#आत्मचरित्र
Explore tagged Tumblr posts
rebel-bulletin · 2 years ago
Text
शरद पवार यांच्या नजरेतून उद्धव ठाकरे कसे ? आत्मचरित्रात काय लिहिले ?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीना सत्र सुरु केले आहे. शरद पवार यांचा हा निर्णय जसा धक्कादायक आहे त्याचप्रमाणे त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकामधूनही अनेक बाबी उघड झाल्या आहेत.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बंगळुरू इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज आणि दहा किलो तांदूळ मोफत देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये, बेरोजगार पदवीधरांना तीन हजार रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना एक हजार ५०० रुपये देणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतूक बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास, अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आरक्षण आणि अनुसूचित जमातींसाठी तीन वरुन सात टक्के आरक्षण, मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय राज्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासनही काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलं आहे.
****
भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ मध्ये तीन पूर्णांक आठ  टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी चार पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - आय एम एफनं म्हटलं आहे. आपल्या प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षण अहवालात आय एम एफनं, आशिया आणि पॅसिफिक बाबत ही माहिती दिली. हा प्रदेश जागतिक विकासात सुमारे ७० टक्के योगदान देईल, असं आयएमएफनं या अहवालात नमूद केलं आहे.
****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ��ेंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी, हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या वाशी इथं गांधी फौंडेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ३२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ३७९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४४ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७२ शतांश टक्के इतका आहे. 
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं. या ��व्या आवृत्तीत ७५ पानं वाढवण्यात आली असून, शरद पवार यांच्या २०१५ ते २०२२ पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित आहेत.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं असून, सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी सन्मान योजना फसवी असून, यातून शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पटोले यांनी दिला. 
****
परभणी इथल्या प्रस्तावित जिल्हा स्त्री रुग्णालयाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पाहणी केली. या रुग्णालयाचं काम अधिक गतीनं आणि दर्जात्मक करण्याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातल्या महिलांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिल���. विद्युत उपकरणं, स्वच्छता, उद्वाहन यंत्रणा, सुरक्षा भिंतीचं बांधकाम, वहानतळ आदी व्यवस्था काटोकोरपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांना आरोग्य सुविधा नजिकच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्नरत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमनं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. मोचा नामक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
//**********//
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
“अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”; नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र
“अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”; नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे आता स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार आहेत. याबाबतची माहिती त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत दिली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केले की, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरित्र लिहित लवकरच त्याचे प्रकाशन होईल. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा.
नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे नारायण राणे यांच्या आत्मचरित्रामध्ये काय गौप्यस्फोट करणार, याची…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
बहुचर्चित ‘१��७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला गेल्या काही वर्षात कादंबरी, पुस्तकं, आत्मचरित्र यांचा आधार घेऊन अनेक चित्रपट तयार झाले. त्यातील बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता एका कादंबरीवर आधारित आणखीन एक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, तो म्हणजे ‘१७७०’ गेल्या काही वर्षात कादंबरी, पुस्तकं, आत्मचरित्र यांचा आधार घेऊन अनेक चित्रपट तयार झाले. त्यातील…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"मी त्याला हेडलॉकमध्ये ठेवले आणि...": रॉस टेलरने उघड केले की त्याने "त्रासदायक" डेव्हिड वॉर्नरचा कसा सामना केला | क्रिकेट बातम्या
“मी त्याला हेडलॉकमध्ये ठेवले आणि…”: रॉस टेलरने उघड केले की त्याने “त्रासदायक” डेव्हिड वॉर्नरचा कसा सामना केला | क्रिकेट बातम्या
रॉस टेलरचा फाइल फोटो© एएफपी न्यूझीलंडचा माजी खेळाडू रॉस टेलर ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे आणि त्याने आपल्या कारकिर्दीतील अनेक प्रसंग उघड केले आहेत. न्यूझीलंडच्या कर्णधारपदाच्या वादात राजस्थान रॉयल्सच्या मालकांपैकी एकाने त्याच्या खराब फलंदाजीच्या कामगिर��नंतर त्याला थप्पड मारल्याचा क्षण आठवण्यापासून, टेलरच्या आत्मचरित्राने काही धक्कादायक खुलासे केले. त्याच तुकड्यात,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
ज. मो. अभ्यंकरांचे 'भरारी' आत्मचरित्र प्रेरणादायी - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
ज. मो. अभ्यंकरांचे ‘भरारी’ आत्मचरित्र प्रेरणादायी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 21 : शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक भान ठेवून वंचित घटकांसाठी विशेष कार्य करणाऱ्या ज. मो. अभ्यंकरांचे ‘भरारी’ हे आत्मचरित्र सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्‍गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या ‘भरारी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
ज. मो. अभ्यंकरांचे 'भरारी' आत्मचरित्र प्रेरणादायी - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
ज. मो. अभ्यंकरांचे ‘भरारी’ आत्मचरित्र प्रेरणादायी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 21 : शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक भान ठेवून वंचित घटकांसाठी विशेष कार्य करणाऱ्या ज. मो. अभ्यंकरांचे ‘भरारी’ हे आत्मचरित्र सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्‍गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या ‘भरारी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
asantoshwebportal-blog · 5 years ago
Text
लेखक असावेत असे ! माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे
लेखक असावेत असे ! माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे
Tumblr media
गिरीश कर्नाड हे प्रथमतः मी ‘निशांत’ या चित्रपटात पाहिले होते. सहज अभिनय आणि संवादफेक यातून हे गारुड निर्माण झाले ते कायम राहिले. यांचे अभ्यासक्रमात लावलेले ‘हयवदन’ हे नाटक शिकवले. ‘मंथन’ या चित्रपटातून एक वेगळीच भूमिका त्यांनी साकारली होती.
त्यांचे आत्मचरित्र ‘खेळताखेळता आयुष्य’ हे काळजीपूर्वक वाचून काढले.
शाम बेनेगल, शबाना आझमी, नासिरुद्दीन शहा, ओम पुरी, स्मिता पाटील, मोहन आगासे हे त्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
आंबेडकरांचे अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
आंबेडकरांचे अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष आंबेडकर म्हणाले होते “अस्पृश्यता गुलामगिरीपेक्षा वाईट आहे.” आंबेडकरांना बडोदाच्या संस्थानाने शिक्षित केले होते, म्हणून त्यांची सेवा करण्यास ते बांधील होते. महाराजा गायकवाड यांचे लष्करी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु जातीभेदामुळे त्यांना लवकरच नोकरी सोडावी लागली. त्यांनी या घटनेचे त्यांच्या आत्मचरित्र वेटिंग फॉर अ वीजा यात वर्णन केले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
रॉस टेलरने "आयपीएल कारकीर्द लांब" कशी असती ते उघड केले | क्रिकेट बातम्या
रॉस टेलरने “आयपीएल कारकीर्द लांब” कशी असती ते उघड केले | क्रिकेट बातम्या
न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेयर, ज्याने अलीकडेच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ नावाचे त्याचे आत्मचरित्र प्रकाशित केले, त्याने त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल काही अज्ञात तथ्ये उघड केली. टेलरने 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सोबत इंडियन प्रीमियर लीग कारकीर्दीची सुरुवात केली आणि 2011 च्या आवृत्तीत फ्रँचायझीने त्याला विकत घेतले असते तर तो जास्त कालावधीसाठी स्पर्धा खेळला असता असे त्याने उघड केले.…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
आत्मचरित्रातून नारायण राणे सांगणार शिवसेना सोडण्याचं कारण
आत्मचरित्रातून नारायण राणे सांगणार शिवसेना सोडण्याचं कारण
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण आत्मचरित्र लिहिणार असल्याची घोषणा आधीच केली आहे. मात्र आता नारायण आत्मचरित्रातून कोणत्या कोणत्या गोष्टी सांगणार याची उत्सुक्ता वाढली आहे. आपल्या आत्मचरित्रातून नारायण राणे हे शिवसेना सोडण्याचे कारण स्पष्ट करणार आहेत. याबाबतीची माहिती त्यांनी एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला तेदेखील आपण आपल्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
दिव्य मराठी विशेष:भगवान नगरच्या ज्येष्ठ नागरिकाने घरात साकारले ग्रंथालय,1600 पुस्तकांचा संग्रह वाचनासाठी खुला
दिव्य मराठी विशेष:भगवान नगरच्या ज्येष्ठ नागरिकाने घरात साकारले ग्रंथालय,1600 पुस्तकांचा संग्रह वाचनासाठी खुला
दिव्य मराठी विशेष:भगवान नगरच्या ज्येष्ठ नागरिकाने घरात साकारले ग्रंथालय,1600 पुस्तकांचा संग्रह वाचनासाठी खुला कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र वाचनातून ज्येष्ठांना मिळतोय विरंगुळा कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र वाचनातून ज्येष्ठांना मिळतोय विरंगुळा Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
परवीन बॉबीमुळे कबीर बेदींनी पत्नीवर नाव बदलण्यासाठी टाकलेला दबाव, आत्मचरित्रात केला खुलासा
परवीन बॉबीमुळे कबीर बेदींनी पत्नीवर नाव बदलण्यासाठी टाकलेला दबाव, आत्मचरित्रात केला खुलासा
परवीन बॉबीमुळे कबीर बेदींनी पत्नीवर नाव बदलण्यासाठी टाकलेला दबाव, आत्मचरित्रात केला खुलासा बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते कबीर बेदी हे नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत असतात. नुकतंच कबीर बेदी यांच्या जीवनकथेवर आधारित असलेले आत्मचरित्र ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाईफ ऑफ द अॅक्टर’ हे प्रकाशित झाले. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत ��ाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून संघटीत आणि असंघटित महिला कामगारांसाठी लसीकरण शिबीरं भरवण्याची डॉ नीलम गोऱ्हे यांची घोषणा
** ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामीने यांचं आज सकाळी नाशिक इथं निधन
** हुतात्मा सुधाकर शिंदे यांच्या पार्थिव देहावर नांदेड जिल्ह्यात बामणी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
** रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र पारंपारिक पद्धतीनं साजरा
****
स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून संघटीत आणि असंघटित महिला कामगारांसाठी लसीकरणाची शिबीरं भरवण्यात येणार असल्याचं, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबई, पुणे आणि औरंगाबाद मध्ये पुढच्या आठवड्यापासून ही शिबीरं सुरू होणार असल्याचं, डॉ गोऱ्हे यांनी सांगितलं. 'स्वयंसिद्धा भाग दोन' या कार्यक्रमाची देखील घोषणा त्यांनी केली. यामध्ये कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना अपेक्षित असलेल्या मदतीसंदर्भात सर्वेक्षण करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. कामगार सेनेच्या माध्यमातून हजारोंना रोजगार उपलब्ध करून देणारे शिवसेना उपनेते, रघुनाथ कुचिक यांना गोऱ्हे यांनी राखी बांधून त्यांचा सत्कार केला. सैन्य दल, पोलीस विभागासोबत विविध सुरक्षा दलाच्या माध्यमातून कार्यरत असलेले तमाम रक्षणकर्ता भाऊ बहिणींचे देखील डॉ गोऱ्हे यांनी आभार मानले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनऊ इथं कल्याण सिंह यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याण सिंह यांच्या कार्याला उजाळा देताना, कल्याण सिंह यांनी जनकल्याण हाच आपल्या आयुष्याचा मंत्र मानला असं मोदी यांनी नमूद केलं. कल्याण सिंह यांनी राष्ट्र उभारणीसाठी आयुष्यभर काम केलं अशा शब्दात मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. कल्याण सिंह यांचं काल लखनऊ इथं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या बुलंदशहर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
अफगाणिस्तानवरून १०७ भारतीयांना घेऊन वायू सेनेचं एक विशेष विमान आज पहाटे दिल्लीत दाखल झालं. १६८ नागरिकांना घेवून भारतीय वायू सेनेचं C-17 हे विमान काबूलहून गाजियाबादच्या हिंडन इथल्या वायु सेनेच्या तळावर उतरलं. ज्यामध्ये १०७ भारतीय आणि उर्वरित अफगान शीख तसंच हिंदू सहभागी आहेत. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंह खालसा हे देखील अफगाणी शीख नागरिकांमध्ये सहभागी आहेत. यासर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरातल्या पारनाका इथंल्या बाजारपेठेत एका इमारतीच्या तळमजल्याला आज भीषण आग लागल्याने, या आगीत कपड्यांची चार दुकानं खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. ही आग शॉटसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२१ व्या  जयंती दिनानिमित्ताने सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतींना पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन केलं. शासनाच्या कृषि विभागासह विविध संस्था, संघटनांनी कृषी विषयक कार्यक्रम केले. कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन न करता प्रवरा परिवाराच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं पद्मश्री विखेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम झाला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेकांनी विखे पाटील यांना आदरांजली अर्पण केली.
****
ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामीने यांचं आज सकाळी नाशिक इथं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. साहित्याच्या विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या महामीने यांनी विनोदी एकांकिका, नाटके, कथा अशी सुमारे शंभर पुस्तकं लिहिली. राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार, ताराराणी मोडक पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक  वाचनालयाचा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. खाणावळ ते लिहिणावळ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
छत्तीसगडच्या नारायणपूर इथं नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले सहाय्यक समादेशक सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालक्यातल्या बामणी इथं शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हुतात्मा सुधाकर शिंदे यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
****
बहीण भावाच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण आज सर्वत्र पारंपारिक पद्धतीनं साजरा होत आहे. बहीण भावाला राखी बांधून औक्षण करत, मांगल्याची कामना करते, तर भाऊ सुद्धा बहिणीला भेटवस्तू देऊन, संरक्षणाचं तसंच सर्व परिस्थितीत साथ देण्याचं वचन देतो. आज घरोघरी हा सोहळा साजरा झाला.
 परभणी जिल्हयात वृक्षवंदन-रक्षाबंधन या सप्ताहाचे ३० ऑगस्ट पर्यंत आयोजन करण्यात आलं आहे. आज वस���तराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हा उपक्रम राबवण्यात आला. कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्यासह अनेकांनी झाडांना राख्या बांधल्या. वृक्षाला आपण राखी बांधून, लहानपणी त्यांचे संवर्धन करू. हेच वृक्ष भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करणार आहेत, वृक्षास प्रतिकात्मकरित्या राखी बा���धून वृक्ष संवर्धनाशी आपण भावनिकरित्या बांधून घेत आहोत, असं सांगत, डॉ ढवण यांनी, सर्व नागरिकांना वृक्ष संवर्धनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.
 परभणी इथं शेक हॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने टाकळगव्हाण इथल्या सीमा गणेश वाकुडे या भगिनीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेळी देण्यात आली. दोन मुली आणि एक मुलगा असलेल्या सीमा वाकुडे यांच्या पतीचं हृयविकाराने निधन झालं असून, त्या रोजंदारी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत.
 नांदेड शहरातील सिडको परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने अग्निशमन दलाच्या जवानांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून औक्षण करण्यात आलं यावेळी जवानांनी महिलांना तुळशीची रोपं भेट म्हणून दिली.
 औरंगाबाद इथे सिडको भागातल्या प्रियदर्शनी उद्यानात वृक्षप्रेमी नागरिकांच्या वतीने झाडांना राख्या बांधण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले ५ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आज पर्यत ९० हजार ७२२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोविडमुक्त झाल्याने ५ रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २ हजार ६६१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयात ४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
//********//
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** औरंगाबाद जिल्ह्यातली टाळेबंदी स्थगित; विरोधातलं आंदोलनही रद्द
** कोरोना विषाणू संसर्गाचा अधिक उद्रेक असलेल्या औरंगाबाद, नांदेडसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
** परभणी जिल्ह्यात दहावी - बारावी वगळता इतर सर्व वर्ग १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
** नांदेड जिल्ह्यात नियोजन विकास आराखड्यात ५टक्के निधी कोविड उपचार सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना
** राज्यात २७ हजार ९१८ कोविड रुग्णांची वाढ, मराठवाड्यात ८८ रुग्णांचा संसर्गानं मृत्यू तर नव्या चार हजार २१० रुग्णांची नोंद
** गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती
आणि
** साहित्य क्षेत्रातला प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर
****
औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून लागू होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन ही ��ोषणा केली. टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून, या बदलाची सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार टाळेबंदी रद्द करत असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनानं नऊ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती. मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत होता. जिल्ह्यात आतापर्यंत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य केलं, यापुढेही असंच सहकार्य मिळावं, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात अंशत: टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंतच दुकानं सुरु ठेवता येतील, जमावबंदीही कायम आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचं खासदार इम्तियाज जलिल यांनी स्वागत केलं आहे. टाळेबंदीमुळे गोरगरीबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत, त्यांनी टाळेबंदीला विरोध दर्शवला होता. टाळेबंदीविरोधात जलिल यांनी आज पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणू अजून पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन खासदार जलिल यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद, नांदेडसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवून, बाधितांचं तत्काळ विलगीकरण करण्याचे तसंच संपर्कात आलेल्यांचा तपास करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या शहरांमध्ये औरंगाबाद, नांदेडबरोबरच, अहमदनगर, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. देशात संसर्गाचा दर सुमारे साडे पाच टक्के असताना, महाराष्ट्रात मात्र संसर्गाचा दर देशात सर्वाधिक २३ टक्के असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना कोविड लसीकरण करता येणार आहे. कोविन संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या किंवा दुपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन ओळखपत्र दाखवणाऱ्या नागरिकांना कोविड लस दिली जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात इयत्ता दहावी - बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. सर्व वरिष्ठ महाविद्यालय तसेच शिकवणी वर्ग ४ एप्रिलपर्यंत बंद राहतील. जिल्ह्यातले आठवडी बाजार, प्रवासी वाहतूक, धार्मिक स्थळंही १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
बीड जिल्ह्यात कोविड प्रतिबंध तसंच बाधितांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र गृह विलगीकरणातल्या रुग्णांनी कोविडचे नियम पाळावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं आहे. ते म्हणाले...
होम आयसोलेशन आपण देतोय पण होम आयसोलेशनचे लोकं आपले नियम पाळत नाही असे दिसतय त्यांना आम्ही कडक सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष आहे. पण जर ��ोम आयसोलेशच्या लोकांनी काळजी घेतली तर निदान कुटुंबातल्या लोकांना तरी कोरोनापासून आपल्याला बचाव करता येईल. आणि संख्या आपली वाढणार नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे जनतेला की, आपल्यातणं जर उस्फुर्तपणे प्रतिसाद आला तर प्रशासनावर विनाकारणचा ताण येणार नाही.
 दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत तसंच खाजगी बँका आणि सर्व खाजगी कार्यालयातल्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केली आहे. येत्या पाच एप्रिलनंतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी कोविड तपासणी केल्याशिवाय कार्यालयात येणार नाहीत, याची सर्व बँक शाखाप्रमुख तसंच खाजगी कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या यावर्षीच्या नियोजन विकास आराखड्यात ५टक्के निधी कोविड उपचार सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल नांदेड इथं वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमवर बैठक घेतली, या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी, कोविड बाधितांवर उपचारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी दोनशे रुग्णखाटा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
****
राज्यात काल २७ हजार ९१८ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २७ लाख ७३ हजार ४३६ झाली आहे. काल १३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ४२२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. काल २३ हजार ८२० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख ७७ हजार १२७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ४० हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार २१० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८८ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४३, नांदेड जिल्ह्यातल्या २०, परभणी नऊ, जालना आठ, लातूर पाच, हिंगोली दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ११६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९५०, लातूर ५५७, जालना ४२४, परभणी ३७९, बीड ३१८, उस्मानाबाद २४२, तर हिंगोली जिल्ह्यात २२४ रुग्ण आढळून आले.
****
राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सीजनचा पुरवठा वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने काल अधिसूचना जारी केली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू ��ाहणार आहे. ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादका��ना देण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास, वाढीव पुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी जमा करुन देण्याचे निर्देश कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.  
****
साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा सरस्वती सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेशनचा हा पुरस्कार देशातल्या २२ भाषातल्या पुस्तकांचं अवलोकन करुन दरवर्षी एका साहित्यिकाला दिला जातो. लिंबाळे यांना त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लिंबाळे यांची ४० हून अधिक पुस्तकं प्रकाशित असून अक्करमाशी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. उमेदीच्या काळात लिंबाळे यांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रात उद्घोषक म्हणून काम केलं आहे.
****
नांदेड शहरात धुलीवंदनाच्या दिवशी वजीराबाद भागात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या १८ समाज कंटकांना पोलिसांनी अटक केली असून, ३०० लोकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ही माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज पाहून ६० आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याचं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाचे प्रविण पाठक यांची एकमतानं निवड झाली. नगरपालिकेच्या काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात कोविडबाधितांवर उपचारासाठी आवश्यक एच.आर.सिटी चाचणी करता सीटी स्कॅनचं जादा शुल्क आकारणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. संबंधित सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाळसाळे यांनी काल परभणी शहरात विविध कोविड केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय उपचार, सुविधा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेऊन, आवश्यक निर्देश दिले. टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण कार्यक्रम टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात काल घेण्यात आला, ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन टाकसाळे यां��ी यावेळी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त होणारे धार्मिक विधी फक्त पाच जणांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश प्रशासनानं जारी केले आहेत. मात्र, हे विधी करण्यासाठी ५० जणांना आणि सर्व फडकऱ्यांना कमीत कमी २० जणांच्या उपस्थितीची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज योगेश गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. देहू इथं काल तुकाराम बीजेनिमित्त ५० भाविकांना परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.
****
थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडीत करू नये, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली. उस्मा��ाबाद इथल्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
****
बीड तालुक्यातल्या श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती हरिभक्तपरायण महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचं काल निधन झालं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी महाराजांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
//**********//
0 notes