#घेण्यावर
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
युवकांचा सहभाग वाढवल्यास सहकारी संस्थांचा कायापालट शक्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाचा समारंभ
डिजीटल कृषी योजना आणि मुंबई-इंदूर नवीन रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
मराठवाड्यात २८४ मंडळात अतिवृष्टी, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे प्रशासनाला निर्देश
आणि
राज्य सरकारचे शिक्षक पुरस्कार जाहीर, मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास, प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या काल कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं, वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होत्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सहकार हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबतच सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे ��ाष्ट्रपतींनी लक्ष वेधलं.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल कृषी योजनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी एक हजार २०२ कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी एक हजार ११५ कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. मुंबई-इंदूर दोन शहरं जोडणारा तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या २८४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, ६३ गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
**
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ९० टक्के भरलं असून, धरणात १३ हजार ६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल या धरणाचं जलपूजन केलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
**
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के झाला आहे. बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या काठावरील नागरिकांनी सद्य:स्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन, आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. काल अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शहरातल��� चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, खरीप पिकांचं नुकसान झालं आहे.
**
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी शिंदे यांचा काल नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**
परभणी जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथं पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या दगावल्या, तर शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या नुकसानीचा तत्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर गावात रात्री मुक्कामी असलेली बस काल पुराच्या पाण्यात वाहून गेली.
**
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावातल्या दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं, तर कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. चार गावातून ३९ जणांना एनडीआरएफ च्या जवानांच्या मदतीने पुराच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर काल सकाळी वीज कोसळली, सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
**
लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन य��ंनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
**
नांदेड जिल्ह्यात ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतीचं दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. उंचाडा इथं कयाधु नदीच्या परीसरात अडकलेल्या २५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पावसामुळे २५ जनावरं दगावली असून, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्या�� येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधल्या संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्यानं, हा मार्ग काल वाहतुकीसाठी बंद केला होता. नांदेड शहरात अनेक वसाहतींमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं, महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत.
**
धाराशिव जिल्ह्यात १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातले बहुतांश नदी, नाले, ओढे तसंच तेरणा नदी भरून वाहत आहे. यामुळे तेर मुरुड आणि धाराशिवहून लातूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल जाहीर झाले. यावेळी विविध प्रवर्गांमधे ११० जणांची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी मुंबईत होणार आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकसंख्या पंधरा झाली आहे. यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश आहे. काल सुमीत अंतीलनंत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. तर, पुरुष बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत नितेश कुमारनं सुवर्ण आणि सुहास यतीराजनं रौप्य पदक जिंकलं. महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत तुलसीमती मुरुगसेन हिनं रौप्य, मनीषा रामदास आणि नित्यश्री सिवन यांनी कांस्यपदक, तर मिश्र तिरंदाजी प्रकारात शीतलदेवी आणि राकेश कुमार जोडीला कांस्यपदक मिळालं. ऍथलेटीक्समध्ये योगेश कथुनिया यानं थाळीफेकमध्ये सलग दुसरं रौप्य पदक पटकावलं.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख १० हजार युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजाराहून अधिक युवा हे राज्यातल्या खासगी तसंच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली.
****
गेल्या खरीप हंगामातील कापूस तसंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार १९४ कोटी ६८ लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून, शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरीत करण्याचे निर्देश, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
****
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी अश�� लढत होणार असल्याचा दावा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लातूरमध्ये काल व्हि. एस. पँथर्स संघटनेचे संस्थापक विनोद खटके यांनी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.
****
यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या आठ तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित बी. रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Pankaja Munde : पाथर्डीतून नाही तर परळीतून लढणार, पराभवाचा बदला घेण्यावर पंकजा मुंडे ठाम!
https://bharatlive.news/?p=85923 Pankaja Munde : पाथर्डीतून नाही तर परळीतून लढणार, पराभवाचा बदला घेण्यावर पंकजा ...
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
पहा: डेव्हिड वॉर्नरचे लक्ष चेंडूवर होते, येथे गिली प्रायव्हेट पार्टवर उडून गेली
पहा: डेव्हिड वॉर्नरचे लक्ष चेंडूवर होते, येथे गिली प्रायव्हेट पार्टवर उडून गेली
डेव्हिड वॉर्नर: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात (AUS vs SL) गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान एक मजेदार घटना घडली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लेग स्लीपमध्ये उभा असलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर स्टंपचा बळी ठरला. त्याचे लक्ष पूर्णपणे झेल घेण्यावर होते आणि दुसरीकडे गिली त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जाऊ लागली. तो हसतखेळत वेदना लपवताना दिसला. यादरम्यान सहकारी खेळाडूही त्याला…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
द कपिल शर्मा शो जूनमध्ये बंद होणार नाही, टीमच्या दौऱ्याचा शोवर परिणाम होणार नाही
द कपिल शर्मा शो जूनमध्ये बंद होणार नाही, टीमच्या दौऱ्याचा शोवर परिणाम होणार नाही
कपिल शर्मा शो बंद होणार नाही: अलीकडेच कपिल शर्माच्या शोमध्ये ही बातमी वेगाने पसरू लागलीबंद हवा जाईल. या अफवा दोन प्रकारे उडल्या. एक म्हणजे कपिल शर्माने विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन केले नाही आणि त्यानंतर कपिलच्या शोच्या विरोधात एक विभाग उभा राहिला होता. जो स्वतः शो ऑफ एअर घेण्यावर वाकलेला होता. दुसरी ऑफ एअर अफवा तेव्हा उठली जेव्हा कपिल अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
लोकसभेत कृषी कायदे परत घेण्याचा ठराव मंजूर, चर्चेच्या मागणीवरून गदारोळ
लोकसभेत कृषी कायदे परत घेण्याचा ठराव मंजूर, चर्चेच्या मागणीवरून गदारोळ
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत कृषी कायदे परत घेण्याचा प्रस्ताव सादर केला. त्याला मंजुरी देखील मिळाली. यानंतर विरोधकांनी कायदा परत घेण्यावर चर्चेची मागणी केली. त्यावरून संसदेत मोठा गदारोळ उडाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चा सुरू करण्याची तयारी दर्शवली. परंतु, त्यासाठी शांत व्हावे असे आवाहन केले. परंतु, विरोधकांची घोषणाबाजी सुरूच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
शेतकरी नियोजन पीक : केळी
कापूस व इतर पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात यंदा टप्प्याटप्प्याने केळीची लागवड केली आहे. लागवड १२ जून ते २० जून यादरम्यान करण्यात आली. जमीन काळी कसदार पाण्याची निचरा होणारी आहे. त्या दृष्टीने सर्व बाबींचे नियोजन केले आहे. योग्य व्यवस्थापनातून निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्यावर भर असतो. शेतकरी :  कमलेश महाजनगाव : ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगावएकूण क्षेत्र : २० एकरकेळी क्षेत्र : १२ एकर (एकूण झाडे १७…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years ago
Text
दहावीच्या परीक्षा न घेण्यावर राज्यसरकार ठाम......!
दहावीच्या परीक्षा न घेण्यावर राज्यसरकार ठाम……!
मुंबई दि.२३ – महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
गलगलेंची भन्नाट कल्पना 
मुंबई : महाराष्ट्रातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. प्रत्येकजण घाबरला आहे. स्वतःची आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेण्यावर आपला जास्त भर असतो. पण त्यासोबतच आपण या समाजाचंदेखील देणं लागतो. करोनाच्या या भयावह परिस्थितीत समाजाप्रती आपला खारीचा वाटा उचलण्याचं आवाहन अभिनेते भरत जाधव यांनी केलं आहे.​    ​सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vidhisworld · 4 years ago
Text
कायदा म्हणजे काय ? कायदयाची संकल्पना काय आहे? कायदयाची गरज का भासते?
Tumblr media
कायदा म्हणजे काय ? कायदयाची संकल्पना काय आहे ? कायदयाची गरज का भासते ? याचं आपण आज थोडक्यात ओहा पोह करणार आहोत. प्रथम कायदा म्हणजे शासनाने प्रचलित समाजरचनेमध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी, राज्यशासनाचा व्यवहार समाजापर्यंत व्यवस्थित पोहचविण्यासाठी जे नियम, जे तत्वे असतात त्याला आपण कायदा म्हणतो. कायदा हा खरंतर निसर्ग तत्वावर, न्याय तत्वावर, माणसांच्या मुलभूत गरजांवर एकमेकांच्या गरजांचा संकोच होऊ नये, एकमेकांच्या नैसर्गिक मालकी हक्कावर, उत्त्पन्नावर, मुलभूत अधिकारावर कसल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि सर्वांना न्याय तत्व, मुलभूत तत्व, विवेकाने एका पद्दतीने त्याचा उपभोग, वापर, हक्क, अधिकार, आणि संरक्षण मिळावा यासाठी कायदयाचा वापर केला जातो. राज्यशासनाने, केन्द्र शासनाने त्या-त्या वेळेस शासनाच्या का��ी अटी नियमांची, पद्दतींची अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने, नागरिकाने, तसेच शासनाने वागणुकीचे जे नियम केलेले असतात त्यालाही आपण कायदा म्हणू शकतो.
आता हा कायदा मानवाच्या सारासार विवेक बुद्दीवर अवलंबून असतो, निसर्ग न्याय तत्वावर अवलंबून असतो. कायदा हा चलित आहे; काळ, वेळ, प्रसंग, परिस्थिती, गरज या संदर्भात, या कारणास्तवर याचा उपयोग हा बदलत जातो, त्या प्रमाणे कायद्यात निरनिराळे बदल होऊ शकतात. कायदा हा खरे पाहतं, समाजाच्या मुख्य हेतूचा, इच्छेचा, व्यक्तिगत आणि सामूहिक हक्कांचा एक प्रतिक असतं, एक symbol असतं. आता हा कायदा विविध प्रकारचा आहे. व्यक्तिगत संरक्षण, सामाजिक संरक्षण, निसर्गाचे संरक्षण त्यासाठी समाज्याचे प्रशासन, administration यामध्ये एक सुसूत्र बद्धता यावी त्याचे जे नियम असतात त्याचाही एक कायदा असतो, आणि मग या कायद्याच्या नियमावली तर्कशुद्धरीत्या विवेकाने सर्व समाज्याला व शासनाला उपयुक्त होण्याचं एक शास्त्र आहे. ते कायदा शास्त्र आणि या कायद्याचा योग्य तो अर्थ लावणे योग्य त्या ठिकाणी योग्य त्या हेतूने त्याचे विभाजन करणे याचेही एक शास्त्र आहे, असा हा कायदा. यामध्ये आपण आज मिळकती संदर्भात, मालकी हक्काच्या संदर्भात इथे ओहा पोह करणार आहोत.
आपण म्हणतो हि माझी मिळकत आहे, हि त्याची मिळकत आहे हि कायदेशीर मिळकत आहे, याचा अनधिकृत कब्जा आहे, याने बळकावली आहे, यास शासनाने दिली आहे अश्या अनेक प्रकारच्या मालमत्ता संदर्भात आणि मिळकती संदर्भात आपण नेहमी विधान करत असतो. आता हा जो मालमत्ता आहे यामध्ये एक अचल मालमत्ता म्हणजेच immovable property आणि दुसरी जंगल मालमत्ता म्हणजेच movable property. अचल मालमत्तेला आपण स्थावर मालमत्ता असेही म्हणतो. आता या मालमत्ता ग्रहण करण्याच्या, ठेवण्याच्या, घेण्याच्या, देण्याच्या, हस्तांतरित करण्याच्या अनेक कायदेशीर पद्धती आहेत. त्यास आपण व्यवहार म्हणतो, आणि केलेला व्यवहार हा संरक्षित आहे का? कोणाच्याही मुलभूत हक्कास, मालकी हक्कास, उपभोगास इजा न पोहचविता शासनाने दिलेल्या नियमानुसार आहे का? तो समाजमान्य आहे का? व्यक्तीमान्य आहे का? पुन्हा ते कायदा मान्य आहे का? हे पाहणं गरजेचं असतं. कारण, मालमत्ता हि एकमूल्य आहे, मालमत्ता हि एक ठेव आहे, मालमत्ता हि एक asset आहे, मालमत्ता हे assurance आहे, मालमत्ता हि एक पत आहे, मालमत्ता हि एक उपजीविकेचे साधन आहे, मालमत्ता एक भविष्य निर्वाहनेमीचं साधन आहे, मालमत्ता हि हस्तांतरित एका व्यक्तीकढून दुसऱ्या व्यक्तीकडे वारसा हक्काने वडिलांकडून मुलांकडे जाण्याची, जगण्याची अत्यावश्यक मिळकत आहे, एक मूल्य आहे. आता हि मालमत्ता स्थावर आणि जंगम आहेत. तश्या काही मालमत्ता अदृश्य स्वरूपात देखील असतात, उदाहरण म्हणजे गायकाचा आवाज, एका नाट्य कलाकाराचा अविर्भाव, एखादं patent एखाद्याची अनु��वाची master key अश्या अनेक पद्धतीच्या मालमत्ता व आपण त्याला copyright या संकल्पनेत घेतो. पुन्हा माझा copyright, माझे patent, त्याचे हक्क या पद्धतीच्याही मालमत्ता आहेत. दृश्य आणि अदृश्य त्याचबरोबर माणसाची समाजात एक पत असते एक goodwill असते ती पत, ते goodwill अभ्यासाने, विशिष्ठ ज्ञानाने, अनुभवाने, परिचयाने वाढत आहे, आणि पत हि सुद्धा एक प्रकारची मालमत्ता आहे, शोध हि मालमत्ता आहे. संशोधनातून तयार केलेला एखादा formula हि पण मालमत्ता आहे आणि अश्या सर्व प्रकारच्या मैदानीक मालमत्तेचं संरक्षण त्यासाठी एक नियम त्यावर शासनाचा कायदेशीर अंकोश या सर्वांचा सर्वसमाज बघतो आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण कायद्यानेच वागतो, कायद्यानेच झुकतो आणि आपले संरक्षण कायद्यानेच होते. आपण सामान्य माणसं प्रत्येक श्वास जो नैसर्गिकरीत्या घेतो त्याला हि कायद्याचे संरक्षण असते, हि दैनंदिन बाब असल्यामुळे ते आपल्या कधीही लक्षात येत नाही. शुद्ध पाणी, शुद्ध हवा ज्याला आपण privacy, private privacy, personal privacy, आपल्या घराची privacy, आपल्या विचारांची privacy म्हणतो, याचंही संरक्षण होतं. Possation कब्जा आचारांचा, विचारांचा, वस्तूंचा हा हि एक प्रकार तुमच्या स्वामीत्वाचा होऊ शकतो. हे जे स्वामित्व आहे, हे स्वामित्व नैसर्गिक, व्यक्तिगत, जन्मतः, वारसाने आलेले, समाजाने दिलेले, शिक्षणाने आलेले, अनुभवाने आलेले, शासनाने दिलेले व समाजाने मान्य केलेले असे सर्व काही नैतिक, व्यावहारिक आणि कायद्याच्या चौकटीत असणारे आपण नियमित उपभोगत असतो. त्याच बरोबर ते administration करताना नियमांमुळे सर्वांना व्यवस्थित मिळावे म्हणून काही नियम, अटी, शर्त, बंद, प्रतिबंध असतात, तेही कायद्यात येतात. त्या व्यक्तीची, त्या समाजाची, त्या शासनाची आणि समाजसमूहाची अत्यावश्यक गरज असते. त्यामुळे श्वासोश्वास हा गणित प्रत्येकाला कायद्याची गरज आहे. जशी मानवाला आहे तसेच वन्यपशु-प्राणी, दुर्मिळ प्राणी, वनस्पति, पंच महाभूतांच नियोजन, पंचमहाभूतांचा, आनंदाचा, उत्पन्नाचा, उपभोगाचा वाटा याची हि गरज आहे, त्याचेही एक प्रशासन आहे. अन्यथा पुढच्या पिढींना सिंह, हरिण, राजहंस, काळवीट हे फक्त चित्रात दाखविण्याचे प्राणी उरतील, त्यांचेही संरक्षण झाले पाहिजे.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. अनेक प्रकारच्या संस्कृती, रीतिरिवाज, जाती, पंत, सण, वार, उत्सव त्यातील वैदिक्ता विविधता आणि दुर्मिळता जोपासण्यासाठी, काही हक्क राखून ठेवण्यासाठी कायदे करावे लागतात. जसे की पोंगल, पुणे मध्ये गणपती उत्सव होतो. त्याचे एक नियोजन करावे लागतं, एक कायदा करावा लागतो. गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीला २४ तासाचे २८ तास ३६ ��ासांपर्यंत जातं. ठराविक रोड वरून मिरवणूक न्ह्यावी लागते. कोणाच्या आनंदासाठी कोणाच्या तरी privecy ला त्या कालमर्यादेत प्रतिबंध येतो, समाजाने आणि कायद्याने हे मान्य केले आहे, पण त्यास काही मर्यादा आहेत. हा संपूर्ण भाग आपले मुलभूत हक्क, अधिकार, मालमत्ता, कायदा यासंदर्भात आपण पाहत आहोत. हे कायदे काळानरूप रितिरिवाजाने मोठयांकडून लहानांकडे, मागच्या पिढीकधून पुढच्या पिढीकडे काही मौखिक, काही लिखित पुढे चालत आले. त्याचे गरजेनुसार नियोजन होत गेलं.
आपणास माहीत आहे, कि संपूर्ण देश हा लाखो खेड्यांचा अनेक संस्थानिकांमध्ये वाटलेला नियमित पगार, नियमित काळ हे ब्रिटिशांपासून भारतात चालू आलं. त्यापूर्वी राजाचा मुलगा राजा, प्रधानचा मुलगा प्रधान, सेवकाचा मुलगा सेवक आणि या सर्वांना त्यांच्या सेवेसाठी जमीन इनाम दिली जात असे, आणि त्या जमीनितले उत्पन्न हि त्या कुटुंबाची, त्या समाज्याचे उत्पन्नाचे एकमेव साधन, आणि नोकरी मध्ये राजाचा मुलगा राजा सक्षम आहे, पात्र आहे याचा आणि वारसा हक्काने आलेल्या अधिकाराचा काहीही एक संबंध न्हवता. मग हे वेतनाचे नियोजन करणार, पुढे पुढे जाता वेतन अर्धे करण्याचे कायदे करण्यात आले. जमिनीच्या holding चे कायदे करण्यात आले. त्यामुळे ceiling हेक्टा आलं. घरं वाढली, harbor ceiling हेक्टा आलं. Land acquisition भुसक पदार्थांचे कायदे आले, असे मालमत्ते संबंधी कायदे आले. तसेच आपली जी चल संपत्ती आहे, सोनं, नाणं, पैसा अडका याचे हि नियोजन करता आलं. त्यासाठी बँकेची निर्मिती झाली. पुन्हा त्या बँकेच्या नियोजनासाठी बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. Corporate funds आले, प्रदेशी चलनं आली. राष्ट्रीय बँक बरोबर नागरी बँका, पत संस्था, सहकारी संस्था त्यांचे नियमन आलं. त्यामध्ये त्यांचं दृश्य उत्पन्न, तुमचं locker त्याचे विधिनियम आले. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला श्वासा इतकीच व किंभावना श्वासापेक्षा जास्त कायद्याची गरज निर्माण होते. आपण artificially श्वास विकत घेऊ शकतो, पण कायदा हा समाजाने, व्यक्तीने पाळावा लागतो. कायद्याची सुरुवात जन्मापूर्वी हि होते. Legitimate child किंवा illegitimate child, एकच माता बालक, व दत्तक पुत्र मानवाच्या जन्मापूर्वी पासून कायद्याचे अधिनामे आहेत, जन्मभर कायदे अणि त्या व्यक्तिच्या मृत्यू पश्चात हि कायदा त्याने केलेली will त्याच्या संपत्तीची विल्हेवाट, त्याने काढलेल्या कर्जाची जबाबदारी, त्याच्यावर असणारी responsibility याचं हे कायदेशीररित्या, नियोजन, विल्हेवाट करावी लागते. असा हा कायदा सावधतेनी आपल्यासाठी वापरला पाहिजे.
स्पर्धा नाही उदाहरण म्हणून; कधी कोणास कमी जास्त लेखणे हा हे हेतू नाही. कायद्याची संकल्पना सांगण्यास सोपे जावे म्हणून हे उदाहरण, एक doctor चुकला तर एक patient दगा होऊ शकतो. पण, त्याचे दुःख त्याचे नुकसान एका कुटुंबा पर्यंत समावेत असू शकतं. जर कायदा करणारे, कायदा वापरणारे, कायदा सांगणारे याने जर चूक केली तर त्याचे परिणाम सर्व समाजाला भोगावे लागतात. चालू सांप्रत काळात एक उदाहरण असे ���ी, भारत स्वतंत्र झाला, कायदे झाले, आपण प्रगत झालो, शिक्षण घेतलं, व्यापार, व्यवसाय, नोकरी केली, investment केलं, परदेशात गेलो, पैसे कमविले, पैसे गमविले, चढउतार पहिले, युद्ध पहिले, दुष्काळ पाहीला, सुकाळ पाहीला, पाण्याची टंचाई पाहिली, अतिवृष्टी पाहिली हे सर्व करत असताना नियतीला, निसर्गाला थोडसं विसरून शेतीच्या संदर्भात उत्पादन खर्चावर आधारित भाव देणारा कायदा केला नाही. शेती वापर आपण अनैतिक, अव्यवहार्य, खोटारडेपणी वागलो. त्यामध्ये सर्वशासन, सर्वनागरिक, सर्व समाज यात अंतर्भूत होत आहे. हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय दैनंदिन जीवनात प्रत्येकाचा आहे. कांदा उत्पादन खर्च २० रु. झाला जास्त पीक घेतलं तर २ पैसे ला हि विकत घेतला आणि कमी पडला तर तो १०० रु. प्रमाणे पण विकत घ्यावा लागला. भरडला एकच समाज त्याचे नाव शेतकरी. आम्हास अन्न वस्त्र सोडून कोणतीही वस्तू वाढली त्या बाबत तक्रार नसते पण २५ पैशाने दूध वाढले की आम्ही निषेध करू लागतो. हा नैतिकतेचा, निसर्गाचा शेती उत्पन्न घेण्यावर आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एक प्रकारे अन्याय करत आहोत. एक ज्वलंत उदाहरण सांगण्याचं कारण असं की कायद्याचा व्यवस्थित अंकोश नसेल, कायदे बरोबर नसतील तर त्याचे दुष्परिणाम समाजास किंवा समाजाच्या काही घटकास भोगावे लागतात आणि त्याचा दृश्य आणि अदृश्य परिणाम कळत आणि नकळत पणे सर्व समाजावर होतो. शेती पर्वडेनासही झाली लोक गावाकडून शहरात आले, शहराला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकसंख्या आली, मग पाण्याचे प्रश्न, वसाहतीचे प्रश्न, झोपडपट्टीचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, निसर्गाची हानी होण्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले. म्हणजे आम्ही जर प्रामाणिक पणे, शुद्धतेने अर्थकारणावर, समाजकारणावर, निसर्गकारणावर अवलंबून, उत्पादन खर्चावर आधारित भाव प्रामाणिकपणे त्या शेतकऱ्यास दिला असता तर शेती व्यवसायाला एक सामाजिक प्रतिष्ठा लाभली असती. तज्ञ लोक, सुशिक्षित लोक, विद्वान, संगणक तज्ञ, यंत्रतज्ञ हे शेतीवर गेले असते. म्हणजे, आम्हीच अनैतिकतेने वागून स्वार्थी पणाने वागून कायद्याचा संकोच केल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या सर्वजण विषयुक्त अन्न खात आहोत. आणि म्हणून प्रथम कायद्याची गरज प्रत्येकाला आहे. कायदा आपल्या श्वासा इतकाच महत्वाचा आहे. आपण तो श्वास ही शुद्ध हवेतील oxygen असेल तरच आपण निरोगी सुदृढ योग्य त्या प्रतिकार शक्तीचे राहू. यासाठी कायद्याचा अभ्यास आपण नियमित करणार आहोत.
आम्ही Vidhi Vishwa Associates या LLP firm चे जबाबदार वकील मंडळी, या कायद्याची माहिती समजला पोहचावी समाजाचा वेळ पैसे वाचावा, न्यायव्यवस्थेवर ताण पडू नये. या रुपयाने समाजाची देशाची सेवा करण्यासाठी आपणास नियमित भेटत जाऊ. त्यामध्ये आपणास काही शंका असल्यास, काही दाखले हवे असल्यास, पुरावे हवे असल्यास त्याचे आम्ही जास्थित जास्त निरसन करण्याचा सकार्य करण्याचं प्रयत्न करू. विधी विश्व संस्थेमधील आम्ही वकील मंडळी किमान २५ वर्षापेक्षा जास्त कायद्यातील अनेक क्षेत्रातील अभ्यासू विद्यार्थी या छताखाली आलो आहोत. आमचं ब्रीद वाक्य आहे Honesty Is The Best Policy.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग तसंच तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त
केंद्रीय मंत्रिमंडळाची डिजिटल कृषी योजनेला मंजुरी-मुंबई इंदूर रेल्वेमार्गासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपये निधीलाही मान्यता
मराठवाड्यात पावसाची संततधार कायम; जालन्यात एकाचा नदीत बुडून मृत्यू तर परभणीत शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या ठार
आणि
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत आज भारताच्या नीतेश कुमारला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक तर योगेश कठुनियाला थाळीफेकमध्ये रौप्य पदक
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास, प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात त्या बोलत होत्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहकार हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबत सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या –
(राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू)
इस तेजी से बदलते हुये समय में सहकारी संस्थाओं को भी अपने आप को बदलने की आवश्यकता है। उन्हें अधिक से अधिक टेक्नॉलॉजी का उपयोग करना चाहिये। साथ ही मॅनेजमेंट को प्रोफेशनल बनाना चाहिये। ये सदैव ध्यान रखना चाहिये की, कोई भी सहकारी संस्था किसी के व्यक्तिगत हित और लाभ कमाने का साधन बनकर ना रह जाये। नही तो को ऑपरेटीव्ह का उद्देश्य ही समाप्त हो जायेगा। मेरा मानना है क��, सहकारीता समाज मे ही एक शक्ती का सदुपयोग करने का उत्तम माध्यम है। सहकारीता का योगदान देश के विकास में अतुलनीय है।
दरम्यान, तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपतींचं कोल्हापूर इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. पर��ा चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल कृषी योजनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. मुंबई-इंदूर दरम्यान तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा नवा रेल्वेमार्ग २०२८-२९ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे.
****
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार आजही कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण सुमारे ९० टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे.
****
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के झाला आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील परिसराती नागरिकांनी सद्यस्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. क्षीरसागर यांनी आज अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झालं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. दरम्यान, घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी विठ्ठल शिंदे यांचा आज सकाळी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. जिल्ह्यातल्या पूरस्थितीकडे पाहता बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर मिळावं, अशी मागणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे.
पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथे पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाला तर काही शेळ्या आणि शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या घटनेतल्या नुकसानाचा तात्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर गावात रात्री मुक्कामी असलेली बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. याशिवाय एक मळणी यंत्रही पुरात वाहून गेल्याचं वृत्त आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. गावातल्या दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं आहे. कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणं धोकादायक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर आज सकाळी साडेअकराच्या सुमाराला वीज कोसळली. यात वायरलेस सेटसह इतर विद्युत साहित्य जळून गेलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
****
लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी ०६ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र��यांनी दिल्या.
****
नांदेड शहरातल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
नांदेड शहरात महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आज भारताच्या नीतेश कुमारनं बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. याशिवाय योगेश कठुनियानं पुरुषांच्या एफ छपन्न थाळीफेक क्रीडाप्रकारात रौप्य पदक जिंकलं. आजच्या या पदकांमुळे आता भारताची पदकसंख्या नऊवर पोहचली आहे. भारताचा बॅडमिंटन पटू सुहास यतिराजही आज सुवर्णपदकासाठीचा आपला सामना खेळणार आहे.
****
स्मिता वत्स शर्मा यांनी आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. स्मिता वत्स शर्मा यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली आहे.
****
राज्यात आज बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर सह परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात बैलांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली, तसंच पुरणपोळी खाऊ घालून मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असला तरी मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या ८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित बी. रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात ‘बी. रघुनाथ आणि परभणीची कविता’ हा मूळ परभणी जिल्ह्यातील कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २१ सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ४ लाख ९२ हजार प्रौढ पात्र नागरिकांचं उद्यापासून बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी बीसीजी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“मी हा निर्णय घेतला अन् आता…”, लग्न न करता मुलं दत्तक घेण्यावर सुष्मिता सेनने केले भाष्य
“मी हा निर्णय घेतला अन् आता…”, लग्न न करता मुलं दत्तक घेण्यावर सुष्मिता सेनने केले भाष्य
“मी हा निर्णय घेतला अन् आता…”, लग्न न करता मुलं दत्तक घेण्यावर सुष्मिता सेनने केले भाष्य बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर सुष्मिताने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सुष्मिता सेन ही अद्याप अविवाहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती सिंगल मदर म्हणून दोन मुलींचे संगोपन करत आहे. नुकतंच आंतरराष्ट्रीय महिला…
View On WordPress
0 notes
chandrakant-patil-blog · 5 years ago
Link
महाराष्ट्राचे कृषिमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी या अभियानामार्फत एका अभिनव उपक्रमाची सुरुवात राज्यामध्ये केलेली आहे. श्री पाटील यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रगतीवर भर  दिलेला असून त्यांची विचारधारा शेतीमध्ये नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान, सरकारच्या विविध ��ोजना, जास्तीत जास्त पीक घेण्यावर भर, तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांचा समावेश या व्यवसायासाठी करणे, विविध सिंचन योजना आणि शेतीमालाला योग्य भाव अशा विविध घटकांना समाविष्ट करते.  
0 notes
harshal-barve · 6 years ago
Text
ब्लॉग 1 : क्रिकेट
चेन्नई विरुद्ध बंगळूरू मॅचमधील धोनीची बॅटींग सगळ्या क्रिकेट विश्वाला बोटे तोंडात घालायला लावणारी होती. त्याने विराटच्या संघाच्या खिशातली मॅच जवळजवळ काढून घेतली होती. विराटच्या चेहऱ्यावर मॅच हातातून निसटत असल्याची नाराजी प्रकर्षाने जाणवू लागली होती. याआधीही रसेल ने केलेल्या अशक्य आणि अवर्णनीय बॅटींग ने एक सामना त्यांच्या हातातून बघता बघता निसटण्याची जखम पुन्हा ताजी होण्याचीच ही लक्षणे होती.  परंतु हा सामना दोन महान व्यक्तींच्या स्वभावाचे काही वेगळे पैलू आणि त्यांची कणखर वृत्ती नक्कीच दाखवून देत होता.
धोनी: 
लिडिंग फ्रॉम द फ्रंट चे उत्तम उदाहरण. चेहऱ्यावर कधीही नैराश्य न दाखवणारा हा महान खेळाडू. याचे वैशिष्ठ्य म्हणजे क्रिकेट विश्वातील प्रत्येक जण याची तारीफ करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्याबद्दल कोणालाही जेलसी वाटत नाही. अन्यथा या कलियुगात कोणीही सतत यशस्वी होताना दिसले तर त्यामागच्या परिश्रमांचा आणि स्वतःच्या लायकीचा विचार न  करता त्याच्याबद्दल जळफळाट करून वाट्टेल ते बोलायला बरेच जण पुढे सरसावतात. पण या महान खेळाडू बद्दल आजपर्यंत फक्त गौरवोद्गारच ऐकायला मिळत आलेत. त्याचा साधेपणा, प्रत्येकाकडून योग्यतेप्रमाणे परफॉर्मन्स काढून त्याचा परफेक्ट वापर करण्याची कला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परिवाराला तो देत असलेला क्वालीटी वेळ त्याला उच्च स्थानावर नेऊन ठेवतात. त्याचे देशप्रेम ही सर्वांनाच प्रभावाने जाणवते.
विराट कोहली:
महान आणि अशक्य कोटीचा कंसीस्टंट बॅट्समन. याच्या बॅटमधून धावांचा रतीब गेली काही वर्षे निघतोय. आणि हा आहे भारतीय क्रिकेट टीम मधला सर्वात फीट खेळाडू. एवढ्या लहान वयात कप्तानपदाची जबाबदारी स्विकारून आपला खेळ अधिकच उंचीवर नेऊन ठेवण्याची कठीण कला याच्याकडे आहे. धोनीच्या छायेत तो छान तयारही होतोय. जगातले अनेक रथी महारथी यासाठी भारतीय क्रिकेट संघाला नशीबवान समजतात. विराटचे वैशिष्ट्य म्हणजे तो एक अतिशय अग्रेसीव कप्तान आहे. पण त्याला धोनीकडून शिकण्यासारखे अजून खूप काही आहे. 
या दोन्ही कप्तानांचा सर्वात प्रशंसनीय विचार म्हणजे ते फॉरेन प्लेयरपेक्षा भारतीय प्लेयर्सकडून महत्वाची कामगिरी करून घेण्यावर भर देतात. एक खूप छान रिस्क काल विराटने घेतले. त्याने शेवटची ओव्हर फॉरेन प्लेयर ऐवजी भारताच्या बॉलरकडून करवून घेतली. एक प्रकारे भारतीय युवा गोलंदाजाला महत्वाच्या क्षणी धोनीला बॉलिंग करण्याची यापेक्षा अधिक चॅलेंजिंग संधी कधी मिळणार? Hats off to विराट, Hats off to धोनी  आणि Hats off to भारतीय क्रिकेट ✓
��ा क्रिकेट वरील ब्लॉग कसा वाटला ते जरूर कळवा.
हर्षल श्रीराम बर्वे.
२२ एप्रिल २०१९
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
राष्ट्रवादीने संजय शिंदेंना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवले- रोहन देशमुख
राष्ट्रवादीने संजय शिंदेंना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवले- रोहन देशमुख
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र ��ोहन देशमुख यांना माढा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर जोर द्यायला सुरुवात केली आहे. माढ्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकीट नाकारून, रोहन देशमुख यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रोहन देशमुख यांनी पंढरपूर दौऱ्यावेळी…
View On WordPress
0 notes
thanevarta-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर चाचणी घेण्यावर राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिबंध महापालिका निवडणुकांनंतर लगेचच काही ठिकाणी जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदारांवर कुठल्याही प्रकाराचा प्रभाव पडू नये या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकांची जाहिर प्रचार बंदी झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर चाचणी घेण्यावर राज्य निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला आहे.
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा शांत-उद्या मतदान
चौथ्या टप्प्यातल्या प्रचारालाही वेग-
छत्तीसगडमधल्या दंत���वाडा जिल्ह्यात ३५ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
बीड जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचं चंदन जप्त-दोन जण ताब्यात
आणि
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात मतदार जागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचं आयोजन
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा काल थंडावल्या. या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांसह राज्यातल्या सोलापूर, माढा, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग, या ११ मतदारसंघात उद्या सात मे रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतदार संघांमध्ये महाविकास आघाडी तसंच महायुतीसह विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काल अखेरच्या दिवशी सायंकाळपर्यंत सभा, मेळावे घेत प्रचार फेऱ्या काढल्या, द्वारसभांच्या माध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा भर दिसून आला.
****
कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला, तर इंडिया आघाडीसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतली.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते नितीन गडकरी प्रचारात सहभागी झाले होते. त्यांनी टेंभुर्णे इथंही सभा घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण इथं सभेला संबोधित केलं, तर सोलापूर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर इथं संकल्प मेळावा घेतला.
बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी सभा घेतली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदारांना साद घातली.
सांगली लोकसभा मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज इथं केसांचा चौकात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली.
महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार आदित्य ठाकरे यांची सभा झाली, तर सावंतवाडीत भाजपा उमेदवार नारायण राणे यांनी प्रचारसभा घेतली.
लातूर लोकसभा मतदारसंघात अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर, काँग्रेस नेते अमित देशमख यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातही जाहीर प्रचार थांबला असून, आता मतदारांच्या प्रत्यक्ष गाटीभेटींसह, माध्यमांच्या जाहिरातींवर उमेदवारांचा अधिक भर दिसून येत आहे.  
****
चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानेही आता वेग घेतला आहे.
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज राज्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. दुपारी एक वाजेच्या सुमारा�� पुणे जिल्ह्यातल्या शिरुर इथं, तीन च्या सुमारास पिंपरी-चिंचवड इथं, तर संध्याकाळी साडे चार वाजता रायगड जिल्ह्यातल्या खारघर इथं ते प्रचारसभा घेणार आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्राचारार्थ काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालना शहरात सभा घेतली.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल वैजापूर इथं पदयात्रा काढली, तर पक्षाचे प्रमुख असदउद्दीन ओवैसी यांची संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेतली असून,  महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
****
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जी भाषा पाकिस्तान करतो, तीच भाषा काँग्रेस का करत आहे, असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विधीज्ञ उज्वल निकम यांच्या संदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करत, वड्डेटीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केल्याचं शेलार यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसची ही भूमिका मान्य आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. विधीज्ञ निकम ही यावेळी उपस्थित होते, आपल्याकडे बरीच माहिती आहे मात्र देशहित म्हत्वाचा असल्यानं आपन काही बोलत नाही असा इशारा त्यांनी दिला.
****
भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी प्रमुख वर्तमानपत्रांत काल प्रसिद्ध केलेली जाहिरात, मतांचं ध्रुवीकरण करणारी असल्याची तक्रार, काँग्रेस पक्षाने केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
कामगारांना मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा, यासाठी सर्व क्षेत्रातल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनानं परिपत्रक जारी केलं आहे. मतदान करण्यास सवलत मिळाली नाही, अशी तक्रार दाखल झाल्यास संबंधिताविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण अहमदनगर ��णि शिर्डी या मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम समाज माध्यमांवर ही ऐकता येईल.
****
छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात काल ३५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तीन नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. दंतेवाडा पोलिसांच्या लोन वरतु मोहिमे अंतर्गत या नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत प्रोत्साहन म्हणून या सर्वांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दिले जातील.
****
बीड जिल्ह्यात काल दोन कोटी रुपये मूल्याचं चंदन जप्त करण्यात आलं. केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल पहाटे केलेल्या या कारवाईत चंदनाचा सुमारे १२०० किलोचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्या पार्थिवावर काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली, गाडे यांचं परवा छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलानं काल शहरातून संचलन केलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात आजपासून मतदार जनजागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी काल रात्री अचानक आंतरराज्य सीमेवरील स्थिर निगराणी पथकांना भेट देवून तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. रोकड, मद्य किंवा इतर प्रतिबंधित पदार्थ, वस्तूंची वाहतूक होवू नये, यासाठी स्थिर निगराणी पथकावर वाहनांची तपासणी केली जात आहे.
****
बीड लोकसभा मतदारसंघात पोलीस अधिकारी, कर्मचारी तथा अन्य अधिकारी कर्मचारी जे कर्तव्यावर आहेत, अशा एकूण ६२२ मतदारांनी आतापर्यंत टपाली मतदान केलं आहे.  सहाय्यक निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात १० ते १२ मे दरम्यान उर्वरित पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात काल एका कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. मेहकर नजीक काल सकाळी ���ा अपघात झाला, जखमींना छत्रपती संभाजी नगर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण जवळ टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा २१ वर्षीय युवक काल संध्याकाळी दुचाकीवर त्याच्या आईसह शेवगाव इथं जात असताना हा अपघात झाला.
****
अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. क्षितीज झारापकर यांनी गोळाबेरीज, ठेंगा, एकुलती एक, आयडियाची कल्पना आदी चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जला २८ धावांनी हरवलं. तर अन्य एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायन्ट्सचा ९८ धावांनी पराभव केला. आज या स्पर्धेत मुंबईत मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघादरम्यान सामना होणार आहे.
****
राज्यात काल सोलापुरात सर्वाधिक  ४४ पूर्णांक ४ दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली
मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक सात, नांदेड ४२ पूर्णांक ८, बीड ४२, तर छत्रपती संभाजीनगरचं तापमान ४१ पूर्णांक सहा एवढं नोंदवलं गेलं.
दरम्यान, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
0 notes