#चेन्नई सुपर किंग्ज बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
चारधाम तीर्थयात्रेच्या दृष्टीनं उत्तराखंड प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. चारधाम तीर्थयात्रा करण्याऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकार सज्ज झालं आहे. यासंदर्भात उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं असून सामान्य यात्रेकरुंच्या सुविधेसाठी या चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केदारनाथ धामसाठी विशेष व्यक्तिंसाठींच्या अर्थात व्हिआयपी यात्रांची संख्या कमी करण्याबाबत या पत्राद्वारे सूचित केलं आहे. तसंच कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी यात्रेकरुंनी आयआरटीसीच्या माध्यमातूनच हेलिकॉप्टर सेवांची नोंदणी करण्याचं आवाहनही उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे.
****
इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बदलेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य निरर्थक असून इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा झालेली नाही. पुरेसं संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर ��थे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्य राज्यात लोकसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अधिक ठिकाणी प्रचारासाठी संधी मिळावी, म्हणून राज्यातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सगळेच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गुजरात राज्यात येत्या सात तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणंद इथं सभा झाली. या सभेनंतर ते सुरेंद्रनगर, जामनगर आणि जुनागढ या ठिकाणी सभा घेतील, तर काँग्रेस नेते तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या नेत्या सुनीता केजरीवाल भावनार आणि भरुच इथं आप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोटाद आणि डेडियापाडा इथं रोड शो करत आहेत.
****
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरु आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून आज त्या चिरमिरी इथं जाहीर सभा घेतील. प्रियंका गांधी यांचा छत्तीसगडचा हा दुसरा प्रचार दौरा असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी या आधी राजनांदगांव तसंच कांकेर इथं जाहीर सभा घेतल्या आहेत.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.
****
भारतीय बुद्धीबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ फिडेनं अधिकृतपणे ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित केलं आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्र���णावल्ली यांच्यानंतर या किताबानं सन्मानित झालेली वैशाली ही तिसरी महिला बुद्धीबळपटू आहे. ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित असलेली वैशाली आणि तिचा भाऊ रमेशबाबू प्रग्यानंद ही विश्वातली पहिली भावा बहिणीची जोडी आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेत काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जनं १७ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. या स्पर्धेतल्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
Text
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
राजस्थान रॉयल्सनंतर, चेन्नई सुपर किंग्ज देखील प्रस्तावित महिला आयपीएलमध्ये संघ तयार करण्याचा विचार करेल. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी शनिवारी कोझिकोडमध्ये सांगितले की, “एकदा बीसीसीआयने महिला आयपीएलच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेतला की, आम्ही त्यात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवू.” जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच बोलू. स्पोर्ट्सस्टारने काशी विश्वनाथचाही हवाला देत…
View On WordPress
#CSK#CSK आणि रवींद्र जडेजा#CSK मधील मालक संघ आणि रवींद्र जडेजा यांचा विचार#CSK-रवींद्र जडेजा संबंध#TNP#TNPL#आयपीएल २०२२#इंडियन प्रीमियर लीग#चेन्नई सुपर किंग्ज#चेन्नई सुपर किंग्ज बातम्या#चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएल#चेन्नई सुपर किंग्स#चेन्नई सुपर किंग्स बातम्या#चेन्नई सुपर किंग्स महिला आयपीएलमध्ये संघ घेण्याचा विचार करणार आहे#तरुण लीग#तामिळनाडू#तामिळनाडू क्रिकेट#तामिळनाडू प्रीमियर लीग#तो म्हणाला ते खरे नाही#महिला आयपीएल#युवा लीग
0 notes
Text
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
एमएस धोनी वाढदिवस: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 7 जुलै रोजी 41 वा वाढदिवस आहे. माही सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथे आपला वाढदिवस साजरा करणार आहे. धोनी (एमएस धोनी) ने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएल खेळत आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी काही…
View On WordPress
#CSK#आयपीएल#आयपीएल २०२२#एमएस धोनी#एमएस धोनी लंडन#एमएस धोनीचा ४१ वा वाढदिवस#एमएस धोनीचा वाढदिवस#एमएस धोनीची पत्नी#एमएस धोनीची पत्नी साक्षी#एमएस धोनीची बातमी#एमएस धोनीच्या वाढदिवसाची बातमी#एमएस धोनीबद्दल अज्ञात तथ्ये#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#चेन्नई सुपर किंग्ज#ताजी बातमी#धोनी लंडन#धोनीचा वाढदिवस#धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा#महेंद्रसिंग धोनी#महेंद्रसिंग धोनीचा ४१ वा वाढदिवस#महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस#महेंद्रसिंग धोनीबद्दल#माजी कर्णधार#माजी कर्णधार एमएस धोनी#माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी#लंडन#साक्षी धोनी#हिंदी बातम्या
0 notes
Text
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 38 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. सोमवारी (25 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. चेन्नईला अनेक आघाड्यांवर कामगिरी सुधारावी लागणार आहे. चेन्नईने आतापर्यंत सातपैकी ��ेवळ दोनच सामने जिंकले आहेत तर…
View On WordPress
0 notes
Text
विराट कोहलीला सीएसके विरुद्धच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख डॉलर्सचा दंड आयपीएल 2021: सीएसकेविरुद्ध हळू गोलंदाजी महागली, आरसीबीचा कर्णधार कोहलीला 12 लाखांचा दंड
विराट कोहलीला सीएसके विरुद्धच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख डॉलर्सचा दंड आयपीएल 2021: सीएसकेविरुद्ध हळू गोलंदाजी महागली, आरसीबीचा कर्णधार कोहलीला 12 लाखांचा दंड
डिजिटल डेस्क, मुंबई. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीला रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यादरम्यान त्याच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कारण टीमची ही पहिली चूक होती आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान गुन्हेगारीच्या दराशी संबंधित हंगामात कोहलीला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, असे एका निवेदनात…
View On WordPress
#आयपीएल 2021#चेन्नई सुपर किंग्ज#ताज्या हिंदी बातम्या#भास्करकिंदी बातमी#रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर#विराट कोहली#हिंदी बातम्या#हिंदी बातम्या आज#हिंदी बातम्या थेट#हिंदी मध्ये बातमी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्त�� करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता
एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरल्याची मुख्यमंत्र्यांची भावना
राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करण्याची राज्यपाल रमेश बैस यांची सूचना
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार, मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव
सविस्तर बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी ते भरवीर असा ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. समृद्धी मार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. ते म्हणाले…
Byte…
आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प पहिला टप्पा देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबर मध्ये नागपूर ते शिर्डी झाला. आणि लगेच आपण पुढचा टप्पा ८० किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला, तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला, आणि शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अलीकडेच महामार्गावर झालेल्या अनेक अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केल��. या महामार्गावर लवकरच सुगम वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येईल असं ते म्हणाले. महामार्गाचं महत्त्व विशद करताना ते म्हणाले....
Byte…
हा समृद्धी महामार्ग का आहे, हा एक ईकॉनॉमिक कॉरीडोर आहे. राज्याच्या १५ जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो, ज्याठिकाणी पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे, पोर्टच्या आधारावर विकास झाला, त्या पोर्ट लेड डेव्हपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई, एमएमआर रिजन, आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलिकडे तो होत नव्हता, आता पार गोंदिया पर्यंत पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे, आणि म्हणून महाराष्ट्राला रिडीफाईन करणार हा महामार्ग आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारला काल नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं भाजप, येत्या ३० तारखेपासून जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे. या अभियानातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे ‘नौ साल सेवा सुशासन, गरीब कल्याण’, या विषयावरच्या एका राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह याच खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात तीन सत्रं होणार असून, त्यात इंडिया सर्जिंग अहेड, जन जन का विश्वास आणि युवा शक्ती गॅल्व्हानायझिंग इंडिया या तीन विषयावर चर्चासत्रं होणार आहेत. या परिसंवादात विविध मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
****
दिल्लीतल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलानं ही याचिका मागे घेतली.
दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, यावेळी ७५ रुपयांचं नवं नाणं जारी करण्यात येणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, ग्रामविकास तसंच पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या माध्यमातून जालना, नांदेडसह जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, ��ागपूर आदी जिल्ह्यांतल्या गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश जारी करण्यात येतील असं महाजन यांनी सांगितलं.
