#भाजप नेते सुधीर मुनगंटीवार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचालींना वेग, भाजप-संयुक्त जनता दलाची नवी दिल्लीत बैठक
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात ६५ टक्के तर राज्यात ६१ टक्के मतदान
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी
रायगडासह राज्यात तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस आज महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाच्या सरी
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. याच अनुषंगानं भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. संयुक्त जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. एनडीएच्या नेत्यांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्याच्या एका दिवसानंतर या बैठका झाल्या. दरम्यान, एनडीएत समाविष्ट घटक पक्षाची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत भाजपसह मित्रपक्षांचे नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहतील.
****
देशात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६५ पूर्णा��क ७९ टक्के मतदान झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही नवीन आक��ेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधील तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यातील राज्यसभा सदस्यत्वासाठी १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहेत. तर, २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कसलीही चर्चा झाली नसून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर तटकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त तटकरे यांनी फेटाळून लावलं. पक्षाच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असून सर्व आमदार बोलावलेल्या बैठकीला येणार आहेत, असंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्यात केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या विरोधात अधिक नाराजी असून येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केले जाईल, असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून महागाई, जीएसटी या प्रश्नांवर यापुढे आवाज उठवला जाईल असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त ��ायगडावर आले आहेत. संपूर्ण रायगड फुलांनी सजविण्यात आला असून आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं असून राज्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात येत आहे. या ठिकाणी आज सायंकाळी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही होत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे.
****
महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी यावेळी स्फोटकं, वायर, बॅटरी, पुस्तकं आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. हे नक्षलवादी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी आले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
****
५८, ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून पर्यंत प्रवेशिका साद�� करता येणार आहेत. निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं आहे. मान्सून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पोहचला. पुणे इथल्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. हौसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग इथं कालपासून तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत लांजा इथं सर्वाधिक १८ पूर्णांक ८० मिलिमीटर पावसाची, तर दापोलीत १६ पूर्णांक ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात आजही पावसाच्या सरी कोसळल्या असून वाशिम जिल्ह्यातही सायंकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात शहादा, प्रकाशा पट्ट्यात मिरची लागवडीची तयारी सुरु असून या��ाठी नाशिक आणि इतर ठिकाणांहून मिरचीचे रोपं मागवण्यात आले आहेत. यंदा मान्सून चांगल्या प्रमाणात झाल्यास, भरघोस पिकाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस परिसरात आज झालेल्या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले आहेत. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या बोलोरो जीपला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. हे सर्वजण जिंतूर तालूक्यातल्या कोक इथले रहिवासी आहेत.
****
धुळे जिल्ह्यात आजपासून २१ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या मोहिमेत अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणं, अतिसाराच्या प्रकरणाच्या व्यवस्थापनासाठी तरतूद करणं, ओआरएस आणि झिंग कॉर्नरची स्थापना करण्यासह मोहिम प्रभावी राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.
****
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार वृक्षारोपण केलं जात आहे.
भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढविण्यासाठी कार्यरत आहे. यंदा आणि पुढील वर्षात इको बटालियनमार्फत धारुर तालुक्यात किल्ले धारुर आणि घागरवडा येथे सव्वा दोन लाख वृक्ष लागवड करणार आहे.
****
महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेला छत्रपती संभाजीनगर इथून सुरुवात झाली आहे. शेतकरी वर्गाला पीक कर्ज नुतनीकरण, व्याज परतावा आणि शासनाच्या प्रोत्साहनपर योजनांचं महत्व पटवून देत यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. बीड जिल्ह्यात ही संवाद यात्रा येत्या नऊ, दहा आणि अकरा तारखेपर्यंत जनजागृती करणार आहे. बँकेची योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर माहिती दिली जाणार आहे. ही संवाद यात्रा मराठवाड्यात ११ दिवस असेल.
****
नांदेड इथं येत्या मंगळवारी ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
****
0 notes
Text
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासोबतच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचीही घोषणा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच होणार आहे. या कॅबिनेट विस्तार त्यानंतर लगेचच गणेशोत्सव होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
Text
निवडणूक आयोगाचा संविधानावर घाव घालणारा निर्णय
छाननी न करताच निर्णय सुनावला, सावंत यांचा आरोप, नेत्यांच्या प्रतिक्रिया मुंबई : निवडणूक आयोगाने सर्व तक्रारी आणि आम्ही उत्��र दिलेले त्याचीदेखील छाननी केलेली नाही. छाननी न करताच अवघ्या चार तासांत पक्ष व चिन्हाचा निर्णय दिला. निवडणूक आयोग कोणाच्या आदेशावर चालत आहे, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. देश हुकमशाहीकडे चालला आहे. छाननी न करता दिलेला निर्णय हा देशाच्या संविधानावर घाव घालणारा आहे, असा आरोप खा. अरविंद सावंत यांनी केला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सावंत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकशाहीवर विश्वास ठेवणा-या जनतेच्या पाठीत सुरा खूपण्याचे काम केले जात आहे. भाजपचे अनेक लोक न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधीच शिंदेची शिवसेना खरी असल्याचे सांगत होते. त्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होत आहे. पण जेवढा आम्हाला त्रास दिला जाईल, तेवढी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना बळकट होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. तसेच खा. विनायक राऊत यांनीही निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्हाला काही बोलायचे नाही. पुढे काय पावले उचलावी, यावर आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, असे म्हटले. खा. अनिल देसाई यांनीही हा निर्णय अनपेक्षित होता. हा निर्णय धक्कादायक आहे, असे म्हटले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, तो आम्हाला स्वीकारावा लागणार आहे. आता पुढची रणनीती काय आहे ते आम्ही ठरवू, असे म्हटले. तसेच दीपक केसरकर यांनी ज्यांची मेजॉरिटी जास्त त्यांचाच पक्ष असतो, असे म्हटले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणा-यांचे नावही संपले आणि चिन्हही, असे ट्विट केले. तसेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला आनंदही नाही, खंतही नाही आणि दु:खही नाही. कारण हा निर्णय भाजपशी संबंधित नाही, असे म्हटले. आमच्यातल्या फितुरांच्या साथीने तुम्ही जिंकलात सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असे होत नाही. मोदी-शहाजी, फडणवीसजी तुम्ही जिंकलात, अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला, कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली. पण आम्ही खडकातून पुन्हा उगवू, असेही त्या म्हणाल्या. गद्दारांचा नीच व निर्लज्ज प्रकार आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत शिंदे गटावर हल्लाबोल केला. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला. पण महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणारच, असे ते म्हणाले. ये तो हो��ा ही था : सोमय्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ये तो होनाही था. प्रथम सरकार गमावले, हिंदुत्व गमावले, चिन्ह, नाव आणि त्यानंतर सर्वच गमावणार. अर्थात, उद्धव ठाकरे गटाचा पराभव अटळ आहे, असे सोमय्या म्हणाले. Read the full article
0 notes
Text
फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार
फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार
फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच निर्णयात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत, की राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांनी फोन उचलताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे, तसे आदेश लवकरच दिले जातील. The post फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार appeared first on द वायर मराठी. मुंबई: महाराष्ट्राचे…
View On WordPress
#“वंदे#“हॅ��ो’#आताची बातमी#उचलल्यावर#ऐवजी#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#फोन#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मातरम’#मुनगंटीवार#म्हणावे:#रेगुलर अपडेट#वायरल बातमी
0 notes
Text
विधानसभेत पाहिला "कॉमेडी सम्राट" ; आ. नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
विधानसभेत पाहिला “कॉमेडी सम्राट” ; आ. नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
सिंधुदुर्ग : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणशैलीवर त्यांना उपहासाने नटसम्राट उपमा देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे युवा नेते, आमदार नितेश राणेंनी “कॉमेडीसम्राट” उपमा दिली आहे. “आज एक कॉमेडी सम्राट विधानसभेत पाहिला आणि ऐकला… महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही, ” कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री ?” असं ट्विट आ. राणेंनी केलं आहे. …
View On WordPress
0 notes
Text
#Maharashtra #विधानसभाकामकाज राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू : अजित पवार
#Maharashtra #विधानसभाकामकाज we-will-set-up-a-statutory-development-corporation-as-soon-as-the-governor-announces-the-appointment-of-12-members-ajit-pawar
मुंबई: वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालां���ी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास…
View On WordPress
0 notes
Text
sudhir mungantiwar: chitra wagh: चित्रा वाघ यांना सरकार बदनाम करतंय; सुधीर मुनगंटीवार यांचा गंभीर आरोप - the government is defaming chitra wagh serious allegations by sudhir mungantiwar
sudhir mungantiwar: chitra wagh: चित्रा वाघ यांना सरकार बदनाम करतंय; सुधीर मुनगंटीवार यांचा गंभीर आरोप – the government is defaming chitra wagh serious allegations by sudhir mungantiwar
हायलाइट्स: भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्क करण्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. चित्रा वाघ या आवाज उठवत असल्याने सरकार त्यांना अशा प्रकारे बदनाम करत आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. चौकशी होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे- सुधीर मुनगंटीवार. मुंबई: पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी (Pooja chavan alleged…
View On WordPress
0 notes
Text
... म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी केलं 'अग्गंबाई सासुबाई' मालिकेचं कौतुक
… म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी केलं ‘अग्गंबाई सासुबाई’ मालिकेचं कौतुक
[ad_1]
मुंबई: अल्पावधीच लोकप्रिय झालेली मालिका ‘अग्गंबाई सासुबाई‘ या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत असू असे काही बदल प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. या मालिकेतील पात्रांची सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू असते. या मालिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी हा व्हिडिओ शेअर करत मालिकेचं कौतुक केलं आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ या…
View On WordPress
#Agga Bai Sasubai#agga bai sasubai new episode#sudhir mungantiwar#sudhir mungantiwar on agga bai sasubai#अग्गंबाई सासुबाई#तेजश्री प्रधान#धीर मुनगंटीवर#निवेदिता सराफ
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि क���ँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड भाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यां��्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज यांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांना सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या ��मी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्र��ान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच साबित हुवा। मुझे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
Text
महाराष्ट्रात ‘वंदे मातरम’ म्हणण्याच्या आदेशावरून वाद, रझा अकादमीचा आक्षेप
महाराष्ट्रात ‘वंदे मातरम’ म्हणण्याच्या आदेशावरून वाद, रझा अकादमीचा आक्षेप
‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ बोलून संभाषण सुरू करण्याच्या आदेशावरून महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. यावर सईद नुरी यांनी आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सईद नुरी रझा अकादमी ‘आम्ही फक्त अल्लाहची पूजा करतो. वंदे मातरम याशिवाय दुसरा पर्याय द्या. सर्वांना मान्य असेल असा पर्याय द्या. या शब्दात रझा अकादमी सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र सरकार…
View On WordPress
0 notes
Text
राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका नाही : सुधीर मुनगंटीवार
राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका नाही : सुधीर मुनगंटीवार
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या खासदार नारायण राणे यांना त्यांच्याच पक्षाने झटका दिला आहे. कारण नारायण राणेंने केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. “राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी आहे”,…
View On WordPress
0 notes
Text
Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका
Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका
Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव संजय राऊतांना होता. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत आहेत. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांना काल ईडीनं अटक केली. आज त्यांना कोर्टात…
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्रिपदावर युवासेनेचे सरदेसाईं यांचे मोठं खुलासा
मुख्यमंत्रिपदावर युवासेनेचे सरदेसाईं यांचे मोठं खुलासा
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना-भाजप महायुती कामाला लागली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले होते. अमित शाह यांच्या वक्तव्याला राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही समर्थन दिले होते.
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रपती राजवटीवरून भाजपमध्येच जुंपली
राष्ट्रपती राजवटीवरून भाजपमध्येच जुंपली
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही वैयक्तिक असून ही पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने नाराज राणेंनी, मी देखळी माजी मुख्यमंत्री आहे. मी काय काल राजकारणात आलेलो नाही, असे प्रतिउत्तर दिले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे वरील मत व्यक्त केले, ते म्हणाले, मी भाजप नेत्यांना विचारायला गेलेलो नाही. सुधीर…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी तीनशेहून अधिक जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २०० ते २०५ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास ३० जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर तर उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २�� जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसर्या फेरी अखेर महायुतीचे संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसर्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसर्या क्रमांकावर आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. जालना मधून महायुतीचे रावसाहेब दानवे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा - गोंदिया मधून महायुतीचे सुनिल मेंढे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसर्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे, नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महायुतीचे कपिल पाटील, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महाविकास आघाडीचे निलेश लंके, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महायुतीचे धैर्यशील मोहिते पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, इशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत.
****
उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र ��ोदी आघाडीवर आहेत. अमेठी मतदरासंघातून काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर, तर भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दुसर्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली इथून तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत.
****
मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे.
****
मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्रं आपल्याला ऐकता येतील. त्याशिवाय, निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम देखील सादर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होऊन, निवडणूक निकालाबात माहिती देत आहेत.
****
राज्यातली पाणी टंचाई, बी - बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघातप्रकरणी सरकारी अधिकारी डॉक्टरांचा समावेश, या विषयांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार दोन ही योजना फोल ठरल्याचं दानवे म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून या आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं लातूर जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे. या काळात विना परवानगी मिरवणूक काढणं, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई असून या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तर विद्यमान खासदार अशोक नेटे हे गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. पंतप्रधान यानंतर १० तारखेला नागपूर इथं रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
****
दिल्लीतल्या कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज दिल्लीतल्या राऊस न्यू अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. के. कविता यांना २६ मार्च रोजी ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १५ मार्च रोजी ईडीनं त्यांना हैदराबाद इथल्या राहत्या घरातून अटक केली. त्या सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
****
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद -एनसीईआरटीनं त्यांच्या शैक्षणिक साहित्यावरील स्वामित्व हक्कांबाबत निर्देश जारी केले आहेत. जर एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेनं परवानगीशिवाय एनसीईआरटीची अधिकृत पाठ्यपुस्तकं व्यावसायिक वापरांसाठी प्रकाशित केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा परिषदेनं दिला आहे. नक्कल करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकातला मजकूर चुकीचा असू शकतो, त्यामुळं अशी पाठ्यपुस्तकं किंवा कार्यपुस्तकं लोकांनी वापरू नये, असं आवाहनही एनसीईआरटीच्या वतीनं करण्यात आलं आहे. नक्कल केलेली पाठ्यपुस्तकं किंवा कार्यपुस्तकं आढळल्यास एनसीईआरटीला कळवावं असंही आवाहनही करण्यात आलं आहे.
****
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा द��ानं दोन ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. ही स्फोटकं नक्षलवाद्यांनी लपवून ठेवली असल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांसह एका नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांनी काल अटक केली. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या तिघांवर महाराष्ट्र शासनानं साडेपाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक कारवाया रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या नक्षलविरोधी अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. परभणी लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य निवडणूक निरीक्षक कृष्ण कुमार निराला यांच्या उपस्थितीत बाळासाहेब उगले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
****
दरम्यान, अकोला लोकसभा मतदार संघातही आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असून, दुपारी निवडणूक चिन्हांचेही वितरण होणार आहे. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि भाजप या तिनही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे तसंच भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांच्यासह १७ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.
****
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच समन्वय नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या उर्वरित जागांबाबत दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण परभणी लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरता अमरावतीत निवडणूक मतदार जागृती स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विभागिय क्रीडा संकुलात आज सकाळी पाच हजार विद्यार्थी, नागरीक आणि युवा मतदारांनी मानवी साखळी तयार करत मतदानाबाबत जनजागृती केली. मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदारांना मतदानानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, पद्मश्री शंक��� बाबा पापळकर आदींची उपस्थिती होती.
****
रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळ काल रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला. यांत रिक्षातल्या तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही बस दापोलीला जात असताना माणगावला मानस हॉटेल समोर आली. त्यावेळी हा भीषण अपघात घडला.
****
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पुढच्या २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes