Tumgik
#वापरल्या”
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप मुंबई : ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanajy Raut) यांनी शिंदेगटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. ज्या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया यंत्रणा लावणं हा समस्त महिलावर्गाचा अपमान आहे. महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून ही सुरक्षा फुटीर आमदारांसाठी वापरली जातेय, मिंदेगट लोकांशी…
View On WordPress
0 notes
aissmseducation · 2 months
Text
इंजिनियरिंग ड्रॉइंग म्हणजे इंजिनियर्सची भाषा!
Tumblr media
Author– श्री. अनिलकुमार अर्जुन देसले
(इंजिनियरिंग ड्रॉइंग निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनियरिंग ड्रॉइंग. थोडक्यात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही इंजिनियर्सची भाषा असते. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, संकल्पना, भावना हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे साधन होय. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात; परंतु तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी चित्रकला ही संकल्पना उपयोगात आणून एका व्यक्तीकडून विविध विचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहचवणे सहजरित्या शक्य होते. म्हणूनच, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपल्या संकल्पनांचे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली; त्या पद्धतीलाच ‘इंजिनियरिंग ड्रॉइंग’ असे म्हणतात.
मोटारगाडी, रेल्वे, विमान, घडयाळ इ. प्रकारची अनेक यंत्रे तसेच या यंत्रांचे वेगवेगळे भाग निरनिराळ्या ठिकाणी तयार होतात. हे तयार करणाऱ्या कामगाराला/कारागिराला यंत्राची किंवा यंत्राच्या विशिष्ट भागांची माहिती तोंडी सांगणे शक्य आणि सोईचेही नसते. त्यामुळे अभियंता त्या यंत्राचे किंवा विशिष्ट भागांचे प्रमाणबद्ध चित्र काढून कामगाराला/कारागिराला देत असतो. प्रमाणबद्ध चित्रावरून कामगाराला/कारागिराला यंत्राची तसेच यंत्राच्या भागांची व्यवस्थित कल्पना येते आणि त्यातून निर्मिती सहज शक्य होते. याच कारणामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करण्यासाठी प्रत्येकाला इंजिनियरिंग ड्रॉइंग या विषयी सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे.
साधारणत: इंजिनियरिंग ड्रॉइंगमध्ये कुठल्याही यंत्राचे तसेच यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे चित्र रेखाटून त्यात लांबी, रुंदी, उंची इत्यादिपासून ते वापरण्याची जागा, वापरला जाणारा धातू, रंग, वजन या सर्व बाबींची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच यंत्रनिर्मिती प्रक्रिया व काही काळानंतर त्या यंत्राची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. उदा. मोटार वाहनाची निर्मिती ते गॅरेजमध्ये होणारी दुरुस्ती त्याचबरोबर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, हाऊस वायरिंग, पाणी पुरवठा/गॅस पुरवठा या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया व दुरुस्ती सहज होते.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने निर्���ितीचा वेग वाढविण्यात इंजिनियरिंग ड्रॉइंगचा मोठा वाटा आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून प्रत्येक यंत्राच्या तसेच यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती प्रक्रिया, दुरुस्ती यामध्ये लागणारा वेळ कमी होऊन उत्पादन वाढीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.
वरील मांडलेल्या सर्व गोष्टींचा बारकाई अभ्यास व विचार केल्यास लक्षात येते, की इंजिनियरिंग ड्रॉइंग एक महत्त्वाचा विषय असून त्याची इत्यंभूत माहिती व ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंग हा इंजिनियर्सचा आत्मा आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
Source: https://aissmsitcboribhadak.org/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3/
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
२५ वा कारगिल विजय दिवस देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा
गौरी गणपतीनिमित्त राज्यात १ कोटी ७० लाखावर नागरिकांना आनंदाचा शिधा
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून तीन दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन
आणि
बांग्लादेशचा दारूण पराभव करत भारतीय महिला संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल
****
२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्यदलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी, कारगील युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे.