****
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं हा उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं काल शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यावेळी उपस्थित होते.
जनतेची कामं लवकरात लवकर होण्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील राहील, असं आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणाले,
Byte…
आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होतं, पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं, की का आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आणि मग या यंत्रणेचा वापर या सर्वसामान्य लोकांना झाला पाहीजे. आपलं सरकार आल्यानंतर २८ प्रलंबित सिंचनाच्या योजनांना आपण सुप्रमा दिला. सहा लाख हेक्टर जमिन या निर्णयामुळे ओलीताखीली येणार आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारे वितरीत करण्यात आली. पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्न वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथंही शासन आपल्या दारी या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशेवर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करावं, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुंबईहून रायगड इथं सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला राज्यपालांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभियान सुरु करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, पुरातत्व आणि इतिहास यांचा समन्वय साधला जाणार आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हेर��टेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन आणि चित्रकला शिबिर घेण्यात येईल. तर संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर यशवंत जाधव आणि समुहाचं “पोवाडा गायन”, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, आणि वेरुळ लेणींच्या वास्तुकला आणि कलाकुसर यावर आधारित, सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता आणि त्यांच्या महागामी नृत्य समूहाचा “नृत्यांकन”- हा कार्यक्रम होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शेतीसाठी रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसंच जळालेली रोहित्रं तात्काळ बदलण्याच्या सूचनाही, त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, तसंच शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बोगस बि-बियाणं, खते, किटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास, कृषि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाचं लोकार्पण सावंत यांच्या हस्ते काल झालं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलतांना सावंत यांनी, राज्यातली आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रुग्णालयांना आकस्मिक भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतल्याचं सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, महाविकास आघाडीचे जयकुमार जैन यांची, तर उपसभापती म्हणून, संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी एक- एकच अर्ज आल्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी कुमार बारकुल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
****
औरंगाबादमध्ये आजपासून ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीनं हा महोत्सव होत असल्याचं, सभापती राधाकिशन पठाडे यांनी सांगितलं. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचं उद्धाटन होईल, अधिक माहिती देताना पठाडे म्हणाले...
Byte…
हा आंबा महोत्सव २७/०५ ते ३१/०५ असं, त्यात पुढे काही वाढवायचं ठरलं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नुसार आपण एक दोन दिवस पुढेही वाढवू शकतो. आणि कोकणामधून येणारे, देवगड, रत्नागिरी, चिपळूण या भागातून सर्व शेतकरी याठिकाणी स्वत:चा पिकवलेला आंबा, घेऊन येणार आहेत. पणन मंडळाकडे जे नोंदणीकृत क���लेले शेतकरी आहेत. असेच या महोत्सवात भाग घेणार होते. परंतू मिटींगमध्ये असं ठरलं की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा पिकवत असेल किंवा स्वत:च्या मळ्यातला आंबा असेल तर ते पण या महोत्सवामध्ये भाग घेवू शकतील, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गाळयुक्त शिवार मोहीमेअंतर्गत सिंचन प्रकल्पातला गाळ काढण्याची कामं पूर्ण करण्याची सूचना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध जलसंधारण कामांचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत काल त्या बोलत होत्या. शेतकरी, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा गाळ काढावा, तसंच तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात यावा असंही त्यांना यावेळी सूचित केलं.
****
उस्मानाबाद हा जिल्हा केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित जिल्हा जाहीर केला असून, जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याबाबत माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte..
यामध्ये १९१ तीव्र कुपोषित म्हणजे सॅम आणि एक हजार ५१९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम तर सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख १३ हजार ७९४ बालकं आढळून आली आहेत. यातील एक हजार ७१० बालकांची आरोग्य विभागामार्फत स्वंतत्र पथकाव्दारे जून मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी तीव्र कुपोषित सॅम श्रेणीतील बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. गंभीर वैद्यकीय दोष आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा देऊन वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करुन, अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २३३ धावा केल्या. शुभमन गिलनं ६० चेंडूत १२९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १८ षटकं दोन चेंडुत १७१ धावांवर सर्वबाद झाला.
****
परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं, बेरोजगारांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत, आज पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमित्त लातूरसह राज्यभरात अभिवादन सभा तसंच विविध कार्यक्रम काल घेण्यात आले. लातूरमध्ये निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ७३ जणांनी रक्तदान केलं. लातूर तालुक्यातल्या मौजे वासनगाव ग्रामपंचायतीत, विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनंही विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर;ठाण्याची करिश्मा संखे देशात पंचविसावी तर महाराष्ट्रातून प्रथम
राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश
दोन हजाराच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात
औरंगाबाद इथं मृत सफाई कामगारांच्या कुटूंबाला दहा लाख रुपये मदतीचे धनादेश प्रदान
सिंदखेडराजाजवळ काल झालेल्या बस आणि कंटेनर अपघातातील मृतांचा आकडा नऊवर
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे राजेश पाटील विजयी
आणिप्ले- ऑफ फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये इशिता किशोरनं देशातून प्रथम, गरिमा लोहियानं द्वितीय तर उमा हरातीनं तृतीय क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून करिश्मा संखे हिनं पहिला क्रमांक मिळवला असून, ती देशात पंचविसाव्या क्रमांकावर आहे.
या परीक्षेत एकूण नऊशे तेहतीस उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी तीनशे पंचेचाळीस उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील तर ९९ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहेत. दोनशे त्रेसष्ट इतर मागासवर्गीय, एकशे चोपन्न अनुसूचित जातीचे आणि बहात्तर उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या नऊशे तेहतीस उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तरहून जास्त उमेदवारांचा समावेश आहे.एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे बारा टक्के उमेदवार महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील यशस्वी उमेदवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे.
****
राज्यात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक गुरुबीर पाल सिंग यांनी काल मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लष्करी शिस्त आणि देशप्रेम अंगी बाणवणाऱ्या एनसीसी मध्ये सहभागासाठी राज्यातल्या तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असतो, असं सांगत, राज्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र एनसीसीची विद्यार्थी संख्या वाढवण्याचं नियोजन आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. आकाशी रंगाचा शर्ट आणि नि��्या रंगाची पॅन्ट आणि बूट मोजे असा विद्यार्थ्यांचा तर त्याच रंगसंगतीत विद्यार्थिनींचा गणवेश असेल. काही शाळांनी या वर्षी गणवेशाची मागणी कंत्राटदारांकडे नोंदवली असल्याने, अशा शाळांचे विद्यार्थी तीन दिवस शाळेने ठरवलेला तर उर्वरित तीन दिवस राज्य सरकारने ठरवलेला गणवेश घालतील, असं केसरकर यांनी सांगितलं. खासगी शाळांनीही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत विचार करावा, असं आवाहन केसरकर यांनी केलं. ते म्हणाले....
Byte…
खासगी शाळांनी खरं आता याचा विचार केला पाहिजे की
आम्ही या खासगी शाळा काढल्या १०० टक्के पगार आपण शासनाकडून घेतो , इतर खरच आपण शासनाकडून घेतो परंतु त्या शासकीय शाळा नसल्यामुळे ती मुलं याच्यापासून वंचित होतात. याचा विचार खासगी शाळांनी कधी तरी केलाच पाहिजे, असं मलं वाटतं. शेवटी शिक्षणासाठी तुम्ही या संस्था स्थापन केलं नं . मग त्या मुलांचा तुम्ही विचार करणार नाहीत का, कारण त्या जर गवरमेंट स्कूल असत्या तर त्या मुलांना सुद्धा युनिफॉर्म मिळणार. त्या मुलांना आपण मोफत पुस्तकं देतो पण युनिफॉर्म देऊ शकत नाही, इतर फॅसिलिटिस त्यांना देऊ शकत नाही, त्यांना लॅबस् देऊ शकत नाही, याच्यासाठी खासगी शाळांचे चालक महाराष्ट्राच्या मुलांचं हिताच्या दृष्टीने पुढे येणार का , ते जर स्वत: हून पुढे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि नाही आले तर मग काय निर्णय घ्यावा लागेल.., शेवटी मुलांचं हित हे शिक्षणा मधे सर्वोच्च असतं.
