Tumgik
#दिवसांचं
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
shrikrishna-jug · 6 months
Text
ढगाळ वातावरण
शेतात रोज उन्हाळी वातावरण पाहून,कंटाळा आल्यासारखं होतं.आणि ढगाळ पावसाळी वातावरणाची आठवण येत राहते.ढगाळ दिवसांत शेतावर काम करत असल्याची अनुभवून गेलेली आठवण,मी माझ्या वहीत एकदा कधी लिहून ठेवली होती ती वाचत होतो. “कधीकधी मला ढगाळ दिवस पण आवडतात त्यांचं सौंदर्य मला मोहित करतं. सर्वसाधारणपणे बरेच लोक उन्हाळी दिवसांचं कौतुक करताना दिसतात.आनंद आणि उच्च उत्साह मिळतो असं त्यांना वाटत असतं.निळ्या आकाशात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 08 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यात गेल्या दहा - पंधरा दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भात विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजही नाकारला, मात्र वडेट्टीवार यांना निवेदन देण्यास सांगितलं. राज्यात जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असून, पंचनाम्यासंदर्भात सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केली. यानंतर अध्यक्षांनी पुढचं कामकाज सुरु केल्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत तत्काळ चर्चा क��ण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली.
हा विषय गंभीर आणि महत्वपूर्ण असून, यासंदर्भात सभागृहात चर्चा कधी होईल हे कळवण्यात येईल, असं अध्यक्षांनी सांगितलं.
****
राज्यात ज्यांची वीज जोडणी थकाबकिपोटी कायमस्वरुपी खंडित केली आहे, त्यांना पुन्हा जोडणी देण्यासाठी नवी सोपी योजना आणली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मीटर रीडिंग न घेताच परस्पर बिले देण्याचा प्रकार जिथे झाला आहे त्यांना विशेष मोहीम राबवून नव्याने सुधारित बिले दिली जातील अशी माहिती त्यांनी दिली. सदस्य विनोद निकोले, राजेश टोपे, सुनील भुसारा आदींनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
****
राज्य सरकार एक नवीन एव्हिएशन अर्थात उड्डयन धोरण आणणार असून यामध्ये विमानतळाप्रमाणेच हेलीपोर्ट तयार करण्याची सुद्धा तरतूद असेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर इथं आज एअरबस एमआरओ फॅसिलिटी चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पर्यटन क्षेत्रात आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये उड्डयन क्षेत्राचा फार मोठा सहभाग असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेऊ नये या आशयाचं देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नवाब मलिक यांची भुमिका जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीनं व्याज दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत २०२३-२४ या आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के कायम ठेवण्यात आला आहे. देशांतर्गत मागणी चांगली असल्यानं अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे. महागाईही कमी होण्याची चिन्ह दिसत असल्यानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. रेपोदरात वाढ न केल्यामुळं गृहकर्जदारांना दिलासा मिळाला असल्याचं दास यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वास्तविक एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्के असल्याचं देखील ते म्हणाले.
****
केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ पद्धतीने संवाद साधणार आहेत. देशातल्या नागरिकांनी विकसित भारत दूत व्हावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. केंद्र सरकारची विविध विकासकामं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या दूतांना मिळेल. नमो ॲपवर १०० दिवसांचं आव्हान पूर्ण करण्याचा संकल्प करून यात सहभागी होता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा ४१वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक ठेवण्यात येणार असल्यामुळे राज्यात औषधाचा तुटवडा भासणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
केरळ इथल्या सबरीमला जत्रेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून केरळमधल्या कोट्टयम करता विशेष गाड्या चालवणार आहे. कोट्टयम - सिकंदराबाद विशेष ‌गाडी दहा तारखेला, आदिलाबाद - कोट्टयम विशेष गाडी २५ डिसेंबर आणि एक जानेवारीला, तर कोट्टयम - सिकंदराबाद विशेष गाडी २७ डिसेंबर आणि तीन जानेवारीला सुटणार आहे.
