#असलेल्या
Explore tagged Tumblr posts
Text
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ReadMore
#श���तकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत#ठाणे : हिंगोली#नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन#हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून#यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. Read More
1 note
·
View note
Text
64. सर्वोत्तम काम करा
श्रीकृष्ण म्हणता, “तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत” (3.8).
मानवी शरीर टिकून राहावे याकरिता अन्नसंग्रह करणे आणि ते ग्रहण करणे आवश्यकच आहे. त्याशिवाय, मानवी शरीरात अनेक अवयव, व्यवस्था आणि रसायने असतात जी नियमितपण अनेक अंतर्गत कामे करीत असतात. त्यापैकी, एखादी कृती जरी चुकली तरी शरीरातील सुसंगततेवर परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो किंवा ते नष्टही होऊ शकते. त्या दृष्टीने शरीराची देखभाल निष्क्रियतेतून शक्य होणार नाही.
श्रीकृष्ण विहित कृती ��रण्याबद्दल बोलतात, जी एक जटिल संकल्पना आहे. पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले विधी आणि समाजाने आपल्यावर लादलेली कर्तव्ये ही सामान्यतः विहित कार्य म्हणून घेतली जातात. परंतु ते दोघेही श्रीकृष्णाच्या संदेशाची व्याख्या करण्यात अयशस्वी ठरतात.
भौतिक जगात आपली सर्वोच्च क्षमता प्राप्त करणे हे आपले बंधनकारक काम आहे. एखादे बीज जसे मोठ्या वृक्षात परिवर्तित होते किंवा आपल्या जीन्समध्ये असलेल्या सूचनांबरहुकुम वागत एका पेशीतून जसे गुंतागुंतीचे मानवी शरीर निर्माण होते तसे. यातून हे स्पष्ट होते आपल्या जीन्समधून पेशींकरता येणार्या सूचनांप्रमाणेच आपल्या गुणांनी आपल्यासाठी कर्माची निवड केली आहे. त्यामुळे, उरते ते केवळ सूचना स्वीकारणे किंवा ‘कृती करणे’, ज्यामध्ये वाढणे, बरे होणे आणि संरक्षण करणे यांचा समावेश असतो.
आपला संपूर्ण क्षमतेने आपण सर्वोत्तम काम केले पाहिजे. आपण काय करतो आहे इथपर्यंतच ते मर्यादित नाही तर किती चांगले काम आपण करतो आहे हेदेखील महत्वाचे आहे. अर्थात, आपली क्षमता, अनुभव आणि वेळ यानुसार सर्वोत्तम म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या बदलू शकते. केवळ उपस्थित असणे, शांत राहणे किंवा आस्थेने ऐकणे हे देखील सर्वोत्तम काम असू शकते. हे आपल्याला मोक्षाच्या त्या शाश्वत अवस्थेकडे (गुणांच्या पलीकडे) घेऊन जाईल (2.72). हे करण्याबद्दल आहे, निवडण्याबद्दल नाही कारण आपला जन्म जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना आहे तो आपल्या आवडीने झालेला नाही.
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रप��ी संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
एकवीसाव्या शतकातील भारताकडे संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रीत असून, भारताकडे असलेलं आयोजन आणि नाविन्यपूर्ण कौशल्याचं संपूर्ण जग अवलोकन करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित एन एक्स टी संमेलनात आज ते बोलत होते. आपण मांडलेली व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना आता सत्यात उतरली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जगातला एक नवीन उद्यमी देश म्हणून भारत आता उदयास येत आहे, भारत केवळ एक कार्यशक्ती नव्हे तर एक जागतिक शक्ती असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.
****
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पुण्यात या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन ��ोहळा पार पडला. याअभियानांतर्गत शून्य ते १८ वयोगटातल्या मुलांची सर्वांगीण शारीरिक आरोग्य तपासणी, विनामूल्य शस्त्रक्रिया, करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ॲनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत भित्तीपत्रक आणि चित्रकथापुस्तिकांचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. पालक आणि शाळा व्यवस्थापनासह सर्व संबंधित यंत्रणेने पुढच्या दोन महिन्यात हे अभियान राबवून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना आबिटकर यांनी यावेळी केली.
