#महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इंथल्या राजभवनात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी होत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज सकाळपासूनच संभाव्य मंत्र्यांना शपथविधीसाठी भ्रमणध्वनीद्वारे राज्य नेतृत्वाकडून कळविण्यात येत असल्याचं वृत्त आहे. राज्य सरकारमधील सहभागी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनाही त्यांच्या नेतृत्वांनी मंत्रीपदाची शपथ घेण्याविषयीची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये तब्बल ३३ वर्षांनंतर मंत्रीमंडळ विस्ताराचा कार्यक्रम होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये मुख्य सचिवांच्या चौथ्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. तींन दिवस होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सुरुवात झाली. राज्यांच्या मदतीनं साधलेल्या विकासचं मूल्यमापन करणं आणि कार्यान्वित करणं, हा या संमेलनामागचा उद्देश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित भागीदारीला सशक्त करणं तसंच सहकारी संघराज्यवाद, जलद आर्थिक वृद्धी आणि विकासामध्ये योग्य ताळमेळं हे या संमेलनातील चर्चेचे विषय आहेत. या संमेलनात सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले आहेत.
राज्यभरात उद्यापासून कुष्ठमु��्त सुरक्षित महाराष्ट्र म्हणजेच कुसुम ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या नियमित तपासणीत गेल्यावर्षी वीस हजार नवे कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारनं २०२७ सालापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचं उद्दीष्ट निश्चित केलं असून, ते साध्य करण्यासाठी कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जात आहे. आशा स्वयंसेविका तसंच पुरूष स्वयंसेवकांच्या मदतीनं प्रत्यक्ष सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इंथल्या श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची आज सांगता होत आहे. सकाळी आठ वाजता होम हवनास सुरुवात झाली असून, दुपारी साडेबारा वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता देवीच्या पालखीची मिरवणूक अंबाजोगाई शहरातून काढण्यात येणार आहे. या नवरात्र महोत्सवामध्ये जवळपास दहा हजाराहून अधिक भाविक मंदिरामध्ये आराध बसले होते, अशी माहिती योगेश्वरी मंदिर समितीचे सचिव अशोक लोमटे यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे.
राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढत आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक नीचांकी तापमान ४ पूर्णांक ६ डिग्री सेल्सिअस नोंदलं गेलं. उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरे कडून येणार थंड वारे तसेच आपल्या भागात असलेले कोरडे वातावरण यामुळं पारा खाली जात असल्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांनी सांगितलं. कडाक्याच्या थंडीचा रबी पिकांना फायदा होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव- चिखली मार्गावर अमडापूर नजीक दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्याने दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले. घटनेनंतर अज्ञात वाहनाचा चालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
रत्ना��िरी जिल्ह्यातल्या जयगड तालुक्यातल्या वायुगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या दोन व्यवस्थापक आणि दोन अभियंते अशा चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयगड पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. नियमित देखभाल-दुरुस्तीचं काम करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून सुरुवात झाली. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजीक आशयही वृद्धिंगत करण्यात त्यांच्या चित्रपटांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. केवळ भारतातच नव्हे तर विशेषत्वानं रशियासह जगभरातल्या चित्रपट रसिकांनी राज कपूर यांच्या चित्रपटांना अखंड दाद दिली.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघानं ७० षटकात ३ बाद २३४ अशी आश्वासक सुरुवात केली आहे. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर यजमानांचे तीन गडी ७५ धावांवर बाद झाले होते. सामन्याचा पहिला दिवस तेरा षटके वगळता पावसामुळे वाया गेला. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
जळगाव शहरातील फातेमा नगरात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उद्धस्त करीत पोलिसांनी व्यावसायिक आणि घरगुती अवैध ३४ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.
0 notes
Text
धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा, सर्व लिपिकांची रिक्त पदे भरणार, मंत्रीमंडळ बैठकीत ११ महत्त्वाचे निर्णय | Maharashtra Cabinet Meeting Decisons CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis sgy 87
धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा, सर्व लिपिकांची रिक्त पदे भरणार, मंत्रीमंडळ बैठकीत ११ महत्त्वाचे निर्णय | Maharashtra Cabinet Meeting Decisons CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis sgy 87
राज्य मंत्रीमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले ११ महत्त्वाचे निर्णय १) धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा, अतिरिक्त सवलतीही…
View On WordPress
0 notes
Text
उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग
उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग
उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकारच्या…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#उद्या#ठळक बातमी#ताजी बातमी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मंत्रिमंडळाचा#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्रात#राजकारण#राजकीय#विस्तार#वेग!#हालचालींना#होणार”
0 notes
Text
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासोबतच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचीही घ��षणा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच होणार आहे. या कॅबिनेट विस्तार त्यानंतर लगेचच गणेशोत्सव होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
View On WordPress
#एकनाथ शिंदे#द���वेंद्र फडणवीस भाजप#भाजप नेते सुधीर मुनगंटीवार#महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक#शिव सेना
0 notes
Text
प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या नवीन मंत्रिमंडळास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.’’ दरम्यान शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर सदस्यांच्या शपथविधीला सुरूवात झाली. अस्थायी अध्यक्षांच्या तालिकेवरील सदस्यांच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून सदस्यत्वाची शपथ घेतली. आज शनिवारी आणि उद्या रविवारी उर्वरीत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
दरम्यान, नव्याने गठित विधानसभेच्या अध्यक्षांची परवा नऊ डिसेंबर रोजी निवड केली जाणार आहे. त्यासाठी उद्या दुपारी बारा वाजण्यापूर्वी प्रस्ताव सादर करण्याचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भातील घोषणा आज केली, तर येत्या १६ डिसेंबरच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी ��ाँग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करावी, असे आदेश दिल्लीतील न्यायाधिकरण न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत. आयकर विभागानं ऑक्टोबर २०२१ मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेली सुमारे एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यासह मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एका रिसॉर्टचाही समावेश होता. मात्र, याबाबत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. दिल्ली नायाधीकरण न्यायालयानं यावर काल सुनावणी घेत आयकर विभागाची याचिका फेटाळली आणि अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी वर्षातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी आज नवी दिल्ली इथं एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विविध शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने काल देशभरात ८५ केंद्रीय विद्यालयं स्थापित करण्यास मंजुरी दिली. यापैकी तीन केंद्रीय विद्यालयं महाराष्ट्रातील असून त्यापैकी एक पुण्यात स्थापित होईल. पुण्यातील सुडुंब्रे इथल्या एनडीआरएफ कॅम्पस याठिकाणी हे केंद्रीय विद्यालय स्थापन केलं जाईल. यासोबतच, देशात २८ नवीन नवोदय विद्यालयं स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असून त्यापैकी एक ठाणे जिल्ह्यात स्थापन केलं जाणार आहे.
भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. सीरियात वाढत असलेले बंडखोरांचे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सीरियातील सध्याची असुरक्षित परिस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाला जाणं टाळावं. जे लोक परत येऊ शकतात, त्यांनी लवकरात लवकर व्यावसायिक उड्डाणं करून मायदेशी परत यावं आणि इतरांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यात काल सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू असून यामुळं शेती पिकं आणि फळबागांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीची तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर करण्यासाठी तलाठी आणि संबंधित यंत्रणे मार्फत शेतकऱ्यांना कळवावं, तसंच घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत आणि शेतकरी बांधवांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशीही क्षीरसागर यांची मागणी आहे.
सांगली जिल्ह्यातल्या काही भागात आज पहाटे पाच वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळं काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान, मराठवाड्यात काल सर्वत्र पावसानं हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ॲडलेड ओव्हल इथं बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आस्ट्रेलियाच्या ५ गडी बाद २३५ धावा झाल्या होत्या. काल पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव १८० धावांत संपुष्टात आला. सध्या आस्ट्रेलियानं ५५ धावांची आघाडी घेतली आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
सरकारी सेवांमध्ये नवनियुक्त सत्तर हजार उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान
मुंबई आणि पुण्यासह देशभरातल्या सात शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटी रूपयांचे प्रकल्प उभाण्याची केंद्रीय गृह मंत्र्यांची घोषणा
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दरानं तत्काळ मदतीसाठी, दीड हजार कोटी रुपये निधीला, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीत पाचपट वाढ तसंच लातूर इथं पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तेलाच्या टँकरला आग लागून चार जणांचा मृत्यू
आणि
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा धरणाच्या कालवा दुरुस्तीसाठी तीन कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर
****
सरकारी सेवांमध्ये नवनियुक्त सत्तर हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. देशभरातल्या त्रेचाळीस ठिकाणी झालेल्या या रोजगार मेळाव्यांमध्ये पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून, भारताला पुढच्या काळात विकसित राष्ट्र बनवण्याचा उद्देश असल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. मातृभाषेतल्या भरती परीक्षांचा देशातल्या तरुणांना मोठा फायदा होत असल्याचं, तसंच मुद्रा योजनेमुळे कोट्यवधी लोकांना मदत झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
मुंबई आणि पुण्यासह सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशभरातल्या सात शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जातील, अशी घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केली आहे. काल नवी दिल्लीत आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता हे यावेळी उपस्थित होते. यामध्ये मुंबई आणि पुण्यासह चेन्नई, कोलकाता बेंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती शहा यांनी दिली.
देशभरातल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी शहा यांनी एकूण आठ हजार कोटींहून अधिक मूल्याच्या तीन योजना जाहीर केल्या. यामध्ये राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पाच हजार कोटींचे प्रकल्प उभारणं, पुराचा धोका कमी करण्यासाठी सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांसाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणं, तसंच भूस्खलन शमन करण्यासाठी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८२५ कोटी रूपयांची, राष्ट्रीय भूस्खलन जोखीम शमन, या प्रकल्पांचा समावेश आहे.
यासह साडे तीनशे अतिजोखमी आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये, सुमारे एक लाख युवा आपदा मित्र -स्वयंसेवक तयार करण्याचं लक्ष्य निश्चित केल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे. राज्यात या पद्धतीचे प्रशिक्षित आठ हजाराच्या वर आपदा मित्र आहेत.
****
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दरानं तत्काळ मदत करण्यासाठी, एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीला, राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता त्यांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात सुधारणा करत, तो आता केंद्र सरकारच्या भत्त्याएवढा करण्याचा निर्णयही, काल घेण्यात आला. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावं, यासाठी त्यांच्या शिष्यवृत्तीत सरकारनं काल पाचपट वाढ केली.
लातूर इथं पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुणे इथं चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयं स्थापन करणं, अतिरिक्त आणि जलदगती न्यायालयांना मुदतवाढ देणं, मानसिक आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तींकरता पुनर्वसन गृहं योजना, स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी, त्यांच्या कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ, चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयं स्थापन करणं, आदी निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यात काही ठिकाणी निदर्शनाला आलेल्या बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत आपापल्या जिल्ह्यांत पथकं तया�� करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकावेत, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना यावेळी दिले. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकत आहेत की नाही, ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
चढ्या भावानं बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यात नव्यानं कायदा आणण्यात येणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं चढ्या भावानं बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी विक्रेत्यांचं स्टिंग ऑपरेशन माध्यमांच्या प्रतिनिधींनी काल केलं, यासंदर्भात प्रतिक्रीया देतांना सत्तार बोलत होते. कपाशीच्या बियाणांची विक्री किंमत आठशे ५३ रुपये सरकारनं निश्चित केली असतांना, संबंधित विक्रेता साडेबाराशे रुपयांना हे बियाणं विकत असल्याचं समोर आलं आहे. वाढीव दराने बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, यासाठी भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा - नीट चा निकाल जाहीर झाला आहे. तमिळनाडू इथला प्रबंधन जे तसंच आंध्रप्रदेशातला वरूण चक्रवर्ती या दोघांनी ९९ पूर्णांक ९९ शतांश टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत उत्तरप्रदेशातले सर्वाधिक उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्या खालोखाल महाराष्ट्र आणि राजस्थानातले उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
****
गडचिरोली शहरातल्या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत १८ वर्षांखालच्या २१ बाल कामगारांना मुक्त करण्यात आलं. जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय, स्पर्श संस्थेचा कैलास सत्यार्थी चिल्र्ड्रेन फांउडेशन एक्सेस टु जस्टीस प्रकल्प, चॉईल्ड लाईन आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
आदिवासी विभागातल्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती न करता बाह्यस्रोताद्वारे ही सेवा घेण्याचा शासनानं घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी राज्यभरातल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी काल नाशिक इथून मंत्रालयाकडे जाण्याच्या लाँग मार्चची सुरुवात केली. आदिवासी विकास विभाग वर्ग तीन आणि चार रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च सुरु करण्यात आला आहे.
****
बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्याबाबत तयारीसाठी गृहमंत्री अमित शाह काल नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आप��्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक घेतली. बिपरजॉय चक्रीवादळ उद्या गुरुवारी संध्याकाळी गुजरातमध्ये सौराष्ट्र -कच्छ किनारा या भागात धडकेल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याचे महानिदेशक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वादळ जमिनीवर धडकल्यानंतर कच्छ, द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता मोहपात्रा यांनी वर्तवली आहे. दरम्यान, या वादळामुळे उद्भवू शकणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेत, या भागातल्या पंधरा हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण चौतीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
****
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात काल तेलाचा टँकर उलटून त्यानं जागीच पेट घेतला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. हा टँकर कठड्याला धडकून उलटला, त्यानंतर या टँकरमध्ये असलेल्या ऑईलनं लगेच पेट घेतला. त्यावेळी पुलाच्या खाली असलेल्या प्रवाशांवर आगीचा गोळा पडला, त्यामुळे दोन मुलं आणि एक महिला जखमी झाली आहे. तिघांवरही उपचार सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुलाखालच्या दोन- तीन गाड्यांना देखील आग ला��ून नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा धरणाच्या कालवा दुरुस्तीसाठी तीन कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला. तेरणा मध्यम प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही, अनेक वर्षे देखभाल दुरुस्ती न झाल्यानं, कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडता येत नव्हतं. कालवा दुरुस्तीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिचारिकांनी वेतनवाढीसाठी काल आंदोलन केलं. राज्यभर महाराष्ट्र शासकीय परिचारिका महासंघाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात यांनी दिली. आमचा प्रश्न न सोडवल्यास राज्यभर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी लातूर इथं आज ‘जागेवर निवड संधी’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात उमेदवारांना थेट मुलाखत देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी, महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी उद्या आवश्यक त्या कागदपत्रांसह लातूर जिल्हा क्रीडा संकुलात उपस्थित राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी जिल्हा प्रशासन वेरूळ महोत्सवासह व���विध उपक्रम राबवत असून, येत्या सप्टेंबर महिन्यात औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या जागतिक पर्यटन परिषदेत एक हजार टूर ऑपरेटरचा सहभाग राहणार असण्याची अपेक्षा आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना, राज्य सरकारनं निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं ��वीन कृती दल
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध - कृषी आयुक्त सुनील चव्हाण
अक्षय्य तृतीया, भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती तसंच रमजान ईदचा सण देशभरात उत्साहात साजरा
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं महावितरणचं आवाहन
जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदकं
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
सविस्तर बातम्या
देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड विषयक देखरेखीबद्दल सावध राहून व्यवस्था अधिक बळकट करावी, चाचणी, उपचार, बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी या पत्रातून केली आहे.
****
सार्वजनिक आरोग्य विभागानं कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी नव्या कृती दलाची स्थापना केली असून निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, डॉक्टर बिशन स्वरुप गर्ग, यांच्यासह ८ जणांची या कृती दलाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे संकेत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल नंदूरबार इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठल्याही खात्याचं काम अडून राहिलेलं नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भुमरे यांनी टीका केली. राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हान भुमरे यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पक्षात घुसमट होत असून, ��क दिवस त्याचा विस्फोट होईल, असंही मंत्री भुमरे यांनी म्हटलं आहे.
****
मरा��ा आरक्षण मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना यंदा आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराशा केल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपण अविचलपणे जनतेसाठी काम करीत राहू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे जिल्हा रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, मात्र रुग्णांना तातडीने इतरत्र नेण्याची गरज पडल्यास हवाई रुग्णवाहिकेची सोयही उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलत होते. धर्माचं राजकारण केल्यानं भविष्यात राज्यात दंगली होतील, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले…
Byte…
महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का की दंगली घडवायच्या? असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर याठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतंय की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटीव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटीव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.
****
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. मृगाचा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असते, त्या पार्श्वभूमीवर खतांचं नियोजन एप्रिलपासून सुरु करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाप्रमाणे पिकनिहाय खतांचं प्रमाण, त्यांची उपलब्धता आणि त्यासाठीचा खर्च याबाबत माहिती देणारं ‘कृषिक ॲप’ कृषी विभागानं तयार केल्याची माहिती कृषि आयुक्त चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा, अतिरिक्त खत वापरामुळे होणारा अतिरिक्त खर्च, घटणारं पिक उत्पादन अशा समस्यांवर मात करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं.
****
राज्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर ई-पीक पेऱ्यांची नोंद झालेली नाही अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी गावपातळीवर संबंधीत गावचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची समिती गठित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या समितीनं कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून, याबाबत शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून शहानिशा करावी आणि सात - बारा उताऱ्यावर त्याची नोंद करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमाणित केलेले सात - बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. समितीनं आपला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे.
****
‘उडान अर्थात उडे देश का आम नागरिक' या योजनेच्या पाचव्या टप्प्याला काल सुरुवात झाली. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उडानच्या माध्यमातून देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुविधा अधिक वाढवणं आणि अगदी अखेरच्या टोकापर्यंत हवाई संपर्क सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात एक हजार नवे मार्ग, पन्नास अतिरिक्त विमानतळं, हेलीकॉप्टर स्थानकं आणि पाण्यावरील विमान उड्डाण व्यवस्था कार्यान्वित करण्याचं लक्ष्य साध्य होईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य तुरुंग विभागानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला आणि पुरुष कच्चे कैदी तसंच शिक्षा झालेल्या महिला कैदी, त्यांच्या मुलांना, तसच नातवंडं, भाऊ, बहिण यांना भेटू शकणार आहेत. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारावं आणि समान वागणूक द्यावी, या उद्दशानं हे धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती, तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
****
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी एक चार पाच सहा सात या क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या या नि:शुल्क मदतवाहिनीच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार आदी बाबींची माहिती तसंच मदत देण्यात येते
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी, ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचं विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
विविध क्षेत्रातल्या नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणा��साठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पाठ्यवृत्ती अर्थात फेलोशिप उपक्रम राबवणार आहे. राज्याचा पर्यटन विकास साधणं हा याचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपसाठी तरुणांनी १५ मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महामंडळानं केलं आहे. २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतली प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहेत. gm@maharashtra tourism.gov.in आणि dgm@maharashtra tourism.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करता येतील.
****
साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण , भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसंच ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण काल देशभरात साजरा झाला. उत्तराखंडातल्या प्रसिद्ध चार धाम तीर्थक्षेत्र यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. उत्तराखंडमधील, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांचे दरवाजे काल दुपारच्या सुमारास दर्शनासाठी विधीवत उघडण्यात आले. केदारनाथ धाम इथलं मंदिर २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम इथलं मंदिर २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पुढच्या सहा महिन्यांपर्यंत नेहमीप्रमाणे या चारही ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं, ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि मिरवणुक काढण्यात आली तर महात्मा बसवेश्वर जिल्हा महोत्सव समिती आणि अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
****
ईद-उल-फित्रच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणा सुदीच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिली आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरात मुस्लीम समाजबांधवांनी सकाळी कदीम जालना आणि सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद ऊल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.
****
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. वीज वाहिन्या, रोहित्र, वीज वितरण पेट्या किंवा फीडर फिल्डरच्या जवळ कचरा जाळल्यामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला आग लागल्यामुळे विजेच्या भूमिगत तारा आणि इतर वीज यंत्रणा नादुरु��्त झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या आगींमुळे महावितरणच्या नुकसानीसोबतच ग्राहकांना वीज पुरवठा अनियमित होतो आहे. अशा घटनातून वीज यंत्रणेला आग लागल्याचं आढळल्यास एक नऊ एक दोन किंवा १८००-२१२-३४३५ या नि:शुल्क क्रमांकावर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १२ वसतीगृहं सुरू करण्यात आली आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी ही माहिती दिली, ते काल मानकुरवाडी इथं ऊस तोडणी कामगारांना ओळख पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. मानकुरवाडी परिसरातील ऊसतोड कामगारांची लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शंभर टक्के नोंद करण्यात आली आहे. या महामंडळांतर्गत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
जागतिक ग्रंथ दिन आज साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठी प्रकाशक पुणे यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्था या विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे , भाष्य करणार आहेत. प्रकाशन परिषदेचे कार्यवाह अरविंद पाटकर हे ग्रंथव्यवहारासंबंधी विचार मांडणार आहेत.
****
तुर्की इथं झालेल्या प्रथम स्तर जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली आहेत. ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे या जोडीनं मिश्र दुहेरीत चिनी तैपेई जोडीचा १५९ विरुद्ध १५४ गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने महिलांच्या कंपाउंड प्रकारात कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीवर १४९ विरुद्ध १४६ अशी मात करत सुवर्ण पदक पटकावलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायन्टसवर ७ धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सनं २० षटकात ६ गडी गमावत १३५ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल लखनऊ सुपर जायन्टस संघ मात्र २० षटकांत सात गड्याच्या बदल्यात केवळ १२८ धावा करू शकला.
या स्पर्धेतल्या अन्य सामन्यात पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्स संघावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्जनं २१५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करणारा मुंबई इंडियन्सचा संघ निर्ध���रित २० षटकात ६ गडी गमावत २०१ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्याच्या सर्वांगीण विकासाचं सरकारचं लक्ष्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन.
सरकारची भूमिका सर्वसामान्यांना सोबत घेण्याची - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मराठवाड्यात चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात.
आणि
मध्य रेल्वेच्या उद्यापासून चार वि��ेष गाड्या.
****
आपलं सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवाससस्थानी प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी शिंदे हे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले –
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय चांगली कामं, पायाभूत सुविधा असतील, राज्यातल्या सर्व समाजघटकांसाठी योजना असतील, असे अनेक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण घेतोय. आणि खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठीचं सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र काम करतायत.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
****
नागपूर इथं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेतला. सामान्य माणसाला पुढं घेऊन जाण्याची सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
देशाच्या एकूण जीडीपीच्या पंधरा टक्के आपण महाराष्ट्रातनं जीडीपी देतो. आणि देशाची जी निर्यात आहे, त्या निर्यातीमध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्के हिस्सा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे महाराष्ट्र हा प्रगतीकडे चाललेला आहे, ही प्रगती करत असताना, जो सामान्य माणूस आहे, त्या सामान्य माणसाला सोबत घेऊन या महाराष्ट्रातील दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर अशा प्रत्येकाला या ठिकाणी सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय.
****
मराठवाड्यामध्ये आज सर्वत्र चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्���ाक दिनाचा उत्साह दिसून आला. औरंगाबाद इथं पोलिस मुख्यालयात पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेद विसरुन सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास देश सामर्थ्यशाली महासत्ता बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते, बीड इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
राज्यात बालविवाह प्रथेमध्ये परभणी जिल्हा वरच्या क्रमां��ावर आहे, जिल्ह्यासाठी ही बाब चांगली नाही, त्यामुळं आता जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकानं बालविवाहमुक्त परभणी मोहिमेत सहभागी होणं आवश्यक आहे, असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल इथं प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी गोयल बोलत होत्या. परभणी जिल्हा बाल विवाहमुक्त करण्यासाठी ग्रामीण भागातल्या शालेय शिक्षणात मुलींची पटसंख्या वाढली पाहिजे, असंही गोयल यांनी सांगितलं.
****
प्रसार भारती आणि इजिप्तच्या राष्ट्रीय माध्यम प्राधिकरणादरम्यान आशय-सामग्रीची देवाणघेवाण, क्षमता विकास आणि सह-निर्मिती सुलभ करण्यासाठी आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि इजिप्त सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री समेह हसन शौकरी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली. हा सामंजस्य करार म्हणजे, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, सामाजिक विकास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यावर विशेष भर देणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशाची प्रगती दाखवण्यासाठी दूरदर्शन वाहिनीची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. दोन्ही देशांचे प्रसारक द्विपक्षीय आधारावर क्रीडा, बातम्या, संस्कृती, मनोरंजन आणि इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित विविध प्रकारच्या कार्यक्रमांची देवाणघेवाण या अंतर्गत करणार आहेत. हे कार्यक्रम त्यांच्या नभोवाणी आणि दूरचित्रवाणी मंचावरून प्रसारित केले जातील. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी वैध असेल. प्रसार भारती या भारताच्या सार्वजनिक प्रसारकांनी, प्रसारण क्षेत्रातलं सहकार्य आणि सहयोगासाठी सध्या ३९ परदेशी प्रसारकांबरोबर सामंजस्य करार केले आहेत.
****
औरंगाबाद इथलं प्रमुख पर्यटन स्थळ असलेला बीबी का मकबरा आज प्रजासत्ताक दिनापासून दररोज रात्री १० वाजेपर्यंत आकर्षक रोषणाईनं उजळणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागानं दिली आहे. या अनुषंगानं भारतीय पुरातत्व विभागानं आज संध्याकाळी सात वाजता बीबी का मकबरा परिसरात विशेष कार्यक्रमांतर्गत महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांचं ध्रुपदांगी कथ्थक नृत्य सादरीकरण होत आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त औरंगाबादमध्ये १५० हून अधिक वस्त्यांमध्ये भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आलं. भारतीय स्व��तंत्र्याचा इतिहास, संविधान आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामात - स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग यावर यावेळी माहिती देण्यात आली.
****
प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. या अंतर्गत मनमाड - औरंगाबाद गाडी उद्या मनमाड इथून सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि औरंगाबाद इथं सकाळी साडे अकरा वाजता पोहोचेल. औरंगाबाद - मनमाड गाडी उद्या दुपारी बारा वाजता निघेल. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - औरंगाबाद ही गाडी आज मध्यरात्रीनंतर बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि औरंगाबाद इथं सकाळी सव्वाआठ वाजता पोहोचेल. औरंगाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही गाडी उद्या रात्री आठ वाजता निघून २८ जानेवारी रोजी पहाटे साडे तीन वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही गाडी ३० जानेवारी रोजी रात्री आठ वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं ३१ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. औरंगाबाद कोल्हापूर या विशेष गाडीची एक फेरी घेण्यात येत आहे. ही विशेष रेल्वे उद्या औरंगाबादहून सकाळी आठ वाजता सुटणार असून कोल्हापूरला मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार असल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचं आज सकाळी नवी मुंबई इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. सुमंतराव गायकवाड यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं १९६० ते ६७ असे सात वर्षे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलं. आज संध्याकाळी सात वाजता मुंबई इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
भगवान बुद्धाच्या अस्थिधातू कलशाचं उद्या औरंगाबादमध्ये आगमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघ थायलंडच्या ११० बौद्ध भिक्खूंना घेवून परभणी इथून ही धम्मयात्रा सुरु झाली असून मुंबई चैत्यभूमीपर्यंत जाणार आहे. औरंगाबाद शहरातल्या केंब्रीज चौकात सकाळी नऊ वाजता या धम्मयात्रेचं आगमन होणार आहे. शासकीय दुध डेअरी समोर भिक्खू संघाद्वारे महापरित्राणपाठ आणि धम्मदेसना आणि भगवान बुद्ध यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक डॉ.पवन डोंगरे यांनी दिली.
****
अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली इथल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरचा सादिक पठाण विजेता ठरला. त्यानं महाराष्ट्र केसरी गटात विजेतेपदासह तीन किलो चांदीची गदा आणि ४१ हजार रुपये रोख रकमेचं पारितोषिक पटकवलं.
****
0 notes
Text
महाराष्ट्र मंत्रिमंडळ: संजय राठोड यांच्या प्रवेशामुळे भाजपने आत्महत्येचे प्रकरण उद्धृत केल्याने वाद निर्माण झाला.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ: संजय राठोड यांच्या प्रवेशामुळे भाजपने आत्महत्येचे प्रकरण उद्धृत केल्याने वाद निर्माण झाला.
यवतमाळमधील दिग्रसचे आमदार संजय राठोड यांच्यावर पुण्यातील महिलेच्या आत्महत्येचा आरोप आहे. मुंबई : संजय राठोड – एकेकाळी टिकटोक स्टारच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले बंडखोर सेनेचे आमदार – महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाजपसोबतच्या युतीमध्ये प्रथमच सार्वजनिक मतभेद निर्माण झाले आहेत. ट्रिगर हे भाजपच्या राज्य युनिटच्या उपाध्यक्षा चित्रा…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राला आज मंत्रिपद मिळणार, या नावांची चर्चा
महाराष्ट्राला आज मंत्रिपद मिळणार, या नावांची चर्चा
नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होत आहे मुंबई : आज महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे पाच आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटातील चार आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळी त्यांच्या छावणीतील आमदारांची भेट घेतली. त्यांना सेनेच्या 55 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेच्या एका गटाने…
View On WordPress
0 notes
Text
१ ऑगस्टनंतरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
१ ऑगस्टनंतरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
१ ऑगस्टनंतरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर राज्यात एकनाथ शिंदे-भाजपची नवी सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही दिवसांत 500 हून अधिक शासन निर्णय मंजूर झाले.मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन जवळपास महिना उलटला तरी महाराष्ट्रात…
View On WordPress
0 notes
Text
शिंदे सरकारच्या खात्यांच्या विभाजनाचा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, मुख्यमंत्रीपद देऊन सर्व काही घेतले
शिंदे सरकारच्या खात्यांच्या विभाजनाचा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, मुख्यमंत्रीपद देऊन सर्व काही घेतले
रविवारी (१४ ऑगस्ट) शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे 14 आणि फडणवीस यांच्याकडे 8 खाती असली, तरी या आठ खात्यांचा ठसा अनोखा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो) एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आ विभागांचे विभाजन सुद्धा झाले. या विभाजनाने उपमुख्यमंत्री ना देवेंद्र…
View On WordPress
0 notes
Text
शिंदे सरकारमध्ये अनेक सुप्त ज्वालामुखी; काही आता फुटतील, काही नंतर फुटतील, महाराष्ट्रावर संकट वाढेल
शिंदे सरकारमध्ये अनेक सुप्त ज्वालामुखी; काही आता फुटतील, काही नंतर फुटतील, महाराष्ट्रावर संकट वाढेल
संजय शिरसाट यांनी शुक्रवारी उशिरा आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख संबोधले, नंतर ते ट्विट डिलीट केले. Dy Cm Devendra Fadnavis Cm एकनाथ शिंदे महाराष्ट्र राजकीय संकट संपलेले नाही. शिंदे गटात बंडाची ठिणगी पडू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या…
View On WordPress
0 notes
Text
TEXT - Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१०
****
· चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांचा शपथविधी.
· ‘घरोघरी तिरंगा’अभियान यशस्वी करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन.
· राज्यातलं सरकार फार काळ टिकणार नाही- नाना पटोले ��ांची टीका.
आणि
· जालन्यामध्ये प्राप्तीकर विभागाच्या धाडीत ३९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.
****
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. उपराष्ट्रपती पदाच्या ६ तारखेला झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेल्या धनखड यांनी विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा ५२८ विरुद्ध १८२ मतांच्या फरकानं पराभव केला होता.
****
रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र उत्साहानं साजरा केला जात आहे. राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण- भावांमधल्या विश्वासाचा हा सण समाजात महिलांबद्दल आदर आणि सद्भावनेला प्रोत्साहन देईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात काम करणारे सफाई कर्मचारी, शिपाई, माळी आणि वाहनचालकांच्या मुलींकडून राखी बांधून घेत हा सण साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना विधानभवन आवारात महिला पोलिसांनी राख्या बांधल्या.
****
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिकानं राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीनं ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयात या संदर्भातला कार्यक्रम झाला, त्यावेळी शिंदे बोलंत होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यातल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा तसंच वर्धक मात्रा देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत विधानभवनात कोविड प्रतिबंधक लसीकरण वर्धक मात्रा देण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन सत्तेवर आलेलं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटांचं सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत केली. हे सरकार जोर जबरदस्ती करुन तसंच पैशांच्या जोरावर सत्तेवर आलं आहे, असा आरोप त्यांनी केला. या सरकारनं तब्बल ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तसंच राज्याची ��ात्काळ खाते वाटपाची पंरपरा मोडीत काढली असून तीन दिवसानंतरही खाते वाटप केलेलं नाही, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये विशिष्ट महत्त्वाच्या खात्यांसाठी लढाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महागाई वाढली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. खतं, बियाणं आणि शेतमजुरांचे भाव तिप्पट वाढले आहेत. अतीवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. येत्या सतरा तारखेपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हे विषय लावून धरणार असल्याचं पटोले म्हणाले.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या मात्र राज्याच्या जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची कोणतीच मागणी केली नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातल्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न येत्या अधिवेशनात सभागृहात मांडणार असल्याचं ते म्हणाले. सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावं असंही पाटील म्हणाले.
****
बीड जिल्ह्यासह अन्य ठिकाणी सोयाबीन आणि विविध पिकांचं गोगलगाय किटकानं केलेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना बोंड आळीच्या धरतीवर विशेष मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन या संदर्भातल्या मागणीचं निवेदन दिलं. राज्य शासनानं नुकतीच अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून यात कुठंही गोगलगायींच्या प्रादुर्भावानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत नाही, असं ते म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटीची वेळ मागितली आहे.
****
भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते मुंबईत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नौदलाच्या पश्चिम विभागातल्या सेवानिवृत्त तसंच सेवेत असलेल्या शौर्य विजेत्या अधिकारी आणि सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. भविष्यातली आव्हानं वेगळ्या प्रकारची असतील, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. माजी नौसेना प्रमुख ऍडमिरल विजय सिंह शेखावत, कमांडर अशोक कुमार, कमांडर अनुप वर्��ा, कॅप्टन होमी मोतीवाला, सर्जन कमांडर अलोक बॅनर्जी, कॅप्टन कौस्तुभ विजयकुमार गोसावी, क्लिअरन्स डायव्हर आनंद सोपान सावंत आणि पेटी ऑफिसर आदेश कुमार या शौर्य विजेत्या माजी आजी अधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं आज अहमदनगर इथं वितरण करण्यात आलं. केरळचे राज्यपाल आरीफ महोमंद खान यांच्या हस्ते आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. साहित्य जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांना यावेळी गौरवण्यात आलं. साहत्यिक रविंद्र इंगळे-चावरेकर, अभय गुलाबचंद कांता, मंगेश नारायण काळे, के.जी भालेराव, हिरालाल पगडाल यांना साहित्य पुरस्कारानं तर दत्ता भगत आणि छबुबाई चव्हाण यांना कला गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
प्राप्तीकर विभागानं जालना इथं छापे टाकून ५८ कोटी रुपयांची रोकड, ३२ किलो सोन्यासह हिरे, मोती असा सोळा किलोंचा ऐवज अशी एकूण ३९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जालन्यातल्या चार स्टील व्यावसायिकांच्या निवासस्थानी, कार्यालयांत ही कारवाई झाली. यात औरंगाबादमधील एका बांधकाम व्यावसायिकाचाही समावेश आहे. गेल्या एक ऑगस्टरोजी सुरू झालेली ही कारवाई आठ ऑगस्टपर्यंत सुरू होती, अशी माहिती प्राप्तीकर विभागानं दिली. नाशिक विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातल्या २६० कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आज नांदेड इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं ३७५ मीटर लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची तिंरगा पदयात्रा काढण्यात आली. या तिरंगा पदयात्रेत विविध पक्षांचे पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीनं हडको इथंल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस, अकलूज या भागात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीमधे पाच हजार नागरिकांनी सहभाग घेतला.
****
0 notes
Text
चंद्रकांत पाटील यांचे कुटुंब चहा विकून जगायचे, आता शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळाले
चंद्रकांत पाटील यांचे कुटुंब चहा विकून जगायचे, आता शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळाले
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन 40 दिवस उलटल्यानंतर अखेर मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. 18 आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांना राजभवनात मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क भाजपचे महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील…
View On WordPress
#एकनाथ शिंदे#चंद्रकांत पाटील#भाजप चंद्रकांत पाटील#महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील#महाराष्ट्र भाजप
0 notes