#मावळा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाची मान्यता
· मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये-ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेची मागणी
· विकसित भारत संकल्प यात्रेतून विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत-केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड
· यंदाचा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना जाहीर
आणि
· जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचा आंदोलनाचा इशारा
सविस्तर बातम्या
राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आली. आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचं काल राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलं. राज्याला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने या अहवालातून ३४१ शिफारशी केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्यण मंत्रिमंडळाने घेतला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर इथल्या सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली असून या योजनेमुळे एक हजार ३४५ हेक्टर क्ष���त्र सिंचनाखाली येणार आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विमा अग्रीम संदर्भात आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांसाठी एक हजार ९५४ कोटी रुपये वाटपाला मंजुरी मिळाली आहे, यापैकी आतापर्यंत ९६५ कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. उर्वरित रक्कम वितरणाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसंच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणबाबत स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; मात्र हे आरक्षण ओबीसीतून देऊ नये, अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. काल जालना जिल्ह्यात अंबड इथं भटके, विमुक्त, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते. या सभेत भुजबळ यांच्यासह, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केलं. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन संबंधितांना दाखले द्यावे, धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल कोल्हापूर इथं सभा घेतली. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहे, सर्वांनी एकजुटीने शांततेने आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी केलं. यावेळी व्यासपीठावर शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते. सांगली, विटा तसंच इस्लामपूर इथंही जरांगे पाटील यांच्या काल जाहीर सभा झाल्या.
****
दरम्यान, मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी संसदेत विधेयक संमत होण्याची गरज मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं बोलत होते.
****
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ लवकरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सुरू होईल, या यात्रेतून विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. कृषी, ग्रामविकास, अदिवासी विकास विभाग, शिक्षण, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी करुन घेण्यात यावी. आशा, अंगणवाडी सेविका, नागरी सुविधा केंद्र यांची मदत घेऊन नोंदणीचं उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.कराड यांनी या बैठकीत दिले. योजनांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात सात प्रचार रथ येणार असून, ग्रामपंचायतस्तरावर सुकाणू अधिकारी नेमले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत काल नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या मांडवी आणि जवरला या गावात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाकडून नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाबासह सिकलसेल संदर्भातील तपासणीही यावेळी करण्यात आली.
****
मध्यप्रदेश विधानसभेच्या सर्व २३० विधानसभा जागांसाठी तर छत्तीसगडमधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या ७० जागांसाठी काल मतदान झालं. मध्यप्रदेशात ७६ पूर्णांक २२ टक्के, तर छत्तीसगढमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
छत���रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. २१ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं अमर हबीब यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.
****
ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉ. शरद हेबाळकर यांना श्रीराधादामोदर प्रतिष्ठानचा श्रीदासगणू पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सव्वा लाख रुपये असं आहे. दासगणू महाराजांच्या पुण्यतिथीला येत्या १२ डिसेंबर रोजी पंढरपूर इथं हा पुरस्कार हेबाळकर यांना प्रदान केला जाईल.
****
धाराशिव इथं ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल ६५ किलो वजनाच्या गादी गटात कोल्हापूरच्या सोनबा इंगळे याने पहिला, सोलापूरच्या अनिकेत मगर याने दुसरा तर वर्ध्याच्या विनायक मोळे याने तिसरा क्रमांक पटकावला. माती गटाच्या काही कुस्त्या आजच्या सत्रात होणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी आणि एकूण ७५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या २५ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या ११ तालुक्यातली साडे नऊशेहून अधिक गावंही टंचाईग्रस्त जाहीर झाली आहेत.