****
वीज महावितरण कंपनीने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं राज्य सरकारने दिलेलं उद्दीष्ट ८२ दिवसांत पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. गेल्या पाच डिसेंबरपर्यंत राज्यात ७१ हजार ४३७ तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसांत ५७ हजार ३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना एकूण ८०० कोटी रुपयांचं अनुदान खात्यात थेट जमा करण्यात आलं आहे. याअंतर्गत लाभार्थी संख्येत छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात चौथ्या, नागपूर पहिल्या, पुणे दुसऱ्या, तर जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
****
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भातील प्रस्ताव सादर करावेत, महामार्गावरील जनसुविधा केंद्राच्या देखभाल तसंच व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचतगटांना देण्याबाबत तसंच या सुविधा केंद्रांमध्ये शौचालये, हिरकणी कक्ष, हस्तकला विक्री केंद्रे, अल्पोपहार यासारखे स्टॉल उभारण्याबाबतचा प्रस्तावही सादर करण्याची सूचना तटकरे यांनी यावेळी आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षातील संभाव्य पाणी तसंच चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
यासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते.
विहिरींमधला गाळ काढण्याचं काम, तसंच नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्तीची कामं तातडीने हाती घ्यावीत.संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे भूजल पातळीत आणि पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे बुलडाणा इथे आयोजित राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादीत केलेल्या वस्तू, पदार्थांची विक्री स्थानिक ठिकाणी, तालुका तसंच शहरी भागात विक्री करावी. केवळ वस्तू उत्पादनावर भर न देता वस्तूची पॅकींग, मार्केटिंग आणि ब्रॅडींगवर भर द्यावा. यासाठी घरोघरी जाऊन आपल्या मालाची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवावी, असं ते यावेळी म्हणाले.
****
कृषिपदवीधरांनी उद्योजक बनावं आणि शेती क्षेत्राला नवी दिशा द्यावी असं प्रतिपादन अकोला इथल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केलं आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी इथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात देशभरातील कृषि विद्यापीठं आणि इतर प्रमुख संस्थांमधून ६०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
आईसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ब गटात आज दक्षिण अफ्रीका आणि इंग्लंड संघात सामना होणार आहे. या स्पर्धेत काल लाहोर इथला नियोजित ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आणि या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलिया ने ब गटातून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
0 notes
Text
सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ‘ त्या ‘ निलंबित नायब तहसीलदाराचा कारनामा उघडकीस
सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ‘ त्या ‘ निलंबित नायब तहसीलदाराचा कारनामा उघडकीस
निलंबित असलेल्या एका नायब तहसीलदाराने शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग करत बेकायदेशीरपणे परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवला असल्याचा प्रकार पाथर्डीत समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे. पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते हरिहर गर्जे आणि किसन आव्हाड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर एकच खळबळ उडालेली असून निलंबित नायब तहसीलदार अनिल…
0 notes
Text
पूर्णत्वाचा ध्यास असलेल्या अपूर्णतेत विलक्षण सौंदर्य असतं । #vidya
0 notes
Text
कै. सुभाष काळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार जाहीर
बार्शी : कै सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ कुलदैवत फार्म यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या जाणीव फाउंडेशन, जय शिवराय प्रतिष्ठान, त्रिमूर्ती प्रतिष्ठान, ऍनिमल फ्रेंड्स आर्यन क्रीडा व संशोधन संस्था मंडळ, उद्योजक रवीआण्णा राऊत, सतीश देशपांडे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सचिन वायकुळे, संत मन्मथ शिरोमणी सेवा मंडळ, ओन्ली समाजसेवा संस्था, माधवराव देशमूख, यांना पुरस्कार जाहीर…
0 notes
Text
आपल्या महान देशाला आणि आराध्यदैवत गणरायाला स्मरून कामाप्रती खऱ्या निष्ठेने जेव्हा आपण काम करत राहतो तेव्हा आपल्या कामाचे सार्थक होतेच.
समस्त महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट यांच्याद्वारे #जगदंब निर्मित प्रजासत्ताक दिनाचा बॅनर प्रत्येकवर्षी झळकतो. त्या कलाकृतीला उदंड स्वरूपात प्रेक्षकांची दाद मिळते. तेव्हा मनाला गणरायाच्या आशीर्वादाची प्रचिती येते, भारतमातेच्या शक्तीची प्रेरणा मिळते आणि उत्कृष्ट काम करत राहण्याची ऊर्जा मिळते.
ही अशी सर्वांची सेवा घडत राहो, अनेक कलाकृती मातृभूमी आणि गणरायाच्या चरणी अर्पण होत राहोत आणि आपल्या सर्वांचे प्रेम मिळत राहो एवढीच प्रार्थना!!
#धन्यवाद_दगडूशेठ
#धन्यवाद_सुवर्णयुग
#जगदंब
#प्रजासत्ताक_दिन #RepublicDay #india #26January #dagdushetganpati #shrimant

0 notes
Text
Entertainment Mix Masala: 'Mukkam Post Devach Ghar' Marathi Movie Trailer Brings Bollywood Masala.
Get ready for an entertainment mix masala with the trailer launch of 'Mukkam Post Devach Ghar' Marathi movie! Packed with Bollywood Masala, Bollywood Tadka, and exclusive celebrity interviews, this film promises to be a blockbuster. Stay tuned for all the updates!
#bollywood masala#entertainment mix masala#bollywood tadka#celebrity interviews#latest marathi movies#latest marathi webseries
0 notes
Text
वावरने आपल्या प्रमुख उत्पादन ‘वावर जादूगर’ चे केले अनावरण
शाश्वत कृषी नवकल्पनेत आघाडीवर असलेल्या वावरने वावर जादूगर हे अत्याधुनिक इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट (आयपीएम) तंत्रज्ञानावर आधारित आपले प्रमुख उत्पादन सादर केले आहे, जे भारतीय शेतकऱ्यांसमोरील कीटक व्यवस्थापनाच्या समस्या सोडवण्यासाठी डिझाइन केले आहे.
जादूगर पीक नुकसान करणाऱ्या कीटक प्रजातींना लक्ष्य करते आणि त्यांच्या जीवनचक्रामध्ये व्यत्यय आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र वापरते. हा उत्पादन संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने काम करतो आणि सूर्यास्तानंतरच्या संध्याकाळच्या ३-४ तासांमध्ये, जेव्हा कीटकांचा हल्ला शिगेला पोहोचतो, त्या वेळी प्रभावीपणे पिकांचे संरक्षण करतो. वावर जादूगर सौर उर्जेवर चालतो, त्यामुळे ते पर्यावरणपूरक असून शेतकऱ्यांसाठी कार्यक्षमतेच्या खर्चात लक्षणीय घट करते.
Read More
1 note
·
View note
Text
बारामतीच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी उभारा-उपमुख्यमंत्री अजित पवार - महासंवाद
बारामती, दि.५: छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले. श्री. पवार यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरूअसलेल्या…

View On WordPress
0 notes
Text
66. समर्पण की संघर्ष
जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे समर्पण आणि दुसरे म्हणजे संघर्ष. शरणागती म्हणजे युद्धात पराभूत झालेल्या शरणागतीप्रमाणे असहाय्य शरणागती नव्हे. हे जागरूकता आणि सक्रिय स्वीकृतीसह शरणागती आहे. इतरांपेक्षा पुढे असण्याचा विचार हा एक संघर्ष आहे. आपल्याला जे काही दिले जाते त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी; आणि आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा वेगळे काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे संघर्ष. समर्पण, दुसरीकडे, प्रत्येक जिवंत क्षणाबद्दल कृतज्ञता आहे.
श्रीकृष्ण म्हणतात, “जो पुरुष या जगात अशा प्रकार�� परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगां�� रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो” (3.16). इंद्रियसुखांच्या मागे धावणार्यासाठी हा कधीही न संपणारा जीवनसंघर्ष आहे. या संघर्षातून ताण, चिंता आणि दु:ख निर्माण होते, म्हणजेच आयुष्य व्यर्थ जाते.
श्रीकृष्ण पावसाच्या उदाहरणाने सृष्टीचे चक्र स्पष्ट करतात (3.14). पाऊस हा पाण्याच्या निःस्वार्थ कृतीचा एक प्रकार आहे जेथे पाण्याचे बाष्पीभवन होते आणि निःस्वार्थपणे पावसाच्या रूपात पडते. अशी निःस्वार्थ कृती ही सर्वोच्च शक्तीचा स्रोत आहे (3.15). नि:स्वार्थी कर्माच्या चक्रावर चालणे हे समर्पणाचे जीवन आहे जे आपल्याला आनंदित करते.
श्रीकृष्ण म्हणतात की, “जो माणूस आत्मरत असतो, स्वत:मध्येच त्याला आनंदप्राप्ती होते तो स्वत:बद्दल समाधानी असतो, आत्मतृप्त असतो, त्याच्याकरिता कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही” (3.17). इंद्रियांपासून स्वतंत्र असे हे आयुष्य आहे ज्यामध्ये अस्तित्वाव्यतिरिक्त इतर कोणत्याही इच्छा उरलेल्या नाहीत. नि:स्वार्थ कृती करीत असताना आपल्या वाट्याला जे काही येईल ते बिनदिक्कतपणे स्वीकारण्याचा हा मार्ग आहे. “त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही” (3.18).