****
कारगिलमध्ये २५ वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल मधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर ते बोलत होते. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत, त्यांचे शौर्य कायम स्मरणात ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाच�� सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा सैनिकांचं त्यांनी स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही या युध्दातल्या हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगील युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह तीन वीर मातांचा तसंच सहा वीर पत्नींचा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा दिला. 
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं सांगितलं.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून झाली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलतांना, केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं सांगितलं. त्यापूर्वी राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी, हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिन्थेटिक रंग, सिन्थेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. तर खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधलं.
****
सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता.
लोकसभेत त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा झाली, काही सदस्यांनी अशासकीय विधेयकं सादर केली, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या, बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या गैरसरकारी विधेयकाचा समावेश आहे. राज्यसभेत सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.
****
यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या  या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती न्यायालयात केली असल्याचं, पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर दोन विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला धरणातून विसर्गासंदर्भात पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी समन्वय साधावा आणि यापुढे अशी दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते  बोलत होते.
दरम्यान, पुण्यातल्या पूरग्रस्त भागातील घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची, महापालिका  तसंच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीनं युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचं तसंच शेतीच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखं चित्र आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. चित्रकार शैलेश आचरेकर यांनी सहा महिन्यांच्या प्रयत्नातून हे चित्र साकारलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना ते भेट देण्यात आलं.
****
लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी आज दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर - कुर्डूवाडी- टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून ‘तरंग, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तीन दिवसीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं २९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांत हा मेळावा होणार आहे.
****
भारतीय महिला संघाने आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेश संघाचा दणदणीत पराभव केला. बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, निर्धारित २० षटकांत आठ बाद ८० धावा केल्या. भारतीय संघाच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं हे लक्ष्य अवघ्या ११ षटकांत साध्य केलं. चार षटकांपैकी एक षटक निर्धाव देत  १० धावांच्या बदल्यात तीन बळी घेणारी रेणुका सिंग प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना सध्या श्रीलंका आणि पाकिस्तानच्या संघात सुरू आहे. यामध्ये जिंकणाऱ्या संघासोबत भारतीय संघाचा परवा रविवारी अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री ११ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून, अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू करणार आहेत.
****
नांदेड महापालिकेने पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं
****
जालना शहरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
mahavoicenews · 7 months
Text
प्रमुख मराठी लोगो: सांस्कृतिक ओळख आणि अभिमानाचे प्रतीक
प्रमुख मराठी लोगो हे एक प्रतिष्ठित चिन्ह आहे जे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मराठी भाषिक समुदायाची भाषिक ओळख दर्शवते. क्लिष्ट तपशील आणि दोलायमान रंगांसह डिझाइन केलेला, हा लोगो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधता, इतिहास आणि परंपरा यांचे सार दर्शवतो.
प्रमुख मराठी लोगोमध्ये मराठी संस्कृतीत महत्त्व असणारे अनेक घटक आहेत. तिच्या केंद्रस्थानी देवनागरी लिपी आहे, जी मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. मराठी साहित्य आणि कवितेची अभिजातता आणि सुसंस्कृतपणा प्रतिबिंबित करणारी स्क्रिप्ट सुंदर शैलीत आहे.
देवनागरी लिपीभोवती पारंपारिक मराठी आकृतिबंध आणि चिन्हे आहेत, जसे की कमळाचे फूल, आंब्याची पाने आणि मोराची पिसे. ही चिन्हे मराठी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत आणि समृद्धी, शुभ आणि सौंदर्य यासह विविध अर्थ धारण करतात.
प्रमुख मराठी लोगोचे रंग पॅलेट अभिमान, उत्कटता आणि एकतेच्या भावना जागृत करण्यासाठी काळजीपूर्वक निवडले आहे. भगवा, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या दोलायमान छटा अनुक्रमे धैर्य, वाढ आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून वापरल्या जातात, तसेच भारतीय राष्ट्रध्वजाला आदरांजली वाहतात.
प्रमुख मराठी लोगो केवळ दृश्य प्रतिनिधित्वापेक्षा अधिक काम करतो; हे सांस्कृतिक अस्मितेचे आणि मराठी भाषिक समुदायासाठी अभिमानाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हे मराठी लोकांच्या लवचिकता, सर्जनशीलता आणि लवचिकतेला मूर्त रूप देते, ज्यांनी भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिदृश्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
लोगो सरकारी कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध संदर्भांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केला जातो. तिची उपस्थिती मराठी भाषा, साहित्य, कला आणि परंपरांना साजरी आणि प्रोत्साहन देते, जगभरातील मराठी भाषिकांमध्ये आपुलकी आणि एकतेची भावना वाढवते.
शिवाय, प्रमुख मराठी लोगो वेगाने बदलणाऱ्या जगात भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे व्यक्तींना त्यांच्या मुळांचा अभिमान बाळगण्यासाठी, त्यांचा वारसा स्वीकारण्यासाठी आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रोत्साहित करते.
शेवटी, प्रमुख मराठी लोगो हे केवळ प्रतीकापेक्षा बरेच काही आहे; हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक टेपेस्ट्रीचा आणि तेथील लोकांच्या चिरस्थायी भावनेचा पुरावा आहे. हा प्रतिष्ठित लोगो स्वीकारून आणि त्याचा उत्सव साजरा करून, मराठी भाषिक समुदाय पुढील पिढ्यांसाठी आपली खास ओळख आणि वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.
अधिक माहितीसाठी:-
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
rajnandanibansal · 1 year
Text
youtube
आधुनिक शेतीमुळे अनेक शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यास मदत झाली आहे. आमचे आणखी एक प्रयोगशील शेतकरी, श्री गणेश जाधव यांचेही असेच आहे, ज्यांनी पॉली हाऊस शेती सुरू केली जी त्यांच्या अंजीर लागवडीसाठी ग्रीनहाऊस फार्मिंग म्हणून ओळखली जाते. शेतातील उत्पादनाचा दर्जा सुधारण्याची त्यांची आकांक्षा होती आणि त्यांना पॉलीहाऊस शेती करण्याचा प्रयत्न करण्याची कल्पना सुचली जी यशस्वी ठरली. त्यांनी ह्या कल्पनेला कसे रुजवले आणि प्रयत्नात आणले, कोणती मदत घेतली, हरितगृह शेतीमुळे त्यांच्या अंजीर लागवडीचा दर्जा कसा सुधारला, पॉलीहाऊस शेतीमुळे फायदेशीर ठरणारे घटक कोणते आहेत, रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याच्या लागवडीसाठी खत देण्यासाठी त्यांनी कोणत्या पद्धती वापरल्या, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. आणि दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृह शेतीने कसे यशस्वी परिणाम दिले जाणून घ्या. Modern agriculture has helped a lot of farmers to grow the quality and quantity of agricultural products. The same goes for another one of our experimental farmers, Mr. Ganesh Jadhav who started poly house farming which is generally known as Greenhouse Farming for his Fig plantation. He aspired to improve the quality of his farms and products and came across the idea of trying poly house farming which turned out to be a success. Watch this video to know, how he learned and inculcated the idea, what assistance he acquired, how #greenhousefarming improved the quality of his fig plantation, what factors are profitable due to poly house farming, what methods he uses to prevent infestation and provide fertilizers for his plantation. And how Greenhouse Farming gave a successful outcome to obtain quality yield. https://www.youtube.com/watch?v=G8ZS-MJPJs8
0 notes
nileshartist · 2 years
Photo
Tumblr media
देशातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात असून जगभरातील अनेक विद्यार्थी त्यांत शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच पूर्वेकडील ऑक्सफर्ड किंवा विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. आज, पुण्यामध्ये जगातील नामांकित आई.टी. कंपन्याही आहेत; त्यामुळे या शहराला आई.टी. हब म्हणूनही ओळखले जाते. पुणे हे बुद्धिजीवींचे शहर आहे. पुण्यात वर्षभर संगीत, कला, साहित्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. ‘पुणे तेथे काय उणे’ अशी उक्तीही प्रसिद्ध आहे.याच पुण्यात कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी १८८३मध्ये सिव्हील इंजिनिअर पुर्ण केले. पुण्याला ते खडकवासला धरणावर असताना १९०३मध्ये त्यांनी पावसाळ्यात धरणामध्ये जास्त पाणी आल्याने धरण असुरक्षित होऊ नये म्हणून निर्माण केलेल्या स्वयंचलित स्लुईस गेट्स अद्वितीय ठरल्या व त्यानंतर ग्वाल्हेरच्या तिग्रा आणि म्हैसूरच्या कृष्णराज सागर धरणावर त्या वापरल्या गेल्या. #pune #coep #engineer #incredibleindia #punestreetart #artforall #publicart #openart #engineersday #maharashtra_ig #mumbaiartfestival #streetartindia #streetarteverywhere #smartcity #punecity #nileshartist (at Coep Pune) https://www.instagram.com/p/CpH_fsZsLX4/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
शेती व तिचा इतिहास ... | वस्तूंच्या उत्पादनाशी संबंधीत आहे , सभ्यता शेती व वनीकरणातून अन्न आणि इमरान जनावरांचे पालवायोषण आणि अतिरिका अाधान्य देणयाची लागवड ही रोती ही मुख्य घटना होती यामुळे 25 अधिक दाट व स्तरीय समाजाचा विकास सक्षम झाला कृषी अभ्यासाला अंग्रॉनॉमी म्हणून संबोधले जाते आणि संबंधित बगायती अभ्यास बागायती क्षेत्रात | केला जातो शेतीमध्ये विविध तंत्र आणि विशिष्ट्ये आहेत वाढत्या वनस्पतीसाठी उपयुक्त असलेली जमीन विस्तृत करने पाण्याचे वाहिन्या खोदल्या जातात आणि इतर प्रकारच्या सिंचनाचा वापर केला जातो . शेतीयोग्य जमिनीवर पिकांची वाढ आणि कुरण आणि परिसरावरील जनावरांच्या कुरणात प्रामुख्याने शेतीशी संबंधीत आहे . गेल्या शतकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीची ओळख आणि परिमानायक वाढ विचायत घेण्यामागील मुख्य मुद्दे बनली विकसित जगात , शेतात सेंद्रिय शेती पर्यंत आहे ' आधुनिक शेतीशास्त्र , वनसातीचे संकरीतकरण किटकनाशके व खते व तंत्रज्ञानाच्या सुधारणांनी पिकांचे उत्पादन वेगाने वाढवले आहे . आणि मानवी आरोग्या वर विपरीत परिणाम झाला आहे . सघन स्वाईन होतीसारख्या निवडक प्रजनन व पशुसवंर्धनाच्या आधुनिक पद्धतींनी मांसाचे उत्पादन वाढले आहे . परंतु प्राणी कूटता देखील . वाढली आहे . प्रतिजैविकांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हामौन आणि सामान्यतः वापरल्या जाणाच्या रसायनांबा बतचे मुद्दे उदयास आले आहेत . मांस औद्योगिक उत्पादन महये ,
मान , फार्मास्युटिकल्स आणि उत्तेजक घटकामध्ये प्रमुख कृषी उत्पादनाना खाद्य , फायबर , इंधन वा | विदेशी उत्पादनांचा देखील एक वर्ग आहे सन 2000 पासून | विस्तृतपणे गतबद्ध केले जाऊ शकी सजावटीच्या किया | | जैवइंधन बायोफार्मोस्युटिकल्स , बायोप्लास्टिक्स आणि फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनमा वनस्पतीचा वापर केला .. खास पदाथमिध्ये धान्य भाज्य फले आणि मांसा याचा समावेश आहे . 2007 मध्ये . जगातील जवळजवळ एक तृतीयांस कामगार कृषी क्षेत्रात कार्यया होते . तथापि औद्योगिकीकरणाच्या प्रारंभापासूनच शेतीचे महत्त्व कमी झाले आहे . आणि 2003 मध्ये - इतिहासात प्रथमच सेक क्षेत्राने शेतीला आर्थिक क्षेत्राच्या रूपात मागे टाकले आणि त्याचा प्रसार जगभर पसरला जास्तीत जा | लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला कृषी जगातील लोकसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देते तरीही कृषी उत्पादन सकल जगातील उत्पादनाच्या कमी आहे . कमी बनवते सुमारे 10,000 वर्षापूर्वीच्या विकासापासून , भौगलिक कन्हरेज आणि उत्पादनांमध्ये शेतीचा मोठ्या प्रमाण विस्तार झाला आहे . या विस्तारादरम्यान नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पिके जोडली ठगेली . सिंचन , पीक फिरवियों , खते . आणि किटकनाशके यासारखये शेती पहुंदती फार पूर्वी विकसीत केल्या गेल्या , केतु लक्षणीय गेल्या शतकात घडल्या . मानवी इतिहासाची प्रमुख भूमिका आहे . आणि ती राहील कारण जगातील सामाजीक आणि आर्थिक बदलामध्ये शेतीचा विकास महत्त्वाचा घटक आहे . इतिहासामध्ये घडामोडी फक्त शेतीच्या
-वैभव वैद्य....
0 notes
karmadlive · 2 years
Text
चक्क घराच्या बेडरूममध्येच सुरू होता बनावट दारू बनवण्याचा कारखाना ; उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या एका कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चक्क घरातील बेडरुममध्येच बनावट विदेशी मद्य तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरिट, रंग द्रव्य, सुगंधी द्रवासह सीलबंद बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील दुर्गानगर इथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
आनलाईन फसवणूकीपासून सावध रहा __
आनलाईन फसवणूकीपासून सावध रहा __
आचरा पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन आचरा : सायबर गु्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूकीबाबत नवनवीन फंडे वापरले जात असून यात जास्त करून तरुण पिढी फसली जात असल्याचे दिसून येत आहे. आचरा भागात असे प्रकार वाढले असून अनोळखी नंबर,फोन कॉल पासून सावध राहण्याचे आवाहन आचरा पोलीसस्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी केले आहे.सायबर गु्हेगारांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीसाठी नवनवीन क्लुप्त्या वापरल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 3 years
Text
बायको : जर मी अचानक मरुन गेली, तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?
Pradip : नो डार्लिंग, असा तर मी स्वप्नातही विचार करु शर्त नाही...!!!
बायको : का, नाही का? तुमच्या चांगल्या वाइट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी नां !!!
प्लीज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा. तुम्हाला माझी शपथ डार्लिंग!!!
Pradip : ओह माय शोना.. मेल्यानंतर पण माझी ऐवढी काळजी???
बायको : तर प्रोमिस ? तुम्हें दुसरे लग्न कराल ना ?
Pradip : ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्या साठी लग्न करीन !!!
बायको : तुम्ही तुमच्या बायकोला या घरात ठेवाल ना?
Pradip : हो, पण तीला तुझी रुम नाही देणार वापरायला ,,,
बायको : तीला आपली कार चालवायला द्याल ना ?
Pradip : नो, नेवर! त्या कार मध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत. तुझी आठवण म्हणूण मी कायम माझ्या जवळ ठेवीन. तीला नविन कार घेवून देईन !!!
बायको : आणि माझे दागीने...?
Pradip : ते मी कस देणार तीला त्यात तुझ्या आठवणी आहेत ना. मी तीला नविन दागीने बनवून देईन !!!
बायको : आणि तीने माझ्या चप्पल वापरल्या तर ?
Pradip : नाही वापरु शकणार! कारण तिच्या पायाची साईज 7 आहे आणि तुझ्या पायाची साईज 9 आहे .......... ???????????????????????????
भयाण शांतता पसरली.....
Pradip : ओ शिट..
Pradip आता स्वर्गवासी झाला आहे....