****
लोकसभेचे माजी अध्यक्ष तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोशी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सोमवारी सायंकाळी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत
****
आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी कार्यरत जी - ट्वेंटी कार्यगटाची दुसरी बैठक कालपासून मुंबईत सुरू झाली. सर्जनशील निधी यंत्रणेची तपासणी करण आणि संधी ओळखून विशिष्ट समुदायांवरील आपत्तीचा प्रभाव कमी करणं, हा या बैठकीचा उद्देश आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि २० देशांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या प्रतिनिधींनी काल सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं.
****
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात झाली. बदलल्या जाणाऱ्या ��ोटांचा दैनंदिन हि��ोब ठेवण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं सगळ्या बँकांना दिले आहेत. याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचा हिशोबही ठेवला जाणार आहे. केंद्र सरकारनं २०१६ मध्ये नोटबंदी केल्यानंतर नव्यानं चलनात आणलेल्या या नोटा, चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं गेल्या शुक्रवारी केली होती.
****
महाविकास आघाडीत एकजूट राहील आणि ती कायम असावी, अशीच आपली भूमिका असल्याचंही विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीसंदर्भात बोलताना, सूड भावनेतून तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठीक असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले...
Byte…
माझं याबद्दल एवढच म्हणणं आहे की, द्वेष भावनेतनं राजकीय सूड बुद्धीतनं, काही वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणाला बोलवण्यात येऊ नये. काही त्यांना कुठे एखादा क्ल्यू मिळाला आणि त्या च्याबद्दल त्यांना काही नोटीस काढावी लागली, तर तो काढण्याचा त्यांचा अधिकार आहे.
****
पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने, राज्यातल्या मोठ्या गर्दीच्या मंदिरांचं डिजिटल मॅपिंग करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
****
यावर्षी ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आषाढी वारीचं नियोजन करण्यात येणार असून, महिला वारकऱ्यांना मूलभूत तसंच आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. पालखी मार्गावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहा हजार वृक्ष लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला वारकऱ्यांना हिरकणी कक्षही उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वामी यांनी यावेळी दिली.
****
अमरावती जिल्ह्यातलं श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथून माता रुक्मिणीची पायदळी वारी पालखी आषाढी एकादशी करता पंढरपूरकडे काल मार्गस्थ झाली. या पालखीचं हे चारशे एकोणतिसावं वर्ष आहे. कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचं माहेर असून पंढरपूरमध्ये या पालखीचा विशेष मान असतो.
****
ड्रेनेज लाईन मधला गाळ कचरा काढण्यासाठी औरंगाबाद ��हानगरपालिका आता रोबोटिक स्कॅव्हेंजर इक्विपमेंट हे आधुनिक यंत्र वापरणार आहे. महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्यासमोर काल या यंत्राचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. हे यंत्र ड्रेनेजमधला गाळ काढण्याचं काम मानवविरहित पद्धतीनं करतं, यामुळे ड्रेनेजमधल्या विषारी वायूमुळे होणारी जीवितहानी टाळता येईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. केरळमधल्या चार तरुण अभियंत्यांनी जेन-रोबोटीक्स या त्यांच्या स्टार्टअप उद्योगातून हे यंत्र तयार केलं आहे.
दरम्यान, शहरातल्या सलीम अली सरोवर परिसरात ड्रेनेज पाईप दुरुस्त करताना चार मजुरांचा आठ मे रोजी मृत्यू झाला होता, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.वेंकटेशन यांनी काल मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वेंकटेशन यांच्या हस्ते त्या कुटुंबांना देण्यात आले.
****
हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर यांची, तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे अशोक सिरामे यांची निवड झाली आहे. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात काल ही निवड प्रक्रिया झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जवळाबाजार बाजार समितीच्या सभापतीपदीसाठी शिवसेनेचे शिवाजी आप्पा भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ काल सकाळी झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातातील मृतांचा आकडा नऊवर पोहचला आहे. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत तसंच जखमी प्रवाशांना शासकीय खर्चानं योग्य ते वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या वेरूळ इथल्या डमडम तलावामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. संकेत बमणावत आणि आयुष नागलोद अशी या दोघांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात काल एकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. निवळी खुर्द शिवारात झालेल्या या दुर्घटनेत अन्य एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
ग्रामीण भागात पशुधन विकास अधिकारी पशुधनाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देत असल्याचं, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशूंचे निदान करण्यासाठी मेटल डिटेक्टर तसंच विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप काल करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात नांदेड, अर्धापूर, हदगाव, म��हूर, नायगाव, मुखेड आणि कंधार या सात तालुक्यातल्या ६२ पशुवैद्यकीय दवाखान्यांना मेटल डिटेक्टर तसंच १०१ पशुवैद्यकीय दवाखान्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले- ऑफ फेरीत चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सवर पंधरा धावांनी विजय मिळवत, अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. १७३ धावांचं लक्ष्य साधण्यासाठी फलंदाजीला आलेला गुजरात टायटन्सचा संघ अवघ्या १५७ धावात तंबूत परतला.
दरम्यान, प्ले- ऑफ गटात दुसरा सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंटस यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं एम ए चिदंबरम क्रीडासंकुलात संध्याकाळी साडेसात वाजता सामना खेळवला जाईल. या सामन्यातला पराभूत संघ स्पर्धेतून बाद होईल, तर विजेत्या संघाचा परवा शुक्रवारी गुजरात टायटन्ससोबत सामना होणार आहे.
****
७१ व्या महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेच्या काल अखेरच्या दिवशी नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे यांनी सर्वोत्कृष्ट धावपटूचा मान पटकावला. पुणे जिल्हा संघाने पुरुष आणि महिला गटात अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. म्हाळुंगे बालेवाडीच्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र ॲथलेटिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसं देण्यात आली. ओडिशामध्ये येत्या १५ ते १८ जून दरम्यान आंतर-राज्य वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी काल झालेल्या स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथे ‘वंडर केव्ह्स‘ या कार्यक्रमाचं येत्या सत्तावीस तारखेला आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं साजरा होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव, या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला शिबीर, पोवाडा गायन, प्रश्नमंजुषा आणि नृत्यनाटिका असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दुर्गम भागासह खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी शासनानं हाती घेतलेल्या “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यात येत्या एक जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार;ओळखपत्राशिवाय या नोटा बदलून देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलचा वापर
सत्ता गेल्याने घरघर लागलेल्या महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल-भाजपची टीका
सरकार विरोधकांविरूद्ध चुकीची कारवाई करीत असल्याचा शरद पवार यांचा आरोप
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्याचं येत्या शुक्रवारी लोकार्पण
जात वैधता प्रमाणपत्राअभावी नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ३८३ लोकप्रतिनिधींची निवड रद्द
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना
��विस्तर बातम्या
दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार आहेत. एका वेळी कमाल २० हजार रुपये अर्थात जास्तीत जास्त दहा नोटा बदलता येणार आहेत. दरम्यान, दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेणं हा चलन व्यवस्थ���पनाचा भाग असल्याचं भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. भारतीय रिजर्व्ह बँक दीर्घ काळापासून स्वच्छ चलन धोरणाचं पालन करत असून त्यानुसार यापूर्वीही वेळोवेळी विशिष्ट क्रमांकाच्या नोटा चलनातून काढून घेऊन नव्या नोटा जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. नोटबंदीनंतरच्या काळात चलनाची गरज तातडीनं भागवण्यासाठी प्रामुख्यानं दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. मात्र, आता हा उद्देश पूर्ण झाला असून इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात असल्यामुळे आता दोन हजारांच्या नोटा कमी करण्यात येत आहेत असं ते म्हणाले.
दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबर २०२३ नंतरही वैध असतील, असे संकेत शक्तिकांत दास यांनी दिले. दोन हजार रुपयाच्या नोटांच्या वैधतेसंदर्भात बँकेनं काहीही निर्देश दिलेले नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
Byte…
नोटीफिकेशन मे हम ने कहा हैं it continues as legal tender। हम ने तो कही पे नहीं कहा, उसके आगे तो कुछ नहीं कहा। हम ने तो ऐसा नहीं कहा कि भाई लीगल टेंडर जो है वो सिर्फ 30TH सप्टेंबर तक है ऐसा तो नहीं कहा है। हमारे एक्सपेक्टेशन ये है कि 30 सप्टेंबर के अंदर जो है मॅक्झिमम क्वांटिटि ऑफ नोटस् वापस आ जायेंगे। हम देखेंगे उस वक्त, we will see & we will decide.
छोट्या व्यावसायिकांकडून दोन हजाराच्या नोटा नाकारण्याचा मुद्दा नवीन नाही, पूर्वीही अनेक व्यावसायिक ग्राहकांकडून दोन हजाराची नोट घेण्याऐवजी ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देत असत, याकडे दास यांनी लक्ष वेधलं. परदेशी गेलेल्या नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं दास यांनी सांगितलं.
दरम्यान, नोटा बदलण्यासंदर्भात रिजर्व्ह बँकेने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. दररोज किती नोटा बदलण्यात आल्या याची बँकांनी नोंद ठेवावी, नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सावलीची तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असं रिजर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.
****
ओळखपत्र दाखवल्याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमधून बदलून देणं, हे संविधानाच्या अनुच्छेद १४ चं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. दोन हजाराच्या नोटा बॅँकांनी संबंधित खातेधारकाच्या खात्यातच जमा करण्याचे निर्देश द्यावे, असंही या याचिकेत म्हटलं आहे.
****
��गामी काळात पर्यावरणाच्या माध्यमातून दिशादर्शक काम पहायला मिळेल, असा विश्वास, पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. जी २० अंतर्गत मुंबईत सुरु असलेल्या पर्यावरण आणि हवामानविषयक बैठकीचं काल कपिल पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर काम सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले....
Byte…
पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा संकल्प आहे, की आपला देश स्वच्छ झाला पाहिजे. आपल्या पर्यावरणामध्ये संतुलन राहिलं पाहिजे. पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे, मला विश्वास आहे, की येणाऱ्या काळामध्ये जगाला दिशादर्शक असं भारताचं काम पर्यावरणाच्या मध्ये आणि क्लायमेट चेंजच्या मध्ये निश्चितपणाने आपल्या देशामध्ये होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे.
****
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित-एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलचा उपयोग ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह इथं याचं सादरीकरण करण्यात आलं. जास्तीत जास्त नागरिकांना सहजरित्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी या पोर्टलचा उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. यासाठी स्वयंसेवक नागरिकांना योग्य ती मदत करतील अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
****
सत्ता गेल्यामुळे घरघर लागलेल्या महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल सुरु झाल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्तेतून गेल्यावर जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी कोणाची ताकद जास्त हे सांगण्यातच आघाडीचे तिन्ही पक्ष आपली ताकद खर्च करत आहेत. जिवंत राहण्यासाठी एकमेकांमध्येच स्पर्धा सुरु झाल्याची टीका उपाध्ये यांनी केली.
****
काळा पैसा वैध करण्यासंदर्भातल्या प्रकरणी सक्त वसूली संचालनालय-ईडीने राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल चौकशी केली. एका कंपनीला दिलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणात पाटील यांच्या सहभागाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गैरव्यवहार विभागानं दाखल केलेल्या तक्रारीवरून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
****
चुकीची कामं करणाऱ्या माणसाच्या सल्ल्यावरून सरकार विरोधकांविरूद्ध चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. विरोधकांना त्रास देण्याच्या उद्देशाने केंद्रसरकार तपास यंत्रणांचा वापर करु�� राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप ��्यांनी केला. दोन हजार रुपयांच्या नोटेबाबतच्या निर्णयात सरकारने सर्वसामान्यांचा विचार केलेला नाही अशी टीका त्यांनी केली.
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काहीही चर्चा अद्याप झालेली नाही, महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं.
****
केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राऊत काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २०२४ मध्ये ईडीच्या कार्यालयात कोणा कोणाला पाठवायचं याची यादी आम्ही लवकरच तयार करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, जयंत पाटील यांना सक्तवसूली संचालनालयानं समन्स बजावून चौकशी केल्याच्या विरोधात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभरात निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं पक्ष कार्यकर्त्यांनी ईडी विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली.
जालना इथं पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं. बदनापूर, परतूर आणि भोकरदन इथल्या तहसील कार्यालयासमोरही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केलं.
****
औरंगाबाद शहराची पाणी पुरवठा योजना वेळेत प��र्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीच्या कामाचा डॉ कराड यांनी काल स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. शहरातल्या जनतेला २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं डॉ.कराड यांनी सांगीतलं. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्याचं येत्या शुक्रवारी २६ मे रोजी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होईल, हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर शिर्डी पासून नाशिक जिल्ह्यातल्या भरवीरपर्यंतचं अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अजूनही सुरू असून, इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
****
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेत उपायुक्त रवींद्र निकम यांनी, नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार अडसुळ यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु न शकल्याने नांदेड जिल्ह्यात आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या एक हजार ३८३ लोकप्रतिनिधींची निवड जिल्हाधिकारी ��भिजीत राऊत यांनी रद्द केली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत निवडून आलेल्या या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १७ जानेवारी २०२३ पर्यत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र प्रमाणपत्र सादर न केल्यानं, त्यांची निवड रद्द ठरवण्यात आली.
****
क्रिकेट :
इंडियन प्रीमिअर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या प्ले ऑफ सामन्यांना आजपासून प्रारंभ होणार आहे. यातला पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता चेन्नईमधल्या एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना सुरु होईल. या सामन्यातला विजेता संघ थेट अंतिम फेरीत दाखल होईल, तर पराभूत संघाचा अन्य दोन संघातल्या विजेत्याशी सामना होईल. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाची अंतिम सामन्यात आजच्या विजेत्या संघाशी विजेतेपदासाठी लढत होईल.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात काल शासन आपल्या दारी या योजनेच्या पहिल्या कार्यक्रमात सात हजार नऊ जणांना विविध प्रकारचे लाभ देण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या या योजनेच्या कार्यक्रमाचा, जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं.
****
बोगस कीटकनाशक विक्रेत्या कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर चलनी नोटा उधळून आंदोलन केलं. दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
****
शेतकऱ्यांनी एचटीबीटी बियाणाबाबत जागरूक राहून अनधिकृत बियाणांची पेरणी करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. खरीप हंगामपूर्व बैठकीत ते बोलत होते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जूननंतर पाण्याचा अंदाज घेवून कापसाची पेरणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक काल झाली. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राजू नाना भुमरे तर उपसभापतीपदावर राम पाटील एरंडे यांची बिनविरोध निवड झाली. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे राधाकिसन पठाडे तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे मुरली चौधरी विजयी झाले. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर शेषराव जाधव आणि उपसभापती पदी अनिल चव्हाण निवडून आले, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप शिवसेना युतीचे रामहरी जाधव सभापती तर शिवकन्या पवार या उपसभापतीपदी निवडून आल्या आहेत.
**
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे अशोक ठेंगल तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मदन इंगोले यांची बिनविरोध निवड झाली.
****
बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा जवळ आज सकाळी एस ट�� बस आणि ट्रकच्या अपघातात चार जण ठार तर काही प्रवासी जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात स्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती बुलडाणा पोलिसांनी दिली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्यसरकारचा निर्णय
स्थानिकांच्या इच्छेविरोधात बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही-उद्धव ठाकरे यांचा इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या कोकणासंदर्भातल्या भूमिकेवर टीका
देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये आज वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' परीक्षेचं आयोजन
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडून जालना रेल्वे स्थानकाची पाहणी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सची प्रतिस्पर्ध्यांवर मात
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काल पासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बारसू मधल्या स्थानिकांच्या इच्छेविरोधात तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल महाडमध्ये जाहीर सभेत बोलत होते. हा प्रकल्प कोकणाच्या भरभराटीसाठी आणायचा असेल,तर ती तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला, ते म्हणाले…
‘‘जर तो प्रकल्प आणायचा असेल कोकणाच्या भरभराटीसाठी तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, तुम्ही सगळे आमच्या कार्यकर्त्यांना आणी तिथल्या भूमीपुत्रांना तडीपाऱ्या लावताय, जिल्हाबंदी लावताय, आणी उद्या सांगताय रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल.. आज जिकडे बंदी करताय, तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात.. प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच, जो पर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याचा मनाविरुद्ध हे सगळं चाललंय.. तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसू मध्ये उतरेल.’’
तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित असलेल्या सोलगावला उद्धव ठाकरे यांनी काल भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना, बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला गैरसमजातून पत्र लिहिलं होतं, ती अंतिम भूमिका नव्हती असा खुलासा केल���. बारसूचा तेलशुद्धीकरण प्रकल्प गुजरातला न्यावा आणि गुजरातला गेलेले वेदांत, एअरबससारखे प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्याचं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिलं.
कॉग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आपल्या समर्थकांसह उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
****
कोकणवासियांबद्दल लोकप्रतिनिधींना शून्य आपुलकी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते काल रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत होते. गोवा मुंबई महामार्गाचं काम गेल्या सोळा वर्षांपासून रखडलं असून, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम चार वर्षांत पूर्ण होऊन जनतेसाठी खुला झाल्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. बारसू संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी, कोकणात जमिनींचा व्यापार होत असल्याची टीका केली. बारसू इथं कातळशिल्पांच्या परिसरात रिफायनरी होणं शक्य आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली. आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी काल रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला. तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं.
****
विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये गेल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी, बारसू इथं व्हावी असं पत्र देऊन सुचवलं होतं. मात्र आता ते या प्रकल्पाला विरोध करत असल्याचं केसरकर म्हणाले.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रा पूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा यंदा एक महिना लवकर सुरु होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात सुरु होणारा हा पालखी सोहळा यंदा मात्र जून महिन्यातच पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता गृहीत धरुन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाय योजना करण्याचे निर्देश पुणे जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
राज्यात काल कोरोनाच्या १७६ नव्या रुग्णांचं निदान झालं, यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर ४८७ रुग्ण काल कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात एक हजार ८७६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातले फक्त ११५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. काल ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ११ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्���ात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी काल जालना इथं रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पीटलाईन आणि इतर कामांचा आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुकुंदवाडी तसंच करमाड रेल्वे स्थानकालाही भेट देऊन निरीक्षण केलं. करमाड इथं मालधक्का करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मालधक्का आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी परिसरातल्या अनेक उद्योजकांची तसंच जालना इथं पोलाद उद्योग प्रतिनिधींची सरकार यांनी काल भेट घेतली.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत काल विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३' अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमप��्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी काल राज्यभरातील मुलांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. या वन्यप्राणीगणनेत ३३ वाघ आणि १६ बिबट्यांसह अस्वलं, रानगवे, विविध प्रकारची हरणं, वानरं, मगरी, सायाळ अशा एकूण तीन हजार २३ प्राण्यांची नोंद करण्यात आली.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
लातूर जिल्ह्याचा पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी काल कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी काल अनुभवी व्यक्तींचं म्हणणं ऐकून नोंदी घेतल्या. सोयाबीन हे प्रमुख पीक असलेल्या जिल्ह्यात सोयाबीनचे हब व्हावं, जिल्ह्यात चंदन, अश्वगंधा या सुगंधी औषधी वनस्पतींचं प्रमाण मोठं आहे, त्यासंबंधी युवकांना प्रशिक्षण द्यावं, औसा, उदगीर किल्ला, हत्तीबेट आदी पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं निर्धारित २० षटकात ८ बाद १३९ धावा केल्या. चेन्नईनं १७ षटकं आणि ४ चेंडूत ४ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.
दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं प्रथम फलंदाजी करत १८२ धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्ली संघानं सतराव्या षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ते साध्य केलं.
या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता राजस्थान ��ॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
****
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजि��क्यपद स्पर्धेत भारताच्या बिंदियारानी ने रौप्यपदक पटकावलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत बिंदियारानीने ५५ किलो वजन गटात १९४ किलो वजन उचललं.
****
फिडे आणि टेक महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी पहिली जागतिक बुद्धिबळ लीग दुबईमध्ये होणार आहे. दुबईतले भारताचे वाणिज्य दूत डॉ. अमन पुरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातली सर्वात मोठी आणि फ्रँचायझी-आधारित ही बुद्धिबळ स्पर्धा २१ जून ते २ जुलै दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ६ खेळाडूंचा समावेश असलेल्या ६ संघांमध्ये सामने होणार आहेत.
****
महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काल दिल्ली पोलिसांनी ७ तक्रारदार कुस्तीपटूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कुस्तीपटूंच्या वकिलांच्या उपस्थितीत त्याचं जबाब नोंदवण्यात आले. जबाब नोंदवताना या तक्रारदारांनी वेगवेगळ्या घटना सांगितल्या. परंतु, शोषण नेमके कधी झाली ती तारीख कुणाच्याही लक्षात नव्हती. लवकरच पोलीस कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचा देखील जबाब नोंदवून घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर चिकलठाणा परिसरात सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अहमदनगर इथल्या एका युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघं जन जखमी झाले. माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
गुणवत्तापूर्ण रस्ते दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या घनकचरा प्रक्रियेसाठी आय सी टी आधारित प्रकल्प राबवण्यात येणार
अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्सचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होणार
‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
दुय्यम निबंधक कार्यालयांचं कामकाज शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही सुरू
धाराशिव इथं उद्या राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्जवर सहा गडी राखून विजय; तर लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना पावसामुळे रद्द
****
राज्यातल्या रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल दुरुस्तीसाठी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महामंडळाचं भागभांडवल १०० कोटी रुपये राहणार असून, यापैकी ५१ टक्क्यांचा शासकीय निधी टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून दिला जाणार आहे.
**
राज्यातल्या सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या घनकचरा प्रक्रियेसाठी, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान -आय सी टी वर आधारित प्रकल्प राबवण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून, ५७८ कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. घनकचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी, जीपीएस किंवा आयसीटी आधारित तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्��त आयुक्त, मुख्याधिकारी यांच्यामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
**
कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात जगभरातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी, पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. यापैकी तीस टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात पदव्युत्तर पदवीसाठी पंधरा आणि पी एच डी साठी दहा अशा एकूण दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना, तीन वर्षे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचं वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल ४० वर्षे असावं. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कांदळवन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
**
करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात १६ सप्टेंबर २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर -जीएसटी अधिनियम लागू करण्यात आला. या तारखेपासून ते ३० सप्टेंबर, २०२६ या कालावधीपर्यंत करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्यात येणार आहे.
**
कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर इथल्या मौजे उदगांव इथं, ३५० खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासाठी १४६ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
****
सरकार लवकरच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्सचा शालेय अभ्यासक्रम समावेश करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं. काल मुंबईत भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात जगाशी संपर्क साधण्याची गरज असून, या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही चंद्रा यांनी केली.
दरम्यान, चित्रपट रसिकांना आपल्या आवडीच्या चित्रपटांच्या डिजिटायझेशनसाठी आता निधी उभारता येणार असल्याची माहिती, चंद्रा यांनी दिली. सरकार लवकरच वारसा चित्रपटांची एक यादी जाहीर करेल, त्या यादीतून चित्रपट रसिक आपल्या आवडीच्या चित्रपटाचं डिजिटल स्वरूपात रुपांतर करण्यासाठी निवड करू शकतील. सरकारने पाच हजारावर चित्रपट आणि लघुपटांच्या डिजिटायझेशनचं उद्दीष्ट निर्धारित केलं आहे. यापैकी सुमारे अडीच हजार चित्रपटांचं डिजिटायझेशन झाल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.
****
चांगला आशय हीच मनोरंजनाच्या बाजारपेठेची गुरुकिल्ली आहे, असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौर��� द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते काल फिक्कीच्या कार्यक्रमात बोलत होते. चांगल्या कार्यक्रमांची निर्मिती आणि त्यांचं प्रभावी प्रसारण आजच्या स्पर्धेच्या युगात महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. दूरदर्शन नवीन कल्पनांसह पुढे येत असून, हा बदल त्यांच्या आगामी चार महिन्यांच्या कार्यक्रमातून दिसून येईल, असं द्विवेदी यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या अतिमहत्त्वाच्या इमारती, रुग्णालयं, पंचतारांकीत हॉटेल, शाळा, देवस्थानं यावर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून संरक्षणात्मक उपाययोजना सुचवणारा अहवाल, तज्ज्ञ समितीनं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. या अहवालात मोठ्या सार्वजनिक आणि अतिउंच इमारतींच्या सुरक्षेचं विश्लेषण करण्यात आलं आहे. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
****
शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातल्या रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी, आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. बँकेच्या शिष्टमंडळानं काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकल्प कार्यान्वित झाले तर शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरवणारं, महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरवण्याबाबत, बार्टी, टी आर टी आय, महाज्योती आणि सारथी, या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ही माहिती दिली. पुढील शैक्षणिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध व्हावेत, यासाठी वसतिगृहाच्या कामाला जिल्हास्तरावर अधिक गती द्यावी, ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्यांकरता ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर, प्रतिमहा सहा हजार रुपये १० महिन्यांसाठी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं पाटील यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याचं, आव्हाड यांनी ट्विट करत जाहीर केलं आहे.