‘स्वतःवर समाधानी’ ही गीतेतील मूलभूत शिकवण आहे की माणूस स्वतःमध्ये आनंदी असतो आणि स्वतःमध्ये समाधानी असतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी असते, तेव्हा आपल्या अधिकार आणि क्षमतांबद्दल कोणतीही तक्रार किंवा तुलना नसते.
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित एन एक्स टी संमेलनात सहभागी होत आहेत. या संमेलनात न्युज एक्स वर्ल्ड या वाहिनीचा शुभारंभही करण्यात येणार आहे. आय टी व्ही नेटवर्क आणि या संमेलनात सगळ्या श्रेणीतील लोकांना एका व्यासपीठावर आणत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एन एक्स टी फाउंडेशन ला आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या संमेलनात उपयुक्त विचार विनिमय होईल अशी आशाही व्यक्त केली आहे.
****
ईपीएफओअर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाने २०२४-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ ठेवींवर सव्वा ८ टक्क्यांचा व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे.ही शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. मंजुरीनंतर व्याजाची रक्कम ईपीएफओ खात्यात जमा केली जाईल.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध झाला. आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले अकरावी चे प्रवेश ऑनलाइन होत होते. इथून ��ुढे इयत्ता अकरावी चे सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत, प्रवेशाच्या पहिल्या चार फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जलशुद्धीकरण कामाचं देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी उपअभियंता करंजेकर विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा इथल्या कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यातील चिखली आणि लेंडेझरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण केली. केलेल्या कामाचं ९ लाख ८० हजार रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडे सुहास करंजेकर यानं लाच मागितली होती.
****
कोकणचा विकास आता थांबणार नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.कोकण सन्मान या कार्यक्रमात देवगड इथे ते बोलत होते. कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता आणि खाद्य संस्कृती यांचं चित्रीकरण सामाजिक माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या कोकणातील रील क्रिएटर्सचा सन्मान कोकण सन्मान कार्यक्रमातून राणे यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ सिने नाट्य कलाकार विद्याधर कार्लेकर, ठाकर लोककला जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावणे आणि अखंड समाजसेवेचाव्रत घेतलेले दयानंद कुबल यांचा विशेष सन्मानही या कार्यक्रमात करण्यात आला.
****
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून राज्य सरकारनं चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी वकीलांशी समन्वय साधणं, सीमा भागातल्या मराठी भाषिकांचे प्रश्नसोडवणं, याकरिता ही नियुक्ती केली आहे.
****
आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे महाशिवरात्र महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असलेल्या श्री नागनाथ प्रभूंचा रथोत्सव सोहळा आज साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं औंढा इथं दाखल होत आहेत. मंदिर संस्थानकडून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
नांदेड इथं ग्रंथोत्सवाचा आज समारोप होणार आहे. काल सकाळी ग्रंथदिंडीने या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पुस्तका��ची अनेक दालनं याठिकाणी उभारण्यात आले असून, विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत धाराशिव इथं उद्या रविवारी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम इथून या फेरीला सुरुवात होणार आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांच्या पुनर्मूल्यांकन अर्जाची मुदत पाच मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल १९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. त्यानंतर पुनर्मूल्यांकन अर्ज करण्याची मुदत दोन मार्च पर्यंत देण्यात आली होती, ती वाढवण्यात आली आहे.
****
अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी तसंच अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्याच्या दृष्टीनं राज्यात २८ फिरत्या प्रयोगशाळा देण्यात येणार आहेत. औषध प्रशासन आणि विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल नागपूरमध्ये या विभागांच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ही माहिती दिली. प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्नचाचण्या विहित मर्यादेत कराव्यात, असे निर्देश, आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
0 notes
Text
स्वारगेट स्थानकातील 23 सुरक्षा कर्मचाऱ्यांचे निलंबन, आरोपी ऊसात लपल्याची शक्यता असल्याने..
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून पहाटेच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकातील एका बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झालेला आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली असून गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही…
0 notes
Text
पूर्णत्वाचा ध्यास असलेल्या अपूर्णतेत विलक्षण सौंदर्य असतं । #vidya
0 notes