#निलेश राणे
Explore tagged Tumblr posts
Text
Kudal Election Result 2024 LIVE Updates: कुदाल सीट पर दांव पर राणे परिवार की साख, क्या निलेश को मिलेगी जीत
कुदाल विधानसभा सीट महाराष्ट्र की चर्चित सीटों में से एक है. यहां से पूर्व मुख्यमंत्री नारायण राणे के बेटे निलेश राणे चुनाव लड़ रहे हैं. शिवसेना (शिंदे) ने निलेश राणे को मैदान में उतारा है जबकि उनके सामने शिवसेना (उद्धव ठाकरे) ने वैभव नाइक को खड़ा किया है. यहां पर 20 नवंबर को वोट डाले गए थे और आज शनिवार को मतों की गिनती शुरू हो रही है. जल्द ही शुरुआती रुझान सामने आएंगे. वैभव नाइक लगातार 2 चुनाव…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 29.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
एकनाथ शिंदे, अजित पवार, विश्वजीत कदम आणि वरूण सरदेसाईंसह दिग्गजांचे अर्ज दाखल
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी
भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी देशभरात दक्षता सप्ताहाला कालपासून प्रारंभ
आणि
प्रकाशासह आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात आज धनत्रयोदशी
सविस्तर बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन या कालावधीमध्ये अर्ज दाखल करता येत असले तरीही, अर्ज भरणं आणि त्यापूर्वीच्या अन्य पूरक प्रक्रियेसाठी आज सकाळी साडे नऊ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू असतील, असं संबंधित विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
दरम्यान, काल अनेक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला.
कर्जत - जामखेड मतदार संघातून महाविकास आघाडीचे रोहित पवार, शिर्डीतून महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे, तर राहुरीतून महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सांगली जिल्ह्यात पलूस- कडेगाव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी तर जत मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल अर्ज भरला.
मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी तर वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केला.
वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथं महायुतीतल्या शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेनं आमदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली असतांना, भाजपकडून काल माजी मंत्री अनंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातून काल सलग सहाव्यांदा अर्ज दाखल केला.
धुळे जिल्ह्यात ��ुळे ग्रामीण मतदारसंघासाठी कॉंग्रेसचे कुणाल पाटील, धुळे शहर साठी समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीदार तर वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाठ यांनी अर्ज दाखल केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतून तर कुडाळ मतदार संघातून शिवसेनेचे निलेश राणे यांनी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी काल वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अहमद हे नागपूर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदार संघातून काल एकूण ६४ अर्ज दाखल झाले. तर जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदार संघातून काल ९९ उमेदवारांनी १२२ अर्ज दाखल केले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत २२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून, नऊ विधानसभा मतदार संघात २२७ इच्छुकांचे एकूण २७९ अर्ज दाखल झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात काल ५१ उमेदवारांनी ७३ अर्ज दाखल केले. तर परभणी जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदार संघात काल ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
****
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे, याच मतदार संघातले महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी, तर औरंगाबाद पूर्व मतदार संघाततून महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल उमेदवारी अर्ज भरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल पुढची यादी जाहीर केली, यात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून सुहास दाशरथे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
दरम्यान, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या मतदार संघात २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आपण महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी परत करत असल्याचं, तनवाणी यांनी जाहीर केलं. पक्षानं त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांना औरंगाबाद मध्य मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
****
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये माळशिरसमधून राम सातपुते, आष्टीतून सुरेश धस, देगलूर जितेश अंतापूरकर तर लातूरमधून माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील- चाकूरकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
शिवसेनेनं १३ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. घनसावंगी मतदारसंघातून हिकतम उढाण, कन्नड - संजना जाधव, तर धाराशिव मतदारसंघातून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने काल चार मित्र पक्षांसाठी प्रत्येकी एक जागा जाहीर केली. गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला, बडनेरा-युवा स्वाभिमान पार्टीला, तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेनंही दोन जागा मित्रपक्षांना दिल्या असून, यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने यांना, तर शिरोळ मतदारसंघातून राजर्षी शाहुविकास आघाडीचे राजेंद्र येड्रावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी काल जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत ९२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
काँग्रेसनेही काल चार उमेदवारांची यादी जाहीर केली, यात अकोला पश्चिममधून साजिद खान, सोलापूर शहर चेतन नरोटे, तर कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी केलं आहे...
