागरुकता, स्वयंशिस्त आवश्यक - मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
** ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य सरकार कठोर निर्बंध लावू शकतात - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
** अहमदनगर जिल्ह्यात टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात आणखी ३३ जणांना कोविड संसर्ग; बाधितांची एकूण संख्या ५२
आणि
** भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला प्रारंभ
****
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या स्वरुपाशी लढण्यासाठी स्वयंजागरुकता, स्वयंशिस्त आवश्यक असून आपली सामुहिक शक्ती कोरोनाचा पराभव करेल, या विश्वासासह आपणा सर्वांना २०२२ या वर्षात प्रवेश करायचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम शृंखलेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत होते. तामिळनाडू मध्ये हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेले देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पंतप्रधानांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या अपघातात मृत्युशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर मरण पावलेले कॅप्टन वरुण सिंह यांनी आपल्या शाळेच्या म���ख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्राचा ही मोदी यांनी उल्लेख केला. या पत्रात दिवंगत वरुण सिंह यांनी आपल्या यशाचा नव्हे तर आपल्या कमतरतांचा संदर्भ दिला असून आपल्यातल्या उणीवांवर मात करण्यासाठी, विशेष करुन विद्यार्थ्यांकरीता हे पत्र प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
परीक्षांपूर्वी आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असून या कार्यक्रमासाठी आजपासून २ दिवसांनंतर mygov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. २८ डिसेंबर पर्यंत नोंदणी उपलब्ध असून यात ९ वी ते बारावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.
पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेनं इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्त्वाविषयी परिचय करुन देण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाबद्दल आणि देशविदेशातून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संवादातून प्रशंसा केली.
****
आरोग्य कर्मचारी आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचा तिसरा संरक्षक म्हणजेच बुस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे. या लसीकरणाचं राज्यात योग्य पद्धतीनं नियोजन केलं जाईल, असं यांनी सांगितलं.
बूस्टर डोस देण्यासंदर्भात अलिकडेच राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली होती, आणि आमची ती मागणी होतीच, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं देखील लसीकरण केल्यामुळे विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बुस्टर डोसमुळे लाभ होईल, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
****
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य सरकार कठोर निर्बंध लावू शकतात, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार प्रतिबंधित क्षेत्र - कंटोनमेंट झोन तयार करणं, कडक नियमावली लावणं, हे निर्णय राज्य सरकारनं घ्यायचे असल्याचं, पवार यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या...
केंद्रसरकार सातत्याने कोविड नियंत्रणासाठी आपल पथक पाठवत असत त्या त्या राज्यात संख्या वाढल्या तर तिथ गाईडलाईन देत असते, त्या राज्याशी चर्चा पण करत असते आणि एक लक्ष ठेवून असते. आता लॉकडाऊनचा विषय हा राज्य सरकारचा असतो. एखाद्या ठिकाणी पेशंटची संख्या वाढली तर तिथल नियंत्रण करन असेल, कंटोनमेंट झोन असतील किंवा तिथली व्यवस्था असेल, ती राज्याने द्यायची असते. गरज पडल्यास लॉकडाऊनचा विषय असेल तर राज्यसरकारला ते अधिकार आहेत, ते करु शकतात.
ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग लवकर होतो आणि तो बरा देखील लवकर होतो, तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता पवार यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दोन पॅकेज मधून विशेष मदत करण्यात आली यातून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध खरेदी करता येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातले आणखी ३३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. या विद्यालयातले १९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली, त्यातून हा निष्कर्ष समोर आला. त्यामुळे या विद्यालयातल्या एकूण बाधितांची संख्या ५२ झाली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात आज एकही नवीन कोविडग्रस्त आढळला नाही.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी परिसरात आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. ३ पूर्णांक ९ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किलोमीटर खोल नोंदवला गेला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला आज दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरिअन इथं सुरूवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद १५७ धावा झाल्या होत्या. मयंक अग्रवाल ६० धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. सध्या लोकेश राहूल ६८ तर कर्णधार विराट कोहली १९ धावांवर खेळत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एक दिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे.
****
बीड इथं आज दहा किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. आमदार विनायक मेटे, अभिनेता देवदत्त नागे, स्नेहा कोकणे यांनी सकाळी साडे सहा वाजता हिरवा झेंडा दाखवल्यावर या स्पर्धेला सुरुवात झाली. सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं तसंच प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं या हेतूनं या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं आमदार विनायक मेटे यांनी यावेळी सांगितलं. मराठवाडा लोक विकास मंच मुंबई, कैलासवासी अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
****
नागालँड इथं होणाऱ्या ५६ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून ३२ खेळाडूंची निवड करण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या जत इथं निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राज्यातून सातशे पाच खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते यावेळी विजेत्या खेळाडूंना बक्षीसं प्रदान करण्यात आली.
****
'दास्तान-ए-बड़ी बांका' या विशेष सादरीकरणातून औरंगाबादकरांनी आज मुंबई नगरीच्या अनोख्या दर्शनाचा अनुभव घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र, महात्मा गांधी मिशन आणि अभ्युदय फाउंडेशन यांच्या वतीनं सादर झालेल्या या कार्यक्रमात धनश्री खंडकर आणि अक्षय शिंपी यांनी हावभाव आणि संवादातून मुंबईतल्या लोकलची कथा, लेडीज डब्यातले किस्से, लोकलच्या आत आणि बाहेर घडणाऱ्या घटना, स्टेशनवरचे संवाद आदी प्रसंग सादर केले.
****
लातूर शहरातल्या सर्व प्रभागांमध्ये आज संजय गांधी निराधार योजना समाधान शिबीर घेण्यात आलं. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख यांच्या हस्ते शहरातल्या प्रभाग क्रमांक १४ इथं या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी यावेळी या योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा. ****
राज्य सरकारचा २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प, आज अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत दुपारी दोन वाजता सादर करणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरातील राज्याची आर्थिक परिस्थिती, फारसी चांगली नाही. या स्थितीत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा भार कमी करुन, दर कपात करण्याचे संकेत दिले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राज्यात सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांनी, केंद्रातल्या सरकारवर टीका करत राज्यात ठिकठिकाणी आंदोलनही केलं आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकट काळात घरा-घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला, कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या, असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच, पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊ या, त्यासाठी वचनबद्ध होऊ या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु झालं असून, राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. देशात पेट्रोलची किंमत शंभर रुपये आणि डिझेलची किंमत ८० रुपये प्रती लीटर झाली असल्याचं विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहात सांगितलं. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती देखील वाढल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चेची मागणी करत सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. सभापतींनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतरही गदारोळ सुरुच राहील्यानं सभापतींनी कामकाज आधी ११ वाजेपर्यंत आणि नंतर एक वाजेपर्यंत स्थगित केलं होतं.
****
देशात सहा राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये देशातल्या एकूण रुग्णांच्या ८६ टक्के रुग्ण आहेत.
****
देशात आतापर्यंत दोन कोटी नऊ लाख नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. काल दिवसभरात ६६ हजारांहून अधिक नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतका झाला आहे. काल १४ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी आठ लाख रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल १८ हजार ५९९ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ९७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ५७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या एक लाख ८८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या तीन हजार २१८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात काल नव्या ४२६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ९६९ झाली आहे. तर काल तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आतापर्यंत एक हजार २९२ रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ५५९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात येत्या ११ मार्च पासून ते चार एप्रिल पर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण टाळेबंदी करण्याचा, तर अन्य दिवशी अंशतः टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल जाहीर केला. या अंशतः टाळेबंदी मध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलनं, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलतरण तलाव, क्रीडा मैदाने, शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद असतील. मंगल कार्यालय, सभागृह यात होणाऱ्या सर्व लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे. या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण टाळेबंदी करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
****
नागपूरच्या हिंगणा औद्योगिक वसाहतीतल्या विको लॅबोरेटरीज कंपनीला मध्यरात्री आग लागली. यामध्ये कारखान्याचा तळमजला आणि दोन मजले कोसळले. घटनास्थळी नागपूर महानगरपालिकेचे सहा तर नगर परिषद वाडीचे चार अग्निशमन वाहनं पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर आगीच्या घटनेमुळे कंपनीचं जवळपास ७० टक्के नुकसान झालं आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीनं आयोजित केली जाणारी १४वी इंडियन प्रिमियर लीग स्पर्धा यंदा ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांमधे, चेन्नई इथं स्पर्धेचा सलामीचा सामना होईल.
****
0 notes
Text
सय्यद मुश्ताक अली टी -२०: दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडू दुस Time्यांदा चॅम्पियन्स बनला, अंतिम फेरीत बडोद्याचा पराभव केला. - सय्यद मुश्ताक अली टी -20: दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडू दुस Bar्यांदा चॅम्पियन बनला, त्याने अंतिम सामन्यात बडोद्याला पराभूत केले.
सय्यद मुश्ताक अली टी -२०: दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडू दुस Time्यांदा चॅम्पियन्स बनला, अंतिम फेरीत बडोद्याचा पराभव केला. – सय्यद मुश्ताक अली टी -20: दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडू दुस Bar्यांदा चॅम्पियन बनला, त्याने अंतिम सामन्यात बडोद्याला पराभूत केले.
तामिळनाडू क्रिकेट संघ – फोटो: ट्विटर अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका दिनेश कार्तिक यांच्या नेतृत्वात असलेल्या तामिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडक दुस the्यांदा जिंकला. अखेर रविवारी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात उपविजेतेपदावर तामिळनाडूने जबरदस्त कामगिरी केली. त्याने…
View On WordPress
#क्रिकेटची ताजी बातमी#तामिळ नाडू क्रिकेट असोसिएशन#तामिळ नाडू क्रिकेट संघ#तामिळ नाडू वि बडोदा#तामिळ नाडू वि बडोदा थेट स्कोअर#दिनेश कार्तिक#बीसीसी#बीसीसी घरगुती#मणिमरण सिद्धार्थ#सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अझरुद्दीन#सिड मुश्ताक अली ट्रॉफी 2021 विजेता#सीड मुश्ताक अली ट्रॉफी#सीड मुश्ताक अली ट्रॉफी 2021#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या
0 notes