#स्मृती इराणी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
वन रँक-वन पेन्शनच्या अंमलबजावणीला आज दहा वर्षे पूर्ण झाली. वन रँक-वन पेन्शन म्हणजे निवृत्त सैनिकांच्या धैर्य आणि बलिदानाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दशकभरात लाखो निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळं मदत झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सैन्यदलाच्या बळकटीकरणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. कर्तव्य निभावत असताना शहीद झालेल्या ३६ हजारांहून अधिक पोलिसांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय तपास संस्थेनं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी, न्यावैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गोवा भेटीवर आहेत. राष्ट्रपती स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या विविध सरावांची पाहणी करणार आहेत. यामध्ये जमिनीवरील जहाज मोहीम, कॉम्बॅट ऑपरेशन्स, पाणबुडी ऑपरेशन्स आणि बचाव आणि मदतकार्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयएनएस विक्रांतची प्रथमच पाहणी करत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना आयोगाकडून टपालाच्या माध्यमातून कळवण्यात आलं आहे. तसंच आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू केलं जाणार नाही, असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ३७० कलम लागू करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करायचा का, असा सवाल उपस्थित करुन हे कलम हटवल्यामुळे राज्यातील दहशतवादी घटना कमी झाल्याचं इराणी यांनी नमूद केलं. दरम्यान, ३७० कलमाच्या पुनरूज्जीवना संदर्भातील ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादामुळे आज सभागृहात गदारोळ झाला.
ग्राहक ओळख पटवणे- केवायसीच्या संदर्भातील काही नियमांमध्ये रिझर्व्ह बँकेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन अथवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी ग्राहक देय परिश्रम कस्टमर ड्यू डिलिजन्स साठी अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणी केंद्रात सात दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून छटपूजेनिमित्त ११ तारखेपर्यंत रेल्वेच्या १६० विशेष फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ७ हजार ६०० विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेड विभागातूही पानिपतसाठी १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान चार जादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्यात किनवट दौऱ्यावर आहेत. किनवट मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदिप नाईक यांच्यात लढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद जेठेवार निवडणूक लढवत आहे. किनवट इथल्या सभेनंतर फडणवीस यांच्या यवतमाळ जिल्ह्यात तीन जाहीर सभा नियोजीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दर्यापूर, तिवसा, बडने��ा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दत्तात्रय दगडे पाटील आणि जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले.
प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिहार कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शारदा यांचं परवा मंगळवारी दिल्लीत निधन झालं.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धा उद्यापासून बीड इथं होणार आहेत. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत ३५ संघ सहभागी झाले आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.
0 notes
pradip-madgaonkar · 2 years ago
Text
Happy birthday Smriti Irani: from Pradip Madgaonkar
वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46
Tumblr media
0 notes
bandya-mama · 2 years ago
Text
Tumblr media
Happy birthday Smriti Irani: from Bandya Mama
वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या महिलांसाठी आदर्श आहेत Smriti Irani, चेहऱ्यात दिसला मोठा बदल, डाएट पाहा
लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या महिलांसाठी आदर्श आहेत Smriti Irani, चेहऱ्यात दिसला मोठा बदल, डाएट पाहा
लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या महिलांसाठी आदर्श आहेत Smriti Irani, चेहऱ्यात दिसला मोठा बदल, डाएट पाहा केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांनी वजन कमी करून महिलांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी सांगितले की, व्यक्ती कोणत्याही वयात वजन कमी करून फिट होऊ शकते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक फोटो सध्या खूप लोकप्रिय होत असून चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये चेहऱ्यावरूनच त्यांच्या वेट लॉसचा अंदाज…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
स्मृती इराणी यांनी राष्ट्रपतींची माफी मागावी, काँग्रेसचे अधीर चौधरी म्हणाले
स्मृती इराणी यांनी राष्ट्रपतींची माफी मागावी, काँग्रेसचे अधीर चौधरी म्हणाले
नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केल्याच्या वादानंतर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘द्रौपदी’ हे नाव दिल्याबद्दल ‘बिनशर्त माफी मागावी’ असे आवाहन केले आहे. ‘राष्ट्रपती’ हा उपसर्ग न वापरता मुर्मू. अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या ‘राष्ट्रपत्नी’ टीकेनंतर भाजपने प्रचंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्र: पुण्यात स्मृती इराणींच्या ताफ्यावर फेकली अंडी, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं
महाराष्ट्र: पुण्यात स्मृती इराणींच्या ताफ्यावर फेकली अंडी, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी पुणे दौऱ्यावर होत्या. सोबत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्मृती इराणींवर झालेला हल्ला भ्याडपणाचा आहे. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या नेत्याचा असा कार्यक्रम असेल तेव्हा आम्हीही असेच करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
स्मृती इराणी राजीव गांधीचे 'ते' स्वप्न पूर्ण करणार
स्मृती इराणी राजीव गांधीचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करणार
उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघावर नेहमी गांधी घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. भारताचे मा��ी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अमेठी ते सुलतानपूर रेल्वेमार्गाने जोडण्याचे स्वप्न होते. परंतु ते स्वप्न अर्पूणच राहिले.
