#नवी दिल्ली
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 January 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. • मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं आवाहन. • कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पासंदर्भात जागतिक बँकेचं पथक उद्या सांगली दौऱ्यावर. • राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ६० धावांनी विजय.
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत असून, यानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान बोलत होते. नेताजींनी आरामदायी जीवनाचा मार्ग न पत्करता भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम घेतले, आपणही विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अशा प्रकारे मेहनत घ्यायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले, नेताजी ने देश की स्वतंत्रता के लिए आजाद हिंद फौज बनाई, इसमें देश के हर क्षेत्र हर वर्ग के वीर और वीरांगनाएं शामिल थीं। सबकी भाषाएं अलग-अलग थीं, लेकिन भावना एक थी देश की आजादी। यही एकजुटता आज विकसित भारत के लिए भी बहुत बड़ी सीख है। तब स्वराज के लिए हमें एक होना थ���, आज विकसित भारत के लिए हमें एक रहना है। देशाच्या एकतेला बाधा आणणाऱ्या शक्तींपासून दक्ष राहायला हवं असं पंतप्रधान म्हणाले. आज भारत गुलामीच्या मानसिकतेमधून बाहेर पडत आहे. वारशाचा अभिमान बाळगत विकासाच्या वाटेवर चालत आहे. याच बळावर जागतिक स्तरावर भारताचा आवाज बुलंद होत असून, जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा दिवस दूर नाही, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली. संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवन इथं आदरांजली वाहिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हस्ते झालं. जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास ३० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे. लोकशाही असलेल्या देशात निवडणुकीचं भवितव्य हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर, तसंच राजकीय प्रचारात आणि निवडणूक कार्यपद्धतीत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर, यावर अवलंबून असल्याचं, राजीव कुमार यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास दहा कोटी भाविकांनी कुंभस्नान केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज कुंभमेळा परिसरात भेट देऊन आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या कक्षांच्या वतीनं सुरु असलेल्या प्रसिद्धी व्यवस्थेची पाहणी केली. प्रसार भारतीनं या महाकुंभसाठी व्यापक प्रसिद्धीसाठी व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं. महाकुंभसंबंधी अनेक रोचक तथ्यं आकाशवाणी तसंच दूरदर्शनचे प्रतिनिधी सामान्यांपर्यंत पोहोचवत असल्याचं ते म्हणाले. प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाच्या या पर्वाच्या माध्यमातून एकात्मतेची भावना वृद्धींगत होत असल्याचं जाजू यावेळी म्हणाले. दरम्यान, महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त गर्��ीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे विभागानं दीडशे अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. वातावरणाशी जुळवून घेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल, अशा प्रकारच्या बि-बियाण्यांवर संशोधन करून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा विद्यापीठाने भाग बनावं, असं राज्यपाल म्हणाले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या कार्यक्रमास उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याचं नियोजन असून, त्याबाबतच्या प्रकल्पास जागतिक बँकेनं मंजूरी दिली आहे. जागतिक बँकेचं एक पथक उद्या, २४ तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे. या भागातल्या सांडपाणी प्रकल्पाची, अवर्षण प्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे. तसंच पथक कृष्णा नदी आणि परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटी घेणार आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी दोन हजार ३३८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँक करणार आहे.
साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज ते बोलत होते. एफआरपी अर्थात रास्त किफायतशीर दरात वाढ होते त्या प्रमाणात एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढत नाही, या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यातल्या सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावं आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मुंबईत कुर्ला बसस्थानक इथं या अभियानाच्या शुभारंभ��्रसंगी ते आज बोलत होते. बसस्थानक ही सार्वजनिक जागा असून, तिथे स्वच्छता ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.
महिला क्रिकेटमध्ये, १९ वर्षांखालील टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात ११८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकात नऊ बाद ५८ धावाच करु शकला.
जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून, त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे.
महसूल विभागात अंतर्भाव झालेल्या अनेक नवीन संगणकीय प्रणालींची कार्यपद्धती प्रशिक्षणातून जाणून घ्यावी, असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्वरुपाचं आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.
सुप्रसिध्द कवी, नाट्यकथा लेखक प्राध्यापक अनिल पंढरीनाथ सोनार यांचं आज पहाटे धुळ्यात, वार्धक्यामुळे निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. सोनार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारणीचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष होते.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला रहिवासी असलेल्या आरोपीस जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सश्रम जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २५ ऑगस्ट २०१८ रोजी ही घटना घडली होती.
0 notes
latestnewsandjokes · 6 days ago
Text
'जसप्रीत बुमरा खेलना चाहते हैं': कोल्डप्ले शो के दौरान क्रिस मार्टिन की आश्चर्यजनक घोषणा - देखें | क्रिकेट समाचार
क्रिस मार्टिन और जसप्रित बुमरा नई दिल्ली: शनिवार को ब्रिटिश बैंड कोल्डप्ले का मुंबई कॉन्सर्ट संगीत प्रेमियों और क्रिकेट प्रशंसकों दोनों के लिए एक अविस्मरणीय रात साबित हुई।नवी मुंबई के डीवाई पाटिल स्टेडियम में अंतिम गीतों में से एक के दौरान, कोल्डप्ले के फ्रंटमैन क्रिस मार्टिन जब उन्होंने अप्रत्याशित रूप से भारत के स्टार गेंदबाज के नाम का उल्लेख किया तो भीड़ आश्चर्यचकित रह गई जसप्रित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khabar24 · 12 days ago
Text
नवी दिल्ली येथे “राष्ट्रीय युवा दिन” निमित्त आयोजित “विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग” कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारत सरकार युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय मार्फत “स्वामी विवेकानंद जयंती” तथा “राष्ट्रीय युवा दिन” निमित्त ३ दिवशीय “विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग” कार्यक्रमाचे आयोजन करण्य��त आले होते. आज शेवटच्या व समारोप दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर कार्यक्रमात देशभरातून आलेल्या हजारो तरुणांशी संवाद साधला. तसेच विकसित भारत घडवण्यासाठी तरुणांच्या नवनवीन कल्पनाही त्यांनी…
0 notes
nagarchaufer · 20 days ago
Text
पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार वेगवेगळ्या पद्धतीने कर लावण्याऐवजी , काँग्रेसने भाजपला सुनावलं
पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार वेगवेगळ्या पद्धतीने कर लावण्याऐवजी , काँग्रेसने भाजपला सुनावलं
‘ पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार वेगवेगळ्या पद्धतीने कर लावण्याऐवजी अर्थव्यवस्थेच्या समस्येवर लक्ष केंद्रित करावे आणि गरिबांना आर्थिक सहाय्य आणि मध्यम वर्गाला दिलासा द्यावा ,’  असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे.  काँग्रेस नेते सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात नवी दिल्ली येथे बोलताना ,’ महागाई आणि बेरोजगारीमुळे भारत कमी खप , कमी गुंतवणूक , कमी विकास आणि कमी वेतनाच्या दुष्टचक्र सापडला असून…
0 notes
darshanpolicetime1 · 21 days ago
Text
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन - महासंवाद
नवी दिल्ली, दि. ०३: पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनातील दर्शनी भागात आयोजित कार्यक्रमात बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी आयुक्त नीवा जैन,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
batminews · 29 days ago
Text
Tumblr media
0 notes
kvksagroli · 4 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाचे कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे उद्घाटन दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आयोजित कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड श्री. भाऊसाहेब बर्हाटे व संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री प्रमोद देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले. या कर्यक्रमात शेतकर्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते तसेच शेतकरी संवाद व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना शेतकर्यांसाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र म्हणजे एक हक्काच व्यासपीठअसल्याचे श्री बर्हाटे म्हणाले. श्री प्रमोद देशमुख यांनी शेतकरी व कृषि विज्ञान केंद्रांची व्याप्ती अधिकाधिक वाढावी यासाठी केंद्र शासनाने कृषि विज्ञान केंद्रांना अजून बळकटी देण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात कृषि रथ तयार करून त्याला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. हा रथ कृषि समृद्धी व कृषि विज्ञान केंद्राची ज्ञानगंगा आठवडाभर गावोगावी पोहोचवत राहील. यामध्ये एक आठवडाभर वेगवेगळ्या गावात जाऊन कृषि विज्ञान केंद्राच्या सर्व शास्त्रज्ञांद्वारे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ माधुरी रेवनवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांनी केले. #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #शेतकरी #नांदेड #महाराष्ट्र #कृषिसमृद्धी #कृषक #स्वर्णमहोत्सव #समृद्धी #सप्ताहा #तंत्रज्ञान #agriculture #farming #farmer #technology #innovation #development #Maharashtra #India
0 notes
mhlivenews · 5 months ago
Text
मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी - केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
स्वीकृत योजनेंतर्गत दोन्ही राज्ये व्यावसायिकरित्या जोडल्याने व्यापाराला चालना नवी दिल्ली, 2: मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या  प्रकल्पाचा एकूण…
0 notes
sugar-news · 5 months ago
Text
0 notes
gajananjogdand45 · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/central-lok-sabha-elections-dates-announced-the-election-will-be-held-in-seven-phases/
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणुकदार परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन, रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, योजनेला आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो.
विधिमंडळाचं कामकाज विनाअडथळा चालवत, गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प पाटणा इथं आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत करण्यात आला. काल समारोपाच्या दिवशी या परिषदेनं पाच संकल्प केले. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधानाचं महत्व सांगण्यासाठी देशभरातल्या विधिमंडळांचे सदस्य समाजाच्या सर्व स्तरात जातील, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिषदनेनंतर वार्ताहरांशी ��ोलताना सांगितलं. देशातल्या २३ विधिमंडळातले ४१ पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.
राज्यामध्ये कर्करुग्णांचं प्रमाण वाढत असून, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबवावी असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल दिले. २०२५-२६ या वर्षाच्या नियोजनासाठी मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या तसंच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आबिटकर त्यांनी दिल्या.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक २० रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक १८५ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत १३८ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ४४ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आल्याचं, आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.
नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देणारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. २०२३-२४ या वर्षाच्या गाळप हंगामासाठी, आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, सर्वोकृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या हे पुरस्कार वितरीत केले जातील.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथी, देवदासी, एचआयव्ही बाधित २० व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आली. अशा व्यक्तींसाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबवण्यात येतात, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन येडगे यांनी यावेळी केलं.
इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या ��हिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. तर, या स्पर्धेत, पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक-जिन, तर लक्ष्य सेनचा सामना जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होईल. याच स्पर्धेत, काल महिला दुहेरीत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंडच्या जोडीचा, तर पुरुष दुहेरीत, सात्विक साइराज रांकि रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने तैवानच्या जोडीचा पराभव केला.
0 notes
latestnewsandjokes · 1 month ago
Text
अग्रणी एमआरओ एयर वर्क्स का अधिग्रहण करने के लिए अदानी ने विमानन क्षेत्र में पंख फैलाए
नई दिल्ली: द अदानी ग्रुपकंपनी, जो मुंबई सहित सात शहरों में हवाई अड्डों का संचालन करती है और नवी मुंबई में एक ग्रीनफील्ड का निर्माण कर रही है, विमानन क्षेत्र में अपनी उपस्थिति का विस्तार कर रही है। यह भारत के सबसे बड़े निजी क्षेत्र एमआरआई (रखरखाव, मरम्मत और ओवरहाल) प्लेयर का अधिग्रहण कर रहा है एयर वर्क्स 400 करोड़ रुपये के उद्यम मूल्य के लिए। अदानी डिफेंस सिस्टम्स एंड टेक्नोलॉजीज लिमिटेड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 11 months ago
Link
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय.
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
मोठी बातमी..आता शिक्षणाचा कालावधी कमी जास्त करण्याचा पर्याय उपलब्ध होणार
मोठी बातमी..आता शिक्षणाचा कालावधी कमी जास्त करण्याचा पर्याय उपलब्ध होणार
पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारे शिक्षणाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय आगामी काळात उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता जास्त आहे ते कमी कालावधीत शिक्षण पूर्ण करू शकतील.  विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी नवी दिल्ली इथे ही माहिती दिलेली असून उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये वर्धित वेग पदवी…
0 notes
darshanpolicetime1 · 29 days ago
Text
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट - महासंवाद
नवी दिल्ली, 26 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंबीय सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुलगा लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री यांना पारंपारिक पैठणी शाल आणि पुष्पगुच्छ भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
political-chat-01 · 11 months ago
Text
Tumblr media
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद जी यांची बीजेपी नॅशनल काउंसिल 2024 दरम्यान भेट घेतली. 📍भारत मंडपम, नवी दिल्ली
0 notes