****
मलेशियामध्ये सुरु असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत ���ाल भारताला स्पेन कडून चार - एक असा पराभव पत्करावा लागला. भारताचा शेवटचा साखळी सामना उद्या कॅनडा सोबत होणार आहे.
****
0 notes
pradip-madgaonkar · 2 years
Text
Bandya : साखरपुडा आणि लग्न यात…
काही दिवसांचं अंतर का ठेवलं जातं?
Pradip : उद्या कोणी असं म्हणायला नको की…
तुम्हाला दुर्घटनेपासून वाचण्याची संधी
देण्यात आली नव्हती.
0 notes
bandya-mama · 2 years
Text
Bandya : साखरपुडा आणि लग्न यात…
काही दिवसांचं अंतर का ठेवलं जातं?
Pradip : उद्या कोणी असं म्हणायला नको की…
तुम्हाला दुर्घटनेपासून वाचण्याची संधी
देण्यात आली नव्हती.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. ढगांचा गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यासाठी 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे : पावसाचा अंदाज असूनही, पुणे येथील भारतीय हवामान विभागानुसार (India Meteorological…
View On WordPress
0 notes
marathitv9-blog · 5 years
Link
0 notes
kokannow · 4 years
Text
युवा डान्सिंग क्वीन जज सोनाली कुलकर्णी ने  स्वीकारलं  ३७ दिवसांचं फिटनेस चॅलेंज !! 
उत्तम आरोग्य, ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाऊनमध्ये घरातच बसावं लागत असल्यामुळे, अनेकांच्या फिटनेसवर परिणाम झालेला दिसत आहे. अर्थात, घरी राहूनही फिटनेसची काळजी घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. सेलिब्रिटी मंडळी सुद्धा यात मागे नाहीत. घरच्या घरी व्यायाम आणि डाएटचा फंडा वापरून, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
आपल्या वक्तव्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह करणार दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या
आपल्या वक्तव्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह करणार दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या
‘निवडणूक प्रक्रियेनंतर आता चिंतन आणि मनन करण्याची वेळ आली आहे. या काळात माझ्या बोलण्यामुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते आणि प्रायश्चित्त करण्यासाठी दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या करत आहे,’ असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे.
मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला भाजपने काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भोपाळमधून उमेदवारी दिली होती.
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
आकाशव���णी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०७ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाडा आणि विदर्भाचा सर्वांगीण विकास तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय याला आपल्या सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आजपासून १४ दिवसांचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला काल संध्याकाळी पत्रकार परिषेदत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. 
****
नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी विरोधीपक्ष सदस्यांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. आंदोलकांनी यावेळी संत्र्यांच्या माळा परिधान करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधी घोषणा दिल्या. 
****
आज सशस्त्र सेना ध्वज दिन. हुतात्मा सैनिकांच्या सन्मानार्थ १९४९ पासून दरवर्षी सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असून सैनिकांनी देशाप्रती दिलेल्या निस्वार्थ योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा ध्वज दिनाचा उद्देश आहे.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्हा देशात आठव्या क्रमांकावर असून ही कामगिरी आणखी उंचावण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचं जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.
****
मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात आज हवामान अंशतः ढगाळ राहील, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. अन्यत्र हवा कोरडी राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारनजिक सकवार इथं दुचाकी आणि मोटारीदरम्यानच्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या मोटार चालकाला उपचारांसाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  
****
मलेशियातील क्वालालंपूर इथं सुरु पुरुष कनिष्ठ गट हॉकी विश्वचषक स्पर्धेत क गटात आज भारताचा सामना स्पेन सोबत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
Text
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार,अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं मोर्चा दिल्लीत....
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार,अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं मोर्चा दिल्लीत….
बळीराजा पुन्हा एकदा आक्रमक; हजारो शेतकरी संसदेवर धडकले!
नवी दिल्ली | शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं मोर्चा दिल्लीत धडकला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी 21 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं. शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी. शेतमालाला दिडपट हमीभाव मिळाला. राजू शेट्टी आणि इतरांनी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयांमधील मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नियुक्त, कडक कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी.
`यंग इंडीया अनचेन्ड` उपक्रम महापालिका, जिल्हा आणि तालुकास्तरावर सुरू व्हावा- मंत्री अदिती तटकरे.
आणि
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आज तीन सुवर्ण पदकं.
****
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आज दिल्लीतून मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीनं संवाद साधून राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या सगळ्या शासकीय, महापालिका आणि नगरपालिका रुग्णालयांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतल्या रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी, आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
****
विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करावी आणि प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करावी, मराठा आरक्षणासाठी झालेल्या जालन्यातल्या आंतरवेली सराटी इथल्या आंदोलनातल्या लाठीमार प्रकरणाबाबतही निवृत न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी, राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाला द्यावेत तसंच शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्युंबद्दल वैद्यकीय मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांचे राजीनामे घेण्यात यावेत अशा मागण्या या निवेदनात आहेत. याशिवाय, या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी विनंतीही वडेट्टीवार यांनी राज्यपालांना या निवेदनातून केली आहे.
****
दिव्यांग बांधवांना शासनातर्फे विविध सोयी सवलती मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. हिंगोली इथं आज 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' हा उपक्रम राबवण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध प्रमाणपत्रांचं वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आलं.
दरम्यान, मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष आपलं खच्चीकरण करत आहे, असा आरोप कडू यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
****
महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा बंधमुक्त भारतीय युवा अर्थात 'यंग इंडिया अनचेन्ड' हा उपक्रम मुंबईतल्या ३० महाविद्यालयांत सुरू होणार आहे, या उपक्रमाची महानगरपालिका, जिल्हा आणि तालुकास्तरावर व्याप्ती वाढवावी, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत या उपक्रमाचं उदघाटन केलं, त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालकांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जनजागृती करणं यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. सुरक्षित वातावरणात प्रत्येकाला आपला विकास करता यावा यासाठी गुन्हा घडल्यास तरुणांनी त्याबाबत आवाज उठवावा, असं आवाहन तटकरे यांनी केलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची कोविड काळातली देय नुकसान भरपाई आठ दिवसात शेतक-यांना न दिल्यास पीक विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या सहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांकडून दोनशे चोवीस कोटी रुपये येणं आहेत, अशी माहिती देत, कोविड ही जागतिक आपत्ती होती,त्यामुळे कंपनीने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मुंडे यांनी या विमा कंपन्यांना सांगितलं.
****
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या पी. एम. विश्वकर्मा योजनेचा इच्छुकांनी फायदा घेऊन उद्योजक बनावं आणि आपली आर्थिक प्रगती साधावी, असं आवाहन केंद्रीय मध्यम, लघू आणि सूक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. या योजनेच्या प्रचारासाठी आज सिंधुदुर्ग इथं परिसंवाद आणि जनजागृती कार्यक्रम झाला, त्यावेळी राणे बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा बांधवांना समृद्धी मिळेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. यावेळी राणे यांच्या हस्ते काही प्रातिनिधिक कारागिरांचा सत्कार करण्यात आला.
****
हिंदी भाषेत डब केलेल्या चित्रपटाला मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र देण्यासाठी सात लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी या मंडळाच्या अज्ञात कर्मचाऱ्यासह अन्य काही जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्यात, हे प्रमाणपत्र देण्यासाठी मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं एका महिलेनं ही लाच मागितली होती.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आपलाच अधिकार असून, निवडणूक आयोगाचा निकाल आपल्या बाजूनं लागेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते आज दिल्लीत एका सभेमध्ये बोलत होते. आजकाल केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप केंद्र सरकारवर करत, दहा वर्षांपूर्वी या यंत्रणांची नावंही सामान्य लोकांना माहिती नसायची, असं पवार म्हणाले.
****
हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धेमधे भारतानं आज तीन सुवर्ण पदकं जिंकली. धनुर्विद्येमध्ये कंपाऊंड प्रकारात पुरुष आणि महिला संघांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदकं जिंकली तर स्क्वॅशमध्ये मीश्र दुहेरीतही भारतानं विजेतेपद मिळवलं. ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक वर्मा यांच्या धनुर्विद्या संघानं अंतिम सामन्यात कोरियाच्या संघाचा २३५ विरुद्ध २३० असा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे आणि त्यांच्या यशाचा देशाला अभिमान असल्याचं म्हटलं आहे. बॅडमिंटनमध्ये एच. एस. प्रणॉयनं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या पुरुष कबड्डी संघानं अ गटातलं प्रथम स्थान कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुस्तीमध्ये अमित पंघाल, मानसी, पूजा आणि नवीन कांस्य पदकासाठी लढत देणार आहेत.
****
काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी आज धाराशीव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासमोर निदर्शनं केली. जिल्हा सरकारी रुग्णालयात औषधांची तसंच आवश्यक कर्मचारी-डॉक्टरां अभावी सामान्य रुग्णांची हेळसांड होत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. निदर्शनांनंतर अधिष्ठातांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं. नांदेडच्या रुग्णालय अधिष्ठातांना स्वच्छतागृहाची सफाई करायला लावणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. धुळे इथंही या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं.
****
`मेरी माटी - मेरा दे���` अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे आज शहरात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नागरिकांनी यावेळी कलशात माती संकलित केली. ही माती दिल्ली इथं अमृत वाटिकेसाठी पाठवली जाणार आहे.
****
आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षांचा पराभव निश्चित असल्यानं त्या धास्तीनं सरकार निवडणूक घेत नाही, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं केला. ते पक्षातर्फे जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी घेण्यात येत असलेल्या `होऊ द्या चर्चा` उपक्रमात बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिडको, हडको, मयुरनगर, यादवनगर, मुकुंदवाडी, सुतगिरणी चौक या परिसरात `होऊ द्या चर्चा` हा उपक्रम सुरू आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर तसंच जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, माजी नगरसेवक किशोर नागरे या उपक्रमामध्ये जनतेशी संवाद साधत आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेलं उपोषण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतलं. उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी शिष्टमंडळासह मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. शासनाची भुमिका स्पष्ट असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. 
सरकारनं यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं परंतु, सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. रद्द झालेलं मराठा आरक्षण पुन्हा मिळावं आणि ते टिकावं हीच सरकारची भुमिका आहे. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी दाखवल्या, त्यावर सरकार काम करीत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 
दरम्यान, मराठा समाजाला मुख्यमंत्री न्याय देतील, ही अपेक्षा असून उपोषण सुटलं तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
****
हिंदी भाषा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी भाषा, राष्ट्रीय एकता आणि सदभावनेचा धागा नेहमीच मजबूत करत राहणार असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदी भाषेचं महत्त्व लक्षात घेऊन, भारतीय घटनेनं हिंदीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन आज सकाळी हिंदी दिनानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र आणण्याचं काम हिंदी भाषेनं केलं. आपल्या भाषा हा आपला सांस्कृतिक ठेवा असून भाषाप्रगत झाल्यास देशाचीही प्रगती होते. हिंदी अधिक सशक्त करण्यसाठी प्रयत्न केले पाहिजेत तसंच सरकारी कार्यालयांनी हिंदी भाषेचा वापर वाढवावा असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं.
****
संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण याविषयी सदस्य आपले विचार मांडतील. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचं विधेयक सरकारनं सूचीबद्ध केलं असून त्यावर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसंच विधीज्ञ सुधारणा विधेयक, नियतकालिकांचे प्रेस आणि नोंदणी विधेयक आणि टपाल कार्यालय विधेयकांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे, राज्यसभेनं त्यांना यापूर्वी मंजुरी दिली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाराणसी इथं कालपासून शाश्वत वित्त कार्यगटाची चौथी जी- ट्वेन्टी बैठक सुरू आहे. या बैठकीत २०२३ च्या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आज बैठकीच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी जी - ट्वेन्टी शाश्वत वित्त आलेखावर चर्चा सुरू राहणार आहे. या बैठकीत जी  ट्वेन्टी सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या ८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान, मुंबईत आज आर्थिक समावेशन संबंधित जागतिक भागीदारीसाठीची चौथी जी २० बैठक सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी २० देशांचे, विशेष आमंत्रित देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे ५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
****
मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडा मार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद-आजारी गिरण्यांमधील यापूर्वीच्या सोडतीमध्ये अयशस्वी दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती आजपासून वांद्रे इथल्या म्हाडा मुख्यालयात करण्यात येत आहे. राज्यातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे प्रत्यक्ष तसंच म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येणार असल्याचं म्हाडाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोमधल्या आर प्रेमदासा मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्या संघाची रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघासोबत लढत होईल.
****
आय एस एस एफ नेमबाजी आणि रायफल विश्वचषक स्पर्धेला आजपासून ब्राझीलमधील रिओ दि जनेरो इथं सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सोळा सदस्य असलेल्या भारतीय पथकाचं नेतृत्व ऑलिंपिकपटू सौरभ चौधरी आणि अंजुम मौदगील करणार आहेत. १८ ते २��� नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेची अंतिम फेरी दोहा इथं होणार आहे. भारतीय नेमबाजांनी या वर्षात आतापर्यंत झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत सात सुवर्ण, चार रौप्य आणि बारा कांस्य अशी एकूण २३ पदकं जिंकली असून भारत सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१२ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजूर केला. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. रमेश बैस यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते.
***
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं स्वर्गीय माधवराव लिमये यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी यंदा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार २०२१-२२ या वर्षासाठी देण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
***
 मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषा आणि ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी  ग्रामीण संमेलनांची आवश्यकता आहे, असं चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अर्धव्यु प्रकाश देशपांडे यांनी म्हटलं आहे. राजापूर लांजा नागरिक संघाचं दोन दिवसांचं आठवं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील तळवडे इथं सुरू झालं. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात काल ते बोलत होते. सभामंडप भरलेला असला तरी व्यासपीठावर मात्र एकही खुर्ची ठेवली जात नाही, हे या संमेलनाचं वैशिष्ट्य यावर्षीही जपण्यात आलं.
***
राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.या अभियानाचा प्रारंभ लवकरच अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथून करणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल दिली.
***
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन स्वभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या वेषात येऊन तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
//*************//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Eknath Shinde, CM Fellowship : शिंदे सरकार 100 दिवसांचं संकल्पपत्र आणणार, मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू होणार
Eknath Shinde, CM Fellowship : शिंदे सरकार 100 दिवसांचं संकल्पपत्र आणणार, मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू होणार
Eknath Shinde, CM Fellowship : शिंदे सरकार 100 दिवसांचं संकल्पपत्र आणणार, मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू होणार देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री फेलोशिप हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. तो पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरू होणार असल्याचं दिसतंय. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकेल. मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Udaipur Murder: ४५ दिवसांचं ट्रेनिंग, पाकिस्तानशी संबंध; उदयपूर हत्याकांडातील आरोपींची कुंडली वाचून हादराल
Udaipur Murder: ४५ दिवसांचं ट्रेनिंग, पाकिस्तानशी संबंध; उदयपूर हत्याकांडातील आरोपींची कुंडली वाचून हादराल
Udaipur Murder: ४५ दिवसांचं ट्रेनिंग, पाकिस्तानशी संबंध; उदयपूर हत्याकांडातील आरोपींची कुंडली वाचून हादराल उदयपूरमध्ये कन्हैयालालची निर्घृण हत्या करणाऱ्या गौस मोहम्मद आणि रियाझचा उद्देश दहशत पसरवणे हा होता. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनीही अगदी अमानुषपणे हत्या केल्यानंतर त्याचा व्हिडिओही माध्यमांवर शेअर केला. पण आता या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. उदयपूरमध्ये…
View On WordPress
0 notes