#नवनीत राणा आणि रवी राणा
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, नायजेरियाची राजधानी अबुजा इथं काल ते पोहोचले असून सतरा वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नायजेरिया दौरा आहे तर गयानाला १९६८ नंतर भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. ब्राझीलमध्ये रियो दे जानेरो इथं उद्या १८ तारखेला जी-२० शिखर बैठकीत पंतप्रधान उपस्थित राहतील. या दौऱ्यामुळं या देशांसोबत लोकशाही आणि वचनबद्धतेवर आधारित सामरीक भागीदारीचं नवं द्वार उघडेल, असा विश्वास त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान या देशांसोबत विविध क्षेत्रातील अनेक करार देखील अपेक्षित आहेत.
दरम्यान, नायजेरियामध्ये स्थित मराठी भाषिक आपली संस्कृती आणि भारताशी संलग्न राहत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. नायजेरियातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पुण्यातून जळगावला जाणाऱ्या वाहनातून पाच कोटी ५९ लाख ६१ हजार रुपयांचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. परवा रात्री उशिरा जळगाव शहरातल्या रेमंड चौकात स्थानिक गुन्हे ��ाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. जवळपास चार किलो सोनं आणि ३४ किलो चांदी जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, परवा दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार इथं भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची काल प्रचार सभा सुरू असताना गोंधळ झाला, त्यामुळं एक गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी झाली. दर्यापूर मतदार संघात शिवसेनेकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ हे उमेदवार असून त्यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदेले यांच्यात लढत होत आहे, या ठिकाणी महायुतीमध्ये दोन गट आहेत. काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गोंधळ झाला, यानंतर नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेतील किसान चौकातकाल प्रचार सभा झाली.
आजच्या दोन वर्षानंतर इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धनामध्ये अनेक कामं केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव इथं सोनाजी महाराज संस्थानमध्ये अकरा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री विठ्ठलाच्या उत्सवाची काल मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. भालेगाव इथं संत श्री नरहरी महाराजांनी सुरु केलेल्या या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा असून प्रती पंढरपूर म्हणून भालेगावच्या या विठ्ठलाची ओळख जिल्हाभरात आहे.
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घरातील लग्न झालेली मुलगी हजेरी लावते तसंच खामगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी होतात.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४६ लाख रुपयांचा मुद्देम��ल जप्त करण्यात आला असून २४० गुन्ह्याची नोंद करून २२६ संशयीतांना अटक करण्यात आली. तर १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात ४७ गुन्हे नोंदवून ३९ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक सामाजिक प्रसार माध्यामावर प्रसारित झाली आहे. याबद्दीलची तक्रारी काही उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतल्या गणेश शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याने त्याला निर्गमित करण्यात आलेल्या या टपाली मतपत्रिकेचं छायाचित्र मत नोंदवल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीमधून प्रसार माध्यमांवर टाकलं. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितलं आहे.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्य ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
Text
हनुमान चालीसा पंक्तीत खासदार-आमदार जोडप्याच्या जामीनाला महाराष्ट्र आव्हान देणार आहे
हनुमान चालीसा पंक्तीत खासदार-आमदार जोडप्याच्या जामीनाला महाराष्ट्र आव्हान देणार आहे
त्यांनी त्यांच्या जामीन अटींचा भंग केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकार न्यायालयात याचिका करणार आहे, असे विशेष सरकारी वकील अधिवक्ता प्रदीप घरत यांनी एनडीटीव्हीला सांगितले. राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी हनुमान चालीसा प्रकरणी अटक केली होती. श्री. घरत म्हणाले की, या जोडप्याचे…
View On WordPress
0 notes
Text
नवनीत आणि रवी राणा यांना जामीन मंजूर
नवनीत आणि रवी राणा यांना जामीन मंजूर
नवनीत आणि रवी राणा यांना जामीन मंजूर मुंबई उच्च न्यायालयानं खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना सेशन्स कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसेचं पठण करण्यासंदर्भात राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. कोर्टाने जामीन देताना राणा दाम्पत्यावर काही अटी लादल्या आहेत. जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही असं…
View On WordPress
0 notes
Text
“हनुमानाने उद्धव ठाकरेंना शाप दिला म्हणूनच धनुष्यबाण गोठवण्यात आलं”
मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. मात���श्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास केल्यानंतर राणा दांपत्याला अटक देखील झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसाचा संदर्भ देत टीका केली आहे. आम्हाला 14 दिवस तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा खोचक टोला रवी राणांनी लगावला आहे. दरम्यान, हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा शाप दिलाय. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला त्याचीच त्यांना सजा मिळाली, असंही रवी राणा म्हणाले आहेत. Read the full article
0 notes
Text
महाराष्ट्रात सत्ता बदलताच दृष्टीकोन बदलला? नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्रात सत्ता बदलताच दृष्टीकोन बदलला? नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्याची मागणी
सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांचा जामीन रद्द करताना त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली. नवनीत राणा आणि रवी राणा (फाइल फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय हनुमान चालिसा पाठ संबंधित एका प्रकरणात अमरावतीचे खा नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतात. राणा दाम्पत्य न्यायालयाच्या निर्देशांचे…
View On WordPress
0 notes
Text
राणा दाम्पत्याविरोधात 85 पानी आरोपपत्र दाखल
राणा दाम्पत्याविरोधात 85 पानी आरोपपत्र दाखल
मुंबई – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध पोलिसांनी आज ( 8 मे ) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी ८५ पानी आरोपपत्रात २३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध बोरिवली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम ३५३ आणि ३४ अंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि रवी राणांच्या वतीने…
View On WordPress
0 notes
Link
मुंबईतील नवनीत राणा यांच्या फ्लॅटला नोटीस मिळाल्यानंतर आता ही संपूर्ण इमारतच अडचणीत सापडली आहे. इमारतीतील सर्वच फ्लॅटधारकांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस पाठवली आहे. नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर करण्यात आला होता.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 May 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ मे २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· देशद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
· वैयक्तिक लाभाच्या योजना आधार कार्डशी जोडण्याचा राज्यसरकारचा निर्णय
· माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचं काल दिल्ली इथं निधन
· राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे २२१ रुग्ण
· रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणं पुन्हा बंधनकारक
· औरंगाबाद शहरातल्या ले��र कॉलनीतली बहुतांश निवासस्थानं भुईसपाट
· बीड जिल्ह्यात रस्ता अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू
आणि
· जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत ज्योती याराजी हिला शंभर मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत सुवर्णपदक
****
देशद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत नाही, तोपर्यंत हा कायदा स्थगित करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठानं, कलम १२४ अ अंतर्गत कोणतेही गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. यापूर्वी देशद्रोहाच्या गुन्ह्यांवरून तुरुंगात असलेल्या आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात दाद मागावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय लागू असेल, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.
सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी, सरकार न्यायसंस्था आणि तिच्या स्वातंत्र्याचा आदर करत असल्याचं म्हटलं आहे.
****
दरम्यान, आमदार रवी राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. खासदार नवनीत राणा यांच्यासह काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना राणा यांनी, राज्य सरकार इंग्रजांच्या कायद्याचं पालन करत असल्याचा आरोप केला.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे अनेक निर्णय घेण्यात आले. वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी लाभार्थींची नावं येत्या ३० डिसेंबरपर्यंत आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
ज्या विभागांमध्ये पोषण आहार आणि तत्सम बाबींचा धान्य पुरवठा होत असतो त्यासाठीच्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकींग व्यवस्था येत्या ३० डिसेंबर, पर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहे. येत्या १ जून पासून सर्व संबंधित विभागाच्या सचिवांनी आपापल्या विभागातील मास्टर डेटाबेस देखील अद्ययावत ठेवण्याचंही या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे.
महाऊर्जानिर्मिती कंपनीकडील ४१८ मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. को��िड प्रादुर्भावामुळे मुदतवाढ न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. यंदा राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये ४१ पूर्णांक १९ शतांश टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ३९ पूर्णांक ९२ शतांश टक्के इतका होता. राज्यात २८१ गावे, ७३८ वाड्यांना सध्या २७० टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढवण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी रुपये निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्यातील कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर आणि सोयाबीन पिकाखाली ४६ लाख हेक्टर असं एकूण ८८ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून या प्रमुख पिकांची उत्पादकता अन्य देशाच्या तुलनेत कमी आहे, या विशेष कृती योजनेसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे.
****
किमान आधारभूत किंमतीनं हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मार्च महिन्यापासून चार लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत दोन लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, ५० लाख ८४ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
****
माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं काल दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार राज्यमंत्री होते. हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे श्रेय पंडित सुखराम यांना जातं.
****
प्रसिद्ध संतूरवादक आणि संगीतकार पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा पार्थिव देह जुहू इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, तबलावादक उस्ताद जाकीर हुसैन, यांच्यासह सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंडित शिवकुमार शर्मा यांचं परवा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.
****
हरियाणातल्या कर्नाल इथून अटक करण्यात आलेल्या ��हशतवाद्यांचा ताबा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक घेणार आहे. गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांवर राज्यातही काही गुन्हे दाखल आहेत. हे दहशतवादी स्फोटकं घेऊन नांदेड तसंच तेलंगणात जात असताना त्यांना गेल्या आठवड्यात पकडण्यात आलं होतं.
****
राज्यातल्या महापालिका तसंच नगर पंचायती निवडणुका सप्टेंबर महिन्यात तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. ही मागणी करणारा अर्ज काल न्यायालयात दाखल करण्यात आला.
****
एका तांत्रिक अडचणीमुळे मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाविना निवडणूक घ्याव्या लागत आहेत, त्यामुळे राज्य सरकारनं मध्य प्रदेशचं उदाहरण देण्याऐवजी आपण स्वत: ओबीसी आरक्षणासाठी काय केलं याचा हिशॊब द्या, असं भाजपचे प्रदेश सचिव आमदार अतुल सावे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक पत्र जारी केलं. मध्य प्रदेश सरकारनं या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्याचं जाहीर केलं आहे, तर ठाकरे सरकार मात्र गेली दोन वर्षे चालढकल करत आहे, असा आरोप सावे यांनी केला.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २२१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७९ हजार ८४३ ��ाली आहे. काल या संसर्गाने एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८४९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २११ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३० हजार ५८१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ४१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
कोरोना साथरोगाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेत रेल्वेने प्रवासादरम्यान मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. रेल्वेचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. प्रवाशांना मास्क घातल्यानंतरच स्थानकात प्रवेश दिला जाणार असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या लेबर कॉलनी इथं मोडकळीस आलेली जवळपास ३३८ शासकीय निवासस्थानं काल भुईसपाट झाली. काल सकाळी सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती. कायदेशीर लढाई संपल्यानंतर इथल्या रहिवाशांनी प्रशासनाला चांगलं सहकार्य केल्याचं विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी यावेळी व्यक्त केलं. इथल्या ज्या नागरिकांना खरंच निवारा नाही त्यांची पडताळणी करुन त्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात यादी करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
****
औरंगाबाद शहरातला पाणीप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महानगरपालिकेचे प्रश���सक आस्तिक कुमार पांडेय यांनी सर्व नऊ प्रभागात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आजपासून सर्व पालक अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा करण्याच्या वेळेस सदर व्हॉल्व्ह च्या ठिकाणी उपस्थित राहून, संबंधित कर्मचारी वेळेवर व्हॉल्व्ह सुरू करतो का, किती वेळ व्हॉल्व्ह सुरू राहतो, यावर देखरेख ठेवण्यात यावी, असे निर्देश पांडेय यांनी दिले आहेत.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या २०१९-२० या वर्षासाठीच्या पुरस्कारामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या दोन ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार हिंगोली तालुक्यातल्या दाटेगाव ग्रामपंचायतीला, तर सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा विशेष पुरस्कार कळमनुरी तालुक्यातल्या बोल्डावाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वांगी ग्रामपंचायतीला औरंगाबाद विभागीय स्वच्छता स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर खेड ग्रामपंचायतीला पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी जवळील धामणगाव घाटात झालेल्या अपघातात बीडच्या टेकवाणी कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. काल सायंकाळी चारचाकी गाडीने पुण्याहून बीडकडे येत असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला आदळली. टेकवाणी बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंब आहे.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या हिंगणगाव इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यानं झाडाला गळफास लावून काल आत्महत्या केली. नामदेव जाधव असं या तीस वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून, तोडणीला आलेला ऊस, नेला जात नसल्यानं त्यानं ऊस पेटवून दिला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची काल भेट घेतली. शासन निर्णयानुसार देय असलेली मदत कुटुंबियांना देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या मर्यादा लक्षात घेता, अतिरिक्त ऊस नेण्यासाठी परभणी, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना ऊस नेण्यासाठी विनंती करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
सायप्रस इथं सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजी हिनं महिलांच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे. ज्योती हिने ही शर्यत १३ सेकंद आणि २३ मिली सेकंदात पूर्ण करून नवा राष्ट्रीय विक्रमही केला आहे. या पदकामुळे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ज्योती पात्र ठरली आहे. भारताची धावपटू लिली दास हिने या स्पर्धेत पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे, तर पुरुष���ंच्या दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत अमलन बोरगोहाई याने कांस्यपदक पटकावलं आहे.
****
बीड जिल्ह्यात केज इथल्या मांजरा धरणाचे सहा दरवाजे काल उघडण्यात आले. त्याद्वारे नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत विसर्ग सुरु राहणार असून, पाच उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये एकूण ११ पूर्णांक ४७ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे.
****
लातूर शहरात नळाद्वारे नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा पिवळसर रंग नाहीसा करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तोपर्यंत लातूरकरांनी संयम बाळगावा, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे. उन्हाळ्यात प्रकल्पातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर अशी समस्या उद्भवते. या समस्येवर मनपा लवकरच तोडगा काढेल, असं आश्वासनही गोजमगुंडे यांनी दिलं.
****
नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, नद्या आणि पाझर तलाव यांची संख्या लक्षात घेता मान्सूम पूर्व कामाच्या नियोजनात प्रत्येक विभागानं दक्षता घेणं आवश्यक आहे असं जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचित केलं आहे. काल जिल्ह्याची मान्सूनपूर्व बैठक ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली,त्यावेळी ते बोलत होते. पावसामुळे जीवीत अथवा भौतिक नुकसान होऊ नये या दृष्टीने अधिक दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
****
अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर इथं उद्या माता रुख्मिणीचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
हनुमान चालीसा वाद : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
हनुमान चालीसा वाद : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
हनुमान चालीसा वाद : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्र्याच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या हॉलिडे आणि संडे कोर्टाने रविवारी हा निकाल दिला. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची…
View On WordPress
0 notes
Text
“हनुमानाने उद्धव ठाकरेंना शाप दिला म्हणूनच धनुष्यबाण गोठवण्यात आलं”
मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास केल्यानंतर राणा दांपत्याला अटक देखील झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसाचा संदर्भ देत टीका केली आहे. आम्हाला 14 दिवस तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा खोचक टोला रवी राणांनी लगावला आहे. दरम्यान, हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा शाप दिलाय. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला त्याचीच त्यांना सजा मिळाली, असंही रवी राणा म्हणाले आहेत. Read the full article
0 notes
Text
नवनीत राणाचा जीव धोक्यात! राजस्थानच्या सीमेवरून आलेल्या काही लोकांनी होम रेकी केली, असा इशारा हितचिंतकांनी दिला
नवनीत राणाचा जीव धोक्यात! राजस्थानच्या सीमेवरून आलेल्या काही लोकांनी होम रेकी केली, असा इशारा हितचिंतकांनी दिला
राजस्थानच्या सीमेवरील काही लोकांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अमरावती येथील घराची रेस केली आहे. असा इशारा त्यांच्या एका हितचिंतकाने पत्र लिहून दिला आहे. नवनीत राणा लाइफ इन थ्रेट एका शुभचिंतका��ा पत्र पाठवून माहिती देतात महाराष्ट्राचे अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि तिचा नवरा रवी राणा जीव धोक्यात आहे. अमरावती येथील राणा दाम्पत्याच्या घराची काहींनी रेकी केली आहे.…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
राणा दाम्पत्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार , पोलीस न्यायालयात
राणा दाम्पत्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार , पोलीस न्यायालयात
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी जामीन अटींचे उल्लंघन केल्याबद्दल विशेष न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. खार पोलिसांनी राणा दांपत्याला पुन्हा अटक करण्यासाठी न्यायालयात जामीनपात्र अजामीनपात्र याचिका दाखल केली होती त्याची दखल घेत न्यायालयाने नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा…
View On WordPress
0 notes
Text
राणा दाम्पत्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार , पोलीस न्यायालयात
राणा दाम्पत्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार , पोलीस न्यायालयात
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी जामीन अटींचे उल्लंघन केल्याबद्दल विशेष न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. खार पोलिसांनी राणा दांपत्याला पुन्हा अटक करण्यासाठी न्यायालयात जामीनपात्र अजामीनपात्र याचिका दाखल केली होती त्याची दखल घेत न्यायालयाने नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा…
View On WordPress
0 notes
Text
Navneet Rana : खासदार नवनीत राणांना रुग्णालयातून डिस्चार्ज ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
#Navneet Rana : खासदार नवनीत राणांना रुग्णालयातून डिस्चार्ज ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान #Mumbai #Maharashtra
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज . रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा दिसली. एवढंच नाहीतर रुग्णालयाबाहेर नवनीत राणा यांच्या स्वागतासाठी काही समर्थक उपस्थित होते. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा समर्थकांकडून स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री…
View On WordPress
#Maharashtra#Mumbai#Shivsena#UdhavThakrey#cm uddhav thackeray#hanuman Chalisa row#Navneet Rana#navneet rana news today#Navneet Rana vs Shivsena#Ravi Rana#Shiv Sena#नवनीत राणा#महाराष्ट्र#मातोश्री#मुंबई#रवी राणा#हनुमान चालिसा वाद
0 notes