#समिती स्थापन केली
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर-मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश-भोकरमधून श्रीजया चव्हाण तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी 
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका
कळमनुरीचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार
आणि
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड अजिंक्य-बंगळुरू कसोटीतही न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे,
जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर ��ाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण,
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा,
 निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस,
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीश महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कुलाबामतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं आणि जिथे आपला उमेदवार उभा नसेल, तिथे जो उमेदवार बॉण्डपेपरवर आपल्या मागण्यांना समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईत बैठक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाच�� राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघटनेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतरही अनेक पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
Byte…
माजी आमदार कपिल पाटील यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 
**
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
**
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाड��तील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
**
बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काल भारतीय जंतापक्षातुन बाहेर पडत असल्याचं  काल जाहीर केलं. आपली पुढची राजकीय दिशा लवकरच स्‍पष्ट करु, असं मस्के यांनी सांगीतलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ काल करण्यात आली. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
लातूर इथंही काल ही प्रक्रिया पार पडली, जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १८  ऑक्टोबर रोजी कळमनुरी इथं  कार्यकर्त्यांना संबोधित करताना मतदारांना आमिष दाखवण्या��ा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुत्ते यांनी बांगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या, उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. न्यूझीलंडची अमेलिया कीर ही सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विजयासाठी ठेवलेलं १०७ धावांचं माफक आव्हान पाहुण्या संघानं केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
****
परभणी इथं कालपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
१४ वर्षाखालील मुले मुली यांच्यातल्या या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २०० खेळाडू सहभागी झाल्याचं क्रीडा अधिकारी कविता लावंदे यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांनी त्याची तक्रार करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत  येणाऱ्या मंदिर अर्चक पुरोहित आसामच्या वतीने काल शहरातील धार्मिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात शहरातील विविध संस्था,  संघटना तसंच उपासना मंडळाचे १६०० पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. काल सकाळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
UAPA कायदा म्हणजे जिवंत माणसाला गळफास लावणे
तीन वर्षात 5922 लोकांना ठरवले गेले देशद्रोही -
....
संविधान कलम 19 म्हणतो कि, भारतातील लोकांना विनाशस्त्र एकत्र येऊन संघटना स्थापण्याचा आणि ती चालवण्याचा पूर्ण अधिकार असेल. त्यामुळे संविधानाला विरोध करण्यासाठी UAPA कायदा आणण्यात आला कि ज्यामुळे सत्तेला विरोध होत असतांना, सत्ता जर डगमगू लागली तर लोकांचे आवाज दडपून त्यांचा गळा बंद करता आला पाहिजे. हा कायदा घटनेच्या कलम 19 नुसार प्रदान केलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध लादत आहे. सन 2019 मध्ये या कायद्यांतर्गत विविध सुधारणा करण्यात आल्या ज्याने या कायद्यात काही कठोर तरतुदी जोडल्या.
पुढील बाबी नव्याने या साठी कायद्यात अंतरभूत केली गेली कि, भीमा कोरेगाव दंगलीतील विनाकारण फसविल्या गेलेल्या संशयित लोकांनी कायद्यात राहून स्वतःचा बचाव करायला उतरू नये म्हणून ही नवीन तरतूद केली गेली.
याच पार्श्वभूमिवर 2019 ला या कायद्यात खालील बदल केले गेले ज्याद्वारे टार्गेट लोकांना देशद्रोही नक्षलवादी घोषित करता येईल, हा त्या मागचा मुख्य मकसद होता. सुधारित तरतुदींच्या माध्यमातून महानगरांमध्ये आणि शहरी भागात काम करणाऱ्या अशा विचारवंतांच्या विरोधातही कारवाई केली जाईल, जे तरुणांना दहशतवादी आणि विध्वंसक कृतीत गुंतविण्यास उद्युक्त करतात असा इशारा दिला गेला.
या दुरुस्तीमुळे एखाद्या व्यक्तीला केवळ योग्य प्रक्रिया आणि पर्याप्त पुराव्यांच्या आधारे दहशतवादी घोषित करण्याची परवानगी मिळाली आणि भीमाकोरेगाव नंतर अख्खीच्या अख्खी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आतंकवादी व नक्षलवादी घोषित केली गेली.
