Tumgik
#श्रीदेवी चित्रपट
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 April 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग
नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर;परभणी तसंच हिंगोलीच्या तरुणांची चमकदार कामगिरी
यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार', ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर;उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी अभिनेते रणदीप हुडा यांना विशेष पुरस्कार
      आणि
आज श्रीरामनवमी;ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवाची जय्यत तयारी
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत परवा शुक्रवारी १९ तारखेला संपत आहे.
या टप्प्यात काल उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार मनोहर पाटील यांच्यासह एकूण तीन जणांनी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी अर्ज दाखल केले.
लातूर मतदार संघातून महायुतीचे सुधाकर श्रृंगारे, राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे श्रीधर कसबेकर, तसंच अपक्ष सुरेश कांबळे यांच्यासह पाच अर्ज काल दाखल झाले.
कोल्हापूर मतदारसंघात काल दोन तर हातकणंगले मतदारसंघात पाच उमेदवारांनी अर्ज भरले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती तसंच बहुजन समाज पक्षाचे संदीप नामदेव शिंदे यांनी कोल्हापूर इथं अर्ज दाखल केला.
हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील यांनी आणि बहुजन समाज पक्षाकडून रविंद्र कांबळे यांनी काल अर्ज दाखल केले. याशिवाय शिवाजी माने, मनोहर सातपुते आणि रघुनाथ पाटील या अपक्ष उमेदवारांनीही काल अर्ज दाखल केले.
सांगली लोकसभा मतदारसंघात काल काँग्रेसचे विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केला. एकूण तीन उमेदवारांनी काल नामनिर्देशनपत्र दाखल केली.
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोलापुरातले महायुतीचे उमेदवार राम सातपुते तसंच माढा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी काल इंडिया आघाडीकडून अर्ज सादर केला.
भाजपानं सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या गुरुवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
येत्या एकोणीस तारखेला मतदान होणार असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथकं रवाना करण्यास कालपासून सुरूवात झाली. अशा ६८ मतदान केंद्रांवरच्या २९५ मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर सामग्रीसह वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने पोहचवण्यात आलं.
****
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सुमारे एकोणतीस नक्षलवादी मारले गेले, तर सीमा सुरक्षा दलाच्या एका निरीक्षकासह तीन सैनिक जखमी झाले. या परिसरात सुमारे पन्नास नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी ही कारवाई या ठिकाणावरून एके 47 सह पाच रायफली जप्त करण्यात आल्या.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं सप्टेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल काल जाहीर केला. या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव यांचा प्रथम क्रमांक आला आहे. ते भारतीय तंत्रज्ञान संस्था - आय आय टी कानपूरचे विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आहेत. अनिमेष प्रधान दुसऱ्या तर दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या शिवनी इथले डॉ. अंकेत जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करत, तीनशे पंचाण्णवावा क्रमांक  मिळवला आहे. अंकेत जाधव यांचं शालेय शिक्षण कळमनुरीमध्ये, उच्च माध्यमिक शिक्षण नांदेडमध्ये तर वैद्यकीय शिक्षण पुणे इथं झालं आहे. परभणीचे नीलेश डाके यांनीही या परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांचा नऊशे अठरावा क्रमांक आला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठानचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार', ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. तर प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर तसंच ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली. अभिनयासाठी अशोक सराफ, अतुल परचुरे तसंच पद्मिनी कोल्हापुरे यांना, संगीत क्षेत्रासाठी रुपकुमार राठोड यांना, तर पत्रकारितेसाठी - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी अभिनेते रणदीप हुडा यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२३ - २४ या वर्षाकरता उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी गालिब या नाटकाला मोहन वाघ पुरस्कार, सामाजिक कार्यासाठी दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला आनंदमयी पुरस्कार, तर साहित्य सेवेसाठी मंजिरी फडके यांना वाग्विलासीनी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २४ तारखेला मुंबईत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.
****
भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव रामनवमी आज साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थ नगर भागातल्या राम मंदिरासह मराठवाड्यात ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं काल पोलिस प्रशासनाच्या वतीनं शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सर्व जातीधर्माचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.
शिर्डी इथं रामनवमी उत्सवाला कालपासून सुरूवात झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘महिला मतदार; मतदान करणार’ ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवलं जाणार आहे. अंगणवाडी ताई, बचतगटाच्या महिला यांच्या सहकार्यानं हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमातून जनजागृती करावी, मतदान केंद्रांवर महिलांसाठी असलेल्या सुविधांबाबत माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
परभणी लोकसभा निवडणुकीच्या पोस्टल मतदानाला कालपासून सुरुवात झाली. काल परभणी, पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदार संघातल्या निवडणूक कार्यात कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केलं, तर आज गंगाखेड विधानसभा संघातलं मतदान होणार आहे. बावीस हजार पाचशे पंचाहत्तर मतदारांचं मतदान टपालानं होणार असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं.
दरम्यान, परभणी लोकसभा मतदार संघातल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ श्रेणीतल्या एक हजार सहाशे एकोणतीस मतदारांकडून त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार असल्याची माहिती गावडे यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागानं शहरात मतदान जनजागृती केली जाणार आहे. काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल आणि महापालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ऑटोरिक्षांना मतदान करण्याबाबतचे स्टीकर लावण्यात आले. यावेळी, दिव्यांग मतदारांसाठी टायगर ऑटोरिक्षा संघटना माफक दरात ऑटोरिक्षा सेवा उपलब्ध करून देईल, असं सांगण्यात आलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात गेल्या एक महिन्याचा कालावधीत सुमारे ६० लाखांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला असून, आचारसंहिता भंगाच्‍या ७ तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत.
****
बीड मतदार संघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार असून, नामनिर्देशन पत्र भरण्याची सुरवात उद्या १८ तारखेपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची आणि सर्व व्यवस्थेची पाहणी केली.
****
मतदानाचा लातूर पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. काल स्वीप कक्षाच्या कार्यक्रमात विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. मतदानासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या लातूरकरांना प्रवासी भाड्यात दहा टक्के सवलत देण्याची घोषणा जिल्हा वाहतुक संघटनेनं यावेळी केली, तर, मतदान करणाऱ्या नागरिकांना आरोग्य तपासणीत दहा टक्के सवलतीची घोषणा लातूर पॅथालॉजी असोसिएशननं केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या २०१८ च्या एमबीबीएस बॅचचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. निवृत्त सनदी अधिकारी भास्कर मुंडे यांच्या हस्ते १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या वांजरवाडा शिवारात बोअरवेलच्या केसिंगचं काम करत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्यानं दोन तरुणांचा मृत्यू झाला. बसवराज गड्डे आणि योगेश जाधव अशी त्यांची नावं असून, काल सकाळी ही दुर्घटना घडली.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरने आईची आठवण काढली, इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट टाकली ताज्या मनोरंजन बातम्या
श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरने आईची आठवण काढली, इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट टाकली ताज्या मनोरंजन बातम्या
श्रीदेवीच्या जयंतीनिमित्त जान्हवी कपूरने आईची आठवण करून देत इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट टाकली ताज्या मनोरंजन बातम्या ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
या 6 चित्रपटांमुळे श्रीदेवी बनली भारताची पहिली महिला सुपरस्टार, पहा यादी
या 6 चित्रपटांमुळे श्रीदेवी बनली भारताची पहिली महिला सुपरस्टार, पहा यादी