दरम्यान, पक्षानं अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी शुक्रवारी बैठक घ्यावी, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी केली आहे. या बैठकीत जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असं, पवार यांनी सांगितल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती प��्षानं केली असल्यामुळे, त्यांच्या जागी कोणाची निवड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पवार यांनी आपला निर्णय कायम ठेवला तरी ते पक्षाचे सर्वेसर्वा, पक्षाची ओळख, आणि चेहरा राहतील. त्यांनी काहीही निर्णय घेतला तरी ते सार्वजनिक जीवनात कायम सक्रीय राहणार असल्यानं, राज्यातल्या महाविकास आघाडीला कसलाही फटका बसणार नाही, असं पटेल यांनी सांगितलं.
****
खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमध्ये लुडबुड करू नये, ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी काँग्रेस संदर्भात केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना नाना पटोले काल नागपूर इथं बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजूर्न खरगे आहेत मात्र निर्णय राहुल गांधीच घेतात, असं म्हटलं होते. त्यावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबावरील प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये असं पटोले यांनी म्हटलं आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत गेली तरीही आम्ही भाजपविरोधात लढू असंही पटोले म्हणाले.
****
‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केरळमधली डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्षाने चित्रपटावर हेट स्पीच - द्वेषपूर्ण भाषणाला चालना देण्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असून, न्यायालय या चित्रपटावर कोणताही शिक्का लावू शकत नाही, चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर योग्य व्यासपीठावरून प्रयत्न करावेत, असं न्यायालयानं सांगितलं.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था -आयआयटी प्रवेशा परीक्षेसाठी पात्रता गुणांच्या निकषात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आयआयटी प्रवेशासाठी ७५ टक्के गुणाची अट शिथील करण्यासंदर्भात दाखल याचिका फेटाळून लावताना यासंदर्भात विचार करणं तसंच निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा असल्याचं नमूद केलं आहे.
****
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कोचर यांनी बँकेकडून निवृत्तीच्या लाभासंदर्भात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कोचर यांच्यावरील कारवाई योग्य ठरवत, कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
****
जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या दुय्यम निबंधक कार्यालयांचं कामकाज शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता, नागरिकांना सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या सु��िधेचा लाभ घेण्याचं आवाहन विखे पाटील यांनी केलं आहे.
****
धाराशिव इथं उद्या या वर्षीच्या राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र गोवा वकील संघटना आणि उस्मानाबाद जिल्हा वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद घेण्यात येणार आहे. यात “जलद न्यायासाठी न्यायव्यवस्थेचं आधुनिकीकरण” या विषयावर चर्चासत्र घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात ई कामकाजासाठी संगणक, छपाई यंत्र तसंच आवश्यक साहित्य भेट दिले जाणार आहे. राज्यभरातून जवळपास तीन हजार विधिज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्याग, समर्पण आणि राष्ट्रप्रेम याचं मूर्तीमंत उदाहरण असल्याचं, प्रसिद्ध अभिनेते तथा विचारवंत शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. ते काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं वि.दा.सावरकरांचे जीवन आणि विचार दर्शन, या विषयावर बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविध पैलूंचं दर्शन पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना घडवलं.
****
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. धाराशिव इथं व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात अभिवादन सभा घेण्यात आली. संस्थेचे सदस्य कमलाकर पाटील यांनी महाजन यांच्या स्मृतींना उजाळा देताना, अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीतून स्वतःची ओळख निर्माण केलेले महाजन यांच्याकडे भारतीय राजकारणातले एक महत्त्वाचे नेते म्हणून पाहिले जात होतं, असं सांगितलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मोहाली इथं झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पंजाबच्या संघानं दिलेलं २१५ धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्सनं एकोणिसाव्या षटकात चार गडी गमावत पूर्ण केलं.
तत्पूर्वी काल लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. लखनौ संघानं एकोणीस षटकं आणि दोन चेंडूत सात गडी गमावत १२५ धावा केल्या. मात्र यावेळी पावसामुळे थांबवावा लागलेला सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला.
****
ताश्कंद इथं आशिया चषक धनुर्विद्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारतीय खेळाडूंनी रिकर्व्ह आणि कंपाउंड विभागातल्या चारही सांघिक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष रिकर्व्ह संघाचा उद्या शुक्रवारी सुवर्णपदकासाठी चीनच्या खेळाडूंशी सामना होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त आयुक्त जी.श्रीकांत यांनी काल प्रभारी प्रशासक आ��्तिक कुमार पांडेय यांच्या कडून पदभार स्वीकारला. त्यांनतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. कार्यालयात स्मार्ट व��्क करून ई प्रशासनाकडे वळलं पाहिजे, याकरता प्रत्येक विभागाने एक ध्येय ठरवून त्या दिशेनं काम करावं, असं आवाहन, जी. श्रीकांत यांनी केलं.
****
येत्या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यासाठी रोप��ंची सहज उपलब्धता व्हावी, यासाठी हर घर नर्सरी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केलं आहे. हर घर नर्सरी उपक्रमातून प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने, किमान ५० रोपे तयार करायची आहेत. या उपक्रमात शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनीही कृतीशील सहभाग नोंदवावा, प्रत्येक शासकीय कार्यालयात पाच हजार रोपांची रोपवाटिका तयार करावी, स्थानिक प्रजातींच्या रोपांची प्राधान्यानं निर्मिती करावी, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातले कर्मचारी रमेश शिंदे यांना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या यशाबद्दल महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता सचिन तालेवार, आदींनी शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
सरकार लवकरच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स अभ्यासक्रमाचा शालेय अभ्यासक्रम लागू करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं. मुंबईत आज भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात जगाशी संपर्क साधण्याची गरज असून, या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही चंद्रा यांनी केली.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायनं काल दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेच्या शिफारशी जारी केल्या. अलीकडच्या दशकात सरकारने व्यवसाय सुलभ करण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं असल्याचं, दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. ट्राय ने २०२१ मध्ये दूरसंचार क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेवर एक मार्गदर्शक पत्रिका तयार केली होती. यात वापरकर्ता-अनुकूल, पारदर्शक आणि प्रतिसादात्मक डिजिटल एक खिडकी आधारित पोर्टल सुरू करण्याची शिफारस केली आहे. हे पोर्टल आंतर-विभागीय ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करण्याकरता नवीन डिजिटल तंत्रज्ञानासह सक्षम केलं जाईल, असं म्हटलं आहे.
****
भारतीय ओळखपत्र प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला आहे, हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.
****
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आज साजरा केला जात आहे. पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली त्यांची भूमिका यावर भर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. "अधिकारांचे भविष्य घडवणे: इतर सर्व मानवी हक्कांसाठी चालक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य" ही यंदाची पत्रकार स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ७२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सात हजात ६९८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४० हजार १७७ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के आहे.
****
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलट गणत��ला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगानं योग दिनाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार विभागानं काल “योग महोत्सव” आयोजित केला होता. आंतराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवस आधी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नाटक, पथनाट्य अशा माध्यमातून योगासनाचं सादरीकरण करण्यात आलं. सोलापूर, पालघर याठिकाणीही केंद्रीय संचार विभागानं अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
****
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगानं काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी मनपाचे वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांची बैठक घेतली. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत देशातल्या सगळ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरला चांगला क्रमांक मिळावा, या उद्दिष्टानं ही बैठक घेण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये नदी आणि नाल्यांची स्वच्छता, कचरा प्रक्रिया केंद्राचं व्यवस्थापन, कचरा संकलन, कचरा मुक्त शहर, सांडपाणी व्यवस्थापन, हेल्पलाईन, दंड आकारणी, सार्वजनिक शौचालयं, या मानकांवर गुण दिले जातील, अशी माहिती स्वच्छ भारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं आस्थापना कर लागू केल्यास शहरातले सगळे व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा व्यापारी प्रतिनिधींनी दिला आहे. या करासंदर्भातला व्यापाऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी लवकरच पालकमंत्री, सहकारमंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पारधी समाजातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाराशीव इथं काल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. धाराशीवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार हे शिबिर घेण्यात आलं. पारधी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला आणि इतर कागदपत्रं अद्ययावतत करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना मोहाली इथं पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यातल्या दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावं, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी गठीत विशेष कृतीदलाच्या बैठकीत पुणे इथं ते बोलत होते. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सराव प्रात्यक्षिकात आढळलेल्या त्रुटींचं तत्काळ निराकरण करावं. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावं, अशा सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिल्या.