या कायद्यानुसार UAPA हा कायदा तयार करण्याचे उद्दीष्ट म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वासाठी आणि अखंडतेसाठी धोकादायक असलेल्या कारवायांना आळा घालणे असा असून त्याची वास्तविकता मात्र वेगळीच आहे. तथाकथित सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या नावाखाली नागरिकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि त्यांना त्या स्वातंत्र्यापासून दूर ठेवून त्यांना दहशदवादी व नक्षलवादी घोषित करून त्यांचं संपूर्ण आयुष्य कारागृहात काढायला लावणे असा आहे.देशातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार रक्षणकर्ते, दलितबहुजन चालवळीशी संबधित लोक, पत्रकार, वकील, स्कॉलर, सांस्कृतिक कर्मी, कवी, कलावंत यांच्यावर कसलेली बुढ नसलेले आरोप करत सरकार जे लोकांना UAPA लावून कारागृहात टाकत आहे, त्यामुळेच सध्या देशातील नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक उच्च न्यायालये नागरिकांवर अन्याय होऊ नये म्हणून सक्रिय हस्तक्षेप करीत आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो-एनसीआरबी, 2018 च्या आकडेवारीच्या आधारे गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूएपीए अंतर्गत सन 2017 मध्ये शिक्षा होण्याचे प्र��ाण 49.3% होते, तर 2015 मध्ये ��ा दर 14.5 % होता. म्हणजेच फक्त दोन वर्ष्यात लोकांना दहशदवादी आणि नक्षलवादी घोषित करण्याचे प्रमाण 34% वाढले कि, ज्याचा सामान्य माणूस
विचारच करू शकत नाही. सन 2018 मध्ये UAPA अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींची संख्या 1421 होती. 2016 ते 2019 दरम्यान भारतातील 5922 लोकांना या तीनच वर्ष्यात नक्षलवादी आणि दहशदवादि घोषित केले गेले. हा आकडा येत्या शंभर वर्ष्यातील सर्वोच्च आकडा होता.
1) एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित केल्यास ती व्यक्ती गृहसचिवांकडे अपील करू शकते. गृहसचिवांनी 45 दिवसांच्या आत अपिलाबाबत निर्णय घ्यावा लागतो पण असा कोणताच अधिकार भीमाकोरगाव आणि जेएनयु संशयिताचा मान्य करण्यात आला नाही, कायदा फक्त नावापुरता ठेवला गेला आणि त्यातील हक्क डावलून टाकण्यात आले.
2) या कायद्यांतर्गत शासन पुनर्विचार समिती स्थापन करेल. या समितीचे अध्यक्ष सध्याचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. असं कायद्यात म्हटलं गेलं होत. पण सरकारला मानवाधिकार, पत्रकार आणि अंतराष्ट्रीय स्तरावरून असा दवाब येऊन सुद्धा सरकारणे पुनर्वीचार करणारच नाही अशी भूमिका घेतली आणि हजारो बुद्धीजीवी लोकांचं आयुष्य बरबाद करून टाकलं.
3) कोविड महामारी संपूर्ण जगात पसरली असतांना, 33% लोक एकट्या भारतातुन मृत्युमुखी पडले असतांना, तरुंगात शेकडो कैदी करोनाने मृत्यू पावले असतांना आणि हजारो लोकांना तरुंगात करोना झाला असतांना, सरकारने कैदयेतील लोकांकडून हमीपत्र घेऊन त्यांना जामीनवरून सोडून त्यांची देखभाल करण्याची जिम्मेदारी त्यांच्या रक्त्याच्या नातेवाईकला द्यायला हवी होती.
- वैभव वैद्य....
0 notes
marathibatmi11 · 2 years ago
Text
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वाल��र प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारने पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून एक समन्वय समिती स्थापन केली असून महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुला-मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवण्याचे काम ही समिती करणार आहे. जर मुली लग्नासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारने पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून एक समन्वय समिती स्थापन केली असून महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुला-मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवण्याचे काम ही समिती करणार आहे. जर मुली लग्नासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारने पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून एक समन्वय समिती स्थापन केली असून महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुला-मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवण्याचे काम ही समिती करणार आहे. जर मुली लग्नासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन द���खील करण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारने पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून एक समन्वय समिती स्थापन केली असून महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुला-मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवण्याचे काम ही समिती करणार आहे. जर मुली लग्नासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारने पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून एक समन्वय समिती स्थापन केली असून महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुला-मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवण्याचे काम ही समिती करणार आहे. जर मुली लग्नासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारने पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून एक समन्वय समिती स्थापन केली असून महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुला-मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवण्याचे काम ही समिती करणार आहे. जर मुली लग्नासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, भोकर मधून श्रीजया चव्हाण, फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करण्याची मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भूमिका
कृषी उत्पादनांचा भाव आणि बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती
आणि
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडचा भारतावर आठ गडी राखून विजय, मालिकेत एक - शून्य अशी आघाडी
****
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवादी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे, जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकर मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा, निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीष महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबार हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कोलाबा मधून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, तसंच इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्याला मतदान करावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की निवडणूक लढवायची, याबाबत निर्णय घेण्यासाठी आज अंतरवाली सराटी इथं निर्णायक बैठक पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. जिथे आपला उमेदवार उभा करणार नाही, तिथे जो उमेदवार ५०० रुपयाच्या बॉण्डवर आपल्याला समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करायचं, तसंच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचं, अशी भूमिका जरांगे यांनी जाहीर केली. कोणत्या मतदारसंघात मराठा समाजाची ताकद आहे, हे तपासणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघटनेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा प्रवेश केल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
****
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज भाजपला सोडचिट्ठी देत असल्याचं जाहीर केलं. आज वार्ताहरांशी बोलताना त्यांनी पुढची राजकीय दिशा लवकरच जाहीर करु, असं सांगितलं.
****
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ आज करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हानिवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या सात मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एक प्रवाशाकडून सुमारे आठ किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून, या गांजाची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाश्याने हा गांजा खेळणी आणि अन्नपदार्थांच्या डब्ब्यात लपवला होता. या व्यक्तीला अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याखाली अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत बोलत होते. शेतकरी आपला भाजीपाला पाच रुपये किलो भावानं विकतात आणि किरकोळ बाजारात मात्र तो ५० रुपये किलो भावानं विकला जातो, ही तफावत कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. या रेल्वेंमध्ये वातानुकूलित, ��यनयान आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात पुन्हा उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ठेवलेलं १०७ धावांचं माफक आव्हान या संघानं केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. पहिल्या डावात वेगवान शतकी खेळी करून न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचणाऱ्या आणि दुसऱ्या डावात नाबाद राहात विजय मिळवून देणाऱ्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रला सामनावीराचा किताब मिळाला.
न्यूझीलंडने तब्बल साडेतीन दशकांनंतर भारताला भारतात पराभूत केल्यानं न्यूझीलंडसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. यापूर्वी १९८८ मध्ये न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता.
****
नांदेड इथं तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी क्रीडा संकुलात सुरू या स्पर्धेत चौदा -सतरा- एकोणवीस वर्षाखालच्या वयोगटातले राज्यभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. मतदार जनजागृतीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धेतल्या खेळाडूंसह नव मतदारांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचं आज पहाटे पुण्यात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. बोरगावकर यांनी लातूर, बीड, धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज तुळजापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांना त्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागिय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्री कोसळलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
किती जणांनी आंतरजातीय व आंतरधर्मिय केले विवाह, सरकार माहिती गोळा करणार
किती जणांनी आंतरजातीय व आंतरधर्मिय केले विवाह, सरकार माहिती गोळा करणार
किती जणांनी आंतरजातीय व आंतरधर्मिय केले विवाह, सरकार माहिती गोळा करणार मुंबई – महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची आणि त्यात सहभागी असलेल्या कुटुंबांची माहिती गोळा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने मंगळवारी या संबंधातील अधिसूचना जारी केली. त्यात आहे की ही आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह-कौटुंबिक समन्वय समिती महिला आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
सोनीपत न्यूज: ट्रॅक्टर परेडनंतर बेपत्ता झालेल्या शेतकर्‍यांच्या शोधासाठी समिती गठीत - ट्रॅक्टर परेड: बेपत्ता शेतकर्‍यांना शोधण्यासाठी समिती, आज युनायटेड मोर्चा पुढील रणनीती तयार करेल
सोनीपत न्यूज: ट्रॅक्टर परेडनंतर बेपत्ता झालेल्या शेतकर्‍यांच्या शोधासाठी समिती गठीत – ट्रॅक्टर परेड: बेपत्ता शेतकर्‍यांना शोधण्यासाठी समिती, आज युनायटेड मोर्चा पुढील रणनीती तयार करेल
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडपासून बेपत्ता झालेल्या शेतक for्यांचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे, जेणेकरून समिती कोणत्याही माहितीवर समन्वय साधेल आणि त्यावर पुढील कार्यवाही करू शकेल. त्याचबरोबर आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी संयुक्त किसान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
२९ मोबाईलमध्ये पेगासस आढळले नाही
Tumblr media
