#कोरोना व्हायरस
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
ग्रामीण भारताला सशक्त करण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ग्रामीण भारत महोत्सवाचं उद्घघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. २०१४ पासून सरकार खेड्यातील लोकांचं जगणं समृद्ध करण्यासाठी प्राधान्य देत असून, हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकारनं प्रत्येक गावात मूलभूत सुविधांची हमी देणारी मोहीम सुरू केल्याचं ते म्हणाले. ग्रामीण समाजांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे तसंच स्वच्छ भारत अभियान, पीएम आवास योजना, जल जीवन मिशनद्वारे सर्व ग्रामीण भागाचा फायदा आणि विकासाचे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. येत्या नऊ तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून विकसित भारत २०४७ साठी स्वावलंबी ग्रामीण भारताची निर्मिती ही या महोत्सवाची संकल्पना आहे.
चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस HMPV हा विषाणू वेगाने पसरत असून तेथील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. या विषाणुमुळे चीनमध्ये अनेक मृत्यु झाले असून त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. HMPV, कोरोना आणि माइकोप्लाज्मा न्यूमोनिया यासारखे आजार देखील चीनमध्ये वेगाने पसरत असल्याचंही वृत्त आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी परिस्थितीचं निरीक्षण करत असून, नागरिकांनी सातत्याने मास्क वापरावा, हातही धुवावेत, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
एस. टी महामंडळ नफ्यात राहण्यासाठी महामंडळाने बृहत कृती आराखडा तयार करावा. यासाठी परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, वाहतूकदार यांच्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करावा, अशा सूचना परिवहन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात समिती सभागृहात परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देऊन स्वच्छतेची कोटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महिला प्रवाशांसाठी प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या.
रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढवून देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा, अशा सूचना रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत तसंच ग्रामीण भागात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणावर होत असून उद्योग क्षेत्रातील मजुरीचे दर जास्त आहेत. या बाबींचा विचार होऊन मजुरीचे दर ठरवावेत, अशा सूचनाही मंत्री गोगावले यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा असं जलजीवन योजनेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला लवकरात लवकर या सुविधांचा लाभ मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत येत्या १०० दिवसांत होणाऱ्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत उद्या पाच तारखेला दुपारी बारा वाजता कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर माळेगाव यात्रेत विजेत्या मल्लास माळेगाव केसरी हा पुरस्कार दिला जातो. नांदेडसह विविध राज्यांतून कुस्तीपटू ��ोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेणार आहेत. माळेगावच्या लाल मातीत या कुस्त्या रंगणार आहेत. दरम्यान माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा, तसंच कृषी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण केलं जाणार आहे.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला. तत्पुर्वी पहिल्या डावात भारतीय संघानं १८५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर सहा गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत १४५ धावांची आघाडी मिळाली आहे.
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान ८ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान, आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि किमान तापमानात काहीशी घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
0 notes
Text
मारबर्ग व्हायरस काय आहे, तो किती धोकादायक आहे?
https://bharatlive.news/?p=83639 मारबर्ग व्हायरस काय आहे, तो किती धोकादायक आहे?
जग कोरोना विषाणूच्या ...
0 notes
Text
कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत
कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सोशल मीडियात 5G व कोरोनाच्या संबंधाने काही अतिशय हास्यास्पद पोस्ट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सोशल मीडिया वर्तुळात तांत्रिक तसेच विज्ञान विषयांवर माहिती लिहिणाऱ्यांचा दुष्काळ असल्याने हिंदी पट्टयातून येणाऱ्या खऱ्या-खोट्या मेसेजेसचा पाऊस येथे पडत असतो. यातून कोविड-19 सारख्या घातक आजाराच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष होऊन अस्तित्वात नसलेल्या जागतिक षडयंत्राच्या वायफळ…
View On WordPress
0 notes
Text
दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास डॉक्टरांसह प्रशासनावर करणार गुन्हे दाखल
दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास डॉक्टरांसह प्रशासनावर करणार गुन्हे दाखल
ऑक्सीजन, रेमडीसीवर इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्णाचा दवाखान्यात मृत्यू झाल्यास डॉक्टरांसह स्थानिक आमदार, खासदार, महापौर, जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार! भिमआर्मी जिल्हाप्रमुख विलास चक्रे. लातूर प्रतिनिधी | सध्या देशात कोरोना संसर्गजन्य विषानुणे थैमान घातलेले आहे,या महामारीतून आपला जीव कसं वाचवता येईल भितीपोटी जनता सरकार जे निर्बंध लादत आहे, नियमाच्या अधीन…
View On WordPress
#Bhim Army latur#covid-19 vaccine#covid19#Latur Marathi mews#Latur news#Oxygen cylinder#कोरोना व्हायरस
0 notes
Photo
कराडातील ५४ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणाऱ्या ५४ वर्षीय कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पाहटे ५ वाजता मृत्यु झाला आहे.
0 notes
Text
कोरोना व्हायरसमुळे पुणे महानगरपालिकेत प्रवेशबंदी..
कोरोना व्हायरसमुळे पुणे महानगरपालिकेत प्रवेशबंदी.. #noentri- #pune_municipality #coronavirusissue #sajagnagrikktimes
corona virus issue : कोरोना व्हायरसमुळे पुणे महानगरपालिकेत प्रवेशबंदी..
ई-मेलद्वारे तक्रारी मांडण्याचे आव्हान.
corona virus issue : सजग नागरिक टाईम्स : पुणे : कोरोना व्हायरसमुळे केंद्रात, राज्यात, व पुणे शहरात चांगली दक्षता घेतली जात आहे.
यासाठी आणखीन एक पाऊल पुढे जात पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आजपासुन पुणे महानगर पालिकेत येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी घातली आहे.
View On WordPress
0 notes
Text
मुंबई कोरोना अपडेट: मुंबईत कोविड रुग्णांमध्ये मोठी वाढ, चार महिन्यांनंतर सर्वाधिक रुग्ण आढळले; सकारात्मकता दर रेकॉर्ड 6 टक्के
मुंबई कोरोना अपडेट: मुंबईत कोविड रुग्णांमध्ये मोठी वाढ, चार महिन्यांनंतर सर्वाधिक रुग्ण आढळले; सकारात्मकता दर रेकॉर्ड 6 टक्के
महाराष्ट्रात एकूण कोरोना बाधितांची संख्या 78,87,086 झाली आहे. मुंबईत आजकाल शहरातील 11 वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्रात एकूण बाधितांची संख्या 78,87,086 झाली आहे. राज्यात शेवटच्या दिवशी 366 लोक संसर्गमुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 77,35,751 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना जागतिक महामारीचा वेग पुन्हा एकदा वाढू ला��ला आहे. कोविड केसेस…
View On WordPress
0 notes
Text
दिल्ली कोरोनाव्हायरस आज कोरोना omicron 3rd wave दिल्ली कोविड डेथ पीक तज्ञ हे सांगतात
दिल्ली कोरोनाव्हायरस आज कोरोना omicron 3rd wave दिल्ली कोविड डेथ पीक तज्ञ हे सांगतात
नवी दिल्ली: आठवडाभरापूर्वी दिल्लीत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ नोंदवल्यानंतर दिल्लीत त्यांची संख्या कमी झाली आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा शिगेला पोहोचला आहे की नाही हे सांगायला हवे. पुढील काही दिवस या संसर्गामुळे मृत्यूचा कल पहा. प्रमुख राज्य आणि खाजगीरित्या चालवल्या जाणार्या प्रमुख कोविड केअर सेंटर्समधील वरिष्ठ डॉक्टरांनी यावर जोर दिला आहे की मृत्यूच्या…
View On WordPress
#आज कोरोनाव्हायरस मृत्यू#कोरोना अपडेट भारत#कोरोना व्हायरस लाइव्ह अपडेट्स#कोरोनाविषाणू अद्यतने#कोरोनाविषाणू बातम्या#कोरोनाव्हायरस थेट अद्यतने#कोरोनाव्हायरस भारत#कोविड 19 भारतातील प्रकरणे#कोविड 19 लस#कोविड बातम्या#कोविड लस#कोविड लसी#कोविड लसीकरण बातम्या#तिसरी लहर दिल्ली शिखर#दिल्ली कर्फ्यू#दिल्ली कोविड मृत्यूची तिसरी लाट#दिल्ली कोविड शिखर#दिल्ली वीकेंड लॉकडाऊन#भारतात कोरोना
0 notes
Text
Coronavirus दुबईची दर्यादिली! भारतीय रुग्णाचं १ कोटींचं बिल केलं माफ; वरून ₹ १० हजार दिले
Coronavirus दुबईची दर्यादिली! भारतीय रुग्णाचं १ कोटींचं बिल केलं माफ; वरून ₹ १० हजार दिले
[ad_1]
दुबई: करोनाच्या आजारामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यातच खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर येणाऱ्या अव्वाच्या सव्वा खर्चाची अनेकांना धास्ती असते. दुबईत एका भारतीयाला करोनाची बाधा झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल केले. मात्र, रुग्णालयाने तब्बल एक कोटींचे बिल त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले. पुढे जे झाले त्याचा विचार सध्याच्या परिस्थितीत कोणीच करू शकत नाही. या रुग्णालयाने या…
View On WordPress
#coronavirus#coronavirus dubai#coronavirus in dubai#coronavirus patient#Coronavirus treatment#करोना व्हायरस#कोरोना
0 notes
Text
कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती नेमकी वाढवावी तरी कशी? (How To Improve Your Immunity Power)
कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती नेमकी वाढवावी तरी कशी? (How To Improve Your Immunity Power)
How To Improve Your Immunity Power in Marathi
कोरोना व्हायरस कोविड -19 ही आजची चर्चा असल्याने, शक्य तितक्या सुरक्षित आणि निरोगी राहण्याविषयी बरेच काही सांगितले जात आहे. आपले हात धुणे , इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी जोखीम कमी करण्यासाठीच्या सर्व गोष्टी असू शकतात, योग्य खाणे चांगले ठेवण्यात मोठी भूमिका बजावते . एखाद्याला विषाणूचा धोका होण्याचा धोका टाळता येत नाही, परंतु रोगप्रतिकारक…
View On WordPress
#Health#home remedies for improve Your Immunity#improve your immunity#improve Your Immunity in marathi
1 note
·
View note
Text
'यांच्या' साठी कोरोना आपत्ती नव्हे इष्टापत्ती !
‘यांच्या’ साठी कोरोना आपत्ती नव्हे इष्टापत्ती !
अन्यथा शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाईल: गिरीश जाधव अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांसाठी कोरोना आपत्ती नव्हे तर इष्टापत्ती झाली आहे . संपूर्ण नगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे .रुग्ण व मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन , आय सी यु आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत . त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी याचा काळाबाजार सुरु केला आहे. …
View On WordPress
0 notes
Photo
तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
0 notes
Text
कोरोना व्हायरसमुळे पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील शाळा बंद ठेवण्याची मागणी
corona virus : कोरोना व्हायरसमुळे पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील शाळा बंद ठेवण्याची मागणी आम आदमी पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट ��िधानसभा मतदार संघाच्यावतीने शाळा बंद ठेवण्याची मागणी. #school #punecantonment #coronavirus #sajagnagrikktimes
corona virus : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्याकडे मागणी
corona virus : सजग नागरिक टाइम्स : कोरोना व्हायरसमुळे पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील शाळा बंद ठेवण्याची मागणी आम आदमी पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांना निवेदनाद्वारे केली.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव जगभर…
View On WordPress
0 notes
Text
बापरे,करोनानंतर इबोला मारबर्ग वायरसने वाढवली जगाची चिंता,ही 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध
बापरे,करोनानंतर इबोला मारबर्ग वायरसने वाढवली जगाची चिंता,ही 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध
बापरे,करोनानंतर इबोला मारबर्ग वायरसने वाढवली जगाची चिंता,ही 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध कोरोना व्हायरस (coronavirus) आणि मंकीपॉक्सच्या (moneypox) उद्रेका दरम्यान एक नवीन घातक आणि जीवघेणा विषाणू आढळून आला आहे. घाना देशात इबोला व्हायरस (Ebola virus) म्हणजेच ‘मारबर्ग व्हायरस’ सारख्या धोकादायक आजाराची दोन प्रकरणे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. सेनेगलच्या प्रयोगशाळेत या दोन्ही प्रकरणांची पुष्टी…
View On WordPress
#इबोला#चिंता#ही#जगाची#दिसल्यास#बापरे#करोनानंतर#भारत लाईव्ह मीडिया#मारबर्ग#लक्षण#लाईफस्टाईल#वाढवली#वायरसने#व्हा#सावध
0 notes
Text
कोरोनाव्हायरस: आता 48 तासांत कोरोना विषाणूचा नायनाट होणार, मुंबईत एका कंपनीने बनवला प्रभावी नाक स्प्रे
कोरोनाव्हायरस: आता 48 तासांत कोरोना विषाणूचा नायनाट होणार, मुंबईत एका कंपनीने बनवला प्रभावी नाक स्प्रे
मुंबईस्थित कंपनीने अँटी-कोरोनाव्हायरस अनुनासिक स्प्रे बनवला (प्रतीक फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: पेक्सेल्स भारतात त्याच्या 25 मिली बाटलीची किंमत 850 रुपये असणार आहे. हा स्प्रे आठवडाभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असा कंपनीचा दावा आहे. ग्लेनमार्क कंपनीने हा दावा केला आहे. आता ४८ तासांत कोरोना व्हायरस (कोरोनाविषाणू) काढून टाकले जाईल. मुंबईतील एका कंपनीने अनुनासिक स्प्रे विकसित केला आहे.अनुनासिक…
View On WordPress
0 notes