Byte…
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी देशभरात दक्षता सप्ताहाला कालपासून प्रारंभ झाला. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा सप्ताह पाळला जातो. राष्ट्राच्या भरभराटीसाठी एकात्मतेची संस्कृती विकसित करणं ही या सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहात भ्रष्टाचारविरोधात जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विविध मंत्रालयं, विविध सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, बँका आणि इतर संस्थामधले सरकारी अधिकाऱ्यांनी काल भ्रष्टाचाराविरोधात शपथ घेतली.
****
प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण आज साजरा होत आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी यांचं आज पूजन करण्याचा प्रघात आहे. यमदीपदानही आज केलं जातं. दिवाळीच्या उत्सवाला आज आतिषब���जीनं प्रारंभ होतो. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा, आणि गृहसजावटीच्या साहित्यासह फटाके, फराळाचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, काल सायंकाळी सवत्स धेनू अर्थात गाय वासराच्या पूजनाने वसुबारसेचा सण साजरा झाला. पोषक अन्नघटक असलेलं दूध देणाऱ्या गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
राज्य गौसेवा आयोगाच्या निर्देशानुसार "गाव तिथे गोमाता पूजन- वसुबारस उपक्रमांतर्गत, जालना श���रातल्या पांजरापोळ गोशाळेत विश्वस्त आणि गोसेवकांच्या हस्ते गायींचं पूजन करण्यात आलं. हिवरा रोषणगाव इथल्या श्रीकृष्ण गोशाळेत सरपंच शिला निलखन, किसन बरडे यांनी गाय-वासराची पूजा करून वसुबारस साजरी केली. छत्रपती संभाजीनगर इथंही बीड बायपासवर शारदा गोशाळेत गाय वासरांची पूजा करण्यात आली.
****
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बल्लवाचार्य विष्णु मनोहर यांनी ‘न थांबता २४ तास डोसे बनवणे‘ आणि ‘२४ तासात जास्तीत जास्त डोसे बनवणे‘ हे दोन विश्वविक्रम केले आहेत. परवा सकाळी सात वाजल्यापासून काल सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांनी १४ हजार १७४ डोसे बनवले. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा वर्ल्ड रेकार्ड्स बुक ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
****
नांदेड दक्षिण मतदारसंघातल्या नागरिकांसाठी मतदान जनजागृती रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३१ आक्टोबर रोजी वजीराबाद इथल्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेत स्पर्धा होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं, मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांकडून "मतदारा जागा हो" या पथनाट्याचे प्रयोग केले आहेत.
****
0 notes
Video
youtube
निवडणुकीत पडलो तरी चालेल निलेश राणे
0 notes
Text
नांदेड येथील यंदाच्या जागतिक धम्म परिषदेच्या विशेष उपस्थितीचा मान उत्तर महाराष्ट्राच्या सुपुत्राला
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी किनवट (जि. नांदेड) येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.यंदाच्या बौद्ध धम्म परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील डॉ. निलेश राणे यांची विशेष उपस्थिती लक्षवेधक असणार आहे. राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण संघटनेच्या (दिल्ली) राज्यमंत्रीपदी डॉ. निलेश राणे यांची नुकतीच नियुक्ती झालेल�� आहे. तसेच ते भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती महासंघ (दिल्ली)…
View On WordPress
0 notes
Text
निलेश राणे राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? देवेंद्र फडणवीसांबराेबर चर्चा
https://bharatlive.news/?p=177507 निलेश राणे राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? देवेंद्र फडणवीसांबराेबर ...