***
गेल्या २४ तासात देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे १० हजार ११२ नवे रुग्ण आढळले. आणि ९ हजार ८३३ रुग्ण या आजारातून बरे झाले. सध्या देशात ६७ हजार ८०६ कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आणि रुग्ण बरे होण्याचा देशातला दर ९८ पूर्णांक ६६ दशांश टक्के आहे.
***
मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासप्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी येत्या १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणासंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. राज्य शासनाचा क्युरेटिव्ह पिटीशन - सुधारणा याचिका दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय हा वेळकाढूपणा असल्याचा सूर या बैठकीतून निघाला. कोणीही राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला छत्रपती संभाजीनगर इथं येण्यास भाग पाडावं, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
***
सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या जवळ असलेल्या कागद कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
***
छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
***
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, उद्या सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारत राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश करणार असल्याचं, या पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
***
इंडियन प्रीमिअर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे, दुपारी साडे तीन वाजता बंगळुरु इथल्या के एम चिन्नास्वामी मैदानावर सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतला अन्य सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जाईल.
***
तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत आज तिसऱ्या सुवर्णपदकासाठी पुरुष रिकर्व गटात भारत आणि चीन यांच्यात लढत होणार आहे. भारतीय संघात अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तरुणदीप राय या नेमबाजांचा समावेश आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार थोड्या वेळात म्हणजे दुपारी १ वाजून १० मिनिटांनी या लढतीची सुरुवात होईल. पुरुष रिकर्व एकल स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत भारताचा धीरज बोम्मादेवरा आणि मोल्दोवाचा डॅन ओलारु यांच्यात सामना होणार असून संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
***
नांदेड रेल्वे विभागातील आदिलाबाद इथून सुटणारी रेल्वेगाडी आदिलाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत दादर पर्यंतच धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्नानकावर काही दिवस घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉक मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
//************//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
ग्लोबल वॉर्मिंग - वैश्विक तापमानवाढ हे जगासमोरचं मोठं आव्हान असून, ही समस्या दूर करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचं उद्घाटन आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या पार्श्वभूमीवर आज हरित ऊर्जा तसंच शून्य कार्बन उत्सर्जनासाठी पंचायतींना पुरस्कार देताना, आपल्याला समाधान होत असल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याचा ��मृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं आजपासून २१ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा केला जात आहे. तर २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा केला जाईल. ‘पंचायतींचा संकल्पपूर्ती उत्सव’ या विषयावर परिषदांचं आयोजन मंत्रालयानं केलं आहे.
***
जी-20 कृषी मुख्य वैज्ञानिकांच्या बैठकीला आजपासून वाराणसी इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन झालं. भरड धान्याच्या बाबतीत जागतिक नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता असल्याचं, सिंह यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान, जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था कृती समूहाची दुसरी बैठक आजपासून हैदराबाद इथं, तर आरोग्य कृती गटाची दुसरी बैठक गोवा इथं सुरु झाली.
***
सामाजिक न्यायासाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता राज्यसभेतील विरोधीपक्षनेते तथा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली आहे. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये होऊ शकलेली नाही, ती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी खरगे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे. जातीनिहाय जनगणनेच्या अभावामुळे सामाजिक न्याय विभागाकडची माहिती अपुरी असल्याची शक्यताही खरगे यांनी वर्तवली आहे.
***
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरलं आहे. राज्यात देशातल्या सर्वाधिक सहा हजार ५९२ वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी दोन हजार ६६० प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती कृषी आयुक्तालयानं दिली आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना, २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी लागू करण्यात आली असून, 'एक जिल्हा, एक उत्पादन' या धर्तीवर ती राबवली जात आहे.
***
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेत, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी आज खारघर इथल्या रुग्णालयांत दाखल रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, सांस्कृतिक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीसेवकांना पाणी आणि सावलीसह आवश्यक सुविधा देणं ही आयोजकांची जबाबदारी होती, या सुविधा देणं शक्य नव्हतं, तर खुल्या मैदानावर कार्यक्रम घ्यायला नको होता, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. या आयोजनात योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही, याची चौकशी व्हायला हवी, असं मत पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, हा कार्यक्रम कडाक्याच्या उन्हात न ठेवता सायंकाळी घेण्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली नाही का, असा प्रश्न विचारला आहे. एका ट्विट संदेशात ठाकरे यांनी, भविष्यात अशा घटना होऊ नयेत, आणि प्रशासन अशा चुका करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे.
***
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतल्या दहापैकी आठ जागांवर प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार विजयी झाले. तर उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. नाट्य परिषदेच्या सोलापूर मंडळात नटराज पॅनलनं सर्व सहा जागा जिंकल्या आहेत.
***
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरु इथं रॉलय चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
***
हवामान-
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापासून तीन दिवस तुरळक ठिकाणी जोराचे वारे, वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भासाठी असाच इशारा एकोणीस आणि वीस एप्रिलसाठी देण्यात आला आहे.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
केंद्र सरकारच्या नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्रांचं वितरण
नागपूरमधील शांतीवन इथल्या संशोधन केंद्राचंही पंतप्रधानाच्या हस्ते आज लोकार्पण
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातली महाभरती रद्द झाल्यामुळे, सर्व उमेदवारांचं परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशुब महिंद्रा आणि प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन
आणि
महिला आशिया कुस्ती स्पर्धेत भारताच्या अंतिम पंघालची अंतिम फेरीत धडक, तर आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपर किंग्ज संघावर तीन धावांनी विजय
****
केंद्र सरकारच्या नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं नियुक्तीपत्रांचं वितरण होणार आहे. या उमेदवारांशी पंतप्रधान संवादही साधणार आहेत. भरती होणाऱ्या उमेदवारांना नव्यानं सुरू करण्यात आलेल्या कर्मयोगी प्रारंभ, या ऑनलाइन कामकाज परिचय अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण घेण्याचीही संधी मिळणार आहे.
मुंबईत होणाऱ्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे सहभागी होतील, तर नांदेडमध्ये केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील रोजगार मेळाव्यात नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रं प्रत्यक्ष सुपूर्द करतील.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत, ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बार्टी, सारथी, टी आर टी आय, महाज्योती या संस्थांच्यावतीने, पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांबाबत मुख्यमंत्री लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया स्वत: जाणून घेणार आहेत. आज सायंकाळी साडे चार वाजता दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातून ५० लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातून सहभागी होणार आहेत. आनंदाचा शिधा संचाचं वितरण, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी, शिवभोजन थाळी या योजनेतल्या लाभार्थ्यांशीही यावेळी संवाद साधण्यात येणार आहे.
****
ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्याची सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. सरकारनं फक्त घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी आग्रही मागणी, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात, नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यावर बोलत होते.
****
राज्याच्या अनेक भागात गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतांना, सरकार मात्र नुकसानग्रस्त भागात वांझोट्या भेटी आणि घोषणा करत असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आपण नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, दानवे यांनी काल निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी करत दानवे यांनी, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि फळबागांसाठी एक लाख रुपये प्रति हेक्टर देण्याची मागणी सरकारकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी येत्या १९ तारखेला विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात सक्तवसुली संचालनालय -ईडीनं न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याचं समोर आलं आहे. मात्र, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी निगडीत जरंडेश्वर साखर कारखाना स्पार्कलिंग सॉईल लिमिटेड कंपनीचं नाव आरोपपत्रात आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
****
राज्यात जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ मधल्या विविध १८ संवर्गातल्या रिक्त पदांच्या महाभरतीची प्रक्रिया रद्द झाल्यामुळे, या परीक्षेला अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना, त्यांचं परीक्षा शुल्क परत दिलं जाणार आहे. यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात एकूण शुल्कापैकी ६५ टक्के रक्कम ही सर्व जिल्हा परिषदांकडे वर्ग केली आहे. मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेली ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे रद्द करण्यात आली होती.
