#दिल्ली हवामान अंदाज
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
जागतिक भवितव्याला आकार देण्यात भारत पुढाकार घेत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. जग एआयला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ओळखत असताना, आपल्या देशासाठी एआय म्हणजे आकांक्षी भारत असल्याचं मोदी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पहिल्या १२५ दिवसांत नऊ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधांविषयीचे प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच १५ नव्या वंदे भारत रेल्वेंची सुरुवात, आठ विमानतळांचे बांधकाम, पाच लाख घरांवर सौरछत आणि ९० लाखांहून अधिक वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन आणि प्रशिक्षण यासंदर्भात या बैठकीत विचारविनिमय होईल. सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना महामंत्री आणि राजकीय पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ प��र्ण झाला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार नड्डा यांनी संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी सहअधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
****
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसंदर्भात आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दोन्ही राज्यांच्या उमेदवारांच्या निवडीबाबत या बैठकीत विचारमंथन होणार आहे. मात्र दोन्ही राज्यातल्या निवडणुकांसाठी काँगेसनं अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या एका समितीनं केंद्रीय निवडणूक समितीच्या विचारार्थ ६२ उमेदवारांच्या यादीला मंजुरी दिली होती. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी संयुक्त जनता दलानं दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
****
पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शहीद पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.
****
बुलडाणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने तिनही विद्यमान आमदारांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. जळगाव जामोद मतदारसंघातून डॉ संजय कुटे, खामगाव मधून विधीज्ञ आकाश फुंडकर आणि चिखलीमधून श्वेता महाले निवडणूक लढवणार आहेत.
****
पुण्यातल्या मंडई मेट्रो स्थानकात तळमजल्यावर फोमच्या साहित्याला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या आगीचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मध्यरात्री या ठिकाणी आग लागल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलानं ५ वाहनांच्या मदतीनं आग आटोक्यात आणल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
सामान्य नागरिकांसाठी किफायतशीर दराने विमानप्रवास उपलब्ध करुन देणाऱ्या उडाण योजनेला आज आठ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी संबोधित केलं. या योजनेअंतर्गत ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ६०१ हवाईमार्गांनी जोडले आहेत. तर, आतापर्यंत एक कोटी ४४ लाख प्रवाशांना या योजनेचा लाभ झाला आहे.
****
येत्या २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर अंदमान समुद्रालगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसं�� उद्या कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बुधवारपर्यंत तयार होईल आणि गुरुवारी ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह धडकेल असंही विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर ७८ हजार ४०० रुपये आहे, तर एक किलो चांदीचा दर ९८ हजार १९० रुपये आहे. आज, देशांतर्गत शेअर बाजारात चांगली खरेदी दिसून येत असून सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत वाढ नोंदवली. सुरुवातीला निफ्टीने वाढीसह २४,९५० चा टप्पा पार केला तर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.
****
भारताच्या दीपिका कुमारीने मेक्सिकोमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक़ स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. दीपिकाला अंतिम फेरीत चीनच्या ली झियामनकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजी विश्वचषकात दीपिकाकुमारीनं पाचव्यांदा उपविजेतेपद पटकावलं आहे.
****
काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये काल पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलो मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन आणि २१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये देशभरातील सतराशेहून अधिक धावपटू आणि १२ परदेशातील खेळाडूंनी भाग घेतला.
****
0 notes
Text
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार नवी दिल्ली : उत्तर भारतातील मैदानी भागात पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, झारखंडमध्ये थंडी वाढू लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही पारा घसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 डिसेंबरनंतर थंडी आणखी वाढणार आहे. वास्तविक,…
View On WordPress
#update#weather#अंदाज#आहे#उत्तर#गंभीर#डिसेंबरपर्यंत#थंडी#देशातील#पावसाचा#भारतात;#मुद्दा#राज्यांमध्ये#वाढणार
0 notes
Text
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास गारपिटीची नोंद केली. नवी दिल्ली: दिल्लीच्या काही भागांमध्ये गारपीट आणि पावसाने राष्ट्रीय राजधानीतील उष्णतेपासून अत्यंत आवश्यक आराम दिला आहे. वेगळ्या पॉकेट्समध्ये जोरदार वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडल्याची नोंद आहे, ज्यामुळे पारा खाली आला आहे आणि नंतर थंड वाऱ्याची झुळूक आली आहे. रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी…
View On WordPress
0 notes
Text
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
वेटर ऑनलाईन 27 जुलै, 2021 8:38 एएम | स्कायमेट वेदर टीम दिल्लीत जुलै महिन्यात मॉनसनच्या विमानाने बरेच चांगले प्रसंग उद्भवले. या क्षणी, येथे 14 जुलै आणि 20 जुलै रोजी एएस-पास बारिशसह तापमानातही गिरावट बनी रहा. याव्यतिरिक्त जुलै महिना च्या पर्यटन देखील बारिश काही क्रियाकलाप पहायला मिल होते. रा��्ट्रीय राजधानी दिल्लीत सरासरी मासिक बारिशचा आकडा 187 मिनिटांवर आहे, येथे 281 मिनिट बारिश महिन्यांचा शेवट…
View On WordPress
#दिल्ली पाऊस#दिल्ली पावसाळा#दिल्ली मध्ये बारिश#दिल्ली मध्ये मानसून#दिल्ली येथे आज पाऊस#दिल्ली साठी हवामान अंदाज#दिल्ली हवामान अंदाज#दिल्ली हवामानाचा पूर्वानुमान#दिल्लीचे मौसम पूर्वानुमान#दिल्लीत आज बारिश#दिल्लीत पाऊस#दिल्लीत मान्सून#मानसून 2021#मान्सून 2021
0 notes
Text
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
नवी दिल्ली. उत्तर भारतातील अनेक भागात पाऊसमुसळधार पाऊस, गारपीट, थंडीची लाट आणि दाट धुके यांमुळे पुढील तीन दिवस हवामानाची स्थिती आणखी बिघडणार आहे. हवामान विभागाचा अंदाज (IMD forecast) तो दिवस काही ठिकाणी असामान्यपणे थंड असेल. त्याचबरोबर डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि थंडीची लाट कायम राहणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस, थंडीची लाट आणि धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणामध्ये गारपीट होण्याची…
View On WordPress
#IMD अंदाज#दिल्ली NCR मध्ये पाऊस#दिल्ली पाऊस#दिल्ली हवामान अपडेट#दिल्ली-एनसीआर बातम्या#हवामान अपडेट#हवामान बातम्या#हवामानाचा इशारा
0 notes
Text
तापमान अहवाल: दिल्ली, वर, Mp, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा कमाल तापमान अहवाल 7 मे | तापमान अहवाल: शनिवारी बाडमेरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, जाणून घ्या
तापमान अहवाल: दिल्ली, वर, Mp, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा कमाल तापमान अहवाल 7 मे | तापमान अहवाल: शनिवारी बाडमेरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, जाणून घ्या
तापमान अहवाल: गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात आकाश ढगाळ होते आणि हलका पाऊस पडत होता. त्यामुळे तापमानात घट नोंदवण्यात आली. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान…
View On WordPress
#mp मध्ये कमाल तापमान#आयएमडी#कमाल तापमान#कमाल तापमान वर#गुजरातमध्ये कमाल तापमान#दिल्लीतील कमाल तापमान#देशातील सर्वोच्च कमाल तापमान#मध्य प्रदेशातील कमाल तापमान#महाराष्ट्रातील कमाल तापमान#मौसम#यूपीमध्ये कमाल तापमान#राजस्थानमध्ये कमाल तापमान#हवामान अहवाल#हवामान बातम्या#हवामान विभाग
0 notes
Text
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
नवी दिल्ली : यंदा मान्सूनचे वेळेआधीच भारतात आगमन होणार आहे. केरळात मान्सून 29 मे रोजी धडकणार आहे. त्यानंतर लगेचच 30 मे रोजी भारतात दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यंदा तो तीन दिवस आधीच केरळात मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. येत्या तीन-चार दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. देशभरात…
View On WordPress
5 notes
·
View notes
Text
शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!
शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!
नवी दिल्ली : देशावर कोरोना संकटाचे सावट असताना एक दिलासादायक बातमी गुढी पाडव्याच्या मूहुर्तावर समोर आली आहे. देशात यंदा चांगल्या मान्सूनचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.देशात यंदा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये एकूण सरासरीच्या १०३ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
दहशतवाद जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी लाओसमध्ये आज १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केलं. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री ब्लिंकन यांची भेट घेतली, अमेरिकेत चक्रीवादळामुळं झालेल्या जिवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लाओसच्या पंतप्रधानांसमवेत द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.
****
केंद्र सरकारचा इलेक्टाँनिक तसंच माहिती तंत्रद्ऩान विभाग आणि राज्य सरकारमध्ये रोबोटिक आणि स्वयंचलित तंत्रद्ऩान विकासासाठी करार करण्यात आला आहे.केंद्रिय मंत्री अश्वनी वैश्नव आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी दिल्ली इथं आज या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर आजपासुन दररोजी हवाई दलाचे सुखोई ३० विमान उड्डाण करणार आहे. तर लष्कराचे विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर उतरणार आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमला सुरुवात होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.
****
राज्यातील चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगानं राज्य सरकारनं "चित्रपट धोरण समिती" गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळं राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार असून या समितीमार्फत राज्यातील चित्रपट निर्मिती केंद्रांना प्रोत्साहन देणं, तांत्रिक तसंच कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करण्याबाबत धोरण आखण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ निर्मात्या स्मिता ठाकरे असणार आहेत, तर निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तांत्रिक तज्ञांच्या समावेशानं ही समिती बळकट होणार आहे.
****
संरक्षणमंत्री राजनाथसिंह कमांडर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सिक्कीम दौऱ्यावर आहेत. गंगटोक इथं प्रथमच होणाऱ्या परिषदेत महत्त्वाची रणनिती आणि संरक्षण क्षेत्राच्या सज्जतेवर विचारविनिमय होणार आहे.
****
देशाचं वस्त्रोद्योग क्षेत्र २०३० पर्यंत ३५० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज वस्त्रोद्योग विभागानं वर्तवलाआहे.ऑगस्ट २०२४ च्या व्यापार आकडेवारीनुसार तयार कपड्यांच्या निर्यातीत ११ टक्के वार्षिक वाढ झाली. गुंतवणूक आणि निर्यातीला सर्वाधिक प्रोत्साहन देणाऱ्या भारताच्या अंतर्गत क्षमता आणि मजबूत धोरणात्मक चौकटींमुळं ही वाढ अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना आणि धोरणात्मक उपक्रम राबवत आहे. पुढील ३ ते ५ वर्षांत पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अॅपरेल पार्क आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेद्वारे ९० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक अपेक्षित असल्याचं याबाबतच्या बातमित म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ३० हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
****
राज्यातील दुसरे सौरग्राम होण्याचा माण पुणे जिल���ह्यातील खेड तालुक्यातल्या टेकवडी गावानं पटकावला आहे. १ हजार २३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीज जोडण्यांना सौर ऊर्��ा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडीनं प्रथम क्रमांक पटकावला होता.
****
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तं नागपुरात दीक्षाभूमी इथं कालपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात आली. हा धम्मदीक्षा सोहळा उद्यापर्यंतचालणार आहे. दीक्षा घेण्यासाठी अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.
****
हवामान
राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आजधाराशिवजिल्ह्यातल्यातुळजापूरइथल्याश्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. कालदेवीचीभवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आलीहोती.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने भवानी तलवार दिल्याची, आख्यायिकायामागेसांगितलीजाते.
****
0 notes
Text
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात नवी दिल्ली : देशात सध्या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती…
View On WordPress
0 notes
Text
दिल्ली बातमीः नऊ वर्षांत सर्वाधिक लोकप्रिय 14 फेब्रुवारी - पुन्हा विक्रम झाला; 14 फेब्रुवारी हे दिल्लीतील सर्वात गरम आहे
दिल्ली बातमीः नऊ वर्षांत सर्वाधिक लोकप्रिय 14 फेब्रुवारी – पुन्हा विक्रम झाला; 14 फेब्रुवारी हे दिल्लीतील सर्वात गरम आहे
दिल्लीत बदलते हवामान … – फोट��: पीटीआय अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका कित्येक दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारीचा व्हॅलेंटाईन डे नऊ वर्षातील सर्वात गरम होता. कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस ओलांडले. त्याआधीचा एक दिवस, उन्हाळ्याने पाच वर्षांचा विक्रम मोडला होता. हवामानशास्त्रज्ञ असा अंदाज…
View On WordPress
#गरम फेब्रुवारी#दिल्ली हवामान#दिल्ली हवामान अंदाज#दिल्ली हिंदी समचार#दिल्लीची बातमी#दिल्लीचे वातावरण#दिल्लीतील बातमी हिंदीमध्ये#हिंदी मधील ताज्या दिल्ली बातम्या
0 notes
Text
मुसळधार दिल्ली पावसाने हजेरी लावली, अधिक पाऊस अपेक्षित | दिल्लीत मानूसनी भारी बारिश आणि पावसाची आशा
मुसळधार दिल्ली पावसाने हजेरी लावली, अधिक पाऊस अपेक्षित | दिल्लीत मानूसनी भारी बारिश आणि पावसाची आशा
दिल्लीच्या बारिश ने दिल्लीवासियांसह खूप लांबपर्यंत लुका-छिपीचा खेळ खेळला आहे. दरअसल, या वर्षाच्या दक्षिण मान्सूनच्या भीतीने 16 दिवस देरी पासून 13 जुलै रोजी दिल्ली पोहोचले. दिल्लीत मानसूनची सामान्य तपासणीची तारीख 27 जून आहे. सुरुवात होण्यापूर्वी, दिल्लीमध्ये 18 जुलैपर्यंत कोणतीही महत्त्वाची बारिश गतिविधी पाहिली गेली नाही. दरअसल, काल पासून बादल छापा. हरियाणा आणि रेटिंग्जच्या आसपासच्या भागातील…
View On WordPress
#दिल्ली पाऊस#दिल्ली पावसाळा#दिल्ली येथे आज पाऊस#दिल्ली साठी हवामान अंदाज#दिल्ली हवामान अंदाज#दिल्लीत पाऊस#दिल्लीत मान्सून#मान्सून 2021
0 notes
Text
आयएमडी हवामानाचा अंदाज आज का मौसम उत्तर भारतात थंडी वाढू शकते तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
आयएमडी हवामानाचा अंदाज आज का मौसम उत्तर भारतात थंडी वाढू शकते तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
नवी दिल्ली: उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील पाच दिवसांत किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘कोल्ड डे’ सारखी परिस्थिती निर्माण होईल. पंजाब का मौसम, हरियाणा येथे थंडीची लाट येऊ शकते. -उत्तर प्रदेश (UP IMD हवामान अंदाज), राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग. भारतीय हवामान विभाग (IMD) ��े सोमवारी सांगितले की पंजाब, हरियाणा, दिल्ली…
View On WordPress
#24 जानेवारी 2022 हवामान#imd पावसाचा अंदाज#imd हवामान अंदाज#imd हिमवर्षाव अंदाज#आज का मौसम#आज पाऊस#आजचा हवामान अंदाज#उद्या हवामानाचा अंदाज#काल का मौसम#हवामान#हवामान अंदाज आज थेट अद्यतने
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदर���्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या सं���ुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आज सकाळी शताब्दी ध्वजाचं पूजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, तर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भपंढरी शेगाव इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
****
भारतात प्रथमच, जागतिक वारसा समितीची बैठक होत आहे. आज संध्याकाळपासून नवी दिल्लीच्या भारत मंडपम् इथं या कार्यक्रमाला सुरुवात होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केलं आहे. देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचंही मोदी यांनी म्हणाले.
****
बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, तिथले जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, सहउच्चायुक्तालय अजूनही बांग्लादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून, नेपाळ-भूतान या देशांच्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदत देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. विमानसेवेसह भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
****
उत्तराखंडमधील पवित्र धाम केदारनाथसाठी जाणाऱ्या पादचारी मार्गावर चिरबासा इथं हेलिपॅडनजीक आज भूस्खलन झाल्यानं तीन जण दगावले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे.
****
चांदीपुरा विषाणू प्रकरणासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील मेंदूशी संबंधित तीव्र एन्सेफलायटिस आजाराबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचे संचालक अतुल गोयल यांनी काल तज्ञांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर रसायनांमुळे हा आजार होत असल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं. महाराष्ट्राच्या चांदीपुरा इथं प्रथम आढळलेल्या या विषाणूचा देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील भागात, विशेषत: पावसाळी हंगामात उद्रेक होतो. माशा आणि गोचिडं यांद्वारे हा विषाणू पसरतो. प्रतिबंध, स्वच्छता आणि जागरूकता हेच या रोगावरील उपाय आहेत.
****
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून केंद्र सरकारनं किरकोळ विक्रेत्यांना आतापर्यंत साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरीत केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या संकेतस्थळाचं दिल्ली इथं ��द्घाटन झालं. देशभरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू झाल्याचं सांगून, ते सुरक्षित खाद्यपदार्थांचा वापर करत असल्याच्या खात्रीसाठी एका नावीन्यपूर्ण चाचणी संचाची सुविधा गरजेची असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले.
****
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषदेअंतर्गत कुंभारटोली आणि पाऊळडौना हा रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज स्थानिकांसह या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान पिकाची रोवणी करत आंदोलन केलं. प्रशासनानं हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
****
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे २३ दरवाजे एक मीटरनं, तर अन्य दहा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत. दरम्यान, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील विद्युत प्रवाह नियंत्रक संचाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलानं काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला.
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून, गडचिरोलीहून नागपूर, तसंच चामोर्शी यासह आलापल्लीहून भामरागड, तसंच सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह तीस मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते, नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्यांदा प्रंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. दरम्यान, या शपथविधी समारंभाला भारताच्या शेजारी राष्ट्रांचे महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनौथ आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या शपथविधी समारंभानंतर या नेत्यांची राष्ट्रपती भवनात बैठक होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहू, असंही खर्गे म्हणाले. खर्गे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
****
माध्यम जगतातील प्रख्यात व्यक्तिमत्व, पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैद्राबाद इथं आज सकाळी निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. ईनाडू समूह आणि रामोजी चित्रपटसृष्टीचे ते संस्थापक होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुखः व्यक्त केलं आहे. देशानं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावलं असून पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त राव यांची दृष्टी सामाजिक उत्थानासाठी रुजलेली होती, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामोजी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रामोजी राव भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानानं पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर छाप सोडली. देशाच्या विकासाबद्दल त्यांना अत्यंत तळमळ होती, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामोजी राव यांच्या निधनानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
****
मराठा आरक्षण आंदोनलकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीनं पाठिंबा दिला, अशी माहिती जरांगे यांनी दिली. अंतरवाली सराटी इथं उपोषण स्थळी ते आज माध्यमांशी बोलत होते. अंतरवाली सराटीत सर्व समाजातील गावकऱ्यांनी उपोषणाला पाठींब्याचं लेखी पत्र दिल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजेपासून जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनं या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्या, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
****
यंदाच्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून, त्यापैकी १३ लाख क्विंटल बियाणं वितरीत केलं आहे, आणखी सहा लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती, मुंडे यांनी दिली.
****
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरोचे वारे, मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच पुढच्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुप���च्या पावसाचीही शक्यता आहे. याच काळात तापमानातही दोन ते पाच अंशांनी घट होण्याचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री सांगली जिल्ह्यात सरी बरसल्या असून पालघ�� इथं आज पहाटे मेघगर्जनेसह पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावली.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज टेक्सास इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेश संघानं श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघानं निर्धारित २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल बांग्लादेश संघानं १९ षटकात आठ गडयांच्या मोबदल्यात विजय मिळवला.
अन्य एका सामन्यात अफगानिस्तान संघानं न्यझिलंड संघाचा ८४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत अफगानिस्तान संघानं २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मात्र, न्यझिलंड संघाचे ७५ धावांतच सर्व गडी बाद झाले.
****
दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
****
0 notes