ते काम आता पूर्ण करण्याचा निर्धार अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि इराणी यांच्या बैठकीनंतर या प्रलंबित प्रकल्पाचे…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
स्मृती इराणींच्याहस्ते चित्रपट पुरस्कार घेण्यास नकार नवी दिल्ली : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या वितरणाचा गुरुवारी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात कार्यक्रम होणार होता; मात्र पुरस्कार वितरणावरुन आता नवा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नसल्याने ते अकराच पुरस्कार प्रदान करतील. काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार होते. राष्ट्रपती नेमके कोणते पुरस्कार प्रदान करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे. ह्या 11 पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण दादासाहेब फाळके पुरस्कार : विनोद खन्ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : श्रीदेवी, मॉम राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - धप्पा (मराठी) चित्रपटावर आधारित पुस्तक : मातंगी -मणिपूर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) : नागराज मंजुळे, पावसाचा निबंध सर्वोत्कृष्ट जसारी चित्रपट : सिंजर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन (पुरुष) : केजे येसूदास, “पोय मारंजा कलाम” विश्वासपुरम मन्सूर (मल्याळम) सर्वोत्कृष्ट संगीतकार : ए आर रहमान , कात्रु वेल्लीदायी -तामीळ, सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर : मॉम सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिद्धी सेन (नगरकीर्तन- बंगाली) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - जयराज - (भयानकम् - मल्ल्याळम) सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) - विलेज रॉकस्टार (आसामी), सर्वोत्कृष्ट संकलन - व्हिलेज रॉकस्टार (आसामी)
0 notes
kokannow · 2 years ago
Text
भरणी पोलीस पाटील यांना बडतर्फ करा!
भरणी पोलीस पाटील यांना बडतर्फ करा!
कणकवली भाजपाचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन कणकवली : मौजे भरणी येथील पोलिस पाटील लक्ष्मीकांत काशिराम ताम्हणकर हे गेली ६ वर्षे पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहेत. मात्र नेमणूक झालेपासून सतत काही ना काही कारणाने ते वादग्रस्त ठरले आहेत. आता तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून ते समाजमाध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर  हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड ��ाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळ���न तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज ��ांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांना सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, ��ाही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच ��ाबित हुवा। म��झे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
स्मृती इराणी यांनी ' त्यांची ' संस्कृती दाखवून दिली मात्र यापुढे..
स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली मात्र यापुढे..
स्मृती इराणी यांच्या मुलीचे गोवा येथील कथित बार प्रकरण मागील आठवड्यात चांगलेच चर्चेत होते.कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली आहे त्यामुळे इराणी यांनी तात्काळ त्यांची माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मुंबई महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिलेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
स्मृती इराणी गोत्यात; मुलगी-पतीच्या नावेच खाद्य परवाना
स्मृती इराणी गोत्यात; मुलगी-पतीच्या नावेच खाद्य परवाना
स्मृती इराणी गोत्यात; मुलगी-पतीच्या नावेच खाद्य परवाना नवी दिल्लीः भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीकडून- जोएशा इराणी व त्यांच्या पतीकडून झुबीन इराणींकडून गोव्यात चालवल्या जात असलेल्या सिली सोल्स या वादग्रस्त बारला गोवा राज्य अन्न व औषध प्रशासनाने खाद्य परवाना दिल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरातून झाला आहे. गेल्या महिन्यात दिल्ली उच्च…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"राष्ट्रपत्नी" पंक्ती: जेव्हा सोनिया गांधी स्पष्टीकरण देण्यासाठी भाजप खासदाराकडे गेल्या
“राष्ट्रपत्नी” पंक्ती: जेव्हा सोनिया गांधी स्पष्टीकरण देण्यासाठी भाजप खासदाराकडे गेल्या
भाजपच्या खासदारांनी सोनिया गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली नवी दिल्ली: लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना “राष्ट्रपत्नी” म्हटल्यावरून लोकसभेत प्रचंड वाद सुरू असताना, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भाजप खासदार रमा देवी यांच्याशी बोलण्यासाठी घरभर फिरल्या. भाजप खासदारांनी सोनिया गांधींविरोधात घोषणाबाजी केल्याने नाट्यमय दृश्ये घडली. “सोनिया गांधी, माफी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
माझी नी लाइफ कोणाला म्हणतात, बैलाचा व्हिडीओ शेअर करून स्मृती इराणी म्हणाल्या, लोक म्हणाले- तुम्ही मस्त मंत्री आहात
माझी नी लाइफ कोणाला म्हणतात, बैलाचा व्हिडीओ शेअर करून स्मृती इराणी म्हणाल्या, लोक म्हणाले- तुम्ही मस्त मंत्री आहात
स्मृती इराणी म्हणाल्या कोणाला म्हणतात मजा नि लाइफ प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram बैलाचा हा व्हिडीओ शेअर करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लिहिले आहे, याला ‘मजा नी लाइफ’ म्हणतात. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ 1 लाख 31 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (स्मृती इराणीसोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळेच त्यांची प्रत्येक पोस्ट लगेच व्हायरल होते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
स्मृती इराणी यांनी ' त्यांची ' संस्कृती दाखवून दिली मात्र यापुढे..
स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली मात्र यापुढे..
स्मृती इराणी यांच्या मुलीचे गोवा येथील कथित बार प्रकरण मागील आठवड्यात चांगलेच चर्चेत होते.कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली आहे त्यामुळे इराणी यांनी तात्काळ त्यांची माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मुंबई महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिलेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
स्मृती इराणी यांनी ' त्यांची ' संस्कृती दाखवून दिली मात्र यापुढे..
स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली मात्र यापुढे..
स्मृती इराणी यांच्या मुलीचे गोवा येथील कथित बार प्रकरण मागील आठवड्यात चांगलेच चर्चेत होते.कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली आहे त्यामुळे इराणी यांनी तात्काळ त्यांची माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मुंबई महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिलेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes