#कराड
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• देशभरात आतापर्यंत पाच अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण, राज्यसरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती • रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल - पंतप्रधानांचं प्रतिपादन • छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंग स्फोटात आठ सैनिकांना वीरमरण • मस्साजोग हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन सादर आणि • तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात, ११ तारखेला जलकुंभ यात्रा
देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या अर्भकांना, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला, तर तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. कर्नाटकात आढळलेल्या तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणं दिसून येतात. या आजाराचा विषाणू श्वसनमार्गाच्या वरील भागातल्या संसर्गास कारणीभूत ठरतो. या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे. हा कोणता नवीन विषाणू नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नसल्याचं, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांनी खोकला किंवा शिंक येतांना रुमालाचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं, सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावेत, हस्तां��ोलन टाळावं, तसंच आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळावं, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं कळवलं आहे. नागरिकांनी याबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भातल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. दरम्यान, या आजारासंदर्भात राज्यसरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले: ‘‘प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाहीये. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. यासंदर्भात जी काही ॲडव्हायजरी आहे, ती आम्ही लवकरच जारी करू.’’
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे.
रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन काल मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध चार निकषांच्या आधारावर रेल्वेचा विकास करत असल्याचं पंतप्रधानी नमूद केलं. ते म्हणाले.. ‘‘भारत मे रेलवे के विकास को हम चार पॅरामिटर्स पर आगे बढा रहे है। पहला रेलवे के इन्फ्रास्ट्रक्चर का मॉडर्नायझेशन। दुसरा रेलवे के यात्रियों को आधुनिक सुविधा। तीसरा रेलवे की देश के कोने कोने में कनेक्टीव्हीटी। चौथा रेलवे से रोजगार का निर्माण, उद्योगों को सपोर्ट।’’
छत्तीसगड मधल्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात आठ सुरक्षा सैनिक आणि चालक ठार झाले. पंधरा जणांच्या जिल्हा राखीव रक्षक दलाची तुकडी, संयुक्त कारवाईनंतर काल दंतेवाडा इथून वाहनानं परतत असताना कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा सैनिकांवर गोळीबार सुरू केला. या घटनेत पाच सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मा��णी शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांकडे केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना, यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तपास संस्था त्यांचं काम योग्यप्रकारे करत असून, त्याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही, असं मुंडे म्हणाले… ‘‘सर्व चौकशा नेमलेल्या आहेत. त्या तपासामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे संशयानं बघितलं जातं, मी त्यावर बोलणं काही उचित नाही. आणि अतिशय व्यवस्थित तपास त्याठिकाणी चालू आहे. तपास पूर्ण होऊ द्या.’’
बीड इथं सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी जिल्ह्याची होणारी बदनामी थांबण्यासाठी लढा उभा करू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अविनाश नाईकवाडे यांनी मांडली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली. हिंसेचं वातावरण तसंच जातीवाद थांबला पाहिजे, तसंच दोषींना फशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नाईकवाडे यांनी केली. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चौघांची पोलीस कोठडी काल संपली. त्यांना केज न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची तर इतर तीन आरोपीच्या कोठडीत बारा दिवसांची वाढ केली आहे.
बीड शहरात काल संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला. परभणी इथल्या घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दर्पण दिन काल साजरा झाला. मराठीतले आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. नवी दिल्ली इथं महाराष्ट्र परिचय केंद्रात 'मराठी पत्रकार दिन' साजरा करण्यात आला. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पत्रकार पुरस्कार काल जा���ीर झाले. राज्यात प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. मुद्रित माध्यमाचा राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक लोकमत 'सातारा'च्या प्रतिनिधी प्रगती पाटील यांना, वृत्तवाहिनीच�� उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार एबीपी माझा'चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना तर वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार 'दैनिक पुढारी'चे राजन शेलार यांना जाहीर झाला आहे. बीड जिल्हा माहिती कार्यालय तसंच जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रसारमाध्यमात कार्यरत १५१ जणांचा काल गौरव करण्यात आला. तर धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं.
