#दिल्लीत पाऊस
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 October 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चेबांधणीला वेग
सी-व्हिजिल ॲपवर राज्यभरातून तक्रारींचा ओघ-निवडणूक आयोगाकडून ९८ टक्क्यांहून अधिक तक्रारी निकाली
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पीक वाणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश
आणि
राज्यात अनेक भागात परतीचा पाऊस, शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये केवळ ३०-३५ जागांवर सहमती व्हायची आहे. एक-दोन दिवसात हे जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी दिल्लीत ते काल वार्ताहरांशी बोलत होते. भाजपाच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अंतिम झालेल्या जागांवरचे उमेदवार महायुतीतले पक्ष लवकरच जाहीर करतील, असंही ते म्हणाले. राज्यातल्या २८८ जागांपैकी भाजपाला दीडशे, शिवसेना ८७ ते ९० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागांवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून, तिन्ही पक्ष एकत्र य���ऊन निवडणूक लढणार आहेत, येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल, असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे, एकजुटीने भाजपाशी लढू आणि सरकार स्थापन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्याआधी चेन्निथला यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसची बैठक काल झाली. यात चेन्निथला यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं १६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अंजन साळवे, पैठण अरुण घोडके, सिल्लोड मनोहर जगताप, हदगाव दिलीप राठोड, भोकर रमेश राठोड, कळमनुरी दिलीप मस्के, गेवराई प्रियंका खेडकर, तर आष्टी विधानसभा मतदरासंघातून वेदांत भादवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ५७६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी ५६३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच काळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी काल धुळे इथं माध्यमांशी संवाद साधला. धुळे आणि मालेगावची जागा समाजवादी पार्टी लढवेल हे नक्की असून, या दोन जागांसह एकूण १२ जागांची मागणी पक्षाने महाविकास आघाडीकडे केली असल्याचं, यादव यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांवर त्यांनी टीका केली.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनो�� जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली इथं मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं, जरांगे यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच मराठी महिला ठरल्या आहेत. या पदाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. २००७ ते २०१० या कालावधीत छत्रपती संभाजीनगरच्या महापौर असलेल्या रहाटकर यांनी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले, या पदाची जबाबदारी समर्पण भावनेनं पार पाडणार असल्याची भावना आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी व्यक्त केली.
“अनेक क्षेत्रांमध्ये जसं की शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिलांचे सामाजिक स्थान आहे. यासारख्या वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे महिलांच्या क्षमता आणि संधींना अधिकाधिक गती पण त्यांचा सुध्दा प्रयत्न नक्कीच करायला हवा. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास यात्रेला चालना आपण दिली पाहिजे याकरीता मी प्रयत्न केले पाहिजे असंही मला वाटतं. या पदाचं निर्वाहन जे आहे ते मी खूप जबाबदारीने करेन आणि समर्पण भावनेने करेल.”
****
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं परवा रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. १९७० च्या दशकात देशदूत वृत्तपत्रापासून पत्रकारितेला प्रारंभ केलेल्या अनुराधा औरंगाबादकर यांनी १९९८ पर्यंत साप्ताहिक गावकरीमध्ये कार्यरत राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची विविध विषयांवरची ९० पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, भारत तिबेट सीमा दलाच्या दोन सैनिक हुतात्मा झाले, तर नारायणपूर पोलीस ठाण्यातले दोन पोलीस जखमी झाले. मृत सैनिकांमध्ये सातारा जिल्ह्याचे कॉन्सटेबल अमर पन्वर तर आंध्र प्रदेशमधल्या कडप्पा जिल्ह्यातले कॉन्सटेबल के राजेश यांचा समावेश आहे.
****
महारा��्ट्रासह ओडिशात नक्षल चळवळीत काम करणाऱ्या एका जोडप्याने काल गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. असिन राजाराम कुमार ऊर्फ सुशांत आणि अंजू सुळ्या जाळे उर्फ जनिता अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
हरियाणात करनाल इथल्या राष्ट्रीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेनं, केंद्र सरकारतर्फे मंजूर झालेल्या, गव्हाच्या १३ नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरु केलं आहे. गव्हाची ही नवीन वाणं अधिक उत्पादन देण्याबरोबरच रोग प्रतिबंधक आहेत. बार्ली DWRV 137 या वाणाचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला असून, याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठीही करता येणार आहे.