श्रीदेवीचे टॉप 6 चित्रपट: बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज भलेही आपल्यात नसतील, पण आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून त्या कायम लोकांच्या हृदयात जिवंत राहतील. श्रीदेवीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये विविध भाषांमधील २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्रीचा अभिनयच नाही तर तिचे सौंदर्य आणि नृत्यही लोकांमध्ये चर्चेचा विषय असायचे. त्याचवेळी, आज…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
यशोदा टीझर: प्रेग्नंट सामंथा अ‍ॅक्शनने परिपूर्ण चित्रपटाचे वचन देते
यशोदा टीझर: प्रेग्नंट सामंथा अ‍ॅक्शनने परिपूर्ण चित्रपटाचे वचन देते
एक अजूनही पासून यशोदा टीझर (शिष्टाचार: श्रीदेवी चित्रपट) नवी दिल्ली: शुक्रवारी निर्माते सामंथाच्या यशोदाहिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. एक मिनिटापेक्षा जास्त लांबीच्या व्हिडिओमध्ये, समंथा तिच्या प्रेक्षकांना तिच्या सोप्या जीवनातून घेऊन जाते. टीझरची सुरुवात एका डॉक्टरने समंथाला तिच्या गरोदरपणाबद्दल माहिती देऊन होते. डॉक्टर नंतर सामंथाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
श्रीदेवी किंवा योगिता नव्हे, ही बॉलिवूड ब्युटी मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी होती
श्रीदेवी किंवा योगिता नव्हे, ही बॉलिवूड ब्युटी मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी होती
श्रीदेवी किंवा योगिता नव्हे, ही बॉलिवूड ब्युटी मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी होती मिथुन चक्रवर्ती हे भारतीय चित्रपट जगतातील महान गुरु आहेत. एकेकाळी त्याला… मिथुन चक्रवर्ती हे भारतीय चित्रपट जगतातील महान गुरु आहेत. एकेकाळी त्याला बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागली. पण लवकरच डिस्को डान्सर असमुद्रा हिमाचलच्या महिलांची हार्टथ्रोब बनली. सामान्य महिलांशिवाय बॉलिवूडच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना आला ' खळबळजनक ' अनुभव
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना आला ‘ खळबळजनक ‘ अनुभव
देशात गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबई येथे समोर आलेली असून प्रसिद्ध चित्रपट निर्माते तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती असलेले बोनी कपूर यांच्यासोबत असाच प्रकार घडला असून सायबर चोरांनी त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तब्बल चार लाख रुपयांना चुना लावलेला आहे. ��दर प्रकरणी आंबोली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना आला ' खळबळजनक ' अनुभव
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना आला ‘ खळबळजनक ‘ अनुभव
देशात गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबई येथे समोर आलेली असून प्रसिद्ध चित्रपट निर्माते तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती असलेले बोनी कपूर यांच्यासोबत असाच प्रकार घडला असून सायबर चोरांनी त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तब्बल चार लाख रुपयांना चुना लावलेला आहे. सदर प्रकरणी आंबोली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अर्जुन कपूरची बहीण खुशी कपूरला दिलेला खास सल्ला
अर्जुन कपूरची बहीण खुशी कपूरला दिलेला खास सल्ला
चित्रपट निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज. खरंतर, ती झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही या चित्रपटातून डेब्यू करणार आहेत. दरम्यान, खुशी कपूरचा मोठा भाऊ अर्जुन कपूर त्याला एक सल्ला दिला आहे. हेही वाचा – केवळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
'झीरो' मध्ये श्रीदेवी दिसणार 'या' रूपात...
‘झीरो’ मध्ये श्रीदेवी दिसणार ‘या’ रूपात…
शाहरुख खानच्या झीरो सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. त्यातल्या एकेक गोष्टी आता बाहेर यायला लागल्यात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, राणी मुखर्जी, काजोल, जूही चावला, आलिया भट्ट, करिश्मा कपूर आणि सलमान खान झीरो सिनेमात गेस्ट म्हणून आहेत. आता एक चांगली बातमी आलीय.
सिनेमात श्रीदेवी आहे, हे आपल्याला कळलं होतं. पण खास बात अशी की, सिनेमात श्रीदेवी आणि शाहरुख खानचं एक गाणं आहे. त्यात करिष्मा कपूर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
श्रीदेवी यांच्यामुळे अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यात झाले होते मोठे भांडण, जाणून घ्या काय होते नेमकं कारण?
श्रीदेवी यांच्यामुळे अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यात झाले होते मोठे भांडण, जाणून घ्या काय होते नेमकं कारण?
श्रीदेवी यांच्यामुळे अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यात झाले होते मोठे भांडण, जाणून घ्या काय होते नेमकं कारण? बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी पडद्यावर फारच हिट ठरली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट प्रचंड गाजला. ‘मिस्टर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 June 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ जून २०१८ दुपारी १.०० वा. **** खटल्यांच्या वितरणा साठी सर्वोच्च न्यायालयानं नवीन रोस्टर अधि सूचित केलं आहे. उन्हाळी सुट्टी नंतर दो�� जुलै पासून हे नवं रोस्टर लागू होईल. या नुसार सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सामाजिक न्याय, निवडणूक, हिबियस कॉर्पस आणि न्यायालयाच्या अवमान विषयक याचिकांबरोबरच सर्व जनहीत याचिकांची सुनावणी होईल. श्रम विषयक कायदे, अप्रत्यक्ष कर, पर्सनल लॉ आणि कंपनी लॉ विषयक खटल्यांची सुनावणी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासमोर होईल. **** मुंबई इथं आज आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेची तिसरी वार्षिक बैठक केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत अर्थव्य वहार विभाग, केंद्रीय अर्थ विभाग, आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बॅंक सहभागी झाले आहेत. योग्यव पायाभूत सुविधा गुंतवणूकीच्याा माध्य मातून शाश्व.त भविष्य निर्माण करण्यातसाठी वैचारिक देवाण घेवाण या वेळी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या बैठकीत सहभागी होणार आहेत. **** `तुम्हारी सुलू` चित्रपट २८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - आयफा वितरणात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. बँकाक इथं काल या सोहळ्यात इरफान खानला हैदर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार `मॉम` साठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक `हिंदी मिडियम` साठी साकेत चौधरी यांना, सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटा साठी अमाल मलिम, तनिष्क बागची आणि अखिल सचदेव यांना प्रदान करण्यात आला. पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते अनुपम खेर यांना यावेळी विशेष योगदानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. **** सरकारनं आणखी १६ पोलाद उत्पादनांचा समावेश, गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या कक्षेत केला आहे. या निर्णयामुळे देशात वापरली जाणारी ९० टक्के पोलाद उत्पादनं या आदेशाच्या कक्षात येतील. या पूर्वी पोलाद मंत्रालयानं कार्बन-पोलादची ३४ आणि स्टेनलेस स्टीलची तीन उत्पादनं अधिसूचित केली होती. **** विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजे पर्यंत नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यात २२ पूर्णांक ३४. तर धुळे जिल्ह्यात ३२ पूर्णांक ३४ टक्के मतदान झालं. पालघर जिल्ह्यात सकाळी नऊ वाजे पर्यंत सात पूर्णांक ४९ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. संध्याकाळी पाच वाजे पर्यंत मतदान सुरु राहील. या निवडणुकीत ७१ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, नाशिक शहरातल्या बी डी भालेकर मतदान केंद्रावर शिवसेना उमेदवार किशोर दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे समर्थकांत वाद झाला. पोलिसांच्या कारवाईनंतर आता मतदान शांततेत सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** राज्य सरकारनं लागू केलेल्या प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक उद्योगाला मोठा फटका बसल्याचं प्लास्टिक पिशव्या उत्पादकांच्या देशपातळी वरच्या संघटनेचे सर चिटणीस निमित पुनमिया यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे प्लास्टिक उद्योगाचं १५ हजार कोटी रुपयांचं नुकसान होण्याची तसंच तीन लाख बेरोजगार होण्याची शक्यता त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली. **** छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार येत असलेल्या ३४४ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जोरदार पाऊस असतानाही राज्याच्या विविध भागातून हजारो शिवभक्त गडावर उपस्थित आहेत. आज पहाटे चार वाजता राज्याभिषेक सोहळा सुरू झाला, त्या नंतर ध्वजपूजन कऱण्यात आलं. रायगड जिल्हा परिषद, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीनं हा सोहळा साजरा करण्यात आला. **** जालना शहरातल्या कन्हैय्या नगर भागात मध्य रात्रीच्या सुमारास वाहनाला धक्का लगल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला. वादाचं पर्यावसन नंतर दगडफेकीत झाल्यानं या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार चंदनझीरा पोलिस ठाण्यात परस्परांविरोधी दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, २४ जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. **** राज्यात आज अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये, तसंच धुळे जिल्ह्यात सकाळ पासून पाऊस सुरु आहे. वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रायगड जिल्हयात आज सकाळी कर्नाळा इथला एक पूल खचल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक खोळंबली असून, ही वाहतूक आता अन्य मार्गानं वळवण्यात आली आहे. पुढच्या २४ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात काही ठिकाणी तुरळक पावसाचं वृत्त आहे. *****
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Photo
Tumblr media
स्मृती इराणींच्याहस्ते चित्रपट पुरस्कार घेण्यास नकार नवी दिल्ली : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या वितरणाचा गुरुवारी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात कार्यक्रम होणार होता; मात्र पुरस्कार वितरणावरुन आता नवा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नसल्याने ते अकराच पुरस्कार प्रदान करतील. काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार होते. राष्ट्रपती ��ेमके कोणते पुरस्कार प्रदान करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे. ह्या 11 पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण दादासाहेब फाळके पुरस्कार : विनोद खन्ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : श्रीदेवी, मॉम राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - धप्पा (मराठी) चित्रपटावर आधारित पुस्तक : मातंगी -मणिपूर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) : नागराज मंजुळे, पावसाचा निबंध सर्वोत्कृष्ट जसारी चित्रपट : सिंजर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन (पुरुष) : केजे येसूदास, “पोय मारंजा कलाम” विश्वासपुरम मन्सूर (मल्याळम) सर्वोत्कृष्ट संगीतकार : ए आर रहमान , कात्रु वेल्लीदायी -तामीळ, सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर : मॉम सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिद्धी सेन (नगरकीर्तन- बंगाली) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - जयराज - (भयानकम् - मल्ल्याळम) सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) - विलेज रॉकस्टार (आसामी), सर्वोत्कृष्ट संकलन - व्हिलेज रॉकस्टार (आसामी)
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 April 2018 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा. ****
६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. चित्रपट सृष्टीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार सुयश शिंदे यांच्या मयत या मराठी लघुपटाला, सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शनाचा पुरस्कार पावसाचा निबंध या लघुपटासाठी नागराज मंजुळे यांना, तर सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार मृत्यूभोज या चित्रपटाला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपटाचा पुरस्कार राजेंद्र जंगले यांच्या चंदेरीनामा या चित्रपटाला तर यशराज कऱ्हाडे यांच्या म्होरक्या या चित्रपटाला विशेष चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. न्यूटन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार, तर बाहुबली दोन या चित्रपटानं, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट साहसपट, आणि सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स, असे विविध पुरस्कार मिळवले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मॅाम या हिंदी चित्रपटासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना जाहीर झाला आहे. तर धप्पा या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे प्रमुख प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.
****
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव सामुहिक अत्याचार प्रकरणातला आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर याला आज पहाटे केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारनं उन्नाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील सामुहिक अत्याचार आणि तिच्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यूसंबंधित तीन प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची राज्य सरकारची विनंती मान्य केली. कोणत्याही प्रकारचा गुन्हा आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणातल्या आरोपीला माफ केलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारा नवीन कायदा करणार असल्याची घोषणा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमधल्या हिरा नगर परिसरात आठ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर त्या बोलत होत्या. या पीडितेच्या कुटुंबाला सरकार पूर्ण न्याय देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर, उद्यापासून देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवलं जाणार आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पोहनेर आणि उमरगा तालुक्यातल्या मुरळी या गावांचा यात समावेश आहे. पाच मे पर्यंत हे अभियान राबवलं जाणार असून, या कालावधीत सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडी इथले रहिवासी असलेले एकतीस वर्षीय जवान किरण थोरात यांच्या पार्थिव देहावर आज फकीराबादवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मावंदना देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये बुधवारी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आलं.
****
ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतानं आणखी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं.  नेमबाजीत महिलांच्या ५० मीटर रायफल-थ्री पोझिशन प्रकारात महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतनं, तर पुरुषांच्या गटात १५ वर्षीय अनिश भानवालानं २५ मीटर पीस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. याच स्पर्धेत अंजुम मौदगिलनं रौप्य पदक जिंकलं. अनिश भानवाला हा सुवर्ण पदक जिंकणारा देशातला सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत मुष्टीयुद्ध प्रकारात मनोज कुमार, ���िकास कृष्णन, सतीश कुमार आणि मोहम्मद हसमुद्दिल आपापल्या गटाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी आज सामने खेळतील. बजरंग, दिव्या काकर, मौसम खत्री, पूजा धांदा या कुस्तीपटूंचेही आज सामने होणार आहेत. पुरुषांच्या हॉकी गटात आज उपांत्य फेरीसाठी भारताची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. भारताच्या महिला हॉकी संघाला काल पराभव पत्करावा लागला, मात्र कांस्य पदकासाठी त्यांचा सामना इंग्लंडबरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि के श्रीकांत आज उपांत्यपूर्व फेरीतले सामने खेळतील. या स्पर्धेत आतापर्यंत १६ सुवर्ण, आठ रौप्य आणि दहा कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
//*********//
  ���c���
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ५  मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता
जागतिक चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या ९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात द शेप ऑफ वॉटर हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार डार्केस्ट आवर या चित्रपटासाठी गॅरी ओल्डमॅन याला, तर अभिनेत्रीचा पुरस्कार थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग या चित्रपटासाठी फ्रान्सेस मॅकडोर्मंडला प्रदान करण्यात आला. डंकर्क या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलनाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट - डियर बास्केटबॉल, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - द शेप ऑफ वॉटर, तर सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्टफिल्मचा पुरस्कार द सायलेंट चाईल्ड या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. हिंदी चित्रपटसृष्टीतले दिवंगत कलाकार शशी कपूर आणि श्रीदेवी यांना या सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसंच लैंगिक शोषणाविरोधातही यावेळी कलाकारांनी आवाज उठवला. **** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला. या अधिवेशनात आर्थिक गुन्हेगारी प्रतिबंधक विधेयक, तिहेरी तलाक विधेयक आणि इतर मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी करणारं विधेयक पारीत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. येत्या सहा एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. **** जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर -ए - तय्यबाचा एक दहशतवादी आणि दहशतवादी संघटनेत सक्रीय तीन भूमिगत सदस्य ठार झाले. काल संध्याकाळी पोहनजवळ संयुक्त मोबाईल वाहन तपासणी नाक्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ही चकमक झाली. **** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सी बी एस ईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३८ हजार विद्यार्थी, तर बारावीच्या परीक्षेसाठी ११ लाख ८६ हजार विद्यार्थी बसणार आहेत. **** औरंगाबाद शहरात आता, ओला कचरा रविवार वगळता इतर सगळ्या दिवशी तर सुका कचरा मात्र दर मंगळवारी आणि शुक्रवारीच स्वीकारला जाणार आहे. महापालिकेनं या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. नागरिकांनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं संपूर्णपणे वर्गीकरण करावं, तसंच सुक्या कचऱ्यातलं प्लास्टिक पूर्णपणे वेगळं करून द्यावं, अशी सूचनाही पालिकेनं केली आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 November 2017 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा. ******* अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तिन्ही आरोपींना दोषी ठरवल्यानंतर आज शिक्षेवर युक्तीवाद सुरु झाला आहे. आरोपी नितीन भैलुमे यानं आपण निर्दोष असून, या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसल्याचं न्यायालयात सांगितलं. आरोपी जितेंद्र शिंदे याच्या वकीलानंही आरोपीला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. गेल्या शनिवारी न्यायालयानं या आरोपींना दोषी ठरवल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. आज आणि उद्या युक्तीवाद झाल्यांनतर शिक्षा सुनावण्यात येणार आहे. **** गोव्यात पणजी इथं सुरु असलेल्या ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज डियन पॅनोरमा या बहुचर्चित आणि लोकप्रिय सत्राचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते होणार आहे. यात विविध भागांमधले निवडक २६ चित्रपट आणि १६ कथाबाह्य चित्रपट दाखवले जाणार आहेत. बलुत हा मराठी चित्रपटही या सत्रात दाखवला जाणार आहे. **** हेग इथल्या आंतराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर भारताचे दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. या निवडणुकीतून ब्रिटननं माघार घेतली. आज सकाळी न्यूयॉर्क मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महासभा आणि सुरक्षा परिषदेमध्ये एकाच वेळी मतदान झालं. भंडारी यांना महासभेत १९३ पैकी ���८३ तर सुरक्षा परिषदेतून १५ मतं मिळाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन भंडारी या निवडणुकीत जिंकल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं. **** वस्तू आणि सेवा कराचा कमी करण्यात आलेल्या दराचे फायदे उद्योजकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवावेत असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्ष वनजा सरना यांनी, सर्व उत्पादकांनी कमाल विक्री किंमती कमी करून ग्राहकांना सुधारित दरानुसार उत्पादनांची विक्री करावी असं सांगितलं आहे. सुधारित किंमतींचा व्यावसायिकांनी व्यापक प्रचार करावा असंही सरना यांनी म्हटलं आहे. **** येत्या मार्चअखेर पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात ग्रामीण भागातल्या गरिबांसाठी ५० लाखांपेक्षा जास्त घरांचं बांधकाम केलं जाणार आहे. गावांमध्ये सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत ग्रामीण भागातल्या एक कोटी नवीन घरांच्या निर्मितीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. यापैकी ५१ लाख घरे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करावी लागतील, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. गरीबांना सुरक्षित घराबरोबर शौचालये, स्वयंपाकाच्या गॅसची आणि वीज जोडणी, पिण्याचं पाणी इत्यादी सुविधाही मिळणार असून, या योजनेच्या सामाजिक परिवर्तनाबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** सार्वजनिक क्षेत्रातल्या वीमा कंपन्याना सुचीबद्व करुन तसंच निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून केंद्र सरकारनं ५२ हजार ५०० कोटी रुपये उभे केले असल्याचं गुंवतणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव नीरज गुप्ता यांनी सांगीतलं आहे. सरकारनं व्यापार विनीमय निधीच्या माध्यमातून १४ हजार ५०० कोटी उभारले, तर इतर विनीमय व्यापार निधीसाठी ३२ हजार कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या, त्यातली एक तृतीयांश रक्कम परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवली असल्याचं त्यांनी सांगीतलं. यावर्षी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ७२ हजार ५०० कोटी रुपये उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे. **** नांदेड-लिंबगाव-चुडावा-पूर्णा दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरता येत्या २५ नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान आठ दिवसांचा लाईन ब्लॉक दोन टप्यात घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरा धावणार आहेत. या कालावधी दरम्यान ३० नोव्हेंबरला कोणताच ब्लॉक घेण्यात येणार नाही. दरम्यान, मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पूलाचं काम सुरु असल्यामुळे आज जालना - शिर्डी - जालना ही रेल्वे नागरसोल-शिर्डी दरम्यान रद्द करण्यात येत आहे. ही गाडी आज जालना-नागरसोल-जालना अशी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. **** हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून हाँगकाँगमधल्या काऊलून इथं सुरु होत आहे. भारताकडून या स्पर्धेत पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, एच एस प्रणय, बी साई प्रणित, पी कश्यप हे खेळाडू सहभागी होणार आहेत. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी सुमित रेड्डी, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी सहभागी झाले आहेत. के श्रीकांतनं दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. *******
0 notes