****
जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावं, अन्यथा, उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे. परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वात काल छत्रपती संभाजीनगर इथं न्याय्य हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव नागरे, डॉ.सर्जेराव ठोंबरे, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील २०२० पासूनची पीक नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. या मागण्यांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. आमदार कैलास पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातले शेतकरी नेते राजेंद्र मोरे हे औसा तालुक्यातल्या मातोळा ते किल्लारी पर्यंत पायी दिंडी काढणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबर रोजी ही दिंडी निघणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात होणार आहे. या मोहिमेत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचं निदान झाल्यास नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान येत्या १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्हयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत स्वच्छता उपक्रम राबवावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने केलं आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज छत्रपती संभाजीनगर इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग पदासाठी पूर्व परीक्षा होत आहे. जिल्ह्यात नऊ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९६ उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३८८अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीदर-पंढरपूर-बीदर, आदिलाबाद- पंढरपूर-आदिलाबाद, नांदेड-पंढरपूर-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं काचीगुडा लालगढ काचीगुडा ही विशेष रेल्वे चालवणार आहे. ही गाडी काचीगुडा इथून आज आणि २५ नोव्हेंबर रोजी सुटणार असून निजामाबाद, नांदेड, पूर्णा, अकोला, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर, बिकानेर मार्गे सोमवारी दुपारी ही गाडी लालगढला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवार दिनांक २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी लालगढ इथून रात्री पावणेआठ वाजता निघणार असून याच मार्गाने गुरूवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास काचीगुडा इथं पोहोचेल.
****
0 notes
Text
*👉 गड किल्ले स्वच्छता मोहीम कशी राबवतात? पुढील विडिओ पहा🚩*
https://youtu.be/C1TBV6hp2FQ
*🚩||छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो||🚩*
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर विशेष व्यवस्था करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्य���वर घोड प्रवास पर्यटन सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर घोड पर्यटनासाठी ️तबेले व पानवठे सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर ️पायी प्रवास पर्यटन सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर शिवभक्त व विदेशी पर्यटकांसाठी उच्च दर्जाची विश्रामगृह व स्वच्छतागृह सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर शिवभक्त व विदेशी पर्यटकांसाठी उच्च दर्जाची खान-पान सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा सुरक्षारक्षक सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा गाईड सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर रात्रीच्या वेळी गड किल्ले झळाळून निघण्यासाठी गड किल्ल्यांच्या सर्व बाजूंना फ्लड लाईट्स बसवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ले माथ्यावर रात्रीच्या वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांच्या मनोरंजनात्मक लेझर लाईट्स शो सुरु करावा
*विशेष*
*🪔महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपण्यासाठी कोणते कार्य करावे, याची सविस्तर माहिती शिव विचार🚩 मराठी गुगल ब्लॉग पेज मध्ये आहे. कृपया आपण शिव विचार🚩 मराठी गुगल ब्लॉग पेज अवश्य वाचा आणि शेअर करा*
https://shivsankalpkillepunarvikas.blogspot.com/p/blog-page.html
*🪔धन्यवाद🚩*
0 notes
Text
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र मुंबई : उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उदयनराजेंचं पत्र जशास तसं मुजरा महाराज, महाराज… आज खुप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची. आम्ही आपल्याशी अंश-वंश म्टशन नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून बोलतीय. आपण स्वराज्याचा पाया रचला, त्याला…
View On WordPress
#“मुजरा#640#आजच्या प्रमुख घडामोडी#उदयनराजेंचं#छत्रपती#तुमच्याशी#पत्र#बातमी आजची#बोलावसं#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भावनिक#महाराज#महाराजांना#राजकारण#राजकारण लेटेस्ट#वाटतंय#शब्दांचं#शासन#शिवाजी#सरकार
0 notes
Photo
📌📢 Photo Printed Mobile Cover ✅ All Mobile Model Available ✔️ Delivery Available All Over India ✅ COD Available Book your order now on WhatsApp 8412888444 #मावळे #mavla #मावळाशिवरायांचा #kille #gadkille #chhatrapati #मावळा #मावळाआहेशिवरायांचा #customisedgifts #phonecase #caselooking a https://www.instagram.com/p/CK3sxQUgdvY/?igshid=4qjypoo9foll
#मावळे#mavla#मावळाशिवरायांचा#kille#gadkille#chhatrapati#मावळा#मावळाआहेशिवरायांचा#customisedgifts#phonecase#caselooking
0 notes
Photo
#छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक #मावळा राष्ट्रीय #चारित्र्य म्हणून उभा केला त्याप्रमाणेच उद्योग, व्यवसायात आपल्या #सहकार्यांना उभा केलं पाहिजे जेणेकरून हे सहकारी फक्त कामगार किंवा नोकर न राहता उद्योग व्यवसायाचे मजबूत #खांब होतील !!! (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CKu_Af-r2Qw/?igshid=1pys7qmuullts
0 notes
Photo
#मावळा #mavala #shivrai #shivrayancha_maharashtra #maharashtramaza #bappalover #sambhajimaharaj #shivaji_maharaj_history #history #jagdamb #JagdambCreativeHubPvtLtd ##LovekeshRameshKachi #pune #chatrapati_shivajimaharaj #bhagva #hindutv (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CF6SAe0haEA/?igshid=1j7w2j275z39b
#मावळा#mavala#shivrai#shivrayancha_maharashtra#maharashtramaza#bappalover#sambhajimaharaj#shivaji_maharaj_history#history#jagdamb#jagdambcreativehubpvtltd#lovekeshrameshkachi#pune#chatrapati_shivajimaharaj#bhagva#hindutv
0 notes
Text
मावळा मी मर्दगडी ग सोंग कोंबडी पळाली Dj Song Download Mp3 Music
मावळा मी मर्दगडी ग सोंग कोंबडी पळाली Dj Song Download Mp3 Music
DJSONGS DOWNLOAD Download Now Google Tags : मावळा मी मर्दगडी ग सोंग कोंबडी पळाली Dj Song Download Mp3 Music
View On WordPress
0 notes
Text
आर. सी. सी. बार्शीचा संघ धर्मवीर चषकाचा मानकरी, कुर्डूवाडी मावळा ग्रुपने केले होते आयोजन
2 notes
·
View notes
Photo
फितूरांपासून सावध राहा, 'जे काम पुर्ण मुघल सैन्य' नाही करू शकलं ते काम एका फितूराने केलं. #छावा @ps_bansode #छावा #छावा_सह्याद्रीचा #छत्रपती_संभाजी_महाराज #संभाजीमहाराज #छत्रपती #छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार #संभाजी_महाराज #संभाजी #पुणे #sambhaji #sambhajimaharaj #sambhajiraje #संभाजीराजे #मावळा #मावळा_आहे_शिवरायांचा🚩 #महाराष्ट्र #मराठीमुलगा #मराठीस्टेटस #फितूर #मुंबई #maratha #ekmarathalakhmaratha #marathaempire #marathi__shoutout #marathimotivational (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CPm3gHQNB-B/?utm_medium=tumblr
#छावा#छावा_सह्याद्रीचा#छत्रपती_संभाजी_महाराज#संभाजीमहाराज#छत्रपती#छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार#संभाजी_महाराज#संभाजी#पुणे#sambhaji#sambhajimaharaj#sambhajiraje#संभाजीराजे#मावळा#मावळा_आहे_शिवरायांचा🚩#महाराष्ट्र#मराठीमुलगा#मराठीस्टेटस#फितूर#मुंबई#maratha#ekmarathalakhmaratha#marathaempire#marathi__shoutout#marathimotivational
1 note
·
View note
Text
सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया : खा. विनायक राऊत
सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया : खा. विनायक राऊत
कनेडी येथे शिवसेना विभागीय शाखेचे उद्घाट��, उपनेते गौरीशंकर खोत, आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, नीलम पालव यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : सह्याद्री पट्ट्यातील मावळा हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. कोकणातील हा मावळा शिवसेनेमुळे वेगवेगळ्या पदावर पोचला. मात्र, काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसेनेच्या लोकांनी दाखवलेली आहे. आताही…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाची मान्यता
पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याच्या प्रमाणात गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढ
मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये-ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेची मागणी
आणि
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचा आंदोलनाचा इशारा
****
राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचं आज राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलं. राज्याला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने या अहवालातून ३४१ शिफारशी केल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत विविध विभागांच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली. राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्यात आला असून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्यण मंत्रिमंडळाने घेतला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर इथल्या सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली असून या योजनेमुळे १ हजार ३४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
****
पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात १९९० साली प्रति हेक्टर ३२ टनांहून अधिक माती वाहून गेली होती. २०२० मध्ये हे प्रमाण ६२ टन ७०० क्विंटलवर पोहोचल्याचं प्राध्यापक पेन्नन चिन्नसामी आणि वैशाली होनप यांनी केलेल्या अभ्यासात आढळलं. महाराष्ट्रात ९७ टक्क्यांनी जमिनीची धूप वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे.