0 notes
Text
BREAKING NEWS : निलेश राणेंनी घेतला "हा" मोठा निर्णय
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘मी सक्रिय राजकारणामधून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही’, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणामध्ये माझे मन रमत नाही, इतर काही कारण नाही. गेल्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र: किरीट सोमय्या यांची रत्नागिरी पोलिसांनी कोठडीत सुटका, परिवहन मंत्र्यांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याची भाजप नेते मागणी करत आहेत.
महाराष्ट्र: किरीट सोमय्या यांची रत्नागिरी पोलिसांनी कोठडीत सुटका, परिवहन मंत्र्यांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याची भाजप नेते मागणी करत आहेत.
अटक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘उद्धव ठाकरे सरकारला अनिल परब यांच्यावर कारवाई करावीच लागेल. म्हणूनच आज आपण निलेश राणेंसोबत सत्याग्रह केला आणि तो यशस्वी झाला. पोलिसांनी आम्हाला अटक केली आहे, आम्हाला रत्नागिरीच्या बाहेर सोडावे लागेल. किरीट सोमय्याला रत्नागिरी पोलिसांनी अटक करून जिल्ह्यातून सोडले. भाजप नेते किरीट सोमय्या (किरीट सोमय्या भाजप) शनिवारी महाराष्ट्रातील…
View On WordPress
0 notes
Text
निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुडाळात विविध कार्यक्रम
निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुडाळात विविध कार्यक्रम
प्रतिनिधी । कुडाळ : भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७मार्च रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. बुधवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ठीक ८.०० श्री देव कुडाळेश्र्वर मंदिरात अभिषेक पूजा, सकाळी ठिक ९ ते दु १२ – श्री स्वामी समर्थ मंदिर, औदुंबर नगर येथे रक्तदान शिबीर, सकाळी ठीक १०.०० वा. कुडाळ ग्रामीण…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस
एकनाथ शिंदे, अजित पवार, बच्चू कडू, विश्वजीत कदम आणि वरूण सरदेसाईंसह दिग्गजांचे अर्ज दाखल
औरंगाबाद मध्य मतदार संघातून महाविकास आघाडीचे किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संतुक हंबर्डे यांना उमेदवारी; लातूर विधानसभेसाठी डॉ अर्चना पाटील चाकूरकर भाजपकडून रिंगणात
आणि
आज वसुबारस तर उद्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साह
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज अनेक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी निघालेल्या रॅलीत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ठाणे मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी अर्ज दाखल केला.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला.
कर्जत जामखेड मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांनी महाविकास आघाडी कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सांगली जिल्ह्यात पलूस- कडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसकडून तर जत मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केला. शिराळा मतदारसंघात महायुतीचे सत्यजित देशमुख आणि खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांनी अर्ज दाखल केला
मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केला.
वा��िम जिल्ह्यातल्या रिसोड इथं महायुतीतल्या शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेनं काल आमदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली असतांना, भाजपकडून आज माजी मंत्री अनंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम बढे यावेळी उपस्थिती होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातून आज सलग सहाव्यांदा अर्ज दाखल केला.
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव मतदार संघातून खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्ज दाखल केला. तिरोडामधून महायुतीचे विजय राहागडाले, गडचिरोलीमधून भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांनी अर्ज दाखल केला.
धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी कॉंग्रेसचे कुणाल पाटील, धुळे शहर साठी समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीदार तर वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाठ यांनी अर्ज दाखल केले. शिरपूर मतदारसंघासाठी भाजपाचे काशिराम पावरा यांनी तर साक्री तालुक्यात भाजपचे मोहन सूर्यवंशी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतून तर कुडाळ मतदार संघातून शिवसेनेचे निलेश राणे यांनी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीतून अ���क्ष म्हणून अर्ज दाखल केला. मुंबईत सायन कोळीवाडा इथून महायुतीचे तमिल सेल्वन यांनी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अहमद हे नागपूर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे तसंच याच मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी, तर औरंगाबाद पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वतीने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून सुहास दाशरथे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
दरम्यान, औरंगाबाद मध्य विधान सभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. आपल्या मतदार संघात २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आपण महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी परत करत असून, पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी आपण भक्कमपणे उभं राहू, तनवाणी यांनी जाहीर केलं.
****
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. वसई मतदारसंघातून स्नेहा प्रेमनाथ दुबे, नागपूर पश्चिममधून सुधाकर कोहळे, सावनेरमधून आशिष रणजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत १४७ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप तर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत ९२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलं आहे.
बाईट – प्राजक्ता माळी
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या वसुबारस तसंच उद्या असणाऱ्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर ही दिवाळी आनंद, समृद्धी आणि सुख शांती घेऊन येवो, असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्य गौसेवा आयोगाच्या निर्देशानुसार “गाव तिथे गोमाता पूजन- वसुबारस” उपक्रमांतर्गत जालना शहरातील पांजरापोळ गो शाळेत विश्वस्त आणि गोसेवकांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. हिवरा रोषणगाव इथल्या श्रीकृष्ण गोशाळेत सरपंच शिला निलखन, किसन बरडे यांनी गाय-वासराचे विधिवत पूजन करून वसुबारस साजरी केली.
छत्रपती संभाजीनगर इथंही बीड बायपासवर शारदा गोशाळेत गाय वासरांची पूजा करण्यात आली.
****
भारतीय अन्न महामंडळ ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाला. या प्रणालीद्वारे तक्रार नोंदणीपासून ते तोडगा काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
****
बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाच्या सुमारे ५०३ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्रप्रदेशातल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. विविध बँकांना मिळून सुमारे चार हजार सात कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई ईडीने केली आहे.
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत भरारी पथकाने केलेल्या कारवाईत संशयित वाहनांमधून तीन लाख एकतीस हजार रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. यात सोने-चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंची अधिकृत बिलं नसल्याने त्या ताब्यात घेण्यात आल्या.
****
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत उपेक्षा झाल्यावर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल अशी आशा होती, मात्र पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे राजीनामा देत असल्याचं घरत यांनी सांगितलं.
****
नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी मतदान जनजागृती रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३१ आक्टोबर रोजी वजीराबाद इथल्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेत स्पर्धा होणार आहे.
****
0 notes
Photo
mumbai news News : आरोप ठाकरे कुटुंबीयांवर, उत्तर नाईक कुटुंब देतंय; भाजप नेत्यानं व्यक्त केली शंका – bjp leader nilesh rane attacks on cm uddhav thackeray over anvay naik family land मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. अन्वय नाईक कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
0 notes
Text
निलेश राणे युवा प्रतिष्ठानचा शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा
निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक मध्ये 103 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संघर्ष संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलन व उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी भारत किसान राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष ��्री. माणिकदादा कदम विभागीय अध्यक्ष श्री.नानासाहेब बच्छाव व सोबत शेतकरी नेते श्री.सुधाकर मोगल आणि श्री.भगवान बोराडे उपस्थित होते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी…
View On WordPress
0 notes
Text
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती; निलेश राणे म्हणाले,”उद्धव ठाकरेंची अशी अवस्था…”
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती; निलेश राणे म्हणाले,”उद्धव ठाकरेंची अशी अवस्था…”
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती; निलेश राणे म्हणाले,”उद्धव ठाकरेंची अशी अवस्था…” मुंबई : शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल मोठी घोषणा केली. संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा केली आहे. भाजप नेते निलेश राणेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास…
View On WordPress
#अवस्था#अशी#आताची बातमी#ट्रेंडिंग बातमी#ठाकरेंची#निलेश#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#ब्रिगेड#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#म्हणाले#”उद्धव#युती#राणे#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#शिवसेना-संभाजी
0 notes
Text
घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय - राणे
घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय - राणे #HelloMaharashtra
रत्नागिरी प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित आहेत तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ वर पोहो��ली आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय असं वक्तव्य राणे यांनी केले आहे.
कोरोना केसेस वाढतायत, पीपीइ किट्स व…
View On WordPress
0 notes
Text
कुडाळमध्ये रंगणार कबड्डीचा थरार !
कुडाळमध्ये रंगणार कबड्डीचा थरार !
ब्युरो । कुडाळ : माजी खासदार निलेशजी राणे यांचा वाढदिवस कुडाळ तालुका भाजपाच्या वतीने विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आणि रोजगार विषयक उपक्रम करून साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त बुधवार दिनांक, १६ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून अभिष्टचिंतन सोहळा संपन्�� होणार आहे. तसेच संध्याकाळी ७ वाजल्यापासून युवा नेते विशाल परब मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित प्रकाशझोतातील भव्य कबड्डी स्पर्धा…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 28.10.2024 रोजीचे सकाळी : 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये वडोदरा इथं स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सांचेझ यांच्यासोबतटाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन केलं. सी-295 या विमानांच्या निर्मितीसाठी हे संकुल उभारण्यात आलं आहे. सी-295 विमानांच्या प्रकल्पाअंतर्गत ५६ विमानं तयार करण्यात येणार आहेत. यापैकी १६ विमानं एअरबसच्या माध्यमातून थेट स्पेनमधून दिली जाणार आहेत. उर्वरित ४० विमानांची निर्मिती भारतात होणार आहे. टी ए सी एल या विमानांची निर्मिती करणार आहे. संरक्षण दलासाठी लागणाऱ्या विमानांच्या निर्मितीप्रक्रियेतील फायनल ॲसेब्ली खाजगी उपक्रमाच्या माध्यमातून करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे. या प्रक्रियेंतर्गत विमानांची निर्मिती, ॲसेंब्ली, चाचणी आणि उड्डाणासाठी सज्ज बनवताना विमानांचा पुरवठा आणि देखभाल यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये पंतप्रधानांनी फायनल ॲसेंब्ली प्रकल्पाचं भुमिपूजन केलं होतं.
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पेड्रो सांचेझ रोड शो मध्ये सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन त्यांचं वडोदरा मध्ये स्वागत करण्यात आलं.
****
एन डी एम ए अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा २० वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. वर्तनात्मक बदलांच्या जागरूकतेद्वारे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समुदायांचं सक्षमीकरण, ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्ली इथं होणार्या स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार, तसंच मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे आज अर्ज दाखल करणार आहेत.
****
शिवसेनेनं २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हदगाव मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील, परभणी - आनंद भरोसे, वरळी - मिलिंद देवरा, कुडाळ - निलेश राणे, तर रिस��ड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
काँग्रेसनं १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. आता या मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
****
खरीप विपणन हंगाम २०२४-२५ या काळात १८५ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी केला जाईल, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. तांदूळ गिरणी मालकांच्या तक्रार निवारणासाठी लवकरच आँनलाईन पोर्टल सुरू केलं जाईल, या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारींचं, तात्काळ निवारण केलं जाईल, असं ते म्हणाले.
****
भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल, असं केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. ते सतराव्या भारतीय नागरी वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते. गांधीनगरमधल्या महात्मा मंदीर इथं झालेल्या या परिषदेत खट्टर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या शाश्वत गरजेवर भर दिला. शाश्वत आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्थेसाठी सरकारने अनेक उपक्रम गेल्या दहा वर्षात हाती घेतले आहेत असं त्यांनी सांगितलं. वाहतूक व्यवस्थेसाठी तंत्रज्ञान, संशोधन हरित उपाय आणि खाजगी- सार्वजनिक भागीदारी याला महत्व असल्याचं ते म्हणाले. या परिषदेत शहरी वाहतुकीच्या सर्वोत्तम प्रकल्पांना गौरवण्यात आलं.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल केलेल्या वेगवगेळ्या कारवाईत अवैध मद्याचा मोठा साठा जप्त केला.
नागपूर इथं केलेल्या कारवाईत मद्याच्या ४४८ सिलबंद बाटल्या तसंच वाहन आणि मोबाईलसह एकूण ३८ लाख ६९ हजार रूपयांचा मुद्येमाल जप्त करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे तालुक्यातल्या नेर गाव शिवारात देखील विभागाने बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून २५ लाख २२ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातले सर्व संशयित पळून गेले असल्याची माहिती, राज्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अन्य एका कारवाईत रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या मद्याचा ८७ लाख ९४ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. मुद्देमाल ताब्यात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
****
0 notes