५ फोनशी मालवेअरची छेडछाड, सुप्रीम कोर्टाच्य समितीचा अहवाल नवी दिल्ली : देशभर खळबळ माजवणा-या इस्त्राईलच्या स्पायवेअर पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर पेगासस आढळून आले नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईलचे परीक्षण केले असल्याची माहिती समितीच्या अहवालात मांडण्यात आली. मात्र, २९ पैकी ५ फोनशी मालवेअरद्वारे छेडछाड झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. मात्र, ती छेडछाड पेगासस किंवा कोणत्या स्पायवेअरद्वारे करण्यात आली हे अहवालात नमूद करण्यात आले नाही. सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. रविंद्रन यांच्या समितीने गेल्या महिन्यात अहवाल सादर केला. देशातील ३०० ना��रिकांच्या फोनची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये राजकीय नेते, सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. समितीचा अहवाल ३ भागात सादर करण्यात आला आहे. स्पायवेअरची छेडछाड झाली की नाही तपासण्यासाठी घेण्यात आलेल्या फोनच्या डिजीटल इमेजेस, तांत्रिक समितीचा अहवाल आणि न्यायमूर्ती रविंद्रन यांचा अहवाल असे त्याचे स्वरुप आहे.काही मालवेअरचा गैरवापर करुन नागरिकांच्या सुरक्षेशी आणि त्यांच्या गोपनियतेशी खेळ केला जात असल्याचे निरीक्षणदेखील समितीने नोंदवले आहे. मालवेअरच्या वापरावरील नियंत्रणासाठी समितीने सूचना केल्या आहेत. त्यासाठी काही कार्यपद्धती देखील मांडण्यात आल्या आहेत. गोपनियतेच्या अधिकाराचे संरक्षणही झाले पाहिजे देशाच्या सायबर सुरक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासोबत नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचेदेखील संरक्षण झाले पाहिजे, असेदेखील समितीने म्हटले आहे. अनधिकृतपणे निरीक्षण ठेवले जाण्यापासून नागरिकांचे संरक्षण केले जावे, अशा सूचना समितीने दिल्या आहेत. सायबर हल्ले आणि सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास यंत्रणा निर्माण करण्याची गरज समितीने मांडली आहे. देशाच्या सायबर सुरक्षा यंत्रणेला मजबूत करण्याची शिफारस समितीने केली आहे. Read the full article
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
लातूर दि. 21 ( जिमाका ) :- शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढी पर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून,ती लवकरच यावर उपाययोजनेसाठी योग्य तो निर्णय देईल. हे एन डी आर एफ च्या कक्षेत बसत नसले तरी केंद्राकडे पाठपुरावा करु तसेच पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत कसे बसवता येईल आणि…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
लातूर दि. 21 ( जिमाका ) :- शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढी पर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून,ती लवकरच यावर उपाययोजनेसाठी योग्य तो निर्णय देईल. हे एन डी आर एफ च्या कक्षेत बसत नसले तरी केंद्राकडे पाठपुरावा करु तसेच पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत कसे बसवता येईल आणि…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र | महात्मा बसवेश्वरांच्या स्मारक समितीची नव्याने स्थापना करण्याची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र | महात्मा बसवेश्वरांच्या स्मारक समितीची नव्याने स्थापना करण्याची मागणी
सोलापूर : सोलापुरातील (Solapur) नव्याने स्थापन झालेल्या महात्मा बसवेश्वरांच्या (Mahatma Basaweshwar) स्मारक समितीवरुन आता नवा वाद समोर आला आहे. राज्य सरकारने 11 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला आता विरोध करण्यात आलाय. या समितीत पालकमंत्र्यांना डावलण्यात आले आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जात होती. पालकमंत्री हे जिल्ह्याचे प्रमुख…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
बीएसईबीने मॅट्रिक परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, जर तुम्ही असे केले तर तुम्हाला केंद्रात प्रवेश मिळणार नाही
बीएसईबीने मॅट्रिक परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, जर तुम्ही असे केले तर तुम्हाला केंद्रात प्रवेश मिळणार नाही
बीएसईबी 10वी परीक्षा मार्गदर्शक तत्त्वे: बिहार शालेय परीक्षा समिती (BSEB) द्वारे आयोजित वार्षिक माध्यमिक परीक्षा 2022 ही 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाईल. वेळापत्रकानुसार, परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9:30 ते 12:45/12.15 पर्यंत आणि दुसरी शिफ्ट दुपारी 1:45 ते 5:00/4:30 पर्यंत असेल. परीक्षेसाठी पाटणामध्ये एकूण 74 केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यापैकी पाटणा सदर उपविभागात 33, पाटणा…
View On WordPress
0 notes