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा ११ जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा तत्परतेने लाभ मिळावा यासाठी शासनाच्या योजना परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. काल परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीच्या रुग्णवाहिकांचं बोर्डीकर यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं, टीबीमुक्त भारत अभियानाच्या जनजागृतीपर वाहनाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
शासकीय योजना जनतेपर्यंत परिपूर्ण रीतीने पोहचल्या पाहिजेत, याकरिता प्रशासनाने समिती स्थापन करावी, आणि गावोगावी शिबीरं घेऊन लाभार्थींना मार्गदर्शन करावं, असं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ही सूचना देणारं पत्र क्षीरसागर यांनी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसंच कृषी अधिकाऱ्यांना पाठवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला. उदयोन्मुख गायिका युगंधरा केचे हिच्या शास्त्रीय गायनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दुसऱ्या सत्रात युवा गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सादर केलेली विविध गाणी, आणि विघ्नेश जोशी यांचं खुमासदार निवेदन याला रसिकांनी भरभरून दाद दिली.
लातूर इथं सुरू असलेल्या २० व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. या चार दिवसीय स्पर्धांमध्ये हॉकी तसंच जलतरण आदी स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.
नांदेड-मनमाड-नांदेड डेमू रेल्वे नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते ३१ जानेवारी दरम्यान ही गाडी पूर्णा ते मनमाड अशी धावेल.
0 notes
Text
अजित दादा तुझ्या पाया पडतो . , पुण्यातील मोर्चात सुरेश धस म्हणाले की..
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून आज बीड, बुलढाणा, परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मोर्च्यात सहभाग दर्शवत मुंडेंवर जोरदार निशाणा साधला आहे. सुरेश धस म्हणाले की , ‘ बीडच्या एसपी आणि सीआयडीच्या आयजींना विनंती आहे की नितीन कुलकर्णी आणि वाल्मिक कराड हे दोघे मिळून 17 मोबाईल नंबर वापरतात. हा नितीन कुलकर्णी वाल्मिक कराड आत गेल्यापासून गायब…
0 notes
Text
संतोष देशमुख हत्याकांड: बीड में केज कोर्ट के बाहर वाल्मिक कराड समर्थकों की भीड़, पुलिस ने किया लाठीचार्ज
महाराष्ट्र के बीड जिले के केज तालुका के मसजोग के सरपंच संतोष देशमुख का अपहरण कर हत्या कर दी गई थी. इस मामले में वाल��मिक कराड भी आरोपी थे, लेकिन वह फरार थे. घटना के 22 दिन बाद आखिरकार उन्होंने पुणे में सीआईडी के सामने आत्मसमर्पण कर दिया है. इसके बाद सीआईडी की टीम वाल्मिक कराड को गिरफ्तार कर लिया. सीआइडी ने आज रात में उन्हें अदालत में पेश करेगी. इसके लिए रात में कोर्ट लगाने की गुजारिश की गई, लेकिन…
0 notes
Text
कराड व रहिमतपूर येथे शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या रॅली व मानवी साखळीद्वारे मतदान जागृती - महासंवाद
सातारा दिनांक 13 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती अभियानातंर्गत रहिमतपूर नगरपरिषदेमार्फत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि कन्या प्रशाला रहिमतपूर यांच्या सहयोगाने मतदान जनजागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीचे रहिमतपूर शहरात आयोजन करण्यात आले. ‘आपल्या मतामुळे होणार आहे लोकशाहीचा सन्मान, अवश्य करा मतदान’ असे संदेश फलक घेऊन…
View On WordPress
0 notes
Text
अमित शाह ने औरंगजेब को बताया MVA का हितैषी, कहा, वह जीते तो वक्फ बोर्ड को दे देंगे किसानों जमीन