****
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश राष्ट्रीय राजपत्रात करण्यात आला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना-१६, सोयाबीनचा एम ए यू एस-७३१, देशी कपाशीचा पी ए ८३३, अमेरिकन कपाशीचा एन एच ६७७ आणि तीळाचा टी एल टी -१० या वाणांचा समावेश आहे. देशाच्या राजपत्रात समावेश झाल्यामुळे या वाणांचा प्रचार आणि प्रसार मोठया प्रमाणावर होण्यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल, असा विश्वास, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केला.
****
राज्यात कालही अनेक भागात पाऊस झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला, बीड तालुक्यातल्या चऱ्हाटा या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, परळी तालुक्यात सेलू इथं एक बैल काल वीज कोसळून ठार झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं काल पावसाने हजेरी लावली. रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यात कन्नड आणि हतनूर परिसरात ही पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.
खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात २३ हजार ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन येलदरी धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे.
नाशिक जिल्ह्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. चांदवड तालुक्यात दोन पाझर तलावांचं नुकसान झालं तर, एक बंधारा क्षमतेपेक्षा जास्त भरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसां��ध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
****
बंगळुरू इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेली पहिली कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला १०७ धावांची आवश्यकता आहे. काल चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला. या डावात सर्फराज खान १५०, ऋषभ पंत ९९, विराट कोहली ७० तर कर्णधार रोहित शर्माने ५२ धावा केल्या. काल दुसऱ्या डावात फलंदाजीला मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांना एकही धाव काढता आली नाही. पहिल्या षटकाचे चार चेंडू टाकलेले असतांनाच अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर प्रशासकिय यंत्रणांनी भर द्यावा, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
****
0 notes
Text
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
वेटर ऑनलाईन 27 जुलै, 2021 8:38 एएम | स्कायमेट वेदर टीम दिल्लीत जुलै महिन्यात मॉनसनच्या विमानाने बरेच चांगले प्रसंग उद्भवले. या क्षणी, येथे 14 जुलै आणि 20 जुलै रोजी एएस-पास बारिशसह तापमानातही गिरावट बनी रहा. याव्यतिरिक्त जुलै महिना च्या पर्यटन देखील बारिश काही क्रियाकलाप पहायला मिल होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरासरी मासिक बारिशचा आकड�� 187 मिनिटांवर आहे, येथे 281 मिनिट बारिश महिन्यांचा शेवट…
View On WordPress
#दिल्ली पाऊस#दिल्ली पावसाळा#दिल्ली मध्ये बारिश#दिल्ली मध्ये मानसून#दिल्ली येथे आज पाऊस#दिल्ली साठी हवामान अंदाज#दिल्ली हवामान अंदाज#दिल्ली हवामानाचा पूर्वानुमान#दिल्लीचे मौसम पूर्वानुमान#दिल्लीत आज बारिश#दिल्लीत पाऊस#दिल्लीत मान्सून#मानसून 2021#मान्सून 2021
0 notes
Text
यूपीसह या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, दिल्लीत हवामान आनंददायी, ताज्या अपडेट्स वाचा
यूपीसह या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, दिल्लीत हवामान आनंददायी, ताज्या अपडेट्स वाचा
यावेळी अनेक राज्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झाला असून, त्यामुळे उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती. प्रतिमा क्रेडिट स्रोत: ANI देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मान्सूनचा पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे…
View On WordPress
0 notes
Text
करोनाच्या चिंतेने दिल्लीत वीकएंड कर्फ्यू; मात्र सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस
करोनाच्या चिंतेने दिल्लीत वीकएंड कर्फ्यू; मात्र सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस
करोनाच्या चिंतेने दिल्लीत वीकएंड कर्फ्यू; मात्र सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस दिल्लीतील वाढत्या करोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता डीडीएएमची एक बैठकदेखील आयोजित करण्यात आली. या बैठकीत करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. The post करोनाच्या चिंतेने दिल्लीत वीकएंड कर्फ्यू; मात्र सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस appeared first on Loksatta. देशात पुन्हा एकदा नवीन करोनाबाधितांच्या संख्येत…
View On WordPress
0 notes
Text
हवामान तज्ज्ञांचा अंदाज ; २२ ते २५ जून दरम्यान वादळी पाऊस पडेल
हवामान तज्ज्ञांचा अंदाज ; २२ ते २५ जून दरम्यान वादळी पाऊस पडेल
मान्सूनचे आगमन १५ जून रोजी कोकणात झाले असले तरी अजून मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. मान्सून तेलंगणा, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दाखल होईल. नवी दिल्लीत मात्र मान्सून जुलै महिन्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रात गुरुवारी दाखल झालेल्या…
View On WordPress
0 notes
Text
४ ऑगस्ट, १९४७
