#रोहन देशमुख
Explore tagged Tumblr posts
marathicelebscom · 2 years ago
Text
‘मुशाफिरी!’ - दर्जेदार साहित्याची मैफिल आता ठाण्यात
‘मुशाफिरी!’ दर्जेदार साहित्य, नाट्य, लोक-भावसंगीताची मैफिल आता येत आहे ठाण्यात. तारीख:- १२ फेब्रुवारी २०२३ स्थळ:- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे पश्चिम. वेळ:- सकाळी ११ वाजता. दर्जेदार साहित्याची आणि संगीताची सहल अनुभवण्यासाठी आपली तिकिटं लवकरात लवकर बुक करा. तिकिट दर:- ३५०,२५०,१५० फोन बुकिंग :- 9930370325 / 9167000344Online booking link – https://www.rangabhoomi.com/tickets/ View this post on…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्यादिनांक :२८ जानेवारी  २०२३
ठळक बातम्या
विद्यार्थ्यांनी आपल्यातलं सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व करून दाखवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन 
नवं महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार - बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
सुकन्या कुलकर्णी, अलका कुबल यांच्यासह १५ जणांची चित्रपट परीक्षण समितीवर नियुक्ती
संत निरंकारी सत्संगाच्या छप्पनाव्या संत समागमला औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनमध्ये प्रारंभ 
भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं औरंगाबादमध्ये उत्साहात स्वागत
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंड सोबत उद्या अंतिम सामना
पुरुषाच्या पहिल्या टी - ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर २१ धावांनी विजय
आणि
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा जोडीला उपविजेतेपद
सविस्तर बातम्या
विद्यार्थ्यांनी भोवतालच्या दबावाला बळी पडू नये तसंच स्वतःला कमी न समजता आपल्यातलं सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व करून दाखवावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचं सूक्ष्म नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. कॉपी सारख्या अनुचित प्रकारांचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. गैरप्रकारांचा आधार घेऊन भविष्य घडवता येत नाही, त्यामुळे यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट वापरु नका, असं पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्र आणि गॅझेटस्‌च्या आहारी न जाता त्यांचा हुशारीनं वापर करण्याचा सल्ला मोदी यांनी दिला. घरात तंत्रज्ञानमुक्त जागा तयार करुन विशिष्ट जागेतच टीव्ही, मोबाईल संगणक वापरले जावेत, यामुळे घरातल्या इतर भागात शांतता नांदू शकेल, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
चातुर्यपूर्ण आणि कठोर मेहनत करण्याआधी कामाला व्यवस्थित समजून घेण्याचा सल्ला त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला. ते म्हणाले –
हार्ड वर्क और स्मार्ट वर्क मे से कौनसा वर्क जरुरी हे । क्या अछे परीनामो के लिए दोने जरूरी हे।क्रिपया  अपना मार्गदर्शन दिजिऐ । धन्यवाद श्रीमान कुछ लोग होते है जो हार्ड वर्क ही करते रहते हैं कूछ लोग होते हैं जिनके जीवन मे हार्ड वर्क का नामोनिशान ही नही होता हे। कूछ लोग होते है जो हार्डली  स्मार्ट वर्क करते है और कुछ लोग होते है जो स्मार्टली हार्ड वर्क करते है। और इसलिए पहले काम को बारकाई से समझऐ ।
तणावापासून मुक्ती मिळेल, असा दृढनिश्चय केला, तर त्याचा फायदा होतो, असंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ज्ञानाची परीक्षा कधीही करु नये असं सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देण्याचं काम करत आपलेपणानं विद्यार्थ्यांशी वागावं असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
****
नवं महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असल्याचं बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. मुंबईत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३०वा वर्धापन दिन सोहळ्यात काल ते बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला आणि बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला आणि अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू, फेसबुक  पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या विधिज्ञ गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण यावेळी उपस्थित होते. महिला आयोगानं केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करेल, असं आश्वा��न त्यांनी यावेळी दिलं.
****
राज्य सरकारनं चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख या १५ अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
आरे कारशेडमधील मर्यादेपेक्षा जास्त वृक्षतोड करण्याची मुंबई महापालिकेची नोटीस रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ८४ झाडे कापण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं १७७ झाडं तोडण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. या कार्पोरेशनच्या अर्जानंतर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं नोटीस जारी करुन जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्या नोटीसीला पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी जनहित याचिका दाखल करुन मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
****
राज्यात महाविकास आघाडीची स्थापना, विधानसभा निवडणुकीनंतर झाली आहे तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही निवडणुकीपूर्वी करण्यात आली असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सोलापूरमध्ये काल पत्रकारांशी ते बोलत होते. युतीनंतर होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषावरुन ही युती यशस्वी होणार असल्याचं दिसून येतं असल्याचं ते म्हणाले. आमची युती, २०२४ ची विधानसभा आणि तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
सांगली  जिल्ह्यात भिलवडी इथं उभारण्यात आलेल्या दुग्धोत्पादन आणि दुभत्या जनावरांसंबंधी संशोधन केलं जाणाऱ्या जनुकीय विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. चितळे डेअरी तर्फे उभारण्यात आलेल्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठी ‘सेक्सेल सीमेन जेनेटिक’ प्रयोगशाळा म्हणून या प्रयोगशाळेनं लौकीक मिळवला आहे. दूध उत्पादन वाढीसह  सशक्त गाई आणि बैलांची उत्पत्तीसाठी या प्रयोगशाळेचं मोठं योगदान असणार आहे असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं काल मुंबईत दिमा��दार सोहळ्यात उदघाटन झालं. भारतीय चित्रपटसृष्टीतील तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतील लोकप्रिय चित्रपट कलावंतासह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अप्पाथा’ या तामिळ चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरनं महोत्सव सुरु झाला.  शांघाय सहकार्य संघटनेसाठी भारताचं जी- २०चं अध्यक्षपद दर्शवण्यासाठी हा  चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि  संबंधित देशांमधल्या चित्रपटांचं वैविध्य आणि चित्रपट निर्मितीच्या विविध शैली यांचे दर्शन घडवणं, चित्रपट विषयक भागीदारी उभारणं, कार्यक्रमांची देवाण-घेवाण, चित्रपट निर्मितीमधल्या युवा प्रतिभेची जोपासना आणि या अनोख्या प्रांतामधल्या संस्कृतीना जोडण्यासाठी दुवा म्हणून काम करणं हा, या महोत्सवाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १०० व्या भागासाठी संकल्प चित्र - प्रतीक चिन्ह - लोगो तयार करण्यासाठी येत्या मंगळवारपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जदारांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर हे चिन्ह तयार करता यायला हवं तसंच हे चिन्ह विविध प्लॅटफॉर्मवर अपलोड करता यायला हवं. विजेत्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
****
संत निरंकारी सत्संगाच्या छप्पनाव्या संत समागमला काल औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनमध्ये प्रारंभ झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या तीन दिवसीय संत समागमसाठी लाखो निरंकारी भाविक उपस्थित आहेत. निरंकारी मंडळाच्या वतीनं विश्वबंधुता, एकता आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत.
संत समागम या कार्यक्रमातून गीत आणि विचाररुपातून जो संदेश दिला जात आहे तोच भाव आणि तो च विचार वर्षानुवर्षे महाराष्ट्रातले सर्व संत देत आले आहेत असा संदेश ‘मेसेज टू मॅन काईंड’ या कार्यक्रमात बोलताना सुदीक्षा महाराज यांनी दिला. या समागमसाठी बिडकीन मधे ३०० एकर परिसरात लाखो भाविकांसाठी २४ तास महाप्रसाद व्यवस्था आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या तीन दिवसात सत्संग, सेवादल रॅली, मोफत आरोग्य शिबीर तसंच सामुदायिक विवाह आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं काल औरंगाबादमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अस्थिधातू कलशाला अभिवादन केलं आणि या धम्मपदयात्रेत सहभाग घेतला. शहरातल्या जालना महामार्गावरुन मार्गक्रमण करत जात असलेल्या या धम्मयात्रेतल्या अस्थि कलशाला आणि भिक्खू संघाला अनुयायांनी मोठ्या संख्येनं ठिक ठिकाणी अभिवादन केलं. तसंच भिक्खू संघाद्वारे महापरित्राणपाठ आणि बोधि पुजा करण्यात आली. शहरानजिक तीसगाव इथल्या बोधीसत्व ध्यान साधना केंद्रात ही धम्मयात्रा काल मुक्कामी होती. ११० बौद्ध भिक्खू संघ थायलंडची ही धम्मपद यात्रा परभणीहून निघाली असून मुंबईच्या चैत्यभूमीला जाणार आहे.
****
औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरात उभारण्यात येणाऱ्या मसिआ ऑटो कंपोनंट क्लस्टर इमारतीच्या बांध��ामाचं भूमिपूजन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या क्लस्टर मध्ये २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून याचा फायदा जवळपास दीड हजार सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
प्रेमसंबंधाला असलेल्या विरोधामुळे आई वडील आणि भावांनी मिळून २२ वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडल्याचं काल उघडकीला आलं.  शुभांगी जनार्दन जोगदंड असं या मृत तरुणीचं नाव असून नांदेड तालुक्यातल्या महिपाल पिंपरी इथली ही तरुणी नांदेड शहरात आयुर्वेदिक महाविद्यालयात बी ए एम एसचं शिक्षण घेत होती. गावात राहणाऱ्या एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाला ते मान्य नसल्यामुळे त्यांनी तिचा विवाह दुसरीकडे जुळवला, मात्र मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाकडून विवाहासाठी नकार देण्यात आला. लग्न मोडल्यानंतर समाजात बदनामी झाल्याच्या भावनेतून शुभांगीचे आई -वडील आणि भाऊ आदींनी तिची चार दिवसांपूर्वी गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह शेतात नेऊन जाळल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
****
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडच्या संघासोबत उद्या अंतिम सामना होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडच्या संघानं निर्धारीत २० षटकांत नऊ बाद १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या संघांनं पंधराव्या षटकातच दोन गडी गमावत हे आव्हान पूर्ण  केलं.
उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला तीन धावांनी पराभू�� करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
पुरुषाच्या क्रिकेट स्पर्धेत, रांचीत झालेल्या पहिल्या टी - ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात काल न्यूझीलंडनं भारताचा २१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं विजयासाठी भारतासमोर १७७ धावांचं उद्दिष्ट ठेवलं. मात्र भारतीय संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १५५ धावाचं करु शकला.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत काल भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात ब्राझीलच्या राफेल मॅटोस आणि लुईसा स्टेफनी या जोडीनं सानिया - रोहन जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा पराभव केला.
सानिया मिर्झाची ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. तिनं आपल्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच स्पर्धेत मेलबर्नमधून केली होती.
****
परभणी जिल्ह्यात फुकटगाव ते कान्हेगाव या रस्त्यावर रेल्वे मार्गाच्या ठिकाणी भूमिगत रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पुढील पाच महिने बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कळवलं आहे. या मार्गावरची वाहतूक गणपूर फाट्यामार्गे वळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसाचा संप पुकारला होता. या संपात सर्व संघटना सहभागी झाल्यामुळे २००० पेक्षा जास्त शाखांमधून रोखीचे किंवा धनादेश वठणावळीचे कुठलेही व्यवहार काल होऊ शकले नाहीत. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक शाखेसमोर महाबँकच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली.
****
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
कोंढवा दुर्घटनेबद्दल भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी केले दुःख व्यक्त...
कोंढवा दुर्घटनेबद्दल भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी केले दुःख व्यक्त…
पुण्यात कोंढवा बुद्रुक येथेइमारतीच्या कंपाउंडची भिंत कोसळली. शेजारी असलेल्या लेबर कॅम्पच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळल्याने यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेबद्दल भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केली.
रोहन देशमुख यांचे ट्विट – 
हृदयद्रावक घटना..!पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून आतापर्यंत…
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 6 years ago
Text
भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिली कौतुकाची थाप
भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिली कौतुकाची थाप
लोकमंगल मल्टिस्टेटचे संचालक तथा भाजप युवा नेते रोहन देशमुख यांच्यावतीने १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा तुळजापूर येथे करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप रोहन देशमुख यांनी दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच दरवर्षी लोकमंगल फाऊंडेशन च्या वतीने २०० विद्यार्थी दत्तक घेतले जातात. या सत्कार सोहळ्यात रोहन देशमुख यांनी आपल्या भाषणातून…
View On WordPress
0 notes
mfvansh · 3 years ago
Text
Priyanka chopra and abhishek bachchan starrer film bluffmaster turns 16 years pr
Priyanka chopra and abhishek bachchan starrer film bluffmaster turns 16 years pr
प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) और अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) स्टारर फिल्म ‘ब्लफमास्टर’ (Bluffmaster) फिल्म 16 दिसंबर 2005 में रिलीज हुई थी. रोहन सिप्पी (Rohan Sippy) के निर्देशन में बनी इस फिल्म में रितेश देशमुख, नाना पाटेकर (Nana Patekar) , संजय मिश्रा और बोमन ईरानी जैसे दिग्गज कलाकार थे. इस रोमांटिक ड्रामा फिल्म का निर्माण रमेश सिप्पी ने किया था. इस फिल्म को अभिषेक के करियर के शुरुआती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nataklover · 5 years ago
Photo
Tumblr media
Tag in story if you like it. लफ्ज़ की तलाश में तू लाश बनके फिर रहा, सुकून दे अपने जिस्म को तू इतना क्यों भटक रहा। जो कल सत्ताधिश थे वो आज भी अधिश है, वो काम जो भी कर रहे वो नाम के ही काम है। धर्म धर्म बोलकर अधर्म है बढ़ रहा, इंसानियत की स्वाद को, धर्म है कुचल रहा। जात पात के प्रकोप का है नहीं विकल्प कोई, कोई रो रहा यहां तो कोई मर रहा कहीं। जनता का पैसा पेट में और ये सेठ बनके बैठे है, नष्ट करके लोकशाही, कुर्सी पर ये ऐठे है। आवाज़ यहां है दब रही, खोखले लफ्ज़ है भटक रहे, हारकर अपना हक, मुर्दे है लटक रहे। सत्ता का भोग नहीं उपभोग है चल रहा, जो देश बदलने आया था वो खुद भी है बदल गया। जिनको देश ने यहां था बोहोत कुछ दिया, चाहतों को उनकी अब नया मुकाम मिल गया। नई नई ये राह है, नई नई ये चाह है, है विलायत का मोह इतना, देश की किसे परवाह है। लेकिन एक शख्स था वहां जो देखता यहां वहां, बौखला गया था वो के देश में क्या चल रहा। गर मै नहीं गया यहां तो ये भूल बढ़ती जाएगी, सच्चाई के कपड़ों पर और धूल बढ़ती जाएगी। मै नौजवान हूं मै देश का ही प्राण हूं, गर देश हो यहां महान तभी तो मै महान ही। इतिहास को तू साथ रख, तू साथ रख कर्तव्य को, तू लोकशाही ज़िंदा कर, तू ज़िंदा कर इस देश को। गीरेबा अपना साफ रख, तू साफ तू धूल को, तू सच्चा देश प्रेमी है, मिटा देगा तू भूल को। -रोहन देशमुख . . . . #manatlevichar16 #indianpolitics #theboywhowrites https://www.instagram.com/p/B5cv-qRHBgf/?igshid=n2tsaqn50xdl
0 notes
manvadhikarabhivyakti · 7 years ago
Photo
Tumblr media
यूपीएससीचा निकाल जाहीर; उस्मानाबादचा गिरीश बडोले राज्यात पहिला आणि देशात विसाव्या क्रमांकावर ! —- रिपोर्ट – बीनू वर्गिस मुंबई: क��ंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत उस्मानाबादचा गिरीश बोडले राज्यातून पहिला आहे. गिरीशनं देशात विसावा क्रमांक पटकावलाय. देशात पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी ठरलाय. राज्यातील आठजणांनी पहिल्या 100 जणांमध्ये स्थान मिळवलंय. दिग्विजय बोडके (54), सुयश चव्हाण (56), भुवनेश पाटील (59), पियुष साळुंखे (63), रोहन जोशी (67), राहुल शिंदे (95), मयुर काटवटे (96), वैदेही खरे (99) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत देशातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवलंय. यूपीएससी परीक्षेत राज्यातील अनेकांनी मोठं यश मिळवलंय. वल्लरी गायकवाड देशात 131 वी आली. तर यतिन देशमुख (159), रोहन बापूराव घुगे (249), श्रीनिवास वेंकटराव पाटील (275), प्रतिक पाटील (366), विक्रांत मोरे (430), तेजस नंदलाल पवार (436) यांनीही परीक्षेत चांगलं यश मिळवलंय.
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण; पोलिस, अग्निशमन, नागरी सुरक्षा तसंच गृहरक्षक पदकांची घोषणा.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आता २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला मतदान.
दौंड इथे एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू हे हत्याकांड असल्याचं निष्पन्न.
आणि
सानिया मिर्झा-रोहन बोपन्ना जोडीची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक.
****
७४ वा प्रजासत्ताक दिन उद्या साज��ा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींच्या हिंदी आणि इंग्रजीतल्या भाषणाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. आकाशवाणीवरून भाषणाचा मराठीतून अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे.
****
उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं जाहीर झाली आहेत. ९३ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकं जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबईचे पोलिस उपमहानिरीक्षक देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुप कुमार सिंग, मुंबईचे वरीष्ठ गुप्तचर अधिकारी संभाजी देशमुख आणि ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांसह १४० पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदकं जाहीर झाली असून त्यात औरंगाबादचे पोलिस अधीक्षक मनीष कालवानिया, कोल्हापूर इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस हवलदार नामदेवराव यादव यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी ६६८ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झालं असून, त्यात महाराष्ट्रातल्या ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबादचे रमेश काथार आणि हवालदार गोकुळ वाघ यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४३ जीवन रक्षा पदकंही आज जाहीर केली. यामध्ये सात जणांना सर्वोत्तम, आठ जणांना उत्तम, तर २८ जणांना जीवन रक्षा पदकं जाहीर झाली आहेत. एखा��्याचा जीव वाचवल्याबद्दल हे पदक दिलं जातं. ४७ अग्निशमन सेवा पदकंही राष्ट्रपतींनी आज जाहीर केली. यापैकी दोन पदकं शौर्यासाठी तर सात पदकं उत्कृष्ट सेवेसाठीची आहेत. ५५ गृहरक्षक पदकं आणि नागरी सुरक्षा पदकंही राष्ट्रपतींनी आज जाहीर केली. यामध्ये राज्यातल्या काशिनाथ कुरकुटे, एकनाथ सुतार, परमेश्वर जावडे आणि मोनिका शिंपी यांचा समावेश आहे.
****
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा उद्या दिल्लीत राजपथावर होणार आहे. विजय चौकात सकाळी साडे दहा वाजता या संचलनाला प्रारंभ होईल. या सोहळ्यात इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात आज सकाळी अल सिसी यांचं औपचारिक स्वागत करुन त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल सिसी यांच्यात विविध मुद्यावर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेत कर्ज मर्यादा १० लाख रुपयांहून १५ लाखापर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती महामंडळामार्फत प्रसिद्धीपत्राद्वारे देण्यात आली आहे. मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गाकरता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांमार्फत उद्योगधंदे उभारण्याकरता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न या योजनांमार्फत केला जाणार आहे. महामंडळामार्फत साडेचार लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा आणि व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष तसंच व्याजाचा दर जास्तीत जास्त १२ टक्के इतका असेल असंही पत्रकात म्हटलं आहे.
****
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे. या दोन्ही विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला ही निवडणूक पार पडणार आहे. मतमोजणी नियोजित तारखेला २ मार्च २०२३ रोजी करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेमुळे निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
****
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचालनालय ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायाधीश राहुल रोकडे यांनी अटी शर्तींसह हा निकाल दिला आहे. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अटकेपासून अंतरिम सं��क्षण देतांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं, त्यानुसार खडसे यांनी सत्र न्यायलयात जामिनासाठी अर्ज केला होता.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या जिल्हा माहिती अधिकारी, सहायक संचालक आणि माहिती अधिकारी पदांसाठीच्या जागेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करतांना तांत्रिक अडचणी येत आहेत, यामुळे या पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी आणि पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांनाही यासाठी अर्ज करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
****
पुणे जिल्ह्यात दौंड इथल्या एकाच कुटुंबातल्या सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू हे प्रत्यक्षात हत्याकांड असल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्याम पवार, प्रकाश पवार आणि दोघांना अटक केली आहे. हे चौघं मृतक मोहन पवार यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूला मोहन पवार यांचा मुलगा कारणीभूत असल्याच्या संशयावरून श्याम पवार यानं मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी, जावई, आणि तीन चिमुरड्या नातवंडांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे सातही मृतदेह गेल्या सहा दिवसांत भीमा नदीपात्रात आढळले. दरम्यान, मोहन पवार यांचा मुलगा देखील बेपत्ता आहे त्याचाही शोध घेतला जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सानिया बोपन्ना जोडीनं ग्रेट ब्रिटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसिरा क्रॉज्जिक या जोडीचा ७-६, ६-७ आणि १०-६ अशा फरकाने पराभव केला. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या शनिवारी २८ तारखेला होणार आहे.
****
उत्तम आरोग्यासाठी योग आणि पौष्टिक तृणधान्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे प्रत्येकाने रोजच्या आहारात तृणधान्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा समावेश केला, तर विविध व्याधींपासून व्यक्ती लांब राहू शकतो, असा सूर जळगाव इथं झालेल्या जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेत व्यक्त झाला. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
****
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण १ हजार २१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकही आज प्रदान करण्यात आले.
परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज जिल्ह्यातील १७ केंद्रांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत १२ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
****
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार नोंदणी करावी असं आवाहन लातूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी केलं आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शिंदे बोलत होत्या. आपली लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निर्भयपणे आणि कोणत्याही अमिषाला बळी न पडता सजगपणे मतदानाचा हक्क बजावावा, असंही डॉ शिंदे यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज परभणी इथं जिल्हा निवडणूक विभाग आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जानेवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे. देशात मुलींना प्रोत्साहन आणि संधी देण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. मुलींच्या अधिकारांचं आणि शिक्षणाचं महत्व तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत जागरुकता वाढवणं हा देखील या दिनामागचा उद्देश आहे. देशात मुलींच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त बालकांशी संवाद साधणार आहेत. काल ११ बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
बिजनेस 20 अर्थात बी 20 ची पहिली बैठक काल गुजरातमधल्या गांधीनगर इथं घेण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, जी 20 साठीचे भारताचे शेरपा अमिताभ कांत, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या प्रमुखांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. बी 20 च्या या स्थापना बैठकीचा रेझ म्हणजेच- वृद्धी हा विषय आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत, केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयने दाखल केलेलं जामीनाविरोधातील अपील, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलं.
****
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधल्या तोफखाना केंद्रीय विद्यालयात काल ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम राबवण्यात आला. त्याअंतर्गत परीक्षेतल्या विविध समस्या आणि त्यासाठीच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली.
अहमदनगर शहरात भुईको�� किल्ल्याच्या जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्ये परीक्षा पे चर्चा या सहाव्या महोत्सवानिमित्त काल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
****
ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या सामन्यात या जोडीनं एरियल बेहेर आणि मकातो निनोमिया या जोडीचा ६-४, ७-६ असा सरळ सेटमधे पराभव केला.
//*********//
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिली कौतुकाची थाप
भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिली कौतुकाची थाप
लोकमंगल मल्टिस्टेटचे संचालक तथा भाजप युवा नेते रोहन देशमुख यांच्यावतीने १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा तुळजापूर येथे करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप रोहन देशमुख यां��ी दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच दरवर्षी लोकमंगल फाऊंडेशन च्या वतीने २०० विद्यार्थी दत्तक घेतले जातात. या सत्कार सोहळ्यात रोहन देशमुख यांनी आपल्या भाषणातून…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
राष्ट्रवादीने संजय शिंदेंना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवले- रोहन देशमुख
राष्ट्रवादीने संजय शिंदेंना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवले- रोहन देशमुख
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांना माढा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर जोर द्यायला सुरुवात केली आहे. माढ्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकीट नाकारून, रोहन देशमुख यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रोहन देशमुख यांनी पंढरपूर दौऱ्यावेळी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
शेतकरी, कामगार, अभियंते आणि लघू उद्योजक हे ‘मेक इन इंडिया’ची शक्ती असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. ते आज ‘मन की बात’ या कार्यक्रम श्रृंखलेच्या ८७ व्या भागातून देशवासियांशी संवाद साधत होते. देशानं गेल्या आठवड्यात ४०० अब्ज डॉलर म्हणजेच ३० लाख कोटी रुपये मूल्याच्या निर्यातीचं लक्ष्य गाठल्याची माहिती देताना, पंतप्रधानांनी उस्मानाबादच्या हातमाग उत्पादनांचा उल्लेख केला. केंद्र सरकारनंही गेल्या वर्षभराच्या काळात ‘गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस’च्या माध्यमातून लघु उद्योजकांकडून सुमारे एक लाख कोटी रुपयांचं साहित्य खरेदी केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सात एप्र��लला साजरा होत असलेल्या जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी पद्म पुरस्कार प्राप्त १२६ वर्षांचे बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. या वयातली त्यांची चपळता सर्वांना प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. नाशिक इथले चंद्रकिशोर पाटील यांच्या गोदावरी स्वच्छता चळवळीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. महाराष्ट्रातल्या बारवांचं पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात रोहन काळे हा तरुण राबवत असलेल्या कामाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
उन्हाळ्यात पशूपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासोबतच पाणी बचत आणि पाणी पुनर्वापराचं आवाहनही त्यांनी केलं. जलबचतीच्या कार्यात मुलांनी ‘जल योद्धा’ म्हणून उत्स्फूर्ततेनं काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. २३ मार्च या हुतात्मा दिनाच्या अनुषंगानं हुतात्म्यांचं स्मरण करत, पुढच्या महिन्यात साजऱ्या होत असलेली महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ आंबेडकर यांच्याशी निगडित स्थळांना भेटी देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८३ कोटी १६ लाखांहून अधिक मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात २६ लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. १२ ते १४ वयोगटातल्या एक कोटी २० लाखांहून अधिक किशोरवयीन मुला मुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन कोटी २५ लाखांहून अधिक पात्र नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातल्या युवा वर्गाला आतापर्यंत पहिल्या लसीच्या ५ कोटी ६८ लाखांपेक्षा अधिक तर दुसऱ्या लसीच्या ३ कोटी ७१ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
एकात्मिक पद्धतीनं काम करून मराठवाड्याचं मागासलेपण घालवता येईल, असा आशावाद ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. वराडे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथं, निर्भिड अक्षरांचे दादा आ. कृ. वाघमारे या ग्रंथाचं प्रकाशन आणि परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. आ. कृ. वाघमारे यांनी कठीण काळात निर्भिड पत्रकारिता केली. त्याच प्रमाणे आज मराठवाड्याच्या नेमक्या समस्या काय आहेत, मराठवाडा मागास का आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे या प्रश्नांवर काम करावं लागेल असं ते म्हणाले. ‘प्रादेशिक मागासलेपण आणि विकास पत्रकारिता’ या विषयावर यावेळी परिसंवादही घेण्यात आला. आज नेत्यांच्या भांडणाचीच पत्रकारिता असल्यानं विकासाविषयी कुणी बोलताना दिसत नाही. त्यामुळं विकास पत्रकारिता मागं राहिली तसंच ��ातीवाद वाढला असं मत मुक्त पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील सावखेडा गंगा इथं आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका बिबट्यानं दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. हे शेतकरी एका दुचाकीवरुन शेतात पाणी देण्यासाठी जात असताना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केलं. शुभम अशोक खटाने हे तीस वर्षीय तसंच अरुण होसाळे हे २८ वर्षीय शेतकरी या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
****
एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या वतीनं २४ ते २६ मार्चदरम्यान औरंगाबाद इथं आयोजित ‘पोस्ट पँडेमिक वर्ल्ड ऑर्डर-अपोर्च्युनिटी अँड चॅलेंजेस’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेची काल सांगता झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.विजया देशमुख होत्या. डॉ.दिलीप कुमार, डॉ.सुनील कुमार यांनी आभासी पदधतीने झालेल्या या परिषदेत मार्गदर्शन केलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालय अंतर्गत अकोला-पूर्णा मार्गावरील लोहगड-वाशिम दरम्यान साडे ४५ किलोमीटर अंतर लांबीच्या मार्गाचं विद्युतीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 March 2021 Time 7.10am to 7.20am Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      महाराष्ट्रात वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता, केंद्राचे कठोर आणि प्रभावी उपाययोजनांचे निर्देश.
·      एका पोलिस अधिकाऱ्याशी संबंधित प्रकरणाचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही - खासदार शरद पवार.
·      दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी एससीईआरटीकडून प्रश्नपेढी उपलब्ध.
·      राज्यात नवे १७ हजार ८६४ कोविडरुग्ण; मराठवाड्यात १३ रुग्णांचा मृत्यू तर नव्या दोन हजार ९२१ रुग्णांची नोंद.
·      उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक कोविड सुश्रुषा केंद्र.
·      हिंगोली जिल्ह्यात मर्यादेपेक्षा अधिक वऱ्हाडी जमवलेल्या चार लग्न सोहळ्यांवर कारवाई.
आणि
·      बँकांच्या निष्क्रिय खात्यातून अब्जावधी रुपये लंपास करण्याच्या तयारीत असलेली टोळी पुणे पोलिसांकडून जेरबंद.
****
महाराष्ट्रात वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता, राज्य सरकारनं कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. सध्या केल्या जात असलेल्या रात्रीची संचारबंदी तसंच सप्ताहांत टाळेबंदीचा प्रभाव अत्यंत मर्यादित असेल, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यात कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होत असून, कोविडच्या तपासण्यांमध्ये वाढ करणं, बाधितांचं विलगीकरण तसंच कोविड लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना, आरोग्य सचिवांनी केल्या आहेत.
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, राज्यासाठी कोविड लसीच्या दोन कोटी २० लाख मात्रांची मागणी केली आहे. दर आठवड्याला २० लाख मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी, टोपे यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल दिल्लीत दाखल झालेले टोपे पत्रकारांशी बोलत होते. नागरिकांनी योग्य काळजी घेणं, तसंच गांभीर्यानं वागणं गरजेचं असल्याचं, ते म्हणाले.
****
एका पोलिस अधिकाऱ्याशी संबंधित प्रकरणाचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. केरळमधले ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनी ��ाल काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, दिल्लीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात पवार यांनी, चाको यांचं स्वागत केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारमधले सर्व घटकपक्ष मिळून काम करतात, काही समस्या येतात, त्यावर चर्चेतून तोडगा काढला जातो, असं सांगतानाच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची शक्यता, पवार यांनी फेटाळून लावली.
****
रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नसल्याचं, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत सांगितलं. रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती असून ती कायम तशीच राहील, असं त्यांनी नमूद केलं.
देशात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, एकूण ३८६ इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रं कार्यान्वित झाली आहेत, अशी माहिती, केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत दिली. देशात सुमारे ३६ कोटी ७१ लाख एल ई डी दिव्यांचं माफक दरात वितरण केल्याचंही, जावडेकर यांनी सांगितलं.
****
देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. बँकांच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. देशाची आर्थिक नाडी बँकांच्या हाती आहे, त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासात बॅंकाच महत्वपूर्ण भूमिका बजावतात, याची जाण केंद्र सरकारला असल्याचं, त्यांनी नमूद केलं. ज्या राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण होईल, त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क आणि फायदे अबाधित राहतील, अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळानं विकास वित्त संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भातल्या घटनांचं वृत्���ांकन अधिक संवेदनशीलतेनं व्हावं, अशी अपेक्षा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. काल या अनुषंगानं घेण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. अशा घटनांचं वार्तांकन करताना, यासंदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करावं, तसंच पोक्सो कायदा, बाल न्याय सुधारित अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याशी निगडित घटनांचं वृत्तांकन करतानाही, पीडीतांबाबत पुरेपूर संवेदनशीलता जपण्यात यावी, माध्यम प्रतिनिधींसाठी यासंदर्भात विशेष जागृती कार्यशाळांचं आयोजन करण्यात यावं, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिल��.
****
पुणे इथल्या बार्टी कार्यालयानं सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना, येत्या ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात, विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत, समितीकडे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित सर्व प्रकरणं निकाली काढण्याच्या तसंच त्रुटी असलेल्या अर्जांबाबत अर्जदाराकडून त्रुटींची पूर्तता करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेत सुरू असलेलं विविध प्रकल्पावरचं संशोधन आणि चाचणीचं काम कालबद्धरित्या पूर्ण होण्यासाठी, प्रकल्प प्रमुखाची नेमणूक करण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते काल या संस्थेच्या ५९ व्या नियामक परिषदेच्या बैठकीत बोलत होते. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि पीएच.डी. करण्यासाठीही अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात यावं, असंही देशमुख म्हणाले.
****
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी, पदोन्नतीच्या अटी तसंच शर्तीमध्ये सुधारणेचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. नगरपंचायतींप्रमाणेच क आणि ड दर्जाच्या महानगरपालिकांच्या क्षेत्रातल्या अंगणवाडी मदतनीसांना, अंगणवाडी सेविकेच्या पदावर पदोन्नतीनं नियुक्ती देताना विचारात घेण्यात यावं, असंही ठाकूर यांनी सांगितलं.
****
वस्त्रोद्योगाची क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्राचे प्रश्न सकारात्मक पद्धतीनं सोडवण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. वस्त्रोद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. २७ अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रमागांना, वीजवापरावर ७५ पैसे प्रतियुनिट अतिरिक्त अनुदान, रेशीम संचालनालयातील रिक्तपदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यास मान्यता, वस्त्रोद्योगासाठी सौरऊर्जेच्या वापराची शक्यता तपासणं आदीबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती, पवार यांनी दिली.
****
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘एससीईआरटी’च्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाइन प्रश्नपेढी उपलब्ध आहे. यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीची तर १४ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, म्हणून ही सराव प्रश्नपेढी तयार केली जात आहे. परीक्षेत यापैकीच प्रश्न विचारले जातील, असं नाही, असं परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल, तसंच इमारतींच्या पुनर्विकासकामांसह राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी शिंदे यांना काल दिल्लीत लोकमत माध्यम समुहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनाही ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
राज्यात काल १७ हजार ८६४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २३ लाख ४७ हजार ३२८ झाली आहे. काल ८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५२ हजार ९९६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक २६ शतांश टक्के झाला आहे. काल नऊ हजार ५१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २१ लाख ५४ हजार २५३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९१ पूर्णांक ७७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ३८ हजार ८१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या दोन हजार ९२१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात, बीड जिल्ह्यातल्या दोन, तर नांदेड, परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल तब्बल एक हजार २७१ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ५५२, जालना ३०४, बीड २८३, लातूर १९९, उस्मानाबाद १२३, परभणी ११६, तर हिंगोली जिल्ह्यात ७३ नवे रुग्ण आढळून आले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक इमारत अधिग्रहीत करून कोविड केंद्र उभारण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. या अधिग्रहित करण्यात आलेल्या इमारतीत ७४७ रुग्णखाटांची व्यवस्था होणार आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक, तसंच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी, प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार यंत्रणा स्थापन करुन, या केंद्रावर सनियंत्रण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातला कोविड संसर्ग तातडीनं आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, सर्व धर्मगुरूंनी आपल्या स्तरावर नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगत कोविड नियमावलीचं काटेकोर पालन करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. कोविड उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं विविध धर्मगुरूंसोबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
****
��िंगोली जिल्ह्यात मर्यादेपेक्षा अधिक वऱ्हाडी जमवलेल्या चार लग्न सोहळ्यांवर काल कारवाई करण्यात आली. संबंधित वधु वर, विवाह सोहळ्याचे आयोजक तसंच सोहळ्यांना हजर असलेल्यांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी नियमाचं पालन करावं, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक कलासागर यांनी दिला आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. बाजारपेठेत होणारी गर्दी कमी करण्यासोबतच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं कलासागर यांनी सांगितलं.
****
विविध बँकांच्या निष्क्रिय खात्यातून अब्जावधी रुपये लंपास करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने जेरबंद केलं आहे. यामध्ये औरंगाबाद इथल्या एएम न्यूज या खासगी वृत्तवाहिनीचे राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू तसंच प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याचा समावेश आहे. या सर्वांनी आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर बँकातील निष्क्रिय खात्यांची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. ही सर्व खाती हॅक करून, बँक खात्यांमध्ये जमा असलेले २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये आपल्या खात्यात वळवण्याचा त्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी २५ लाख रुपये रोख आणि ४३ लाख ५४ हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त केलं. या सर्वांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या ६२२ ग्रामपंचायतींनी, विविध विकास कामांच्या विकास निधीचे आराखडे शासनाने दिलेल्या मुदतीत १५ मार्चपर्यंत पूर्ण करून, प्लॅन प्लस या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत. यात उस्मानाबाद जिल्हा औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकावर, तर राज्यातून तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी ही माहिती दिली.
****
अहमदनगर इथं सावेडी इथल्या श्री दत्त देवस्थानात, श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांचा जयंती उत्सव, काल कोविड नियम पाळून साधेपणानं साजरा झाला. भाविकांना दर्शनासाठी येण्याची परवानगी नसल्यानं, संस्थानच्या वतीनं सकाळी झालेल्या महापुजेचं ऑनलाईन प्रसारण करण्यात आलं.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या परभणी इथून प्रथमच सोयाबीनची किसान रेल्वेने मालवाहतूक करण्यात आली. ४२ बोगींमधून दोन हजार ६६१ टन सोयाबीन गुजरातमध्ये गांधीधाम इथं पाठवण्यात आले. नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी ही माहिती दिली.
****
अहमदाबाद इथं काल झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी क��त भारतीय संघानं दिलेलं १५७ धावांचं लक्ष्य इंग्लंडनं १९ व्या षटकात पूर्ण केलं. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं दोन - एक अशी आघाडी घेतली आहे.
****
परभणी महानगर पालिका हद्दीतील थकित मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीच्या व्याजात, ३१ मार्चपर्यंत १०० टक्के सूट द्यायचा निर्णय महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी जाहीर केला आहे. नागरिकांनी या निर्णयाचा लाभ घ्यावा आणि मालमत्ता तसंच पाणीपट्टीची थकबाकी जमा करावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातील आदिवासी क्षेत्र असलेल्या गारगोटवाडी या गावाने माझा गाव सुंदर गाव अभियानात सहभाग घेतला आहे. गावातल्या युवकांनी गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावात वृक्षारोपण करून वृक्षाचे संगोपन व्हावे यासाठी सावली प्रतिष्ठानने कार्य हाती घेऊन वृक्ष लागवड केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 April 2019 Time – 07.10am to 07.20 am आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ एप्रिल २०१९ सकाळी ०७.१० मि. ****
·      राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; वीज कोसळून १३ जण ठार
·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपला. राज्यातल्या दहा मतदार संघात उद्या मतदान
·      राज्यातल्या जलाशयांमधल्या मृत पाणीसाठा, पिण्यासाठी आरक्षित करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
आणि
·      ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा.पवार यांचं सोलापूर इथं निधन
****
राज्यात काल झालेल्या अवकाळी पावसानं १३ जणांचे बळी घेतले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसानं वीज कोसळून चार जण ठार झाले. यामध्ये दोन शेतकऱ्यांसह एका महिलेचा आणि एका पंधरावर्षीय मुलाचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर, पातूर इथं गारपीट झाली. या गारपिटीत पातूर तालुक्यातल्या पळसखेड इथल्या शेतात काम करणाऱ्या एका तीस वर्षीय महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात बागलाण, दिंडोरी आणि देवळा या तीन तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांत अवकाळी पावसाने जिल्ह्यात आठ जणांचे बळी घेतले आहेत.  
अमरावती जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. वाशिम जिल्ह्यात अनेक गावांना रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसून आंबा, तसंच फळभाज्यांचं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात भोकर आणि कंधार इथं शेतात काम करत असणाऱ्या दोन शेतमजूरांचा काल वीज पडून मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे मोसंबी, लिंबू, आंबा आणि केळीच्या बागा तसंच हळद पिकाचं नुकसान झालं आहे.
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात अंधापुरी शिवारात दोघांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला तर ४० शेळ्या दगावल्या. या पावसामुळं जिल्ह्यात कापणीला आलेल्या उन्हाळी ज्वारी, फळबागा आणि चाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात दिंद्रुड देवदहीफळ इथं शेतात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं भारत संचार निगम लिमिटेडचा मनोरा कोसळून चार घरांचं नुकसान झालं. यात एकजण जखमी झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यालाही काल झालेल्या गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला. जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या तीस एकर फळबागांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. जालना जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळं जालना शहर आणि जिल्ह्यातला वीजपुरवठा खंडीत झाला होता. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, मराठवाड्यात येत्या २४ तासांत गारपीट होण्याची शक्यता परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला. या टप्प्यात १३ राज्यातल्या ९७ लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार ��हे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोलीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती आणि सोलापूर या दहा मतदार संघाचा समावेश आहे. या सर्व दहा मतदार संघात काल प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या.
****
लातूर इथं महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल उदगीर इथं सभा झाली. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची असल्याचं सांगतानाच, मुख्यमंत्र्यांनी, कलम १२४ अ रद्द करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर टीका केली. कॉग्रेस नेत्यांची घोषणा आणि भाषणं म्हणजे जनतेचं मनोरंजन असून त्याचा वास्तवाशी संबंध नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, लातूर लोकसभा मतदार संघात काल कॉंग्रेस महाआघाडी, भाजपा महायुती, तसंच वंचित बहुजन आघाडीनं शहरातून पदयात्रा काढून प्रचाराचा समारोप केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना निवडणूक आयोगानं काल जारी केली. या टप्प्यात सात राज्यातल्या एकोणसाठ जागांसाठी येत्या बारा मे रोजी मतदान होणार आहे.
*****
देशात देशद्रोहाला अजिबात थारा देऊ नका, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातले शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी काल अमरावती इथे झालेल्या सभेत ते बोलत होते. शिवसेना भाजप युती राज्यातल्या अट्ठेचाळीसही जागा जिंकेल, असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
परभणी मतदारसंघातही अनेक भागांत मिरवणुका काढून काल प्रचाराची सांगता करण्यात आली. यात प्रामुख्यानं आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर आणि युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या समर्थकांचा समावेश होता. या मतदारसंघात एकूण सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
नांदेड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात बैठका, प्रचार फेऱ्या, मतदान स्मरण पत्रिका वितरण, रोड शो करून शक्ती प्रदर्शन केलं. नांदेड शहरात काल सिनेअभिनेत्री ईशा कोप्पिकर यांनी रोड शो केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्या प्रचारासाठी काल एमआयएमचे नेते खासदार अससुद्दीन ओवैसी आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभा घेतली.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधून जाहीर प्रचाराची सांगता केली. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांची कळंब येथे जाहीर सभा झाली. तुळजापूर येथे माजी खासदार डॉ.��द्मसिंह पाटील यांनी पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केलं. तसंच राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर येथे जाहीर सभा घेऊन मतदारांसमोर आपली भूमिका मांडली. महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उमरगा तालुक्यांत अनेक गावांत जाहीर सभा, बैठका घेतल्या. भाजप नेते रोहन देशमुख यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांत मोटरसायकलवरून मतदारांशी संपर्क साधून जाहीर प्रचाराची सांगता केली.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
सोलापूर मतदारसंघातले भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांच्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल सोलापुरात प्रचारसभा घेतली. संपूर्ण देशभरात लवकरच रस्त्यांचं जाळं निर्माण करणार असून आणि राज्याला कायमस्वरूपी दुष्काळापासून मुक्त करण्याच्या योजना राबवणार असल्याचं ते म्हणाले.
****
भाजपा-शिवसेनेच्या काळात भारतासह राज्यातलीही अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. ते काल बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं महाआघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या साठीच्या प्रचारसभेत बोलत होते. या सरकारच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि शेतकरी देशोधडीला लागले, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजेनिंबाळकर यांच्यावर, विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासाठी कथितरीत्या अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. खासदार रविंद्र गायकवाड यांनी याबाबत केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना लोकसभा मतदार संघातल्या अठरा उमेदवारांना निवडणूक खर्च निरीक्षकांनी नोटीस बजावली आहे. दैनंदिन निवडणूक खर्च तपासणीस गैरहजर राहणे, एकाच बाबींवर दहा हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम रोखीनं खर्च करणे, आदी कारणांसाठी या नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटीस बजावलेल्या उमेदवारांमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, काँग्रेस महाआडीचे विलास औताडे यांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या जलाशयांमधल्या मृत पाणीसाठ्याचं नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्यानं पिण्यासाठी करावा, अशा सूचना मुख्य सचिव यु.पी.एस.मदान यांनी दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या सहाय्यानं गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज संनियंत्रण करावं, असे निर्देश मदान यांनी दिले आहेत.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू तसंच राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी महावीर जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या दिनाच्या निमित्तानं देशात तसंच ��गभरात सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचे सतत प्रयत्न केले पाहिजेत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
साहित्य अकादमी पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा.पवार यांचं काल पहाटे सोलापूर इथं निधन झालं. ते शहाऐंशी वर्षांचे होते. मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक अशी त्यांची ओळख होती तसंच, त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य आणि साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला होता. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी त्यांनी काम केलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ठ वाङमय पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.
****
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापू दादा शार्दूल यांचं काल पहाटे धुळे इथे निधन झालं. ते ऐंशी वर्षांचे होते. धुळे जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करून त्यांनी पंचवीस वर्षं शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद भूषवलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी धुळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद इथल्या परिवर्तन संस्थेच्या वतीने येत्या २१ एप्रिलला शेक्सपिअर महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात मच ॲडो अबाऊट नथिंग या नाटकाचा संपादित भाग तसंच, हॅम्लेट हे नाटक साकारणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि न��टककार प्रशांत दळवी यांच्याशी नाटककार प्रशांत दळवी आणि कवी दासू वैद्य हे संवाद साधणार आहेत. औरंगाबाद इथं, सरस्वती भुवन संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात, हा महोत्सव होणार आहे.
****
ट्रक वाहतूकदाराकडून पैसे लुटल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह अन्य दोन जणांना ठाणे जिल्ह्यात काल अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक समीर शेंडे, शिपाई अजय शेट्ये आणि दत्ता इंगोले अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नाव असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. मांसाची वाहतूक करणाऱ्या एकशे पंचवीस ट्रकपैकी एक ट्रक वाशिंद इथे अडवून, गुन्हा दाखल न करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी पाच लाख रुपये मागितल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
****
नगरसोल ते तिरुपती या विशेष गाडीचा मार्ग एक दिवसासाठी बदलण्यात आला आहे. ही गाडी येत्या वीस तारखेला नडीकुडी आणि गुंटूर मार्गे न जाता, सिकंदराबाद-काझीपेट- विजयवाडा-तेनाली अशी धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागात, रेल्वे मार्गाचं काम सुरू असल्यानं, हा बदल करण्यात आल्याचं, रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 July 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० जुलै २०१८ सकाळी ६.५० मि. ****  मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांचं आंदोलकांना शांततेचं आवाहन  येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा  मराठवाड्यात विविध जिल्ह्यात अद्याप आंदोलन सुरू  हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था काल जेद्दाहला रवाना आणि  विविध देशांमधल्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी **** मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार गांभीर्यानं सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आंदोलकांनी शांतता राखून सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत मराठा आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीला भाजपाचे खासदार नारायण राणे आणि ��ाँग्रेस आमदार नितेश राणे उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळाल्यावर महिनाभरात निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आंदोलकांविरूद्धचे गुन्हे मागं घेतले जात असून, मात्र पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अभय दिलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत यापूर्वी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची चोख अंमलबजावणी व्हावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊ, त्यात स्थानिक पातळीवर सहकार्य आवश्यक आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. **** दरम्यान, मुंबईत काल मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली, त्यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही, असं या मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केलं आहे. काल लातूर इथं झालेल्या बैठकी नंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करत असून, या आंदोलनात झालेल्या मृत्यूंना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, एक ते आठ ऑगस्ट दरम्यान मराठा खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापुढचं आंदोलन राज्यभर एकसंघपणे राबवलं जाणार असल्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. **** विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी काल परळी मधल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांची भूमिका असणारं एक निवेदन देऊन त्यांनी यावेळी आंदोलकांबरोबर चर्चा केली. **** परभणी जिल्ह्यात आंदोलनामुळे गेल्या सहा दिवसांपासून विस्कळीत झालेलं जनजीवन कालपासून पूर्वपदावर येत असलं, तरीही तणाव कायम आहे. जिल्ह्यातली बस सेवाही सहा दिवसांपासून बंद आहे. जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या इरळद इथं काल दुधना नदी पात्रात जलआंदोलन, तर पूर्णा तसंच पाथरी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी काल परभणी इथल्या आंदोलनाचा आढावा घेतला, तसंच जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांचीही भेट घेतली. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-सिल्लोड रस्त्यावर मालखेडा इथं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी रस्त्यावर रबरी चाकं पेटवून दिल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. जाफराबाद तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या दाभड इथले तरूण शेतकरी कचरू दिगंबर कल्याणे यांनी काल आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** रायगड जिल्ह्यात महाड जवळ परवा शनिवारी आंबेनळी घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातले सर्व ३० मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातात ठार झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत घोषित करण्यात आली आहे, तर जखमी झालेले एकमेव प्रवासी प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. **** केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं देशातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची तीन दिवसीय परिषद झाली, यात दहा सूत्रे असलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. **** पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भुत यात्रा असून, ही वारी शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ४६व्या भागातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास अशा अनेक संतांची शिकवण ही अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळं देत असल्याचं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. पर्यावरण संवर्धन, शिक्षण, तंत्रज्ञान, आदी विषयांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचं पंतप्रधानांनी अभिनंदन क��लं. ***** हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था काल मुंबईहून रवाना झाला. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यावेळी विमानतळावर उपस्थित होते. राज्यातल्या साडे अकरा हजारांहून अधिक भाविकांसह विक्रमी एक लाख, ७५ हजार, पंचवीस नागरिक हजयात्रेला जाणार असून त्यात ४७ टक्के महिला आहेत. यातील एक हजार, ३०८ महिला विना मेहरम अर्थात पुरुष सहप्रवाशाशिवाय जात आहेत. दरम्यान, औरंगाबाद इथल्या विमानतळावरुनही ७८ पुरुष आणि ६८ महिलांचा समावेश असलेला हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था जेद्दाहला रवाना झाला. परवा एक ऑगस्टपर्यंत चार वेगवेगळ्या विमानांनी साडेपाचशे यात्रेकरु औरंगाबादहून जेद्दाहला जाणार आहेत. **** जालना जिल्ह्यात सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे एक लाख लाभार्थी आहेत. या पैकी जिल्ह्यातल्या ३६ हजार लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत गॅस जोडणीसाठी अर्ज केले असून, २७ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी मिळाली आहे. जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या शहागड इथल्या अजरबी बाबू शेख या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील एक लाभार्थी आहेत. आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीकडे या शब्दात व्यक्त केला - मी अजरबी बाबू शेख. राहणार शहागड जालना. पूर्वी आम्ही चूलिवर स्वयंपाक करायचो, त्यामुळे सरपण आणायचं त्यामुळे धूराचा त्रास होता. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत गॅस जोडणीसाठी मिळाली. आता धूराचा त्रास होत नाही. का�� पूर्ण वेळात होते. उज्ज्वला गॅसचा आम्हाला फायदा झाला. **** लातूरच्या बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत शिवशंकर बिडवे यांच्या नेतृत्वातील सदस्यांच्या गटानं विजय मिळवला आहे. यासाठी काल सकाळी मतदान आणि दुपारनंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत विधीज्ञ सांबप्पा गिरवलकर यांच्या नेतृत्वाखालील गट पराभूत झाला. **** भारतीय क्रीडापटूंनी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये काल चमकदार कामगिरी केली आहे. रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं पुरुष एकेरीचं विजेतपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत त्यानं जपानच्या कोकी वातानबे याचा १८ - २१, २१ - १२, २१ - १७ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला पराभव पत्करावा लागला. **** महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अमेरीकेसोबतचा सामना बरोबरीत सोडवून आपलं आव्हान कायम राखलं आहे. इग्लंडच्या लंडन इथं काल झालेला स्पर्धेच्या इ गटातला हा अखेरचा साखळी सामना एक-एक अशा बरोबरीत राहिला. **** फिनलँड इथं सुरू असलेल्या साओ क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. नीरजनं ८५ पूर्णांक ६९ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं. **** तुर्कस्तान मध्ये सुरू असलेल्या यासर दोगु आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या बजरंग पुनियानं सुवर्ण तर संदीप तोमरनं रौप्यपदक पटकावलं आहे. महिलांच्या गटात पिंकीनं सुवर्ण तर सीमा, पूजा धांडा, रजनी यांनी रौप्यपदक जिंकलं आहे. गीता फोगाट हिला ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. **** वेदना हे श्रेष्ठ साहित्य निर्मीतीचं बीजकारण असल्याचं मत ९० व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्काराचं वितरण काळे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोहरीर वाङमय पुरस्कार डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या 'लक्षणीय असे काही' या पुस्तकाला, नरहर कुरंदकर वाङमय पुरस्कार प्रसाद कुमठेकर यांच्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या पुस्तकाला, म.भि.चिटणीस वाङमय पुरस्कार कैलास इंगळे यांच्या 'वाङमयीन मराठवाडा' या पुस्तकाला, कुसुमावती देशमुख काव्यपुरस्कार डॉ.पी.विठ्ठल यांच्या 'शून्य एक मी' या काव्यसंग्रहाला देण्यात आला, कुमार देशमुख नाट्यपुरस्कार राजीव नाईक यांच्या 'लागलेली नाटकं' या पुस्तकाला तर रा.ज देशमुख स्मृती पुरस्कार निर्मलकुमार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. **** प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिक विमा अर्ज स्वीकारण्याची मुदत संपणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये ३१ जुलै पर्यंत संबंधीतांचे अर्ज आणि पिक विमा हप्ता स्वीकारुन येत्या १३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात आली आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 AUG. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
**** बिहारमधल्या सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पाटण्यात होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी होणार्या या बैठकीत संयुक्त जनता दल, भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामिल होण्याच्या निमंत्र���ाचा औपचारिकरित्या स्वीकार करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपशी हात मिळवणीस विरोध असलेल्या शरद यादव यांच्या गटाचीही वेगळी बैठक होणार आहे. **** तामिळनाडूत ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम - ए आय ए डी एम के पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणात अडथळा निर्माण झाला आहे. पनीरसेल्वम यांच्या गटानं माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी आणि शशीकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या अटी ठेवल्यामुळे हे विलिनीकरण होऊ शकलं नाही. **** हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात तदर्थ न्यायाधिशाच्या नेमणुकीच्या चर्चेबाबत पाकिस्तानकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी माध्यमांमधल्या वृत्तांमध्ये पाकिस्ताननं तदर्थ न्यायाधिशांच्या नेमणुकीबाबत चर्चा सुरू केली असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या फाशीला १८ मे रोजी स्थगिती दिलेली आहे. **** बिहारमध्ये पूर परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. १९ जिल्ह्यातल्या एक कोटींहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या आता १६४ झाली आहे. बचाव कार्य सुरु असून, पूरग्रस्त भागात विमानानं अन्नाची पाकिटं वितरीत करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातही पूर परिस्थिती कायम असून, बचाव कार्याची गरज लक्षात घेता राज्य कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आसाम मध्ये पूर परिस्थितीत सुधारणा होत आहे. पुरामुळे राज्यातल्या २० जिल्ह्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. **** भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी येत्या सोमवारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी, तसंच २०१९ मध्ये लोकसभेच्या ३५० जागा जिंकण्यासाठीची रणनिती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १३ राज्यांचे मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणी बाबतच्या अहवालांवर यावेळी चर्चा करण्यात येईल. **** स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात ४१८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातले जवळपास ६० टक्के रुग्ण हे ह्रदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा आजारानं ग्रस्त होते. त्यामुळे हे सर्व मृत्यू केवळ स्वाईन फ्लूमुळे झाले असं म्हणता येणार नाही, असं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं. ते मुंबई इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. स्वाईल फ्लू प्रतिबंधक उपाय आणि उपचारासाठी राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं यापूर्वीच आवश्यक ती पावलं उचलली आहेत. राज्यात दोन हजार १९९ ठिकाणी तपासणी केंद्रं सुरु करण्यात आली असून, आतापर्यंत १३ लाख ६२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचं सावंत म्हणाले. **** प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत मागण्यासाठी तसंच वाहतुकीसंदर्भातल्या तक्रारी करणं नागरिकांना सोईस्कर व्हावं यासाठी परिवहन विभागातर्फे ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असं आवाहन परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी केलं आहे. **** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं विद्यार्थ्यांना सर्व पुस्तकं एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ‘इब्स्को डिस्कव्हरी सर्व्हिस’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे. कुलगुरु डॉ. बी ए चोपडे यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं. या माध्यमातून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले ४५ हजाराहून अधिक ई-नियतकालिके आणि तीस लाखाहून अधिक ई-बुक्स तसंच विद्यापीठ ग्रंथालयात उपलब्ध असलेले तीन लाखांहून अधिक वाचनसाहित्य एका क्लिक वर विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. **** सातवं अंबाजोगाई साहित्य संमेलन उद्या होणार आहे. कादंबरीकार मंदा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. चार सत्रांमध्ये होणाऱ्या या एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं दिले जाणारे पुरस्कार यावेळी प्रदान केले जाणार आहेत. **** सिनसिनाटी खुल्या टेनिस सपर्धेत भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नाचा महिला आणि पुरुष दुहेरी प्रकारात उपान्त्य फेरीत पराभव झाला. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ****
0 notes