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकपमधील फुटबॉलची किंमत माहितीय का? जाणून घ्या
FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकपमधील फुटबॉलची किंमत माहितीय का? जाणून घ्या
FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकपमधील फुटबॉलची किंमत माहितीय का? जाणून घ्या FIFA World Cup 2022, price of Football: प्रत्येक वेळी फिफा विश्वचषकात वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलला यजमान देशाकडून काही तरी नाव दिले जाते. त्याचप्रमाणे यावेळी कतारने फुटबॉलला अल रिहाला (Al Rihla) असे नाव दिले आहे. FIFA World Cup 2022, price of Football: प्रत्येक वेळी फिफा विश्वचषकात वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलला यजमान देशाकडून काही…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन पावडरवर अखेर बंदी
Tumblr media
पावडरमध्ये आढळले दोष, कंपनीचा परवाना रद्द मुंबई : लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणा-या जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या पावडरवर बंदी घालण्यात आली आहे. या पावडरमध्ये दोष आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कंपनीचा थेट परवानाच रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला. जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या पावडरला देशभरात प्रचंड मागणी आहे. घराघरात प्रत्येक लहान मुलांसाठी हे पावडर वापरले जाते. गेल्या काही दिवसांत या पावडरमध्ये दोष असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अमेरिकेतही या पावडरवर बंदी आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पावडरची चाचणी भारतात केली. कोलकाताच्या प्रयोगशाळेत चाचणी केली गेली. त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये दोष आढळले आहेत. त्यामुळे राज्याच्या अन्न आणि ओषध प्रशासनाने कंपनीचा थेट परवाना रद्द केला. २०२३ पासून विक्री बंद जॉन्सन ऍण्ड जॉन्सन हे नाव बेबी प्रॉडक्टसशी गेली कित्येक वर्षे जोडले गेले आहे; पण आता २०२३ पासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जगभरातील टॅल्क बेस्ड बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करणार आहे. या कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या हजारो कन्झ्युमर सेफ्टी केसेसमुळे या प्रॉडक्टसची विक्री बंद करणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. अमेरिकेत आढळला धोकादायक फायबर २०२० मध्ये कंपनीने अमेरिका आणि कॅनडामध्ये पावडरची विक्री बंद केली होती. या पावडरमध्ये ऍस्बेटॉसचा एक धोकादायक फायबर आढळला होता. हा फायबर कॅन्सर होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जात होते. या प्रकरणी ३५ हजार महिलांनी गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या आरोपावरून कंपनीवर खटला दाखल केला होता. त्यामुळे अमेरिकेत जॉन्सनच्या प्रॉडक्ट्सची मागणी कमी झाली होती. विक्री कमी झाल्याच्या कारणावरून कंपनीने २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्रीच बंद केली होती. अमेरिकेत कंपनीला दंड जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन पावडरमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या कारणावरून अमेरिकेतील एका कोर्टाने कंपनीला १५ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कंपनीने लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे, असा ठपका कोर्टाने ठेवला होता. या प्रॉडक्ट्समध्ये ऍस्बेस्टॉस मिसळत असल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला होता. १९८४ पासून पावडरची विक्री १९८४ पासून जॉन्सन कंपनी बेबी पावडरची विक्री करते. फॅमिली फ्रेंडली असल्याचे दाखवल्याने ही पावडर म्हणजे कंपनीचे सिंबॉल प्रॉडक्ट बनले होते. १९९९ पासून कंपनीच्या इंटर्नल बेबी प्रॉडक्ट डिव्हिजनच्या वतीने याचे मार्केटिंग रिप्रेझेंटेशन केले जात होते. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्यदलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी, कारगील युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे.
****
कारगिलमध्ये २५ वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल मधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर ते बोलत होते. भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता, मात्र पाकिस्ताननं आपला अविश्वासी चेहरा समोर आणला, असं ते म्हणाले. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आज त्यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचं स्मरण केलं. त्यावेळी ते मुंबईत बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या लाभासाठी निर्णय घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या अनेक वर्षात गव्हासह इतर पिकांचं सरकारकडून खरेदीचं प्रमाण वाढलं असून, खतांवरच्या अनुदानातही भरघोस वाढ केल्याचं चौहान यांनी नमूद केलं.
****
राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी, हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिन्थेटिक रंग, सिन्थेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं.
यासंदर्भात नियंत्रणासाठी देशभरात शंभरावर अन्न परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं, अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी सांगितलं.
खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे सदनाचं लक्ष वेधलं. पासवान यांनी यावर उत्तर देतांना, तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबत असल्याचं सांगत, सरकार या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून सदर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं.
****
सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सु���िधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात ६३ प्रकारच्या तर जिल्हा रुग्णालयात १३४ प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जात असून, विविध आजारांसाठीच्या औषधांचं मोफत वितरण केलं जात असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. जिल्हा रुग्णालयात डायलिसीसची सुविधा दिली जात असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं.
दरम्यान, शून्य प्रहराच्या प्रारंभी, कर्नाटकच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होऊन, गदारोळ सुरू झाल्यानं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नांदेड शहर आणि ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत तीन लाख ७० हजार अर्ज दाखल झाले आहे. जिल्हा यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी, आणि चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री ११ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून, अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू करणार आहेत.
****
महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतले आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून होणारा विसर्ग १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं वाढवून ४० हजार घनफूट प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठी असणारी मंदिर पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
इंस्टाग्रामने सुधारित सामग्री शिफारस नियंत्रणांची चाचणी सुरू केली: तपशील
इंस्टाग्रामने सुधारित सामग्री शिफारस नियंत्रणांची चाचणी सुरू केली: तपशील
इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना शिफारस केलेल्या पोस्टबद्दल सेवेची माहिती देण्यास सक्षम करण्यासाठी त्याच्या अनुप्रयोगात बदल सादर करत आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या कृती आणि Instagram वरील क्रियाकलापांच्या आधारे सानुकूलित सामग्रीसह सेवा देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अल्गोरिदममध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने दिसत असलेल्या एका हालचालीमध्ये, कंपनी म्हणते की वापरकर्त्यांना त्यांना स्वारस्य नसलेल्या पोस्ट…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजी स्वस्त, दरात मोठी कपात जाहीर; नवीन दर जाणून घ्या
दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजी स्वस्त, दरात मोठी कपात जाहीर; नवीन दर जाणून घ्या
MGL ने एका निवेदनात म्हटले आहे की किमतीच्या सुधारणेनंतर, आर्थिक राजधानीतील वाहन मालक इतर इंधनांच्या तुलनेत CNG च्या किमतीत 48 टक्के बचत करू शकतील. महानगर गॅस लि. (MGL) किमती कमी केल्या. (फाइल फोटो) महानगर गॅस लि. (MGL) ने पाईप केलेला स्वयंपाक गॅस (PNG) आणि वाहन इंधन म्हणून वापरल्या जाणार्‍या CNG च्या किमती कमी केल्या आहेत. सरकारने देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवल्यानंतर कंपनीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
भारतात ई-रिक्षा चालतील ऑडीच्या जुन्या बॅटरीवर, इंडो-जर्मन स्टार्टअपने कंपनीशी करार केला आहे.
भारतात ई-रिक्षा चालतील ऑडीच्या जुन्या बॅटरीवर, इंडो-जर्मन स्टार्टअपने कंपनीशी करार केला आहे.
नवी दिल्ली. जर्मनीची प्रसिद्ध कार कंपनी ऑडी आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार ई-ट्रॉनमध्ये वापरलेली बॅटरी भारतात इलेक्ट्रिक रिक्षासाठी वापरणार आहे. भारतातील नॉन-प्रॉफिट स्टार्टअप नुनमने ई-रिक्षासाठी वापरल्या जाणार्‍या ईव्ही बॅटरी खरेदी करण्यासाठी जर्मन कार निर्माता कंपनीशी करार केला आहे. या बॅटऱ्यांचा वापर करून स्टार्टअप भारतात तीन इलेक्ट्रिक रिक्षा लॉन्च करणार आहे. जुन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या…
View On WordPress
0 notes