#भारतात कोरोना
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत एक लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर
अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या ओटीटी मंचावर केंद्र सरकारचा कायद्याचा बडगा, १९ वेबसाईट, ५७ सोशल मीडिया खात्यांचं प्रसारण रोखलं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं प्रचारात शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
आणि
मुंबईनं पुन्हा जिंकला रणजी करंडक, ४२ वेळा कोरलं चषकावर नाव
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात 'पंतप्रधान स्वनिधी' योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या दोन अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणीही करणार आहेत. 'पंतप्रधान स्वनिधी योजना' कोरोना काळात १ जून २०२० साली सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आज दिल्लीतल्या ५ हजार फेरीवाल्यांसह एक लाख इतर फेरीवाल्यांनाही कर्ज वितरित केली जाणार आहेत. आतापर्यंत देशभरात ६२ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना १० हजार ९७८ कोटी रूपयांहून अधिक जास्त रकमेची कर्ज वितरित करण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यावर अभ्यास करण्यासाठी स्थ��पन केलेल्या समितीनं आज आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपविला. आपल्या १८ हजार ६२६ पानांच्या अहवालात या समितीनं एक देश एक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने कायद्यात ४४ सुधारणा करण्यासंदर्भात सुचवलं आहे. या अहवालात सर्व संबंधित पक्ष आणि तज्ज्ञांशी झालेल्या विस्तृत चर्चा आणि १९१ दिवसांच्या संशोधनाच्या निष्कर्षांचा समावेश असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयानं दिली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सोपविला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील उपस्थित होते.
****
सी ए ए म्हणजे नागरीकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. एका वृत्त संस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की, या कायद्यामुळे अफगाणिस्तान, बांगला देश आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती आणि पारसी शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. या स्थलांतरीत नागरिकांचा समावेश भारतीय नागरिकांमध्ये करुन घेतला जाणार असून ते निवडणूक लढवून लोकप्रतिनिधीही होऊ शकतील. एनआरसी म्हणजे नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आणि सीएएचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अल्पसंख्याकांनी या कायद्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नसून या कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. भारतात १५ ऑगस्ट १९४७ ते ३१ डिसेंबर २०१४ या काळात आलेल्या कोणत्याही नागरिकांचे स्वागत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सातत्याने अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या १८ ओटीटी मंचांवर केंद्र सरकारने कायद्याचा बडगा उगारला आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं आज कठोर कारवाई करीत अशाप्रकारे आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या १९ वेबसाईट, १० ॲप आणि ५७ सोशल मीडिया खात्यांवर बंदी घातली आहे. या सर्वांचं प्रसारण आजपासून मंत्रालयानं रोखलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००० च्या तरतुदींनुसार, इतर मंत्रालयं, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र तसंच महिला आणि बाल हक्कांशी संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करून मंत्रालयानं हा निर्णय घेतला.
****
काँग्रेस सरकारचे आणि आपले दरवाजे सदैव शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी खुले असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेदरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं जाहीर सभेला ते संबोधित करत होते. कांद्याचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, केंद्र सरकार या मुद्यावर मौन बाळगून असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळण्याचं तसंच, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.
या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीमध्ये मतदान टक्का वाढावा या दृष्टीन आज सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदान विषयक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कवठेमहांकाळ शहरात महिला मेळावा, तर मौजे केरेवाडी इथं मतदार जागृती विषयी कार्यक्रम घेण्यात आला. तासगाव तालुक्यातील मौजे बलगवडे इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या वार्षिक संमेलन प्रसंगी उपस्थित नागरिकांचं मतदानाबाबत प्रबोधन करण्यात आलं.