****
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात परवा झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत आघाडीची भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली असून, काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
****
महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत, त्यामुळेच आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी भक्कम असून, कसलेही मतभेद नाहीत, आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होणार असल्याचं, पटोले यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविडचे एक हजार ११५ नवे रुग्ण आढळले, तर नऊ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला. राज्यात सध्या कोविड संसर्ग झालेले पाच हजार ४२१ सक्रीय रुग्ण आहेत. मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक १२४ सक्रीय रुग्ण आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८३, नांदेड २६, लातूर २१, बीड १९, तर हिंगोली जिल्ह्यात कोविडचा एक रुग्ण आहे. परभणी जिल्ह्यात सध्या एकही सक्रीय रुग्ण नसल्याचं, आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
कांदा अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत या विषयावर बैठक घेऊन, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्याचं, आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांच्या अनुषंगानं आज तुळजापूर महसूल मंडळामध्ये प्रायोगिक तत्वावर तलाठी तसंच कृषी सहाय्यक प्रत्यक्ष गावांना भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. मुख्यमंत्री परवा धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करून, ई पीक पाहणीची अट शिथील करण्याची मागणी केली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा इथल्या वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला दोन लाख रूपये दंडासह कारवाईचे आदेश, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने, महाविद्यालयास दोषी ठरवलं आहे. दंडाची रक्कम सात दिवसांत न भरल्यास त्यावर १० टक्के व्याज आकारण्यात यावं, संपूर्ण दंड वसूल झाल्याशिवाय महाविद्यालयातल्या विद्यार्थांचे निकाल घोषित करु नये, तसंच पुढील आदेशापर्यंत या केंद्रावर विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा घेऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, आगामी काळात शैक्षणिक लेखापरीक्षण, महाविद्यालयाचं संलग्निकरण, परीक्षा या कोणत्याही बाबतीत बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुलगुरू येवले यांनी महाविद्यालयांना दिला आहे.
****
स्वच्छ भारत मिशनच्या ग्रामस्तरावरील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामं वीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, नरेगा आणि जलजीवन मिशन या विषयाचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. १४१ गावांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देवून, अद्याप सुरु न झालेली कामं तात्काळ सुरु करावीत, तसंच सार्वजनिक शौचालयाची कामंही वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
****
वडीलांना धक्काबुक्की करुन घराबाहेर काढल्याप्रकरणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या भावाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आत्याला घरी येऊ दिल्याच्या कारणावरुन वादावादी होऊन आमदार क्षीरसागर यांनी आपल्याला घराबाहेर काढल्याची तक्रार त्यांचे वडील रविंद्र क्षीरसागर यांनी बीड शहरातल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली, त्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
****
सरकारनं शिक्षण क्षेत्रावरती खर्च वाढवावा, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य असल्याचं, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ.भालचंद्र कानगो यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर इथं रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. शिक्षण व्यवस्थेतला बदल चिंताजनक असून, सर्वसामान्य नागरीक शिक्षणापासून लांब जात असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. खाजगीकरण तसंच व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षण घेणं अवघड होईल, अशी भीती कानगो यांनी व्यक्त केली.
****
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशुब महिंद्रा यांचं काल मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं, ते ९९ वर्षांचे हेाते. केशुब महिंद्रा हे १९६३ ते २०१२ पर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. त्यांनी २०१२ मध्ये त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे समूहाचा कार्यभार सोपवला. पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. १९८७ मध्ये, केशुब महिंद्रा यांना फ्रेंच सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्��ानानं गौरवण्यात आलं होतं.
****
प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजाराने निधन झालं, त्या ७९ वर्षांच्या होत्या. 'तमस' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या उत्तरा बावकर यांनी, अनेक मराठी, हिंदी चित्रपट तसंच दूरचित्रवाणी मालिकांतून विविध भूमिका साकारल्या. त्यांना अभिनयासाठी १९८४ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तर एक दिन अचानक या चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरायण, वास्तुपुरुष, दोघी, तक्षक, एक दिन अचानक, संहिता, आजा नचले, शेवरी, डोर आदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका, रसिकांच्या स्मरणात आहेत.
****
महाराष्ट्र विकास सेवा या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सर्व कामं करण्यास नकार दिला आहे. याबाबातचं निवेदन संघटनेच्या वतीनं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना नुकतचं देण्यात आलं. संघटनेच्या विविध मागण्यांबाबत कोणताही निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला नसल्यानं, ही भूमिका घेतल्याचं, संघटनेनं म्हटलं आहे.
****
नागरिकांनी आपल्या पाल्यांचे शाळाप्रवेश करताना, शाळांना मान्यता असल्याची खातरजमा करून घ्यावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्र जारी केलं. शाळांची सरकारी मान्यता तसंच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई सोबतची संलग्नता पालकांनी तपासून घेण्याची सूचना या पत्रातून करण्यात आली आहे.
****
महिला आशिया कुस्ती स्पर्धेत भा���ताच्या अंतिम पंघालनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. ५३ किलो वजनी गटाच्या काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात तिनं उज्बेकिस्तानच्या कुस्तीपटुचा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना जपानच्या अकारी फुजिनामी विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या इतर कुस्तीपटू मनिषा, रितिका आणि सोनम मलि�� आज कांस्य पदकासाठी खेळणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्जचा तीन धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या संघानं विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं लक्ष्य पार करताना चेन्नईचा संघ निर्धारित षटकात १७२ धावाच करु शकला.
****
हवामान
मराठवाड्यात आजपासून ते १५ एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत, तर उद्या जालना वगळता इतर सगळ्या जिल्ह्यांत आणि पंधरा तारखेला नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात हवामान विभागातर्फे उद्या आणि परवा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल सायंकाळी पाऊस पडला. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
****
0 notes
Text
वडिलांच्या शिकण्यामुळे एन श्रीनिवासन एमएस धोनीला विकत घेऊ शकले, चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाने सांगितले आयपीएल अंकगणित काय आहे
वडिलांच्या शिकण्यामुळे एन श्रीनिवासन एमएस धोनीला विकत घेऊ शकले, चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाने सांगितले आयपीएल अंकगणित काय आहे
एन. चेन्नई सुपर किंग्स, श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्सच्या मालकीच्या फ्रेंचायझीने 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावात महेंद्रसिंग धोनीला $1.5 दशलक्षमध्ये विकत घेतले. दक्षिण भारतातील आघाडीच्या सिमेंट कंपनीने भारताचा तत्कालीन पोस्टर बॉय आणि ODI संघाचा कर्णधार आणि भारताला ICC T20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीसाठी सर्वाधिक बोली लावली होती. स्पोर्टस्टारच्या पहिल्या…
View On WordPress
#CSK#CSK बातम्या#आयपीएल#आयपीएल 2008 लिलाव#इंडियन प्रीमियर लीग#एन श्रीनिवासन#एमएस धोनी#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#चेन्नई सुपर किंग्ज#धोनी#धोनी आयपीएल#धोनी आयपीएल 2008#धोनी लिलाव#धोनीचा लिलाव
0 notes
Text
IPL: सर्वाधिक प्लेऑफ खेळणाऱ्या चार संघांपैकी तीन संघ बाहेर, फक्त त्यांना प्रवेश मिळाला
IPL: सर्वाधिक प्लेऑफ खेळणाऱ्या चार संघांपैकी तीन संघ बाहेर, फक्त त्यांना प्रवेश मिळाला
सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणे: IPL 2022 चा 15 वा सीझन लवकरच संपणार आहे. रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. यानंतर मंगळवारपासून प्लेऑफचे सामने सुरू होतील. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यापैकी आरआर हा एकमेव संघ आहे ज्याने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. एलएसजी आणि जीटी पहिल्यांदाच खेळत…
View On WordPress
#CSK#MI#आयपीएल#आयपीएल २०२२#आयपीएल २०२२ प्लेऑफ#आयपीएल प्लेऑफ यादी#आरसीबी#इंडियन प्रीमियर लीग#ईडन गार्डन्स#केकेआर#कोलकाता नाईट रायडर्स#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#चेन्नई सुपर किंग्ज#ताजी बातमी#ताज्या क्रिकेट बातम्या#बहुतेक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणे#मुंबई इंडियन्स#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#हिंदी बातम्या
0 notes