#महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक :22.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार-राज्यभरात नामनिर्देशन प्रक्रियेला आजपासून प्रारंभ-महायुती तसंच महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप अस्पष्ट
परिवर्तन महाशक्ती, मनसे, तसंच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची टप्प्याटप्प्याने घोषणा
भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोला इथल्या विचार सभेत गोंधळ
राजकीय पक्षांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं-मराठवाडा पाणी परिषदेची मागणी
आणि
भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात नामनिर्देशन प्रक्रियेला आजपासून प्रारंभ होत आहे. येत्या २९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून, ३० तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. नांदेड लोकसभा मतदार��ंघाच्या पोटनिवडणुकीसाठी याच वेळापत्रकाप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २५ नोव्हेंबरपूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.
****
राज्यात आतापर्यंत नऊ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे. त्यात सुमारे एक कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजारांहून अधिक मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या आदिवासी जमातींमधल्या सर्व २ लाख ७७ हजार मतदारांची नोंद मतदार यादीत केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एकूण एक लाख १८६ मतदार केंद्र असतील. त्यातले ४२ हजार ६०४ केंद्रं शहरी तर ५७ हजार ५८२ केंद्रं ग्रामीण भागात आहेत.
****
दरम्यान, निवडणूक निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चर्चा निराधार असल्याचं मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच २६ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन नवनिर्वाचित आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली जाईल, त्यानंतर राज्यघटनेच्या कलम १६४ नुसार सरकार स्थापनेसाठी राज्यपाल आमंत्रण देऊ शकतात आणि त्यासाठी २६ नोव्हेंबर या तारखेचं बंधन नाही, २६ नोव्हेंबरची कालमर्यादा फक्त निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असल्याचं, तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं.
****
राज्यात उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होत असली, तरी महायुती तसंच महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांचं जागावाटप अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीत भाजपाचे ९९ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार वगळता इतर उमेदवार जाहीर झालेले नाहीत.
दरम्यान, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून, उर्वरित जागांवर घटकपक्षांसोबत आज चर्चा होईल, त्यानंतर आजच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असं पटोले यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाहेर पडणार या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं, पटोले यांनी स्पष्ट केलं.
****
रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शिष्टमंडळासह काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याबाबत महायुतीच्या तीन मोठ्या घटकपक्षांसोबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवलीत राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ही माहिती दिली.
****
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीने दहा उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. या दहापैकी आठ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, तर दोन जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. राजू शेट्टी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Byte…
परिवर्तन महाशक्तीच्या या यादीत मराठवाड्यात देगलूर-बिलोली मतदार संघातून सुभाष साबणे, हदगाव-हिमायतनगर-माधव देवसरकर, तर हिंगोली मतदार संघातून गोविंदराव भवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
**
भारतीय कम्युनिस्ट पक्षानं छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून विधिज्ञ अभय टाकसाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी छत्रपती संभाजीनगर इथं ही माहिती दिली. भाकपने राज्यभरात अकरा जागा देण्याची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. याबाबत महाविकास आघाडीशी चर्चा सुरू असून, येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय झाल्यानंतर आपण अंतिम उमेदवारांची घोषणा करू असंही डॉ कांगो यांनी सांगितलं.
**
वंचित बहुजन आघाडीने १६ उमेदवारांची पाचवी यादी काल जाहीर केली. यामध्ये उदगीर मतदार संघातून प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवनाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांची काल अकोला इथं झालेली विचार सभा, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम-लोकशाही मंच द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होताच, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावरून मोठा गो��धळ उडाला. दरम्यान, धक्काबुक्की झाल्यानं पोलिसांनी वंचितच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठवाड्यातली सिंचन क्षमता ५० टक्क्यांन वाढवण्यासाठी एकात्मिक जलनिती या योजनेअंतर्गत सर्व पर्यायाचा विचार करून कालबद्ध कार्यक्रम राबवला जावा अशी अपेक्षा देखील मराठवाडा पाणी परिषदेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
राष्ट्रीय जल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं सर्वश्रेष्ठ राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, पाणी वापर समूह आणि सर्वश्रेष्ठ नागरिक, समाज अशा नऊ श्रेणींत ३८ विजेत्यांची घोषणा केली आहे. यंदा या पुरस्कारांचं हे पाचवं वर्ष आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला असून, त्याच्यावर गडचिरोली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपाताचा कट रचण्यासाठी कोपर्शीच्या जंगलात नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या भागात सी-६० पथकाच्या २२ तर केंद्रीय राखीव दलाच्या दोन तुकड्यांनी नक्षलविरोधी अभियान राबवलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी मारले गेले, त्यांची ओळख पटवणं सुरू आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यात काल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. जंगली कोटा इथला अजिनाथ नथू राठोड, हा १८ वर्षीय युवक तसंच मौजे हनुमंतखेडा इथली अश्विनी मच्छिंद्र राठोड, या १४ वर्षीय मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून सी-व्हिजिल ॲपवर एकूण ७७६ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ७७३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली
****
शिक्षकांनी मतदार जनजागृती उपक्रमात योगदान देण्याचं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमाचा भाग म्हणून ते काल शिक्षक मेळाव्यात बोलत होते. एमआयटी महाविद्यालयातही स्वामी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीपर भारुड तसंच गीतं सादर करुन उपस्थितांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं.
दरम्यान, जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदार संघात टपाली मतदान प्रक्रियेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं काल प्रशिक्षण काल पार पडलं. ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार तसंच निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतदान प्रक्रियेची सुविधा सहज आणि सोपी पद्धतीने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा विभागीय लोकशाही दिन, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
****
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नेवासा इथल्या स्ट्राँगरूमला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. आचारसंहिता अंमलबजावणीच्या दृष्टीने त्यांनी यावेळी सूचना केल्या.
****
0 notes
Text
“अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”; नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र
“अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”; नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे आता स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार आहेत. याबाबतची माहिती त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत दिली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केले की, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरित्र लिहित लवकरच त्याचे प्रकाशन होईल. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा.
नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे नारायण राणे यांच्या आत्मचरित्रामध्ये काय गौप्यस्फोट करणार, याची…
View On WordPress
#Autobiography#Congress#narayan rane#nitesh rane#Shivsena#आत्मचरित्र#काँग्रेस#नारायण राणे#नितेश राणे#महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष#शिवसेना
0 notes
Text
वीज बिल माफीसाठी १९ मार्चला राज्यभर महामार्ग रोको आंदोलन; राजू शेट्टींची माहिती
वीज बिल माफीसाठी १९ मार्चला राज्यभर महामार्ग रोको आंदोलन; राजू शेट्टींची माहिती
कोल्हापूर : राज्यात पुन्हा एकदा घरगुती वीज बिल वसुली सुरू करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री यांनी थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनसह विविध पक्ष, संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारच्या या सक्तीविरोधात १९ मार्च रोजी राज्यस्तरीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.…
View On WordPress
0 notes
Text
उद्धव महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री..!
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री होंगे। भाजपा नेता और पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के इस्तीफे के बाद मंगलवार को मुंबई के ट्राइडेंट होटल में शिवसेना, एनसीपी, कांग्रेस और कुछ छोटे दलों की संयुक्त बैठक में महा विकास अघाड़ी का औपचारिक तौर पर गठन हुआ। बैठक में शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण समेत शिवसेना, एनसीपी और कांग्रेस के तमाम बड़े नेता और नवनिर्वाचित विधायक शामिल हुए। समाजवादी पार्टी के नेता अबू आजमी भी बैठक में मौजूद र���ें। उनके अलावा, स्वाभिमानी पक्ष के नेता राजू शेट्टी भी बैठक में शामिल हुए। खास बात यह रही कि डेप्युटी सीएम पद से इस्तीफा देने वाले अजित पवार बैठक में शामिल नहीं हुए। उद्धव ठाकरे के साथ कांग्रेस और एनसीपी से एक-एक नेता उपमुख्यमंत्री पद का भी शपथ ले सकते ह��ं। एनसीपी की तरफ से जयंत पाटिल और कांग्रेस की तरफ से बालासाहेब थोराट उपमुख्यमंत्री बन सकते हैं। महाविकास अघाड़ी के नेता और मुख्यमंत्री के तौर पर उद्धव ठाकरे के नाम के प्रस्ताव के पास होने के बाद एनसीपी चीफ शरद पवार ने कहा कि राज्य में बदलाव की जरूरत थी। बालासाहेब ठाकरे का जिक्र करते हुए शरद पवार ने कहा कि वह काफी हाजिरजवाब थे। अगर आज वह होते तो बहुत ज्यादा खुश होते। पवार ने कहा, ‘महाविकास अघाड़ी के तीन प्रतिनिधि आज राज्यपाल से मिलेंगे और सरकार बनाने का दावा पेश करेंगे। शपथग्रहण 1 दिसंबर को मुंबई के शिवाजी पार्क में आयोजित किया जाएगा। उद्धव ठाकरे को नवगठित महा विकास अघाड़ी का नेता चुना गया। थोड़ी देर में उद्धव ठाकरे के नेतृत्व में शिवसेना-एनसीपी-कांग्रेस के 3 नेता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मिलकर सरकार बनाने का औपचारिक दावा पेश करेंगे। उद्धव ठाकरे फिलहाल विधायक नहीं हैं। मुख्यमंत्री बनने के बाद 6 महीनों के भीतर ही उन्हें विधानसभा या विधान परिषद का सदस्य बनना जरूरी होगा। उद्धव ठाकरे 1 दिसंबर को मुंबई के शिवाजी पार्क में एक भव्य समारोह में महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद का शपथ लेंगे। पहली बार ठाकरे परिवार से कोई मुख्यमंत्री बनेगा। अबतक ठाकरे परिवार खुद को चुनाव से दूर रखता आया था लेकिन इस बार के विधानसभा चुनाव में परिवार ने जब इस परंपरा को तोड़कर आदित्य ठाकरे को चुनाव मैदान में उतारा था। यह संकेत था कि अब शिवसेना मुख्यमंत्री पद के लिए सारा जोर लगाएगी। 24 अक्टूबर को नतीजे घोषित होने के बाद से ही शिवसेना ने बीजेपी पर आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाने का दबाव डालना शुरू कर दिया। हालांकि, बीजेपी से गठबंधन टूटने के बाद बदली परिस्थितियों में खुद उद्धव को सीएम पद के लिए तैयार होना पड़ा। Read the full article
0 notes
Text
!!भाजपा का #ठगबंधन!!
!!भाजपा का #ठगबंधन!! 1- शिव सेना 2- शिरोमणि अकाली दल 3- लोक जन शक्ति पार्टी 4 - अपना दल 5 - तेलगु देशम पार्टी 6 - जनता दल यूनाइटेड 7 - भारतीय समाज पार्टी 8 - जम्मू एंड कश्मीर पीपुल डेमोक्रेटिक फ्रंट 9 - राष्ट्रीय लोक समता पार्टी 10 - स्वाभिमानी पक्ष 11 - महान दल 12 - नागालैंड पीपुल्स पार्टी 13- पट्टाली मक्कल काची 14- ऑल इंडिया एन आर कांग्रेस 15- सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट 16- रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया 17- बोडोलैंड पीपुल्स फ्रंट 18 - मिजो नेशनल फ्रंट 19 - राष्ट्रीय समाज पक्ष 20- कोनगुनडाउ मक्कल देसिया काची 21- शिव संग्राम 22 - इंडिया जनानयगा काची 23 - पुथिया निधि काची 24- जना सेना पार्टी 25 - गोरखा मुक्ति मोर्चा 26 - महाराष्ट्र वादी गोमांतक पार्टी 27 - गोवा विकास पार्टी 28- ऑल झारखंड स्टूडेंट यूनियन 29 - इंडिजन्यस पीपुल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा 30 - मणिपुर पीपुल्स पार्टी 31 - कमतपुर पीपुल्स पार्टी 32 - जम्मू कश्मीर पीपुल्स कांफ्रेंस 33- हिंदुस्तानी अवाम मोर्चा 34- केरला कांग्रेस (थॉमस) 35 - भारत धर्म जन सेना 36- असम गण परिषद 37 - मणिपुर डेमोक्रेटिक पीपुल्स फ्रंट 38- प्रवासी निवासी पार्टी 39- प्रजा सोशलिस्ट पार्टी 40 - केरला विकास कांग्रेस 41- जनाधीय पठाया राष्ट्रीय सभा 42 - हिल स��टेट पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी 43 - यूनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी(मेघालय) 44 - पीपुल्स पार्टी ऑफ अरुणांचल 45 - जनाठीपथिया संरक्षण समित 46 - देसिया मुरपोक्क द्रविड़ कड़गम ये लिस्ट नोट कर लीजिए। बीजेपी के सहयोगी दल हैं। गठबन्धन, ठगबंधन और राजनैतिक सौदेबाजी कहने वालों के मुँह पर मारने के काम आएगी। साथ में वो डॉयलाग भी घुमा दीजिएगा - शेर तो अकेला ही आता है झुंड में तो .... 😉 ....और इसमें सबसे खास बात ये कि भाजपा देशभक्त है और 'भक्त' महान - क्योकि---- अलग गोरखालैंड की मांग करने वाले गोरखा जनमुक्ति मोर्चा का गठबंधन बीजेपी के साथ है. आज़ाद नागालैंड की मांग करने वाले नागा जनमुक्ति मोर्चा का गठबंधन बीजेपी के साथ है. आज़ाद कश्मीर की मांग करने वाली पीडीपी का गठबंधन बीजेपी के साथ है. आज़ाद खालिस्तान की मांग का समर्थन करने वाले अकाली दल का गठबंधन बीजेपी के साथ है. केवल मराठियों के लिए महाराष्ट्र की मांग करने वाली शिवसेना का गठबंधन बीजेपी के साथ है. अलग बोडोलैंड की मांग करने वाला बोडो जनमुक्ति मोर्चा का गठबंधन बीजेपी के साथ है. त्रिपुरा को देश से अलग करने की मांग रखने वाली उग्रवादी संगठन NLFT के साथ बीजेपी का गठबंधन
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं सरकार वचनबद्ध-कार्यभार स्वीकारतांना पंतप्रधानांची ग्वाही-प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १७वा हप्ता जारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभिन्न भाग-अजित पवार यांचा निर्वाळा
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध
आणि
अहमदनगर तसंच जालना जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या दोन घटनांत चौघांचा मृत्यू
****
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यभार स्वीकारताच, सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १७वा हप्ता पंतप्रधानांनी जारी केला. या अंतर्गत ९ कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार कोटी रुपये निधी थेट जमा होणार आहे. दरम्यान, नवनियुक्त मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
****
मणिपूरच्या जिरीबाम इथं आज काही हल्लेखोरांनी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. सुदैवानं मुख्यमंत्री बीरेन सिंह यावेळी या ताफ्यात नव्हते. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक जखमी झाला. घटनास्थळावर पोलिसांकडून शोध अभियान सुरू असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये काल यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी आज शोधमोहिम सुरू केली. लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल या सुरक्षा दलांनी राजौरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या रयाथ, पोनी, शिव खोरी परिसरा��ा घेराव घातला असून, ही शोधमोहीम अद्यापही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए-राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभिन्न भाग असल्याचा निर्वाळा, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रीपदावरून काहीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्रिपदाचा प्रस्ताव एनडीएकडून मिळाला होता, मात्र आपण तो सध्या तो नाकारत, एनडीएसोबतच काम करत राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. पक्षस्थापनेसह पक्षविस्तारासाठी योगदान दिलेल्या सर्वांप्रती अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, आज सकाळी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, अनिल पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रपुरुषांच्या स्वाभिमानी विचारांवर आपण मार्गक्रमण करतांना, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आपण काम करत असल्याचं, पवार यांनी सांगितलं. जनतेची सेवा, कष्टकरी, शेतकरी आणि महिला यांचा सन्मान तसंच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी आपण सर्वजण काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
अहमदनगर इथंही आज शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे.
****
कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज यांचा निवडून आल्याबद्दल सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
****
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या आज झालेल्या छाननीत दोन अर्ज बाद ३६ अर्ज वैध ठरले आहेत. आज झालेल्या छाननीत अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार यांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असल्याचं आढळल्यानं त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. किशोर भिकाजी दराडे यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार रणजित बाठे यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. या निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारांचे ५३ अर्ज असून आज छाननी झाल्यानंतर बुधवार १२ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
****
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या धर्मव��र छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा नरीमन पॉइंट ते वरळीकडे जाणारा सव्वा सहा किलोमीटरचा बोगदा आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या मार्गाचा उर्वरित तिसरा टप्पा जुलै मध्ये खुला करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. या मार्गावर प्रवास करण्यासाठी पूर्वी ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत होता मात्र या बोगद्यामुळे हा प्रवास आता केवळ ८ मिनिटात होणार आहे.
****
खरीप हंगामात खते-बियाण्यांच्या अभावी कुठंही पेरण्यांना विलंब होऊ नये, त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे आणि खतांचा पुरवठा तसंच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. ते आज त्यांच्या मंत्रालयीन दालनात यासंदर्भातल्या आढावा बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबबात माहिती दिली. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
****
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी दिली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २६ वा वर्धापन सोहळा आज विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठानं संशोधन प्रकल्पांना सर्वाधिक प्राधान्य दिलं असून या दृष्टीकोनातून विद्यापीठात ’दृष्टी’ कक्षाची स्थापना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य शास्त्राची माहिती देणारं अद्ययावत ’इक्षणा’ संग्रहालय विद्यापीठ मुख्यालयात साकारण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड - खर्डा मार्गावर आज एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जामखेड कडून खर्डा कडे जाणारी एस टी बस आणि समोरुन येणारी कार यांच्यात हा अपघात झाला. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झाले���्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जालना-अंबड मार्गावरील हारतखेडा फाट्यावर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
****
पावसाळ्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची योग्य ती दक्षता घ्यावी, पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात, सांडपाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने करावा, आदी सूचना मीना यांनी यावेळी दिल्या.
****
लातूर शहरात पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लातूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. डेंग्यू प्रतिबंधासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळण्याचं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये तसंच घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात असं आवाहनही महापालिकेनं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं दहावी तसंच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा आज गौरव करण्यात आला. समर्थ नगर इथल्या श्रीराम मंदिरात आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमात सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
****
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाच्या वतीने १० जून ते १६ जून या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दृष्टीदिन सप्ताह राबवला जात आहे. डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेल्या या सप्ताहाला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी नेत्रदानाचं महत्त्व सांगून, नेत्रदानाचे संमतीपत्र भरुन देण्याबाबत आवाहन करण्यात आलं.
****
नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो राज्याच्या बहुतांश भागात सक्रीय झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 19 October 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
ग्रामीण भागातल्या युवकांकरता राज्यशासन ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करत असलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आज दुपारी चार वाजता दूरस्थ पद्धतीनं पंतप्रधान या केंद्रांचं लोकार्पण करतील. राज्यातल्या ३४ जिल्ह्यांत उद्घाटन होत असलेल्या या केंद्रांमध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या १७ केंद्रांचा, नांदेड १६, जालना १३, धाराशिव १२, परभणी १० तर हिंगोली जिल्ह्यातल्या आठ प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांत १७ ठिकाणी ह्या केंद्रांचं उद्घाटन होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे. या सर्वं केंद्रांमध्ये मागणीनुसार प्रशिक्षण दिलं जाणार असून, इच्छुकांना नाव नोंदवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
राज्याच्या विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाल्याबद्धल आज राज्य मंत्रिमंड�� बैठकीत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून अभय जयनारायणजी मंत्री, श्याम छगनलाल चांडक यांचीही आज नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुढच्या दोन वर्षांसाठी हा पदभार असणार आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा बांगलादेशसोबत सामना होणार आहे. पुणे इथं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलिया, अफगाणीस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध सलग तीन विजय नोंदवले आहेत. बांगलादेश संघाचा कर्णधार, अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन दुखापतीमुळं संघाबाहेर राहिला तर त्याच्या संघासमोरचं आव्हान आणखी अवघड होणार आहे. बांगलादेश संघ या स्पर्धेतल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांत पराभूत झाला तर अफगाणीस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयी झाला आहे.
****
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था- सारथी मधल्या संशोधक विद्यार्थ्यांनी आजपासून छत्रपती संभाजीनगर इथं सारथी विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. २०१९ पासून संशोधन करत असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठ नोंदणी दिनांक पासून गौरववृत्ती देण्यात यावी तसंच गौरववृत्ती संख्या केवळ ५० ही अट तत्काळ रद्द करावी आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
****
दौंड निझामाबाद जलद रेल्वे येत्या २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः आणि निझामाबाद पंढरपूर एक्सप्रेस ही रेल्वे २३ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर काचीगुडा नगरसोल जलद रेल्वे २४, २६ आणि २८ ऑक्टोबरला मुदखेड ते परभणी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. रामेश्वरम ते ओखा जलद रेल्वे २७ ऑक्टोबरला रामेश्वरम इथून सुटून काटपाडी, पाकाला, धर्मावरम, गुत्ती मार्गे धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
नाशिकमध्ये काँग्रेसपक्ष कार्यकर्त्यांनी आज अमली पदार्थविरोधात मानवी साखळी तयार करुन आंदोलन केलं. अमली पदार्थांचा व्यापार बंद होत नाही तोपर्यंत पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अमली पदार्थ विरोधामध्ये उद्या नाशिक इथं मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात मराठा समाज कार्यकर्त्यांतर्फे एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तालुका बंदीचा इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षण द्या, मगच दौरे करा, असं आवाहन संघटने��र्फे करण्यात आलं आहे. येत्या २३ तारखेला पवार हे तालुक्यातल्या पिंपळनेरच्या दौऱ्यावर येणार आहेत. पवार यांनी येवू नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराही कार्याकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सोयाबीनला किमान आठ हजार रुपये भाव द्यावा, पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, मागील आणि चालू वर्षातली अतिवृष्टीची मदत उर्वरित शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Video: ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढेल आमच्या नादाला लागायचं नाही - निलेश राणे
Video: ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढेल आमच्या नादाला लागायचं नाही – निलेश राणे
नारायण राणेंचे थोरला मुलगा निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंवर टीका करीत शिवसैनिकांना अर्वाच्य भाषेत चिथावलं आहे. गुरुवारी रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे कुटुंबावरही टीका केली.
“ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढेल आमच्या नादाला लागायचं नाही”, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान केले. “आपण ठाकरेंवर ऐवढी टीका करत असताना एकाही शिवसैनिकाची आपल्यासमोर…
View On WordPress
#balasaheb thackrey#nilesh rane#उद्धव ठाकरे#निलेश राणे#बाळासाहेब ठाकरे#महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष#शिवसेना
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· अन्न सुरक्षा क्षेत्रात महाराष्ट्राला तृतीय मानांकन;'इट राईट' या उपक्रमात औरंगाबाद आणि लातूरसह ११ जिल्ह्यांना पुरस्कार
· राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग; महाविकास आघाडी तसंच भाजपची मोर्चेबांधणी
· सहाय्यक प्राध्यापकांची दोन हजार ८८ पदं त्वरित भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय
· ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन
· राज्यात काल कोविड संसर्ग झालेले एक हजार ८८१ नवे रुग्ण
· मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद इथं जाहीर सभा
· बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार
आणि
· खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघानं काल पटकावली ११ सुवर्णपदकं; पदकतालिकेत पहिल्या स्थानी कायम
****
अन्न सुरक्षा क्षेत्रात महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकाचं मानांकन मिळालं आहे. खाद्य सुरक्षेच्या बाबतीत राज्याने उत्तम कामगिरी केली असून काल जागतिक अन्न सुरक्षा दिनी राज्याला सन्मानित करण्यात आलं. काल नवी दिल्ली इथं झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्य हस्ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विभागाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केलं आहे.
राज्याने 'इट राईट' या उपक्रमातही उत्तम कामगिरी केली आहे. या ���पक्रमाअंतर्गत राज्यातल्या अकरा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आलं आहे. यात औरंगाबाद आणि लातूरसह बृहन्मुंबई, पुणे, मीरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे.
****
राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात सात उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यातल्या २८८ आमदारांपैकी ५५ आमदार शिवसेनेचे, ५३ आमदार राष्ट्रवादी क��ँग्रेस आणि ४४ आमदार काँग्रेसचे आहेत. विरोधी पक्ष भाजपकडे १०६ आमदार आहेत. या प्रमुख पक्षांखेरीज बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. यासोबतच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पीडब्ल्यूपी, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पार्टी, जनसुराज्य पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पार्टी यांचे प्रत्येकी एक आमदार आहेत. या आमदारांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, काल मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
****
वरिष्ठ महाविद्यालयातल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती संदर्भात १२ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार उच्चस्तरीय समितीने मान्य केलेल्या दोन हजार ८८ सहायक प्राध्यापकांची पदं त्वरित भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबईत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभागातल्या प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठक झाली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं दोन महिन्यात भरावीत असे निर्देश, पवार यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांना प्रति तास एक हजार रुपये देण्यास, या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षक संचालकांच्या सर्व रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात असा देखील निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.
दरम्यान, त्रुटीची पूर्तता करणाऱ्या शाळांना २० टक्के वाढीव अनुदान देण्यासही काल अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कायम शब्द वगळलेल्या आणि मूल्यांकन पात्र खाजगी शाळांना देखील अनुदानासाठी पात्र घोषित करण्यास या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.
****
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पुणतांबा इथं शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै या कृषीदिनापासून करण्यात येणार आहे. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातला फरार आरोपी मेहुल चोक्सीविरोधात सक्तवसुली संचालनालय - ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. मेहुल चोक्सी, त्याची पत्नी आणि त्यांच्या कंपन्यांसह सहा जणांविरुद्ध मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे दुसरं पुरवणी आरोपपत्र आहे. जवळपास १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीला भारतात हवा असलेला चोक्सी फरार आहे.
****
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. जवळपास चाळीसहून अधिक वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. बातम्या वाचण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरच्या बातम्यांची ओळख बनले होते. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी भिडे यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले एक हजार ८८१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ९६ हजार ११४ झाली आहे. राज्यात काल या संसर्गानं कोणाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८६६ झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ८७८ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३९ हजार ८१६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नांदेड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एक नवा रुग्ण आढळला.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद इथं जाहीर सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार असून, सभेची सर्व तयारी झाली असल्याचं, शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. मार्च - एप्रिल २०२२ मध्ये बारावीची परिक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली होती. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच एस सी रिझल्ट डॉट एमकेसीएल डॉट ओआरजी या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
****
हवाई क्रीडा प्रकारांसाठीचं पहिलं राष्ट्रीय धोरण नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल जाहीर केलं. २०३० पर्यंत भारताला हवाई खेळातल्या प्रमुख देशांमध्ये समाविष्ट करणं, हा या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणात एरोबेटिक्स, बैलूनिंग, ग्लाइडिंग, पैराशूटिंग, पावर्ड एयरक्राफ्ट आणि रोटरक्राफ्ट यासह ११ हवाई क्रीडा प्रकारांना चालना देण्यात येणार आहे. या धोरणामुळे देशात हवाई खेळांचं प्रमाण वाढेल, रोजगार निर्मिती होईल, महसूल वाढेल, असं शिंदे यावेळी म्हणाले. यासाठी एयर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया - भारतीय हवाई क्रीडा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हरियाणात सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी काल पाचव्या दिवशी ११ सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन गेममध्ये हरवून सुवर्णपदक पटकावलं. कब्बडीत मुलांच्या संघाला कांस्यपदक मिळालं. ट्रॅक सायकलिंगमध्ये दोन रौप्य पदकं पटकावली. अॅथलेटिक्समध्ये दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदकं मिळाली. कुस्तीत मुलांच्या ५१ किलो फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूरच्या दोन मल्लात अंतिम लढत झाल्यानं, सुवर्ण तसंच रौप्य पदक महाराष्ट्राने पटकावलं. अन्य दोन मल्लांनी एक सुवर्ण तसंच एक कांस्य पदक तर मुलींच्या गटात एक कांस्यपदक पटकावलं. जिम्नास्टिकच्या पाच प्रकारात संयुक्ता काळे हिनं पाच सुवर्णपदकं पटकावली. औरंगाबादच्या जुळ्या बहिणी सिद्धी आणि रिद्धी हट्टेकर यांनी जिम्नॅस्टिक मध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक जिंकलं. पदकतालिकेत २४ सुवर्णपदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या, २३ सुवर्णांसह हरियाणा दुसऱ्या तर १२ सुवर्णपदकांसह मणीपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी मनपा प्रशासनाकडून आज निवडणूक प्रभाग सीमा प्रसिद्ध अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम निवडणूक कार्यालय मुख्यालय मनपा, प्रभाग समिती कार्यालय नटराज रंग मंदिर आणि प्रभाग समिती क कार्यालय कल्याण मंडप इथं होणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क कर�� शकता.
****
· विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थ��ित; नऊ विधेयकांसह अनेक ठराव मंजूर.
· केंद्राच्या तीन कृषी कायद्यांत सुधारणा करणारी तीन विधेयकं विधीमंडळासमोर सादर.
· विरोधकांनी सभागृहात घातलेला गोंधळ ही लोकशाहीची थट्टा - मुख्यमंत्र्यांची टीका.
· भारतीय जनता पक्षाची विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा.
· १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ भाजपची मराठवाड्यासह राज्यभरात निदर्शनं.
· राज्यात आठ हजार ४१८ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात पाच रुग्णांचा मृत्यू तर २९५ बाधित.
आणि
· ओबीसी आरक्षणासाठी दिल्लीत आंदोलनाचा काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचा इशारा
****
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी, तर विधान सभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी, पावसाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्याचं जाहीर करून, सदनाचं कामकाज स्थगित केलं. या अधिवेशनात दोन्ही सदनात प्रत्येकी नऊ विधेयकं संमत करण्यात आली. यामध्ये वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, सहकारी संस्था सुधारणा विधेयक, परिचारिका सुधारणा विधेयक, राजभाषा सुधारणा विधेयक, आदी विधेयकांचा समावेश आहे.
याशिवाय अनेक ठरावही या अधिवेशनात मंजूर करण्यात आले, यामध्ये मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणं, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मागवणं, २०१४ च्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांना कायम करणं तसंच वयोमर्यादेत वाढ करणं, राज्य लोकसेवा आयोगामार्फत वर्ग एक आणि दोनची १५ हजार ५१५ पदांची भरती, तसंच आयोगातल्या सदस्यांच्या रिक्त पदांची ३१ जुलैपर्यंत भरती करणं, कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश, तसंच कोविड लसीकरणासाठी केंद्राकडून लसीच्या दरमहा तीन कोटी मात्रा घेण्याबाबतच्या ठरावाचा समावेश आहे.
याशिवाय, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांत सुधारणा करून त्याबाबतची तीन विधेयकं विधीमंडळासमोर सादर करण्यात आली. या विधेयकांच्या मसुद्यात शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तीन वर्ष कारावास, शेतमालाचे पैसे सात दिवसांत न दिल्यास कारवाई, तसंच शेतमालासाठी हमीभावाची तरतूद करण्यात आली आहे. या मसुद्यावर येणाऱ्या सूचना लक्षात घेऊन विधीमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात, ही विधेयकं मंजुरीसाठी सदनासमोर मांडली जाणार आहेत.
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्यात येत असल्याचं, उपाध्यक्ष झिरवळ यांनी सांगितलं.
****
कोविड लसीच्या किमान तीन कोटी मात्रा दरमहा मिळाव्यात, असा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, विधीमंडळाच्या दोन्ही सदनात मांडला, तो एकमतानं मंजूर करण्यात आला. दरमहा तीन कोटी लस मिळाल्या, तर दररोज १० लाख ��ागरिकांचं लसीकरण करता येईल, आणि दोन महिन्यात राज्यातल्या सर्वांचं लसीकरण होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रानं देशात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक लसीकरण केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
विधान परिषदेत या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, केंद्र सरकारनं जास्तीत जास्त लसीच्या मात्रा दिल्यामुळेच, महाराष्ट्र देशभरात लसीकरणात आघाडीवर असल्याचं नमूद केलं. या प्रस्तावाला समर्थन देत असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.
अनेक सदस्यांनी या प्रस्तावावर मतं मांडली. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी, कोविड काळात काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याचे प्रकार घडल्याचं यावेळी नमूद केलं. यासाठी खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी दरपत्रक दर्शनी भागात लावणं बंधनकारक करावं, आधार कार्ड नसेल, तर कोविड लस मिळत नसल्याचं निदर्शनास येत असून, या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी बोरनारे यांनी केली.
****
२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत चर्चेविना मंजूर करण्यात आल्या. विधान परिषदेत या चर्चेदरम्यान सदस्य सुरेश धस यांनी, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा मुद्दा उपस्थित केला. दुधाला दहा रुपये लीटरमागे अनुदान देण्याची मागणीही त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, आरोग्य आदी विषयांवरही धस यांनी प्रश्न उपस्थित केलं.
****
राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्यानं, या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकांबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घ्यावा असे निर्देश दिले आहेत.
****
कोविडची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर विधान सभाध्यक्षांची निवडणूक घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. दोन दिवसांच्या अधिवेशन काळात सर्व सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी आणि अन्य दक्षतेसह अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम पूर्णपणे राबवणं शक्य नव्हतं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. बोगस लसीकरण प्रकरणी कठोर कारवाई तसंच बोगस लस घेतलेल्यांच्या रितसर लसीकरणाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. लसींचा पुरवठा वाढेल तसा लसीकरणाचा वेग वाढवता येईल, असं ते म्हणाले.
विरोधकांनी सभागृहात घातलेला गोंधळ ही लोकशाहीची थट्टा असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डेटा केंद्राकडून मागवण्याच्या मुद्यावरून, विरोधकांनी आकांडतांडव करण्याची गरज नव्हती, या मुद्यावरून विरोध करताना, आपलं निलंबन होऊ शकतं, याचंही विरोधकांना भान राहिलं नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
****
भारतीय जनता पक्षानं काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर कालिदा�� कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिरूप विधानसभा भरवली. १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ भरलेल्या या अभिरूप विधानसभेत, सरकारचा निंदाजनक ठराव संमत केल्याचं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं. मराठा तसंच ओबीसी आरक्षण, राज्य लोकसेवा उमेदवारांचे प्रश्न आणि इतर अनेक प्रश्न सुटेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असं फडणवीस यांनी नमूद केलं.
या प्रतिरूप विधानसभेतले माईक जप्त करण्याचे निर्देश विधान सभेतले तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सदनात दिले. त्यानंतर मार्शलांनी पायऱ्यांवर सुरू असलेल्या अभिरूप विधानसभेत जाऊन माईक काढून घेतले, त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र विरोधकांनी त्यानंतर माईकशिवाय ही अभिरूप विधानसभा सुरू ठेवली.
दरम्यान, केंद्र सरकारनं केलेले तीन कृषी कायदे फेटाळण्याऐवजी, काही किरकोळ सुधारणा करून स्वीकारण्याची भूमिका राज्य सरकारने मांडली, याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. या कायद्यांवरून गेले अनेक दिवस सुरू असलेली अडवणूक चुकीची होती, हेच यावरून स्पष्ट होतं, असं ते म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केल्याच्या निषेधार्थ, भाजपच्या वतीनं काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नागपूरात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात झालेल्या आंदोलनात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कारवाईचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. भगवान घडामोडे, विजय औताडे, समीर राजूरकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
परभणी इथं भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जिल्ह्यात सेलू, पूर्णा, जिंतूर, गंगाखेड, पाथरी इथंही या कारवाईचा निषेध करत, आंदोलन करण्यात आलं.
उस्मानाबाद इथं भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारा आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करत असतांना, पोलीस प्रशासनानं हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला.
नांदेड इथंही भाजप समर्थकांनी महाविकास आघाडी सरकार विरूद्ध घोषणा देऊन या कारवाईचा निषेध नोंदवला. या निलंबनाबाबत निषेध व्यक्त करणारं एक निवेदन, भाजपचे महानगर अध्यक्ष प्रविण साले यांनी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सादर केलं.
राज्यात धुळे, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, सोलापूर या ठिकाणीही या निलंबनाचा निषेध करण्यात आला.
****
राज्यात काल आठ हजार ४१८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख १३ हजार ३३५ झाली आहे. काल १७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २३ हजार ५३१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक दशांश टक्के झाला आहे. काल १० हजार ५४८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख ७२ हजार २६८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक सहा दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १४ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल २९५ कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद, लातूर, आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १३२ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ७५, औरंगाबाद ४३, लातूर १४, जालना ११, परभणी १०, नांदेड नऊ तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला नवा एक रुग्ण आढळला.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं २०२१-२२ या शैक्षणिक सत्राला, दोन सत्रात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक सत्रात जवळपास ५० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश असेल. प्रत्येक सत्राच्या शेवटी मंडळ या विभाजित अभ्यासक्रमावर परीक्षा घेईल. पहिल्या सत्रातली परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये, तर दुसऱ्या सत्रातली परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ घेतली जाणार आहे.
****
ओबीसींच्या समस्यांबाबत काँग्रेस आक्रमक होणार असल्याचं, काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सांगितलं आहे. हिंगोली जिल्ह्यात ओबीसी संवाद यात्रेत काल आखाडा बाळापूर इथं, बाजार समितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपने जाणीवपूर्वक ओबीसींचं आरक्षण रद्द करण्याचा कट रचल्याचा आरोप माळी यांनी केला. केंद्र सरकारने तीन महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाला सर्व माहिती पुरवावी, किंवा जातीनिहाय जनगणना करावी, असं न केल्यास ओबीसी सेलच्या वतीनं दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा माळी यांनी दिला. या सर्व प्रकियेस विलंब झाला, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष ओबीसींसाठी पक्षांतर्गत आरक्षण देऊन ओबीसींवरचा अन्याय दूर करेल, अशी ग्वाही माळी यांनी दिली.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल वीज देयकांच्या तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी परभणी इथं अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात भाकरी खात ठिय्या आंदोलन केलं. आठवडाभरापूर्वी वीज देयकांबाबत तक्रार करूनही कार्यवाही न झाल्यानं, हे आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, थकीत वीजबिल तातडीने माफ करावे, या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंदील आंदोलन केलं.
****
राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रलंबित परीक्षा, तसंच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तत्काळ पूर्ण करावी अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तुळजापूर शहर मंत्री सौरभ कदम यांनी दिला आहे. एमपीएससी उमेदवार स्वप्निल लोणकर यांना काल तुळजापूर इथं अभाविपच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यावेळी कदम बोलत होते.
****
सर्वसामान्य शेतकऱ्यांना पीक ��िमा भरण्यासाठी जादा वेळ मिळावा या दृष्टीने परभणी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र तसंच सीएससी केंद्रं रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे. पीक विमा भरण्याकरता कमी कालावधी शिल्लक राहिला आहे, तरी पीक विमा भरण्यापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी गर्दी टाळून पीक विमा भरण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात जातीवाचक नावं असलेली गावं, रस्ते, चौक, वाड्या वस्त्यांची पाहणी करून ही नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या विभागातल्या वस्त्या, रस्ते तसंच चौकांची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यातल्या तरतुदींची कठोरपणे अंमलबजावणी करून तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना, औरंगाबादच्या पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिल्या आहेत. पोलिस आयुक्तालयात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक मकवाना यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
औरंगाबाद शहरात बंदला अल्प प्रतिसाद दिसून येत आहे, मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. लाडसावंगी इथं सर्वच व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली आहेत. पैठण शहरात औषधी दुकानं वगळता इतर सर्व व्यापार बंद आहेत. सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. वैजापूर तालुक्यात मात्र व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
उस्मानाबाद मध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहरातली सर्व दुकानं कडकडीत बंद असून, शाळा महाविद्यालयं तसंच एसटी महामंडळाची वाहतूक सुरळीत सुरू आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आज सकाळी चेन्नई-अहमदाबाद ही रेल्वेगाडी रोखून आंदोलन केलं.
मुंबईच्या काही भागात उस्फुर्त बंद पाळण्यात येत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या पाचही मार्केटमध्ये कृषी मालाची आवक आणि खरेदी विक्री बंद आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राळेगण सिद्धी इथं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बंदला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे.
धुळे तालुक्यातल्या कापडणे-देवभाने चौफुली इथं शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको करत चक्काजाम आंदोलन केलं. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांना तसंच कार्यकर्त्यांना, पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला.
यवतमाळ मध्ये भारत बंद ला जोरदार प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. सातारा जिल्ह्यातल्या बाजारपेठा पूर्णपणे बंद असून, किरकोळ स्वरूपात खाजगी वाहतूक सुर��� आहे. रायगड जिल्ह्यातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
अकोला इथं महाविकास आघाडीच्या वतीनं कृषी विधेयकाच्या प्रतीचं दहन करण्यात आलं, तसंच शहरात रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करण्यात आलं. रत्नागिरी आणि भंडारा जिल्ह्यात मात्र बंदला प्रतिसाद मिळाला नाही.
****
या ‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह अनेक राजकीय पक्ष तसंच शेतकरी संघटना बंद मध्ये सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बॅंक कर्मचारी महासंघ, तसंच औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघ बंद पाळत आहे.
तर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, अखिल भारतीय व्यापारी महासंघ तसंच अखिल भारतीय वाहतुकदार संघटना, आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघही या बंदमध्ये सहभागी झाले नाही.
****
दरम्यान, या सुधारित कृषी कायद्याबद्दल विरोधी पक्ष शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. या मुद्यावर केवळ राजकारण सुरु असल्याचं ते आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
****
देशात काल दिवसभरात २६ हजार ५६७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९७ लाख तीन हजार ७७० झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४० हजार ९५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३९ हजार ४५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९१ लाख ७८ हजार ९४६ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ८३ हजार ८६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दहा लाख २६ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत जवळपास १४ कोटी ८८ लाख चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
मानवी तस्करीला अधिक प्रभावीपणे आळा घालता यावा, यासाठी राज्यातल्या मानवी तस्करी विरोधी केंद्रांची संख्या वाढवून ती ३४ वे नेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यात सध्या १२ मानवी तस्करी विरोधी केंद्र कार्यरत असून, सुरु होणाऱ्या नवीन केंद्रांपैकी आठ केंद्र विदर्भात असतील. या नवीन केंद्रांसाठी एकूण २७५ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचं सरकारनं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. देशभर नोंदवल्या गेलेल्या मानवी तस्करीच्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वात जास्त गुन्हे महाराष्ट्रातले असून, मानवी तस्करीला बळी पडणाऱ्यांची सुटका करण्यात देखील महाराष्ट्र प्रथम स्थानी असल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेनं म्हटलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सिडनी इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** औरंगाबादमध्ये आयोजित अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०चं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन ** राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर; उद्योग मंत्री सुभाष देसाई - औरंगाबाद, परभणी -नवाब मलिक, हिंगोली -वर्षा गायकवाड तर उस्मानाबादचे - शंकरराव गडाख पालकमंत्री ** राज्यात सहापैकी नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला तर धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत; वाशिम, अकोला, पालघर आणि नंदुरबार त्रिशंकू ** आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र र��ाना करून जनगणना करण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर आणि ** कामगार संघटनांच्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद **** औरंगाबाद इथं आजपासून सुरु होणाऱ्या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०, या औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरात, कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर आयोजित या प्रदर्शनात मराठवाड्याबरोबरच राज्य आणि परराज्यातले, चारशे चव्वेचाळीस उद्योग आपापली उत्पादनं प्रदर्शित करणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा समारोप येत्या रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच औरंगाबाद दौरा असल्यानं, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार आहे. दोन दिवसीय दौर्यात मुख्यमंत्री, मराठवाड्यातल्या औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातल्या अनुशेषांसह शेतकरी पीक कर्ज, शिवभोजन योजना, आरोग्य योजना, पीकविम्याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. **** राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावं काल जाहीर करण्यात आली. उद्योग मंत्री सुभाष देसाई औरंगाबादचे पालकमंत्री असतील. जालना - राजेश टोपे, बीड - धनंजय मुंडे, परभणी नवाब मलिक, हिंगोली वर्षा गायकवाड, नांदेड - अशोक चव्हाण, उस्मानाबाद - शंकरराव गडाख तर लातूरचं पालकमंत्रीपद अमित देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांच्याकडे धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ***** राज्यात झालेल्या सहा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीची काल मतमोजणी करण्यात आली. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला तर धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. वाशिम, अकोला, पालघर आणि नंदुरबार जिल्हा परिषदांमध्ये मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकूण ५२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं १२, काँग्रेस नऊ, शिवसेना सहा, तर भाजपनं सात जागा जिंकल्या. अकोला जिल्हा परिषदेतत भारिप बहुज महासंघाला २२, शिवसेनेा १३, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजपला प्रत्येकी सात जागा मिळाल्या. पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेनं अठरा, राष्ट्रवादी काँग्रेसनं चौदा, काँग्रेसनं एक, तर भाजपानं बारा जागा जिंकल्या तर इतर बारा उमेदवार निवडून आले. नंदुरबार इथं भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना प्रत्येकी २३ जागा तर शिवसेनेला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा जिंकता आल्या. दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या चार पंचायत समितीच्या एकूण ११२ गणांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक ७१, काँग्रेसनं १७, शिवसेनेनं १०, राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा, तर आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. पालघर जिल्ह्यातल्या आठ पंचायत समितीसाठीच्या ११४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४७, भाजपला २१, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला १२, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २०, मनसेला दोन, बहुजन विकास आघाडीला सात जागांवर आणि पाच अपक्ष उमेदवारांना विजय मिळवण्यात यश आलं आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड झाली आहे. काल झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे यांना ३०, तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या अंजली शेरखाने यांना २३ मतं मिळाली. शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्यानं, अध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झाल्या. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनिषा पवार, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल बुधवत यांची निवड झाली. **** लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती - जमातीला तसंच अँग्लो इंडियन समाजाला नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व देण्याच्या निर्णयाला पुढील दहा वर्ष मुदतवाढ देण्यास, राज्य विधीमंडळानं मान्यता दिली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या या संविधानातल्या कलम १२६च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यासाठी काल विधीमंडळाचं विशेष अधिवेशन झालं. हे विधेयक समाजातल्या सर्व स्तरांना समान संधी देणारं असून, सामाजिक न्यायाचा भक्कम पाया असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाच्या अनुमोदनाचा प्रस्ताव मांडताना सांगितलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. विधानपरिषदेतही मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधेयकाच्या समर्थनात आपले विचार मांडले. याचवेळी आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र रकाना करून जनगणना करण्याचा ठरावही आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. **** समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचं अनुसरण करत समाजातल्या वंचित घटकांचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. राज्य विधीमंडळाच्या कालच्या विशेष अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. अनुसूचित जाती - जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला आणि तळागाळातल्या घटकांच्या कल्याणासाठी योजना आणि कार्यक्रमांची तत्परतेनं अंमलबजावणी केली जाईल, असं राज्यपाल म्हणाले. महिलांसंदर्भातल्या गुन्ह्यांबाबत त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात येईल, त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक ती सुधारणा देखील केली जाईल, असं आश्वासनही राज्यपालांनी यावेळी दिलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** कामगार संघटनांनी काल पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. या संघटनांनी क्रांती चौक इथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. या बंदच्या अनुषंगानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरच्या गोळेगाव इथं या ��ंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतुक खोळंबली होती. लातूर जिल्ह्यात शासकीय कर्मचारी, राष्ट्रीयकृत बॅंकेतील कर्मचारी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले. आंदोलकांनी लातूर शहरातल्या प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढला. जिल्ह्यातही तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथ सरकारी कार्यालयांसह खाजगी उद्योग-व्यवसाय तसंच, बँकांमध्ये संपाचा संमिश्र परिणाम दिसून आला. नांदेड जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परभणी जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या बॅंक, वीजवितरण, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामरोजगार सेवक, आदी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघानंही आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काल मोर्चा काढला होता. जालना जिल्ह्यातही कालच्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद इथली संत गोरोबाकाका साहित्य नगरी सज्ज झाली आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या संमेलनाला ग्रंथदिंडीनं प्रारंभ होणार आहे. या संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे उस्मानाबादचे वार्ताहर १० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दिवशी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री ना धो महानोर यांच्या हस्ते आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे . या साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी ११ जानेवारीला चार वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन तर १२ जानेवारीला कथा लेखकांशी संवाद, परिसंवाद, परिचर्चा, बालकुमार मेळावा, उस्मानाबाद जिल्ह्यातले जेष्ठ कथालेखक प्राध्यापक भास्कर चंदनशिव ,दिल्ली येथील मराठीभाषक हिंदी लेखक लक्ष्मण नथुजी शिरभाते , तसंच श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाच्या श्रीमती सुमती लांडे यांचा सत्कार आणि साहित्य संमेलनाचा समारोप प्राचार्य रा रं बोराडे यांच्या उपस्थितीत होत आहे . **** नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातही काल अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. औरंगाबाद इथं काल बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीविरोधात मोर्चा काढण्यात आला. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही काल धरणे आंदोलन करण्यात आलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर संघटना आणि ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार ** शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या स्थापनेची घोषणा ** सरकार कोणाशीही सुडबुद्धीनं वागणार नाही- उद्धव ठाकरे ** सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा आणि ** देशभरात संविधान दिन उत्साहात साजरा **** राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या २८ नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रे��� या तीन पक्षाच्या आमदारांची काल सायंकाळी मुंबईत बैठक झाली, या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीतले इतर घटकपक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लोकभारती आणि अपक्ष यांची महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. आघाडीमध्ये समन्वयासाठी एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं या��ेळी जाहीर करण्यात आलं. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, दुर्लक्षित घटकांच्या समस्या, यासारख्या मुद्यांवर काम करण्यासाठी आघाडीची समन्वय समिती स्थापन करणार असल्याचं किमान समान कार्यक्रमात नमूद करण्यात आलं आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्याचा ठराव मांडला, या ठरावाला तिन्ही पक्षांनी अनुमोदन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. सगळ्यांच्या संमतीनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. आपलं सरकार कोणाशीही सुडबुद्धीनं वागणार नाही, असं सांगत त्यांनी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन वेगळ्या विाचरधारेचे पक्ष एकमेकांवर विश्वास ठेऊन देशाला वेगळी दिशा देत असल्याचं सांगितलं. गेले ३० वर्ष ज्या पक्षासोबत राहीलो त्यांनी नाही, तर ज्यांच्यावर टीका केली त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असंही ठाकरे यांनी नमूद केलं. या बैठकीनंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, महाराष्ट्र विकास आघाडीला १६६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्रही त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सोपवलं. त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आणि ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. **** तत्पूर्वी, काल सकाळी सर्वोच्च न्यायालयानं फडणवीस यांना आज बुधवार सायंकाळपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, या याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याच्या राजकारणात काल वेगानं घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. वैयक्तिक कारणावरून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं, असं राज्यपालांनी फडणवीस यांना सांगितलं. त्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी, राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे आपल्याकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ राहिलेलं नाही, इतर पक्षांचे आमदार फोडण्याची किंवा घोडेबाजार करण्याची आपल्या पक्षाची भूमिका नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. अवघ्या चार दिवसात फडणवीस सरकार कोसळल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी फडणवीस यांचा राजीनामा हा राज्यातल्या अकरा कोटी ना��रिकांचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. **** दरम्यान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांनी काल सायंकाळी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. कोळंबकर आज विधानसभेच्या उर्वरित दोनशे सत्त्याऐंशी नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील. सकाळी आठ वाजेपासून विधानसभेच्या या सत्राला प्रारंभ होईल. **** काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. काल मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. **** २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काल अकरा वर्ष झाली. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेले पोलिस, सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुंबई पोलिस जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजॉय मेहता, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होत, आदरांजली अर्पण केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संसदेनं संविधान स्वीकारण्याला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहांची काल संयुक्त सभा घेण्यात आली. या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, संविधानानं दिलेल्या हक्कांचा वापर करण्यासोबतच संविधानानं नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तव्य पालनातूनच हक्कांची सुरक्षा शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिट जारी करण्यात आलं. दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संयुक्त सभेवर बहिष्कार टाकत, संसद भवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ निदर्शनं केली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष तसंच द्रविड मुनेत्र कळघमच्या खासदारांचा समावेश होता. **** ७० वा संविधान दिन राज्यातही विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. औरंगाबाद इथं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महात्म�� फुले सभागृहात संविधानातल्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन केलं. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं संविधान जनजागृतीपर दुचाकी फेरी काढण्यात आली. जालना नगरपालिका आणि संविधान बचाव कृती समितीच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. परभणी महानगर पालिकेच्या महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे यांनी महापालिकेतले पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संविधानाची शपथ दिली. जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू, पालम, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला. लातूर इथं तिरंगा फेरी काढून संविधान दिन साजरा झाला. संविधानदिनानिमित्त ठिकठिकाणी व्याख्यान तसंच माहितीपर अन्य कार्यक्रमही घेण्यात आले. याशिवाय राज्यभरात अनेक शाळा महाविद्यालयांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही करण्यात आलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केलं. भारत हा सार्वभौम लोकशाही असणारे गणराज्य असून इथली शांतता आणि बंधुतेच्या वातावरणात सर्व धर्म शांततेने नांदत आहेत असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी केलं. नांदेड शहरात संविधान जागर यात्रा काढण्यात आली होती. जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन, संविधान आणि त्यासंबंधीत साहित्य, ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातल्या सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर आणि नांदेडच्या विभागीय रेल्वे कार्यालयातही संविधान दिन साजरा करण्यात आला. **** औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, राज्य किसान आंदोलन - स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं काल संविधान दिन हा कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हणून पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर कष्टकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. माथाडी कायद्याची काटेकोर अंमबलबजावणी करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावं, शेतीमालास खर्चाचे दीडपट हमी भाव द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा ** घटक पक्षांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची आज बैठक ** सत्तास्थापनेच्या नाट्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा आरोप ** औरंगाबाद इथं आजपासून तीन दिवसीय जागतिक धम्म परिषद आणि ** औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला प्रारंभ **** राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काल रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीत दोन दिवस विविध बैठकांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती पवार यांनी ठाकरे यांना दिली. खासदार संजय राऊत आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये गेल्या आठवडाभर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. या बैठकीत पूर्ण एकमत झालं असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. आज मुंबईत काँग्रेस आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असून, त्यांना आतापर्यंतच्या चर्चेची माहिती दिली जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. या चर्चेनंतर शिवसेनेशी संयुक्त चर्चा केली जाईल आणि ती बोलणी पूर्ण झाल्यानंतरच सरकार स्थापनेसंदर्भात जे निश्चित होईल, त्याचा तपशील जाहीर केला जाईल, असंही ते म्हणाले. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीनं काल राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास संमती दिली. नवी दिल्लीत काल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याआधी झालेल्या चर्चेची माहिती कार्यसमितीला दिल्याचं पक्षाचे नेते के के वेणुगोपाल यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. **** राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. हे षडयंत्र जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून रोज प्रादेशिक, राजकीय तसंच भावनात्मक चर्चा आणि विवाद सर्वत्र केला जात आहे, असं ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या धर्तीवर राज्याचं त्रिभाजन, मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करून उरलेल्या महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याची चिन्ह दिसत आहेत, शिवसेनेला नामशेष करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या खेळामध्ये आपापला अथवा परस्पर हिताचा कार्यभाग साधून घेतील, हा या षडयंत्राचा भाग आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. **** भाजपनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार होत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचं स्वागतच करेल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते. किमान समान कार्यक्रम बघून सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही हे जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं. **** राज्यातल्या साखर कारखान्यांचा आजपासून गळित हंगाम सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गाळप सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र रास्त हमीभाव न दिल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या तेवीस साखर कारखान्यांचे परवाने स्थगित करण्यात आले आहेत. गाळप परवान्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी नव्व्याण्णव कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयानं आतापर्यंत परवानगी दिली आहे. **** अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची आजपासून केंद्र सरकारचं पथक पाहणी करणार आहे. औरंगाबादसह नागपूर आणि अमरावती या महसूल विभागात झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करील. केंद्रातले अतिरिक्त सचिव डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. के मनोहरन हे आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या १६ गावांना भेट देणार आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आज सकाळी या पथकासमोर विभागातल्या नुकसानीचं सादरीकरण करणार आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** औरंगाबाद इथं जागतिक धम्म परिषदेचं आज संध्याकाळी सहा वाजता बौध्द धर्म गुरू दलाई लामा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय भिक्खु संघाच्यावतीनं शहरातल्या मिलिंद महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात ही धम्म परिषद होणार आहे. श्रीलंकेचे महानायका महाथेरो यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागातून वीस जादा शहर बस सोडण्यात आल्या आहेत. **** औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं काल प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी राज्यात सरकार स्थापन होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. औरंगाबाद शहरात कलावंत घडवणाऱ्या संत एकनाथ रंगमंदिराचं लवकरात लवकर नूतनीकरण व्हावं, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अभिनेते शंतनू गंगणे, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी युवक महोत्सवाच्या निमित्तानं विद्यापीठ परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. समाजातल्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी देखावे सादर केले होते. **** औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचा स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार उदगीरचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटीया यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.बी वराडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात करण्यात आला. शाल, स्मृती चिन्ह आणि २५ हजार रूपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे. देशाला मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन लखोटीया यांनी पुरस्काराला उत्तर देतांना केलं. **** परभणी आणि लातूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. परभणी महापौरपदाची निवडणूक आज सकाळी ११ वाजता होणार आहे. यासाठी पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेतली जाईल. परभणीत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु आहे. लातूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. **** ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौर पदी पल्लवी कदम यांची काल बिनविरोध निवड झाली. **** खराब हवामानामुळे यंदा ऊसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं राज्यात साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचं काल महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी औरंगाबाद इथं सांगितलं. मात्र, साखरेचा पुरेसा साठा असल्यामुळे देशात साखरेच्या किमती वाढणार नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली. **** शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी काल लातूर जिल्ह्यात लातूर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, औसा, चाकूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. राज्यपालांनी जाहीर केलेला निधी शेतकऱ्यांचा खात्यावर जमा होईल, त्यामधून कुठल्या प्रकारच्या कर्जाची वसुली होणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. **** जागतिक वारसा सप्ताह आणि महाराष्ट्र शासनाचा पुरातत्त्व विभाग संचलित तेर इथल्या रामलिंग आप्पा लामतुरे पुराण वस्तुसंग्र���ालयाला ५१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कालपासून तगर महोत्सव सुरू झाला. यानिमित्त काल तेर इथ वारसा फेरी काढण्यात आली. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर - तगर महोत्सवाच्या निमित्ताने तगर परिसरात आढळलेल्या हस्तिदंती बाहुली तगर लक्ष्मीच आणि ते परिसरातल्या चित्र आणि वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालं दोन दिवस चालणाऱ्या या हस्तिदंती बाहुली आणि विविध वस्तू प्रदर्शनात तेर परिसरात आधारलेली सातवाहनकालीन नाणी पाण्यावर तरंगणारी वीट विविध शिलालेख संसारोपयोगी वस्तू देवदेवतांच्या मूर्ती आदि सह तेर आणि रोमन साम्राज्याशी असणारे व्यापारी संबंध पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या विविध वस्तू चित्र असणार आहेत. **** बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईच्या मानवलोक संस्थेचे प्रमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अंबाजोगाई इथं हवामान बदल: समस्या आणि उपाय, शेतीत करावयाच्या सुधारणा या विषयावर आज आणि उद्या राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे. या परिषदेचं उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या ब्राम्हणगाव इथं काल नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतामध्ये स्वयंचलित यंत्राद्वारे हरभरा बियांची पेरणी आणि बीज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी प्रल्कप विषेश तज्ञ दिपक विभूते यांनी पोकरा या योजनेबद्दल माहिती दिली. तसंच समूह सहाय्यक सय्यद जिशान अली यांनी बीज प्रक्रियेबद्दल माहिती दिली. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****
· राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत; भाजपला १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ तर काँग्रेसला ४४ जागा. वंचित बहुजन आघाडीला एकही जागा नाही.
· सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील विजयी, उदयन राजे भोसले यांचा पराभव
· विद्यमान सात मंत्री निवडणूक हरले; भाजपच्या पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे, तर शिवसनेचे जयदत्त क्षीरसागर आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश.
· भारतीय जनता पक्षाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून अभिनंदन.
आणि
· दिवाळीच्या सणाला आजपासून सुरुवात.
****
राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकूण २८८ जागांपैकी भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ अशा एकूण १६१ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ जागांमध्ये वाढ झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला तीन, एमआयएम, प्रहार जनशक्ती पार्टी आणि समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जनसूर्या शक्ती, क्रांतीकारी शेतकरी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळाली आहे. अपक्ष १३ जागांवर निवडून आले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाली नाही.
सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत पक्षांतर करुन भारतीय जनता पक्षात गेलेले उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील यांनी ८५ हजार ८६९ मतांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला.
भाजपच्या विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बबनराव लोणीकर, विजयकुमार गावित, डॉ.अशोक उईके, संभाजी पाटील निलंगेकर, काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नाना पटोले, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विश्वजित कदम, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा समावेश आहे.
****
मावळत्या सरकारमधले सात मंत्री पराभूत झाले. यामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे, बाळा भेगडे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. परिणय फुके, तर शिवसनेचे जयदत्त क्षीरसागर, विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. पक्षांतर करून आलेल्या १७ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये हर्षवर्धन पाटील, जयदत्त क्षीरसागर, वैभव पिचड, निर्मला गावित, दिलीप सोपल, दिलीप माने, भाऊसाहेब कांबळे, गोपीचंद पडळकर, आणि उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे.
पक्षांतरानंतर विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, भास्कर जाधव, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, नितेश राणे, राणा जगजीतसिंह पाटील, गणेश नाईक, नमिता मुंदडा आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.
****
मराठवाड्यातल्या एकूण ४६ विधानसभा मतदारसंघातून भाजपनं १६, शिवसेनेनं १३, काँग्रेसनं ११, राष्ट्रवादी काँग्रेसनं चार, तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला.
औरंगाबाद मध्यल्या नऊ विधानसभा मतदार संघापैकी सहा मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीच्या विद्यमान आमदारांना जनतेनं पुन्हा संधी दिली आहे.
सिल्लोड, पैठण, वैजापूर, कन्नड, औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम या सहा मतदार संघातून शिवसेनेचे अनुक्रमे अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, रमेश बोरणारे, उदयसिंग राजपूत, प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट विजयी झाले. फुलंब्री, गंगापूर आणि औरंगाबाद पूर्व मतदार संघातून भाजपचे अनुक्रमे हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आणि अतुल सावे विजयी झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघात भाजपनं तीन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला.
जालना मतदारसंघातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जून खोतकर यांचा २४ हजारांवर मतांनी पराभव केला. भोकरदन मधून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे, परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर, बदनापूर मधून भाजपचे नारायण कुचे आणि घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांनी विजय मिळवला.
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघापैकी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला. लातूर शहरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख, अहमदपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा मधून भाजपचे अरविंद भातांबरे आणि औसा मतदार संघातून भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत.
लातूर ग्रामीण मतदारसंघात ‘नोटा’ अर्थात ‘वरीलपैकी कोणी नाही’ या पर्यायाला राज्यात सर्वाधिक २७ हजार ३२७ मतं मिळाली आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात रा��्ट्रवादी काँग्रेसनं चार, तर भाजपनं दोन जागांवर विजय मिळवला. बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर या दोन विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
परळीत भाऊ धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंचा पराभव केलाय. तर बीडमध्ये पुतण्या संदीप क्षीरसागरने काका जयदत्त क्षीरसागरांना अस्मान दाखवले. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब अजबे, माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच प्रकाश सोळंके यांचा विजय झालाय. तर केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा निवडून आल्या आहेत. तर गेवराईत लक्ष्मण पवार यांचा निसटता विजय आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशी केवडकर, बीड.
परभणी जिल्ह्यातल्या चार मतदार संघापैकी परभणीतून शिवसेनेचे डॉ.राहुल पाटील, गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, पाथरीतून कॉंग्रेसचे सुरेश वरपुडकर तर जिंतूर मतदार संघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या.
हिंगोली जिल्ह्यात दोन विद्यमान आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघापैकी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम –
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ.संतोष तारफे यांचा दारूण पराभव झाला असून, शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजु नवघरे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा यांना केवळ ४० हजार ९७१ मते पडली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात चार जागा काँग्रेस पक्षानं जिंकल्या असून, भाजपनं तीन तर शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. भोकरमधून कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, हदगावमधून कॉंग्रेसचे माधवराव पवार, नांदेड दक्षिण मधून काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे, देगलूरमधून काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर, नायगावमधून भाजपचे राजेश पवार, मुखेडमधून भाजपचे तुषार राठोड, किनवट मधून भाजपचे भीमराव केराम, लोहा मधून शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे आणि नांदेड उत्तर विधान���भा मतदार संघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विजयी झाले.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यातल्या तीन ठिकाणी शिवसेना, तर एका ठिकाणी भाजपचे उमेदवारांनी विजय मिळवला. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल पाच वेळा विजयी झालेले राज्याचे ज्येष्ठ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीत निवडणुकीपूर्वी प्रवेश केलेल्या राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी पराभूत केलं आहे. तर परांड्यात जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांनी राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांना पराभूत केलंय. तर उस्मानाबादेत शिवसेनेच्या कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय निंबाळकरांचा पराभव केला आहे.
देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
हरियाणा विधानसभेचे निकालही काल जाहीर झाले. नव्वद जागांच्या या विधानसभेत भाजप चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर काँग्रेसनं ३१ जागांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे.
या दोन्ही राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काल नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात काल झालेल्या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप शिवसेना महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.
सत्तेचा उन्माद आलेल्या लोकांना जनतेनं जागा दाखवली, हेच निवडणूक निकालातून समोर आलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांना जनतेने स्वीकारलं नाही, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात महायुतीच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्यामुळे विरोधी पक्षाच्या काही जागा वाढल्या असल्या तरी, प्रबळ विरोधी पक्ष होईल, इतक्या जागा वाढल्या नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
हा जनादेश सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणारा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं ठाकरे म्हणाले.
****
दिवाळीला आजपासून सुरुवात होत आहे. सवत्स धेनू अर्थात गाय गोऱ्ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण वसुबारस आणि आरोग्य देवता धन्वंतरी पूजनाचा सण धनत्रयोदशी आज साजरे होत आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गृह सजावट, कपडे, फराळाचे जिन्नस तसंच फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत काल गर्दी दिसून आली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -१२ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग; सभा आणि प्रचारफेऱ्यांतून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मतदार जागृतीसाठी प्रशासनाकडून विविध उपक्रमांचं आयोजन मोबाईल एसएमएस द्वारे प्रचार प्रकरणी परभणीतले कॉंग्रेस उमेदवार रविराज देशमुख यांना नोटीस आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताच्या पहिल्या डावात सहाशे एक धावा **** राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय तसंच राज्याचे मंत्री सभा, प्रचारफेऱ्या, वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यात दौंड इथं महाआघाडीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. भाजप सरकारच्या कार्यकाळात काहीही गैरव्यवहार झाले नसतील, तर काही विद्यमान मंत्र्यांना यंदा उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न पवार यांनी विचारला. शेतमालाला हमीभाव, कृषीकर्ज माफी, अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं सभा घेतली. कलम ३७०च्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतानाच, केंद्रात तसंच राज्यात युती सरकारनं केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. शहा यांची काल बुलडाणा जिल्ह्यात चिखली आणि अमरावती जिल्ह्यात धारणी इथंही प्रचार सभा झाली. भाजप शिवसेना महायुती देशासाठी काम करते, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आपापल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी काम करत असल्याची टीका त्यांनी चिखली इथल्या सभेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काल अहमदनगर जिल्ह्यात जाहीर सभा झाल्या. आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांतल्या कामाशी तुलना करत, आघाडीच्या कामांवर टीका केली. ठाणे इथं झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी, या निवडणुकीत चुरस राहिली नसून, विरोधकांमध्ये सत्तेवर ��ेण्याऐवजी, विरोधी पक्षांमध्ये कसं यायचं याचा विचार सुरु असल्याचं सांगितलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही अमरावती इथं जाहीर सभा झाली. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्ज मुक्ती दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. शेतीला कुंपण आणि कर्जमुक्ती हे शिवसेनेच्या वचननाम्यातले प्रमुख मुद्दे असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत भांडुप आणि घाटकोपर इथं प्रचार सभा घेतली. मुंबईतली कंत्राटं, रस्त्यांची अवस्था, बुलेट ट्रेन, आरे वसाहतीतली वृक्षतोड आदी मुद्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत, गेल्या पाच वर्षात काय केलं याचा जाब सरकारला कोण विचारणार असा प्रश्न केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यातल्या महायुतीच्या तीन उमेदवारांसाठी काल नायगाव आणि मुखेड इथं सभा घेतल्या. नायगाव, भोकर मतदारसंघातल्या रस्त्यांची बकाल अवस्था होण्यास काँग्रेसचे नेते वसंतराव चव्हाण आणि अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुंडे यांनी काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या नांदगाव, भारज आणि लिंबगाव या गावात जाऊन मतदारांशी संवाद साधला. उस्मानाबाद जिल्ह्यातले परंडा मतदारसंघातलेप महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी काल भूम तालुक्यात अंभी दंडेगाव आरेवाडी या गावात प्रचार सभा घेतल्या. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी काल इटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, याठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी काल शहरातून प्रचार रॅली काढली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य संगीता खाडे यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोघांचं पक्षात स्वागत केलं. शिरोळ विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पाटील-य��्रावकर यांना पाठिंबा दिला आहे. तर सिटू प्रणित लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. **** दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात राज्यात नऊ प्रचार सभा घेणार आहेत. १३ ऑक्टोबरला जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यात साकोली इथं, १६ ऑक्टोबरला अकोला, परतूर, पनवेल इथं तर १७ ऑक्टोबरला परळी इथं मोदींची सभा होईल. पंतप्रधानांच्या या प्रचार दौऱ्यातली शेवटची सभा मुंबईत १८ ऑक्टोबरला होणार आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची आज जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि औरंगाबाद जिल्ह्यात चिकलठाणा इथं सभा होणार आहे. बहुजन समाज पक्षानं विधानसभा निवडणुकीत राज्यात २६४ मतदारसंघात उमेदवार उभे केले असून, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची परवा सोमवारी १४ ऑक्टोबरला नागपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज देवणी इथं, उदगीर मतदारसंघातले महाआघाडीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उदगीर इथं, तर लातूर शहर मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजा मणियार यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची आज सभा होणार आहेत. दरम्यान, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला. **** पंतप्रधान मोठ मोठ्या घोषणा करत असले तरी, प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे उमेदवार सलीम कुरैशी यांच्या प्रचारार्थ त्यांची काल औरंगाबाद इथं जाहीर सभा झाली. तत्पूर्वी वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी आपली लढाई भाजपसोबत असल्याचं सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मतदार जागृती अभियानांतर्गत प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. विदर्भात पेंच अर्थात रामटेक वन परिक्षेत्रातल्या रिसॉर्टमध्ये मतदारांना निवास आणि भोजनात १० ते २५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी ही माहिती दिली. २१ ऑक्टोबरला मतदार झाल्यानंतर पुढचे १५ दिवस ही सवलत राहणार आहे, यासाठी मतदारांना मतदानाचा पुरावा म्हणून, शाई लावलेलं बोट दाखवणं आवश्यक आहे. औरंगाबाद इथं आज ‘रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी’चं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद निवडणूक यूथ आयकॉन आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष दूत नवेली देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित असतील. शहरातल्या क्रांती चौकातून ‘रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी’ला संध्याकाळी सात वाजता सुरूवात होणार आहे. **** विधानसभा निवडणूक निर्भय, नि:पक्ष, पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी दिल्या आहेत. कुमार यांनी काल मराठवाड्यातल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेनं जनजागृतीवर भर द्यावा, असं त्यांनी सांगितलं. **** राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष राज्यात पाच ठिकाणी माध्यम केंद्र सुरू करणार आहे. यात दोन केंद्र मुंबईत, तर नागपूर पुणे आणि औरंगाबाद इथं प्रत्येकी एक केंद्र असणार आहे. **** गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी मतदार संघातले अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम यांचं अपहरण करुन त्यांना रात्रभर बसवून ठेवल्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह १३ जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ताडाम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. **** परभणी मतदार संघातले कॉंग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांनी मोबाईलद्वारे एसएमएस करून प्रचार केल्याचं निष्पन्न झालं आहे. परवानगी न घेता, परस्पर मोबाईलद्वारे एसएमएस पाठवून प्रचार केल्या प्रकरणी खुलासा करावा, अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे यांनी देशमुख यांना बजावली आहे. तत्काळ खुलासा न केल्यास, लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करण्यात येईल असा इशाराही या नोटीसमूधन देण्यात आला आहे **** दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी किक्रेट सामन्यात भारतानं कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद द्विशतकाच्या बळावर पाच बाद सहाशे एक धावांवर आपला पहिला डाव काल घोषित केला. विराट कोहलीनं दोनशे चोपन्न धावा केल्या. त्याचं हे कारकिर्दीतलं सातवं द्विशतक आहे. कालचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या तीन बाद छत्तीस धावा झाल्या होत्या. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरूद्धचा दुसरा एकदिवसीय सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला. या विजयाबरोबरच भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. ***** ***
0 notes