ते पंधरा दिवस / ४ आज चार ऑगस्ट. सोमवार. दिल्लीत व्होइसरॉय, लॉर्ड माउंटबेटन यांचा ��िवस जरा लवकरच सुरु झाला. दिल्लीतली हवा दमट होती. आभाळ भरून आलं होतं. तरी पाऊस पडत नव्हता. मळभ आल्यासारखं झालं होतं. एकुणातच वातावरण तसं मरगळलेलंच होतं. खऱ्या अर्थानं जवाबदारीतून मुक्त व्हायला लॉर्ड साहेबांना फक्त अकरा रात्रीच उरल्या होत्या. नंतरही अर्थातच ते भारतात राहणार होते. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून. पण…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरे��द्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
****
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून हो��ार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा, हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा तसंच धुळे जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात काल वीजांसह मुसळधार पाऊस पडला.
****
उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात काल मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. दावोसमध्ये झालेली गुंतवणूक, सौरऊर्जा, सेमीकंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत असल्याचं ते म्हणाले.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कोल्हापूर इथं पक्षातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. विधानसभेच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ५८ जागांपैकी अवघ्या १७ जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हे अंतर ��रून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना शाह यांनी यावेळी केली.
****
देशातल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवाद असण्याची गरज, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री जाधव यांनी नॅशनल हेल्थ मिशनची बैठक दिल्लीत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नॅशनल हेल्थ मिशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम घेण्याचं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं.
****
देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख मेट्रिक टनांनी वाढून तीन हजार ३२२ लाख मेट्रिक टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२३-२४ साठी विविध महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाचे अंतिम अंदाज जाहीर केले आहेत. सरत्या वर्षात भात, गहू आणि श्री अन्न यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी झाल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्राथमिक अंदाज करण्यात आल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर सरकारनं कारवाई केली असून, यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी बळकट करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वितरण समारंभ नवी मुंबईत काल झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महाअभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावला यानं अजिंक्यपद मिळवलं आहे. मंगोलियात उलानबातर इथं झालेल्या या स्पर्धेत कमलनं पाकिस्तानच्या खेळाडुचा सहा - दोन असा पराभव केला.
****
कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या ��शस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडुंमध्ये स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
शिक्षकी पेशा हे मानव निर्माणाचं पवित्र अभियान-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राज्यशासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या चार प्रकल्पांना मान्यता
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीप���टी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर
कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
आणि
लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित
****
शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही, तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनी, नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात देशभरातल्या ८२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या ब���डके यांचा समावेश आहे. ५० हजार रुपये, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मंतय्या बेडके यांनी, या पुरस्काराबाबतच्या आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..
‘‘आमच्या शाळेमध्ये शाळा डिजीटल करणे, विद्यार्थ्यांना मातृभाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणे, आणि शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, हा जो आमचा निविण्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश होता आणि तो उद्देश सफल झाला.’’
****
मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल प्रदान करण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नसल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२८ शाळांना काल शिक्षक दिनी नवोपक्रमशील तसंच गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राज्यात एक लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या, उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं २१ हजार २७३ कोटी रुपये गुंतवणुकीच्या वाहन प्रकल्पातून १२ हजार रोजगार निर्माण होतील. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये होणार असून, यात एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपये गुंतवणुक आणि १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
पुण्यातल्या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्रकल्पात एकूण १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, एक हजार रोजगार निर्माण होतील, तर अमरावती जिल्ह्यात नांदगाव इथं वस्त्रोद्योगात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.
****
��त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण आणि गंगापूर इथं जिल्हा अतिरिक्त न्यायालयाची स्थापना, तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच वाटप, थकबाकी अदा करणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याज माफी, विहिरी-शेततळे-वीज जोडणीसाठी भरीव अनुदान, तसंच बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला, तसंच १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उजनी, कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच १०० टक्के भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास या धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी साठा होता.
****
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचं, या निर्णयात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह ग्रामीण भागातल्या आठ देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
****
कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यासाठी वळवणं शक्य असून, याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
****
दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश���ी देण्यात आले आहेत.
****
चालू शैक्षणिक वर्षामधल्या विविध शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे.
****
जातीव्यवस्था कायम राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं तसंच पुतळ्याचं अनावरण काल गांधी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं.
****
आगामी गौरी-गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतल्या केशरी शेतकरी शिधा प��्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येतो. पात्र शिधापत्रिका धारकांनी हे शिधासंच हस्तगत करावेत, असं आवाहन परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. शांतता समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
पुणे महानगर परिवहन मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालक तसंच बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना स्कॉच या नामंकित संस्थेचा "स्कॉच २०२४ राष्ट्रीय पुरस्कार" जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल मुंडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या २२ सप्टेंबरला नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर त��लुक्यातल्या मंगरूळ इथल���या अंगणवाड्यांच्या परिसरात अंगणवाडी सेविका आणि गावकऱ्यांच्या मदतीने परसबाग उभारण्यात आली आहे. या परसबागेतल्या विविध भाज्या आणि फळे अंगणवाडीत शिकणाऱ्या लहानग्यांना पोषण आहारात दिले जातात. यामुळे बालकांमधल्या कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचं, पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाच पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज ग्रामपंचायतीत जमा करुन समाजकल्याण विभागाकडे देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी दीड हजारावर अर्ज छाननीअंती पात्र ठरले आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
युवकांचा सहभाग वाढवल्यास सहकारी संस्थांचा कायापालट शक्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाचा समारंभ
डिजीटल कृषी योजना आणि मुंबई-इंदूर नवीन रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
मराठवाड्यात २८४ मंडळात अतिवृष्टी, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे प्रशासनाला निर्देश
आणि
राज्य सरकारचे शिक्षक पुरस्कार जाहीर, मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास, प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या काल कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं, वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होत्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सहकार हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबतच सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल कृषी योजनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रांच्या ��ळकटीकरणासाठी एक हजार २०२ कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी एक हजार ११५ कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. मुंबई-इंदूर दोन शहरं जोडणारा तीनशे नऊ किलोम��टर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या २८४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, ६३ गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
**
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहत��ंमध्ये शिरल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ९० टक्के भरलं असून, धरणात १३ हजार ६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल या धरणाचं जलपूजन केलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
**
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के झाला आहे. बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या काठावरील नागरिकांनी सद्य:स्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन, आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. काल अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, खरीप पिकांचं नुकसान झालं आहे.
**
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी शिंदे यांचा काल नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**
परभणी जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथं पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या दगावल्या, तर शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या नुकसानीचा तत्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर गावात रात्री मुक्कामी असलेली बस काल पुराच्या पाण्यात वाहून गेली.
**
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आ��ेल्या पुरामुळे शेवाळा गावातल्या दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं, तर कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. चार गावातून ३९ जणांना एनडीआरएफ च्या जवानांच्या मदतीने पुराच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर काल सकाळी वीज कोसळली, सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
**
लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
**
नांदेड जिल्ह्यात ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतीचं दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. उंचाडा इथं कयाधु नदीच्या परीसरात अडकलेल्या २५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पावसामुळे २५ जनावरं दगावली असून, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधल्या संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्यानं, हा मार्ग काल वाहतुकीसाठी बंद केला होता. नांदेड शहरात अनेक वसाहतींमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं, महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत.
**
धाराशिव जिल्ह्यात १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातले बहुतांश नदी, नाले, ओढे तसंच तेरणा नदी भरून वाहत आहे. यामुळे तेर मुरुड आणि धाराशिवहून लातूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल जाहीर झाले. यावेळी विविध प्रवर्गांमधे ११० जणांची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी मुंबईत होणार आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकसंख्या पंधरा झाली आहे. यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश आहे. काल सुमीत अंतीलनंत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. तर, पुरुष बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत नितेश कुमारनं सुवर्ण आणि सुहास यतीराजनं रौप्य पदक जिंकलं. महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत तुलसीमती मुरुगस��न हिनं रौप्य, मनीषा रामदास आणि नित्यश्री सिवन यांनी कांस्यपदक, तर मिश्र तिरंदाजी प्रकारात शीतलदेवी आणि राकेश कुमार जोडीला कांस्यपदक मिळालं. ऍथलेटीक्समध्ये योगेश कथुनिया यानं थाळीफेकमध्ये सलग दुसरं रौप्य पदक पटकावलं.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख १० हजार युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजाराहून अधिक युवा हे राज्यातल्या खासगी तसंच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली.
****
गेल्या खरीप हंगामातील कापूस तसंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार १९४ कोटी ६८ लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून, शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरीत करण्याचे निर्देश, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
****
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार असल्याचा दावा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लातूरमध्ये काल व्हि. एस. पँथर्स संघटनेचे संस्थापक विनोद खटके यांनी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.
****
यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या आठ तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित बी. रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग तसंच तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त
केंद्रीय मंत्रिमंडळाची डिजिटल कृषी योजनेला मंजुरी-मुंबई इंदूर रेल्वेमार्गासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपये निधीलाही मान्यता
मराठवाड्यात पावसाची संततधार कायम; जालन्यात एकाचा नदीत बुडून मृत्यू तर परभणीत शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या ठार
आणि
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत आज भारताच्या नीतेश कुमारला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक तर योगेश कठुनियाला थाळीफेकमध्ये रौप्य पदक
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास, प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात त्या बोलत होत्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहकार हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबत सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या –
(राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू)
इस तेजी से बदलते हुये समय में सहकारी संस्थाओं को भी अपने आप को बदलने की आवश्यकता है। उन्हें अधिक से अधिक टेक्नॉलॉजी का उपयोग करना चाहिये। साथ ही मॅनेजमेंट को प्रोफेशनल बनाना चाहिये। ये सदैव ध्यान रखना चाहिये की, कोई भी सहकारी संस्था किसी के व्यक्तिगत हित और लाभ कमाने का साधन बनकर ना रह जाये। नही तो को ऑपरेटीव्ह का उद्देश्य ही समाप्त हो जायेगा। मेरा मानना है की, सहकारीता समाज मे ही एक शक्ती का सदुपयोग करने का उत्तम माध्यम है। सहकारीता ��ा योगदान देश के विकास में अतुलनीय है।
दरम्यान, तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपतींचं कोल्हापूर इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. परवा चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल कृषी योजनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. मुंबई-इंदूर दरम्यान तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा नवा रेल्वेमार्ग २०२८-२९ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे.
****
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार आजही कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण सुमारे ९० टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे.
****
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के झाला आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील परिसराती नागरिकांनी सद्यस्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. क्षीरसागर यांनी आज अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झालं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. दरम्यान, घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी विठ्ठल शिंदे यांचा आज सकाळी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. जिल्ह्यातल्या पूरस्थितीकडे पाहता बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर मिळावं, अशी मागणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे.
पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथे पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाला तर काही शेळ्या आणि शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या घटनेतल्या नुकसानाचा तात्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर गावात रात्री मुक्कामी असलेली बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. याशिवाय एक मळणी यंत्रही पुरात वाहून गेल्याचं वृत्त आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. गावातल्या दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं आहे. कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणं धोकादायक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर आज सकाळी साडेअकराच्या सुमाराला वीज कोसळली. यात वायरलेस सेटसह इतर विद्युत साहित्य जळून गेलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
****
लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी ०६ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
****
नांदेड शहरातल्या जोरदार पा��सामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
नांदेड शहरात महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आज भारताच्या नीतेश कुमारनं बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. याशिवाय योगेश कठुनियानं पुरुषांच्या एफ छपन्न थाळीफेक क्रीडाप्रकारात रौप्य पदक जिंकलं. आजच्या या पदकांमुळे आता भारताची पदकसंख्या नऊवर पोहचली आहे. भारताचा बॅडमिंटन पटू सुहास यतिराजही आज सुवर्णपदकासाठीचा आपला सामना खेळणार आहे.
****
स्मिता वत्स शर्मा यांनी आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. स्मिता वत्स शर्मा यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली आहे.
****
राज्यात आज बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर सह परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात बैलांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली, तसंच पुरणपोळी खाऊ घालून मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असला तरी मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या ८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित बी. रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात ‘बी. रघुनाथ आणि परभणीची कविता’ हा मूळ परभणी जिल्ह्यातील कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २१ सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ४ लाख ९२ हजार प्रौढ पात्र नागरिकांचं उद्यापासून बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी बीसीजी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 01 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता
*********
नवी दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायपालिका विषयक दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा नवा झेंडा आणि विशेष चिन्हाचंही अनावरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं आयोजित ही परिषद कालपासून दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं सुरु आहे.
**** महाविकास आघाडीतर्फे आज, ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरादरम्यान सुरु असलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात हे आंदोलन सुरु आहे.
****
दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत डिजीटल भारत निधी नावानं ओळखल्या जाणाऱ्या नियमांपैकी पहिला नियम अमलात आला असून, त्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. पुर्वीच्या युनिव्हर्सल सर्विस ��ब्लिगेशन फंड ऐवजी हा नियम लागू होणार आहे. या अधिसूचनेनुसार, डिजीटल भारत निधीमधून योजना आणि प्रकल्प कार्यान्वयनासाठी निधी दिला जाईल. अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, डिजीटल भारत निधीमधून अल्पसंख्याक गटांना दूरसंचार सेवांमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं विविध योजना, प्रकल्पांना निधी देण्यात येणार आहे.
****
फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य २०२४ या स्पर्धेमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुणांची तुकडी येत्या सहा सप्टेंबरला रवाना होणार आहे. ६१ प्रकारच्या विविध कौशल्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून त्यासाठी ६० स्पर्धकांचा गट भारताचं प्रतिनिधित्व करेल. दिल्लीत आयोजित भारत कौशल्य राष्ट्रीय स्पर्धेतून यासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
****
हर घर दुर्गा अभियानांतर्गत आता राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असणार आहेत. या अभियानात विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असं आवाहन कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.
****
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर इथं राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी काल ही घोषणा केली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावं, ही या समाजाची प्रमुख मागणी आहे.
****
रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणामुळे नांदेड ते मनमाड डेमू रेल्वेगाडी आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या महिनाभरात ही गाडी पूर्णा इथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड अशी धावेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी मनमाड ते पूर्णा अशी धावणार आहे.
****
सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सरासरीच्या १०९ टक्के पाऊस या काळात देशात होऊ शकतो. त्याचवेळी महाराष्ट्रासह काही भागात तपमान सरासरीपेक्षा जास्त असेल.
****
नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यातील विष्णुपुरी आणि मानार हे दोन्ही मोठे प्रकल्प तुडूंब भरले आहेत. तर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे इतर लघु आणि मध्यम प्रकल्पातही चांगला जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५६ पूर्णांक १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३६ पूर्णांक ८० मिलीमीटर पाऊस किनवट तालुक्यात तर सर्वात कमी ��६ पूर्णांक ५० मिलीमीटर पाऊस भोकर नोंदवण्यात आला आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आज जिल्हा न्यायपालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घघाटन केल्यानंतर ते बोलत होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत, मात्र ते अधिक सक्रिय करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितक्या वेगानं निर्णय घेतले जातील, तितकी महिलांच्या सुरक्षेची अधिक खात्री होईल, अ��ंही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुद्रांक आणि नाण्याचं अनावरण केलं.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आपल्या अभिभाषणात कायद्याच्या चौकटीचा आणि समाजाचा विचार भारतीय न्यायव्यवस्थेत केला गेला असल्याचं म्हटलं. या परिषदेत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, ऍटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी आदी उपस्थित होते.
****
भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन दिल्लीतलं आदमी पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते बिजेन्द्र गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळानं या संदर्भातलं निवेदन राष्ट्रपती मुर्मू यांना दिलं. भाजपनं यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली तसंच या सरकारच्या कार्यपद्धतीमुळं आवश्यक सेवा तसंच दिल्लीच्या जनतेसाठीच्या कल्याणकारी कार्यक्रमांवर दुष्परिणाम होत असल्याचंही नमूद केलं. या प्रकरणी राष्ट्रपतींचा तात्काळ हस्तक्षेप अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
****
जगभरातल्या सर्व डिजिटल व्यवहार करणाऱ्या ‘ॲप्स’ना भारताच्या ‘युपीआय ॲप’नं मागे टाकलं आहे. डिजिटल माध्यमातून गेल्या एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत व्यवहारांमध्ये ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामाध्यमातून ८१ लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. ‘ग्लोबल पेमेंट्स हब पे सिक्युअर’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक सेकंदाला ३ हजार ७२९ हून अधिक डिजिटल व्यवहार ‘युपीआय’च्या माध्यमातून झाले आहेत.
****
नाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळं नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विका��ाला चालना मिळेल.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील राजीव गांधी स्टेडियम मधल्या बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमीपूजन झालं. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, महानगर पालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपास्थित होते.
****
मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला तर रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार असून, रब्बी लागवडीचं क्षेत्रही त्यामुळं वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या चोवीस तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच जालना जिल्ह्यात येत्या तीन सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या आंद्रेस मोल्टेनी आणि मॅक्सिमो गोन्झालेझ यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीतही रोहन बोपण्णा आणि अल्डिला सुतजियादी यांनी डेमी श्युअर्स आणि स्पेनच्या टीम पुट्झ या डच जोडीचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून, अर्थ मंत्रालय यामाध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
देशात खरीप पिकांच्या पेरणीमध्ये या वर्षी लक्षणीय प्रगती झाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र एक हजार ६५ लाख हेक्टरपेक्षा जास्त असून, तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे एक हजार ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी झाली होती. कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
****
भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सात टक्के दराच्या आधारे बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात २०२४-२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा अंदाज सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत जाईल असं म्हटलं आहे.
****
वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आ���ा. याशिवाय तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या पाच शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.
****
राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून काल ठाणे इथल्या ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. व्या��सायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधित पांडे यांनी खोट्या गुन्ह्याच्या धमक्या देणं, पैसे वसुल करणं आणि खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुनामिया यांनी केला आहे.
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं; त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेली अनेक दशकं मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माहेरचा आहेर, मानाचं कुंकू, आज झाले मुक्त मी; अशा मराठी चित्रपटात, तसंच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.
****
पेरूमधील लीमा इथं सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे जय कुमार, नीरु पाठक, रिहान चौधरी आणि संद्रामोल साबू यांनी काल ४ बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारांत पात्रता फेरी पार केली आहे. यासह भारतीय संघ २० प्रतिस्पर्धी संघांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारतील. ३५ वर्षीय जय शाह, हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.
****
राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवा��ी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
****
गुजरात मध्ये देखील मुसळधार पाऊस होत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरा भागात होत असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन व्हाईस ॲडमिरल आर. सरीन, एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास आणि एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. पद्मा श्रीवास्तव यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती. सर्वोच्च न्यायालयानं या कृती दलाला तीन आठवड्यात अंतरिम अहवाल आणि दोन महिन्यांत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे��. मुंबईत अनेक ठिकाणच्या दहिहंडी उत्सवात सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.
****
राज्यात अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील ४२ बंधारे पाण्याखाली गेल�� आहेत.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही संच सुरू करण्यात आले असून, दोन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून ८४ हजार ४४६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.
****
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत नेदरलॅँडचा खेळाडू टॅलोन ग्रीकस्पूर याच्याकडून सुमीतचा १-६, ३-६, ६-७ असा पराभव झाला. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकाता इथल्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ३० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात येत्या आठ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी केंद्र सरकरानं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे तक्रार निवारण व्यवस्था प्रणाली अधिक सुसूत्र होऊन नागरिकांच्या अधिकारातही वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जी पोर्टल डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करु शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, हे अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, २१ दिवसात प्रत्येक तक्रारींचं निवारण करणं आणि सर्व विभागांनी तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे.
****
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर तीन लाखांचं तर दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकं आज सर्वाजनिक मंडळांद्वारे आयोजित दहीह��डी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठीकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकेही या उत्सवात सक्रिय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठिकाणी दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी उत्सव सहभागी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्��े यांच्या उपस्थितीत विधानभवन इथं काल बैठक घेण्यात आली. शैक्षणिक संस्थांमधून महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातही अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
****
नेपाळमध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
कोरोनाच्या संकटातून जग अजूनही पुर्णपणे बाहेर आलं नसून युद्धाच्या स्थितीमुळं भारताच्या विकासासमोर आव्हानं उभी राहीली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत आयोजित तिसऱ्या व्हाईस ऑफ ग्लोबल दक्षिण देशांच्या शिखर संमेलनात ते आज बोलत होते.
पंतप्रधानांनी यावेळी दुरदृष्टप्रणालीद्वारे दक्षिण देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. अलिप्ततावाद, दहशतवाद हा समाजासाठी धोकादायक बनला असून चहुबाजूने अनिश्चिततेचं वातावरण असल्याचं ते म्हणाले. अंतर्गत व्यापार, समावेशक विचार आणि विकासासाठी देश चालाना देत असून भारत मानवतेच्या दृष्टीनं मित्र राष्ट्रांना आपत्तीकाळात मदत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असून मुंबईत जे.जे. रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात निदर्शनं सुरु असून शहरातील काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना या संपात सहभागी झाली आहे.
हिंगोलीत डॉक्टर हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ आणि दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर धुळ्यात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
****
कठोर आणि प्रामाणिक मेहनत तसंच सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे.
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या सव्वीसाव्या दी��्षांत समारंभ कार्यक्रमात काल ते बोलत होते. भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले
****
यंदाचे मुंबई मराठी साहित्य संघाचे नाट्यगौरव सन्मान जाहीर झाले असून त्यात चतुरस्त्र रंगकर्मी पुरूषोत्तम बे��्डे, लेखिका अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे, संगीत नाटकांचे लेखक प्रदीप ओक, ख्यातनाम प्रकाश योजनाकार श्याम चव्हाण, संगीत रंगभुमीवरील नवोदित कलाकार भाग्येश मराठे, डॉक्टर गौरी पंडित, आदित्य पानवलकर, लेखक, दिग्दर्शक स्वप्नील जाधव, आनंद पालव, संतोष भुवड आणि रंगमंच संस्था यांचा समावेश आहे .
संस्थेचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांच्या स्मृतिदिनी २५ ऑगस्ट रोजी अध्यक्ष अचला जोशी, ज्येष्ठ नटवर्य बाळ धुरी यांच्या हस्ते हा सन्मान वितरण सोहळा होईल.
****
हिंगो��ी जिल्ह्यातल्या तीसपैकी नऊ मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली असून, काल पहाटे मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळं हिंगोली शहरालगत असलेल्या कयाधु नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९५ मिलीमीटर पाऊस आंबा मंडळात तर सर्वात कमी २९ पूर्णांक ९ मिलीमीटर पाऊस टेंभूर्णी मंडळात झाला. लातूर जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. जळकोट तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं तर चाकूरसह तालुक्यातल्या महाळंगी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यानं संसारोपयोगी साहित्य आणि शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यातही आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून संततधार पाऊस सुरु आहे.
दरम्यान येत्या चार दिवसात मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळीवारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
उत्तरप्रदेशात प्रयागराज रेल्वे स्थानकावर दुरुस्ती कामामुळे जालना-छपरा-जालना या विशेष गाडीच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. संबंधित प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
****
बीड इथं काल कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय भारत सरकार, जन शिक्षण संस्थान बीड द्वारा सुरू असलेल्या पीएम विश्वकर्मा प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींना ओबीसी महामंडळाच्या कर्जविषयक योजनांची माहिती देण्यात आली. ओबीसी समाजातील पारंपारिक व्यावसायिकांच्या आर्थिक उत्थानासाठी ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे वसुली निरीक्षक कृष्णा कळसाने यांनी ही माहिती दिली.
****
0 notes