दरम्यान, आज धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार गट हा प्रचारासाठी शरद पवार यांचं छायाचित्र आणि नाव वापरत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. अजित पवार गट हा निवडणूक आल्यावर शरद पवार यांचं नाव वापरतो, मात्र निवडणूक नसतांना त्यांना त्यांची गरज वाटत नाही. आता जर तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे तर तेच पुढे सुरू ठेवावं, अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. या संदर्भात अजित पवार गटाला दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून या संदर्भातील पुढची सुनावणी १९ मार्चला होणार आहे.
****
रणजी करंडक स्पर्धेत मुंबईनं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विजय साकारत विक्रमी बेचाळीसावं विजेतपद पटकावलं. मुंबई संघानं अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. मुंबई संघाने दिलेल्या ५३८ धावांच्या आव्हानासमोर विदर्भाने चांगली झुंज देत ३६८ धावा केल्या. दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा आणि दोन बळी टिपणारा मुशी�� खान सामनावीर ठरला. तर, स्पर्धेत पाचशेपेक्षा अधिक धावा आणि २९ बळी अशी कामगिरी करणारा तनुष कोटीयन मालिकावीर ठरला.
****
नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून, मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट अशा प्रकल्पाच्या माध्यमातून, देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता नागपुरात आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे, वर्ध्याच्या सिंदी रेल्वे इथल्या ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ, आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील कापूस, कपडा, संत्रा, हे कोलकत्त्याच्या हल्दिया मार्गे बांग्लादेशच्या नदीतून थेट बांग्लादेशला जातील. यामुळे प्रति कंटेनर दीड लाख रुपये असलेला वाहतूक खर्च हा एक लाख रुपयांवर येईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तसंच या भागात उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल असं गडकरी यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केलं.
****
मूत्रपिंडाचं आरोग्य आणि आजारांविषयी जनजागृतीसाठी आज वर्ल्ड किडनी डे पाळला जात आहे. 'सर्वांसाठी मूत्रपिंडाचं आरोग्य', ही यंदाची संकल्पना आहे. किडनी, अर्थात मूत्रपिंडाचं आरोग्य आणि त्याच्या सर्वसामान्य कार्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या रोगांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार वर्ल्ड किडनी डे म्हणून पाळला जातो.
****
नंदूरबार जिल्ह्यातल्या धडगांव तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील १५३ कुटुंबियांना लंडन इथल्या व्हेल्स ऑन व्हील्स संस्थेमार्फत आधुनिक पद्धतीच्या पाण्याच्या ड्रमचं वाटप करण्यात आलं आहे.
खडतर भागात देखील जमिनीवर चाकांच्या सहाय्याने सहज चालणाऱ्या या ड्रम मधून पाणी ने आण करण्यासाठी महिलांना सुकर होणार असून पाण्यासाठी महिलांची २ ते ३ किलोमीटरची पायपीट आणि त्रास वाचणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
g20 summit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 7 सप्टेंबरला भारतात येणार, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला
https://bharatlive.news/?p=133910 g20 summit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 7 सप्टेंबरला भारतात येणार, कोरोना ...