****
मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; मात्र हे आरक्षण ओबीसीतून देऊ नये, अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात अंबड इथं ��ज झालेल्या भटके, विमुक्त, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते. या सभेत भुजबळ यांच्यासह, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, आमदार आशिष देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी या सभेला मार्गदर्शन केलं. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, या मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगनना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी, बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन संबंधित दाखले द्यावे, धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा आदी मागण्या या सभेतून करण्यात आल्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यात विटा आणि सांगली इथं जाहीर सभा घेतली. सर्वांनी एकजुटीने शांततेने आंदोलन करावं, असं आवाहन करतानाच, आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन शांत होणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी या सभेतून दिला.
****
दरम्यान, मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी देशाच्या लोकसभेत विधेयक संमत होण्याची गरज मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते आज लातूर इथं बोलत होते. लोकसभेत असं विधेयक मांडण्यात यावं, यासाठी आपण राज्यभरातील लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असून, हे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करणार असल्याचं माणिकराव शिंदे यांनी सांगितलं.
****
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह मुंबईत शिवाजी पार्क इथं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरात शिवसेनेच्या विविध शाखांमधूनही बाळासाहेबांच्या स्मृतींना आंदरांजली वाहण्यात आली.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी किनवट तालुक्यातल्या मांडवी आणि जवरला या गावात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. उज्ज्वला योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, सुकन्या योजना आदी योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आरोग्य विभागाकडून मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणीसह सिकलसेल तपासणीही करण्यात आली.
****
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६२ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात येत्या २० नोंव्हेबर पासून सोलापूर इथं होणार आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक अमोल धाबळे यांनी दिली. या स्पर्धेत एकूण पंधरा संघ सहभागी होणार असल्याचं सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषन चवरे यांनी सांगितलं.
****
नां��ेड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी आणि एकूण ७५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या २५ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. आठ तालुक्यात���ल या २५ महसूली मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
****
जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावं, अन्यथा, उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे. परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर इथं न्याय्य हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव नागरे, डॉ.सर्जेराव ठोंबरे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील २०२० पासूनची पीक नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार कैलास पाटील, शिवसेनासह संपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.
****
सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातले शेतकरी नेते राजेंद्र मोरे हे येत्या २४ नोव्हेंबर रोजी औसा तालुक्यातल्या मातोळा ते किल्लारी पायी दिंडी काढणार आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात ८० ��क्के पीक हे सोयाबीनचं घेतलं जातं. मात्र सोयाबीनला मिळणारा आताचा दर उत्पादन खर्च बघता अत्यल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यास सुरुवात होणार आहे. या मोहिमेत आरोग्य पथकाद्वारे २५ लाख ६५ हजार ९५८ नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, तपासणीत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचं निदान झाल्यास नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, येत्या १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्हयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत स्वच्छता उपक्रम राबवावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने केलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोताळा तालुक्यात रिधोन इथं ही घटना घडली. सुरेश कळमकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आपल्या शेतात काम करत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला, जखमी अवस्थेत त्यांना बुल़डाणा इथं रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीदर-पंढरपूर-बीदर, आदिलाबाद- पंढरपूर-आदिलाबाद, नांदेड-पंढरपूर-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वे काचीगुडा लालगढ काचीगुडा ही विशेष रेल्वे चालवणार आहे. ही गाडी काचीगुडा इथून शनिवार १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी सुटणार असून निजामाबाद, नांदेड, पूर्णा, अकोला, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर, बिकानेर मार्गे सोमवारी दुपारी लालगढला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवार दिनांक २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी लालगढ इथून रात्री पावणेआठ वाजता निघणार असून याच मार्गाने गुरूवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास काचीगुडा इथं पोहोचेल.
****
0 notes
Text
*👉 गड किल्ले स्वच्छता मोहीम कशी राबवतात? पुढील विडिओ पहा🚩*
https://youtu.be/UJMImpVOQ4k
*🚩||छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो||🚩*
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याची व्यवस्था करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्यापासून ते गड किल्ल्यांपर्यंत रोप वे प्रकल्प सुरु करावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांवर उच्च दर्जाची विश्रामगृह व स्वच्छतागृह सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला घोड्यांच्या देखभालीसाठी आणि विश्रामासाठी तबेले व पानवठे सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी वाहनतळ व खान-पान सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा गाईड सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा सुरक्षारक्षक सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला रात्रीच्या वेळी गड किल्ले झळाळून निघण्यासाठी चारही बाजूंना फ्लड लाईट्स बसवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांसाठी प्रवासी वीमा असावा
*विशेष*
*🪔महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपण्यासाठी कोणते कार्य करावे, याची सविस्तर माहिती शिव विचार🚩 मराठी गुगल ब्लॉग पेज मध्ये आहे. कृपया आपण शिव विचार🚩 मराठी गुगल ब्लॉग पेज अवश्य वाचा आणि शेअर करा*
https://shivsankalpkillepunarvikas.blogspot.com/p/blog-page.html
*🪔धन्यवाद🚩*
0 notes
Text
अभिनेता अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत? नव्या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा
अभिनेता अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत? नव्या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा
अभिनेता अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत? नव्या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा अखेर नुकतेच अजय आणि तब्बूने ‘भोला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. गेली अनेकवर्ष सातत्याने तो आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘सिंघम’ मधला कर्तव्यदक्ष अधिकारी असो, ‘तान्हाजीमधला’ मर्द मावळा किंवा ‘दृश्यम’ चित्रपटातील कुटुंबाला सांभाळणारा…
View On WordPress
#अजय#अभिनेता#आताची बातमी#एंटरटेनमेंट बातम्या#चर्चा?#चित्रगुप्ताच्या#चित्रपटाच्या#ट्रेंडिंग बातमी#देवगण#नव्या#न्यूज अपडेट मराठी#पोस्टरची#फ्रेश बातमी#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भूमिकेत#मनोरंजन#���राठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#सर्वत्र#सिने जगत#सिने सृष्टी#सेलेब्रिटी न्यूज
0 notes
Text
Shiv Jayanti Ahmednagar : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी गनिमि काव्याचा वापर केला - रमेश वामन
#Shiv Jayanti Ahmednagar : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी गनिमि काव्याचा वापर केला - रमेश वामन #Ahmednagar #ShivajiMaharaj
Shiv Jayanti Ahmednagar : अहमदनगर (दि १९ फेब्रुवारी २०२२) – निजामशाही आणि कुतूबशाही या सर्वच बलाढ्य शत्रुंशी सामना करताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी अनेक लढाया गनिमि काव्याचा वापर केला. हे तंत्र वापरण्यासाठी आणि तातडीने निर्णय घेणारा प्रतिभावंत, धाडसी असा निर्णय फक्त छत्रपती शिवाजी महाराज घेऊ शकतात, असे प्रतिपादन शिवभक्त मावळा रमेश वामन यांनी केले. वसंत…
View On WordPress
0 notes
Text
स्टार प्रवाहच्या जय भवानी जय शिवाजी मालिकेत येणार शिवा काशिद
स्टार प्रवाहच्या जय भवानी जय शिवाजी मालिकेत येणार शिवा काशिद
अभिनेता स्तवन शिंदे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत शिवा काशिद यांची…
View On WordPress
#Jai Bhavani Jay Shivaji#Jay Bhawani Jay Shivaji#Shiva Kashid#Star Pravah#Stavan Shinde#Stavan Shinde To Play Shiva Kashid In Jay Bhavani Jay Shivaji#जय भवानी जय शिवाजी#शिवा काशिद#स्टार प्रवाह#स्टार प्रवाहच्या जय भवानी जय शिवाजी मालिकेत येणार शिवा काशिद
0 notes
Text
Marathi Mavla मराठी मावळा Dj Song Download Mp3 Music
Marathi Mavla मराठी मावळा Dj Song Download Mp3 Music
DJSONGS DOWNLOAD Download Now Google Tags : – Marathi Mavla मराठी मावळा Dj Song Download Mp3 Music
View On WordPress
0 notes