अमित शाह ने औरंगजेब को बताया MVA का हितैषी, कहा, वह जीते तो वक्फ बोर्ड को दे देंगे किसानों जमीन #BreakingNews #news #Samachar #RightNews #RightNewsIndia
Maharashtra News: महाराष्ट्र में विधानसभा चुनाव जैसे-जैसे करीब आ रहा है, विरोधी दल एक दूसरे पर हमले तेज कर रहे हैं। शुक्रवार को गृह मंत्री अमित शाह ने सतारा जिले के कराड में रैली की और महाविकास अघाड़ी गढबंधन पर जमकर हमला बोला। उन्होंने कहा कि कांग्रेस ने वक्फ कानून में बदलाव किए जिससे कि वक्फ बोर्ड किसी की भी जमीन पर कब्जा करने लगा। कर्नाटक की सरकार ने पूरा का पूरा गांव वक्फ को दे दिया। उन्होंने…
0 notes
Link
कांग्रेस ने 48 उम्मीदवारों का किया ऐलान, कराड से पृथ्वीराज लड़ेंगे चुनाव, विलासराव देशमुख के 2 बेटे को टिकट
0 notes
Text
महाराष्ट्र की किन सीटों पर बीजेपी, शिवसेना, एनसीपी में खींचतान? अमित शाह ही निकालेंगे सलूशन
मुंबई: बीजेपी और एकनाथ शिंदे शिवसेना के बीच ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नासिक, संभाजीनगर और धाराशिव सहित छह लोकसभा सीटों को लेकर गतिरोध जारी है। समस्या को सुलझाने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के बीच अब तक तीन दौर की बातचीत हो चुकी है, लेकिन कोई सहमति नहीं बन पाई है। दोनों ही दल इन सीटों पर जीत की संभावना का दावा करते हुए अपने रुख पर अडिग हैं। दोनों दलों के अंदरूनी सूत्रों ने बताया कि सीएम शिंदे और डिप्टी सीएम फडणवीस ने संकेत दिया है कि अब इसका समाधान केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के हस्तक्षेप के बाद ही निकल पाएगा।छह सीटें कौन सी?इन छह सीटों में से जून 2022 में विभाजन के बाद ठाणे पर शिवसेना यूबीटी का, पालघर पर शिवसेना (एकनाथ शिंदे के नेतृत्व में) का, रत्नागिरी-सिंधुदुर्ग पर शिवसेना यूबीटी का, नासिक पर एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना का, हाल तक उस्मानाबाद कहे जाने वाले धाराशिव पर शिवसेना यूबीटी और संभाजीनगर पर एआईएमआईएम का कब्जा है।ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं शिंदेबीजेपी ने ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर और नासिक पर दावा किया है, जबकि शिंदे गुट भी इन सीटों पर अपना दावा ठोक रहा है। दोनों ही दल मोदी लहर और मोदी की गारंटी पर सवार होकर अपनी जीत की संभावनाओं का दावा करते हैं। सीएम शिंदे प्रतिष्ठा का सवाल मानकर ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं हैं। ठाणे सीएम शिंदे का गृह क्षेत्र है। दूसरी ओर बीजेपी का कहना है कि शिवसेना में विभाजन के बाद शिंदे गुट के पास शिवसेना यूबीटी के वर्तमान सांसद राजन विचारे को टक्कर देने के लिए कोई मजबूत उम्मीदवार नहीं है।रत्नागिरी-सिंधुदुर्ग को लेकर शिंदे पर भारी दबावउद्योग मंत्री उदय सामंत और उनके भाई किरण सामंत का रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीट बीजेपी के लिए न छोड़ने को लेकर सीएम शिंदे पर भारी दबाव है। उनका कहना है कि इस सीट पर अपनी पार्टी का उम्मीदवार खड़ा करना चाहिए। लेकिन बीजेपी के पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे खुद इस सीट से उम्मीदवार बनने को ��च्छुक हैं। उन्हें उम्मीद है कि वह यह सीट शिवसेना यूबीटी से छीन सकते हैं।पालघर-औरंगाबाद में भी यही हाल पालघर में भी बीजेपी अपनी बढ़ती उपस्थिति के साथ-साथ आरएसएस और उससे जुड़े संगठनों के काम के कारण जीतने को लेकर आश्वस्त है। बीजेपी को पालघर में हितेंद्र ठाकुर के नेतृत्व वाली बहुजन विकास अघाड़ी से समर्थन की उम्मीद है। इसी तरह हाल तक औरंगाबाद कहे जाने वाले संभाजीनगर में शिंदे गुट ने पार्टी के मंत्री संदीपन भामरे या मराठा आरक्षण आंदोलन के कार्यकर्ता विनोद पाटिल को उम्मीदवार बनाने पर विचार कर रहा है। बीजेपी को जीत का भरोसादूसरी ओर बीजेपी भी इस सीट पर अपनी जीत को लेकर आश्वस्त है। पार्टी का मानना है कि वह विभाजित विपक्ष और शिवसेना यूबीटी की गुटबाजी का फायदा उठा सकती है। केंद्रीय मंत्री भागवत कराड संभाजीनगर में भाजपा के संभावित उम्मीदवार हैं। शिवसेना यूबीटी ने पूर्व सांसद चंद्रकांत खैरे को अपना उम्मीदवार बनाने की घोषणा की है।एनसीपी के नासिक पर दावे से टेंशन और बढ़ीइसके अलावा अजित पवार के नेतृत्व वाली एनसीपी के नासिक पर दावे ने सीट-बंटवारे की प्रक्रिया को और अधिक जटिल बना दिया है। एनसीपी मंत्री और समता परिषद के संस्थापक छगन भुजबल ने दावा किया है कि उनकी उम्मीदवारी का प्रस्ताव किसी और ने नहीं, बल्कि बीजेपी के वरिष्ठ नेताओं ने किया है। मौजूदा सांसद हेमंत गोडसे ने सीट-बंटवारे की प्रतीक्षा किए बिना अपना अभियान शुरू कर दिया है, जबकि भुजबल को अपनी पार्टी से टिकट मिलने का भरोसा है। भुजबल ने साफ कर दिया है कि वह नासिक सीट पर बीजेपी के कमल पर नहीं, बल्कि अपनी पार्टी के घड़ी चुनाव चिह्न पर चुनाव लड़ेंगे। लेकिन बीजेपी उनका समर्थन नहीं कर रही।धाराशिव सीट का क्या पेच?जहां तक धाराशिव सीट का सवाल है, शिवसेना यूबीटी ने पहले ही मौजूदा सांसद ओमराजे निंबालकर को अपना उम्मीदवार बनाया है। उन्होंने चुनाव प्रचार भी शुरू कर दिया है। यहां से बीजेपी की ओर से पार्टी विधायक और पूर्व मंत्री राणा पाटिल के मैदान में उतरने की संभावना है। जबकि शिंदे गुट को एक उपयुक्त उम्मीदवार ढूंढना मुश्किल हो रहा है, जो ओम राजे निंबालकर को टक्कर दे सके। अजित पवार के नेतृत्व वाली राकांपा को धाराशिव सीट मिलने की उम्मीद है। इसके लिए पार्टी ने पहले ही तीन नामों को शॉर्टलिस्ट कर लिया है। इनमें पार्टी विधायक सतीश चव्हाण और विक्रम काले व जिला पदाधिकारी सुरेश बिराजदार शामिल हैं। http://dlvr.it/T4w80T
0 notes
Text
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे रजनीदेवी यांचे निधन; कराड येथे होणार अंत्यसंस्कार
सातारा : साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ. रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय ७६) यांचे शुक्रवार १२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.सौ.रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौ. रजनीदेवी…
View On WordPress
#mp srinivas patil#mp srinivas patils wife passes away#खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन#रजनीदेवी श्रीनिवास पाटील#श्रीनिवास पाटील
0 notes
Text
कराडात महामोर्चाद्वारे मराठ्यांचे वादळ
https://bharatlive.news/?p=183015 कराडात महामोर्चाद्वारे मराठ्यांचे वादळ
कराड, पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
Video
youtube
p 3 गायक आनंद शिंदे यांचा,कराड हिते कव्वालीचा लायु कार्य्रम
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कर्नाटकात दोन अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यापैकी तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणे दिसून येतात. या आजाराचा विषाणू श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं कळवलं आहे. नागरिकांनी याबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात येत आहे. देशभरात दळणवळण सुविधेला चालना देण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या या उपक्रमात नव्या जम्मू रेल्वे विभागाचं उद्घाटन, तेलंगणा मधल्या चारलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनचं उद्घाटन आणि पूर्व किनारपट्टी रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी देखील यावेळी होत आहे.
****
शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंदसिंह यांना आदरांजली अर्पण केली आहे. मानवतेच्या कल्याणासाठी गुरु गोविंदसिंह यांनी केलेलं कार्य सर्वांना प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त सर्वत्र आचार्य जांभेकर यांना अभिवादनासह, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
धुळे जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रसारमाध्यमात कार्यरत १५१ जणांचा आज गौरव करण्यात येत आहे.
****
बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांकडे केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.
****
नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांच्या डिजिटल स्वरुपातल्या, वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत करण्याच्या हेतूनं ही नियमावली तयार करण्यात आली आहे. याला कायद्याचं स्वरूप देण्यापूर्वी, नागरिकांनी या नियमावलीच्या मसुद्याविषयीचे आपले अभिप्राय आणि सूचना, MyGov पोर्टलवर, १८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथं काल झालेल्या कुस्तीच्या दंगलीत मानाची पहिली कुस्ती माळाकोळी इथल्या दीप कांगणे या पैलवानाने जिंकली. या स्पर्धेत नांदेडसह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातल्या पैलवानांनी हजेरी लावली होती. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव इथं अश्व, श्वान, शेळी, कुक्कुट प्रदर्शन आणि दुग्ध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा आज समारोप होत आहे. युवा गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्यासह युगंधरा केचे हिचं शास्त्रीय गायन आज होणार आहे. दरम्यान, काल महागामीच्या गुरू पार्वती दत्ता यांच्या कथक नृत्यानं या महोत्सवाला प्रारंभ झाला. शाहीन परवेज यांच्या सतार वादनाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. महोत्सवाचं हे १८ वं वर्ष आहे.
****
राज्यातील २८ हजार ८६७ सहकारी संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करून सुधारित निवडणूक कार्यक्रम राबवण्याचे आदेशही प्राधिकरणाने दिले आहेत.
****
0 notes
Text
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धक्का जरी लागला तरी.., काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धक्का जरी लागला तरी.., काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभर बीडची चर्चा सुरू असून मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड याने मागितली होती असे विष्णू चाटे याने सांगितले आहे. विष्णू चाटे हा सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे वाल्मीक कराड हा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असून राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज…
0 notes
Text
संतोष देशमुख हत्याकांड: बीड में केज कोर्ट के बाहर वाल्मिक कराड समर्थकों की भीड़, पुलिस ने किया लाठीचार्ज
महाराष्ट्र के बीड जिले के केज तालुका के मसजोग के सरपंच संतोष देशमुख का अपहरण कर हत्या कर दी गई थी. इस मामले में वाल्मिक कराड भी आरोपी थे, लेकिन वह फरार थे. घटना के 22 दिन बाद आखिरकार उन्होंने पुणे में सीआईडी के सामने आत्मसमर्पण कर दिया है. इसके बाद सीआईडी की टीम वाल्मिक कराड को गिरफ्तार कर लिया. सीआइडी ने आज रात में उन्हें अदालत में पेश करेगी. इसके लिए रात में कोर्ट लगाने की गुजारिश की गई, लेकिन…
View On WordPress
0 notes
Text
कांग्रेस ने महाराष्ट्र चुनावों के लिए जारी की 48 उम्मीदवारों की पहली लिस्ट, जानें किसको कहां से मिला टिकट
Congress Candidates List Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस पार्टी ने अपने उम्मीदवारों की लिस्ट जारी कर दी है। 48 सीटों के लिए उम्मीदवार फाइनल हो गए हैं। पार्टी के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साकोली से, विधायक दल के नेता बालासाहेब थोरात संगमनेर से, विपक्ष के नेता विजय वडेट्टिवार ब्रम्हपुरी से, पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण से और सीडब्ल्यूसी सदस्य एवं क्षेत्रीय…
0 notes
Text
Onion Rate | जाणून घ्या आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत एका क्लिकवर…
शेतमाल : कांदा बाजार समिती परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/07/2023 कोल्हापूर क्विंटल 2324 600 1800 1200 अकोला क्विंटल 225 1000 1600 1500 औरंगाबाद क्विंटल 1938 300 1500 900 सातारा क्विंटल 120 500 1600 1050 कराड क्विंटल 51 1000 1700 1700 सोलापूर क्विंटल 5887 100 2300 1000 जळगाव क्विंटल 475 375 1227 862 पंढरपूर क्विंटल 454 400 2000 1200 नागपूर क्विंटल 1800 1200 1800 1650 अमरावती- फळ आणि भाजीपाला क्विंटल 258 900 3100 2000 पुणे क्विंटल 8507 700 1700 1200 पुणे- खडकी क्विंटल 10 800 1400 1100 पुणे -पिंपरी क्विंटल 10 1400 1500 1450 पुणे-मोशी क्विंटल 196 500 1000 750 चाळीसगाव-नागदरोड क्विंटल 3000 200 1480 1200 मलकापूर क्विंटल 415 350 1250 1000 कामठी क्विंटल 4 1400 1800 1600 कल्याण क्विंटल 3 500 1000 750 नागपूर क्विंटल 1000 2000 2600 2450 येवला -आंदरसूल क्विंटल 5000 200 1700 1300 लासलगाव क्विंटल 22000 500 2600 1300 लासलगाव – निफाड क्विंटल 2500 500 1426 1300 लासलगाव – विंचूर क्विंटल 6500 500 1682 1350 मालेगाव-मुंगसे क्विंटल 21000 375 1565 1350 सि��्नर – नायगाव क्विंटल 1504 200 1450 1200 कळवण क्विंटल 22600 200 1900 1100 चांदवड क्विंटल 13000 350 1771 1230 मनमाड क्विंटल 7200 500 1600 1200 पिंपळगाव बसवंत क्विंटल 26400 400 2601 1400 पिंपळगाव(ब) – सायखेडा क्विंटल 6625 400 1450 1100 भुसावळ क्विंटल 31 900 1200 1000 रामटेक क्विंटल 10 1400 1600 1500 देवळा क्विंटल 9450 100 1650 1350 उमराणे क्विंटल 15500 701 1651 1260 Read the full article
0 notes
Text
56 मिनट और फिर... बजट इतिहास में सबसे लंबा भाषण देने वाली सीतारमण ने कैसे कही 1 घंटे से कम में अपनी बात
नई दिल्ली: वित्त मंत्री ने गुरुवार को संसद में अपना लगातार छठा बजट पेश किया। उन्होंने सिर्फ 56 मिनट में अपना बजट भाषण समाप्त कर दिया। यह उनका अब तक का था। फिरोजी रंग की कढ़ाई वाली कांथा सिल्क साड़ी पहनकर सीतारमण संसद पहुंची थीं। भाषण के दौरान लोकसभा में सत्ता पक्ष के सदस्य उनकी घोषणाओं और टिप्पणियों पर बीच-बीच में मेजें थपथपाते देखे गए। जब उन्होंने कहा कि ‘हमारी सरकार जुलाई में पूर्ण बजट पेश करेगी’ तो सत्ता पक्ष के सदस्यों ने सबसे ज्यादा देर तक मेजें थपथपाईं। विपक्षी सदस्यों ने भी वित्त मंत्री का बजट भाषण पूरे ध्यान से सुना। हालांकि, लोकसभा चुनाव के बाद उनकी सरकार के सत्ता में लौटने संबंधी कथन पर विपक्ष की ओर से कुछ विरोध के सुर सुनाई दिए। इससे पहले आज 11 बजे बजट भाषण शुरू होने से पहले जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा कक्ष में पहुंचे तो भारतीय जनता पार्टी (बीजेपी) सदस्यों ने ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’ और ‘जय सियाराम’ के नारे लगाए।सीतारमण का सबसे छोटा बजट भाषण सीतारमण का 56 मिनट का आज का बजट भाषण उनका अब तक का सबसे छोटा बजट भाषण है। सदन में सबसे लंबा बजट भाषण देने का श्रेय भी सीतारमण को जाता है। उन्होंने साल 2020 में दो घंटे 40 मिनट तक भाषण पढ़ा था।भारत की पहली पूर्णकालिक महिला वित्त मंत्री के रूप में 2019 में सीतारमण का बजट भाषण दो घंटे 17 मिनट तक चला था। साल 2021 में उन्होंने एक घंटा 50 मिनट तक बजट भाषण दिया। 2022 में उनका यह भाषण 92 मिनट का और 2023 में 87 मिनट का रहा।सीतारमण के आज के बजट भाषण में पहले की तरह तमिल कवियों और विचारकों के उद्धरण नहीं थे। हालांकि, उन्होंने कम से कम आठ बार प्रधानमंत्री मोदी का उल्लेख किया और उनके भाषणों के अंश पढ़े।लोकसभा की दर्शक दीर्घाओं में अधिक संख्या में लोग नहीं थे। दीर्घा-2 में राज्यसभा के कुछ सदस्य बैठे थे। वहीं, वित्त मंत्री के रिश्तेदार कृष्णमूर्ति लक्ष्मीनारायणन और विद्या लक्ष्मीनारायणन और उनकी बेटी वांग्मयी पराकला को दीर्घा-3 की पहली कतार में बैठे हुए देखा गया।बजट पेश करने से पहले सीतारमण ने वित्त राज्य मंत्रियों- पंकज चौधरी और भागवत कराड और वित्त मंत्रालय के शीर्ष अधिकारियों के साथ राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू से मुलाकात की।राष्ट्रपति ने खिलाया चम्मच से दही-शक्कर राष्ट्रपति ने सीतारमण को चम्मच से दही-शक्कर खिलाया। केंद्रीय बजट प्रस्तुत करने के लिए शुभकामनाएं दीं। सीतारमण ने अपने बजट भाषण में कुछ शब्द-संक्षेपों की नई व्याख्या की। मसलन, उन्होंने एफडीआई को ‘फर्स्ट डेवलप इंडिया’ (पहले भारत का विकास) और जीडीपी को ‘गवर्नेंस, डेवलपमेंट एंड परफॉर्मेंस’ (शासन, विकास और कार्य प्रदर्शन) कहा।उन्होंने कहा, ‘सकल घरेलू उत्पाद (जीडीपी) के रूप में बढ़ोतरी के अलावा सरकार अधिक समावेशी जीडीपी (शासन, विकास और कार्य प्रदर्शन) पर भी समान रूप से ध्यान दे रही है।’वित्त मंत्री सीतारमण ने 2019 में बजट दस्तावेजों को परंपरागत ब्रीफकेस में लाने के बजाय बही-खाते के रूप में लाना शुरू किया था। इस पर राष्ट्रीय प्रतीक अशोक चिह्न होता है। इस बार उन्होंने इस परिपाटी को कायम रखा।जनता दल (यूनाइटेड) के नेता राजीव रंजन सिंह ‘ललन’ को बजट भाषण के दौरान अनेक बार मेज थपथपाते हुए देखा गया। उनकी पार्टी गत सप्ताह ही दोबारा राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (राजग) में शामिल हुई है। सीतारमण के बजट भाषण की समाप्ति पर प्रधानमंत्री मोदी उनके पास पहुंचे। अंतरिम बजट प्रस्तुत करने के लिए उन्हें बधाई दी। कई मंत्रियों को भी सीतारमण को बजट प्रस्तुत करने के बाद बधाई देते हुए देखा गया। http://dlvr.it/T29v2q
0 notes