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
ओमिक्रॉन व्हॅरीनाटने भारतात सामुदायिक संक्रमणाच्या अवस्थेत प्रवेश केल्याची चेतावणी देणारे लसीकरण न केलेले गंभीर कोविड 19 असू शकते
ओमिक्रॉन व्हॅरीनाटने भारतात सामुदायिक संक्रमणाच्या अवस्थेत प्रवेश केल्याची चेतावणी देणारे लसीकरण न केलेले गंभीर कोविड 19 असू शकते
जिनिव्हा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या एका उच्च अधिकाऱ्याने रविवारी कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण न केलेल्यांना चेतावणी दिली. सर्वोच्च आरोग्य संघटनेने सांगितले की, भारतातील कोरोना समुदायाने संक्रमणाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे आणि जगभरातील देशांमध्ये प्रकरणांची ‘त्सुनामी’ सुरू झाली आहे, जरी ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा कमी गंभीर आहे परंतु…
View On WordPress
0 notes
vijaydadra24 · 4 years ago
Link
जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनीही सुरक्षित राहा, घरीच राहा असं आवाहन केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात रेखाटलेलं चित्र आणि आशादायी संदेश त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. लाकडाऊनमुळे स्वत:ला आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ आणि जागा मिळाल्याचे सांगत प्राणघातक कोरोना व्हायरसचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न विजय दर्डा यांनी केला आहे. "काम थांबत नाही; मात्र या लॉकडाऊनने मला आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ दिला आहे. काल, बऱ्याच दिवसांनंतर मी हातात ब्रश घेतला आणि कोरोना व्हायरसचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे", असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे...https://www.lokmat.com/topics/vijay-darda/
1 note · View note
dardavijay560 · 4 years ago

vijaydarda9 · 4 years ago
Link
जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनीही सुरक्षित राहा, घरीच राहा असं आवाहन केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात रेखाटलेलं चित्र आणि आशादायी संदेश त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. लाकडाऊनमुळे स्वत:ला आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ आणि जागा मिळाल्याचे सांगत प्राणघातक कोरोना व्हायरसचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न विजय दर्डा यांनी केला आहे. "काम थांबत नाही; मात्र या लॉकडाऊनने मला आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ दिला आहे. काल, बऱ्याच दिवसांनंतर मी हातात ब्रश घेतला आणि कोरोना व्हायरस���े चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे", असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे...https://www.lokmat.com/topics/vijay-darda/
1 note · View note
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
कोरोना जे एन. वन प्रकाराबाबत काळजी करण्याची गरज नसली तरी सावध राहावं-  केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांचं आवाहन.
इसीससाठी भरती आणि निधी उभारण्यात गुंतलेल्या सहा जणांवर एनआयएचं आरोपपत्र दाखल.
छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं उत्साहात स्वागत.
आणि
भारतीय महिला क्रिकेट संघाचं ऑस्ट्रेलियासमोर २८३ धावांचं आव्हान.
****
देशात कोरोनाच्या जेएन.वन या प्रकाराच्या बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. जे एन.वन प्रकाराबाबत काळजी करण्याची गरज नसून, सावध राहण्याची
गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत त्या सर्व राज्यांवरही आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून असल्याचं मंत्री पवार यावेळी म्हणाल्या. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोविडच्या ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या चार हजार ९७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
****
राष्ट्रीय तपास संस्था -एनआयएनं जागतिक दहशतवादी संघटना इसीससाठी भरती आणि निधी उभारण्यात गुंतलेल्या सहा जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. महाराष्ट्रातल्या इसीस दहशतवादी कारवाया प्रकरणातल्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि परदेशी-आधारित दहशतवाद्यांचा सहभाग असलेला मोठा कट उघड झाला आहे. मुंबईचा ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला, शर्जील शेख आणि बोरिवली-पडघा इथले आकीफ अतीक नाचन, तसंच जुबेर नूर मोहम्मद शेख आणि पुण्यातल्या डॉ. अदनानली सरकार अशी या आरोपींची नावं आहेत. ते सर्व प्रतिबंधित इसीस संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यांनी देशाच्या धर्मनिरपेक्ष आचारसंहिता, संस्कृती आणि लोकशाही शासन प्रणालीच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशानं दहशतवादी कारवायांना पुढे नेण्याचा कट रचला होता, असं एनआयएनं म्हटलं आहे.
****
केंद्र शासनाची विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगरच्या शि��ाजीनगर, विजयनगर आणि भारतनगर परिसरात दाखल झाली तेंव्हा यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे शिवाजीनगर इथं यात्रेस उपस्थित राहिले. अद्यापही ज्या नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड घेतलेलं नाही,  त्यांनी नोंदणी करुन या आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विकसित भारतात कोणीही गरीब राहू नये अशी अपेक्षा डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केली. अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेतर्फे आधार अद्ययावत करणारं वाहन उपलब्ध होते. सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला गॅस योजना, आरोग्य विभागाचे सर्वांसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, महानगरपालिकेचे हर घर जल, पंतप्रधान शहरी आवास योजना, पंतप्रधान आत्मनिर्भर भारत, अन्न सुरक्षा योजना आदी योजनांबाबत माहिती देणाऱ्या दालनांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी डॉ.कराड यांच्या समवेत उपस्थित सर्वांनी विकसित भारताचा संकल्प करणारी शपथ घेतली.
****
नांदेड महापालिका हद्दीतही विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज शहरातल्या जंगमवाडी आणि महाराणा प्रताप सिंह चौक इथं केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीस चांगला प्रतिसाद दिला. महाराणा प्रताप सिंह चौकात झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. नांदेड इथं नागरिकांनी या यात्रेसंदर्भातल्या भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या.
बाईट – विमल ठोंबरे आणि गोदावरी गोडबोले, जि.नांदेड
****
विदर्भातल्या ४७ सिंचन प्रकल्पांना आज सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामाध्यमातून दोन लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं. यावेळी कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाचीही बैठक झाली.
****
काँग्रेस पक्ष हा नेहरू, गांधी, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालतो तर भारतीय जनता पक्ष हा समानतेच्या विरुद्ध चालणारा पक्ष असल्याची टिका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३८ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे, त्यानिमित्त नागपूर इथं ' है तय्यार हम ' या मेळाव्यात खरगे बोलत होते. केंद्रात आगामी काळात काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यास आपण जात निहाय जनगण��ा करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर असून आज त्यांनी अचलपूर तालुक्यातल्या विविध कार्यक्रमांना भेट दिली. यादरम्यान त्यांनी अंबादास पंत वैद्य अंध अपंग मुलांचे वसतीगृह वझर इथं भेट दिली. यावेळी अठरा वर्षावरील बौद्धिक अक्षम असलेल्यांसाठी शासन स्तरावर कायदा करण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
****
यवतमाळमध्ये आज स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बोरी इचोड नागपूर- हैदराबाद महामार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन क���लं. ग्रामीण भागातले नागरिक आणि महिलांची या आंदोलनात उपस्थिती होती. वेगळं विदर्भ राज्य देऊ असं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विदर्भातल्या जनतेचा विश्वासघात केला असल्याचं आंदोलकांनी यावेळी नमुद केलं.
****
छत्रपती संभाजीनगरचे शास्त्रीय गायक गिरीष गोसावी यांना ग्वाल्हेर इथला प्रतिष्ठित बैजु बावरा राष्टीय संगीत पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गोसावी यांना वैदिक योग आणि संगीत संस्थानचा हा पुरस्कार अलाउद्दीन संगीत अकादमीचे संचालक जयंत भिसे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या उमरी, मुदखेड, बिलोली आणि नायगाव तालुक्यांतल्या २२० गावांमधून सांडपाणी आणि पिण्याचं पाणी व्यवस्थापनासाठी जनजागृती रथ फिरणार आहे. काल जिल्हा परिषद प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रथाला रवाना करण्यात आलं. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले यांच्यासह प्रशासनातले अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
धुळे इथं क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ वर्ष वयोगटातली मुलांची राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुणे संघानं छत्रपती संभाजीनगर संघावर तर कोल्हापूर संघानं लातूर संघावर मात केली. अन्य सामन्यांत मुंबई संघानं नागपूरवर आणि नाशिक संघानं अमरावती संघावर विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये राज्यातल्या आठ विभागांतले दोनशे खेळाडू, निवड चाचणी सदस्य, व्यवस्थापक सहभागी झालेले आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान मुंबईत सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियासमोर २८३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. काही वेळापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या नवव्या षटकात एक बाद ५७ धावा झाल्या होत्या. भारताकडून जेनिमा रॉड्रीक्सनं ८२, पूजा वस्त्रकारनं ६२ तर यास्तिका भाटियानं ४९ धावा केल्या.
****
दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्ध सेंच्युरीयन इथं सुरू पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी पहिल्या डावामध्ये १६३ धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४०८ धावा केल्या आहेत. काही वेळापुर्वी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद १८ धावा केल्या होत्या.
****
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत उद्या बीड इथं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीची बैठक होणार आहे. केंद्र शासनाच्या तसंच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरता "विकसित भारत संकल्प यात्रा २०२४" अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठकही उद्या बीडमध्ये होणार आहे. 
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
कोरोना चीनमध्ये पण भारतात म्हणून झाली औषधे महाग
कोरोना चीनमध्ये पण भारतात म्हणून झाली औषधे महाग
चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यानंतर कोरोना साथीचा प्रचंड उद्रेक झालेला असून दिवसाला सुमारे दहा लाख नागरिक कोरोनाची शिकार होत आहेत . चीनमधून भारतात औषध उद्योगासाठी लागणारा कच्चामाल येत असल्याने आता कच्चामाल येण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. औषधांच्या किमती त्यामुळे बारा ते 25 टक्क्यांनी वाढल्या असून देशात कोरोनाचा उद्रेक झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची देखील शक्यता आहे. औषध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पुन्हा वाढतोय कोरोना!
https://bharatlive.news/?p=93786 पुन्हा वाढतोय कोरोना!
Coronavirus Cases in India: भारतात कोरोनाव्हायरसची प्रकरणे ...
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
कोरोना अपडेट चारपैकी एका रुग्णाला ऑक्सिजन सपोर्टची गरज असते
कोरोना अपडेट चारपैकी एका रुग्णाला ऑक्सिजन सपोर्टची गरज असते
नवी दिल्ली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने जगभर हाहाकार माजवला आहे, पण आपल्यासाठी ही दिलासादायक बाब आहे की यावेळी कोविड-19 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेपेक्षा कोविड कमी प्राणघातक आहे. 13 खाजगी रुग्णालयांची साखळी असलेल्या मॅक्स हेल्थकेअरने त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की यावेळी कोरोनाने ग्रस्त असलेल्या चारपैकी एका रुग्णाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
कोरोनाचे नवीन XE प्रकार भारतात आढळले नाहीत, सरकारी सूत्रांनी मुंबईत प्रथम प्रकरण आढळल्याच्या मीडिया वृत्तांचे खंडन केले
कोरोनाचे नवीन XE प्रकार भारतात आढळले नाहीत, सरकारी सूत्रांनी मुंबईत प्रथम प्रकरण आढळल्याच्या मीडिया वृत्तांचे खंडन केले
INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomic Consortium) अंतर्गत नेक्स्ट लेव्हल जीनोम सिक्वेन्सिंग पद्धतीद्वारे त्याची तपासणी केली असता, त्याचा जीनोम क्रम XE च्या जीनोम रचनेशी जुळत नसल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत, सापडलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होत नाही की सापडलेला केस कोविड 19 च्या XE प्रकाराशी संबंधित आहे. कोरोनाविषाणू इमेज क्रेडिट स्रोत: ANI कोरोनाचे नवीन XE प्रकार भारतात आढळले नाही (भारतात एकही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
कोरोना चीनमध्ये पण भारतात म्हणून झाली औषधे महाग
कोरोना चीनमध्ये पण भारतात म्हणून झाली औषधे महाग
चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यानंतर कोरोना साथीचा प्रचंड उद्रेक झालेला असून दिवसाला सुमारे दहा लाख नागरिक कोरोनाची शिकार होत आहेत . चीनमधून भारतात औषध उद्योगासाठी लागणारा कच्चामाल येत असल्याने आता कच्चामाल येण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. औषधांच्या किमती त्यामुळे बारा ते 25 टक्क्यांनी वाढल्या असून देशात कोरोनाचा उद्रेक झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची देखील शक्यता आहे. औषध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago