Tumgik
#राष्ट्रवादी काँग्रेस
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची पंतप्रधानांची घोषणा
समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन, नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेडमध्ये गोदावरी नदी स्वच्छता मोहिम
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या बंदला जालना आणि परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत एक - शून्य अशी आघाडी
****
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य परस्परांसोबत सामायिक करायला इच्छुक आहे असं म्हणत, या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी भिख्कू महासंघांचे राज्यभरातून भंतेजी आले होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन, सामूहिक प्रार्थना झाली. अखिल भारतीय भिख्कू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो यावेळी उपस्थित होते.
****
पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून, ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मंत्रालयाला केल्या आहेत.
****
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना आज नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत गडकरी यांनी त्यांची प्रशंसा केली.
****
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा चार जागा मागणार असून, राज्यातल्या एकूण अपेक्षीत जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबतीत विलंब न करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं पवार म्हणाले.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेत एक पेड माँ के नाम, स्वच्छता क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता जागृती साठी नाटक, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, घरोघरी कचरा संकलनासाठी जनजागृती कार्यक्रम, कचरा वर्गीकरण आदी कार्यक्रम राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये देखील आज स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली –
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेम��ंनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
मुंबईत वांद्रे इथं उभारण्यात येणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या कोनशिलेचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़. मराठा समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर उद्या सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं. या सर्व आमदारांकडून ‘धनगड’ नामोल्लेखाला समर्थन असल्याचं पत्रही आंदोलकांनी घेतलं.
लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर.अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
 ****
नांदेड पोलीस परीक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्यांवर धाडी टाकून जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत हातभार लावावा असं आवाहन पोलीस उपमहानरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिली, तसंच उदगीर एमआयडीसीला मंजूरी मिळाल्याने स्थानिक युवकांना लवकरच रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं बनसोडे यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना फार्मसी टिचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातल्या भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत तीन दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल, असं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
लोहमार्ग निरीक्षणासह दुरूस्तीसाठीच्या लाईन ब्लॉकमुळे निजामाबाद-पंढरपूर ही गाडी उद्या निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे.
****
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pimpri : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत भर पावसात आंदोलन
एमपीसी न्यूज – बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (शनिवारी) राज्यभरात मूक आंदोलन ( Pimpri) करण्यात येत आहे. पिंपरीतही भर पावसात काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे…
0 notes
sugar-news-india · 2 months
Text
0 notes
sugar-news · 2 months
Text
0 notes
punerichalval · 5 months
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
adbanaoapp-india · 6 months
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
Tumblr media
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
Tumblr media
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
0 notes
mdhulap · 8 months
Link
अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल ! Ajit Pawar group is the original NCP party
0 notes
mhlivenews · 8 months
Text
राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आहे. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणीही उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. अजित पवार यांच्या गाठीशी असलेल्या आमदारांच्या बळावर त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकणार आहे. मात्र अजितदादा आपल्या पक्षातून कोणाला तिकीट देणार याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
क्वाड समुहाच्या शिखर परिषदेसाठी अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि जपानचे संबंध अधिक मजबुत करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये हिंद-प्रशांत परिसरात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याविषयी चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेली चर्चा ही दोन्ही देशांसाठी उपयोगी ठरली आहे.
****
श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी काल झालेल्‍या मतदानानंतर लागलीच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये नॅशनल पिपल्स पॉवर म्हणजेच एनपीपी पक्षाचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांनी मोठी आघाडी घेतल्याचं वृत्त आहे. आज सकाळपर्यंत झालेल्या मतमोजणीत त्यांना ५६ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि साजिथ प्रेमदासा यांना प्रत्‍येकी १९ टक्‍के मते  मिळाली आहेत. दरम्यान, देशात मतमोजणी होईपर्यंत संचरबंदी लागू करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना, परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं अवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, कालही धाराशिव आणि बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. तर उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदच अवाहन करण्यात आलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात नाशिक इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे सदस्य नसतांनाही विद्यमान आमदार असल्याचं पत्र शासकीय कार्यालयांना दिले, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबादास खैरे यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. घड्याळ हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे. पण आता पक्ष कोणाचा हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी आम्हाला तुतारी हे नवीन चिन्ह दिलं त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी या याचिकेत केल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यापूर्वीही अनेकदा ही मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर सुमारे ४२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री  नितीन गडकरी यांनी दिली आहे. काल पुणे इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाट -हडपसर मार्गाचं चौपदरीकरण आणि विविध विकास कामांच्या भुमीपुजन गडकरी त्यावेळी बोलत होते.
****
राज्यातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची काल भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
****
रेल्वे रूळांच्या पाहणी आणि दुरूस्तीसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दौंड निजामाबाद ही गाडी उद्या मुदखेड ते निजामाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर परवा निजामाबाद इथून निघणारी निजामाबाद पंढरपूर ही गाडी निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या कांद्याची आता पुन्हा नाशिक रोड आणि लासलगाव इंथल्या रेल्वेस्थानकातून निर्यात होणार आहे. त्यासाठी रेल्वे मालवाहु डब्बे उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मलखेडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलं आहे. या संदर्भात काल नाशिक इथं जिल्ह्यातल्या कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी त्यांनी बैठक घेतली. दरम्यान, मालखेडे यांनी नाशिक, लासलगाव आणि कसबेसुकेणे इथं रेल्वे स्थानकाची पाहणी करून निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
****
चेन्नई इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवशी बांगलादेश संघाने आपल्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा ६ बाद २०५ धावा केल्या आहेत. त्याआधी भारतानं आपला दुसरा डाव चार बाद २८७ धावांवर घोषित करत बांदलादेशाला ५१५ धावाचं लक्ष दिलं होतं.
****
0 notes
news-34 · 5 months
Text
0 notes
Video
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच ! कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष..
0 notes
gajananjogdand45 · 8 months
Link
https://marmikmaharashtra.com/nationalist-congress-party-employment-and-self-employment-cell-district-president-padi-akbar-akhtar-sheikh/
0 notes
Text
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? सुनावणी बाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं
https://bharatlive.news/?p=163236 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? सुनावणी बाबत सुप्रिया सुळे यांनी ...
0 notes
punerichalval · 1 year
Text
पवार काका पुतण्यांची भेट; ठाकरे-काँग्रेस बैठकीनंतर राऊतांचे महत्त्वाचं वक्तव्य, पवारांनी आता...
पवार काका पुतण्यांची भेट; ठाकरे-काँग्रेस बैठकीनंतर राऊतांचे महत्त्वाचं .....
मुंबई : शनिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘गुप्त’ भेट घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसने (Congress) यावर भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये यावर शिवसेना आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 1 year
Text
'भिडूच्या रुपात मनु आजही जिवंत आहे...'
संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes